युद्ध नावडे सर्वांना

युद्ध नावडे सर्वांना...

© भूषण वर्धेकर
मे २०२१

आजकाल आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घटनांचा भारतातील समाज माध्यमांवर सुळसुळाट जोरात चालू आहे. मग अशा वेळी मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांच्या फॉरवर्डेड लेख, स्फुटं, ऐतिहासिक नोंदी व्हायरल होत आहेत. तशाच गोष्टी कट्ट विचारसरणीतील मंडळीपण बिनधोक पणे पसरवतात. पीडीत कोण आवडता की नावडता हाच कळीचा मुद्दा आहे जणू! अशी युद्धे, जमीन बळकावून हस्तगत करणे हे परंपरागत चालत आलेल्या ऐतिहासिक घोडचूका आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये युद्धाचा आलेख बघितला तर पैसा, जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठीच युद्धजन्य परिस्थिती तयार केली जाते. एखाद्याला गुलाम करणे ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तसेच कमी शक्तीशाली देशाला किंवा समुहाला येनकेनप्रकारेण सोयी सवलती देऊन प्रसंगी धमकीवजा इशारे देवून काबूत ठेवले जाते. विस्तारवादी धोरणात हाच दुर्गुण आहे. वॉर मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक देशात असतोच असतो. संरक्षण ही सामाजिक मुलभूत गरज आहे. मग ते संरक्षण देशाचे असो वा समुहाचे. मग अशावेळी जो आपला तारणहार असेल त्याचा उदोउदो ठरलेलाच. त्याच्या चुका, घोडचूका किंवा अनंत अपराध सगळे पोटात घेऊन समर्थन करणे हेच एकसुरी ठरलेले असते. युद्धे वाईटच कारण वित्तहानी आणि जीवितहानी ही सर्वांचीच होत असते. बलाढ्य पक्षाची कमी कमकुवत पक्षाची जास्त हाच तो काय फरक.

युद्धाचा भडका उडाल्यावर रातोरात जागी झालेली मंडळी ही युद्ध होण्यासाठी जबाबदार गोष्टींवर काहीही बोलत नाहीत. कारण आंतरराष्ट्रीय अर्थचक्रावर युद्धांचा प्रचंड प्रभाव असतो. भीती ही एकमेव गोष्ट ज्याचा व्यापारासाठी सर्रासपणे उपयोग होतो. वैश्विक इतिहासात धर्मासाठी कत्तली ह्या वर्षानुवर्षे होत आलेल्या आहेत. पीडित धर्म वा देश कोणता यावर ज्याने त्याने निषेधाची किंवा पाठिंब्याची दुकाने थाटलेली आहेत. कोणताही देश शास्त्र आणि शस्त्र या दोहोंचा वापर करतोच. कारभार चालवण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी. मग त्या त्या विचारसरणीचे पाईक गुणवंत हौशे नवशे आणि गवशे पराकोटीची मंद बौद्धिकं उथळ माथ्याने मिरवत असतात.

मानवतावाद कसा चांगला हे पाठ्यपुस्तकी छान वाटते. बिइंग प्रँक्टीकल अँक्शन ला रिअँक्शन येतेच. प्रतिसाद द्यावा की प्रतिकार करावा हे त्यावेळची दाहक परिस्थिती ठरवते. एकाएकी जर हल्ले झाले तर कडी निंदा तीखी निंदा वगैरे करणारे पण असतात आणि जशास तसे प्रत्युत्तरादाखल प्रतिहल्ला करणारे पण असतात. एक नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जो पाऊल टाकतो त्याला समर्थन दिलेच जाते. उदा. भारतात आतंकवादी हल्ले जेव्हा झाले तेव्हा मोदींच्या नेतृत्वावर टिका करणारे, नावे ठेवणारे लोकच एअर स्ट्राईक वगैरे झाला की तो सैन्याने केला मोदिंचे काय कौतुक वगैरे बोलू लागले. काही बहाद्दर नेत्यांनी पुरावे द्या म्हणून मागणी केली. काही बिनडोक लोकांनी तर आतंकवादी हल्ला हा मोदींनीच घडवून आणला निवडणुकीत जिंकण्यासाठी असा जावईशोध लावला. अशा घटना जर होत असतील तर त्या पथ्यावर कशा पडतील याची खबरदारी बरोबर घेतली गेली. भक्तलोक मुळात मर्कट. त्यांना अशा पद्धतीने डबल स्टँडर्ड लोकांनी आयतं कोलीतच दिले. मर्कट असल्याने त्यांनी त्यांच्या लीला लीलया पार पाडल्या ध्रुवीकरणासाठी.

मानवतावादी संघटनेच्या बाबतीत पण गढूळ समज बऱ्यापैकी फोफावलाय. सैनिक मरतात तेव्हा मानवतावादी आवाज उठवत नाहीत मात्र हल्ल्यात अतिरेकी मरतात तेव्हा मानवतावादी खडबडून जागे होतात. मुळात अतिरेकी का तयार होतात, कोण तयार करतात यावर मानवतावादी कधीच काथ्याकुट करत नाहीत. याचाच वर्चस्वतावादी लोक पुरेपूर फायदा उचलतात. युद्धात नुकसान हे होतेच पण त्यात आर्थिकदृष्ट्या बरेच हितसंबंध लपलेले असतात. त्या हितसंबंधांना कोणीही आवाहन देत नाही. विचारवंत वगैरे एक दोन आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांवर पुस्तके लिहून कोण कसा चुकतो किंवा अमुकच कसा बरोबर असे निष्कर्ष काढून चमकोगिरी करतात. बऱ्याचशा वेळेला अशा लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तर्क लावलेले आढळतात. असे विसंगत तर्क आजूबाजूच्या टपलेल्या टोळक्यांना आवडतात फे फे उडवण्यासाठी. जागतिक सत्य हेच आहे की जो बलाढ्य असतो तो इतरांनी शांतता पाळा म्हणून आग्रह धरतो. मात्र स्वतःच्या बाबतीत हिंसेचे, हल्ल्यांचे समर्थन करतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीत चीन आणि अमेरिका ही दोन बलशाली राष्ट्रे म्हणून ओळखली जातात. त्यांनी केलेल्या अमानवी कृत्यांवर कोणीही चकार शब्द काढणार नाही. निषेधार्थ एकही आवई उठवणार नाही. मात्र इतर राष्ट्रीय घटनांमध्ये स्वतःची टिमकी वाजवणार. अशा लोकांच्या तर्कांचा हेतू ध्रुवीकरणासाठी जोरदारपणे वापरला जातो.

