प्रयत्नांति.. ?

तुझा पाठलाग सुटावा म्हणून देश बदलून पाहिला,
तुझी आठवण मिटावी म्हणून नाव बदलून पाहिलं

तुझी ओढ जाणवू नये म्हणून माणसांच्या गर्दीत थांबले,
तुझी हाक ऐकू येऊ नये म्हणून शहराच्या गोंगाटात रमले

तुझा गंध मिटावा म्हणून अत्तर लावून पाहिले,
तुझी चव विसरावी म्हणून कडू- तिखट घोट घेतले

तुझं हसू आठवू नये म्हणून गजल ऐकून हिरमुसले,
तुझ्या कुशीत यायला लागू नये म्हणून जागीच राहिले

तुझा स्पर्श पुसावा म्हणून उसळत्या समुद्रात शिरले,
तुझं चांदणं विसरावं म्हणून रणरणत्या उन्हात पोळले

तुझा हात धरावा लागू नये लागू नये म्हणून जपून चालले,
तू गालातल्या गालात हसू नये म्हणून शहाण्यासारखं वागले

पण आता मात्र काय करते आहे तेच कळायचे थांबले,
आणि एवढं सगळं करूनसुद्धा मी तर तुझीच राहिले.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तुझा स्पर्श पुसावा म्हणून उसळत्या समुद्रात शिरले,
तुझं चांदणं विसरावं म्हणून रणरणत्या उन्हात पोळले

हे विशेष आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मारवा आणि जुमलेंद्र विकासे ही दोन्ही नावं गमतीदार आहेत.
कविता आवडली ही कमेंट माहितीपूर्ण कशी होऊ शकते? ☺️

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली ही माहिती नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

या पहेलीचे उत्तर काय ठरले मग शेवटी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मार्मिक आणि एक पकाऊ Smile तुम्हाला हवे ते घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'पकाऊ' सहर्ष स्वीकारली. आजन्म उपकृत झालो.

ती 'मार्मिक' दुसऱ्या कोणालातरी, ज्याला/जिला तिचा उपयोग असेल, अशा कोणाला द्या.

आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा, मी उत्तर म्हणतेय, श्रेणी नाही. ती तर मी देऊच शकत नाही!
वरच्या कमेंट मधे विचारलं ना, कि कविता आवडली ही माहिती नाही होऊ शकत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता लक्षात आले. Smile

पण मुळात श्रेणी ही कोणी 'घेण्यासाठी' म्हणून नसतेच मुळी! ही निव्वळ काही मूठभर श्रेणीदात्यांच्या (ज्यात आम्हीही आलो.) दैनंदिन करमणुकीकरिता 'ऐसी' व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेली एक अत्यंत चांगली सुविधा आहे. (ती पुरविण्याबद्दल 'ऐसी' व्यवस्थापनाचा मी अत्यंत ऋणी आहे.) ती कोणीही गंभीरपणे घ्यावी, अशी सहसा कोणाचीच अपेक्षा नसावी.

एनी वेज़, माझ्याही मूळ प्रश्नामागील रोखसुद्धा वेगळाच होता. या पहेलीचे (बोले तो, आमच्या डोक्यावरून गेलेल्या या कवितेचे) अखेरीस उत्तर काय, असा माझा प्रश्न होता. असो.

----------

ते नसते का, ते 'ईचक दाना, बीचक दाना, दाने ऊपर दाना; छज्जे ऊपर लड़की नाचे, लड़का है दीवाना' की काय ते! 'पहेली'च म्हणतात ना त्याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या व्यक्तीची अभिव्यक्ती दिव्याभोवती पाकोळी या स्वरूपाची आहे हे पाहून मला तिची काळजी वाटते. पण त्या अभिव्यक्तीला निश्चितच दर्जा आहे. एखाद्याची उत्कटता जर लालित्यपूर्णतेने व्यक्त होत असेल तर केवळ ती आपली मानसिकता नाही म्हणून तिची खिल्लीच उडवली पाहिजे का ? लेखकांपेक्षा प्रतिक्रियेची पिंक टाकणारेच अधिक सोकावले आहेत ऐसीवर.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या व्यक्तीची अभिव्यक्ती दिव्याभोवती पाकोळी या स्वरूपाची आहे हे पाहून मला तिची काळजी वाटते. पण त्या अभिव्यक्तीला निश्चितच दर्जा आहे.

