Skip to main content

इजराईल -इराण युद्ध

इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.

इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.

इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.

या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

विवेक पटाईत Tue, 03/03/2026 - 15:50

ज्यांनी स्वत:च्या देशातील लाखो लोकांना फासावर चढविले आहे, अश्या कट्टर जिहादी राष्ट्राला कुणीही समजवू शकत नाही. दुसरी कडे इजराईलचे अस्तित्व भविष्यात राहणार की नाही, हे ह्या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे. या शिवाय "सुपर पावर" भविष्यात सुपर पावर राहणार की नाही हे ही या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 20:21

In reply to by विवेक पटाईत

या शिवाय "सुपर पावर" भविष्यात सुपर पावर राहणार की नाही हे ही या युद्धाच्या निकालावर अवलंबून आहे.

असे नोस्त्रोदामसकाकांनी सांगून ठेवलेले आहे काय?

सई केसकर Tue, 03/03/2026 - 19:19

इस्रायलचा नाश व्हायच्या आधी धनंजय माने यांचं डायबेटिसचं औषध मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना..

सई केसकर Tue, 03/03/2026 - 20:38

In reply to by 'न'वी बाजू

आता इतक्या वर्षांचं इन्फ्लेशन वगैरे...शिवाय आज ब्रेंट क्रूडच $७०/बॅरल झालं. इस्लामी वर्चस्व हटवायची किंमत तर द्यावीच लागेल ना पुणेकरांना!

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 21:02

In reply to by सई केसकर

...पुण्यावरील इस्लामी वर्चस्व हटविण्याची चिंता दिल्लीकरांना कधीपासून (नि काय म्हणून) पडू लागली, इतकाच प्रश्न आहे.

(शिवाय, त्यांचे मूळसुद्धा पुणेरी नव्हे. (नागपूर की कायसेसे ऐकून आहे.) अर्थात, पुणेरी लोकांच्या डोक्यांत इस्लामी वर्चस्वाच्या भीतीचे खूळ घुसवून देण्याची नागपूरकरांची परंपरा अंमळ जुनीच आहे, म्हणा.)

(बाकी, 'सदाशिव पेठेवरील इस्लामी वर्चस्व' वगैरे कल्पनांनी अंमळ महिरून वगैरे गेलो, हे नमूद करणे येथे प्राप्त आहे. चालायचेच.)

सई केसकर Wed, 04/03/2026 - 16:03

In reply to by अबापट

अहो अहो अहो! मूळ सिनेमात पुण्यातला एक बंगला, बालगंधर्व रंगमंदिर वगैरे आहे म्हणून पुणे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/03/2026 - 07:24

In reply to by सई केसकर

तो मित्र वारला तसं औषध वारलं नाही म्हणजे मिळवलं!

'न'वी बाजू Thu, 05/03/2026 - 08:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तो पिच्चर कधीचा? किती वर्षे झाली त्याला? आता, औषध म्हटले, की त्याला काहीतरी एक्स्पायरी डेट असणारच की!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/03/2026 - 07:59

In reply to by 'न'वी बाजू

अहो, इस्रायलवरून आणायचं औषध आहे. अशी कशी एक्स्पायरी असेल त्याला! काहीही हं तुमचं, 'न'बा!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/03/2026 - 07:56

In reply to by 'न'वी बाजू

मला फायरफॉक्सातून पैसे न देता फोटो बघता आले. मी ॲडब्लॉकला एकरकमी पैसे दिले आहेत, एका वर्षाचे, म्हणून असेल का?

'न'वी बाजू Fri, 06/03/2026 - 08:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन पर्याय देतोय.

१. पहिल्या वर्षाकरिता $४९ आणि त्यानंतर प्रतिवर्षी $१४९, किंवा
२. पहिले दोन आठवडे फुकट (साइनअप करून) आणि त्यानंतर प्रति-चार आठवडे $१२.९५

पेवॉलचा आणि ॲडब्लॉकरची वार्षिक वर्गणी भरलेली असण्याचा अर्थाअर्थी संबंध (बहुधा) नसावा. (चूभूद्याघ्या.)

(कदाचित तुम्ही बिझनेसइनसायडरची वर्गणी भरली असावी काय? किंवा, गेला बाजार, बिझनेसइनसायडरला इतक्यात कधी साइनअप केले असावे काय?)

