कोमट कलाकृती, निबर अनुभूती, अर्धवट सोडलेली पुस्तकंं, हॅशटॅग meh इत्यादिवगैरे

सर्वप्रथम, डिस्क्लेमर : , शीर्षकातच एक सुमारदर्ज्याची मस्तमस्त कविता झालेली आहे याची मम पामरास जाणीव आहे बरे का.

तर, प्रस्तुत टिपणात माझ्या वर्धिष्णुशा नेव्हलचं अविरत चाललेलं गेझिंग करताना सुचलेले काही विचार नोंदवायचा नम्ब्र प्रयत्न करीत आहे.

British-Lit

हां तर गेली कित्येक वर्षं जी गोष्ट जाणवत होती पण मनातून "यात काय सांगण्यासारखं आहे का!" असं वाटल्याने त्याबद्दल कधी कुणाशी काही संवाद साधता आलेला नव्हता.

एखाद्या प्रदीर्घकाळ पडून राह्यलेल्या, प्रदीर्घ लांबीच्या दोराच्या प्रदीर्घ गुंत्याची सुरवात कुठून करायची असा प्रश्न ज्याप्रमाणे पडतो त्याप्रमाणे या विषयाचं आहे बघा. सुरवात करायचीच झाली तर 'अशी पुस्तकं ज्यांच्या पूर्ततेच्या प्रवासाकरता वाचनाचं तारु अथांगशा वगैरे पाण्यात सोडलं तर खरं पण कधी त्यांच्या दुर्बोधतेच्या खडकांवर आपटल्याने तर कधी स्वत:च्याच उथळपणाच्या, टिचभर अटेन्शन स्पॅनच्या कर्दमात कायमचे रुतल्यामुळे तर कधी जीवनरूपी (अहाहा!) क्रूर जलचराच्या हल्ल्यालाच बळी पडल्याने त्या त्या तारवाचा प्रवास कायमचा खंडितच राहिला - ती पुस्तकं' असा लांबलचक पल्ल्याचा विषय घेता येईल. (जसजसा "ॲक्सेस" मिळत गेला तसतसा हा प्रकार सिनेमे आणि ओटीटी कंटेंटबद्दलही करता येईल.)

तर आपलं हे असं कां होतं? माझ्यामते आजवर हा विषय अनेक थोर्थोर लोकांनी नक्कीच कुठेकुठे मांडला असेल. कुणाला लिंका देता आल्या तर द्या. मला मज्जा यीईल वाचायला. मी सरळसरळ मला जाणवलेल्या कारणांची जंत्रीच करतो पहिले छूट. मग पुढचं पुढे पाहूया.

- मिडलाईफ : हा सर्वात महत्त्वाचा घटक असला पाहिजे. लहानपणीं मला आई-आज्जी वाणसामानातली एखाददुसरी गोष्ट आणायला सांगायची. येताना ती गोष्ट पुडीत गुंडाळलेली असली तर त्या पुडीवरचा कागद मी वाचत वाचत घरी यायचो. तोच मी, माझ्या पलंगाशेजारी गेले ३-४ महिने जागतिक दर्ज्याची किमान ४ पुस्तकं पडली आहेत ती कुरतडत नाहीये. वयाबरोबर कुतुहल, जिज्ञासा, किंवा या जातीची जी काय भूक असेल ती गेली आहे का? आता तुम्ही म्हणाल "साईला याचं उत्तर तू आमाला काय विचारते. ते नारियेल काय साला आमी घरी बनवते काय!" - थोडक्यात तुझं तूच सांग. आणि अर्थातच तुमचं सर्वच नेहमीच अचूक असल्याने हेही तितकंच अचूक आहे. माझं म्हणणं असं आहे की मला मिडलाईफ क्रायसिसने अगदी हजार हिश्शांनी गाठलं आहेच; पण इन जनरल, दुनियाभरच्या वाचकांमधेही हा फॅक्टर कमीअधिक प्रमाणात कारणीभूत होत असला पाहिजे. (आता इथे "मिलाक्रा" म्हणजे फारच अतिशयोक्ती म्हणता येईल. पण अतिशयोक्तीशिवाय आपल्याला सत्याचा डोस कसा काय पोचणार ना! दुसरं म्हणजे हा अगदी क्रायसिस नसला तरी मिडलाईफ प्रवृत्ती इतपत तरी किमान म्हणता येईलच.)