जगाच्या इतिहासात नरसंहार खूप झालेले आढळतील. भारतभूमीवर देखील बरेच नृशंस नरसंहार केले गेले. मुळात आपल्या देशाचा बराचसा इतिहास बायस्ड पद्धतीने लिहिला गेला. एकतर प्रतिमामंडन करण्यासाठी किंवा प्रतिमाभंजन करण्यासाठी. एखाद्या राष्ट्राची, राज्याची किंवा नेतृत्वाची स्तुती कवने गाणारे, खुशमस्कऱ्या करणारे, गौरवग्रंथ लिहिणारे, चरित्रांचे शब्दांकन करणारे आणि आताचे बायोपिक काढून छद्मप्रतिमा उभी करणारे समुह पुर्वीपण होते आजही आहेत भविष्यातही असतील. अशी मंडळी मोठ्या गटाला आवडेल असा ऐवज तयार करतात किंवा उपलब्धतेनुसार गोळा करतात. अस्सल निष्पक्षपणे वर्णन केले जाणारे साहित्य दुर्मिळच. त्यामुळे हिंसेचे समर्थन करणारे जिकडेतिकडे सापडतात.

पृथ्वीगोलार्धाचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य असे भाग जर केले तर एक भाग धर्माधिष्ठित तर दुसरा विज्ञानाधारित मुल्यांना कवटाळलेला दिसतो. सगळे धर्म जरी शांतीचा संदेश वगैरे देतो म्हणत असतील तरीही प्रत्येक धर्माचा काहीना काही हिंसक इतिहास आहेच आहे. जेवढा धर्म एकजूटीने वाढेल तेवढा कट्टर होत जातो. अल्पसंख्याक असू तेव्हा विशेषाधिकार बहुसंख्यांक होऊ तेव्हा सर्वाधिकार समान अधिकार वगैरे अंधश्रद्धा असतात. हे प्रत्येकांना लागू पडते. हिंदूंच्या बाबतीत थोडेफार वावगे आहे. एकतर विस्कटलेल्या जातपातपंथांत विभागलेला धर्म म्हणजे हिंदू. जगभरात ज्या काही चाळीसच्यावर सिव्हिलायझेशन नोंदणीकृत आहेत त्यापैकी टिकलेली सिव्हिलायझेशन म्हणजे हिंदू. सिंधू नदीशी निगडीत, सप्तसिंधूशी नाळ असलेली भारतीय उपखंडात पसरलेली, विखुरलेली आणि बहरलेली समृद्ध जमात म्हणजे हिंदू. हिंदुंनी इतर धर्मीयांवर आक्रमणे करून त्यांना गुलाम केले किंवा त्यांचा देशातील जागा बळकावली किंवा मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला भाग पाडले असा उल्लेख कुठे आजवर सापडला नाही. जाणकारांनी यावर कुठे वाचले, अभ्यासले असेल तर जरूर सांगावे. इतर धर्मीयांच्या इतिहासात डोकावले तर काहींचा इतिहास हा रक्तरंजित आहे तर काहींचा शोषित, वंचित आहे. धर्माच्या आधारवर हिंसा कोणी कधी आणि किती वेळा केलीय हे वाचणाऱ्या सगळ्यांना माहिती असते. फक्त जगजाहीर बोलता येत नाही. त्यातही काही दशकांपासून इतर धर्मीयांच्या कट्टर भूमिकेला जशासतसे उत्तर देण्यासाठी कट्टर हिंदूत्ववादी जहाल गट उदयास आले आहेत. मात्र ते सकल हिंदूंचे कधीही प्रतिनिधीत्व करू शकत नाहीत.

मूळ मुद्दा हाच की भारतात अशी आय स्टँड विथ समथिंग मंडळी आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत आपल्या मायभूमीत ज्या गोष्टी झाल्या होत्या घडत आहेत त्यावर सोयीनुसार भुमिका घेतात. अशा ढोंगीपणाला सामान्य जनता कंटाळते. सामान्य जनतेला हिंसा ही हिंसाच दिसते मरणारा माणूसच दिसतो. पण हल्ली भारतात मरणारा कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे पाहून निषेध वगैरे नोंदवला जातो. मुळात स्वसंरक्षणासाठी जर हत्यार उचलले तर तर जो बलवान असतो तोच जिंकतो. हा जगत्मान्य इतिहास आहे. इतिहासात जो ताकदवान जो सक्षम तोच टिकतो अन् लक्षात ठेवला जातो. विजय पराजय हे नंतरचे पैलू आहेत.

देशावर हल्ला झाला तर प्रतिहल्ला होणारच. २०२१ चालूय. अहिंसेची शिकवण फक्त एकतर्फी असून चालत नाही. व्यक्तीगत आयुष्यात पण अहिंसा कोणीही पाळत नाही मात्र दुसऱ्याला अहिंसेची शिकवण द्यायला पुढे सरसावतात विचारवंत वगैरे मंडळी. मुद्दा हाच आहे की पँलेस्टाईन मधल्या मुस्लिमांवर हल्ले होतात तेव्हा जेवढा राग, निषेध किंवा प्रखर टिका हल्ले करणाऱ्यांवर होते तशी टिका चीनमधील ऊईगीर मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ले करणाऱ्यांवर होत नाही. इकडचा मुस्लिम तिकडचा मुस्लिम असे काय वेगवेगळे असतात का? अशावेळी आपल्याकडे वावरणाऱ्या पुरोगामी, विचारवंत आणि मानवतावादी लोकांच्या ढोंगीपणाची किव येते. पीडीतांचा धर्म, देश पाहून गळे काढणारे वाढत चाललेत सध्या. अशा लोकांमुळे कट्टर विचारसरणीतील लोक चेकाळतात आणि धष्टपुष्ट आयुधांचा वापर करून ध्रुवीकरण करतात. हल्ली हे भारतात सर्रासपणे होत आहे.

field_vote: 
1.75
Your rating: None Average: 1.8 (4 votes)

१.हल्ला,संहार बरोबर कि चूक, आणि तो थांबायला हवा का
२. टीकाकार दुटप्पी आहेत की नाहीत,
ह्यात एक विषय खूप महत्त्वाचा वाटतो, दुसरा पोलिटिकल कुस्ती म्हणून चांगला मजेदार विषय आहे.

