मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०६
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
गेल्या काही दिवसांपासून ऐसीवर
गेल्या काही दिवसांपासून ऐसीवर लिन्क क्लिक केल्यास भलतीच पेज उघडतात असा अनुभव येत आहे. विंडोज १० + फायरफॉक्स ब्राउझर.. नेहमी होत नाही. विशेषत: २ नवे प्रतिसाद मधील २ वर क्लिक केल्यास असे होते.
इतरांना असे आढळले आहे का?
मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर मध्येही असे झाले..
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जाहिराती?
भलती म्हणजे कोणती? 'ॲडवेअर'सारखा प्रकार होतोय का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
होय
होय
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हो
क्रोम मधे होते. (विंडोज १० आणि अँड्रॉईड) .
माझ्या फायरफॉक्समधे "नोस्क्रिप्ट" आणि "यू व्लॉक" लावलेले आहेत (कदाचित त्यामुळे) - तिथे असे होत नाही.
माझ्या मोबाईल / लॅपटॉप मध्ये व्हायरस / ॲडवेअर / मालवेअर नाही याची खात्री केली आहे. दोन्हीकडे क्रोम अनइन्स्टॉल / रीइन्स्टॉल करूनही उपयोग झाला नाही.
मॅक+सफारी
मला असा अनुभव मॅक+सफारीवर येतो. परंतु कारण समजत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अजून नाही. जाहिराती नाहीच.
अजून नाही. जाहिराती नाहीच.
-------------
३१-१-२०२०
आपल्या माहिती मध्ये काही उणीव राहू नये, चहूबाजूंनी ज्ञानी होण्यासाठीच गूगल झटत असते ना?
पण माझ्या मोबल्यातल्या क्रोमवर भलती पेज न येण्याचं कारणही मला तपासलं पाहिजे.
आता मेन बोर्डावर या
आता मेन बोर्डावर या धाग्यापुढे ६ प्रतिसाद ३ नवीन असे दिसले. त्या तीन वर क्लिक केल्यावर हे पेज उघडलं.
https://playoverlyprogressivefreeware.icu/EOzP-gRnrldballRz5Kju2Id_9ioZs...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
स्ट्रेंज!
मला अजिबात माहीत नाही हे का होतंय. ह्या लिंकेवर क्लिक केल्यावर मला ४०४ एरर कोड दिसला.
मी ॲडब्लॉकसकट फाफॉ वापरते. फोनवर ॲडब्लॉक नाही, पण फोनवरूनही अशा लिंका उघडत नाहीत. माझ्या फोनवर असल्या लिंका उघडल्या म्हणून मला ते थांबवता येईल असंही नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
https://aisiakshare.com
थत्ते तुम्ही https://aisiakshare.com वापरताय ना? कारण, ते https झाल्यापासून जाहिरातींची पानं उघडल्याचा अनुभव मला अद्याप तरी आलेला नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कधी झालं HTTPS?
कधी झालं HTTPS?
पण ते कुलूप केव्हा दिसेल अड्रेसपुढे?
HTTPS
काही दिवस झाले.
काही प्रतिमांचे पत्ते अद्याप बदलायचे आहेत एवढंच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद.
धन्यवाद.
GoDadiकडे काम दिलं वाचलं होतं.
कंटाळा आला....
ते हातानं बदलणार होते. पण फार काम वाढायला लागलं. ह्या आठवड्यात वेळ झाला की कोडनं जबरदस्ती बदलेन...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही.मला हेच्टीतीपीएस झालेलं
नाही.मला हेच्टीतीपीएस झालेलं माहिती नव्हतं.
धन्यवाद.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
झालं का झालं? झालं.
आता पुन्हा अशी अडचण आली तर सांगाल का? आता सक्तीनं httpsवरच जाण्याचा कोड वाढवला आहे.
झालं का झालं? झालं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो
झालं झालं. आता नाही येत ॲडवेअर.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हिरवं कुलुपही लागलं.
हिरवं कुलुपही लागलं.
माझ्या क्रोम सेटिंग्ज मध्ये
माझ्या क्रोम सेटिंग्ज मध्ये
Do not track, - ON
Android System synchronise - OFF.
ई पेपराच्या बुकमार्कचा लोगो
ई पेपराच्या बुकमार्कचा लोगो हा चष्मेवालं पिवळं घुबड ठरलेलं आहे का?
गाण्यांचा अर्थ
गाणं ज्या पिक्चरात आहे, तो बघितला नसला तर अर्थ कळत नाही. म्हणजे situation काय आहे हे कळत नाही. पण तरी गाणं आवडतं. गाण्यांचा अर्थ, situation सांगणारी एखादी साईट आहे का कोणाला माहित?
खरंय
मलाही अशा साईटची गरज आहे.
