Is global recession imminent now ?

Empty store shelves

गट फीलिंग...
जागतिक महामंदी, महा जाऊदेत , किमान जागतिक मंदी येणे आता अटळ आहे असे वाटते काय ?
(इथे विषय कोरोना किती घातक वगैरे असा नसून त्यांच्यामुळे उद्भवलेली व्यावसायिक परिस्थिती असा आहे)
काय वाटते ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पर्यटन क्षेत्र नक्कीच बंद पडेल सहा महिने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही विदाबिंदू -

  1. चीन सध्या जगाचा पुरवठादार आहे. आयफोनपासून लसणापर्यंत अक्षरशः वाट्टेल ती गोष्ट चीन जगाला पुरवते. आणि चीनमधलं उत्पादन थांबलं आहे. उदा. हे पाहा : Coronavirus Is Shuttering Chinese Factories — And Affecting Global Manufacturing
  2. अवकाशातून दिसणारे परिणाम - You can see the impact of coronavirus from space : औषधं, मास्क्स, अशा काही गोष्टी बनवणारे सोडता सगळीकडे उत्पादन ठप्प, मागणी कमी आणि माल गोदामांत पडून आहे.
  3. उत्पादन कमी म्हणून तेलाला मागणी कमी, त्यातच लोक विमान प्रवास टाळताहेत म्हणून आणखीच कमी. आणि उत्पादन कमी करून तेलाच्या किंमती कायम ठेवण्याच्या प्रयत्नात पुतिननी खोडा घातला - Russia’s Defiance Sets the Stage for Oil Price ‘Bloodbath’
  4. आज अमेरिकेनं युरोपातून येणारे प्रवासी आत घ्यायचे नाहीत असा निर्णय घेतला : Coronavirus: Trump suspends travel from Europe to US
  5. इटलीत खाद्य आणि औषधं विक्री वगळता बाकी सर्व आस्थापना बंद - Italy Shuts Down All Shops and Restaurants as Coronavirus Cases Rise; फ्रान्समध्ये १०००हून अधिक जमावावर बंदी : France bans gatherings of more than 1,000 people over coronavirus concerns, with exceptions for protests and public transit; मर्केल म्हणतात ६० ते ७०% जर्मनांना लागण होऊ शकते.
  6. बुंडेसलिगाच्या मॅच प्रेक्षकांविना; एनबीएच्या मॅच थांबवल्या लोक सिनेमागृहांत जात नाहीयेत; आयपीएलचं काय होणार? हे सर्व पाहता पैशांच्या उलाढालीवर परिणाम होणार.

हे सर्व पाहता मंदी येणार असंच दिसतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थिंक बँक या चॅनेलचे युट्युबवरचे व्हिडिओ नक्कि पहा.

https://www.youtube.com/watch?v=cWn-bi-IBV4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

काका, हा सहा महिन्यांपूर्वी आलेला व्हिडिओ आहे का ?
कोरोना पूर्व काळातील ?
माझा संदर्भ सद्यस्थितीतील आहे आणि भारतापुरता मर्यादित नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरोना बद्दल बोलयचे झाले तर पुण्यात सिंह्गड परिसरात जे रुग्ण आढळले त्या ठिकाणी सगळी दुकाने बंद करावी लागली. आजुबाजुचा परिसर रिकामा केला असे ऐकलेय. खरे खोटे माहित नाही. मात्र चीनमध्ये जसा उद्रेक झलाय कोरोना च्या विषाणूंचा त्यावरुन एक गोष्ट लक्षात येते की जेवढा वेळ ह्याचा प्रादुर्भाव राहील तेवढी भारतीय छोटी बाजारपेठ, कुटिरोद्योग वगैरे ला फटका बसेल. पुण्यात मगरपट्टा येथे एका कंपनीत कोरोनाचा रुग्ण सापडला म्हणून ऑफिस असलेल्या बिल्डिंग मधला एक मजला पुर्ण रिकामा केलाय. म्हणजे जसं जसे रुग्ण आढळतील तसं तसे शट डाउन होउ शकेल काहि काळापुरते असे दिसतेय.

खुप दिवस जर कोरोनाची साथ राहिली तर त्या त्या देशात त्याचे पडसाद दिसू लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

गुजरात - संजाणजवळच्या कोंबडीपालक मालकाने सर्व कोंबड्या मारून टाकल्या. अशी अफवा पसरली की यामुळे वायरस पसरतो. - गिऱ्हाईक नाही मग कोंबड्याना खायला घालण्याचा खर्च तरी कशाला?
सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा कॉलेजे अगदी बागेतही मुले जाणार नाहीत. सुटीतली गावी जाण्याची रेल्वे आरक्षणे रद्द होतील तर रेल्वेचे वीस टक्के कलेक्क्षन बुडेल. खर्च चालूच राहील म्हणजे तीस टक्के धरा. एकावरती एक पत्ते ठेवून बांधलेले बंगले आहेत. कोसळतील.

साडी /कापड उद्योग मंदीत जाईलच.
घरात बसून सिलिंग फ्यान फिरताना पाहणे हाच एक उद्योग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मशीन लर्निंग, एआय, ऑटोमेशन यावर अनेक कंपन्या भरपूर खर्च कित्येक वर्षांपासून करत आहेत. कोरोनासारखी संकटे जेव्हा येतात तेव्हा मनुष्यबळ पूर्णपणे वापरता येत नाही किंवा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावे लागते. ज्या कंपन्यांनी आपल्या सिस्टीममधली मनुष्यबळावरची अवलंबीता कमी करून मशीन्सवरची वाढवलीय, त्यांना अर्थातच रिस्क मिटिगेशन कॉस्ट कमी असेल, प्रोजेक्ट्स पूर्ण करणे अधिक सोपे जाईल, तसेच इतर कंपन्यांपेक्षा नफा अधिक मिळवून मंदीच्या परिस्थितीतदेखिल टिकणे अधिक शक्य असेल. पारंपरिक संरचना राबवणाऱ्या कंपन्या बुडीत ठरतील. बरेचसे, उत्क्रांतीच्या नॅचरल सिलेक्शन थियरीसारखे. आर्थिक संरचना उत्तम चालण्यासाठी मशीन्सने जवळजवळ सर्व प्रॉडक्शन्स हाताळावीत हा विचार अधिकाधिक स्विकारार्ह होत राहिल. ईंडस्ट्री ४.० हा बझवर्ड राहणार नाही. मला वाटते, असली संकटे(कॉरोना, हवामान बदलामुळे येणारे पूर वगैरे नैसर्गिक संकटे) हे स्थित्यंतर अधिक वेगाने घडवून आणेल. आता, बेरोजगारीचे संकट विविध राष्ट्रे कसे हाताळतील याची कल्पना नाही. थोडक्यात, मंदीचे स्वरूप आधी अनुभवल्यापेक्षा भिन्न असेल.

