पंडित नामा - १: गिरीजाकुमारी टिक्कू

काही इतर संदर्भ शोधताना ही ब्लॉगपोस्ट आणि मग ही लेखमाला सापडली.

विशेषतः बंगालातल्या मागच्या काही दिवसांतील बातम्या पाहून आणि ही पोस्ट वाचून, अश्या घटना भविष्यात टाळता येण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी संपूर्ण ब्लॉगपोस्ट खाली देत आहे.

गिरीजाकुमारी टिक्कू.
जन्मः १५ फेब्रुवारी १९६९ | हत्या: ११ जून १९९०

या महिलेबद्दल मी प्रथम फेसबुकवर वाचलं होतं. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांबाबत पूर्ण कल्पना असली, तरी फेसबुक आणि व्हॉट्सॅपवरुन आलेल्या ढकलसंदेशात बर्‍यापैकी मसाला मिसळलेला असतो याची कल्पना असल्याने यात वर्णन केलेल्या तपशीलांवर कितपत विश्वास ठेवावा याबद्दल मी जरा साशंकच होतो. पण ती पोस्ट एका मैत्रिणीला दाखवल्यावर तिने त्याची सत्यता पटवली. कारण तिच्याच कंपनीत गिरीजाचा भाचा की पुतण्या काम करत होता आणि त्याने या कथेची सत्यता प्रमाणित केली.

एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा अंत होता होता काश्मीरात नुकताच हिंसाचार सुरु झाला होता. त्रेहगामच्या एका मुलींच्या शाळेतल्या प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणार्‍या गिरीजाला कुणीतरी निरोप दिला की काश्मीर खोरे कायमचे सोडण्याआधी निदान तुझा पगार तरी घेऊन जा. ती शाळेत गेली, पगार घेतला, आणि मग तिच्या एका मुस्लिम सहकार्‍याच्या घरी काही कामानिमित गेली.

तिच्या शाळेत जाण्यापासून ते मुस्लीम सहकार्‍याच्या घरी जाईपर्यंतच्या प्रत्येक हालचालीवर अतिरेक्यांकडून नजर ठेवली जात होती. त्या सहकार्‍याच्या घरी ती जाताच अतिरेकी त्या घरात घुसले आणि तिला घेऊन जाऊ लागले. यावर तिच्या मुस्लीम सहकार्‍यानेही काहीच आक्षेप घेतला नाही. जणू काही अंगणात घुसलेल्या एखाद्या वांड जनावराला त्याचा मालक येऊन घेऊन जातो आहे आणि ब्याद टळली असाच त्याचा आविर्भाव होता. इतरही कुणीच आक्षेप घेतला नाही. कारण ती हिंदू होती. काफीर होती. तिच्या शरीरावर त्यांची मालकी असणं इस्लाममधे धर्ममान्य होतं. ती त्यांची "मालमत्ता" होती.

मग तिला विवस्त्र करण्यात आलं. तिच्यावर त्या अतिरेक्यांनी सामूहिक बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेक दिवस. आणि मग जिवंतपणीच त्या धर्मांध इस्लामी अतिरेक्यांनी तिच्या शरीराचे लाकडे कापण्याच्या करवतीने दोन तुकडे करुन मग तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. तुम्हा आम्हाला तिला झालेल्या वेदनांची स्वप्नातही कल्पना करता येणं निव्वळ अशक्य आहे. साधं भाजी चिरताना बोट कापलं तरी आपण वेदनांनी किती कळवळतो ते आठवा. आणि मग कल्पना करा. आधी सामूहिक बलात्कार झाला आहे त्या स्त्रीवर. आणि मग लाकडे कापण्याच्या करवतीने शरीराचे दोन तुकडे. आपण एक वाकप्रचार वापरतो. एखादी फार वाईट घटना घडली की आपण म्हणतो, "शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये". इथे ती ज्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष राहत होती, ज्यांना मित्र समजत होती त्यांनीच शत्रू बनून तिच्यावर हे नृशंस अत्याचार केले होते. तिचा बळी घेतला होता.