व्यक्तीगत आयुष्यात पण अहिंसा कोणीही पाळत नाही मात्र दुसऱ्याला अहिंसेची शिकवण द्यायला पुढे सरसावतात विचारवंत वगैरे मंडळी.

???? व्यक्तिगत जीवनात अहिंसा पाळत नाहीत ? तुम्हाला अश्या कोणाची माहिती असल्यास पोलिसांत कळवा.

सैनिक मरतात तेव्हा मानवतावादी आवाज उठवत नाहीत मात्र हल्ल्यात अतिरेकी मरतात तेव्हा मानवतावादी खडबडून जागे होतात.

मस्त बुजगावणे !

  • ‌मार्मिक7
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“मरण्याची असमृद्ध अडगळ”, मुस्लिमद्वेष, मोदीपुरस्कार आणि बाकी सगळी whataboutary!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मी फक्त एकूण मला दोन वेगवेगळ्या गटात विभागलेले आहेत लोक, भक्त, गुलाम, समर्थक, विरोधक आणि तटस्थ वगैरे यांच्या काही पोष्टी, लेख, वगैरे वाचून सुचलं तसं लिहिले.
मी शक्यतो लिखाणात सुवर्णमध्य ठेवायचा प्रयत्न करतो. मात्र वेगवेगळ्या चष्म्यातून वाचू कोणी मला भक्त म्हणतं कोणी गुलाम कोणी कम्युनिस्ट कोणी येडपट कोणी फालतू तर कोणी भरकटलेला म्हणतात. मी दुर्लक्ष करतो. कारण जो तो त्या त्या पर्सेप्शने बघणार आणि बोलणार. मी लिहून मोकळा होतो. जे भावतं ते लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

लंपन, पूर्ण सहमत!
लेखकाने पलेस्टाइनचा इतिहास मुळातून वाचावा अशी नम्र सुचना. आणि अताचा संघर्ष का उसळला त्याची कारणे जाणून घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीणा गवाणकर, निळू दामले, सविता दामले यांचे भाषांतरित आणि अतुल कहाते यांची पुस्तके वाचली आहेत. काही माहितीपट पण पाहिले आहे. नुकताच ध्रूव राठी या युट्यूबरचा एक सारांश स्वरूपातील एक लेटेस्ट युट्युब व्हिडीओ पण पाहिला. असो

इस्राएल हा खुप महत्वकांक्षी देश आहे. आपल्या कम्युनिटीवर शतकानुशतके अन्याय झालाय ही भावना प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्यू नागरिकांच्या मनात ठासून भरलीय. आणि याच भांडवलाच्या जोरावर देश उभा करून शस्त्रास्त्र, युद्धनीती आणि आक्रमकता या जोरावर लोकांमध्ये कैक नेतृत्व लोकप्रिय झाले. मोशे दायान सारखा लष्करातील माणून संरक्षण मंत्री होतो आणि तीन तीन राष्ट्रांसोबत युद्धकरून जिंकतो हे भारीय. देश कसा चालवावा, उभा करावा ह्यासाठी अभ्यासायला इस्राएल खूप मोठा विषय.

ताकद वाढली आणि आपल्या खूप अन्याय झालाय ही भावना पेरलेली असेल तर विस्तारवादी आणि वर्चस्वतावादी गुण किंवा दुर्गुण वाढीस लागतात. व्यक्ती, संघटना किंवा देश यांतून सुटत नाहीत. आजूबाजूला जॉर्डन, इजिप्त, लेबेनॉन आणि अरब अशी ऐतिहासिकदृष्ट्या युद्धखोर मंडळी असेल तर इस्राएल कडून शांततेसाठी कबुतरे उडवण्याचा अट्टाहास कोण करेल? अशात धार्मिक कट्टरता, लोकांचे राक्षसी समर्थन, आधुनिक शस्त्रसज्जता या बळावर युद्धाची खुमखुमी असणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

प्रतिकार करतोच. प्रतिकारशक्ती जर कमी पडली तर केविलवाणा होतो माणूस. हिंसा कोणालाच नको असते. मात्र स्वसंरक्षणासाठी तिखट प्रतिकार केला जातोच. अरे ला कारे करणारा वर्ग नेहमी अग्रेसिव्ह असतो. आक्रमकता ज्यांची जास्त तो कणखर हा फुकाचा आत्मविश्वास कित्येकांना असतो.

टिकाकार दुटप्पी आहेत. हे सरसकटपणे सगळ्यांना लागू होत नाही. कंन्सट्रक्टिव्ह टिका, टिप्पणी गरजेची असते. ती खिलाडूपणे स्विकारणारा पण खूप महत्त्वाचा असतो. सध्या भारतात दोन्ही घटक आस्तित्वात नाहीत. सत्ताधारी मदांध झालेत. टिकाकार भरकटलेल्या अवस्थेत आहेत.

सैनिक मरतात... हे यासाठीच उल्लेखलेले आहे की मानवतावादी लोकांची प्रतिमा तशी भारतात बनलीय. कट्टर पंथीय लोकांनी तशी इकोसिस्टिम बनवलीय. मानवतावादी, पुरोगामी वगैरे राष्ट्रद्रोही असतात वगैरे. सर्वसामान्य जनतेला मुर्खात काढणे सत्ताधाऱ्यांना सहज जमते.

अशा घटनांचा वापर जो तो आपापल्या मतपेढ्या मजबूत करण्यासाठी करतो. आज सत्ताधारी लोकांनी राष्ट्रवादाची, देशभक्तीची एक इकोसिस्टिम मजबूत बनवलीय. जशी कधीकाळी कॉंग्रेसच्या लोकांनी सेक्युलरिझमच्या नावाने बनवलेली होती.

स्वसंरक्षणासाठी जे राष्ट्र ताकदवान त्याच्या वाट्याला सहसा कोणी जात नाही उघडपणे. आंतरराष्ट्रीय राजकारणात युद्धे इतर देशात कशी होतील आणि आपल्याला त्याचा कसा फायदा होईल या एकमेव दुष्टचक्रात अडकलंय सगळं. युद्धात आर्थिक हितसंबंध खूप महत्त्वाचे असतात. सुप्त व्यापार कसा जोपासला जाईल तेच बघितलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

भारतात अशी आय स्टँड विथ समथिंग मंडळी आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत आपल्या मायभूमीत ज्या गोष्टी झाल्या होत्या घडत आहेत त्यावर सोयीनुसार भुमिका घेतात.

गेले काही दिवस 'आय स्टँड विथ पॅलेस्टाईन' अशी पोस्ट मला क्वचितच दिसली. अजूनही माझ्या विचारकूपातले लोक करोना, कोव्हिड, ऑक्सिजन, आजारांमुळे होणारे मृत्यू वगैरेंबद्दलच बोलत आहेत. आणि काही हिंदू मंडळी 'मी इस्रायलमध्ये लढायला जायला तयार आहे, माझी उंची ५'७" आहे' छापाच्या पोस्टी टाकताना दिसत आहेत. भारताची अधिकृत भूमिका पॅलेस्टाईनच्या समर्थनाची आहे. तर काय हो करायचं?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारताची अधिकृत भूमिका पॅलेस्टाईनच्या समर्थनाची आहे.

हे विधान थोडे क्वालिफाइड म्हणावे लागेल. भारताची 'अधिकृत भूमिका' या किंवा तत्सम तात्त्विक प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच वरकरणी तत्त्वनिष्ठ परंतु आतून ambivalent राहिलेली आहे. (राजकीय दृष्ट्या / from a practical standpoint, यात काही गैर आहेच, असा माझा दावा नाही. प्रत्येक देश हा अंतिमत: स्वत:चे - आणि फक्त स्वत:चे - हितसंबंध सांभाळतो.)

१९९०च्या दशकात जेव्हा भारताने इस्राएलसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, (निदान) तेव्हापासून भारताची भूमिका नेमकी इस्राएलविरुद्ध म्हणता येईलसे वाटत नाही. हं, पॅलेस्टिनी संघटनांबरोबर संबंध तोडलेले नाहीत, आणि त्यांना नैतिक पाठिंबा वगैरे आहेच, परंतु इस्राएलला थेट विरोध म्हणता येईलसे वाटत नाही.

परंतु ही गोष्ट झाली इस्राएलबरोबर राजकीय संबंध प्रस्थापित केल्यानंतरची. त्याअगोदरच्या काळात जेव्हा तत्त्वास अनुसरून वगैरे भारताचे इस्राएलशी राजनैतिक संबंध नव्हते - जेव्हा भारताचा पॅलेस्टिनी मुक्तिसंघटनेला ठाम तात्त्विक, नैष्ठिक वगैरे पाठिंबा होता, आणि जेव्हा श्री. यासर अराफत हे श्रीमती इंदिरा गांधींच्या गळ्यात गळे वगैरे घालीत (माइंड यू, श्री. अराफत आणि श्रीमती गांधी या दोहोंप्रति माझ्या मनात निव्वळ आदराव्यतिरिक्त दुसरी कोणतीही भावना नाही. तर ते एक असो.) - तेव्हासुद्धा, भारताने (अरब किंवा इतर अनेक मुस्लिम राष्ट्रांप्रमाणे) इस्राएलचे अस्तित्व वा इस्राएलचा अस्तित्वाचा हक्क नाकारलेला नव्हता; फक्त, पॅलेस्टिनींच्या लढ्याला पाठिंबा होता आणि त्यामुळे इस्राएलशी राजनैतिक संबंध ठेवणे कटाक्षाने टाळले होते, इतकेच. (इस्राएली पासपोर्टधारकांना भारतात मज्जाव नव्हता; भारताच्या दृष्टीने ते तेव्हाही एक वैध पारपत्र ठरत होते.) मात्र, इस्राएलशी राजनैतिक संबंध ठेवलेले जरी नसले, तरी व्यापारी संबंध - तिसऱ्या राष्ट्रांमार्फत नव्हे, तर थेट - आणि मानवी देवाणघेवाण यांना मनाई नव्हती. किंबहुना, इस्राएलशी राजनैतिक संबंध नसल्यामुळे तेव्हा दिल्लीत इस्राएली दूतावास जरी नसला, तरी मुंबईत इस्राएलचे कॉन्सुलेट कार्यरत होते. (दिल्लीत पीएलओचे 'रेप्रझेंटेशन' आणि मुंबईत इस्राएलचे कॉन्सुलेट दोन्ही एकसमयावच्छेदेकरून गुण्यागोविंदाने नांदत होती. आता त्यात दिल्लीतल्या इस्राएली दूतावासाचीसुद्धा भर पडली, इतकेच. पॅलेस्टिनींचे प्रतिनिधित्व बहुधा अजूनही असावे; त्यात फरक पडण्याचे काही कारण दृग्गोचर होत नाही. तर ते एक असो.)

त्याहूनही विनोदी परिस्थिती दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत होती. वर्णभेदी राजवटीच्या काळात दक्षिण आफ्रिकेवर भारताचा बहिष्कार (embargo) होता. भारतीय पारपत्रे ही तेव्हा दक्षिण आफ्रिकेस प्रवास करण्याकरिता अवैध होती. दक्षिण आफ्रिकेस प्रवास करणे, दक्षिण आफ्रिकेबरोबर कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार वा व्यापार (अगदी तिसऱ्या राष्ट्रांमार्फतसुद्धा) करणे हे दंडनीय गुन्हे होते; त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होती. मात्र, याला एक भलाथोरला अपवाद होता.

मुंबई-सुरतेची जी हिऱ्यांना पैलू पाडून त्यांची निर्यात करणारी (मोठी) इंडस्ट्री आहे, ती भारताला परकीय चलन मिळवून देण्यात अग्रेसर आहे. मात्र, कच्च्या मालाकरिता ती पूर्वापार दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून आहे. खास त्यांच्याकरिता या नियमाला मुरड घालून खुद्द भारत सरकार आपल्या 'स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन' या (अधिकृतरीत्या आयातनिर्यात करणाऱ्या) अवयवामार्फत दक्षिण आफ्रिकेतून पैलू न पाडलेल्या हिऱ्यांची आयात करून त्यांना तो कच्चा माल मिळवून देत असे.