हे विधान नक्की कोणाबद्दल आहे? कवयित्रीबद्दल, कवयित्रीच्या कवितेतल्या नॅरेटरबद्दल, की माझ्याबद्दल?

(माझ्याबद्दल खास नसावे. कारण, ती शमा-परवाना तुलना जरी मला व्यक्तिशः महिरून टाकणारी असली, तरीसुद्धा, माझ्या अभिव्यक्तीला दर्जा वगैरे आहे - आणि तोही निश्चितच, वगैरे - असे विधान कोणी (आणि, ऑफ ऑल द पीपल, आपण) करेल, हे खरे वाटत नाही.)

मात्र, विधान कोणाबद्दलही - कवयित्रीबद्दल, कवयित्रीच्या कवितेतल्या नॅरेटरबद्दल, अथवा माझ्याबद्दल - असो, परंतु, संबंधित व्यक्तीबद्दल आपण काळजी करण्याचे कारण समजले नाही. आपापली काळजी करण्यास आम्ही समर्थ आहोत की! आणि, आम्हांस नक्की काय धाड भरली आहे?

(अर्थात, हे विधान मी इतक्या छातीठोकपणे केवळ माझ्याबद्दलच करू शकतो. कवयित्रीला अथवा कवयित्रीच्या कवितेतील नॅरेटरला धाड भरली आहे किंवा कसे, याबद्दल निश्चित आणि खात्रीलायक असे काही विधान अर्थात केवळ कवयित्रीच करू शकते. मात्र, त्या दोहोंसही धाड भरली नसावी, असा माझा अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.))

एखाद्याची उत्कटता जर लालित्यपूर्णतेने व्यक्त होत असेल तर केवळ ती आपली मानसिकता नाही म्हणून तिची खिल्लीच उडवली पाहिजे का ?

खिल्ली वगैरे काहीही नाही. अंमळ चावटपणा, टवाळकी, इफ यू विल. कवयित्रीशी अथवा कवयित्रीच्या अभिव्यक्तीशी आमचे व्यक्तिशः काहीही वाकडे नाही. (फार फार तर, ती अभिव्यक्ती आमच्या पार डोक्यावरून गेली, याची ही प्रांजळ कबुली आहे.)

(बरे तर बरे, ती अभिव्यक्ती आमच्या डोक्यावरून गेली, म्हणून कवयित्रीने इतःपर अभिव्यक्त होऊच नये, असेही आमचे म्हणणे अथवा दावा नाही. अशा परिस्थितीत, नक्की कोणाला आणि नक्की काय अडचण असू शकते, हेच कळत नाही.)

(टू हर क्रेडिट, कवयित्रीला काही अडचण असल्याचे निदान जाणवले तरी नाही. (चूभूद्याघ्या.))

लेखकांपेक्षा प्रतिक्रियेची पिंक टाकणारेच अधिक सोकावले आहेत ऐसीवर.

हे म्हणणे म्हणजे, 'दुकानदारांपेक्षा गिऱ्हाइकेच सोकावली आहेत बाजारात' असे म्हणण्यासारखे झाले. गिऱ्हाइकाशिवाय दुकान चालू शकत नाही. गिऱ्हाइकांच्या वर्दळीशिवाय बाजार चालू राहू शकत नाही - भले त्यातले निम्म्याहून अधिक गिऱ्हाईक हे निव्वळ विंडोशॉपर्स अथवा मालाला नुसताच हात लावून, प्रसंगी (सकारण किंवा अकारण) नावे ठेवून, नाके मुरडून, काहीही विकत न घेता केवळ टाइमपास करून परत जाणारे असले, तरीही. 'आम्हाला दुकान चालवायचे, म्हणून आम्ही चालवतोय; गिऱ्हाइकांस आवडत नसेल, तर त्यांनी चालू लागावे; आमच्या दुकानात पाय ठेवू नये' ही सदाशिवपेठी दुकानदाराची वृत्ती झाली. महाराष्ट्र व्यापारात मागे पडतो, तो यामुळेच!

'दुकानदारांपेक्षा गिऱ्हाइकेच साली अधिक सोकावली आहेत बाजारात' असे विधान गुजराती व्यापारी कधीही करणार नाही. कारण, त्याला धंदा करायचा असतो! (उलटपक्षी, 'आदर्श गिऱ्हाइकांची लक्षणे' वगैरे केवळ व्यवहारशून्य - आणि बहुधा मराठी - अकॅडेमिक मंडळीच कल्पू - आणि कंपाइलू - जाणोत!)

इत्यलम्|

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0