(समजा, ॲडब्लॉकरने काही जुगाड़ करून तुम्हाला एक वेळेस पेवॉलला ओव्हरराइड करू जरी दिले — ज्याची शक्यता मला मुळात नगण्य वाटते — तरीसुद्धा, असा परिणाम कायमस्वरूपी अथवा दीर्घकाळ टिकून राहू शकेल, याबद्दल प्रचंड साशंक आहे.)

असो.

अमित.कुलकर्णी Wed, 04/03/2026 - 10:54

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम!

२ मुद्द्यांविषयी माझी मते -

१. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. - "भारता"ने आपली राजवट तिथे स्थापन करावी. "अपॉरचुनीटी है, बेनिफिट ले सकते हैं." - हे यापूर्वी कुणालाही न सुचू शकणारे चतुर धोरण या वेळी अनुसरता येईल.

२. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. - विश्वगुरू असलेल्या भारताकडे का नाही बरे? "आमचे नेतृत्व करा" अशी गळ ते घालताना आम्हाला आत्तापासून दिसत आहेत.

विवेक पटाईत Thu, 05/03/2026 - 17:25

In reply to by अमित.कुलकर्णी

या घटकेला रशिया आणि चीन नंबर दोन आणि तीन वर आहेत. बाकी भारतालाही मोठ्या प्रमाणाव शस्त्रांचे ऑर्डर मिळतील. युद्धाचा निकाल काही लागो पण स्वतःची रक्षा स्वतः करायची असते हे प्रत्येक देशाला चांगले कळून जाईल. त्याचा फायदा भारतालाही होईल.

चिंतातुर जंतू Thu, 05/03/2026 - 18:06

काय सांगता! फॉरेन सेक्रेटरींनी अगदीच माती खाल्ली की!

India's foreign secretary Vikram Misri at Iran Embassy, meets Iran Ambassador Dr Mohammad Fathali. Pays condolences over the demise of supreme leader Khamenei.

India's foreign secretary Vikram Misri at Iran Embassy

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/03/2026 - 07:58

म्हणे भारतानं बोलावलेली युद्धनौका होती; त्यात काही शस्त्रास्त्रं नव्हती; ती श्रीलंकेजवळ भारताच्या हद्दीबाहेर अमेरिकेनं बुडवली. काय म्याटर झाला त्याचा?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/03/2026 - 02:05


मी आज टॅक्सी करून विमानतळावर गेले. जुन्या मित्राला भेटायला अल्बुकर्कीला चालले आहे.

टॅक्सीवाला इराणी होता. आॅस्टिनातल्या हवेनुसार टीशर्ट-शाॅर्ट्स घालून आला होता. त्याला म्हणाले, "I am sorry for what is going on in your country and happening to your people." आधी आम्ही दोघांनी धर्म, राजकारणी, अयातोल्ला सगळ्यांना नावं ठेवली.

हल्लीच झालेल्या सरकारविरोधी निदर्शनात ३६,००० लोक मारले. त्यांच्या दफनासाठी आधी नातेवाइकांकडून गोळ्यांचे पैसे घेतले, ज्या त्यांच्यावरच झाडल्या आणि मारलं. दफनाला दहा-पंधरा दिवस लागले. तो म्हणे, "यांच्या कर्माचं फळ पाहा! आता अयातोल्लाचं दफन करता येत नाहीये बाँब पडतील म्हणून."

तो ४२ वर्षांचा आहे. त्याला आठवतं तेव्हापासून दर शुक्रवारी टीव्हीवर 'अमेरिकेचं वाटोळं होवो', आणि 'इस्रायलचा नायनाट होवो' असं सतत चालायचं. इराणकडे किती मिसाईल आहेत, ड्रोन आहेत याची भर पडली. मग म्हणे, "बाँबहल्ले सुरू झाले आहे, आणि दोन तासांत अयातोल्लावरही बाँब पडला. काय फायदा या मिसाईलांचा!"

"इराणमध्ये खूप लाचखोरी आणि भ्रष्टाचार आहे. किती इराणी अधिकारी मोसादसाठी बातम्या पुरवत असतील पाहा! इतक्या सहज यांना अयातोल्ला आणि लष्करी अधिकारी कुठे आहेत, हे एरवी समजलं असतं का?"

