तो क्षण येतो तेव्हा..

गर्तेत सापडल्यासारखं वाटत असतं..
प्रकाशाचा कणही दिसत नसतो, गुडुप अंधाराने जगण्याला वेढा घातलेला असतो..
क्षण न क्षण जगण्याला चरे पाडत जात असतो..
प्रत्येक हसू आपल्यावर उगारलेला सुरा वाटत राहतो..
मायेची प्रत्येक पाखर फेकून द्यावी असं मनात येत राहतं..
तरीही कधी हसावं लागत असतं, मनातल्या आभाळात एक पक्षी उंच उंच उडाला म्हणून घातली जाते शीळ, लोक नॉर्मल समजून निवांत होतात..
कुठून होते विचारांची दाटी, कुठून आभाळ भरून येते.. कधी घसा फाटेल इतक्या जोराने ओरडावं वाटतं कशावर पण..
अशातंच तो क्षण येतो.. कुणासाठी सगळं संपतं त्या एका क्षणात तर कुणासाठी सावरणारा एक हात येतो..

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जाऊं दे सोड
- गौतम बुद्ध

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

अँग्झायटी चे यथार्थ वर्णन. आजच वाचत होते अँग्झायटी इज अ सायलेंट स्क्रीम फॉर हेल्प.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो सावरणारा मदतीचा हात सर्वाना लाभो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile