रामनाम लेखन जपयज्ञ वही

डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.

भारतवारीत जशा मी भेटवस्तू दिल्या, तशाच मला भेटवस्तू मिळाल्यासुद्धा. या सर्व भेटवस्तूंमध्ये मला एक कुतूहलपूर्ण अशी लहानशी भेट मिळाली. एका मैत्रिणीच्या, ७६ वर्षिय आईकडून. ती म्हणजे 'रामनाम मंत्र जप यज्ञ वही' व २ लाल रंगाची बॉलपेने. या वहीत १००-२०० पाने असतील प्रत्येक पानावरती एकूण ३९ बाय १३ अशा ५०७ रिकाम्या चौकटी आखलेल्या असून, प्रत्येक चौकटीमध्ये तुम्ही लहान अक्षरात हवे ते लिहू शकता . प्रत्येक चौकटीं मध्ये 'श्रीराम' हा शब्द लिहावयाच्या उद्देश्याने, जेमतेम त्या आकाराची प्रत्येक चौकट आहे. लाल रंग शुभ असल्या कारणाने लाल रंगात लिहीण्याचे सुचविलेले आहे. या वह्या नंतर देवळांमार्फत हरीद्वारला जातात व मंदीरांच्या पायाभरणीमध्ये त्या पुरल्या जातात.
मला काही प्रश्न पडलेले आहेत -
(१) असे रामनाम लिहीणे, जप करणे हा रिकामटेकडा विरंगुळा आहे का?
- माझ्या मैत्रिणीच्या आई विधवा असून, निवॄत्तीपरान्त, शांत व निवांत आयुष्य जगत असून , खाण्यापीण्याची अतोनात कडक बंधने त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत. मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.
(२) मी स्वतः ४ पाने भरुन पाहीली. सलग एक पान अ‍ॅट अ टाइम पूर्ण केले. संमिश्र अनुभव आला.
- ३ वेळेला, मला जाणवले की मनात सकारात्मक व मन निवळवणारे विचार येतात. चांगलेच विचार येतात. एका वेळेला मात्र संमिश्र विचार आले - गॉसिपी, सकारात्मक, mundane तीन्ही प्रकारचे. मात्र चारही वेळेला एक संवेग अर्थात फ्लो व सहजता साधत असल्याचे अनुभवास आले. एक पर्पझ ड्रिव्हन अ‍ॅक्टिव्हीटी असल्याचा अनुभव आला. की हे पान आपल्याला पूर्ण भरायचे आहे, हा तो पर्पझ. त्यातून एक आनंद मिळाला.
(३) सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे
- सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय? उदा - डिप्रेशन/अवसादात सुडोकू चा वापर करावा ज्यायोगे, मेंदू अ‍ॅक्टिव्हेट करणारी रसायने अधिक निर्माण होतील याउलट उन्मादामध्ये, रामनामामुळे शांत वाटेल - वगैरे प्रकारचा काहीही रिसर्च माझ्यातरी पहाण्यात आलेला नाही. पण ते तसे नसेलच अशी गॅरंटी नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे. कोणी विदा जमविल्यास, विश्लेषण केल्यास, पूर्ण संशोधनांती काही हाती लागू शकेल.
सुडोकू खेळणे किंवा तत्सम मेंदूस चालना देणारी अ‍ॅक्टीव्हीटी व रामनाम लेखन जपयज्ञ या म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह अ‍ॅक्टिवीटीज आहेत असे मला म्हणायचे नसून, मी फक्त तुलनात्मक दृष्टीकोनामधून दोन्हींकडे पहात आहे.
(४) कोणी हा लेखन यज्ञ 'कन्सिस्टंटली ( चिकाटीने )' केलेला असल्यास, तुमचा अनुभव काय आहे?
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे. रामनाम लेखनाचा अनुभव नाही. एक दोन वेळा मनाचे श्लोक लिहून काढलेले आहेत. मनाचे श्लोक वेगळे. ते लिहीताना, मनात रुजू लागतात. पण हे जे 'रीपीटीटिव्ह' श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे आहे, तो नक्की वेगळ्य प्रकारचा अनुभव आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अजुन एक मुद्दा- प्रत्येक व्यक्ती तिच्या कलानुसार, आकलनानुसार, दिवसभरातील घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न करीत असते मीही अपवाद नाही. ही वही मला मिळाली ती तारीख व वेळ याची कुंडली मांडली असता पुढील नीरीक्षण दिसले.