"लोकांना फक्त स्वातंत्र्य हवं आहे. सरकारकडून, व्यवस्थेकडून आम्ही फार अपेक्षा धरतच नाही. मी काही वर्षं इराणमध्ये द. कोरियाच्या वकिलातीत काम केलं. तिथे मदत मागायला कुणी कोरियन आले तर त्यांना मदत करणं हे आपलं परमकर्तव्य असल्याचं लोक मानायचे. मी इथे इराणी वकिलातीत गेलो तर ते लोक माझा चेहरा, कपडे बघतील. लांब, मुसलमानी दाढी नाही; आणि बंद गळ्याची शेरवानी नाही; टीशर्ट-शाॅर्ट्स आहेत म्हणजे 'हा आपल्यातला नाही' आणि ते लोक मला मदत करणार नाहीत."

"तुम्हाला सरकार आवडत नसेल तर देश सोडून जा, असं म्हणायचे हे लोक. आता अयातोल्लाला मारला तर कित्येक देशांत इराणी वकिलातींसमोर लोक नाचताना दिसले. चिलेमध्ये इराणी लोक असतील असं मला वाटलंही नव्हतं. त्यांचे आताचे नाचतानाचे व्हिडिओ बघून मला समजलं."

इराणमध्ये महागाई खूप आहे, १००% आयातकर आहे, अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था बुडीतखाती गेली आहेत; लोकांनी जगायचं कसं! मग चोऱ्यामाऱ्या चिकार! त्याचाही एक फोन चोरीला गेल्याचं सांगितलं.

मग म्हणे, "भारतीय मुसलमान आणि पाकिस्तानी लोक अयातोल्लाच्या मरणाचा मातम करताना दिसत आहेत, काळे कपडे घालून! त्यांना माहीत आहे का नुकतेच त्यानं किती मुसलमान मारले, ३६,०००! मुसलमान म्हणून कुणालाही जवळ करायचं का! मी सांगतो तुला, जगातले सगळ्यांत बिनडोक लोक कोण, तर पाकिस्तानी. त्यानंतर अफगाण - विमानतळांवर नमाज पडताना दिसतात. आपला धर्म ठेवा आपल्याकडेच! आणि तिसऱ्या नंबरवर आमचे सत्ताधारी. मूर्ख लोक."

'परदुःख शीतल' याचं जेमतेम भाषांतर मी त्याला सांगितलं. फेसबुकवर मराठी पुरोगाम्यांनीही(!) अयातोल्लाचे फोटो लावलेले मी दोन दिवसांपूर्वी बघितले होते. आपल्याच लोकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणारा, स्त्रियांनी डोकं झाकलंच पाहिजे म्हणून लोकांना मारणारा अयातोल्ला.

विमानतळाजवळ आल्यावर म्हणाला, "ज्यांची मुलं या लोकांनी मारली त्या आया आता आपापल्या घरांच्या गच्चीवर जाऊन नाचत आहेत. धर्म आणि कट्टरपणानं माझ्या देशाची धूळधाण उडवली आहे."

मी शेवटी एवढंच म्हणाले, "युद्ध सामान्य लोकांच्या हिताचं कधीच नसतं. आत्ता मी फक्त आशा धरू शकते की हे युद्ध लवकरच संपेल. इराणी लोकांना पुन्हा आपला समाज आणि देश उभारता येईल. आणि मुख्य म्हणजे कट्टरवादी लोकांना सत्ता मिळणार नाही."

माझ्या आणखी एका मैत्रिणीचं कुटुंब इराणमध्ये आहे. त्यांची ख्यालीखुशाली तिला अजूनही समजलेली नाही.

'न'वी बाजू Sat, 07/03/2026 - 05:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अयातोल्ला खामेनी कसा आहे, हा प्रश्न नाही. अयातोल्ला कसाही असेल. तो काही फार प्रेमळ, मनमिळाऊ, प्रजावत्सल आदि सर्वगुणसंपन्न राज्यकर्ता असेलच (किंवा आहे), असा माझाही दावा नाही. परंतु,

