शांत सागरी कशास .............तीन वर्षांनंतर
शांत सागरी कशास तीन वर्षांनंतर
शांत सागरी कशास उठविलीस वादळे? शांत सागरी कशास उठवतोस वादळे?
गायिले तुवा कशास गीत मन्मनातले? भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे?
काय हे तुझ्यामुळे पहा किती तुझ्यामुळे
देहभान हरपले गृहशांतता हरपते
युगसमान भासतात आज नाचरी पळे युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे
अमृतमधुर बोल एक खडाजंगी बोल तव
श्रवणि जो न पाडिलास श्रवणि माझ्या पाडतोस
अधिरता भरे जिवात केवढी तयामुळे भयभीती मनी भरे केवढी तयामुळे
स्वर्ग कल्पनेतला स्वर्ग कल्पनेतला
येइल कधि भूतला केव्हाच विरुन पार गेला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे दिवसरात्र अंतरात त्रस्तता उचंबळे
कवयित्री : संजीवनी मराठे
प्रतिक्रिया
हे .. कसं काय आहे?
हे .. कसं काय आहे? सिझोफ्रेनिक काव्य वाटतंय -एक ओळ सोमेश्वरी तर दुसरी रामेश्वरी.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
............शांत सागरी कशास .
............शांत सागरी कशास .............................तीन वर्षांनंतर
शांत सागरी कशास उठविलीस वादळे?.................शांत सागरी कशास उठवतोस वादळे?
गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?.....................भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे?
काय हे तुझ्यामुळे......................................पहा किती तुझ्यामुळे
देहभान हरपले..........................................गृहशांतता हरपते
युगसमान भासतात आज नाचरी पळे......................युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे
अमृतमधुर बोल एक...................................खडाजंगी बोल तव
श्रवणि जो न पाडिलास.................................श्रवणि माझ्या पाडतोस
अधिरता भरे जिवात केवढी तयामुळे......................भयभीती मनी भरे केवढी तयामुळे
स्वर्ग कल्पनेतला.......................................स्वर्ग कल्पनेतला
येइल कधि भूतला...................................... केव्हाच विरुन पार गेला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे.......................दिवसरात्र अंतरात त्रस्तता उचंबळे
- संजीवनी मराठे
===============================
एक मराठी असामी
या अल्लाह,
तुम्ही हे लिहून माझं कुतूहल वाढवलं आहे. हे कूटकाव्य सोडवायला माझे न्यूरॉन्स शिवशिवताहेत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
शांत सागरीं कशास
संजीवनी मराठे यांची ही कविता माझ्या आधीच्या बॅचच्या मराठीच्या पुस्तकात होती बहुतेक इयत्ता आठवी/नववी/दहावीला.
ही ती मूळ कविता -
शांत सागरीं कशास उठविलींस वादळें?
गायिलें तुवा कशास गीत मन्मनांतलें?
काय हें तुझ्यामुळें
देहभान हरपलें
युगसमान भासतात आज नाचरीं पळें !
अमृतमधुर बोल एक
श्रवणिं जों न पाडिलास
अधिरता भरे जिवांत केवढी तयामुळें !
स्वर्ग कल्पनेंतला
येइल कधिं भूतला
दिवसरात्र अंतरांत आस ही उचंबळे !
तर वरील धागाकर्त्याने ही कविता ताज्या प्रेमाची मानून तीन वर्षांनंतर काय परिस्थिती असेल असे कल्पून या कवितेचे तीन वर्षांनंतरचे वर्जन/विडंबन लिहिले आहे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
संजीवनी मराठे यांची कविता इथे
संजीवनी मराठे यांची कविता इथे का चिकटविली आहे?
त्यांनी परवानगी दिली आहे का असे करण्याला?
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
.
भिकार! भिकार!! त्रिवार भिकार!!!