ही कुंडली माझ्या कुंडलीशी (लग्न=मिथुन) मोठ्या प्रमाणात, रेझोनेट होते (निदानपक्षी तसे मला माझ्या अर्धवट ज्ञानामधुन वाटते तरी. असो.) सातवे घर हे गुरुचे घर असते कारण तुमचे गुरु तुमच्या समोरासमोर आसनस्थ असतात. जर कुंडलीतील, लग्नस्थान म्हणजे तुम्ही असाल तर, अर्थात बरोब्बर तुमच्या समोरचे स्थान हे गुरुचे असते. सातव्या घरात या विशिष्ठ वेळी बरीच घडामोड असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मला या लेखनाच्या बाबतीत खरच जाणून घ्यायचे आहे. मूळ नक्षत्रामध्ये गुरु व सूर्य असून, काहीतरी 'आमूलाग्र बदलाचे निदर्शक' किंवा एखाद्या बाबीच्या मूळाशी जाउन तपास करण्याचे हे नक्षत्र निदर्शक आहे. थोडक्यात,जिगसॉ पझलचे बरेच तुकडे माझ्याकरता, फिट बसताना मला तरी दिसत आहेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१) उपक्रम आणि त्याचे परिणाम शोधण्याची उत्सुकता आवडली.
२) श्रीराम-श्रीराम-श्रीराम लिहीणे तर अशा वह्या साडुंना कुणी दिल्या होत्या दहा बारा वर्षांपूर्वी. रोज दोनचार पाने ते लिहीत. वही भरली की बदलून दुसरी आणत. हे रिटायरमेंटनंतर केलेले उद्योग. वेळ जाणे हा त्यांचा हेतू होता. मग गावच्या घरी छोटे दुकान टाईमपास म्हणून चालवले. तर वेळ घालवणे हा उद्देश बरोबर वाटला त्यांना.
त्यांची वही पाहिल्यावर छान वाटायचे कारण अक्षर एका सुबोध वळणाचे सुंदर होते.
((मी त्यांना म्हटले की कुणाला रामरक्षा किंवा इतर पोथ्या तुमच्या हस्ताक्षरी उतरवून दिल्यात तर वेळही जाईल आणि त्यांना आठवण अधिक बारीकसा इन्कम म्हणून प्रकल्प आवडेल. ))
// मी असले उद्योग करणार नाही कारण तीन - श्रद्धाळू नाही, इतर खटपटे उद्योग आहेत आणि माझे अक्षर पाहून "ही वही खरोखरच जमीनीत लवकर गाडा" म्हणेल.//
३)प्रश्न कुंडलीची कल्पना आवडली.

माझ्या मते
अ) गूढतेकडे आकर्षण आहे का नाही याचे उत्तर - होय.
ब) काम तडीस नेणार का ?नेऊ शकणार का? होय,होय.
क) श्रद्धेने करणार का? नाही. किंतू उत्पन्न झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद च्रट्जी.
>>>> माझे अक्षर पाहून "ही वही खरोखरच जमीनीत लवकर गाडा" म्हणेल.//>>>> हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न कुंडलीचे भाकित काढून टाकू का? पटकन लिहिले गेले. ऐसीवर हवे/नको?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कशाला काढताय? असू दे की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे त्यांनी बायपोलर किंवा काहीतरी मानसिक विकाराच्या लक्षणांवर असेच अन्यत्र मन लावणारे गोसेवा वगैरे मार्ग सुचवले होते तेव्हा त्यांना बिचाऱयांना चांगलीच सज्जड जगजाहीर तंबी मिळालेली असल्याने ते ताकही फुंकून पिणारच. Wink

बाकी लेखात लिहिलेलं रामनाम लेखन करून लाखो वेळा रिपीट लिहून वह्या भरणारे लोक पाहिले आहेत. मन ज्यात रमतं ते काहीही कोणीही करावं. त्याला काय करणार इतर लोक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय गवि बरोबर. माझ्याही ते लक्षात आले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोशल साईट सावधानता बाळगण्याचा निर्धार करण्याच्या विचारात आहे उद्यापासून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंका: रामनामाचेच लेखन जर करायचे आहे, तर मग 'रामनाम सत्य है|' असे असंख्य वेळा लिहिले, तर चालेल काय? कारण त्यातसुद्धा रामनाम आहेच की!

