तुम्हालाही डिप्रेशन आलंय का?

गाभा:
तुम्हालाहीडिप्रेशनआलंय_का?
**

प्रचंड निराशेनं ग्रासल्यावर म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यावर ५३ वर्ष वयाच्या रमेशने एका समुपदेशकाची भेट घ्यायचं ठरवलं. त्यानं शहरातील एका नामांकित समुपदेशकांना फोन करुन त्यांची अपॉईन्टमेन्ट घेतली. ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेतच रमेश समुपदेशकांकडे पोहोचला. समुपदेशकांना भेटून त्यानं आपली बेहाल अवस्था वर्णन केली आणि "मी सध्या प्रचंड निराशेनं ग्रासलो आहे, त्रासलो आहे" असं स्पष्टच सांगीतलं.
रमेशचं बोलणं समुपदेशकांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं.

समुपदेशकांचे आपल्या विशिष्ठ शैलीतले समुपदेशन सुरु झाले. त्यांनी सर्वप्रथम रमेशच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीला बाहेर बसायला सांगीतले. आता त्या केबिनमध्ये समुपदेशक आणि रमेश असे दोघेच बसले होते. समुपदेशकांनी दोन-चार हलकेफुलके प्रश्न विचारुन रमेशचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरादाखल रमेशची रडकथा सुरु झाली.
रमेश सांगत होता - " मी खूप त्रासलो आहे चिंतेनं माझ्या काळजावर प्रचंड दाब आला आहे नोकरीतल्या कामाचं टेन्शन, मुलांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही याची चिंता, बायकोची हौस मौज, घरासाठी घेतलेलं कर्ज, गाडीचे हप्ते, माझं आजारपण, पाहुण्यांची वर्दळ... "

रमेश पुढं बोलतच होता - "या सगळ्या काळज्यांमुळे मी सैरभैर झालोय. कशातच मन लागत नाही. लोकांना वाटतंय माझं छान टुमटुमीत चाललंय. पण माझं मलाच माहित.. मी हे सगळं कसं करतोय ते. रात्री नीट झोप लागत नाही. जेवायला बसलो की अन्नावरची वासना उडून जाते. का कुणास ठाऊक, पण माझं काही खरं नाहीं. मी प्रचंड निराश झालोय!" असं सांगत रमेशनं आपलं सारं दुखणं नि:संकोचपणे मांडलं होतं.

रमेशचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतानाच समुपदेशकाच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं.
रमेशचं बोलणं थांबल्यावर समुपदेशकांनी रमेशला विचारलं-
"तुमचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं?"
रमेशनं त्याच्या प्राथमिक शाळेचं नाव सांगीतलं. रमेशला हा प्रश्न अप्रस्तुत वाटल्यानं त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. समुपदेशकांनी मात्र त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करुन हलकेच हसत म्हटलं-
"तुम्हाला त्या शाळेत एकदा जावं लागेल. जमेल का तुम्हाला त्या शाळेत जायला?"
रमेश हे ऐकून आणखी त्रासला होता. परंतु तरीही तो म्हणाला-
"मला त्या शाळेत जायला जमेल, पण त्यानं माझा प्रश्न सुटणार आहे का? कशासाठी जायचं मी त्या शाळेत?"
समुपदेशक म्हणाले- "त्या शाळेत तुम्ही चौथीच्या वर्गात शिकत असताना तुमच्या वर्गात कोण कोण विद्यार्थी होते, त्यांची सर्वांची नावं तिथल्या एका रजिस्टरमध्ये लिहीलेली असतील. त्या रजिस्टरची एक झेरॉक्स कॉपी हवी आहे. पुढच्या वेळी माझ्याकडे येताना ती तुम्ही सोबत घेवून यायची आहे."

रमेशला या त्रासिक वाटणाऱ्या गोष्टीचीही थोडी गंमत वाटली आणि त्यानं शाळेतून अशी यादी आणायला होकार दिला.

