प्रतिभा

मी तुझ्या रोज भोवती असते
एक अदृश्य सोबती असते

मी कधी रिक्त शाश्वती असते...
वा कधी दिव्य आरती असते!

आसवांचे जुनेच लोलक, पण-
मी नवी रंगसंगती असते

सांजवेळी तुझा विसावा मी
आणि दिवसा तुझी गती असते

तू करू पाहतोस जे त्याची
फक्त मी मूक संमती असते

- कुमार जावडेकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आवडली.
दुसऱ्या ओळींमध्ये असते आल्यामुळे फार पुनरावृत्ती झाली. त्या ऐवजी होते, जाते, देते वगैरे चांगले वाटले असते असं आपलं वाटून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद... गझल असल्यामुळे प्रत्येक शेराच्या शेवटीही 'असते' हे अंत्ययमक आणि 'सोबती', 'भोवती' अशी यमकं आली आहेत.
आपला,
कुमार्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0