निवॄत्तीपरान्त

इतकी फाईट मारून 'निवॄत्ती' कशापायी? साधी निवृत्ती चालली असती की! नव्हे, बरोबर ठरती.

अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना

या सहजसुलभ वासनांमध्ये नक्की काय वाईट आहे? (हं, आता थोड्या गुंतागुंतीच्या वासनांची गोष्ट वेगळी. म्हणजे, त्यांतसुद्धा काही वाईट आहे, अशातला भाग नाही, परंतु तेथे रामनाम उपयोगाचे नाही. तेथे चित्तवृत्तीनिरोधाकरिता कदाचित वेगळी साधने पाहिजेत. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>या सहजसुलभ वासनांमध्ये नक्की काय वाईट आहे?>>>> वाईट काहीच नाही. पण एकंदर त्या काहीही बाहेरचं खातपीत नाही, साध्या रहातात, याचा त्यांच्यापेक्षा अन्य लोकांनाच अभिमान असल्याचे निदर्शनास आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एकंदर त्या काहीही बाहेरचं खातपीत नाही, साध्या रहातात, याचा त्यांच्यापेक्षा अन्य लोकांनाच अभिमान असल्याचे निदर्शनास आले.

अरे बापरे!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्ती दीर्घकाळ राहावी म्हणून 'निवॄत्ती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो 'निवॄत्ती' मधील 'वॄ' चुकून तसा पडला आहे. बाकी नोकरीमधुन त्या निवृत्त झालेल्या आहेत असे म्हणायचे होते.
___________
ओह दीर्घ वृ बद्दल म्हणताय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन भरकटू नये - उदा अमके खावे/तमके ल्यावे अशा सहजसुलभ वासना, या वहीचा उपयोग होत असावा असा कयास.>>> हे माईंड डायवर्टिंग टेक्निक आहे. CBT मधे या प्रकारची (व्यक्तिसापेक्ष पर्याय) टेक्निक वापरतात.
सुडोकू खेळणे व रामनाम लिहीणे, यामध्ये तत्वतः फरक आहे हे मान्य आहे. सुडोकूमध्ये मेंदूला चालना मिळते, तल्लखता जाणवते. याउलट रामनाम लिहीण्यामध्ये (मनात जप करत करत) एक शांत सहज संवेगाचा अनुभव येतो. या दोन्हीमध्ये क्वालिटेटिव्ह फरक काय?>>>> दोन्ही मंत्रचळ. फक्त त्रासदायक ( कुणी नकारात्मक म्ह्णू शकत) विचारांच्या साखळीतून (मंत्रचळ) सुटका मिळ्ण्यासाठी काउंटर मंत्रचळ.
मला स्वतःला स्तोत्रे म्हटल्याने फार बरे वाटते. पण त्या मागे शब्दप्रेम, नादाची भुरळ या बाबी आहेत हे मान्य आहे.>>>> बर वाटण मह्त्वाच आहे. कारणमीमांसा हा बौद्धिक खेळ खेळल्याने थकवा आला की कराव हे. बाकी ऐसीवर मेंदुवरची भरपूर बौद्धिके आहेतच.
ही सामो ना यडपट आहे अस कुणीतरी कुजबुजतय.मला आल ऐकायला. Lol Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>>>>>>>ही सामो ना यडपट आहे अस कुणीतरी कुजबुजतय.मला आल ऐकायला. LolLol>>>>>> हाहाहा
>>>>>>>CBT मधे या प्रकारची (व्यक्तिसापेक्ष पर्याय) टेक्निक वापरतात.>>>> ओह. CBT = कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी, वाटतं. आत्ता शोधल्यावर, फुलफॉर्म सापडला.
मला लहानपणचे आठवतय. तांदूळातील खडे वेचून, काढून टाकताना, मी असे समजत असे की एकेक खल प्रवृत्तीची व्यक्ती जगातून नाहीशी होतेय. किती लहान होते तेव्हा पण आनंद मिळे. (५ वी पासून आईला मदत करत असे बहुधा)
__________________
आई रोज झोपताना, एक गोष्ट सांगे. आज कोणती गोष्ट ऐकायची आहे असे विचारी. शहाणी मुलगी की वेडी मुलगी? त्या गोष्टींमधून ती संस्कार करत असे. परंतु त्यामुळे, जग हे ब्लॅक किंवा व्हाईट असे २ च रंगात पहाण्याची सवय लागलेली असावी. त्यातून हे खलनिर्दालनाचे सुलभीकरण केले गेलेले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामस्तुती रामनाम हा माझ्या भावजीवनाचा एक भाग आहे.आमच गावी राममंदीर आहे.गीत रामायण गावा़कडे रेडीओवर ऐकत असू. आपला रामनवमी उत्सव लई भारी असायचा. सारवलेले मंदिराचे प्रांगण, मांडव डहाळे टाकून, सडा टाकून सजवलेले अंगण व ओटा, त्यावर पडलेली मोगरा,जाई व पारिजातकाची फुले , रामजन्माला आलेली गावकर्‍यांची अलोट गर्दी. दत्तु आरोट्याचा लाउस्पीकर लाऊन त्यावर रामजन्माचे किर्तन होई.