रमेशने समुपदेशकांनी सांगीतल्याप्रमाणे त्यांच्या शाळेत जाऊन चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी आणून समुपदेशकांकडे सुपूर्द केली.

यादीवरुन नजर फिरवित समुपदेशक रमेशला म्हणाले- "हे सर्व जण तुमच्या सोबत शिकत होते. आता तुम्ही एकेक करुन सर्वांना भेटा, त्यांचं सध्या काय चाललंय याची माहिती मिळवा. ही तुम्हाला मिळालेली माहिती एका स्वतंत्र वहीमध्ये लिहा आणि एक महिन्याच्या आत ती वही मला दाखवायला घेवून या."

रमेशने यादी परत हातात घेतली. त्यात सुमारे १५० नावे होती. या सर्वांना भेटण्यासाठी रमेशने रात्रीचा दिवस केला. खूप फिरुन सुद्धा रमेशला त्यातील फक्त १२० जणांची भेट घेणं शक्य झाली होती.

महिन्याभराने या भेटीतून मिळालेल्या माहितीचा सर्व तपशील घेवून रमेश समुपदेशकांकडे गेला. सोबतची वही समुपदेशकांच्या हाती दिली. समुपदेशकांनी वहीतील माहिती वरुन नजर फिरवली. त्यांचा हेतू साध्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता!

समुपदेशकांनी ती वही पुन्हा रमेशच्या हाती सोपवत त्या माहितीचे मोठ्या आवाजात वाचन करायला सांगीतले.
रमेशने त्या वहीतील माहितीचे वाचन केले. १२० जणांना भेटून रमेशने मिळविलेल्या माहितीचा साधारण तपशील खालीलप्रमाणे होता -
१) ३७ जणांचा मृत्यू झालेला होता. आणि कारणे खाली येतीलच
२) २८ मुली विधवा झालेल्या होत्या. ४ मुलींनी आपल्याच नवर्याला मारले होते.
३) १३ जण घटस्फोटीत होते.
४) १५ मुले दारुच्या व्यसनात पूर्ण अडकली होती. आणि काही मरण पावली होती
५) एकाला इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळाले नाही म्हणून नैराश्य आले होते .
६) १९ मुले मुली वेगवेगळ्या ड्रगज च्या व्यसनात होते आणि त्यातले काही मरण पावले होते
७ ) १५ मुले विधूर झाली होती. तिघांनी आपल्याच बायकोला मारले होते. एकाने दोन बायकांना मारले होते .
८ ) ४ जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती, त्यात एक जण मरण पावला होता,
९) ५ जण गँगस्टर झाले होते आणि २ जण विरोधी गॅंग चे असल्याने त्यांनी एकमेकांना ठोकले होते . अजून एकाला वर्गातल्याच कमिशनर झालेल्या मुलाने एन्काउंटर मध्ये उडवले होते. वर्गातील काहींची मुले हि वेगवेगळ्या गॅंग मध्ये होती
१० ) २ जण चोरून अणुबॉंम्ब विकताना पकडले म्हणून युनो ने खटला चालवून त्यांना युनेस्को मधल्या तुरुंगात टाकले होते.
११) ४ जण समलैंगिक झाले होते आणि त्याचे हि ब्रेक अप झाले होते.
१२ ) २ जण करोना काळात मास्क चा काळाबाजार करताना पकडले गेल्याने त्यांना खूप हप्ते द्यावे लागत होते
१३) १ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती
१४) ३ जण ब्रेन ट्रान्सप्लांट मध्ये मेंदू चा काळाबाजार करतांना पकडले गेले होते
१५) ७ जण करोना ने मरण पावले होते . ३ जणांची फुफुसे बदलावी लागली होती .
१६) २ जण नोटबंदी च्या रांगेत मरण पावले होते
१७) एकाच्या कानाचे ऑपरेशन डेंटिस्ट ने चुकीच्या प्रकारे केल्याने त्याला कमी दिसू लागले होते .
१८) ४ जणांना मुल-बाळ झालेलं नसल्यानं त्यांच्या दवाखान्याच्या / बाबा -बुवांच्याकडे चकरा सुरु होत्या.
१९) २३ जणांना मधुमेहाचा आजार जडला होता.
२०) ६ जणांना वेगवेगळ्या कॅन्सरने पछाडले होते.
२१) ९ जणांच्या मुलाबाळांचं शिक्षण अर्ध्यातच सुटलं होतं.
२२) ४ जणांना काहीतरी अपघात होऊन अपंगत्व आलेलं होतं.
२३) १२ जण असे होते की ज्यांना त्यांची मुलं सांभाळीत नाहीत. ते निराधार झाले आहेत.
२४) ११ जणाची मानसिक स्थिती बिघडून त्याला वेड लागले होते.
२५) ४ जण इतके गरिब होते की त्यांना रोजच्या खाण्यापिण्याचीही भ्रांत होती.
२६) ५ जण खूप श्रीमंत आणि त्यामूळेच खूप गर्विष्ठ झाले होते.
२७) १ जण आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने त्याचे अद्यापही लग्न झाले नव्हते.
२८) १ जण असा होता की ज्याची तीन लग्ने होऊनही तो समाधानी नव्हता.