खुप घाईत खरडले आहे, चुका अनेक असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तसेच इतर कंपन्यांपेक्षा नफा अधिक मिळवून

बरोबर, पण यासाठी मानवी रोजगार आणि यांत्रिक रोजगार यांचा सुवर्णमध्य लागतो. कोणत्याच एका टोकाला लंबक झुकत जाऊन चालणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्पादन क्षेत्रात मनुष्य बळाचा वापर बिलकुल न करता किंवा अतिशय कमी करून उत्पादन करता येईल अगदी भरघोस,आणि कमी खर्चात हे सत्य आहे .
पण ती उत्पादन निर्माण तर माणसासाठी च होणार आहेत ना की मशीन च ते विकत घेणार आहेत .
आर्थिक व्यवस्था मधून जितकी लोक बाहेर फेकली जातील त्याच प्रमाणात मंदी सुद्धा वाढेल.
उत्पादन विकली जाणार नाहीत.
खूप लोकांनी असा इशारा दिला आहे .
जे काम करणे मनुष्य साठी धोकादायक आहे तिथेच माफक प्रमाणात कृत्रिम बुध्दी mattecha वापर करणे हेच शहाणपण आहे.
कृत्रिम बुध्दी matte cha vikas hot hot त्यांच्यात स्वतः निर्णय घेण्याची आणि स्वतःचे मत,विचार निर्माण करण्याची ताकत आली तर तो राक्षस माणूस जातीच्या विनाशाला कारणीभूत ठरेल.
जसा माणूस विसरतो तसा ते सुद्धा दिलेल्या सूचना विसरून जावून स्व उलट निर्णय घेवू शकतात.
अर्थ व्यवस्था मधून माणूस बाहेर फेकला गेला की जग बुडी (आर्थिक क्षेत्रात ) आलीच म्हणून समजा.
ताज उदाहरण ग्रामीण भाग आर्थिक संकटात
सापडल्या बरोबर वाहन उद्योग संकटात आला.
कंपन्या बंद पडल्या.
मी अर्थ क्षेत्रात ला महितिगर नाही पण सरळ विचार आहे.
जगाची १०० रुपायची अर्थ व्यवस्था आहे असे समजू या त्या मधील फक्त ५ रुपये लोकांकडे आले आणि ९५ रुपये भांडवल दर ,कारखानदार ह्यांनी कृत्रिम बुध्दी मत्ता वापरून स्वतःकडेच ठेवले तर ती ती अर्थ व्यवस्था १०० रुपयाची राहणार नाही ५ रुपयाची होईल त्या नंतर ५ रुपये मुल्याचेच उत्पादन निर्माण करावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला माझ्या औषधांची चिंता लागलेली आहे.
_____________
जागतिक मंदी इनेव्हिटेबल आहे. आजपासून आम्हाला घरुन काम करण्यास परवानगी आहे. काल कॉस्टकोत पेपर टॉवेल्स, पाणि वगैरे जीवनावश्यक वस्तू संपलेल्या तरी नाहीतर तुटवड्यात तरी होत्या. बाहेर लिटल इंडिया मध्ये तूफान गर्दी असे, ते आता ओस पडलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाण्याचे फिल्टर आणून ठेव. नळाचं पाणी सहज पिता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरोबर तोही विचार आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अमेरिकेत दरवर्षी फ्लूमुळे ०.०१% लोक मरतात; कोविद-१९चा मृत्यूदर त्याच्या दहापट ०.१% आहे. अमेरिकेत गेल्या फ्लू मोसमात २०००० लोक दगावले. हे आकडे पाहता, वरचा दिवाळखोरीचा दुवा न उघडताही ते म्हणणं पटलं.

कर्जाचा व्याजदर कमी झाल्यामुळे लोक आहेत ती कर्जं पुन्हा सुधारित व्याजदरानं घेतील; पण त्याहिशोबात नवीन घरं विकत घेतील का? सध्या तरी असं काही दिसत नाहीये.

हा आणखी एक दुवा - Coronavirus business update: all you need to know बातमीतले दोन आलेख खाली आहेत; आणखी काही बातमीत आहेत.

airlines

corona virus spread

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोक घरात बंदिस्त झाली आहेत.
सर्व प्रकारच्या क्षेत्रात मंदी येवू शकते हा व्हायरस नियंत्रणात नाही आणला तर.
हे छोटे विषाणू माणसाला हतबल करू शकतात ह्याचे हे जिवंत उदाहरण.
पूर्ण जग ठप्प करण्याची ताकत ह्या सुष्म जीवात आहे.
असे असंख्य व्हायरस सुप्त अवस्थेत असतील ते कधी ही डोक वर काढू शकतात.
तेव्हा माणसाने उगाच स्वतःच्या बुध्दी मत्तेच गर्व करू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्केट धडाम धुडुम पडते आहे. डाउचे ट्रेडींग थांबविले होते.
थोडा वधारलाय.. -१०% वरून -५%
युरोपिअन मार्केट आज डबल डिजीट्स कोसळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांनी 2008 मध्ये संधी गमावली त्यांना थोडी वाट पाहिली तर पुन्हा एकदा बाजारात घुसण्याची चांगली संधी आहे. मंदी समोर दिसते आहे. व्हायरसपेक्षा मंदीने जास्त लोक मरतील अशी एक शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस... २००८ मध्ये केलेल्या चुका टाळायच्यात.. मार्केट बॉटम एक्सॅक्टली प्रेडीक्ट करता येत नाही. २००८ मध्ये निफ्टी ६००० वरून वर्ष अखेर होईत्सव ३००० च्या रेंज मध्ये गेला. ऑलमोस्ट ५०% करेक्शन. आणि २००९ संपे अखेर पर्यंत तो ५००० च्या पुढे होता. ऑलमोस्ट ७०-८०% अप. २००८ मध्ये दर मेजर करेकक्शन नंतर फ्रेश कॅपिटल ओतायची चूक केली होती. आणि २००९ येईपर्यंत कॅपिटल संपून गेलं आणि एक मेजर लिक्विडीटी इव्हेंट आला.

अनसर्टनिटी वाढली, की कॉस्ट ऑफ इक्विटी जरी १% ने वाढली तरी फेअर व्हॅल्यूएशन २०-४०% कमी होवू शकते. असा एक रिसर्च पेपर वाचला होता.. शोधावा लागेल परत.. (२००८ चे डाउ चे अ‍ॅनालिसिस होते... डाउ.. ३०-४०% पडल्यावर एव्हरेज कॉस्ट ऑफ इक्विटी फक्त १% टक्क्याने वाढलेली आढळली.. असा काहीसा...)