त्याने गीतरामायणाची यल्पी( ग्रामोफोनची लांब तबकडी) पण आणली होती. राम सीता लक्षमण यांच्या मूर्तींना इतके विलक्षण पद्ध्तीने सजवले जाई कि मुर्तीतला राम हा जणु खरा धनुर्धारी रामच भासे. (रामाच्या अलंकाराची , वस्त्रप्रावरणाची वेगळी पेटीच् होती) पण हा उत्सव खरे तर भाउबंदकीतल्या ईर्षेतून व्हायचा . राममंदीर घाटपांड्यांचे कि सार्वजनिक असा तो वाद दोन पिढ्या चालला होता. त्याची कागदपत्रे इतिहासही अयोध्येच्या राममंदिरासारखा वादग्रस्त होता तसेच रोचक होता तो शेवटपर्यंत खर्‍या अर्थाने मला समजला नाही. मंदिर? त्या संबंधीत असलेली जमीन? त्याचा व जनामास्तर यांचा संबंध?(जनामास्तर आमच्या गटातले) आपल्या पक्षातले कोण शत्रू पक्षातले कोण? असे अचंबित प्रश्न मला त्या काळी पडत. मी काही विचारले की अजुन तू लहान आहे असे उत्तर मिळे.कोर्टात आमचे चुलत आजोबा या मंदिराच्या मुर्ती या कै. लक्ष्मीबाई हरी (कोम) जाधव यांनी बसवलेल्या आहेत असे प्रतिपादन करित.( हे कंसातील कोम काय दर्शवायचे कुणास ठाउक?) आमचे आजोबा म्हणत कि हे मंदिर सर्व घाटपांड्यांचे आहे. ते राममंदिर आमचे घर आणि आमच्या चुलत आजोबांचे घर यात सँडविच झाले होते. कोर्टात वाद प्रतिवाद वर्षानुवरषे चालूच होते.मंदिरालगत एक आड असा जुन्या कागदपत्रात उल्लेख होता. त्याची खातरजमा करण्यासाठी न्यायमुर्ती स्वत: आले होते. आयताकृती मंदिराच्या डायगोनली अपोझिट दोन आड होते एक आमचा व एक चुलत आजोबांचा.(जुडवा भाई सारखे) न्यायमुर्ती चक्रावून गेले खरा आड कोणता?(इकड आड तिकडे विहिर अशी अवस्था) शेवटी तो निकाल वडिलांचे हयातीत आमच्या बाजूने लागला आणि वडिल म्हणाले " आता मंदिर सार्वजनिक झाले तरी हरकत नाही. शेवटी देव सर्वांचाच आहे. तसही मंदिर हे सर्वांसाठी खुलच होते"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>>>> रामस्तुती रामनाम हा माझ्या भावजीवनाचा एक भाग आहे.>>>>>>सुंदर!
आमच्याही घरी राम व दास-मारुतीची एक तस्वीर होती. बाकी पूजा कोणी करत नसे. पण मामाकडे, अंगणातली फुले वेचून आणून, ते देवांना आंघोळ, पंच्याने मूर्ती पुसणे, अष्टगंध उगाळून लावणे, प्रसाद अशी पूजा होत असे. मामाकडे रहायला गेले की ती पूजा करण्याची संधी मला मिळत असे. अतिशय आवडे.
पहाटवेळी वाड्यातील, टपोरी फुले - तगर-मोगरा-प्राजक्त इतकी प्रसन्न दिसत. जणू काही सुगंधी माणिक-मोती. नंतर ती जपून वेचून आणणे, अष्टगंध सहाणेवर उगाळणे. प्र-ह-चं-ड आवडत असे. सुगंध-स्पर्श-नयन मनोहर देव-स्तोत्रे व शेवटी प्रसादाचे गोडमिट्ट दूध अशी पंचेद्रियांना सुखावणारी लयलूट असे ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंदिराची मालकी कुणाची हा वाद होतातच. मंदिर बांधलेली जमीन कुणाची आहे ते ठरवतात/ठरवले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेंटॅलिस्टमध्ये डायलॉग आहे. गोल्फकोर्सवर मेंटॅलिस्ट पॅट्रिक जेन आणि थेरेसा हे तपास करायला गेलेले असतात. तिथे जेन म्हणतो, "Nothing but giant mind washing machines. Swing, swing and swing. Anything this repetitive in nature clears the mind."
तसंच रामनाम लिहीणे हे असावं. त्याबरोबर बालपणापासून रामनाम लिहीणे म्हणजे काहीतरी भन्नाट पुण्यवान (एकैकमक्षरंपुसा-) आणि शुभ हे मनावर बिंबवलं गेलं असल्यामुळे त्यात काही टाईमपास केल्यासारखी भावना येत नाही.
बाकी तुम्ही घराचं डीप क्लिनींग करा, चित्रे काढा, संगीत ऐका सगळं एकच.
देवबिव म्हणजे इतर रिकामटेकड्या लोकांना आपल्या कंपूत ओढायची सगळ्यात जुनी पिऱ्यामिड श्कीम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