ही माहिती मोठया आवाजात वाचून पूर्ण झाल्यावर रमेशने समुपदेशकांकडे नजर टाकली. हलकेच स्मित करीत समुपदेशकांनी रमेशला विचारले- " आता सध्या तुमची निराशा काय म्हणतेय?"

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं? यासाठी रमेश स्वतःशी विचार करु लागला-
"मी नको त्या गोष्टींचा नको तितका बाऊ करतोय. त्यामुळेच आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे. खरंतर माझी परिस्थिती इतर सगळ्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे. माझ्या हाती चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी आरोग्याच्या दृष्टीनं अगदी ठणठणीत आहे. माझे सारे कुटूंबिय आनंदी आहेत. माझी मुलं हुषार आहेत. त्यांना शिक्षणात आणि अभ्यासातही चांगली रुचि आहे. मी इतरांपेक्षा नक्कीच सुखी आहे."

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचे वागून आपल्याच सुखाचा चोळामोळा केला आहे! हे लक्षात आल्यानं रमेश खजील झाला होता!

तुम्हालाही असं नैराश्य आलं आहे का? तुम्हाला डिप्रेशन आलंय का?

जर तुम्हालाही निराशाग्रस्त वाटत असेल, तुम्ही डिप्रेस्ड झाला असाल तर तुम्हीही एकदा तुमच्या शाळेत जाऊन यायला हवं. रमेशनं केलेला प्रयोग एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.

field_vote: 
0
No votes yet

५) एकाला इंजिनिअरिंग मध्ये नोबेल मिळाले नाही म्हणून नैराश्य आले होते .
६) १९ मुले मुली वेगवेगळ्या ड्रगज च्या व्यसनात होते आणि त्यातले काही मरण पावले होते
७ ) १५ मुले विधूर झाली होती. तिघांनी आपल्याच बायकोला मारले होते. एकाने दोन बायकांना मारले होते .
८ ) ४ जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती, त्यात एक जण मरण पावला होता,
९) ५ जण गँगस्टर झाले होते आणि २ जण विरोधी गॅंग चे असल्याने त्यांनी एकमेकांना ठोकले होते . अजून एकाला वर्गातल्याच कमिशनर झालेल्या मुलाने एन्काउंटर मध्ये उडवले होते. वर्गातील काहींची मुले हि वेगवेगळ्या गॅंग मध्ये होती
१० ) २ जण चोरून अणुबॉंम्ब विकताना पकडले म्हणून युनो ने खटला चालवून त्यांना युनेस्को मधल्या तुरुंगात टाकले होते.
११) ४ जण समलैंगिक झाले होते आणि त्याचे हि ब्रेक अप झाले होते.
१२ ) २ जण करोना काळात मास्क चा काळाबाजार करताना पकडले गेल्याने त्यांना खूप हप्ते द्यावे लागत होते
१३) १ जण पेंगवीन विकत घ्यायला चुकून उत्तर ध्रुवावर गेला ( ते दक्षिण ध्रुवावर असतात ) त्यामुळे त्याला धंद्यात खोट आली होती