- इन्फर्मेशन ओव्हरलोड/साधनांची मुबलकता : ढोबळमानाने असं म्हणता येईल की पूर्वी उपलब्ध होती त्यापेक्षा अधिक पुस्तकं सहज मिळत आहेत. इथेही वैयक्तिक परिस्थिती आणि सर्वसाधारण मुद्दा हा भेद मान्य आहे. थोडं अधिक वैयक्तिक बोलायचं तर अवांतर - म्हणजे अभ्यासापेक्षा वेगळी - पुस्तकं वाचायला आमच्या तीर्थरूपांचा विरोध होता बरं का. मी चक्क चोरून कथाकादंबऱ्या वाचल्यात. आणि त्याही काकोडकरी कादंबऱ्या नाहीत बर्का. अगदी लेजिट गार्डनव्हरायटी गोष्टी. तर त्यामुळे त्या चोरून वाचल्याचा एक वेगळा आनंद लहानपणीं होता. वयोपरत्वे तशी परिस्थिती राहिली नाही हे बरोबर. पण आमच्या पिताश्रींनी अशी, कृत्रिमरीत्या निर्माण केलेली टंचाई जरी वगळली तरी, पुस्तकांची उपलब्धता ही गोष्ट बरी नव्हती हे मान्य करायला हवं. निम्न आर्थिक स्तरातल्या व्यक्तींना या गोष्टीला सामोरं जावं लागायचं. तर म्हणता म्हणता परिस्थिती पालटली. आता किमान इंग्रजीतलं हवं ते पुस्तक - किमान किंडलवर - इन्स्टंटली मिळेल. पण "खूप लोक आहेत" या चालीवर "खूप साधनं उपलब्ध आहेत" पण प्रोव्हर्बिअली स्पीकिंग चणे आहेत तर दात नाहीत. (हाच मुद्दा युट्युब वगैरेचाही आहे. उदाहरणार्थ एकेकाळी उस्ताद अमीर खानच्या सिड्या मरत मरत मिळवल्या. आता सर्वकाहीअ युट्युबवर आहे पण म्हणून मी सर्व अमीर खान ऐकला नाहीए.) तर हे असं का होत असेल? मला त्याची नीटशी संगती लागलेली नाहीये. तुम्हाला कुणाला लागली असली तर सांगा.

- अटेन्शन स्पॅन, आकलन/आस्वादनाच्या भुकेमधली घट किंवा त्या प्रक्रियेत येणारे अडथळे : आता हा मुद्दा नक्कीच पहिल्या मिलाक्राच्या मुद्द्याला जोडता येईल पण तो थोडा वेगळा आहे. कदाचित वरच्या मुद्दा क्र १ आणि २ चा तो परिणाम आहे असं म्हणता येईल. कदाचित बाय इटसेल्फ त्या मुद्द्याकडे भाषिक अंगाने पाहता येईल. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर व्हर्नाक्युलर मिडियमच्या माणसांनी शेक्सपियर कसा वाचायचा आणि कॉन्व्हेंटमधे जाणाऱ्याने लीळाचरित्र कसं अनुभवायचं. (आता इथे, स्वाहिली किंवा झुलु किंवा अर्धमागधी असले फाटे फोडणं चूक. या भाषा आपल्याला अजिबातच येत नाहीत; तस्मात त्यातलं काही आपण कधी ओरिजिनलमधे वाचणार नाहीओत. अनुवादित वगैरे ठीकए.)

world-literature

- #Meh : हा मुद्दा "मला वाचता येत नाहीये" याच्यापेक्षा "माझ्याच्याने वाचवलं नाही" असा आहे. आता इथेही वैयक्तिक उणीव आपण मान्य करूया. (नाहीतरी मान्य करण्याखेरीज दुसरा पर्याय काय आहे.!) पण मला जरा भीतभीत पण तरी एकदम बोल्ड वाटेल असं सांगावंसं वाटतं ते म्हणजे there is an innate boring element in many many many books - it is nearly universal - माझ्यामते तरी. म्हणजे unputdownable असा गुणधर्म फार्फार थोड्या कलाकृतींमधे असतो. अगदी बऱ्याचशा आवडलेल्या गोष्टींमधेही "च्यायला हे काय आहे यात." असं कायतरी येतं. (एक पटकन आठवलेली गोष्ट. मला अत्यंत आवडलेली सिरीज म्हणजे "ब्रेकिंग बॅड". यात अगदी कणमात्रही मला न आवडणारं असं काही नाहीच. मात्र या (पाच सीझनच्या) सिरिजमधे "द फ्लाय" नावाचा एक एपिसोड येतो. त्यात काहीकाहीकाही घडत नाही. वॉल्टर आणि जेसी काम करत असलेल्या लॅबमधे एक माशी येते. ती घोंघावत राहते. दोघांना त्रास देते. जास्त करून वॉल्टला. तो चिडतो काय तणतण काय करतो. तो तिला शेवटी मारतो. बस्स. आता याचा पॉईंट काय ते म्हण्टलं तर मला मान्य आहे की मानवी जीवन हे कसं कंटाळवाणं आणि क्षुद्र घटनांनी भरलेलं असतं इत्यादिवगैरे. किंवा वॉल्टचा त्रागा हा विनोद. पण काय च्यायला त्याकरता एक आख्खा एपिसोड ! ठीक आहे राव. असो.) मला जे म्हणायचंय त्याकरता हे उदाहरण मला चपखल वाटतं.