यावेळेला वॉल स्ट्रीट जर्नल, न्यू यॉर्क टाईमचे काही आर्टीकल्सआणि ब्लुमबर्गच्या ग्राफ्स मुळे इन्साईट मिळाले. राजन सारखा माणूस पण सगळं सोडा आणि व्हायरस वर लक्ष द्या असा बोलला तेव्हा संशय आला की, प्रकरण गंभीर आहे. पण इतके क्रॅश होणार असे वाटले नाही. पण मेजर करेक्शन होईल अशी चाहूल सुरुवातीलाच लागली जेव्हा डाउ ४-५% दिवसभरात पडला. माझ्या पोर्टफोलिओत, फेब एंड लाच बरेचसे एक्सपोजर कमी करून कॅश पोर्शन ४०% पर्यंत आणला आणि मार्च ४ तारखेला अजून ६०% पर्यंत वाढवला. फिल एक्स्ट्रीमली लकी. कारण एवढी वाताहत होईल असे वाटले नव्हते. जस्ट अ लक फॅक्टर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल इबोला आज करोनो उद्या दुसर काही. यातून जे जगतील तेच टिकतील.
हजारो वर्षांपूर्वी रानटी प्राण्याची भीती होती. नंतर दुसऱ्या माणसांची. चक्र चालूच राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय म्हणतोस भटक्या ? कसा आहेत ?
अजून तिथेच आहेस का ? की आलास परत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॅबो बँकच्या इकॉनॉमिस्टने ह्या लेखात दोन सिनारिओज अ‍ॅनालिसीस केले आहे.

१) भारतात हा व्हायरस फारसा पसरणार नाही. ज्या देशात आतापर्यंत जास्त इंपॅक्ट झालाय त्या देशांपुरता मर्यादीत राहील. (बेस केस) २) फुल ब्लोन पेंडामिक सगळ्या जगात, आणि अगदी भारतात पण... (रिस्क केस)

येत्या काळात कुठला सिनारिओ स्पष्ट होत जाईल त्यावर इकॉनॉमि आणि मार्केट अवलंबून राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००८ बरोबर तुलना करणे अयोग्य असे म्हणणारे इकॉनॉमिस्टचे आर्टीकल. थोडेफार पटते, कारण २-३ क्वार्टर्स नंतर सगळं सुरुळीत असण्याची शक्यता अधिक आहे.

think of asset prices dropping in early 2008, long before most subprime mortgage borrowers defaulted. Today, the time horizon is inverted: it is unclear what will happen in the next few weeks, but fairly certain that within six months the threat will have abated.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुक्रवारी सकाळी, १३/३, आमच्या परगण्यात करोना व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याचं जाहीर झालं. दुपारी ३ वाजता वाण्याकडचं न-नाशिवंत सामान गायब झालं होतं. भारतीय वाण्याकडे संध्याकाळी ७च्या सुमारास बहुतेक डाळी आणि कडधान्यं, तांदूळ आणि कणीक होते. पण मोठ्या रांगा होत्या. भाज्या गायब.

अमेरिकी वाण्याकडे पाव नव्हता. मग केक खाल्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...मिळाला का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संध्याकाळी साडेसातला सगळं रिकामं झालं होतं. आणि घरात मोजून दोन जादाचे रोल होते.

बरा अर्धा कधी तरी अपरात्री दुकानात गेला असावा. सकाळी उठले तर १२ रोल्सचा पॅक दिसला. एवढा सप्लाय काही महिने पुरेल. अगदी घरून काम करावं लागलं तरीही दोन महिने सहज पुरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या हापिसात कालच फर्मान आले, की सोमवारपासून टिल फर्दर नोटिस ऑफिस बंद; सर्वांनी घरून काम करायचे, म्हणून.

पोराची शाळा (फॉर्दॅट्मॅटर कौंटीतील सर्वच शाळा) पुढचा किमान आठवडाभर बंद/सायबर डे मोडमध्ये आहे. त्यानंतरचे काय ते नंतर ठरवून सांगतील.

(बायकोचे सरकारी ऑफिस मात्र तूर्तास नेमाने चालू आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे अजूनही 'सुरक्षित अंतर राखा' पलीकडे काही नाही. सॅन फ्रान्सिस्को शहरानंच दम दिल्यानं तिथले तंत्रज्ञानवाले लोक घरी आहेत. ऑस्टिनात कॉल सेंटर सुरूच आहे; फक्त अंतर राखण्यामुळे, डेस्क कमी पडत आहेत म्हणून टेकी लोकांना घरून काम करू देत आहेत.

(कॉल सेंटरवाल्या लोकांचा पगार कमी, बार्गेनिंग पावर कमी, आणि आता जिवाची किंमतही कमी. ह्या लोकांनाही घरून काम करता येईल. ज्यांना कामासाठी माणसं टाळता येणं शक्यच नाही, त्यांनाच फक्त जरूरीपुरतं बाहेर पडा असं म्हणता आलं असतं. भलत्या ठिकाणी सॉलिडॅरिटी कसली!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्याकडे आय टी वाल्याना १ एप्रिल पर्यंत घरून काम करायचा फतवा आहे.
अजित पवारांनी प्रायव्हेट क्लासवाल्याना खबरदार चालू ठेवलेत तर अशी धमकी दिली आहे.
आईसाहेबांच्या शाळेत मुलांना सुट्टी दिलेली पण शिक्षकांना यायला सांगितलं होतं. मग दोन दिवसानी (शिक्षकांची कटकट असह्य झाल्याने) शिक्षकांना घरी बसा असं सांगण्यात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

आता जगाला वेड लावणारा विषाणू फक्त हेच एकमेव संकट नाही.
पाच पन्नास हजाराचा बळी घेवून तो विषाणू सुप्त अवस्थेत जाईल.
असंख्य संकटांनी मानव जातीला घेरले आहे.

पाणी संकट कधी ही येवू शकत आणि लाखो लोकांना नष्ट करू शकत

वायू प्रदूषण कोणत्याच माणसाला निरोगी राहूनच देणार नाही.
वाढत तापमान मुळे कधी पृथ्वी वरील जमीन समुद्रात बुडेल हे सांगता येणार नाही.
बेरोजगारी,आणि उपासमार ही मानव निर्मित संकट आहेत च डोक्यावर.
स्टिफन sir ni ishara dilach aahe लवकरात .लवकर मानव वस्ती साठी योग्य ग्रह शोधा.
काही वर्षा नंतर पृथ्वी सजीव सृष्टी चे पालन पोषण करू शकणार नाही.
हे सर्व थांबायचे उपाय माहीत आहेत.
प्रदुषण थांबवणे,निसर्गाची हानी टाळणे.
शहरीकरण थांबवणे,अनवशक्या चैनी च्या वस्तू साठी निसर्गाची हानी करणे थांबवणे,
किती तरी उपाय माहीत आहेत .
सर्व जग वेढीस आहे किरकोळ विषाणू मुळे असा पण तो हवामान बदल झाला की सुप्त अवस्थेत जाईल
उपचार ची गरज पण लागणार नाही.