का? कारण ती काश्मीरी पंडीत होती. हिंदू होती. त्यांना म्हणे आझादी हवी होती. आझादीसाठी हिंसेचं समर्थन करायचंच झालं, तर हे असे अत्याचार कुठल्या मापदंडात बसवायचे? भारतालाही आझादी काही निव्वळ बिना खडग बिना ढाल मिळालेली नाही. आपल्याकडेही क्रांतीकारकांची उज्ज्वल परंपरा आहे. पण असे अत्याचार तर सोडाच, त्यांनी कारणाशिवाय स्वकीयांवर तर सोडाच पण परकीय असलेल्या निर्दोष ब्रिटीशांवरही हेतूपुरस्सर हातही उचलल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही. मग जे आपल्याच सोबत राहतात, आपले शेजारी-सहकारी आहेत, काश्मीरच ज्यांची मातृभूमी आहे, त्यांच्या अब्रूवर, जीवावर अशा प्रकारे राक्षसांनाही लाजवेल अशा पद्धतीने घाला घालण्याची ही कृत्ये कुठल्या क्रांतीकार्यात मोडतात?

इस्लामी दहशतवादाने काश्मीरात अशा प्रकारे अनेक बळी घेतले. या महिलेच्या जवळच्या नातेवाईकाचा योगायोगाने शोध लागला म्हणून ही गोष्ट पहिली लिहायला घेतली. तुम्हाला कंटाळा आला का? की अंगावर काटा आला? काही असो, आपल्याला हे सारं माहीत हवं. कारण हाताला लागल्यावर डोळ्यांतून पाणी येतं, तसं आपल्याच देशातील एका राज्यात आपल्याच बांधवांवर झालेले अन्यन्वित अत्याचार आपल्या अंतःकरणाला भिडायला हवेत. कारण एखाद्या अवयवाला झालेला कर्करोग जसा पूर्ण शरीरात पसरतो, तसा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी शेवटी लांब कुठेतरी काश्मीरात सुरु झालेला दहशतवाद आता तुमच्या आमच्या दाराशी येऊन ठेपला आहे. आता अतिरेकी फक्त सीमेपलिकडून काश्मीरात येत नाहीत. ते बोटीतूनही येतात. त्यांना आपल्यातच राहणारे अस्तनीतले हिरवे निखारे मदत करतात.आणि या अत्याचारांची लांबूनही झळ न लागलेले काही हिरवट पत्रमहर्षी अतिरेक्यांशी चर्चा करा असा फुकटचा सल्ला देतात.

काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडताना त्यांनी सर्वस्व गमावलं असेल, पण स्वाभिमान सोबत होता. त्या जोरावर ते उभे राहीले. नोकरी केली. धंदा केला. देशाचे प्रामाणिक नागरिक म्हणून नाव कमावलं. पण आपल्यावर झालेल्या अत्याचारांच्या नावाखाली एकाही काश्मीरी पंडीताने, कुणाचीही हत्या करण्यासाठी बंदूक नाही उचलली. बंदूक सोडा हो रागाच्या भरात साधा दगड नाही उचलला भिरकवायला कुणाच्या अंगावर. त्यामुळे दहशतवादाला धर्म नसतो वगैरे भूलथापा माझ्यासमोर तरी नका ठोकू. हा सरळसरळ एका वंशाचा विच्छेद करण्यासाठी पेटून उठलेला इस्लामी दहशतवाद होता. आणि आहे. नावं वेगवेगळी असतील. पण आहे.

आपल्याला हे सारं माहीत हवं. काश्मीरसाठी मोजलेली किंमत समजली की मग, "देऊन टाका एकदाचा तो काश्मीर" अशी मुक्ताफळं कुणी उधळणार नाही. कदाचित.

पुढची गोष्ट उद्या. अहं... इतकी भयानक नसेल कदाचित.............कदाचित असेलही. बघा बुवा. ज्यांचं मनोधैर्य भक्कम असेल त्यांनीच हे वाचा. कमकुवत हृदय असणार्‍यांसाठी हे नाही.