आता हा वरचा, #Meh हा मुद्दा बऱ्यापैकी डेंजरस आहे हे मला मान्य आहे. म्हणजे असं की कुठल्याही गोष्टीला रद्दबातल करायचं असलं तर ती पूर्णपणे किमान आस्वादणं/पूर्ण करणं आवश्यक आहे हे बरोबर आहे. पण मग त्यातून मेजर प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे तुम्हाला शेक्सपियरचं वर्म कळण्याकरता - किमान नाटक बाय नाटक कळण्याकरता - त्या त्या नाटकातला एकेक शब्द, बारीससारीक गोष्टी कळणं आवश्यक आहे का? मुळात त्या कळणं शक्य आहे का? म्हणजे उदाहरणार्थ क्लिफनोट्स वाचणं, विकी एंट्रीज वाचणं, आणि किमान ते नाटक अन्वयासकट ओळ-बाय-ओळ वाचणं यात नक्कीच फरक आहे. आणि अन्वयासकट ओळ-बाय-ओळ कळणं आवश्यक हे मान्यच. पण तसं केल्यानंतर कळलेलं हॅम्लेट आणि "कवीला यातून असं म्हणायचं होतं" हे फलज्योतिषासारखं क्लिफनोट्सचं वाचन यातनं कळलेला अर्थ यात नक्की काय फरक असतो? (काही चतुर लोक याचं उत्तर कदाचित गोर्मे फूड आणि मकडॉनल्ड्स खाणं यातला फरक हो आहे तोच - असं देतीलच. मला त्यांचं चातुर्य मान्य आहे पण ॲनालॉजी पुरेशी पटलेली नाहीये.) पण येस, #Meh असं म्हणणं बऱ्यापैकी स्लिपरी स्लोप आहे हे कबूल.

पण तरी #Meh उरतोच. तुम्ही कोणपण मोठा लेखक घ्या. ज्याने ज्याने "दीर्घ लिहा सर" या विनंतीला मान दिला आहे त्याच्या त्याच्या लिखाणात अशी प्रसंगी पंधरा-वीस-तीस पानं येतात तरी आपलं कायतरी पाल्हाळ लावलेलं असतं. (सर्वात हॉरिबल रशियन लेखक. आता हे मी निव्वळ युक्रेनपायी म्हणत नाहीये. काय साली पात्रांची भाऊगर्दी. तोबातोबा. )

तर असो. या पोस्टच्या निमित्ताने मनातली मळमळ-खदखद-रुखरुख मांडतो आहे झालं. आणखी सुचत जाईल तसे लिहीनच. (इसे धमकी नहीं चेतावनी समझ लेना.) या लेखाबद्दल तुम्ही मारणार असल्याच्या आगामी टपल्यांचं स्वागत आहे हे वेगळे सांगणें न लगे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(एक पटकन आठवलेली गोष्ट. मला अत्यंत आवडलेली सिरीज म्हणजे "ब्रेकिंग बॅड". यात अगदी कणमात्रही मला न आवडणारं असं काही नाहीच. मात्र या (पाच सीझनच्या) सिरिजमधे "द फ्लाय" नावाचा एक एपिसोड येतो. त्यात काहीकाहीकाही घडत नाही. वॉल्टर आणि जेसी काम करत असलेल्या लॅबमधे एक माशी येते. ती घोंघावत राहते. दोघांना त्रास देते. जास्त करून वॉल्टला. तो चिडतो काय तणतण काय करतो. तो तिला शेवटी मारतो. बस्स. आता याचा पॉईंट काय ते म्हण्टलं तर मला मान्य आहे की मानवी जीवन हे कसं कंटाळवाणं आणि क्षुद्र घटनांनी भरलेलं असतं इत्यादिवगैरे. किंवा वॉल्टचा त्रागा हा विनोद. पण काय च्यायला त्याकरता एक आख्खा एपिसोड ! ठीक आहे राव. असो.)

यावरून आठवले. (अवांतर)

राजकपूरचा 'आह' नावाचा एक पिच्चर आहे. (नाही, (१) राजकपूरचा प्रस्तुत पिच्चर, किंवा (२) राजकपूरचा कोणताही पिच्चर, किंवा (३) राजकपूर, यांपैकी काहीही मला आवडते, असे दूरान्वयानेसुद्धा सुचविण्याचा हा प्रयत्न नाही.) त्याचा सारांश सांगायचा झाला, तर (१) एक राजकपूर असतो, (२) त्याला क्षय होतो, आणि (३) तो मरतो, या वाक्यत्रयीत संपविता येईल. बाकी त्या पिच्चरमध्ये काही म्हणजे काही घडत नाही.