पण एका गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटत .
अगदी पेशी चा अभ्यास करणारे विज्ञान,गुणसूत्रे,आणि dna विषयी सर्व समजले आहे असा दावा करणारे संशोधक.
कृत्रिम बुध्दी मत्ते चे गोडवे गाणारे सर्व गप्प आहेत .
खूप मज्जा वाटते आहे
ह्या मधील काहीच संकट काळी मदतीला आले नाही
कापडाचा मास्क आणि अल्कोहोल युक्त sanitizer हेच तुमचा जीव वाचवण्ासाठी उपयोगी पडणार आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

कापडाचा मास्क आणि अल्कोहोल युक्त sanitizer हेच तुमचा जीव वाचवण्ासाठी उपयोगी पडणार आहे

कृपया कोणीही ह्या अवैज्ञानिक भूलथापांना बळी पडू नये. कापडी मास्क करोना व्हायरस, कोविद-१९पासून बचाव करण्यासाठी साफ निरुपयोगी आहे. हात स्वच्छ ठेवण्यासाठी साबणानं हात धुण्याला आणखी उत्तम पर्याय नाही.

(बाकी प्रतिसादात कशाचा, कशाला, काही संबंध न समजल्यामुळे दुर्लक्ष करत आहे.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रसार माध्यांकडून दिली गेलेली माहिती प्रमाण मानली तर तुमच्या मताशी सहमत आहे .
मला निरीक्षण करायची सवय आहे मी प्रत्येक क्षणी प्रतेक प्रसंगाचे निरीक्षण करतो.
माझ्या drawer मधील वस्तू थोडी जरी हलली तरी माझ्या लक्षात येते.
सीएसटी पासून ठाणे पर्यंत च्या प्रवासात माझ्या लक्षात आले आहे .
एक तर मास्क कोण्ही ही वापरत नाही ( आणि तेच योग्य आहे निरोगी माणसांनी मास्क का वापरावा)
१०० मध्ये फक्त पाच लोक तोंडाला काही तरी आवरण वापरतात. ( हा पण खूप मोठा आकडा आहे पण आपण तसे गृहीत धरू या )
५ पैकी २, रुमाल,ओढणी बांधतात,२ कापडाला नाडा बांधलेला मास्क नावाचा कपडा बांधतात आणि एक proper mask वापरतात ( १०० मध्ये एक हा पण आकडा खूप मोठा आहे)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बचाव म्हणजे नक्की काय यावर कापडी मास्क ( सर्जिकल ) उपयोगी आहे की नाही हे ठरवता येईल. मीडिया आणि विशेषत: अमेरिकेचे सिडिसी अतिशय चुकीची माहिती सांगत आहेत. व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी कापडी मास्क उपयोगी आहेत. सुरुवातीला कापडी मास्क वापरू नका कारण ते उपयोगी नाहीत असे सांगणाऱ्या लोकांनी नंतर हेल्थकअर वाल्यांना पुरणार नाहीत म्हणून सामान्य लोकांनी वापरू नका अशी भूमिका बदलली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्क न वापरण्याचा अमेरिकन सल्ला कसा अंगलट आलाय हे हळूहळू समोर येतंय
https://www.nytimes.com/2020/03/17/opinion/coronavirus-face-masks.html
https://slatestarcodex.com/2020/03/23/face-masks-much-more-than-you-want...
https://medium.com/@adrien.burch/whats-the-evidence-on-face-masks-5f3c27...

आता त्यातही गंमत म्हणजे एनपीआरच्या यासंदर्भातील लेखात मास्कचा अजिबात उल्लेख नाही. सामान्य लेखांनी लिहिलेल्या अनेक प्रतिक्रियांमध्ये, साऊथ कोरिया, थायलंडमध्ये (सार्समुळे) मास्क वापरण्याची पद्धत असल्याने कोविडचा मोठा स्फोट तिथे झालेला दिसत नाही असं लिहिलंय. अर्थात सामान्य लोकांच्या कॉमन सेन्सपेक्षा, तज्ञांची माहिती वेगळीच असणार
https://www.npr.org/sections/goatsandsoda/2020/03/26/821688981/how-south...

सुदैवाने भारतातील जितके फोटो वगैरे पाहतोय तिथे लोक मास्क, रुमाल, ओढण्या वगैरे लावत आहेत. त्यामुळं लक्षण न दिसणाऱ्यांकडून होणारा रोगाचा प्रसार कमी होईल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची बामनं तिकडे समाजमाध्यमांवर 'जितम् मया' म्हणून पेटली आहेत. बहुतेक लोकांना 'आम्ही' लांब ठेवायचो, हे कसं योग्य होतं म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात लॉकडाऊनच केला नाही अमेरिकेत. बऱ्याच राज्यांत लोकं नेहेमीसारखेच फिरताहेत- मग काय मास्क आणि नॉन मास्क?
मान्य आहे की मास्क लावून स्वत:चा स्वत:च्या हातांपासून बचाव होतो, पण इथे सरकार सगळ्यांना "घरी बसा" इतकंही सांगू इच्छित नाही , तेव्हढं किमान तरी केलं तर पुष्कळच फरक पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो आणखी निराळा मुद्दा.

अमक्यानं सांगितलेलं कसं बरोबर ठरलं, ह्याला विज्ञानात स्थान नाही. अमकीफलाणी गोष्ट योग्य आहे कारण ... आणि ते कारण वैज्ञानिक असेल तर तो मुद्दा मान्य. एरवी 'मेरे मन को भाया' , स्पृश्यास्पृश्यता, आणि 'ते सगळे आधीच तोंडं झाकून फिरत होते', ह्यांत फार फरक नाही. ह्या महामारीत नाक तोंड झाकून फिरणं उपयुक्त ठरत असेल तर ते का, हे सांगितलं पाहिजे. पूर्व आशियाई लोकांना तोंड झाकण्याचा फायदा होत आहे, ही पश्चातबुद्धी आहे. ती वाईट अजिबात नाही, पण ते आधी सांगता येणं, हे विज्ञानाचं काम आहे. ते सांगणं कार्यकारणभाव समजल्याशिवाय शक्य नाही. त्यासाठी हा विषाणू कसा पसरतो, त्याचा संसर्ग कसा होतो, हे शिकावं लागतं.

