कोळीकोडचा विमान अपघात

कोळीकोडला झालेल्या विमान अपघातासंदर्भात खरडफळ्यावर चाललेल‌ी रोचक चर्चा मुख्य बोर्डावर आणत आहे. बातमीचा दुवा

field_vote: 
0
No votes yet

Crash नंतर इतक्या लगेच कोणतेही ठाम मत व्यक्त करणं योग्य ठरणार नाही, पण

१. हायड्रोप्लेनिंग झालेलं दिसतं.
२. आठ हजार फूट लांब रनवे जरी बोईंग 737ला पुरेसा असला तरी टच डाऊन तीन हजार फुटांवर झाला असं उपलब्ध माहितीवरुन (DGCA स्टेटमेंट ) दिसतंय. हे अनाकलनीय आहे.

३. मंगलोर केससारखं इथे नाहीये. मंगलोरला ओव्हरशूट होत असतानाही कैप्टनने लैंडिंग अबोर्ट केलं नाही. इथे मात्र विंग कमांडर साठे अणि को पायलट यांनी पुन्हा पुन्हा गो अराउंड करत लैंडिंगचा प्रयत्न केलेला दिसतो.

४. इंजिन बंद केल्याने निश्चित फरक पडतो, कारण फिरत राहिलेले इंजिन disintegrate होऊन घातक ठरू शकते.

एकूण दुर्दैव

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायड्रोप्लेनिंग म्हणजे काय गवि ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगलोर अपघाताच्या तीन दिवस आधीच मंगलोरवरून विमान पकडून मुंबईमार्गे पुण्याला परतलो होतो. त्यामुळे त्या अपघाताविषयी बरेच कव्हरेज बघितले होते. अशा टेबलटॉप विमानतळावर उतरणारे विमान कधीच घ्यायचे नाही हे कालच्या प्रकारावरून ठरवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायड्रोप्लेनिंग म्हणजे काय गवि ?

मी सांगतो! मी सांगतो!

(विमानाच्या बाबतीत नाही, तरी मोटारीच्या बाबतीत हा शब्द अनेकदा ऐकलेला आहे; वापरलेलासुद्धा आहे. किंबहुना, सायकलीपासून ते विमानापर्यंत, अल्पकाळाकरिता का होईना, परंतु पक्क्या (डांबरीकृत/काँक्रीटीकृत) रस्त्यावरून काहीश्या वेगाने जाण्याची शक्यता ज्याज्या म्हणून वाहनांना आहे, त्यात्या सर्व वाहनांचे तत्त्वतः हायड्रोप्लेनिंग होऊ शकते. अधिक वेगाने गेल्यास शक्यता अधिक.)

(काय हे अण्णा! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला हायड्रोप्लेनिंगचा अर्थ मी सांगण्याची वेळ यावी? काही काळाकरिता का होईना, परंतु अमेरिकेत राहिलात ना तुम्ही? तेथे हा शब्द कधी ऐकला नाहीत?)

असे समजा, तुम्ही रस्त्यावरून गाडी चालवीत आहात. धोधो पाऊस पडत आहे. रस्त्यात पाणी साचलेले जरी नसले (साचलेले असल्यास दुधात साखर!), तरी पुष्कळ आहे. गाडीला वेग बऱ्यापैकी आहे.

आता, तुमची टायरे जर चांगल्या स्थितीत असली, तर, सामान्यतः हे रस्त्यावरचे पाणी ती हाताळू शकावीत; टायरांवरल्या खाचांतून ते पाणी बाजूस फेकले जावे, नि तुमची टायरे नि रस्ता यांच्यातील संपर्क कायम राहावा.

मात्र, कितीही चांगली टायरे म्हटली, तरी त्यांना काही मर्यादा असतेच. (टायरे झिजलेली/गुळगुळीत असल्यास तर सोन्याहूनही पिवळे!) अशा परिस्थितीत, टायरे जर रस्त्यावरचे पाणी पुरेशा समर्थपणे हाताळू शकली नाहीत, तर रस्ता आणि टायरे यांच्यामध्ये पाण्याचा थर निर्माण होऊन, विमान ज्याप्रमाणे हवेवर तरंगते (म्हणून एअरो-प्लेन!), तद्वत तुमचे वाहन पाण्याच्या पातळ का होईना, परंतु थरावर तरंगू लागते. (म्हणून हायड्रो-प्लेन.) रस्ता आणि टायरे यांच्यातील संपर्क अजिबात सुटतो. आणि मग येते मजा! तुम्ही ब्रेक दाबा, स्टियरिंग वळवा, काहीही करा, गाडी तिला मन फुटल्याप्रमाणे आपल्याला हवे तसे वागू लागते, नियंत्रणाबाहेर जाते.

वाहनाचा वेग जितका अधिक, तथा रस्त्यावरील पाण्याचे प्रमाण जितके अधिक, तितकी हे घडण्याची शक्यता अधिक.

या फेनोमेनॉनला सामान्य माणसाच्या इंग्रजीत हायड्रोप्लेनिंग असे म्हणतात. थोडक्यात, ओल्या रस्त्यावरून वाहन घसरणे, असे साध्या मराठीत (ढिसाळपणे) म्हणता येईलही कदाचित; परंतु, ओल्या रस्त्यावरून वाहन वेगवेगळ्या कारणांमुळे घसरू शकते, त्यांपैकी सगळेच प्रकार हायड्रोप्लेनिंगचे असतील, असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रत्यावर अर्धवट वितळलेला बर्फ असेल आणि आपण गाडी कितीही हळू चालवली तरी कधीकधी नियंत्रण सुटते हा पण भितीदायक अनुभव असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार न बा ,
मी तुमच्या देशात तसा दोनदा येऊन गेलोय, पण चार सहा महिने जेमतेम. तात्पर्य, हा शब्द ऐकला नव्हता.
त्यामुळे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारी आहे नबा

फर्स्ट हँड अनुभव घेतलेला दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फर्स्ट हँड अनुभव घेतलेला दिसतोय.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्धवट वितळलेलाच असण्याची गरज नाही. चांगला सडकून गोठून दगड झालेला पुरतो.