हं, म्हणजे, मध्यंतरीच्या काळात तो नायिका आणि तिची बहीण (दोघींपैकी नायिका कुठली आणि तिची बहीण कुठली, हे ज्यानेत्याने आपापल्या मगदुराप्रमाणे, आवडीप्रमाणे, आणि इच्छेप्रमाणे ठरवावे. हम कु कूछ फरक नहीं गिरता.) दोघींशीही लफडी करतो, पैकी अखेरीस कोणाशीही लग्न न करता मरून जातो (सुटल्या बिचाऱ्या दोघीही!), पिच्चरमधली गाणी तशी बरी आहेत, वगैरे वगैरे सगळे ठीक आहे. पण म्हणून याकरिता तीन तासांचा पिच्चर?

परंतु, दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला, तर मग सॉलोमन ग्रंडीमध्ये तरी काय घडते? एके दिवशी नायक जन्माला येतो, एके दिवशी त्याचे बारसे होते, मग कालौघात एके दिवशी त्याचे लग्न होते, मग पुढेमागे कधीतरी एके दिवशी तो आजारी पडतो, मग दुसऱ्या दिवशी त्याचा आजार बळावतो, तिसऱ्या दिवशी तो मरतो, नि चौथ्या दिवशी त्याचे दफन होते! हं, प्रत्येक मनुष्य कधीतरी जन्माला येतो नि कधीतरी मरतो, आणि मधल्या आयुष्यात (नि मृत्यूनंतरसुद्धा) बहुतेकांच्या आयुष्यात काही ठराविक घटना घडतात, हा मुद्दा ठीकच आहे, परंतु, त्याकरिता एक आख्खी कविता? गेला बाजार एक आख्खे नर्सरी ऱ्हाईम?

मग राजकपूरनेच याचा कित्ता गिरवून तीन तासांचा एक आख्खा पिच्चर काढला, तर बिघडले कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचण्यापेक्षा ऐकणं-पहाणं सोप्पं आहे - म्हणून?
पूर्वी १००० पानी ठोकळा वाचायचो कारण त्यापेक्षा बरा पर्याय नव्हता. जर कुणी त्याच ठोकळ्यावर बनवलेला ३ तासाचा चित्रपट बघायला दिला तर निर्विवाद मी चित्रपट पाहीन/ ऑडिओबुक ऐकीन.
हेच आणखी काही वर्षांनी पुढे जाऊन असं होणारे -
आजकाल मी सगळं वर्चुअल रिआलिटीतच अनुभवतो - चित्रपट बघायला, ऑडिओबुक ऐकायला काय बोर होतं! त्यापेक्षा सगळं स्वत: प्रत्यक्ष अनुभवता येतं मग ते जास्त परिणामकारक असणारच.

----------------------
समजा काही दिवस "वाचना" पेक्षा जास्त समृद्ध अशी करमणूक उपलब्ध झाली नाही- तर पुन्हा वाचनातच तो आनंद मिळवेन का? बहुधा हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> पूर्वी १००० पानी ठोकळा वाचायचो कारण त्यापेक्षा बरा पर्याय नव्हता. जर कुणी त्याच ठोकळ्यावर बनवलेला ३ तासाचा चित्रपट बघायला दिला तर निर्विवाद मी चित्रपट पाहीन/ ऑडिओबुक ऐकीन.

---

डी गुस्टीबुस नॉन एस्ट डिस्प्यूटांडुम.

(प्रतिसाद इंग्रजीत लिहायला संस्थळमालकांचा आक्षेप असल्याचं ऐकतो. लॅटिन चालेल का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सर, ल्याटिन भाषेत काय लिहिलं आहेत, त्याचा मराठीत अर्थ लिहाल का?

(घ्या, तुमचं ट्रोलिंग फार प्रभावी असण्याचं प्रमाणपत्रं! You have been validated.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेमकं भाषांतर अवघड आहे. पण त्यातल्या त्यात:

शक्य तितकं शब्दश: भाषांतर: जिथे (अभि)रुचीचा प्रश्न येतो तिथे वाद घालण्यात अर्थ नसतो.

भावार्थ: प्रत्येकाची आवडनिवड निराळी असते.
--

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सर, ल्याटिन भाषेत काय लिहिलं आहेत, त्याचा मराठीत अर्थ लिहाल का?

तसे गुगलून पाहता येईलच, म्हणा, परंतु त्यापूर्वी एक प्रयत्न… काही चुकलेमाकलेअडले तर चिपलकट्टी दुरुस्त करतीलच/सांगतीलच.

डी गुस्टीबुस नॉन एस्ट डिस्प्यूटांडुम.

नॉन एस्ट डिस्प्यूटांडुम = is not to be disputed? (हे मला वाटते त्यातल्या त्यात उघड असावे.)