एकेकाळी युरोपीय लोकांना शोध लागला, संत्रं-लिंबू प्रकारची फळं खाल्ल्यामुळे स्कर्व्ही होत नाही. त्यांनी त्याचा संबंध आंबट चवीशी लावला. मग नुस्ती आम्लं प्यायला लागले. त्यातून स्कर्व्हीचं प्रमाण वाढलं. कार्यकारणभाव महत्त्वाचा. तो समजून घेतला नाही तर ह्या नाही तर पुढच्या महामारीत पुन्हा ठेच लागणार.

सध्याच, दुसऱ्या टोकाला जाऊन लोक टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा कायच्या काय कार्यकारणभाव सांगत फिरत आहेत.

म्हणजे लसावि काय उरला? आपल्याला ज्यातलं फार माहीत नाही त्याबद्दल अतिआत्मविश्वासानं बोलणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कारूण्य, विनोद आणि गांभीर्याचं एक विचित्र मिश्रण आहे तुमच्या प्रतिसादात.

खूप मज्जा वाटते आहे

.... तात्या, जपून रहा. व्हायरस लांब असला की जोक्स,फॉर्वर्ड वगैरे मुळे मज्जा वाटणं सहाजिक आहे.

आणि प्लीज मनाला येईल ते इथे लिहित रहा.... इतक्या कमी वाक्यांत जीवनाचं सार आजकाल कुठे वाचायला मिळतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवशास्त्रात संशोधन करणारे 'संशोधक' सर्व समजले आहे असा दावा कधीही करत नसावेत.
'आतापर्यंत'हे समजले आहे असा दावा साधारणपणे करत असावेत.
तुम्ही संशोधक कुणाला म्हणता हे काही कळेना.
कदाचित क्लायमेट चेंज बद्दल बोलताना 'क्लायमेट कहां बदला हय , हम बदले हय'असे जाहीर करणाऱ्या युगपुरुषांना तर तुम्ही संशोधक मानत नाही ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण एका गोष्टीचे थोडे आश्चर्य वाटत .
अगदी पेशी चा अभ्यास करणारे विज्ञान,गुणसूत्रे,आणि dna विषयी सर्व समजले आहे असा दावा करणारे संशोधक.
कृत्रिम बुध्दी मत्ते चे गोडवे गाणारे सर्व गप्प आहेत .

गप्प असतील तर चांगलंच. त्यांनी सतत बडबडत राहावे ही अपेक्षा कशाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञान जाणणाऱ्यांकडे सत्ता नाही आणि सत्ताधीशांकडे बिनकामाच्या गोष्टिंकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा येणार असेल रिसेशन,
तर त्याच्या फायदा कसा घ्यावा आता? म्हणजे गुंतवणूक वगैरे करून?
म्हणतात ना . -"when life gives you lemons you make lemonade".
तर आता
१) पडलेले स्टॉक्स घ्यावेत
२) फंडातली गुंतवणूक वाढवावी
३) की आणखी काही करावं?

२००८ मधे अनेकांनी वेळ साधून केलेल्या गुंतवणूकीमुळे २०१८त फायदा झाला होता, तशी वेळ आता गमवून बसलो तर ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकी ज्ञान पाजळतो. पण दावा नाही की हेच बरोबर. काउंटर आर्ग्युमेंट्स पण असतीलच ती वाचायला आणि माझं स्वत:चे आकलन वाढवायला आवडेलच.
१) पहिली गोष्ट म्हणजे स्वत:ची रिस्क टॉलरन्स (जोखीम घ्यायची क्षमता) तपासा. त्यात दोन भाग असतात १) अ‍ॅबिलिटी २) विलिंगनेस

अ‍ॅबिलिटी टू टेक रिस्क ज्या फॅक्टर्स मुळे वाढते ते असे -

अ) दीर्घ कालावधी म्हणजे जास्त जोखीम घ्यायची क्षमता - जी व्यक्ती नुकतीच जॉब लागली आहे वि. जी व्यक्ती रिटायरमेंटच्या जवळ आली आहे वा रिटायर झाली आहे. (इक्विटी एसेट क्लासची रिस्क जसा कालावधी वाढत जाईल तशी तशी कमी होते.)
ब) सेफ फुच्यर इन्कम + पैसा सेव्ह करण्याची क्षमता - ह्युमन कॅपिटल - जास्त क्षमता - उदा. सरकारी नोकरी - पेंन्शन - युनिव्हर्सिटी प्रोफेसर, रिसर्च सायंटीस्ट यांची जॉब गॅरेंटी खूप जास्त आहे म्हणजे त्यांचे फ्युचर इंन्कम सेफ आहे वि. ज्यांची जॉब जायची भीती वा पगार/उत्पन्न वरखाली होण्याची भीती त्यांची जोखीम घ्यायची क्षमता कमी असते. लाईफ स्टाईल अशी आहे की येणार्‍या इन्कम मधून सेव्ह करू शकतो.
क) लिक्विडीटी निड - दोन वर्षात घराची डाउन पेमेंट करायची आहे. वर्ष अखेरीस मुलाच्या परदेशी शिक्षणासाठी पैसे द्यायचेत. नेहमीच्या खर्चा व्यतिरिक्त, येणार्‍या काळात जास्त प्रमाणात पैसा खर्च करावा लागेल असा कुठलाच प्रसंग नसेल तर जोखीम घेण्याची क्षमता वाढेल. अन्यथा ती कमी असेल.

ड) लार्ज अ‍ॅसेट बेस - चार पिढ्या नाही पण माझी स्वतःची पोटापाण्याची सोय आहे आणि अतिरिक्त पैसा आहे. तर क्षमता वाढते.

विलिंगनेस थोडे सब्जेक्टीव्ह आहे. त्यात एखाद्याची जोखीम घ्यायची सायकॉलॉजी मॅटर करते. आपण स्वत:लाच जज करायला चुकू शकतो. काही प्रसंगावरून आपण रिस्क टेकर वाटू तर काही प्रसंगावरून रिस्क अव्हर्स. तर दुसरा (अ‍ॅडव्हायजर) आपल्याला काय जज करणार.
या दोन फॅक्टर्स वरून "ढोबळ मानाने" एकतर तुमचा रिस्क टॉलरन्स सरासरी, सरासरी पेक्षा जास्त वा सरासरी पेक्ष कमी असेल. आपण कुठल्या कॅटॅगरी मध्ये येतो ते जज करा.

२) रिस्क टॉलरन्स नुसार स्ट्रॅटेजीक अ‍ॅसेट अलोकेशन ठरवा. म्हणजे रिअल इस्टेट व्यतिरिक्त# किती पैसे फिक्स्ड इन्कम अ‍ॅसेट क्लास मध्ये (एफ्डी, बाँड, डेट म्युचल फंड्स, गव्हर्मेंट सेव्हीग्ज इ. ज्यात कॅपिटल लॉस होण्याची क्षक्यता कमी आणि एक ठराविक इंटरेस्ट रेटने ते ओव्हर द पिरिअड वाढतील) आणि किती इक्विटी अ‍ॅसेट क्लासमध्ये (डायव्हर्सीफाईड म्युचल फंड्स वा इंडेक्स इटीएफ्स उदा. निफ्टीबी - ज्यात "तुलनेने" कमी रिक्स आहे. - डायरेक्ट स्टॉक्स - अनडाव्हर्सीफाईड असल्याने यात जास्त रिस्क आहे).

#रिअस इस्टेटवर इव्हेस्टमेंटवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आणि ते चुकीचे नाही. कारण बर्‍याचवेळा तो एक गुड इन्फ्लेशन हेज क्लास आहे. पण लिक्विडीटी नसते. आणि प्रॉपर्टी स्पेसिफीक रिटर्न्स बदलतात. त्यामुळे लिक्विडीटी राहील अशा इतपत त्यात गुंतवल्यास काहीच हरकत नाही.

जी शॉर्ट टर्म लिक्विडीटी आहे त्यासाठी अगोदरच तजवीज करून तो पैसा सरळ फिक्स्ड इन्कम अ‍ॅसेट क्लास मध्ये वेगळा ठेवावा.

३) एका ठराविक कालावधिनंतर स्ट्रेटीजीक अ‍ॅसेट अलोकेशन रिबॅलन्स करत चला (उदा. ३ महिने). उदा. मध्यम वयीन गृहस्त ३५-४५ वयाचा जो ६० व्या वर्षी रिटायर होऊ पहातोय आणि ज्याची रिस्क टॉलरन्स लेव्हल अबाव्ह अ‍ॅव्हरेज आहे. समजा पुढली १५-२० वर्षे सतत नवीन गुंतवणूक करू शकतो. त्याने ठरवले की, ४०%-५०% फिक्ड इन्कम इक्विटी ५०%-६०% इक्विटी क्लास मध्ये करायचे. या स्ट्रॅटेजीक अ‍ॅसेट डिसिजन नुसार जी नवीन इन्व्हेस्टमेंट येईल ती अशा बकेट मध्ये टाका जेणे करून बॅलन्स मेंटेन होत राहील.

४)ओव्हर दी पिरिअड रिस्क्ट टॉलरन्स बदलत जाईल. ३५-४५ वर्षाचा नोकरी करणारा गृहस्थ आता ५५ व्या वर्षात प्रवेश करतोय. आणखी काही वर्षांनी तो रिटायर होणार म्हणजे ह्यूमन कॅपिटल जवळ जवळ संपत आले आहे. आता फायनान्शिअल कॅपिटल हेच काय ते ब्रेड अ‍ॅण्ड बटर आहे. आणि ते सेफ ठेवून उरलेले आयुष्य काढायचे आहे. मग त्याची रिस्क्ट टॉलरन्स फार कमी आहे. मग इक्विटी एक्स्पोजर तेवढाच असला पाहिजे की जो एखादा शॉक आला तर तो अ‍ॅब्सॉर्ब होऊ शकेल. थोडक्यात स्ट्रॅटिजीक अ‍ॅसेट अलोकेशन पण ओव्हर द पिरिअड बदलत जाईल. उदा. रिटायर्मेंट व्हायला २ वर्ष शिल्लक आहेत. आणि ७०-८०% इव्हेस्टीबल वेल्थ इक्विटी अ‍ॅसेट क्लास मध्ये आहे, मार्केट इक्स्ट्रीमली ओव्हरव्हॅल्यू आहे. अशा परिस्थितीत असा एखादा शॉक आला तर दोन वर्षात रिटायर्मेंट प्लानचे बारा वाजतील.

आणि शेवटी, जस्ट एक निरिक्षण, आपल्या मागच्या पिढीने (अ‍ॅटलिस्ट माझ्या वडिलांनी), सगळी वेल्थ ही थेंबे थेंबे साठवून फक्त फिक्स्ड इन्कम अ‍ॅसेट क्लासनेच (नॅशनलाइज्ड बँकांच्या एफडी, पीपीएफ इ.) उभी केली. त्यांच्या काळात एफडीचे दर पण खूप होते म्हणा. पण जास्त कालावधी + कंपाउंडींग मॅजिक + मॉडेस्ट लाइफ स्टाईल + भरपूर सेव्हिंग हा भारताच्या मागच्या पिढीचा वेल्थ क्रिएशनचा फॉर्म्युला होता. थोड्या काहींनी रिअल इस्टेटने.

सध्याच्या मार्केट - खास करून इंडियन मार्केट मध्ये.. थोडे एक-दोन आठवडे बघा. खास करून पुण्यात (जिथे १६ रुग्ण आतापर्यंत आढलेत) आउटब्रेक होतोय की आपल्या परदेशातून आलेल्या लोकांपूरताच केसेस मर्यादीत आहेत.

१) पुण्यात आउटब्रेक झाला तर माझं गट फिल असे की मार्केट कोसळेल. बॉटम अजून खाली असेल.
२) पुण्यात पण नाही आणि भारतात पण इतरत्र कुठेच आउटब्रेक होण्याची शक्यता फार कमी आहे असे कन्सेसस डेव्हलप झाले तर मार्केट फटकरून उसळी घेईल... त्या दिवशीच ट्रेडींग हॉल्ट झाल्यावर ज्या पद्धतीने तो वर आला ते पहाता ती शक्यता नाकारता येत नाही.

आणि जेव्हा वाटते की असे रिसेशन येणार असेल, तर स्ट्रॅटीजिकली समजा मी इक्विटी क्लास ५०-६०% एक्स्पोजर ठरवला असेल तर अशा अनसर्टनीटी च्या काळात तो एक्स्पोजर ५०% वर आणा. (लोअर बाउंड). आणि अशी अन्सर्टनीटी गेली... तर तो ६०% पर्यंत वाढवा (अपर बाउंड). याला टॅक्टिकल ॲसेट अलोकेशन म्हणतात. जे एखाद्याच्या जजमेंट वर अवलंबून असते. २००७ मध्ये केलेली गुंतवणूक, २००८ चा क्रॅश ॲब्सॉर्ब करून २०१७ मध्ये कॅपिटल वाढलेलेच दिसेल. कारण लाँग टर्म.