>>>> सगळ्यात जुनी पिऱ्यामिड श्कीम.>>>> Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेलं वर्षभर कामात असल्यामुळे मला बागकामाबद्दल उगाच इंटरनेट-टाईमपास करायला जमत नव्हतं. आता थोडा वेळ आहे; कामं नाहीत असं नाही. बाकी काही नाही तर ग्रंथालयातून दोन पुस्तकं आणल्येत, दोन डीव्हीड्या आणल्यात. एक पुस्तक पुढच्या आठवड्यात परत करायचं आहे; तो विषय फार आवडतो; पण पुस्तकाची ४००+ पैकी जेमतेम एक चतुर्थांश पानं वाचून झाल्येत.

तरीही मी काल दोनेक तास बागकामाबद्दल वाचन करत बागडत होते. झोप आली तेव्हा थोडा अपराधगंड आला. कामंधामं सोडून, वाचायची पुस्तकं तशीच सोडून मी वेळ फुकट घालवला, असं वाटलं. मग मोठ्या कष्टानं स्वतःला समजावलं की, ठीक आहे. आज वेळ घालवला, त्याला सुट्टी म्हणावं आणि उद्यापासून पुन्हा वाचन-लेखन वगैरे कामाला लागावं. काय ट्रिगर मिळाले की मी असा वेळ घालवते त्याचा विचार करावा आणि ते ट्रिगर टाळावेत. थोडी सुट्टी घेणं म्हणजे गुन्हा नाही; थोडी सुट्टी घ्यावीच. ती सुट्टी थोडीच असेल तोवर चांगलंच आहे.

आज सकाळी उठून बागकामाबद्दल वाचण्याजागी कामंधामं सुरू केली. आता सुट्टीची गरज वाटेस्तोवर जंक रिडींग बंद.