राहता राहिली गोष्ट ‘डी गुस्टीबुस’ची. इथे एक तुक्का मारून पाहायला पाहिजे. त्यातल्या ‘गुस्ट’वरून याचा खाणे/भूक/अन्नावरची वासना/चव यांच्यापैकी कशाशी संबंध असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याला मसण गोड" अशी कोकणात म्हण आहे. ( आवड आणि त्याला हे वेगळे शब्द)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> त्यातल्या ‘गुस्ट’वरून याचा खाणे/भूक/अन्नावरची वासना/चव यांच्यापैकी कशाशी संबंध असावा काय?
--- लॅटिन gustare = चव घेणे. स्पॅनिश no me gusta, इंग्रजी dis-gust इ. त्यातलेच. इतकेच कशाला, अगदी स्कॉटिश An(एक)-gus(निवड-चव) बीफही त्याच कुटुंबातले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> वाचण्यापेक्षा ऐकणं-पहाणं सोप्पं आहे - म्हणून?

--- नाबोकोव्हचं याबाबतीतलं निरीक्षण:

When we read a book for the first time the very process of laboriously moving our eyes from left to right, line after line, page after page, this complicated physical work upon the book, the very process of learning in terms of space and time what the book is about, this stands between us and artistic appreciation. When we look at a painting we do not have to move our eyes in a special way even if, as in a book, the picture contains elements of depth and development. The element of time does not really enter in a first contact with a painting. In reading a book, we must have time to acquaint ourselves with it. We have no physical organ (as we have the eye in regard to a painting) that takes in the whole picture and then can enjoy its details. But at a second, or third, or fourth reading we do, in a sense, behave towards a book as we do towards a painting.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
बरोबर. पुस्तक वाचन हे कुठल्याच अंगाने एकमितीय,द्विमितीय, त्रिमितीय अनुभव नाही, ते एक रूपांतर आहे (transformation )

चित्रसुद्धा अपूर्णच ,त्यात रंग असले तरी गंध नाहीत, आकलन झालं तरी ओबडधोबड, गुळगुळीत, उष्ण असा स्पर्श नाही, चव नाही पण तरीही आपल्याला तो एक द्विमितीय अनुभव असल्याने तुलनेने सहज उमगतो.

तसंच जर उद्या 3D अनुभूती असेल तर तो मला जवळपास 100% भावेल because nothing would get lost in translation. And then that art would just hit me hard like an opium dose.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद अवांतर आहे. पण वरील परिच्छेद वाचून हे आठवलं.
बालसाहित्याविषयीच्या एका कार्यशाळेत मी आणि आणखीही काही जणांनी अशा प्रकारचा एक मुद्दा मांडला होता.
लहान मूल जेव्हा वाचायला शिकतं, तेव्हा लेखी अक्षरांचे शब्द तयार करून, त्यांची वाक्यं आणि त्या वाक्यांचा अर्थ समजून घेऊन मग त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वापरावी लागते. ही प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी सराव लागतो आणि त्यामुळे ही प्रक्रिया मुलांना वाचनाची गोडी लागण्यातली सगळ्यात महत्वाची आणि अवघड पायरी आहे. पण हल्ली पुस्तकं हातात यायच्या आधीच मुलांकडे इतर दृकश्राव्य माध्यमं येतात. त्यामुळे त्यांना पुस्तकं वाचायची गरज वाटत नाही.
यावर तिथल्या एका तज्ज्ञाचं असं मत होतं की मुळात लेखी भाषाच अनैसर्गिक आहे (नेमकं याच शब्दांत म्हणाले की नाही मला नीट आठवत नाही). त्याआधी अनेक वर्षं भाषा आणि साहित्य मौखिक असायचं. लेखी स्क्रिप्टमुळे ते जतन करता येऊ लागलं. पण आता जर जतन करायचे इतर मार्ग उपलब्ध असतील तर मुलांना पुस्तक वाचता आलंच पाहिजे हा आग्रह अनाठायी आहे. भविष्यातलं जग कदाचित वाचनाच्या आणि लिखाणाच्या पलीकडे गेलेलं असेल.
हे मला तेव्हा क्रांतिकारी, एकदम 'आहा मोमेन्ट' वगैरे वाटलं होतं. पण तरीही माझ्या मध्यमवर्गीयपणाला अनुसरून मी माझ्या मुलाला नीट वाचायला शिकवलं आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध्वनिसुद्धा आपली मिती राखून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भविष्यातलं जग कदाचित वाचनाच्या आणि लिखाणाच्या पलीकडे गेलेलं असेल.