बोले तो दर्दभरी वा भावना-बंबाळ करणाऱ्या गाण्यांबाबत आपल्याला म्हणायचंय का? म्हणजे अशी गाणी बघून अजून दर्द कळावं म्हणून पुन्हा पिच्चर पाहायचे असे उद्योग काही काळापूर्वी केले होते. आता ते सगळं बेचव वाटतं.
माझ्या मते, गाण्याची परिस्थिती कळली तरी गाण्याच्या रसात फारशी वाढ होत नाही. उलट कधी कधी असलेला वा बनलेला रसच ऐन गाण्याच्या वेळी धोका देण्याचा संभव असतो. असो.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
.
.
भारत ग्रीस होण्याच्या वाटेवर
भारत ग्रीस होण्याच्या वाटेवर आहे का? पुढे काय?
--
टेलिफोन आणि इतर काही छोट्या कंपन्यांना लायसन फी भरण्याची कोर्टाची मुदत आता (१४-२- मध्यरात्री ) संपली. वोडाफोन, एरटेल,टाटाटेली यांचेच ९२ ह कोटी आहेत. बजेटमध्ये येणे रक्कम सवालाखकोटी सितामाईंनी अगोदरच धरली आहे.
जिएसटीचे एस्टीमेट बोंबलत आहे म्हणतात.
बरंच काही गुपचुप चालले आहे का?
बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती
बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती देणारे हे विकीपान संपादित करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत या पानावरचा मजकूर पाकिस्तानी + सिक्यूलर् दृष्टीने लिहिलेला आहे. या पानावर, The perpetrator of the attack was from Indian-administered Kashmir सारखे अनेक अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख आहेत.
https://en.m.wikipedia.org/wiki/2019_Balakot_airstrike
मग करा की.
मग करा की.
मात्र जे काही लिहिताय त्याला सबळ पुरावे द्या, विकी म्हणजे रिपब्लिक टीव्ही नाही की काहीही खपून जाईल.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
लवकरच बारावीच्या परीक्षा सुरू
लवकरच बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत,
तरी विद्यार्थ्यांनो परीक्षेचं टेन्शन घेऊ नका,
खुप सोपी असते परीक्षा......
मी स्वतः 2-3 वेळेस दिली आहे.
(No subject)
तिकडे बातमी धाग्यावरच्या
तिकडे बातमी धाग्यावरच्या प्राइवेट ट्रेनवरून - प्राईवेट ट्रेन म्हणजे काय?
बहुतेक हायर्ड असावी. ठराविक भाडे रेल्वेला दिले की मग आतमध्ये आपली मर्जी असणार.
बोले तो...
... पूर्वी एसटीचा 'प्रासंगिक करार' असायचा, तसले काही?
हो. ओडिसीचं बरंच भाडं थकलय.
हो. ओडिसीचं बरंच भाडं थकलय. डोकेबाज आईएएस अफिसर गगराणी भूषणला आणूनही.
कोल्लापुर महालक्ष्मी, साईबाबांची शिरडी, बोरिवली गांधी उद्यान, ताडोबा, कोकण किनारे यात परदेशींना रस नाही.
बहुतेक नाही.
बहुतेक नाही.
जस्ट आतल्या सेवा (खानपान*, साफसफाई, टॉयलेटमधील साबण, टिश्यु, वाढपी, चादरी, ब्लँकेट वगैरे) कुणीतरी खाजगी कंत्राटदार पुरवणार.
*म्हणजे लोणावळ्याला कटलेस/चीजटोस्स् विकणाऱ्यांना गाडीत प्रवेश मिळणार नाही असे वाटते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेचं
इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेचं (रोलिंग स्टॉकसहित). सेवा खासगी (सध्या तरी आय आर सी टी सी). खासगी कंपनी रेल्वेला इन्फ्रा वापरण्यासाठी भाडं देणार. सगळं जाऊन वर जो काही प्रॉफिट उरेल तो खा.कं.चा. यात रेल्वेला फायदा असा की सबसिडी द्या वगैरे भानगड नाही. हे रूळ, हे सिग्नल, हे डबे, ही इंजिनं... वापरा आणि पैसे द्या. गाडीत काय सुविधा पुरवायच्या वगैरे ते तुम्ही बघा. म्हणजे थोडक्यात प्रवासी वाहतुकीचं मालवाहतुकीकरण. अपघाताच्या लायाबिलिटीज वगैरे कशा मॅनेज करणारेत ते ठाऊक नाही.
ग्रुप इंन्शुरन्स शक्य आहे.
ग्रुप इंन्शुरन्स शक्य आहे. तिकिट जास्तीच ठेवतात.
डेक्कन ओडिसी (महाराष्ट्र),
डेक्कन ओडिसी (महाराष्ट्र), गोल्डन चारियट (कर्नाटक), पलैस ओन वील्स (राजस्थान) त्या त्या राज्यांच्या टुरिजमने भाडं भरून घेतल्या आहेत. ओडिसी साठी अजिंठा वेरूळ शिवाय ठिकाणं नसल्याने उगाचच थिबा राजवाडा आणि नंतर गोव्यात ढकलतात हुश्श.