स्टॉक्स मधले कळत नसेल तर चांगले लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स (जे कन्सिस्टंटली इंडेक्सला आउटपर्फॉम करत आहेत - खास करून एक्सिसचे सगळ्या कॅटेगरीतले फंड सध्या इंडेक्स आणि पिअर्स ना आउटपर्फॉम करत आहेत. पण ही अवस्था राहीलच याची गॅरेंटी नाही. नाहीतर डिमॅट अकांउट असेल तर निफ्टीबी घ्या जो इंडेक्सला रेप्लिकेट करतो. ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण4
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती देत आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.nytimes.com/interactive/2020/03/17/upshot/hospital-bed-short...

खूपच विदारक चित्र आहे. आणि मार्केटवर त्याचे पडसाद दिसत आहेत. फेड रेट शून्यावर आणून झाले. ८५० बिलिअन डॉलर्सचा निधी मंजूर करून झाला तरी डाउ कोसळतोच आहे. आजपण डाउन आहे.

भारतातले लोकल नंबर्स (संसर्गामुळे बाधित झाले इथले नागरिक) गेल्या ३-४ दिवसात झपाट्याने वाढलेत. १४-मार्च ला हा आकडा २५ होता आज तो ६६ आहे. हेल्थ केअर सिस्टीम आधीच बेताची असलेल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात याने थैमान घातला चित्र खूपच वाईट असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द

सहा सात महिने तरी पडसाद पाहायला मिळतील असं वाटतंय मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हो व्होलॅटीलीटी वाढली आहे. ट्रेडर्सचे सुगीचे दिवस आणि इव्हेस्टर्सचे पेशन्स पाहणारे दिवस... बरेच गुड क्वालिटी बास्केटवाले स्टॉक्स (गुड बॅलन्सशीट, ग्रोथ एक्सपेक्टेशन्स, आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स) खूप अ‍ॅट्रॅक्टीव्ह वाटत आहेत. व्हॅल्यूएशन्स कमी झाले आहे. पण जोपर्यंत क्लॅरीटी येत नाही तो पर्यंत प्रत्येक मेजर करेक्शन ही बाईंग अपॉर्च्युनिटी नसते. ज्यांचे रॉ मटेरिअल क्रुड ऑईलवर अवलंबून आहे त्या कंपन्या तग धरून होत्या सुरुवातीला. पण आता तेही स्टॉक्स गडगडलेत. क्रुड ऑईल मुळे नुसती मार्जिन वधारून काय फायदा, शेवटी लोकांचे डिस्पोजेबल इन्मक कमी झाले तर टॉपलाईन अफेक्ट होणार. ग्रोथ अझम्शन गंडणार. कॉस्ट ऑफ कॅपिटल १% वाढवली आणि ग्रोथ अझम्शन जशास तशी ठेवली तर व्हॅल्यूएशन्स सहज २०-४०% कमी होते. अशा अनिश्चिततेत तर ही दोनही गृहीतके गंडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लावणारी वेळ येईल यात शंकाच नाही. ही क्लॅरिटी येते तेव्हा वेळ गेलेली असते कारण एकाच आठवड्यात मोठे स्विंग बसतात तांत्रिक प्रगतीमुळे अलिकडे. my best chances are with GTT orders set to very low levels (for such good-basket stocks)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

माझेही मत वेगळे नाही. नवीन गुंतवणूक इक्विटी क्लास मध्ये शक्यतो टाळलेलीच बरी, इन्फॅक्ट शक्य असेल तर ओव्हरऑल वेल्थ मधला इक्विटी एक्स्पोजर जास्त वाटत असेल (३०-४०% कोसळल्या नंतरही) तर कमी करणे उत्तम.

सध्यातरी आपली आकडेवारी इतर देशांच्या मानाने कमी दिसत असली तरी ते टेस्टींग किट्सच्या कमतरतेमुळे अंडर टेस्टींग होत असल्यामुळे असण्याचे चान्सेस जास्त आहेत असे या मुलाखती वरून वाटते.

ज्यापद्धतीने नंबर वाढत आहेत अगदी जगभर... आपला देश फार वेगळा आहे असे वाटत नाही. त्यामुळे त्सुनामी येतेय कदाचित... ती नाही आली तर चांगलेच आहे. पण दुर्दैवाने अशी त्सुनामी खरंच आली तर २००९ सारखी पटकन उसळी मारण्याची शक्यता फार फार कमी. कारण २००९ मध्ये आपल्याला सबप्राईम क्रायसिसचा इतका थेट फटका पडला नव्हता. यामुळे मार्केट पुन्हा उसळी मारेल अशी आशा करणं धाडसाचे ठरेल. जोपर्यंत लॉकडाउनला पर्याय लोकं शोधत नाहीत (जगभर, केवळ भारतातच नाही) - जसे सामो म्हणतात त्याप्रमाणे एका वर्गाला "रेडी टू गिव्ह अप" वा "रेडी टू टेक रिस्क" असे काहीसे, जेणेकरून ३०%-५०% एफिशिअन्सीवर कारखाने/ऑफिसेस चालवली जातील - तोपर्यंत कॅश काउज वा लार्ज-मिड कॅप ग्रोथ कंपन्या (ज्या सेटल आहेत त्या) वगळता इतर नव उद्योजकांना, स्मॉल स्केल फ्रॅगमेंटेड ईंडस्ट्रीतल्या व्यावसायिकांना आणि खालच्या गटातल्या लोकांना (रिक्षावाला, उबर-ओला ड्रायव्हर, झोमॅटोचा तो हसरा चेहरा, बांधकाम व्यवसायातले मजूर) चांगलाच फटका पडणार आहे. या गटाला किमान आधार मिळेल अशी सरकारने तजवीज करू म्हटले तरी तो संपूर्ण देशासाठी चांगलाच मोठा खर्च असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकेत ले-ऑफ सुरु झालेत Sad काही रेस्टॉरंटसच्या मालकांनी स्टाफ ला काढून टाकलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसात तरुण व मध्यमवयीन लोक गिव्ह अप करणारेत. मरणार तर मरणार पण घरात डांबून किती दिवस रहाणार? संपूर्ण समाजजीवन ढासळलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॅम जेप्पी (https://www.youtube.com/user/freedailyhoroscopes) माझा आवडता अतिशय आवडता ज्योतिषी म्हणतो. Planets are in their good dignities. This outbreak is intentional. There is some intelligence behind it. Wake up. Stop animal abuse.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This outbreak is intentional.

असली विधानं पुराव्याशिवाय करणाऱ्या लोकांना पुरावं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Spirituuslly intentional so that we learn to stop animal abuse.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I in the you in the you in the you ...