हो. मी बर्फाच्या सिझनमध्ये एकदाच होतो आणि ते पण मिलवॉकीमध्ये. झाली १५ वर्षे त्याला. त्यामुळे सगळे काही लक्षात नव्हते पण हे वाचल्यावर आठवले. सगळ्यात खतरनाक प्रकार बघितला होता तो म्हणजे पाईपमधून पाणी पडत असते त्याचा बर्फ होतो. दुसरी एक गोष्ट बघितली होती बरीच लहान मुले घराबाहेर स्नो मॅन बनवतात आणि तो १०-१५ दिवस न वितळता तसाच असतो. मस्त वाटायचे. आता या सगळ्या दुनियेला सोडून मी खूप लांब आलो आहे. आता माझ्यासाठी शेअरमार्केटच्या हिरव्या आणि लाल रंगाच्या कँडल. बास त्याभोवतीच सगळे विश्व फिरते.

न बांच्या इतके सगळे टाईप करायच्या चिकाटीचे कौतुक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बांच्या इतके सगळे टाईप करायच्या
टाईप या शब्दाचा शब्दश: अर्थ आणि फ्रेज म्हणून दोन्ही अर्थ मनांत येऊन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यात खतरनाक प्रकार बघितला होता तो म्हणजे पाईपमधून पाणी पडत असते त्याचा बर्फ होतो.

फ्रीझ वॉर्निंग असते तेव्हा घरातला एक तरी नळ उघडा, गळत (ठिबकसिंचनपद्धतीने का होईना, परंतु प्रवाही) ठेवावा लागतो. नाहीतर रात्रीत जर शून्याखाली तापमान गेले, तर पाइपांमधले पाणी गोठून पाइपा फुटण्याची भीती असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रीझ वॉर्निंग असते तेव्हा घरातला एक तरी नळ उघडा, गळत (ठिबकसिंचनपद्धतीने का होईना, परंतु प्रवाही) ठेवावा लागतो. नाहीतर रात्रीत जर शून्याखाली तापमान गेले, तर पाइपांमधले पाणी गोठून पाइपा फुटण्याची भीती असते.

बापरे. असले काही केल्याचे लक्षात पण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलंय राव तुमच्या देशात. आमच्या देशात तर फ्रीझ वॉर्निंग नसते तेंव्हाही पाईप फुटण्याची भीती असते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रन-वे'वर रोज एखादे जड वाहन फिरवून पाहात असतील ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या नवीन माहितीनुसार कॉकपिटचे फोटो असं दर्शवतात की,

(३००० फूट रनवे संपून गेल्यावर झालेल्या टच डाऊननंतर कमी रनवे उरलाय यामुळे कदाचित) पायलट्सनी पुन्हा टेक ऑफचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता पुढे येते आहे.

आधी वाटलं तसं इंजिन बंद केलं नसावं. थ्रॉटल फुल फॉरवर्ड स्थितीत दिसतो.

लँडिंगनंतर विमान थांबवण्यासाठी पंखांवर जे स्पॉयलर्स उभे केले जातात ते नंतर तसे उभे असलेले दिसत नाहीत. म्हणजे टेक ऑफ प्रयत्न होता ही शक्यता वाढते.

पण फ्लॅप्स मात्र लँडिंगच्या कॉन्फिग्रेशनमधे दिसतात. म्हणजे लँड झाल्यावर पुन्हा अचानक टेक ऑफचा प्रयत्न, त्यासाठी स्पॉयलर्स बंद अणि फुल पॉवर, पण फ्लॅप्स लँडिंगसाठी सेट केलेले वर घ्यायचे राहिले की कसे. की अन्य काही उद्देश होता हे सांगणं कठीण आहे. लँडिंग स्थितीत असलेले फ्लॅप्स टेक ऑफ लवकर होऊ देणार नाहीत.

सर्वांचा जीव वाचवण्याचा वैमानिकांचा उद्देश दुर्दैवाने असफल झालेला दिसतो.

शक्यता पुढे येताहेत. DFDR आणि CVR यातून अधिक स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल. सध्या केवळ शक्यता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

DfDR आणि CVR काय असतात? व्हिडिओ रेकॉरडिंग किंवा डेटा लॉगर असतो का? की ब्लॅक बॉक्स म्हणजेच DFDR.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

CVR वगैरे मधे काय होतं ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना कधीच कळु देत नाहीत. चौकशी होणाराय....चालु आहे वगैरे सांगत रहातात. पुढे काय झालं ते कधीच बाहेर येत नाही.

प्रत्येक वेळेस विमान प्रवास करतांना आपल्या ईष्ट्देवतेची प्रार्थना करणं हेच फ़क्त आपल्या हातात असतं. Whatsapp वर ईतके विमानोड्डाण आणि विमान तंत्रज्ञान तज्ञ काय वाट्टेल ते टाकताहेत या बद्दल. खरे खोटे देव जाणे.

शेवटी स्वामी समर्थांना शरण जा...... ( उडायला) भिऊ नकोस.....मी तुझ्या पाठीशी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0