हिंदी लेखनामध्ये नाम विभक्ती
हिंदी लेखनामध्ये नाम विभक्ती प्रत्यय वेगळे लिहिण्याचे कधी सुरू झाले? हे प्रमाणलेखन कोणी कधी बदलले?
मुंबईमें - मुंबई में
उत्तर भारतके राजपूत वंशोंमें - उत्तर भारत के राजपूत वंशों में
राष्ट्रकूटकी सत्ता कनौजसे रामेश्वरतक फैली हुई थी। - राष्ट्रकूट की सत्ता कनौज से रामेश्वर तक फैली हुई थी। -
((कल्याण मासिकांत जुन्या आणि नव्या अंकांतील हिंदी लेखनात हा फरक दिसतो. ))
ऐला, मला वाटायचं की नेहमीच
ऐला, मला वाटायचं की नेहमीच वेगळे लिहित आलेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मराठीतही
सध्या मराठीतदेखिल ही पद्धत रूढ होऊ पहात आहे!
मराठीत(देवनागरी) टंकलेखन
मराठीत(देवनागरीत) टंकलेखन मोबाईलवर करताना वरच्या बाजुला शब्द सुचवले जातात त्यामधला एखादा उचलून विभक्ती प्रत्यय लावल्यास तो वेगळा पुढे उमटतो तो परत मागे जोडण्याचे कष्ट कुणी घेत नाहीत. >> मराठी त
मुंबई कडून येणार्या गाड्या.
हेच लिहिणार होतो.
हेच लिहिणार होतो.
ऐसी सारख्या एकएक अक्षर विशिष्ट प्रकारे रेण्डर करणाऱ्या सऑफ्टवेअरमध्ये प्रोब्लेम येत नाही. पण मोबाईलवर ऑटो करेक्ट मुळे प्रॉब्लेम येतो. म्हणूण मी मोबाईलवर अनेकदा तसं लिहितो. शक्यतो मागे जाऊन मधली स्पेस घालवतो पण कधी कधी कंटाळा येतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उपक्रमाचे जुने दिवाळी अंक
उपक्रमाचे जुने दिवाळी अंक कुठे मिळतील कुणी सांगू शकेल का? २०११, १२ चे वाचनमात्र उपलब्ध आहेत, त्यापुर्वीचे दिसत/मिळत नाहीत.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
कोरोना विषयी किंवा कोरोना काळात विनोदी लाइट लिहायचं
तर कुठे लिहाव ? म्हणजे तो कोरोना बखरचा धागा आहे तो
एकतर फार सिरीयस अनुभवांनी संवेदनशील अनुभवांनी ऐतिहासिक सोनेरी क्षणांच्या साक्शीदारांनी भविष्यकालीएन पिढ्यांची सांस्कृतिक तरतुदही आंतरीक अभिव्यक्ती सोबत होत राहीली पाहीजे या बाण्याने लिहिलेला आहे.
बरे पहीले पाच प्रतिसादानंतर धाग्याचा मुड आणि दिशा निश्चित होत असते आता आपली तिच दिशा असेल तर प्रॉब्लेम नसतो
पण समजा आपण उलट दिशेचे ( नेहमीच बहुधा ) असलो किंवा सिनीकल किंवा विक्शिप्तच म्हणा असलो तर
किंवा खाज म्हणा हव तर
आपल्याला वेगळ्याच चावट वाटा दाखवणारा ड्रमर खुणावत असेल्
आपल्याला प्रंचड सेन्टी वातावरणात प्र्चंड ॲन्टी सेन्टी विनोद डोक्यात निर्माण होत असतील तर
माह्या सारख्यासनी
कुठे
लिहाव
हा
?
पडलाय्
उदा. मला पॉर्न हब ने प्रिमीयम कंटेट खुला केलाय्
भारतात कंडोमचा सेल वाढलाय्
टीप टीप बरसा पानी या गाण्यावर नाचत असलेल्या बाईचा व्हिडियो बघतांना तिने पाठीवर दाखवलेल्या वाघाचे टॅटु हे चक्क शिवसेनेच्या ढाण्या वाघ सिम्बॉल च्या टॅटु सारखे बघुन हा त्याचा
सुंदरबन के मेले मे बिछडा हुआ भाऊ आहे का असे प्रश्न पडताय्
आम्ही कुठे जाऊन काशी करावी
एक धागा नको का स्वतंत्र आमच्यासारख्य्यांसाठी
तुम्ही व्यक्त व्हा कुठे तरी.
तुम्ही व्यक्त व्हा कुठे तरी.
वयापरत्वे आणि प्रायवसी असणे/अजिबात नसणे असे बरेच टोकाचे लोक असतात. त्यांचे प्रश्न वेगळे असतात.
मारवा, तुमचे पाहिले वाक्य
मारवा, तुमचे पाहिले वाक्य वाचून दम लागला.