किती खोटंनाटं बोलतात लोक अशा परिस्थितीतसुद्धा! असल्या लोकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बंदी आणणं अजिबात बेकायदेशीर नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Most such claims are baseless, subjective, based on vague interpretations, delusional. I wish he sticks to Astrology.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेटा थनबर्ग खुश असेल आता. काही घातक वायूंचे एमिशन घटल्याची न्यूज वाचली.
लोकांनी विमानसेवा वापरू नये/मर्यादीत प्रमाणात वापराव्यात अशा काहीशा तिच्या अपेक्षा होत्या. काही काळासाठी का होईना सगळ्या देशांना असा निर्णय आज घेणं भाग पडले आहे जे प्रॅक्टीकली नॉर्मल केस मध्ये शक्यच नव्हते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Chaos for the housing market as banks stop mortgage lending and Michael Gove tells home-buyers 'don't exchange contracts'

आमची कंपनी गृहकर्जाची ब्रोकर आहे. आता कर्जाचे दर पुन्हा वाढले आहेत कारण एवढ्या प्रमाणात येणारा लोंढा त्यांना झेपत नाहीये; अशी बातमी मिळाली. ही मंदीत संधी शोधणारे लोक, आहे ते कर्ज अडजस्ट करण्यासाठी - refinance. नवीन घर विकत घेण्यासाठी आलेल्या कर्जाच्या अर्जाची टक्केवारी २९नं कमी झाल्याची अमेरिकी बातमी आहे -

Weekly mortgage applications tank 29% as coronavirus sidelines homebuyers

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजचा हा न्यूयॉर्क टाइम्सचा लेख.. स्टॅटिस्टीकल मॉडेलचे रुपांतर चांगल्या पद्धतीने ग्राफिक्स मध्ये केले आहे... जर मॉडेलची गृहितके बरोबर असतील तर#, पॅरामिटर चेंज करून बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील की भविष्यात काय वाढून ठेवले आहे..  किती दिवस बंद ठेवले तर किती लोक अफेक्ट होतील, किती लोकांना हॉस्पिटलाइझ करावे लागेल आणि किती लोकं मृत्यूमूखी पडू शकतील. .... इ. इ. लेख पण इंटरेस्टींग आहे.

आणि चायनिज इकॉनॉमिवरचा रिपोर्ट. या अ‍ॅनालिस्टच्या मते रुग्णसंख्या रोडावण्यासाठी जगभराची सरकारे जितके कठोर विलगिकरणाचे उपाय योजतील, तितेकेच ते इकॉनॉमिकली कॉस्टली असतील. रुग्णसंख्या रोडावालयानंतरही चायनामध्ये नेहमीच्या उत्पादन क्षमतेपेक्षा ५०% (वा त्याहूनही कमी) क्षमतेने उत्पादने निर्माण केली जात आहेत.

#गृहीतके चुकीची असली तर मॉडेल गंडलेले असेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसा नी आता u turn marava.
Aapli dhyey ,udhisht चुकीचं आहेत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत ह्याची जाणीव माणसाला ह्या साथी मुळे झाली तरी पुढे माणसाचे आयुष्य सुरक्षित आणि सुखी होईल.
भौतिक सुखासाठी बुध्दी मत्तेचा वापर करणे सोडून ध्या.
त्या साठी नैसर्गिक साधन सामुग्री,पर्यावरण,वातावरण,सामाजिक स्वास्थ ह्यांचा बळी घेवू नका.
अन्न,स्वास्थ,निवारा,आणि गरजे पुरतीच साधनं हा मार्गच माणसाला सुखी करेल.
आकाशाला गवसणी घालणाऱ्या माणसाकडे जीव वाचवण्यासाठी आवश्यकता असलेले व्हेंटिलेटर नाहीत पण करोडो च्या संख्येने गाड्या आहेत .
म्हणजे आपण कशाला प्राधान्य देत आहोत.
गल्लोगल्ली खेळाची मैदाने,व्यायाम शाळा नाहीत पण गल्ली बोळात बिअर बार आणि दारूचे दुकाने,tambhuku chi dukane आहेत.
विषाणू आणि जिवाणू पासून वाचण्यासाठी मानवी शरीराची प्रतिकार शक्ती च सर्वात महत्वाचे काम करते .
पण मानवी शरीराची ज्या वयात वाढ होते त्या वयात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी(ह्याचा खरं अर्थ सर्व भौतिक सुख उपलब्ध होण्यासाठी पैसा कमविणे हा आहे)मुलांना अभ्यासा च्य gadhyala जुंपल जात आहे.
शहरीकरण मुळे एकाच जागी भयंकर प्रमाणात मानवी वस्ती वाढत आहे त्याचे फायदे आता पर्यंत घेतले आता त्याचे तोटे किती भयंकर आहेत त्याची झलक बघायला मिळत आहे.
कोणतेच यांत्रिक साहित्य,तुम्हाला साथी पासून वाचवू शकत नाही हतबल आहे माणूस आता २१ व्या शतकात सुधा.
आरोग्य चा बाजार मांडला गेला,ह्या क्षेत्रात किती तरी रोगावर माणूस माणूस अजुन सुधा नात करू शकत नाही सरळ शरणागती पत्करावी lagat aahe.
Karan आरोग्य ला भौतिक सुख पेक्षा खूप कमी किंमत दिली गेली त्या मुळे ते क्षेत्र मागास च राहिले.
घरात दार लावून बसणे हा एकमेव उपाय उपलब्ध आहे.
माणसाला जीवसृष्टी ,विषाणू,जिवाणू ह्यांची ०.१११११११२ (असे किती ही आकडे वाढवा )
Percent Sudha mahit nahi
उगाच आम्हाला सर्व समजले आहे अशी वल्गना करणारे आज स्वतःच घरात बंद आहेत.
अती शाहणपणा करून दुसऱ्या ग्रहावरून मातीचे नमुने,खडकांचे नमुने पृथ्वी आणू नयेत,नाहीतर अत्यंत भयंकर आणि पूर्णतः अपरिचित विषाणू जिवाणू,पृथ्वी वर प्रवेश करेल आणि पूर्ण सजीव सृष्टीची दाणादाण उडविली जाईल.
ग्रहगील लांबूनच साजरे दिसत आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माणूस वयात येतो, लग्न करतो.
संसार सुरू होतो. मुलं होतात.
अडचणी येतात.
मुलं, कुटुंबीय आजारी पडतात.
नोकरीत प्रॉब्लेम येतो. कधी नोकरी जाते. पुन्हा मिळते.
कुटुंबात कलह निर्माण होतात. काही सुटतात. काहींचा मोठा आघात होतो.
वगैरे वगैरे.

तर अशा प्रत्येकवेळी माणसाने "आपण लग्न केलं हे चुकलं" असा विचार करावा का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.