एअरपोर्टवर - तुमचा पासपोर्ट दाखवा.
(काका खिशातून फोन काढून एक विडिओ दाखवतात.)
थँक्स. पुढे कोणेरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विक्रम सेठची ही कादंबरी मी पहिल्यांदा २००५ मध्ये वाचायला घेतली. तेव्हा माझं मिलाक्रा होण्याचं वय नव्हतं (तसं असेलच तर पुढची चार वर्षं मला जमेल तेवढ्या आनंदात घालवावी लागतील). माझ्या शाळेतल्या काही मैत्रिणींना ती फार आवडली होती. पण मला पहिल्या काही पानात कुणाचंही नाव (पुन्हा) आलं की #हाकोण #हीकोण असे प्रश्न सतत पडायचे. दोन वाचानांच्या मध्ये अगदी एक दिवसाचं अंतर पडलं तरी मला त्यातल्या पात्रांची नावं आठवायची नाहीत. आपण सध्या ही कादंबरी वाचायच्या मनस्थितीत नाही असं ठरवून मी ती बाजूला ठेवली. त्याच वेळी लायब्ररीत मला त्यांचीच An Equal Music मिळाली. ती मला फार आवडली आणि एकदम झरझर वाचता आली. कदाचित लायब्ररीतून आणलेल्या पुस्तकांसाठी वाचनाची कालमर्यादा असते म्हणून आपल्याला ती आवडली आणि वाचता आली का? असा प्रश्न मी विचारला. पण मालकीची कादंबरी रद्दीत घालून तीच पुन्हा मी लायब्ररीतून आणली नाही. नशीब.
२००५ - २००७ मी ती कादंबरी वाचायचे काही फुटकळ प्रयत्न केले. तेव्हा फेसबुक/ ओटिटी असं काहीच नव्हतं. ऑर्कुट होतं. पण ते फक्त घरी डेस्कटॉपवरून वापरलं जायचं. आमच्या वर्गातल्या काही जणांनी तिथे जाऊन लग्नं जमवली होती. पण याविषयी गॉसिप आम्ही नोकियाच्या कधीही न फुटणाऱ्या फोनवर करायचो. तरीही ती कादंबरी वाचता आली नाही. नंतर नंतर माझ्या असं लक्षात आलं की अनेकदा मी ती वाचत असताना नुसतेच शब्द आणि वाक्यं वाचत जायचे. मला अर्थ समजूनच घ्यायचा नव्हता. आपल्याला या कथानकाचा ताण आला आहे असं मला वाटायला लागलं.
२००७ मध्ये भारताबाहेर जाण्याआधी मोठी सुट्टी मिळाली होती. तेव्हा मी पुन्हा मनापासून ती वाचायचा प्रयत्न केला. शे दोनशे पानं वाचलीही असतील. पण तेव्हाही हार मानली. मला वाटतं २०११ साली मी ती वाचायचा आता पुन्हा प्रयत्न करायचा नाही असं ठरवलं.

मग आत्ता २०२० मध्ये बीबीसीनं त्या कादंबरीची ओटिटी मालिका केली. तेव्हा मला साईनफेल्डमधल्या जॉर्जइतकाच आनंद झाला होता. पण ती मालिका एका विशिष्ट प्रकारच्या मळकट रंगात रंगवली आहे. बघताना ती सारखी गरम पाण्यात धुवून काढावी असं वाटतं. आणि त्यातल्या पात्रांच्या तोंडातलं इंग्रजी त्या काळाला सुसंगत वाटावं असं जमलेलं नाहीच पण अत्यंत pretentious ही आहे. शिवाय मला इशान खट्टरचे डोळे आवडत नाहीत. प्रेक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता तो अचानक त्याचे डोळे व्याकूळ करतो. अशा काही कारणाने मी ती मालिकाही अर्ध्यात सोडून दिली. पण तिचं संगीत मला आवडलं. विशेषतः शुजात खान यांचे खमाज आणि झिंझोटी.

आता मी हार मानली असली आणि त्याचं rationalization केलं असलं, तरीही मला ती कादंबरी न वाचल्याचं दुःख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका बाबतीत दिलगिरी व्यक्त करून पुढे लिहितो. ‘अ सुटेबल बॉय’ हा उच्चार वाचून फळ्यावर नखाने चरे ओढल्यासारखं वाटतं. I would say ‘सूटेबल’.

ह्या कादंबरीविषयीचा सई केसकरांचा अनुभव ओरिजनल नसून त्यांनी तो टेलिपथीने माझ्याकडून ढापलेला आहे. मीही दोनेकशे पानं वाचून ती सोडून दिली होती. कादंबरीच्या आधी व्हॉल्टेअरचं एक वाक्य (इंग्रजीत) दिलेलं आहे: The secret of being a bore is to tell everything. ह्या सल्ल्याचं विक्रम सेठने पालन केल्यामुळे त्यांना अपेक्षित असाच परिणाम झालेला आहे. पण अर्थात, सर्वसाधारणपणे बोलायचं तर कादंबरीची लांबी हा एकमेव घटक महत्वाचा नसतो. सातशे पानी अतिशय इंटरेस्टिंग आणि दोनशे पानी अतिबोअर कादंबऱ्या कितीतरी आहेत.