तरी एकंदरीत मुद्दा आवडला,
तेव्हा ...
दम लागत असल्यास त्वरित
दम लागत असल्यास त्वरित टेस्टिंग करावे.
ईमान म्हणजे काय?
झायराजी ज्या ईमान बद्दल बोलत आहेत, ते ईमान म्हणजे काय? आणि त्यांची praise त्यांच्या ईमानासाठी त्या म्हणत आहेत तसं "डेंजरस" कशी?
https://twitter.com/ZairaWasimmm/status/1251218460656365569/photo/1
Iman is that you believe in God...
विकी वरून -
"Iman is that you believe in God and His Angels and His Books and His Messengers and the Hereafter and the good and evil fate [ordained by your God]."
त्याचबरोबर हेही -
A Muslim is not the friend of a kafir- 3:28
टोकाचे विचार
अपर्णा रामतीर्थकर गेल्याची बातमी खरडफळा आणि फेसबुकवर वाचली.
ह्या बातमीमुळे माझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाहीये. त्यांच्यासारख्या टोकाचे मागास विचार मांडणाऱ्या कोणत्याही माणसाच्या जिवंतपणीसुद्धा, त्यांचे जवळचे नातेवाईक, सगेसोयरे वगळता इतर कोणाच्याही आयुष्यात फरक पडू नये; अशी इच्छा. करोनासारख्या संकटाला आपण सगळेच तोंड देत असताना मागास, अवैज्ञानिक आणि कोणत्याही व्यक्तीला, व्यक्तीसमूहांना हिणवणारे विचार मांडणाऱ्या कोणाकडेही लोकांनी लक्ष देणं बंद करावं, अशी इच्छा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वर्मावर बोट (+1)
लक्ष देऊन तरी काय फरक पडतो! भीषण प्रवाह कळायलाही हवेत ना...निदान आतासारखं पुन्हा म्हणता तरी येईल...
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर
माध्यमांतून -
अन्यायग्रस्त, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त, निराधार महिलांच्या आधार बनलेल्या अपर्णाताई रामतीर्थकर संकटमोचक होत्या. त्यांनी अनेक महिलांचे तुटलेले संसार जोडले. महिलांना कायदेविषयक हक्क आणि अधिकार यावर त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्या स्वतः वकील असल्याने असंख्य महिलांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जाण्याने महिलांचा आधार गेला. रात्री अपरात्री अडचणीत सापडलेली महिला त्यांच्याशी फोनवरून मदतीसाठी हाक द्यायची तेंव्हा त्या धावून जात असत.
अपर्णा रामतीर्थकर यांना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईशचरणी प्रार्थना.
त्यांचं एक भाषण
आजसे अपून आत्मनिर्भर है!
आजसे अपून आत्मनिर्भर है!
(मनातले छोटेमोठे विचार).
अवांतर
ऐसी च्या RSS FEED ची लिंक मिळेल का ? हे काय असतं मलासुद्धा माहित नाही आहे.
कशासाठी हवंय -
कॅलिबर नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये कुठल्याही संस्थळाच्या FEED ची लिंक दिल्यावर ebook रुपात कॅलिबर आपल्याला संस्थळावरच्या सगळ्या बातम्या/आर्टिकल्स किंडल वर डिलिव्हर करतो.
प्रतिक्रिया योग्य त्या ठिकाणी चिटकवावी ही विनंती.
RSS Feed
हा दुवा
RSS FEED
RSS FEED
हा प्रकार २०१०मध्ये नोकियाच्या ( बटण फोनात) वापरत होतो. पेपराच्या नवीन बातम्या येत.
--–
Android फोनात - Feedly Classic app मध्ये ऐसी अक्षरेची RSS FEED ची लिंक टाकून चालू केले. दुसऱ्या दोन फीडही घेतल्या.
--------
फोनात साइटवर जाऊन मेन बोर्डावरचे लेख पाहतोच. लॉगिनमध्ये असल्याने नवीन लेख / प्रतिसाद हाइलाइट होऊन दिसतात त्यामुळे RSS FEED चा विशेष फरक ऐसीसाठी तरी जाणवणार नाही.
----------
पेपरच्या हव्या असलेल्या फील्डची ( स्पोर्ट्स/ टेक इत्यादी) लिंक add केल्यास फक्त त्या विषयाच्याच नवीन बातम्या दाखवल्या जातात.
नोटिफिकेशनची सोय तपासली नाही. पण ते आल्यास काम सोपे होईल. पेपरसाठी उत्तम.
----------
बाकी डिवाईसचा डिस्प्ले चांगला असल्यास काही कॉन्टेट पाहण्यास मजा नक्कीच येईल.
-------------
((नोकियाच्या feature phone नंतर विंडोज फोनला RSS FEED सपोर्ट नसल्याने बंद झालं होतं.))
माझा अनुभव लिहिला. समीक्षा नाही.
