अधांतर

अशीही एक अवस्था येईल
जेव्हा आपण एकमेकांशी फॉर्मली बोलु

बोलयचंच असतं म्हणून
आणि किंवा आपल्याला 'पोचणारच' नाही
एकमेकांचं बोलणं

अशीही एक अवस्था येईल
आपल्या नात्यात
जेव्हा
आपल्याकडे बोलायलाच काही नसेल

तुला माहितेय का?
अशीही एक 'अधांतर' अवस्था येईल

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिली ३ कडवी आवडली. पण तद्दन समीक्षकी भाषा वापरायचं पाप करायचं तर, शेवट कवितेच्या मानानं अजून थोडा उंच जायला हवा होता. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन