पहिली लाट ओसरतीय ? महासाथीच्या नंतर कुठल्या चांगल्या सवयी टिकणार ?

पहिली लाट ओसरतीय ?
महासाथीच्या नंतर कुठल्या चांगल्या सवयी टिकणार ?

गेले आठ दिवस भारतातील बाधित पेशंटचे आकडे कमी दिसू लागले आहेत . दर दिवशी ९७००० वरून ७८००० पर्यंत कमी झालेले दिसतात .
गेल्या महिन्यात देशभारत बाधित लोकांचे आकडे पुणे परिसरात सर्वात जास्त होते . याच काळात पुणे परिसरात हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळणे दुरापास्त झालं होतं. आजच्या घडीला पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मिळून किमान दोन हजारच्या आसपास ऑक्सिजन सुविधा असलेले बेड्स आणि १४० च्या आसपास व्हेंटिलेटर सुविधा असलेले बेड्स उपलब्ध आहेत असं दिसतं. मनपा कोविड केअर सेंटर्स ( जी पॉझिटिव्ह asymptomatic तसेच नेगेटिव्ह कॉन्टॅक्टस यांच्या विलगीकरणासाठी उभारली होती ) ती टप्याटप्याने बंद करू लागली आहे.
यावरून किमान पुण्यात तरी तात्पुरती महासाथीची पहिली लाट आटोक्यात येऊ लागली आहे असे वाटू लागले आहे . ( हीच परिस्थिती टिकावी म्हणजे खरं )

महासाथीच्या काळात लोकांना काही बऱ्या सवयी लागल्या होत्या असं वाटतं .
महासाथ ओसरल्यावर यातील किती चांगल्या सवयी टिकतात हे बघणे रोचक ठरेल.
कुठल्या बऱ्या सवयी लागल्या होत्या आणि त्यातील कुठल्या टिकतील याबद्दल काय मत ?

field_vote: 
0
No votes yet

लाट ओसरली तरी भीती ओसरलेली नाही. काही सवयी आता टिकून राहातील
१. वैयक्तिक स्वच्छता - दिवसातून वेगवेगळ्या वेळी हात-पाय धुणे वगैरे
२. डिस्टन्सिंग - उगाच गळ्यात गळे न घालणे
३. मास्क आणि सॅनिटायझर - हे आता बऱ्यापैकी कॉमन राहाणार, निदान जे लोक इतर लोकांत कामानिमित्त मिसळतात त्यांच्यासाठी तरी

हा साधारण सुशिक्षित डोके जागेवर असणाऱ्या लोकांबद्द्लचा अंदाज आहे. ज्यांना बाँड बनायची हौस आहे ते कसेही वागणं सुरुच ठेवणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात काही प्रमाणात साथ कमी झालेली दिसते. गेले अनेक महिने मी इतर राज्ये आणि काही देशांची आकडेवारी पहात आहे.
पुण्याला दिलासा मिळतानाच बंगळूरची रुग्णसंख्या वाढत आहे. रोज ५००० च्या आसपास वाढते आहे. कर्नाटकची लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी किंवा जराशी जास्त. तिथे महराष्ट्राच्या दीडपट तपासण्या झाल्यात. एकदा प्रवास सुरु झाले की दुसऱ्या लाटेची धास्ती आहेच.

वैयक्तिक सवयींत् पडणारा फरक म्हणजे
१. बाहेर जेवायला किंवा किरकोळ चरायला जाणार नाही.
२. मित्र नातलग यांच्याशी जाणेयेणे कमी करणार. पूर्वी हे प्रमाण खूप जास्त होते.
३. माझ्यावर अंशत: अवलंबून असणारे चार ज्येष्ट नातलग (८०+ चे) त्यांना माझी कमी मदत होईल- अगदी गरज असेल तरच त्यांना भेटेन.
४. भाजी किराणा आणि बऱ्याच गरजेच्या वस्तू ऑन्लाईन मागवतो त्या चालूच ठेवेन.
५. एकूणच जॉब, व्यवसाय, आणि गुंतवणूकीच्या जुन्या कल्पना मोडीत निघतात की काय असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साथ ओसरली असे वाटत असले तरी ती नक्की ओसरली आहे की फक्त आकडी खेळ आहे हे पाहिले कन्फर्म होवू ध्या .
निर्णय देवून आत्ताच मोकळे होवू नका.
साथ काय वेगात पसरते ह्याची झलक सर्वांनी बघितली आहे त्या मुळे सावधान.
लोकांनी ज्या सवयी लावून घेतल्या आहेत त्या त्यांना लागलेल्या नाहीत जबरदस्ती नी त्यांच्या वर लादल्या आहेत विषाणू नी आणि प्रशासन नी.
जरा कुठे साथ गेली असा अंदाज येईल परत सर्व लोक मास्क,सुरक्षित अंतर,santizer करणे हे सर्व बंद करतील.
भारतीय लोक आहेत ती.
लगेच सुधारणार नाहीत.

  • ‌मार्मिक6
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला राजेशराव, कधीकधी एकदम सेन्सिबल बोलता की हो तुम्ही!

'मार्मिक' दिली आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उप्पर एक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" एवढ्याश्या फडक्याला ती स रुपये उगाच दिले."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढुम ढुम ढुमाक्क म्हटलं की फडक्यालाही मान द्यावा लागतो. आठवा उंदराची गोष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...फडक्यालाही मान द्यावा लागतो.

सकाळीसकाळी अत्रे चावले काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

👌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगोदरचे प्रतिसादातले मुद्दे काही पटले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बचत + व्यायाम
या सवयी लागल्यात पेक्षा रि-एन्फोर्स झाल्यात. टिकवायच्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक लाट आली ती गणपतीनंतर, कारण लोक आप्तेष्टांना भेटले आणि (व्हायरसचा) प्रसाद देऊन-घेऊन लाटेत सापडले. आता नवरात्र आणि नंतर दिवाळी अशा दोन लाटा येणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशा किती लाटा आमच्या ललाटी लिहिल्या आहेत कोणास ठाऊक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाटेची तीव्रता कमी होते आहे यांच्याशी सहमत. परवाच पुण्यात हॉस्पिटल्सकडून ऑक्सीजनची डिमांड कमी झाल्याची बातमी वाचली. रिकामे बेड असल्याची माहिती आणि ही बातमी या गोष्टी नक्कीच आश्वासक आहेत. सरकारनी चाचण्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे पेशंट संख्या कमी दिसते आहे. तरीही हॉस्पिटलमधले मोकळे बेड हे चांगलं लक्षण आहे.
तुरळक मास्क अजून सहा आठ माहिने तरी दिसतील.
काल लॉ कॉलेज रोडच्या वाडेश्वरपाशी गेलो होतो. आतली चालू टेबले भरलेली होती. बाहेर पांच सात लोक वेटिंगला होते. मास्क फक्त वेटर लोकांनी लावला होता. सो लोक पुन्हा जैसे थे वर येतायत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काल लॉ कॉलेज रोडच्या वाडेश्वरपाशी गेलो होतो. आतली चालू टेबले भरलेली होती. बाहेर पांच सात लोक वेटिंगला होते. मास्क फक्त वेटर लोकांनी लावला होता. सो लोक पुन्हा जैसे थे वर येतायत.

माझ्या मते नवी लाट येण्यासाठी हा घटकदेखील कारणीभूत ठरणार (किमान पुण्यात)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जेव्हा कोव्हिड नवीन नवीन होता, लोकांना त्याबाबत फारसं माहित नव्ह्तं, तेव्हा अगदी सौम्य लक्षणं असलेलं पब्लिकही उठसूठ हॉस्पिटलला पळायचं. आता लोकांचं करोनाबद्दल द्न्यानही वाढलं आहे आणि करोनाबद्दलची भीडसुद्धा थोडी चेपली आहे. हल्ली जेव्हा करोनासदृश लक्षणं दिसतात तेव्हा लोक आधी फॅमिली डॉक्टर्सचा सल्ला घेतात, घरच्या घरी ऑक्सीमीटरने एसपीओ२ लेव्हल्स वगैरे बघतात, आणि जर अगदीच घोळ वाटला तरच टेस्ट वगैरे करतात किंवा हॉस्पिटलची पायरी चढतात, अन्यथा टेस्टही करायला जात नाहीत. ज्यांना डायबेटीस वगैरे इतर कोमॉर्बिडिटीज आहेत, ते लोक आधीपासूनच काळजी घेत आहेत, अजूनही काही काळ घेतील. त्यामुळेही हॉस्पिटल्स काहीशी मोकळी दिसत आहेत. माझ्या परिचयातील काही कुटुंबे अशी आहेत, ज्यांच्या घरात त्यांचे कुटंबीय करोनाची स्पष्ट लक्षणं दिसायला लागल्यावर (वास/चव न कळणे, अशक्तपणा इ.) पहिले तर आयसोलेट झाले. नंतर फ्यामिली डॉक्टरच्या सल्ल्याने घरच्या घरीच एस्पीओ२, ताप, पल्स वगैरे तपासत राहिले आणि साधी औषधं घेऊन बरे झाले. टेस्टही करायला गेले नाहीत. चांगली गोष्ट म्हणजे बरे झाले तरीही उगाच इकडे तिकडे बोंबलत हिंडत नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजातील सर्वच घटक थोडी स्थिती सुधारली की बेफिकीर होणार आहेत.
काही ठराविक लोक (अशी लोक संख्येनी खूपच कमी असतात ) च फक्त अजुन काही दिवस नियम पाळतील आणि काही दिवसांनी आपण वेगळे पडत आहोत हे लक्षात आले की ते पण बाकी लोकांसारखे बेफिकीर होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण वेगळे पडत आहोत हे लक्षात आले की ते पण बाकी लोकांसारखे बेफिकीर होतील.

🎯

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. न्यूज चॅनल न पाहणे
२. बाहेरुन आल्यवार हात पाय स्वच्छ धूणे
३. कमी खर्चात पर्यायी गोष्ट मिळवणे
४. स्वत:ची कामे स्वत: करणे
५. नियमित बसून वाचन करणे
६. एखाद्या गोष्टीची गरज आहे की आवश्यकता आहे याचा विचार करण्याची सवय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

शिक्षकांचे औटसोर्सिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0