ह्या सगळ्यांना भेटायला आवडेल.
ही सगळी वेगवेगळी मुलं/मुली आहेत की ह्यातले काही कॉमन असू शकतात?
ताजं प्रेत असल्याने मेलेल्यांनाही भेटायची संधी मिळेल असं गृहीत धरलं आहे.

=====================

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याला कधीच नैराश्य येतं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि परिपूर्ण स्त्री?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं काही असतं का! काहीही हं अस्वल!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परिपूर्ण स्त्री कोणाला म्हणायचे, ते सांगा.

परिपूर्ण पुरुषाबद्दल बोलायचे, तर त्याला स्तनाग्रे नसतात, असे त्याचे एक लक्षण सांगण्यात आलेले आहे. (कोल्हटकरकाका कदाचित याबद्दल खुलासा करू शकतील. नक्की खात्री नाही, परंतु अर्जुन की कृष्ण कोणीतरी या कॅटेगरीत मोडायचा म्हणे. बोले तो, लहानपणी घरच्या मोठ्यांपैकी कोणीतरी कोडे घातले होते, की इतकेइतके पाय, इतकीइतकी शेपटे नि इतकीइतकी स्तनाग्रे (आता नक्की आकडे आठवत नाहीत.) असलेले ते काय? तर उत्तर होते, अर्जुनाचा रथ. त्यात शेपटांच्या हिशेबात रथाच्या घोड्यांची शेपटे तथा रथावरील अर्जुनाच्या निशाणावरील हनुमानाच्या चित्रातील हनुमानाचे शेपूट, हे सर्व जमेस धरले होते. पायांच्या हिशेबात पुन्हा घोड्यांचे, वानराचे (पक्षी: हनुमानाचे) तथा ह्यूमनांचे (पक्षी: कृष्ण तथा अर्जुनाचे) पाय धरले होते. तर, स्तनाग्रांचा हिशेब समजावून सांगताना, मला आठवते त्याप्रमाणे (चूभूद्याघ्या.), 'अर्जुनाला स्तनाग्रे नव्हती!' (कारण, तो (म्हणे) (या कारणास्तव) पूर्णपुरुष मानला जातो!!!) असे आमच्या (तत्कालीन) बालमनावर ठसविण्यात आले होते. मात्र, लहानपणीच्या अर्धवट आठवणाऱ्या गोष्टींवर का विसंबून राहायचे, म्हणून कन्फर्मेटरी गूगलसर्च मारला, तर खात्रीलायक काही सापडले नाही, मात्र दोन काँपीटिंग (आणि अटर्ली अनरिलाएबल) थियऱ्या आढळल्या. पैकी, एका थियरीप्रमाणे अर्जुन (मी म्हटल्याप्रमाणे) पूर्णपुरुष असून त्याला स्तनाग्रे नव्हती; तर, दुसऱ्या थियरीप्रमाणे, (होल्ड युअर ब्रेथ!) अर्जुन पूर्णपुरुष नसून जवळजवळ पूर्ण (निअर-परफेक्ट) पुरुष होता, आणि त्यामुळे त्याला एकच स्तनाग्र होते, तर कृष्ण हा पूर्णपुरुष असून त्याला स्तनाग्रे नव्हती. (गो फिगर!) दोहोंपैकी दुसऱ्या थियरीला प्रॉपोनंट तुलनेने थोडे अधिक आढळले. (मात्र, अर्जुनाला जर एकच स्तनाग्र असेल, तर ते शरीराच्या एकाच (कोणत्या?) बाजूस होते, की (सायक्लॉप्सच्या डोळ्याप्रमाणे) मध्यभागी होते, याबद्दल कोणताही खुलासा आढळला नाही. त्यामुळे, ही थियरी मला शंकास्पद वाटते, नि आमच्या काकाचीच थियरी खरी असावी, अशी (काहीशी बायस्ड) धारणा होते. तर ते एक असो.) कोल्हटकरकाका किंवा त्यांच्या (किंवा त्यांच्याअगोदरच्या) पिढीतले कोणी कदाचित याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. (चूभूद्याघ्या.)