म्हणजे, मुंबईच्या एखाद्या डाह्याभाई गामडियाने, दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना लागतात म्हणून रांगोळी नि कुंकवाच्या टिकल्या निर्यात केल्या - आणि, embargo आड येतो, म्हणून त्या थेट दक्षिण आफ्रिकेस निर्यात न करता मोझाम्बीकमधल्या एखाद्या व्यापाऱ्यास त्या consign केल्या, आणि मोझाम्बीकमधल्या त्या मध्यस्थ व्यापाऱ्याने त्या पुढे दक्षिण आफ्रिकेस निर्यात केल्या - तर बिचारा डाह्याभाई तुरुंगात जाऊन बसणार. मात्र, त्याच वेळी, खुद्द भारत सरकार थेट दक्षिण आफ्रिकेकडून पैलू न पाडलेले हिरे आयात करीत होते.

आता बोला!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही सगळी रोचक माहिती आहे. निर्विवाद.

मात्र नेतान्याहूनं ट्वीट करून इतर देशांचे आभार मानले, त्यात भारताचा झेंडा नव्हता. एरवी मोदी, भाजप, यांच्या चुकांनाही मास्टरस्ट्रोक म्हणणारे भडक भगवे इस्रायलच्या बाजूनं पोष्टी पाडत होते. त्यांच्या पोस्टी 'आय स्टँड विथ इस्रायल'पलीकडे जाऊन 'मी तुमच्यासाठी लढायलाही तयार आहे' अशा होत्या. दुसरीकडे एरवी सामान्य, काश्मिरी लोकांसाठी मेणबत्त्या जाळणाऱ्या लोकांच्या पोस्टी कोव्हिड, ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांबद्दल धरसोड करण्याचं धोरण, शेण-गोमूत्र-गायत्री मंत्रांना उपचार म्हणून विरोध अशा होत्या.

त्यामुळे मूळ पोस्टकर्ते नक्की कुणाला नावं ठेवत आहेत, आणि का नावं ठेवत आहेत हे काही कळेनासं झालं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इस्त्रायल च नाही तर जगातील कोणतेच देश भारताच्या भूमिकेला जास्त किंमत देत नाही.
त्याचे कारण भारताची लष्करी ताकत .
भारताच राजकीय नेतृत्व.
भारताची जनता.
हे सर्व कमजोर आहेत ठाम भूमिका घेवून त्या वर कायम राहण्याच कुवत भारतात कडे नाही ना भारतीय जनते मध्ये.
गुप्तचर खात फक्त लोकांचे पगार देवून पोट भरण्यासाठी नसते .अतिशय बारीकसारीक गोष्टी देश जाणून घेत असतात.
एक वेळ पाकिस्तान चे बोलणे सिरीयस घेतले जाईल ते धर्मासाठी काही ही करतील ह्याची पूर्ण खात्री आहे.पण भारताला कोणी गंभीर पने घेत नाही.
भारतीय बहुसंख्य जनतेला ठाम निर्णय घेणारा.
पंतप्रधान हवा आहे म्हणूनच मोदी चे दुर्गुण विसरून लोकांनी त्यांना निवडून दिले.
गुळमुळीत भूमिका घेणार पंतप्रधान बहुसंख्य जनतेला नको आहे.
आणि टीका होते आहे म्हणून भूमिका बदलणार नेता पण भारतीय लोकांना नको आहे.
पण मोदी नी पण निराशा च केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे जे अल्पदृष्टी आणि अल्पबुद्धीला दिसतं, भावतं, पटतं त्यावर अभिव्यक्त होतो.
भारतात बेरोजगार खूप त्यातही रिकामटेकडे जास्त, वरुन लॉकडाऊन अशा परिस्थितीत वेळ भरपूर मग समाजमाध्यात व्यक्त, अभिव्यक्त होण्यासाठी, पोष्टी पाडण्यासाठी, लाखोली वाहण्यासाठी पर डे जीबी डेटा पुरुन उरतो. मग काय ह्यांची जिरवणे, अमुक समर्थन, तमुक स्टँड, फलाना विरोध, टिमका वाजवणे वगैरै निरंतर चालूय.
सरकारला कोरोनासारख्या दाहक परिस्थितीवरून लक्ष हटवण्यासाठी आयते साधन मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

माहितीपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

अरबांच्या विरोधात जाण्याची भारतामध्ये धमक नाही. इंधनासाठी प्रचंड अवलंबून आहोत आपण.
इस्राएल ला अधिकृत पाठिंबा देण्यात तसा आपल्याला काहीही फायदा नाही. शांततेचे किंवा शोक संदेश देणे हेच आपले परराष्ट्रीय कर्मकांड.
सध्या मला गंमत एकाच गोष्टीची वाटते ती अशी की भक्तांना जे जे प्रिय किंवा भक्त ज्याचे समर्थन करतात त्याच्या विरोधात प्रत्युत्तर म्हणून लिबरल, गुलाम आणि हल्लीचे पुरोगामी लगेच विरोधी भूमिका घेत होते. पण मी काही लोक जे हिटलरला हिणवत होते हुकुमशहा म्हणून कारण त्याने ज्यू लोकांचा अतोनात छळ केला म्हणून वगैरे तीच मंडळी ज्यू लोक कसे युद्धखोर आहेत धार्मिक कट्टर आहेत वगैरे टिका करून हिटलरच्या ज्यू द्वेषाचे समर्थन करत होते. ह्या वैचारिक कोलांट्या उड्या पाहून तार्किकतेची विल्हेवाट लागलेली दिसते. अजून मोदींच्या राज्यात काय काय बघावं लागणार काय माहिती. मी ज्यांना फॉलो करत होतो त्यांच्या एकाएकी भुमिकेत झालेला बदल पाहून अचंबित झालो. असो. सोयीनुसार जगण्याचे आणि सवडीनुसार शास्त्राचे दिवस आहेत आजकाल चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

... लिबरल, गुलाम आणि हल्लीचे पुरोगामी ...