स्वतःची जाहिरात
हा व्हिडिओचा दुवा. काल फेसबुकनी मलाच त्याची जाहिरात दाखवली. माझी अन्नदाती कंपनी, माझा (आणि इतर तिघं आहेत) व्हिडिओ मलाच दाखवण्यासाठी फेसबुकला पैसे देत्ये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा.
हाहाहा.
अभिनंदन .कुठल्या विषयावर
अभिनंदन .कुठल्या विषयावर चर्चा होती ?
विषय - आम्ही काय काम करतो.
आमची कंपनी घरं विकणारे लोक आणि घरं खरेदी करणारे लोक ह्यांची भेट घडवून आणते - रियल इस्टेट ब्रोकर आहे. कंपनीच्या ॲनॅलिटिक्स विभागात आम्ही तिघं काम करतो. आम्ही काय काम करतो आणि सध्या कोणत्या प्रकल्पांवर काम सुरू आहे असा विषय होता.
टीममधला विदा-विश्लेषक आणि माझा न-मॅनेजर, ॲनॅलिटिक्स डिरेक्टर सध्याच्या परिस्थितीवर काम करत आहेत. कोव्हिडमुळे व्यवसायात जे बदल झाले, प्रत्यक्ष जाऊन घर बघायचं ह्याजागी व्हिडिओ कॉलवरून बघायचं, त्याचे आकडे कसे दिसत आहेत; आता पुन्हा बंधनं किंचित ढिली झाल्यावर हे व्हर्च्युअल घर बघणं सुरू राहील का, ह्यावर ते दोघं काम करत आहेत.
मी आणि न-मॅनेजर भविष्यात किती उत्पन्न मिळेल ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहोत. आज जाहिरातीवर पैसा खर्च केला तर २ ते ४ महिन्यांनी उत्पन्न मिळतं. ह्यात अध्येमध्ये चिकार गुंतागुंत आहे. आम्ही त्यासाठी प्रारूप (मॉडेल) बनवत आहोत, ज्यात ही सगळी गुंतागुंत ध्यानात घेतली जाईल आणि हे प्रारूप कसं काम करतं हे सहज मांडता येईल.
आता explainable AI ह्या प्रकाराला बरे दिवस यायला लागले आहेत. हे प्रारूप त्या प्रकारचं असेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१)अनंलेटिक्स वापरून अनपेक्षित
१)अनंलेटिक्स वापरून अनपेक्षित बुडीत घटना वर्तवणे शक्य आहे का?
२) असं करणं अशक्य आहे हे धरूनच सावध राहाणे.
३) तरंगणाऱ्या वस्तू बुडणारच हे धरणे.
------
चर्चा.विडिओ पाहिला. छोटा आणि चटपटीत.
शहाणपण
कुठलीही शहाणी व्यक्ती 'अनपेक्षित बुडीत घटनां'ची भाकितं करता येतील, असं विधान करणार नाही. ॲनॅलिटिक्स आणि ज्योतिष ह्यांच्यात सूतभर फरक आहे; जसा विज्ञान आणि अंधश्रद्धेत फरक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रिलायन्स जिओने ४जी तंत्रज्ञान
रिलायन्स जिओने ४जी तंत्रज्ञान बिझनेसमध्ये आणलं. तर इतर कंपन्यांचं प्राफिट मॉडेल गडगडलं. त्यांच्याकडे ब्लाक स्वान येणार आहे हे ओळखणारे कुणी नव्हते का?
भाकितं होतातच ...
अमेरिकेत epidemiologists कधीपासून भाकितं करत होते, की करोना-कोव्हिडसारखं काही होऊ शकतं. कुणीही त्यांच्याकडे फार लक्ष दिलं नाही. रियल इस्टेट कंपनीला epidemiologists आणि सरकारी धोरणं ठरवणारे लोक नोकरीला ठेवणं परवडत नाही. उद्या एखादं भीषण चक्रीवादळ येऊन अमेरिकेची पूर्व किनारपट्टी उध्वस्त होऊ शकते. त्यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेणारे लोक नोकरीला ठेवणं परवडणारं नाही ...
अनॅलिटिक्स म्हणजे आपल्याला ज्या विषयात काहीही समजत नाही, त्याची भाकितं करणं नाही. आपल्याला ज्या विषयात थोडं काही समजतं, त्यातल्या तज्ज्ञांशी बोलून व्यवसायाची प्रारूपं लिहून भाकितं करणं म्हणजे अनॅलिटिक्स.
आहे त्यात समाधान मानून राहणारे मागेच पडतात. साधारण दहा वर्षांपूर्वी नोकिया अशीच गडगडायला लागली. पंधरा वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट. अशी भाकितं करण्यासाठी सांख्यिकी, अनॅलिटिक्सची काही गरज नाही. आपापल्या क्षेत्राचा अभ्यास केला तरी समजतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद.
धन्यवाद.