तर सांगण्याचा मतलब, एखाद्या पुरुषास स्तनाग्रे नसणे हे तो परिपूर्ण पुरुष असल्याचे लक्षण आहे. तद्वत, परिपूर्ण स्त्रीचे लक्षण (त्या हिशोबाने जायचे, तर) नक्की काय असू शकेल? (कुत्रीसारख्या) स्तनाग्रांच्या चारपाच जोड्या असणे?

हे जर लक्षण असेल, तर 'परिपूर्ण स्त्री असे काहीही नसते' या अदिती यांच्या थियरीला दुजोरा द्यावासा वाटतो. कारण, अशी काही केस निदान आमच्या तरी ऐकण्यात वा पाहाण्यात नाही. (बोले तो, आम्ही स्वतः काही विविध स्त्रियांच्या स्तनाग्रांच्या जोड्या मोजण्याचा सर्व्हे करण्याचा उद्योग केलेला नाही, परंतु, अशा केसिसकरिता ब्रेसियरसुद्धा वेगळ्या पद्धतीची लागेल, हे तर्कास धरून आहे. आणि, अशी वेगळ्या पद्धतीची ब्रेसियर जर बाजारात उपलब्ध असेलच, तर कधी ना कधी त्याबद्दल ऐकू आलेच असते. असो.

(अतिअवांतर: अर्जुनाने (किंवा कृष्णाने - जो कोणी असेल तो.) पूर्णपुरुषांत गणले जाण्याकरिता (किंवा, निव्वळ on a dare) स्वतःचीच स्तनाग्रे (ॲमेझॉन स्त्रियांप्रमाणे) छाटून घेतली असण्याची शक्यता काय असावी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्याचे व्यक्तिमत्व परिपूर्ण आहे असा पुरुष किंवा स्त्री अशा अर्थाने मी परिपूर्ण शब्द वापरला आहे.
ज्याच्या मध्ये काहीच व्यंग नाही असा.
तो यश अपयश ला भीत नाही,जो पटकन कोणाच्या मोहपाशात पडत नाही.जो भावनिक गुंतत नाही,जो विनाकारण कोणाचा द्वेष करत नाही,.
न ,नवी बाजू ह्यांनी जी व्याख्या केली पूर्ण पुरुषाची
परिपूर्ण पुरुषाची नाही.,असू ध्या .
घोड्या ला स्तनाग्रे नसतात अशी माहिती आहे.
घोडा हा पूर्ण नर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोड्या ला स्तनाग्रे नसतात अशी माहिती आहे.

घोड्याला स्तनाग्रे नसतात याबद्दल मला वाटते येथे कोणालाही संदेह नसावा. (किंबहुना, मानव वगळता इतर कोणत्याच सस्तन प्राण्यांतील नरांना बहुधा स्तनाग्रे नसावीत, असे वाटते. चूभूद्याघ्या.)

प्रश्न घोड्याचा नाही. कृष्ण आणि अर्जुन यांपैकी कोणाला स्तनाग्रे नव्हती (आणि, नसल्यास, नक्की किती मिसिंग होती), याबद्दल शंका आहे.

