पाहिले म्यां डोळा

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृतीच्या, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या सगळ्या जंत्रीत तो ऑक्सिजन राहिला बिचारा! हल्ली व्हेंटिलेटरचा काही उपयोग नाही म्हणतात. तो प्राणवायुच कामाला येतो शेवटी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सांगोवांगी म्हणजे विदा नव्हे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार दाहक. पॉवरफुल उपमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली आहे. धक्का देऊन गदागदा हलविणारी. थेट आणि आत्यंतिक प्रभावी रचना.

फक्त, तो 'शुध्दी-बेशुध्दीच्या' ('शुद्धी-बेशुद्धीच्या'? ध-ला-द विरुद्ध द-ला-ध?)-वाला शुद्धलेखनी खडा दाताखाली येतो, तेवढे जपल्यास बरे. की, एरवी अत्यंत चांगल्या, प्रभावी, आय वुड ईव्हन से निर्दोष रचनेस अंमळ गालबोट म्हणून तो मुद्दाम पेरला आहे? तसे असल्यास, ते स्टंट फसलेले आहे, असे सुचवावेसे वाटते. असल्या गिमिकची गरजही नाही, आणि ते अस्थानी दिसते; एरवी चांगल्या रचनेस खुलविण्याऐवजी तिची वाट लावते. आणि, त्या गालबोट वगैरे कालबाह्य अंधश्रद्धा (बोले तो, आपला त्यांवर विश्वास असल्यास) आपल्याला शोभत नाहीत. (अन्यथा, बोले तो, आपला त्यांवर विश्वास नसल्यास, आपण असे का करावे, ते समजत नाही.)

असो. चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0