म्हणजे मला असं म्हणायचय की हे
म्हणजे मला असं म्हणायचय की हे छोटे/ लोकल ब्लाक स्वानसुद्धा विचारात घेतले पाहिजेत. लोन देणाऱ्या बँकाही अडचणीत आल्या.
-------
तर्क आहेत. काही आधार किंवा अनुभव नाहीत.
समाप्त.
हे ट्वीट आपण पाहिलेत का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा हाहा
आणखी काही महिन्यांत बहुतेक सहावी पायरीही येईल; विरोधी पक्षांना नावं ठेवणं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ते असतेच
ती पहिली आणि सगळ्या पायऱ्या सोबतची पायरी असते.
ते असतेच
ती पहिली आणि सगळ्या पायऱ्या सोबतची पायरी असते.
जनजागृती करायला हवी म्हणतात.
जनजागृती करायला हवी म्हणतात.
पण ती आपल्यावर, धर्मावर, मतदारसंघातील जन्तेवर शेकणारी असते.
गंगा स्वच्छता - काशीतले प्रसिद्ध दोन घाट. तिथले प्रकार थांबवता येत नाहीत.
वादळाचं नाव 'निसर्ग' कसं आणि
वादळाचं नाव 'निसर्ग' कसं आणि कुणी ठेवलं?
प्रकोप,
उच्छाद,
गंडभेरी,
भैताड वगैरे हवं ना?
बांग्लादेश्
निसर्ग हे नाव बांग्लादेशाकडून सुचवण्यात आले होते.
निसर्ग्
निसर्ग आधीपासून आहे. आपणच उपरे आहोत. शांत, रौद्र ही त्याची रुपे असणारच!
खरंच.
खरंच.
निदर्शनं
काल एका मोठ्या रस्त्याच्या सिग्नलला तीन तरुण पोरं दिसली. दोन काळ्या मुलींच्या हातात "Black Lives Matter" लिहिलेले फलक होते. मुलगा गोरा होता, त्याच्या हातात फलक होता - "Fuck the police, fuck their abuses ..." आणि काही तरी. गाडी चालवताना सगळं वाचता आलं नाही. आज जमलं तर जाऊन फोटो काढून येईन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वैज्ञानिक ?
तरुण भारत या पेपरांत, दर बुधवारी, भविष्याबरोबर एक ज्योतिष, खगोलीय घटना यासंबंधी लेख असतो. त्यातली परस्पर विरोधी विधाने पहा.
चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर विरोधी गुरुत्वाकर्षणामुळे या काळात हवामानात अत्यंत सूक्ष्म असे कोटय़वधी विषारी जीवजंतू निर्माण होत असतात. त्यांचा अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी ग्रहण काळात खाणेपिणे निषिद्ध मानलेले आहे. गर्भवती महिलांवर ग्रहणाचा परिणाम होण्याची शक्मयता असते. त्यासाठी या काळात ‘संतान गोपाल मंत्रा’चा सतत जप करावा. इतरांनी मृत्युंजय मंत्राचा जप करावा. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास ग्रहणाबद्दलची भीती पूर्ण नष्ट होईल. दर्भ किंवा कुशासन मिळत असेल तर ते जवळ ठेवावे, म्हणजे अनिष्ट परिणाम होत नाही. ग्रहण काळात पूजा, शांती वगैरे करण्यापेक्षा स्वत: जप करणे अतिशय लाभदायक असते.
खरा वैज्ञानिक दृष्टिकोन हे कधी आचरणार ?
हॅहॅहॅ
तरुण भारतचे भविष्य.....हॅहॅहॅ
आमच्या येथील सोलापूर तरुण भारत हा जुन्या तरुण भारत किंवा बेळगाव तरुण भारत पेक्षा वेगळे प्रकाशन आहे. अर्थात अजेंडा, स्वरूप आणि स्थिती सेम.
तिथे साप्ताहिक भविष्य लिहिणारा आणि किंचित लेखक सिनिओरिती ने चक्क मुख्य संपादक झाला. अशा पेपरांचे मत काय वर्णावे.
ऑ. म्हणजे माधव गडकरींनी
ऑ. म्हणजे माधव गडकरींनी जेव्हा साप्ताहिक राशीभविष्य लिहिणारा जोतिषी लिहित न्हवता तेव्हा स्वत:च तो कॊलम लिहून टाकला होता
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
लेखन आवडलं.
लेखन आवडलं.
येथे कर माझे जुळती...
येथे कर माझे जुळती...
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गो करोना
करोना गो, हा मंत्र देणारे आठवले मला आवडतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कावा
एससी एसटी समाजातल्या हुशार नेत्यांना डावलून, हास्यास्पद वक्तव्ये करुन प्रकाशात रहाणाऱ्या नेत्यांना मुद्दाम पुढे आणले जाते. या मागेही उच्चवर्णीयांचा कावाच आहे, अशी शंका येते.
काय माहीत!