(बाकी, पूर्ण पुरुष आणि परिपूर्ण पुरुष यांच्यात नक्की फरक काय? पुरुषास स्तनाग्रे नसणे हे 'त्यासुद्धा व्यंगाचा अभाव' अशा अर्थाने ('पूर्ण पुरुषा'चे लक्षण म्हणून) वापरले गेले नसावे काय? बोले तो, 'पुरुषाठायी स्तनाग्रे असणे हे एका प्रकारचे व्यंगच आहे', अशी काही कल्पना मुळाशी घेऊन?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्याला स्तनाग्रे आणि स्तन ग्रंधी दोन्ही नसतात.
स्त्री पणाचे कोणतेच अवयव आणि भावना नसलेला पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष ( लैंगिक दृष्ट्या पूर्ण पुरुष) असे आपण म्हणू या.
बाकी स्त्रिया ना पण दाढी आणि मिशा( म्हणजे त्या जागेवर काही प्रमाणात केस उगवतात) असतात पण ज्या स्त्री ला तसे केस बिलकुल नसतात त्या स्त्री ला पूर्ण स्त्री(लैंगिक दृष्ट्या) म्हणता येईल.
पण हा धागा नैराश्य वर आहे त्या मुळे अर्थ पण धाग्याला अनुसरून च घेतला पाहिजे.
परिपूर्ण म्हणजे ज्याचे व्यक्तिमत्व परिपूर्ण आहे असा.
जो मानसिक ,आणि शारीरिक दृष्ट्या पूर्ण सक्षम आहे असा.
ज्याची वैचारिक पातळी उच्च आहे आहे असा.
जो संकटं ना सक्षम तोंड देतो आणि विचलित होत नाही असा .
जो मोहपाश मध्ये अडकत नाही असा
ETC
तो परिपूर्ण.
त्याला कधीच नैराश्य येवू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोड्याला स्तनाग्रे नसतात याबद्दल मला वाटते येथे कोणालाही संदेह नसावा. (किंबहुना, मानव वगळता इतर कोणत्याच सस्तन प्राण्यांतील नरांना बहुधा स्तनाग्रे नसावीत, असे वाटते. चूभूद्याघ्या.)

ऑ?

कुत्री मांजरी पाळली नाहीयेत वाटते तुम्ही.

Functional आणि non functional / विकसित आणि अविकसित अवयवांबाबत "असणे" आणि "नसणे" अशी शब्दयोजना अपेक्षित होती का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुत्री मांजरी पाळली नाहीयेत वाटते तुम्ही.

नाही ब्वॉ.

I stand corrected.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडा हा एकमेव सस्तन प्राणी आहे त्याला स्तन ग्रंथी आणि स्तनाग्रे नसतात.
खूप खोलात जावू नका.
नाही तर पुनरुत्पादन करण्याचे अनेक सोपे मार्ग असताना हे किचकट सेक्शुअल पुनरुत्पादन प्राण्या मध्ये का उत्क्रांत झाले असा गहन प्रश्न पडेल ज्याचे उत्तर कोणाकडे नाही
ज्याला दोन व्यक्ती ची विनाकारण गरज लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडा हा एकमेव सस्तन प्राणी आहे त्याला स्तन ग्रंथी आणि स्तनाग्रे नसतात.
खूप खोलात जावू नका.

खूप खोलात गेलो नाही, केवळ विकी तपासला. ह्या पानावर मला आढळला हा बूबबॉम्ब -

Male mammals typically have rudimentary mammary glands and nipples, with a few exceptions: male mice do not have nipples, male marsupials do not have mammary glands, and male horses lack nipples and mammary glands.

तात्पर्य : अगदी नर उंदीरही (तुमच्या भाषेत) पूर्ण नर/पुरुष असतात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

... आयडी प्रचंड आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यात लेखात असं काय सापडलं तुम्हाला की 'लेख भंगार आहे' किंवा असं काही म्हणाला नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादाचे शीर्षक वाचले नाहीत काय? (पण वाचलेत, असे वाटते. यथायथा आणि भंगार यांच्यात नक्की काय क्वालिटेटिव फरक तुम्हाला आढळतो?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यथातथा म्हणजे जेमतेम; अगदीच टाकाऊ, फुली मारण्याइतका भिकारडा नाही, असा अर्थ मी लावते. सदर लेख लिहिला नसता, किंवा लिहून प्रकाशित केला नसता तर बरं झालं असतं, असं माझं मत. एरवी थापा मारल्या तर फार फरक पडत नाही; पण करोनाबद्दल लोक थापा मारतात ते महागात पडतं; तीच गोष्ट डिप्रेशन किंवा इतर मानसिक विकारांची.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यूफीमिझम नावाचा प्रकार तुम्ही कधी शिकला नाहीत काय? सभ्यतासंकोचास्तव 'भंगार' म्हणता येत नसले (किंवा, तसे म्हणून उगाच आपले तोंड खराब करून घेण्याची इच्छा नसली), तर त्याजागी यथायथा म्हणून आपला कार्यभाग साधून घ्यावा, हे शिष्टसंमत आहे. समझने वाले को इशारा, इ.इ.