त्या सुवर्णमध्याचं काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी अस्सल पुरोगामी त्यांनाच मानतो त्यांच्याकडे तात्विक चिंतनाची बैठक आहे. तर्कशुद्ध विचार आहे. उदा. दि. के बेडेकर, शरद बेडेकर, मे. पु. रेगे वगैरे मंडळी वाचून मला लौकिकार्थाने पुरोगामी, इहवादी वगैरे समजले. असो. यावर परत कधीतरी लिहीन.
हल्लीचे पुरोगामी चमकोगिरी करणारे आहेत. माझ्या दृष्टीने भक्त आणि गुलाम यांचा बौध्यांक सारखाच. इथे लिबरल हा हल्लीच्या लिबरल लोकांसाठी लिहिलेला आहे. अस्सल प्रोग्रेसिव्ह थिंकर आणि हल्लीचा लिबरल दोन वेगवेगळी टोकं आहेत.
सध्याच्या ट्रेंडनुसार सरकारी धोरणांवर टिका केली, नावे ठेवली की तुम्ही देशद्रोही (महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोही) तर समर्थन केले तर भक्त, भाजपाई वगैरे. तटस्थ असलोत छुपे संघोटे वगैरे वगैरे. बरं असं ठरवणारी धष्टपुष्ट आयुधे व सैन्य सज्ज असतात युद्धपातळीवर कामे करण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

>>जगाच्या इतिहासात नरसंहार खूप झालेले आढळतील. भारतभूमीवर देखील बरेच नृशंस नरसंहार केले गेले.
- अजूनही घडत आहेत.
भारताने करोनाला हरवलं वगैरे वल्गना करणे, लसीचा पुरेसा साठा आणि पुरवठा न करणे, करोनिल सारख्या द्रव्याचा औषध म्हणून उदो उदो करणे, कुंभमेळा भरवणे, निवडणूक पुढे न ढकलता लाखो लोकांना रॅलीच्या निमित्ताने रस्त्यावर उतरवणे, ऑक्सिजन साठी विनवण्या करणार्‍या लोकांवर खटले भरण्याची धमकी देणे, साथीमुळे होणार्‍या मृत्यूचे आकडे लपवणे ह्या सर्व गोष्टी भारतभूमीवर नृशंस नरसंहार होण्यास कारणीभूत ठरल्या आहे. ही हिंसाच आहे.
>>त्यामुळे हिंसेचे समर्थन करणारे जिकडेतिकडे सापडतात.
- एकदम पटलं!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताने करोनाला हरवलं वगैरे वल्गना करणे, लसीचा पुरेसा साठा आणि पुरवठा न करणे, करोनिल सारख्या द्रव्याचा औषध म्हणून उदो उदो करणे, कुंभमेळा भरवणे, निवडणूक पुढे न ढकलता लाखो लोकांना रॅलीच्या निमित्ताने रस्त्यावर उतरवणे, ऑक्सिजन साठी विनवण्या करणार्‍या लोकांवर खटले भरण्याची धमकी देणे, साथीमुळे होणार्‍या मृत्यूचे आकडे लपवणे ह्या सर्व गोष्टी भारतभूमीवर नृशंस नरसंहार होण्यास कारणीभूत ठरल्या आहे. ही हिंसाच आहे.

फरक आहे.

या सर्वात मोठ्या प्रमाणावर मानवहानी झाली, ती बेजबाबदारपणामुळे/फाजील आत्मविश्वासामुळे/फाजील गर्वामुळे/गलथानपणामुळे/अगदी माजामुळेसुद्धा म्हणा पाहिजे तर, झाली, हे मान्यच आहे. मात्र, याला 'नरसंहार', 'नृशंस नरसंहार' वगैरे म्हणून कॅटेगराइझ करणे सयुक्तिक ठरणार नाही.

जोवर इतक्या लोकांना मारण्याच्या एक्स्प्लिसिट हेतूने, जाणूनबुजून, पूर्वनियोजनानिशी हे सर्व केले गेले, या दाव्यास आधार दर्शविता येत नाही, तोवर याला 'नरसंहार' ('नृशंस' वगैरे फार पुढची गोष्ट झाली!) म्हणता येणार नाही.

Never attribute to malice that which can be adequately explained by stupidity.

(किंबहुना, याला 'नृशंस नरसंहार' वगैरे म्हणणे हे उपरोल्लेखित मूळ कृत्याइतकेच - आणि, अन्यत्र, प्रेते नदीत फेकून देणाऱ्यांना थेट फाशीच्या शिक्षेची अपेक्षा करण्याइतके - गलथान आणि बेजबाबदारपणाचे आहे, असे सुचवू इच्छितो. यात त्या मूळ कृत्यास कोणत्याही प्रकारे कमी लेखण्याचा वा क्षम्य मानण्याचा प्रश्न उद्भवत नाही.)

----------

'नृशंस'चा नेमका अर्थ काय, याच्या शोधात हे गवसले:

मोल्सवर्थ: Mischievous, injurious, disposed to destroy or hurt.

आपट्यांचा संस्कृत शब्दकोश: Wicked, malicious, cruel, mischievous, base

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वद कोटी लोकांना लस द्यायची असताना त्याच्या दुप्पट डोस जमवता यायला हवेत, हे गणित नक्की समजलं असूनही त्याबद्दल वेळेत हालचाल न करणे, त्याविषयी ओरड झाल्यावर ती जबाबदारी राज्य शासनाच्या गळ्यात घालणे, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने आठ टप्प्यात निवडणूक घ्यायला विरोध केल्यावर त्याला राजीनामा देण्यास भाग पाडणे, नंतर
निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक घेणे हा त्यांचा निर्णय होता हे ठासून सांगणे इत्यादी गोष्टींना मी तरी injurious, disposed to destroy हे लेबल लावेन. (कुंभमेळा आयोजना विषयी न बोललेलं बरं.. ) बाकी आपापली व्याख्या आपल्या समजेनुसार बनवावी.
'नृशंस'चा अर्थ शोधून दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साथीच्या रोगांत चुकलेल्या पॉलिसीमुळे मरणार होते त्यापेक्षा अधिक लोक मरणे आणि पद्धतशीरपणे प्लान करून केलेल्या हत्या (युद्ध वगैरे ) यांना एकच शब्द वापरुन एका लेवलवर आणणे आणि दोन्ही गोष्टी सेम आहेत म्हणणे हा एक प्रकारे युद्धखोरी किंवा इतर हत्याकांडाना नॉर्मलाईज करण्याचा प्रयत्न वाटतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला बरोबर उलट म्हणायचे आहे. हा प्रकार देशावर युद्ध लादण्या इतकाच गांभीर्याने घेण्याजोगा आहे. तेही टाळता आले असते असे युद्ध. डॉक्टर्स कडून ऐकलेल्या कथा भीषण आहेत. आणि त्यांना करोना योद्धा म्हणणे ही त्यांची क्रूर चेष्टा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या वर्षी करोनाची सुरुवात होत होती तेव्हा मध्य प्रदेशाचं सरकार पाडण्यासाठी किडे सुरू होते. मग देशात ही महामारी कशी का पसरेनात! बंगालच्या निवडणुका आता झाल्या. कुंभमेळा आता झाला. तरीही माणसं मरत आहेत याबद्दल काही चाड नाही. बंगालमध्ये सभांना गर्दी जमली म्हणून मिरवणं सुरू होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळेच म्हणजे सरकार (केंद्र आणि राज्य), आपली कुचकामी प्रशासकीय व्यवस्था, रामभरोसे आरोग क्षेत्रे आणि अहोरात्र मेडिया कव्हरेज.
याचा रोष जनता येनकेनप्रकारेण १००% दाखवणार मतदानातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