एवढी वर्षं सलग राजकीय लाभ पदरात पाडून घेणारा इसम हुशार नाही, असं म्हणायला जीभ रेटत नाही. जेव्हा आठवले "करोना गो, गो करोना" म्हणत होते तेव्हा आजाराला कोव्हिड हे नावही नव्हतं ... आणि मास्टरस्ट्रोक बहुतेक मध्य प्रदेशच्या प्रादेशिक राजकारणात घडत होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एवढी वर्षं सलग राजकीय लाभ
बरोब्बर! हे आणी राम्विलास पासवान. कायम सत्तेत असतात. पासवान 1997 पासुन प्रत्येक सरकारमध्ये होते. जनता दल, भाजपा, कोंग्रेस आणि परत भाजपा.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
पैचान कौन?
मित्रों ..
*उद्या रात्री ठीक 11:०० वाजता* घरातील सर्व लाईट
बंद करून आपापल्या बाल्कनीत,
किंवा घराच्या मुख्य दरवाजात उभे राहून
तोंडाने
*ठो.. ठो.. ठो... असा* *बंदुकीच्या गोळीचा आवाज*
*आवाज काढून चीनला* *घाबरवायचे आहे.*
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कॅन वी रीशेड्यूल प्लीज?
११ ऐवजी ८ वाजता करावे म्हणजे "२० तारखेला २० वाजता इ.स. २०२० रोजी" असा "मास्टरस्ट्रोक योग" साधता येईल.
२० तारखेला २० वाजून २०
२० तारखेला २० वाजून २० मिनिटांनी २० सेकंदांनी आणि इ.स. २०२० ला चालू करायचं आणि २० वेळा असं ठो केलं तर फक्त योग नाही, मास्टरस्ट्रोक महायोग होईल.
महा-मास्टरस्ट्रोक-योग
महा-मास्टरस्ट्रोक-योग हा शब्द चालेल का? संस्कृत आणि इंग्लिश अशा दोन्ही परक्या भाषा एकत्र करण्याची संधी मिळेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
लिखाण आवडलं. आपला पास.
.
.
दुसऱ्या महायुद्धात अशी भावनिक
दुसऱ्या महायुद्धात अशी भावनिक आवाहनं केली जात नव्हती का?
कुणाला माहीत असेल तर आणा इकडे
कुणाला माहीत असेल तर आणा इकडे.
करमणूक होईल त्यानेही.
मूर्खपणाला देश प्रांत याचे बंधन नसते त्यामुळे केले गेलेही असेल कदाचित.
आणि केले गेले असेल तर तेही हास्यास्पदच
प्लिज इकडे आणा ते सापडले तर .
पुनश्च एकदा तुच्छतावादी टोन.
पुनश्च एकदा तुच्छतावादी टोन.
अशा प्रतीकात्मक उपक्रमांत कितपत उपयुक्तता असते हा मुद्दा अगदी वेगळा, पण थेट मूर्खपणा, करमणूक.. आणा इकडे.. ?
मला इथे आल्यावर कधी कधी भेजा फ्राय चित्रपट (भाग १) ची आठवण होते.
यात कुठला तुच्छतावादी टोन
यात कुठला तुच्छतावादी टोन सापडला हे कळेना.
गाडगीळ काका आमचे गुरुवर्य आहेत.
त्यांच्याशी तुच्छतावादी टोन किमान माझ्या लेखनात कधी नसतो.
(हे बहुधा आमचे गुरुवर्य पण कन्फर्म करू शकतील)
अहो म्हणजे एकंदरीत
अहो म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य, मासेसना अपील होईल असं बहुतांश जे काही असतं ते विनोदी, फालतू, निरुपयोगी असा दृष्टिकोन अनेकदा दिसतो त्याबद्दल म्हटलं.
त्याने ठोस आउटकम असतोच असं नाही, पण खूप मोठा वर्ग एकत्र येऊन काहीतरी प्रतीकात्मक करत असेल तर त्याला इतकं डिस्काउंटही करू नये. मी खुद्द थाळी वाजवेन असं नाही किंवा टॉर्च लावेन असं नाही, त्यावरून निखळ विनोदही करायला हरकत नाहीच.. पण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना अपील होणाऱ्या गोष्टीबद्दल थेट मूर्खपणा किंवा करमणूक साधन असं म्हणू नये असं मत आहे.
अर्थात एक मत प्रत्येकाला असतं तितपतच ते आहे.
इति.
अं?
मला वाटलं ही टिंगल केली ती मोदीभक्तांनी त्या टाळ्या-थाळ्यांमुळे करोना पळाला, वगैरे मास्टरस्ट्रोक मारले होते, त्याची. प्रतीकं निराळी; त्यांचं दैवतीकरण निराळं आणि भंपकपणा साफच निराळा.
