द्वाही :)

"वाचूनही कविता नच कळली
असे न माझे व्हावे
कोश कोणते यास्तव घरी मी
आणुनी ठेवावे?"

विचारले ऐसे मी कविला -
हसुनी खिन्न तो वदला,
"कविता माझी आजवरी का
कळली कोणाला?"

"शब्दांची आतशबाजी अन्
मोडजोड मी करितो -
जरा रेटुनी अर्थ त्यातूनी
शोधावा तो मिळतो.

जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित
ते ते मजला गमते
दुर्बोधाच्या गर्द सावलीत
कविता माझी रमते.

शब्द बुडबुडे केवळ असती
अर्थही अवघा भास
सत्य चिरंतन ऐस जाणुनी
शिणवू नको मेंदूस.

अर्थ जसा गवसेल तसा तो
ठोकुनी दे ना तूही
शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची
फिरवशील ना द्वाही?"

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अतिशय प्रामाणिक कविता. आदाब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपूर्णतेच्या अंधारात
पूर्णत्वाचे विवर
अर्थकाहुर शब्दभांडारात
विषण्णतेचे प्रहर
पद्यपंक्तिच्या मांडवात्
शब्दफुलांची झगमग
दुर्बोध रचनांच्या जाळ्यात
वाचकांची तगमग
सुबोध स्पष्ट विचारांचे
अर्थवेत्त्यांना वावडे
तिमिरघन मायाजालात
रसिकांना शब्दकोडे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच लिहिलेत..
मला ग्रेस यांच्या कविता समजत नाहीत.म्हणून रसग्रहण ऐकायला गेलो तर ऐकून वाटते की खरंच कवीला इतकं एवढं सांगायचे असेल का? रसिकांना शब्दकोडे... हे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टफनटांची मांदियळी
ऐसीवरी सर्वकाळी
ऐसे असोनी यावेळी
आक्रित कैसे घडिले हे

येका नटाने वाहवा करणे
तयाऊपरी "आदाब"णे
दुज्या नटासी काव्य स्फुरणे
भाग्य उदेले येरूचे

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा, एकाच बोल्टात गुंडाळलं हो आपल्याला!
But expected. Not a bolt from the blue.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0