<,<<<हिंदुंनी इतर धर्मीयांवर आक्रमणे करून त्यांना गुलाम केले किंवा त्यांचा देशातील जागा बळकावली
किंवा मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला भाग पाडले असा उल्लेख कुठे आजवर सापडला नाही..>>>>
अगदी बरोबर!!!
फक्त एकच संशय .
हे जे अस्पृश्य होते ते कोण? कुठुन आले? इंद्राला 'पुरंदर" अस का म्हणतात ? कुणाची घरे ,नगरे त्याने उध्वस्त केली ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॉर्दॅट्मॅटर, 'राक्षस' म्हणजे तरी कोण होते? खांडववन जाळण्याचा प्रकार काय होता? त्या खांडववनातले 'नाग' कोण होते? जनमेजयाचे सर्पसत्र हा काय प्रकार होता? (एक साप माझ्या बापाला चावला, म्हणून मी सगळे 'साप' होमात जाळणार, हा कोठला 'न्याय'? याची संभावना कोणी Hindu justice किंवा Aryan justice म्हणून केल्यास ते सयुक्तिक ठरेल काय?)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंबूक नावाचा एक इसम होता. त्याची गोष्ट माहित आहे?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळेच अस्पृश्यता पाळली जायची.
हिंदू अस्पृश्य असला तरी खालच्या जातीचा वरच्या जातीचा, उच्च जातीचा नीच जातीचा वगैरे वेडगळ प्रकार होतेच. मी विस्तारवादी आणि वर्चस्वतावादी भूमिकेतून केलेल्या परराष्ट्रीय हल्ल्यांबाबत विधान केले आहे. आपल्या देश जातपातपंथांत आणि धर्मात विभागला गेलाय त्यामुळे इतरांवर हल्ले करा, व्यापारी दृष्टिकोन ठेऊन करार पद्धतीने देशाचा कारभार हळूहळू ताब्यात घेणे असले उद्योग भारतीयांना जमलेच नाहीत बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

आता आपण अशा अवस्थेत पोचलो पाहिजे होतो की सैन्य ठेवण्याची गरज देशांना लागलीच नव्हती पाहिजे होती.पण अजुन पण माणसाची रानटी वृती बदलेली नाही.माणूस सुधारला नाही तर आहे तासच आहे त्याच्यात काहीच बदल झाला नाही.
मानव संहार करण्याला आज पण सर्व देश खूप महत्व देतात मग त्या उर्मी मुळेच.
अणू बॉम्ब
जैविक हत्यार.
घातक missile.
वाऱ्याच्या वेगाने उडणारी लढावू विमान.
विविध व्हायरस,रासायनिक हत्यार,वातावरणात बदल करणारी हत्यार,ह्या मधील अनेक प्रकार माहीत नाहीत म्हणून लिहत नाही.
पण गुपचूप रकत न सांडता अनेक लोकांचा संहार करू शकेल असे तंत्र ज्ञान माणसाने निर्माण केलेलं आहे.
हे सर्व असे घडत असेल तर माणूस सुधारला असे म्हणता येणार नाही.
अजुन तो रानटी च आहे.
धर्म वरून नर संहार.
ह्याला धर्म जबाबदार नाही माणसाची हिंसक रानटी वृत्ती जबाबदार आहे.
आता सैन्य असावे ते फक्त आपल्या पेक्षा प्रगत जीवांनी पृथ्वी वर हल्ला केला तर पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी.
आपसात लढण्यासाठी नाही.
पण त्या बाबतीत माणूस 0 च आहे असा कधी alien कडून हल्ला झाला तर पृथ्वी वरील एका पण देशाकडे तो हल्ला परतवून लावण्याची ताकतअसलेलं लष्कर नाही .
जगातील सर्व घातक शस्त्र अस्त्र नष्ट करण्याकडे माणसाची वाटचाल आता झाली पाहिजे होती.
पृथ्वी निर्मनुष्य माणूसच करणार हेच विधी लिखित असावे त्या मुळे आपण वेगाने त्या दिशेने जात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

ओ राजेश
,<<<<आता सैन्य असावे ते फक्त आपल्या पेक्षा प्रगत जीवांनी पृथ्वी वर हल्ला केला तर पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी...>>>>
अस नका बोलू हो. मग त्यांना आपल्यापेक्षा जास्त प्रगत का म्हणायचे? ते आले तर आपल्याला मदत करायलाच येतील. वाचा माझी ही कथा
https://aisiakshare.com/node/8107

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख पोटतिडिकेने लिहिलेला आहे. काहीतरी अस्वस्थ करणारी भावना आहे हे दिसतं आहे. पण अनेक ठिकाणी विशिष्ट उदाहरणांऐवजी सरसकट विधानं आलेली असल्यामुळे नक्की मुद्दा गवसत नाही.