एरवी शी जिनपिंग किंवा चीन सरकारच्या नावानं सामुदायिक आणि एकसमयावच्छेदेकरून शिवीप्रदानाचं 'टास्क' देण्याबद्दल लिहिलं असतं, तर ते असं विनोदी वाटलं नसतं. ते फॉरवर्ड आणून मी इथे डकवलं नसतं. भावनांचा निचरा निराळा; विनोद निराळा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छे. मूळ प्रतिसादावर म्हटलंच
छे. मूळ प्रतिसादावर म्हटलंच नाही ते.
उलट तो वाचून खुदकन हसू आलं होतं. आणखी ऍडिशनही सुचू लागल्या होत्या. विनोदाचं सुदैवाने वावडं नाही.
...
(या धाग्यावरची चर्चा मोठी झाल्यामुळे वेगळा धागा केला आहे.)
गूगलबाबा आपला जिगरी दोस्त, लंगोटीयार वगैरे जरी नसला, तरी कधीकधी हातचे राखून थोडी वरवरची का होईना, परंतु मदत करतोसुद्धा.
हे घ्या: (पहिल्या + दुसऱ्या महायुद्धांतली. विविध जालस्रोतांतून साभार.)
ब्रिटनमध्ये:
"सैन्यात भरती व्हा. नाहीतर तुमची बायको तुम्हाला काय म्हणेल?"
"तुमच्या मुलाबाळांना काय जाब द्याल?"
(गच्च भरलेल्या गाडीत) "या! जागा आहे अजून."
(कशाला या? मरायला?)
"कोण रे तो? आँ?"
(सभ्यतासंकोचास्तव शब्दरचना आवरती घेतली आहे. दामाजीचा घोडा, वगैरे...)
"या रे या! सारे या!" (साम्राज्याकरिता लढायला सर्व अंकितांना अगत्याचे आमंत्रण.)
ब्रिटिश हिंदुस्थानात:
टोपीकरांच्या शिपायांना वरून छत्रपती शिवाजीमहाराज आशीर्वाद देत आहेत, ही मोठी मौजेची गोष्ट आहे, नाही?
आणि, अकबर आणि राणा प्रताप यांचे एकसमयावच्छेदेकरून आशीर्वाद परस्परांना कॅन्सलौट नाही का करणार?
मराठ्यांचा जय... इंग्रजांच्या छत्राखाली! वरच्याप्रमाणे छत्रपतींच्या आशीर्वादानेच असणार बहुधा.
दखनी लोकांचे नांव ते नांव, नि वर पुन्हा दक्षिणा! वर बक्षीस, नि कपडे आणि घर फुकट! आणखी काय पाहिजे?
असो.
ग्रेट डिक्टेटर ( हिटलरचे
ग्रेट डिक्टेटर ( हिटलरचे विडंबन करणारा, चार्ली चाप्लीनचा सिनेमा)
त्यात देशासाठी त्याग करणारा निवडताना " ज्याच्या पुडिंगमध्ये नाणं निघेल त्याने पुढं व्हायचं असतं." हना सर्वांच्याच पुडींगमध्ये नाणे घालते तो विनोदी प्रसंग.
माझ्या मते हा प्रसंग एक माइक्रोलेवलचे आवाहनच आहे. घंटानाद/ शंखध्वनिने काही होत नाही हे जनतेला माहिती आहेच. पण तरीही मरण जवळ आलेल्या माणसासाठी उज्जैनीमध्ये महांकाळला महारुद्र करतातच तसे.
"आता हसून घेतले नाही तर पुढे संधी येईलच याची खात्री नसते" हा डायलॉग मी सहावीत रेशनच्या रांगेत उभा असताना कच्छी बायकांकडून ऐकला. ( संदर्भ : रेशनला प्रत्येक कार्डाला बासमती तांदूळ दिला जात होता दोन युनिटला एक किलो. - अट - पी एल40 नावाचा अमेरिकन गहू किंवा मका घेतला तरच बासमती मिळणार होता.)
नंतर तो मका कसा खपवायचा हा प्रश्नंच होता. गिरणीवाला मका दळायला तयार नव्हता. गहू मात्र थोडे थोडे चांगल्या गव्हात मिसळून दळले.
मस्त प्रसंग आहे की.
मस्त प्रसंग आहे की.
गुरुवर्य,
गुरुवर्य,
आता लगे हाथ जोजो rabbit नावाचा चित्रपट बघून टाका.
तुमच्या शिफारशीमुळे पाहिला.
तुमच्या शिफारशीमुळे पाहिला. खुप आवडला.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मला कळला नाही. म्हणून गप्प
मला कळला नाही. म्हणून गप्प बसलो होतो.
शोधतो चित्रपट.
शोधतो चित्रपट.
---------
बाकी जिंकू किंवा मरू गाण्याची आठवण झाली. पिटी शिक्षकांनी ते गाणं बसवून घेतलं.1 पण आम्ही मsssरूsss असे ओरडायचो आणि ते चिडायचे.
#1- दोन जण ड्रम आणि ताशा पिटायचे, दोन पिपाणी वाजवायचे. पिपाणी हे एक वाद्याचं नाव.