सदर लेख लिहिला नसता, किंवा लिहून प्रकाशित केला नसता तर बरं झालं असतं, असं माझं मत.

अं, ठीक. लेख विनोदी व्हावा या उद्देशाने लिहिला गेला असावा, अशी एक पुसटशी शंका येते. ती शंका खरी असल्यास लेख जमलेला नाही, हे पटण्यासारखे आहे. मात्र, 'भिकार लेख' या जॉन्रला अभिव्यक्तिस्वातंत्र्य का असू नये, हे समजत नाही.

एरवी थापा मारल्या तर फार फरक पडत नाही; पण करोनाबद्दल लोक थापा मारतात ते महागात पडतं; तीच गोष्ट डिप्रेशन किंवा इतर मानसिक विकारांची.

हे तुमचे म्हणणे सामान्यतः पटण्यासारखे आहे. मात्र, या ठिकाणी डिप्रेशनबाबत (किंवा इतर कशाही बाबत) कोणताही गंभीर सल्ला दिला जात नसून, केवळ आपले भिकार विनोद प्रसृत करण्याचे एक माध्यम, एवढाच मर्यादित उद्देश या लिखाणामागे आहे, हे बहुधा एखाद्या मंदातिमंद व्यक्तीससुद्धा (with no offense meant to any मंदातिमंद व्यक्ती, whether dead or alive) सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट व्हावे. सबब, हे लिखाण वाचल्यानंतर शर्टातून झुरळ गेल्याची धारणा होऊ शकेलही कदाचित (जे साहजिक आहे), परंतु, त्यापलीकडे, no harm is being done, हे माझे वैयक्तिक मत. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या प्रतिसदाबद्दल धन्यवाद अदिती मावशी . पण खरेच कोणी हा लेख गंभीरपणे घेतला तर तो काळा विनोद होईल !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हितं सगळेच आग्यावेताळ आणि हडळी आहेत. त्यामुळे ताजं प्रेत आलं तर 'जेवणावळी' शिवाय दुसरं काय होणार ?

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

... आयडी प्रचंड आवडला.

मलाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुन्हा शाळेत जाऊन प्रयोग करायला पाहिजे, -- हे वाचून, जरा जरा डिप्रेशन का काहीतरी आलय असे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......

स्वतः पेक्षा दुसरा कोणीच सुखी नसेल ,अनेक अडचणीत सापडलेला असेल तेव्हा आपल्याला नैराश्य येत नाही.

आपल्या पेक्षा आपले मित्र मंडळी, नातेवाईक,शेजारी सुखी असतील तर माणूस नैराश्य नी ग्रस्त होतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्जन बेटावरच्या एकट्या पुरुष/स्त्री ला नैराष्य येउ शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याला स्वतः चा जीव वाचवणयासाठी एवढे प्रयत्न करावे लागतील की त्याला दुसरा विचार करायला वेळ च मिळणार नाही.
निर्जन बेटावर ती व्यक्ती नैरश्या मध्ये जाणार नाही उलट परिस्थिती शी दोन हात करेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयावरचा 'कास्ट अवे' हा टॉम हॅन्क्स चा चित्रपट बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिळोप्याच्या गप्पा मारल्यास डिप्रेशनला मूठमाती मिळेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता समुपदेशक शोधावा लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love