इशान खट्टर कोण हे मला ठाऊक नसल्यामुळे त्याच्या (दोन्ही) डोळ्यांबद्दल केसकरांचं मत मी बिनशर्त स्वीकारायला तयार आहे. त्यांना इतक्यात मिलाक्रा न येवो अशी सदिच्छा व्यक्त करून आवरतं घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ती कादंबरी माझ्याकडून सुटली म्हणून तसं लिहिलं आहे असं मानून घ्या. ती मालिका नेटफ्लिक्सवर आहे. इशान खट्टर कोण हे बघायचे असल्यास. तबू सुंदर दिसली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वयाप्रमाणे अमुक एक पुस्तक कधी वाचेन असं होतं. पाचवीत असताना आमच्या एका वाचनालयात हान्स अँडरसन च्या परीकथा पुस्तक होतं ते कधी एकदा मिळेल आणि वाचेन असं झालौ होतं. त्यात एक कथा एक लहान मुलगी आजारी असते. तिचा पलंग खिडकीपाशी लावलेला असतो. वेळ जात नसतो झोपून. एकदा तिला दिसतं की एक हिरवं रोपटं खिडकीच्या तळाशी उगवतंय. ते वाढताना पाहण्यात आणि उद्या काय होणार याच्या विचारात भराभर दिवस जातात. तो वाटाण्याच्या वेल असतो थंडीत वाढणारा. पुढे निळी जांभळी फुलं, शेंगा वगैरे निरीक्षण करण्यात अडीच तीन महिने तिचे सहज निघून जातात. ही कथा ताणली तर आयुष्यभर लागू होईल. कोणता वाटाणा कधी सापडेल आणि आपल्याला गुंगवेल सांगता येत नाही. वयाप्रमाणे अमुक एक गोष्ट कधी आशावादी आनंदी करेल सांगता येत नाही. आता बास असं कधीच होणार नाही हे निश्चित.

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रशियन लेखक-

डोस्तोवस्की मला एके काळी फार आवडायचा - म्हणजे बघा मी गुन्हा आणि शिक्षा हे पुस्तक जवळपास काही दिवसांत वाचलं, आणि मग द idiot सुद्धा.
आनंदाने मग brothers karmazov विकत घेतली.
अनेक हिवाळे आले आणि गेले पण ते पुस्तक काही पूर्ण वाचवलं नाही.
त्यात नंतर कोण कोणाचं कोण आहे, ते मेलय का जिवंत आहे, का शहराचं नाव आहे हे काहीच कळेना एवढे झोल.

तुर्गानेव, गोरकी वगैरेच्या वाटेला गेलोच नाही मग.
ह्यात आता फॉर्मटचा भागसुद्धा आहेच म्हणा.
कादंबऱ्या झेपल्या नाही तरी Short stories मात्र झकास वाटल्या.

पण एकंदरीत भयानक पाल्हाळ. तुरुंगवासात, अवकाशयानात वगैरे वाचायला उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांगळा झालेला एक वैमानिक पुन्हा खोटे पाय लावून विमान चालवतो युद्धात ती एक गोष्ट कुणाची आहे ती फार आवडलेली.
अंती थंड प्रदेशात अगदी रटाळ कथानक/लेखन शैलीही महत्त्व धरून असणार. वेळ घालवणे हे साधन शोधावे लागत असावे. भारतातल्या उष्ण हवेत त्यांचे काम नसेल. सकाळ झाली, फटफटलं, नेहमीची कामं उरकेपर्यंत सूर्य कासराभर वर येऊन पोळू लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसांपूर्वी मी गॉड डिल्यूजन हे पुस्तक रेटले. फार बोअरींग वाटले. आश्चर्य हेच वाटते, की १० वर्षापूर्वी जेव्हा मित्राने ते वाचायला दिले होते तेव्हा मी शीर्षक वाचूनच बाजूला ठेवले आणि अलिकडे उत्साहात वाचायला घेतले पण वाचता वाचता कळले की, एकतर आस्तिक लोक याच्या नावावरूनच याच्या वाट्याला जायची शक्यता कमी, आणि गेलेच तर इतका तर्कवाद नक्कीच झोप आणेल. त्यापेक्षा त्याच लेखकाचे ब्लाईंड वाचमेकर आस्तिक लोकपण आनंदाने वाचतील आणि कदाचित नास्तिकतेचा विचार तरी करतील. आणि नास्तिकांसाठी हे वाचून फारसे काही पदरात पडण्याची शक्यता कमीच. मला नवीन फार फार तर एवढेच कळले की अमेरीकेत ख्रिश्चन कट्टरतावद्याची कमी नाही. आणि त्यामुळे "ख्रिश्चन राईट/ ख्रिश्चन नॅशनलिझम" च्या नावाखाली एकत्र येवून आपली राजकीय ताकद दाखवणार्‍यांची ही बातमी पाहिली तेव्हा फारसे आश्चर्य वाटले नाही.

