ऋणनिर्देश
ऋणनिर्देश
वर्षाच्या पूर्वार्धात कधी तरी "दिवाळी अंक काढायचा का ह्या वर्षी", अशी सुरुवात होते; आणि ऐन वेळी सगळी धावपळ, पळापळ व्हायची ती होतेच. या सगळ्यांत मजेचा भाग असतो तो आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर काम करण्याचा. गप्पा मारायला, संपर्कात राहण्यासाठी आणखी एक सबब म्हणजे दिवाळी अंक.
ह्या वर्षी आणखी काही मित्रमैत्रिणी ह्या कामात सहभागी झाले. कामं करणाऱ्या, कामं करताना करमणूक करणाऱ्या मित्रमैत्रिणी, अंकासाठी लेखन करणारे सगळेच, वाचकवर्ग आणि अंकाच्या लिंका फेसबुक, ट्विटरादी सोशल मिडीयावर पसरवणाऱ्यांचेही सगळ्यांचे मनापासून आभार. (औपचारिक आभार हवे असल्यास, औपचारिक आभार.) अंकाची संकल्पना जाहीर केल्यावर त्यावर चर्चा करणाऱ्या सगळ्यांचे आभार. कसंही बोला, काहीही बोला, पण बोला!
ह्या वर्षी दिवाळी अंकाचं काम सुरू केलं तेव्हा नंदा खऱ्यांची आठवण झालीच; आणि त्यांनी त्यांचे दोन पूर्वप्रकाशित लेख पाठवले. त्यांची आठवण आल्याशिवाय अंकाचं काम करणं कठीण होतं. नंदा खरे हे आमचे व्यक्तिगत मित्र होतेच, आणि ते 'ऐसी'चेही मित्र आणि आधार होते. त्यांची सतत आठवण राहील.
अंक वाचा; आपल्या आप्तेष्टांना पाठवा; लाईक करा आणि सबस्क्राईबही कराच्च.
प्रियांका तुपे
अवंती कुलकर्णी
राजेंद्र बापट
आदित्य पानसे
नंदन होडावडेकर
रोचना
शैलेन
धनंजय
म्रिन
उज्ज्वला
राजेश घासकडवी
अमुक
चिंतातुर जंतू
संदीप देशपांडे
अवधूत बापट
सई केसकर
३_१४ विक्षिप्त अदिती
आणि सर्व कायनात.
विशेषांक प्रकार
लोकसत्ता
आजच्या लोकसत्तामध्ये ऐसी अक्षरे दिवाळी अंकाची दखल घेतली गेली आहे. त्यासाठी लोकसत्ताचे आभार!
संपादकीय
का उघडत नाहीये?
(कृपया हटवून टाका ही प्रतिक्रिया)