बागकाम हा प्लेसहोल्डर, इंटरनेट-जंक-रिडींग हाही प्लेसहोल्डर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझं म्हणशील तर मला थोड्याही बौद्धिक ॲक्टीव्हीटीचा ओव्हरलोड होतो. I have no idea as to why that happens. जिथे लोक अनेक मुद्दे काढू शकतात, वाद-प्रतिवाद करु शकतात, तिथे मला मुद्दे काढायला फार श्रम पडतात. गणीत अतिशय आवडते. गणिताचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ क्वचित पॅरॅबोला, लसावि, मसावि, नंबरस, ग्रुप थिअरी वगैरेचे वाचन केले तर मजा व पुनरेकवार ॲकंप्लिशमेन्ट वाटते पण वाद-विवादात गती नाही. आता हे औषधांमुळे झालेले असण्याची खूप शक्यता अहेच. झाली आता १४-१५ वर्षे औषधे सुरु होउन.
अजुन एक डोळे मिटून विश्वास ठेवण्याच्या एका जागेची आवश्यकता वाटते. उदा - गुरु. तिथे आपला तर्क चालवायचा नाही. मिलिटरी रुल. हां असे जिवंत व्यक्तीबाबत करणे धोकादायक ठरु शकते. तेव्हा गतकालातील व्यक्तीच हवी असे मनाशी नक्की होते. त्यातही पुन्हा चारित्र्य व शिकवण वाचून स्वच्छ्, विमल आदि गुण आहेत का याची पहील्यांदा चाचपणी झालीच.
_____________
ऐकूही कमी येतय. डॉक्टरांना दाखवायचे आहे. त्यातून सोशल आयसोलेशन होत असावे. मुलगी नॉर्मल आहे म्हणजे तिला वादात भाग घ्यायला आवडते. तिला बौद्धिक बाबी आकर्षित करतात. नवरा व ती तासंतास राजकारण, करीअर, भविष्यातील तिचे ऑप्शन्स यांवर वाद घालतात. मला ते जमत नाही. समोरच्याचे म्हणणे/मुद्दे डायजेस्ट करायलाच इतका वेळ लागतो की आपले काढणार कधी व तसं पाहता सुचतही नाहीत.
________________
कासव जसे अवयव कवचाच्या आत ओढून घेते तशी, किंचीत सोशल आयसोलेशनची सुरुवात असू शकते. मला ते नको आहे आणि त्याकरता नक्की काय करायचे ते कळत नाही. आईला डिमेन्शिआ सुरु झालेला तेव्हा तिच्या व्यक्तीमत्वात फार मोठा बदल मला जाणवला होता. माझ्या व्यक्तीमत्वात तसा बदल नाही याची बऱ्यापैकी खात्री आहे. तेव्हा तसा काही ऑनसेट होपफुली नसावा. मध्यंतरी एका डॉक्टरांना 'डिमेन्शिआ टेस्ट' बद्दल विचारलेले होते तेव्हा त्यांनी अशी काहीही टेस्ट नसल्याचे सांगीतलेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक डोळे मिटून विश्वास ठेवण्याच्या एका जागेची आवश्यकता वाटते.

म्हणूनच आमच्याकडे तिर्री आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


अजुन एक डोळे मिटून विश्वास ठेवण्याच्या एका जागेची आवश्यकता वाटते

.>>> आमच्या राममंदिरात मी श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र म्हणत दोन्ही डोळे मिटून ध्यान करीत राम प्रसन्न व्हायची वाट पहात असे. कंटाळा आल्यावर हळूच एक डोळा बारीक उघडून राम मुर्तीतून प्रकट झाला आहे का हे पहात असे. उगाच प्रकट झाला त्यावेळी आपले लक्ष नव्हते असे व्हायला नको ना! प्रसन्न झाल्यावर वर माग असे सांगितले तरी आपण काही मागायचे नाही हे ठरवले होते.म्हणजे आपल्या निस्वार्थीपणावर खूश होउन राम आपल्याला भरपूर काही देईल ही अपेक्षा. एकदा मूर्तीचा हात हलल्यासारखे वाटले व आपल्या ध्यानाच्या पॉवर मुळे ते झाले असे मला वाटले.वडिलांना सांगितले तर त्यांनी असे काही नसते असे सांगितले. आमच्या राममंदिरात जे वाड्याला लागून आहे त्याच्या मागे एक आड आहे.तिथे काहीतरी भूतबीत आहे असे वाटे. आड आणि मंदिराचा गाभारा यात मोठ्या हॊल सारखे अंतर आहे.तेथे कपडे दोरीवर वाळत टाकलेले असत. ते वाळल्यावर काढून आणताना मी फक्त स्वतःची चड्डि व टॊवेल घेउन पटकन राम राम म्हणत पळून येत असे. असे करताना कोणी आपल्याला पहाणार नाही याची दक्षता घेत असे.
तोच मी चुलीतील राख घेउन तो रामरक्षा म्हणत ती राख चोळत चोळत त्याचा अंगारा बनवत असे. राख चोळताना रामरक्षेची पॊवर त्या राखेत उतरते असा समज असल्याने जोरात चोळली जास्त पॉवर येत असणार असे वाटे. भूताखेतापासून दूर राहण्यासाठी तो अंगारा इतरांना देत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हाहाहा मजेशीर अनुभव आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामस्मरण म्हणजे निष्क्रियता नव्हे - हे वाक्य सत्य आहे की असत्य? असल्यास का , नसल्यास का नाही? Can there be such thing as 'TOO MUCH' नामस्मरण?
किंतु/परंतु जेव्हा मिटतील तेव्हा मनाचा निश्चय होइल. हे असे किंतु, या शंकाकुशंका त्रास देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोप आहे. आपल्याला उपयोग झाला तर सक्रिय अन्यथा निष्क्रिय. हे ठरवण्याचे अधिकार अर्थातच आपले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामस्मरण हे थकलेल्या जीवासाठी योजना असावी. इतरांसाठी too much नाही पण unwarranted अवांछित म्हणता येईल. ((जसे ध्यानध्यारणा करणाऱ्या सन्यासी लोकांसाठी योग. बसल्या ठिकाणीच हातपाय शरीरास व्यायाम.))
भीती वगैरे घालवण्यासाठी रामनाम कशाला? कुठेतरी वाचलेलं - बहुतेक गोंदवले महाराज चरित्रात त्यांना माडीवर जाताना भूत दिसलेलं. ( संत चरित्रात वाचले की भूत दिसणे ही देव दिसण्याअगोदरची पायरी आहे. यामुळे लहानपणी भूत दिसण्याची आस लागली होती. पण बिचारे भूत, त्याला पुढे गती नसावी. ))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोबाईल फोन किंवा आय पॅडवर लिहिले तर चालेल का?

कॉपी -पेस्ट करून खूप जास्तं वेळा राम राम लिहिता येईल, त्यामूळे पुण्य पण जरा ज्यास्तं मिळेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

>>>त्यामूळे पुण्य पण जरा ज्यास्तं मिळेल>>> तुम्ही जिनियस आहात. कीप इट अप.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणायचे होते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उंगली टेढी किये बिना घी/मख्खन नही निकलता।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Excelमधले fill the cells?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉपीपेस्ट करून geometric progressionमध्ये लिहिता येईल. म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, वगैरे. (किंवा, बेटर स्टिल, एकाचे दहा, दहाचे शंभर, शंभराचे हजार, वगैरे. किंवा असे काहीतरी.) झटक्यात रामनामाचा avalanche!

कल्पना बेहद्द आवडली.

..........

मराठीत, झटक्यात१अ रामनामाची दरड१ब कोसळेल१क, असे म्हणता येईल.

१अ राम हे हिंदू दैवत असल्याकारणाने दरड झटक्यातच कोसळेल, हलालात कोसळणार नाही, हे ओघानेच आले.

१ब ते 'हिमप्रपात' वगैरे आपल्याला आवडत नाही. शिवाय, महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे.

१क नंतरनंतर कॉपी करण्यासाठी एवढा प्रचंड चंक मेमरीत ठेवताना किंवा तो मेमरीतून पेस्ट करताना मशीनसुद्धा कोसळेल, ही बाब अलाहिदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक ट्रिलीयन ट्रिलीयनवेळा लिहून झाल्यावर एक रामकॉइन निर्माण करता येईल का?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामनामाच्या महिमा अपार आहे.

तुमचं मशीन सुरक्षित राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण या भागात काही अफाट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कळलं नाही. सर्वच भाग उत्तम आहेत - माझ्या मते.
__________
प्रतिभा ताईंचा इन्टर्नलाइझ झालेला अनुभव म्हणजे सार आवडले. बाकी परिक्रमा कराविशी अजिबात वाटली नाही. जिथे स्वच्छतागृह नाहीत अशी कोणतीही ट्रिप आवडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिमालयात ओर्गनाइज केलेले ट्रेक सोडल्यास इतर ट्रेकमध्ये टॉयलट्स नसतातच. सह्याद्री त वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0