--------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी

स्रोत: https://mandarvichar.blogspot.com/2016/07/blog-post.html

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (4 votes)

प्रतिक्रिया

पुनश्च प्रोपागांडा.

मग आता हे वाचून भैयालाल भोतमांगे काय म्हणाले असते?

शत्रूवरही अशी वेळ येऊ नये - हे तिथेही कमी पडलंच. स्वत:चं पूर्ण कुटूंब मारलं जात असताना, त्यांची विटंबना होत असताना असाहायपणे ते पहाणं त्यांच्या नशीबी होतं. तरीही ते पुढली अनेक वर्षं न्यायलयीन लढाई लढतच राहिले. त्यांनीही शस्त्र हाती घेतलं नाही.
तिथे तर त्यांचे नातलग, गावकरी, महाराष्ट्रातले मराठी लोकंच होते - मग आता तिथेही जर कुणी असंच पोस्ट टाकून त्याला पुन्हा सवर्ण-दलित रंग भडक रंगात रंगवून दलित पँथर्स तयार केले तर तुम्हाला ते चालणार आहे का? महाराष्ट्रातच, हे अस्तनीतले निखारे आहेत, त्यांचं काय करायचं असं भैय्यालाल विचारत राहिले तर त्याला काय उत्तर आहे?

काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेच आहेत (ते नाकारणं हाही मूर्खपणाच.) पण म्हणून त्याचं एक्स्ट्रापोलेशन करून " दहशतवादाला धर्म नसतो" वगैरे रंगीत भिंग लावल्याने आमची दृष्टी मुस्लिमांवर केंद्रित करण्याचा प्रोपागांडा नको.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि काही वर्षांपूर्वी नितिन आगे झाला, महाराष्ट्रातच.
हे सगळे लोक ब्राह्मण नव्हतेच, दलित होते. मग यांची नावंसुद्धा आम्हांला माहीत नसतात. वर पुन्हा दलितांनी ब्राह्मणांना त्यावरून नावं ठेवली की आणखी पोटशूळ उठणार.

त्यांनी कारणाशिवाय स्वकीयांवर तर सोडाच पण परकीय असलेल्या निर्दोष ब्रिटीशांवरही हेतूपुरस्सर हातही उचलल्याचं एकही उदाहरण इतिहासात सापडणार नाही.

चौरीचोराला पोलिस ठाणं जाळल्यामुळे गांधीजींनीच 'चले जाव' आंदोलन मागे घेतल्याचं, काँग्रेसच्या राज्यातल्या पाठ्यपुस्तकांमध्येही शिकवलं होतं. विसरलात? सध्या करोना थैमान घालतोय भारतात. चाफेकर बंधूंनी रँडला का मारलं, याचा पुन्हा एकदा तपास घेऊन बघा.

बाकी जातीपातीचं किंवा धर्माधर्मातलं राजकारण सोडाच. लेखन म्हणूनही हे किती बटबटीत आहे! शब्दशः हिंसेचं पॉर्न.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बंगालचा ह्याचाशी काय संबंध आहे सांगा जरा ! लेखातली तुम्ही स्वतः लिहिलेली जी एकमेव गोष्ट आहे , तिला ना शेंडा ना बुडखा.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हो, तुमच्या अनेक सदस्यनामांपैकी एकावरून तुम्हाला तंबी दिली होती. ते नाव बदललं नाहीत तर ते ब्लॉक करेन म्हणून. त्या नावाचा अर्थ तुम्हाला अर्थातच समजला नव्हता. पण त्याचं वर्णन मोठ्या चवीचवीनं तुम्ही ह्याच धाग्यात केलं आहेत.

इतरत्र कुठे तरी 'भाषा शिकायला पाहिजेत' असा उल्लेख केला होतात. तर भाषा शिकाच आता. म्हणजे असली घाण इथे आणून चिकटवण्याची शक्यता कमी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.