पुस्तक, ऑडिबल, चित्रपट या प्रत्येक माध्यमाचे आपले असे एक निराळेपण आहे. कादंबरीत कित्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या नोंदी असतात. चित्रपटात त्याची दखल म्हणावी तशी घेता येत नाही. याउलट कादंबरीतले संवाद वाचताना कधी कधी हेल, टोन नेमका कळत नाही. उदा. पुलंची पुस्तक वाचने ऐकून/पाहून त्या पात्रांचे संवाद मला जास्त (आणि कायमचे) लक्षात राहिलेले आहेत. पण पुस्तक वाचताना तो टोन तो हेल लक्षात आलेले नव्हते. तसेच, अलिकडे पाहिलेल्या ग्रेट एक्सपेटेशन्स मधल्या एस्टेलाचा "बॉय" हा टोन (पाणउतारा करणारा) मला चित्रपटातून अधिक चांगला समजला. त्या एका टोनमधून त्या पात्राचा स्वभाव चटकन समजतो. पुस्तक वाचताना तो टोन लक्षात आला नव्हता. चित्रपटात सोयीनुसार कधी कधी महत्त्वाचे पात्रही गाळले जाते. (याच चित्रपटात ऑर्लिक हे महत्त्वाचे पात्र गाळूनच टाकले आहे). फार मोठ्या सिरिजच्या वाट्याला मी जात नाही त्यात कदाचित तसे दाखवता येऊ शकते.

मला ऑडीबलही पण खूप आवडते. खास करून ज्या पुस्तकांना फारशी एकाग्रता / ध्यान याची गरज नसते अशी पुस्तकं ऑडीबलवर रिडींग स्पीड वाढवून फटाफट उडवता येतात. कारण त्यातला गाभा कळला तरी खूप होते. मी बरीच पुस्तके ऑडिबलवर जीम मध्ये वर्कआउट करताना संपवली आहेत. उदा. मॉडेल नावाचे एक पुस्तक आहे. डेटींगच्या सल्ल्याबद्धल आहे. पण थोडा वेगळा विचार (आणि कदाचित धाडसी पण अगदी पाश्चिमात्य संस्कृतीच्याही बाहेरचा, त्यामुळे काही स्त्रीवाद्यांना तो बिलकूल रुचलेला नाही) लेखकाने मांडला आहे. अनेक स्त्रियांबरोबर (पण एकावेळी एकीशीच एकनिष्ठ) डेटींग (क्लब मध्ये वन नाईट स्टँडवर न थांबता काही दिवस ते काही महिने रिलेशन्स ) कशी करायची यावर हा लेखक आपले मत मांडतो. भारतीय संस्कृतीला तो रुचणार नाहीच, पण बर्‍याच पाश्चात्यांनाही रुचलेला नाही. नवीन लेखकांची (नॉन फिक्शन) पुस्तक ज्यात काही नवीन विचार मांडलेला असण्याची शक्यता कमी अशा पुस्तकांना ऑडीबल चांगला न्याय देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अल्केमिस्ट च्या बाबतीत माझ असंच झालं. अगदी कसं बस शेवटाकडे नेलं रेटत. पण नाही. यात वाचनाचं तारु दुर्बोधतेच्या खडकांवर आपटल् नाही, स्वत:चा उथळपणा कारणीभूत नसावा, अटेन्शन स्पॅन पण चांगलाच होता. पण काय झाले ते कळलेच नाही. कदाचित त्यांची कोमट कलाकृती आणि माझी निबर अनुभूती!!किंवा मग प्रचंड मार्केटिंग आणि लाखोंच्या प्रति खपल्याचे आकडे.!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती अफगाण पुस्तकंसुद्धा - kite runner etc. वाचवली नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
फ्लाय हा एपिसोड माझ्या मते वॉल्टची जिजिविषा दाखवण्याचा प्रयत्न आहे. तो त्याच्या कामात परफेक्शनिस्ट आहे अगदी जिवाच्या कराराने तो त्याचे लक्ष्य भेदण्याचा प्रयत्न करतो. मेथ लॅब हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात मोठा भाग व्यापून राहिला आहे. ते काम त्याच्या एरव्हीच्या क्षूद्र जीवनाचे सार्थक करते, त्याचे सर्वश्रेष्ठ मेथनिर्माता असण्याचा अभिमान एका यःकश्चित माशीमुळे मोडून पडावा हे सहन न झाल्याने तो जंग जंग पछाडतो. हा संघर्ष त्याची स्वतःच्या मनातली प्रतिमा आणि निसर्ग यामधला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************