'टीकाकार दुटप्पी असतात' यासारख्या विधानाची उदाहरणं मिळाली तर निश्चितच हाती काहीतरी सापडेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या लोकांना फॉलो करत होतो त्यांच्या वैचारिक कोलांट्या उड्या पाहून वाईट वाटते. त्यात जे हिटलरलचा कधीकाळी द्वेष करत होते तेच एकाएकी हिटलरच्या ज्यूद्वेषाचे समर्थन करु लागले. तशा पोष्टी फॉरवर्डेड झाल्या. अशातच सगळं वातावरण ध्रुवीकरणासाठी आपोआप तयार होते.
असो.
'टिकाकार दुटप्पी असतात' हे मी हल्लीच्या टिकाकारांबद्दल बोलतोय. मी याच लेखातील कुठल्यातरी कमेंटवर रिप्लाय केलाय की सकारात्मक टिका ही व्हायलाच हवी ज्यातून नवप्रवाह किंवा नवविचार प्रेरीत असावा. टिका देखील खिलाडूपणे स्विकारणारा पाहिजे. सध्या दोघांचाही वाणवा. उजव्या (किंवा डाव्या) लोकांनी अमुक एक भुमिका घेतली मग त्यात काहीतरी काळबेरं असणारच म्हणून त्याविरुद्ध आमची भुमिका असा मोठा प्रमाद चालूय सगळीकडे. त्यामुळे डायरेक्ट गटातटात विभागून वैचारिक नसबंदी केली जाते. काही लोक सोयीस्कर दुषणं देऊन व्हॉटअबाटिझमला प्रोत्साहन दिले जाते. पीडीतांची कणव येते ती पीडीत कोण यावरून. माणूस म्हणून नाही. हे खटकतं मला.
उदाहरणार्थ, युद्धात दोन्हीकडे नुकसान होते. माणूस म्हणून दोन्ही बाजूंचा निषेध व्हायला हवा. यात आवडता नावडता का असावा? इस्त्रायल युद्धखोर आहेच आहे. मात्र पँलेस्टाईन मधील मुस्लिमसमाजातील माणसेच आहेत. तशीच चीनच्या उईगीर प्रांतातील मुस्लिमांप्रमाणे. मात्र चीनवर आसूड उगवताना निषेध आखूड होतो काहींचा मात्र इस्त्रायलबाबतीत सुसाट हातो.
मेक्सिकन लोकांवर अमेरिकेत जे प्रेम ओतू जाते त्यावर वेगळी भूमिका आणि बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात त्यावर वेगळी भूमिका घेणारे लोक आहेत.म्यानमार मधील राखाईन प्रातांतील रोहिंग्यांविषयीची कणव पाकिस्तानस्थित हिंदूसाठी कधीच दिसत नाही. श्रीलंकेत तमिळी लोकांना जो छळ सहन करावा लागतो त्यावर एक भुमिका तर इराक इराण मधील घटणांवर एक भुमिका! प्रत्येकवेळी माणूस म्हणून कधीच कोणाचा विचार केला जात नाही. शोषितांना राष्ट्र, धर्म पंथ या चष्म्यातून बघितले गेले आणि जाते.
आंतरराष्ट्रीय राजकारणात भुमिका घेताना बऱ्याचशा बाबींचा विचार करावा लागतो. भारत तर खूप क्षेत्रात परावलंबी आहे. त्यामुळे भारत नेहमी सौजनशील भूमिका घेतो. परराष्ट्रीय संबधीचे बरेच गुंतागुंतीचे प्रश्न एका झटक्यात सुटत नाहीत. युद्ध अटळ असेल तर बलवान राष्ट्रांचाच वरचष्मा राहतो वाटाघाटींमध्ये. देशांतर्गत भेडसावणाऱ्या समस्या आणि आंतरराष्ट्रीय समस्या यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एक घाव दोन तुकडे असा निवाडा करता येत नाही.

आता भारतातील अतिहुशार लोकांबद्दल. एकतर स्ट्रेट फॉरवर्ड दोन गटात विभागणी. उजवे किंवा डावे. उजवे बिनडोक असतात. त्यातल्या त्यात भडक भगवे लोकांच्या डोक्यात शेण भरलेले असते. डाव्या़बद्दल म्हणाल तर अस्सल आणि कट्टर डावा हा नेहमीच अमेरिकेचा कडवा विरोधक असतो. आजकाल भारतात नवकम्युनिष्ट अमेरिकाप्रेमी झालेत. खऱ्याखुऱ्या कम्युनिस्टांचा हा जागतिक अपमान आहे. फुरोगाम्यांच्या मते तर सेक्युलरिझम फक्त आणि फक्त कॉंग्रेसमुळे भारतात रूजला. याला काय म्हणावे?
हल्लीचे पुरोगामी म्हणजे राष्ट्रवादी समर्थक शाहू फुले आंबेडकर शाहूमहाराज यांची नावे घेऊन जातीयवादाचे बुरखे पांघरतात. ज्या त्या राजकीय पक्षाने विचारजंत पाळलेले आहेत प्रवक्ता म्हणून. राजकीय विश्लेषक आणि स्वयंघोषित धर्मगुरू एकसारखेच. जो तो फॉलोअर्सना खुश ठेवण्यासाठी प्रवचने करत असतात. निष्पक्षपणे भुमिका मांडा पण आमच्या बाजूने मांडा असा दुधखुळा समज वाढीस लागलाय.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तर घरगडी झालाय. ज्याच्या त्याच्या अस्मितेनुसार वैचारिक विल्हेवाट लावली जातेय. दक्षिणेकडील प्रांतिक अस्मिता गोड वाटतात तर महाराष्ट्रात मात्र टोचतात. काही लोकांना लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी काहीतरी चमकोगिरी करायची असते. सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे.
घुसमट आणि कुतरोड होऊ लागली की लिहून मोकळा होतो मी. असो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ2

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

प्रतिसाद पटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस किस किस किसको प्यार करूं
कैसे प्यार करो किसको प्यार करूँ
कैसे प्यार करो

तू भी है ये भी है ये भी है वो भी है
किसको प्यार करूं

किसको प्यार करूं कैसे प्यार करू
तू भी है ये भी है
ये भी है वो भी है
किसको प्यार करूं हाय हाय

मेरे लिए तो हो गयी मुश्किल
कैसे बंटू एक मेरा दिल
मेरे लिए तो हो गयी मुश्किल
कैसे बंटू एक मेरा दिल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0