कंगना राणावत लोकसभेत मंडीमधून निवडून आली. याबद्दल फेसबुकवर 'लकडी की काठी' गाण्यातली एक ओळ वाचली.
घोडा था घमंडी, पहुंचा सब्जी मंडी ...
परवा तिला विमानतळावर एका CISF कॉन्स्टेबलनं थोबाडीत मारल्याच्या बातम्या आहेत. कुलविंदर कौर असं नाव त्या कॉन्स्टेबलचं. तिच्या घरचे शेतकरी आंदोलनात सामील झाले होते; आणि कंगना त्या काळात आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत होती. कुलविंदरची आई आंदोलनात आली होती, आणि कंगना म्हणत होती की, १००-१०० रुपये देऊन या बायका आणल्या आहेत.
या थोबाडीत प्रकारानंतर कंगनानं या कृत्यालाही दहशतवाद म्हणलं आहे; आणि भाजप नेतृत्वानं त्याबद्दल तिला काही ढोस दिल्याचंही बातम्यांमध्ये दिसलं नाही.
भूतकाळात कंगनानं नथुराम गोडसेनं गांधीजींना मारण्याचं समर्थनही केलं आहे.
दुसऱ्या धाग्यावर एक प्रश्न आहे - "कंगनाला लोकांनी का निवडून दिलं हे समजत नाही." मला समजतं. हा प्रश्न ज्यांना पडला आहे, राजेश१८८, त्यांनाही हे समजत असेलही. ते मान्य करणं जड जात असावं; हे मला चांगलं लक्षण वाटतं. अशा लोकांची संख्या वाढत राहो.