  • तो (राज्यकर्ता म्हणून) बरावाईट जसा कसा असेल, त्याबद्दल काय ते पाहून घेणे हा तो आणि इराणची जनता यांच्यातला आपापसातला मामला नव्हे काय? इस्राएलचा किंवा अमेरिकेचा त्यात काय संबंध?
  • इस्राएल किंवा अमेरिका हे इराणी जनतेचे तारणहार आहेत, अशी येथे कोणाची प्रामाणिक समजूत आहे काय? इराणी जनतेचा त्यांना पुळका आलेला आहे काय? अयातोल्लाहला परोपकारभावनेतून हटवून त्यानंतर इराणच्या जनहितार्थ इस्राएल आणि अमेरिका काही जनहितकारी योजना वगैरे चालविणार आहेत काय?
    • तसे जगात कोणीच कोठेच कधीच करीत नाही.
      • साक्षात प्रभू रामचंद्राने ते केले नाही. वाली तथा रावण यांच्याशी ज्या मारामार्‍या केल्या, त्या संबंधितांच्या राज्यातील प्रजेच्या कोठल्याही हितार्थ नव्हे, तर केवळ स्वतःचे हितसंबंध जपण्याकरिता. त्यानंतर त्या राज्यांत कोठलीही जनहितार्थ योजना वगैरे न राबविता, तेथील गाद्यांवर आपले स्थानिक पित्थे (अनुक्रमे सुग्रीव आणि बिभीषण) बसवून स्वतः नामानिराळे झाले. नंतर तुमचे तुम्ही घ्या बघून!
      • दुसर्‍या महायुद्धात दोस्तराष्ट्रे जर्मनांशी जी लढली, ती ज्यूंसंबंधीच्या कोठल्याही पुळक्यातून नव्हे, तर त्यांच्या हितसंबंधांवर हल्ले झाले म्हणून! झालेच तर, दुसरे महायुद्ध ओसरल्यानंतर, मध्यपूर्वेत पॅलेस्टाइनच्या भूमीत इस्राएल नावाचे ज्यूंचे राष्ट्र स्थापन करण्याची ज्यूंची जी जुनीच (कदाचित हिटलरच्या जन्माच्याही अगोदरपासूनची) मागणी होती, त्याला (तथा त्यानंतरच्या इस्राएलच्या स्थापनेला) दोस्तराष्ट्रांकडून जो अचानक पाठिंबा मिळू लागला, त्यामागेही कोठले ज्यूंबद्दलचे अचानक उफाळून आलेले प्रेम नव्हते. तर,
        • (१) निर्वासित झालेल्या ज्यूंचे लोंढे आपल्या भूमीत येऊ लागून आपल्याला त्यांना समाविष्ट करून घ्यावे लागू नये; त्यापेक्षा ते परस्पर दूर कटले, तर बरेच, ही एक धारणा, झालेच तर
        • (२) मध्यपूर्वेच्या तेलसमृद्ध भूमीत आपला कोणीतरी एक पित्थ्या कायम राहील, जेणेकरून, यदाकदाचित पुढेमागे तेलदांडग्या अरबांचे त्या भागांत जर वर्चस्व होऊ घातलेच, तर त्याला शह द्यायला आपल्या बाजूने एक मोहरा राहील,
      • असा दुहेरी विचार त्यामागे होता.
      • (अन्यथा, त्यापूर्वी,
        • (१) दरवर्षीच्या एका अल्पमर्यादेपलीकडे ज्यूंना पॅलेस्टाइनमध्ये मोठ्या प्रमाणात वसण्यास परवानगी न देण्याचे तत्कालीन स्थानिक ब्रिटिश राजवटीचे धोरण होते,
        • (२) तेथील स्थानिक ब्रिटिश राजवट उलथून पाडण्याकरिता प्रयत्नरत अशा ज्या ज्यूंच्या संघटना होत्या, त्या ब्रिटिश राजवटीच्या लेखी दहशतवादी संघटना होत्या, स्वातंत्र्यसैनिकांचे गट नव्हेत, झालेच तर
        • (३) तेथील स्थानिक ब्रिटिश राजवट उलथून पाडण्याकरिता प्रयत्नरत अशा ज्या ज्यूंच्या संघटना होत्या, त्यांनी सुरुवातीच्या काळात आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी मदत करण्यास (नेताजी स्टाइलमध्ये) साक्षात हिटलरलासुद्धा पाचारण करून पाहिले होते (Imagine that!), परंतु हिटलरने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. असो, हे फार विषयांतर झाले.)
      • फार कशाला, १९७१मध्ये भारताने मुक्तिबाहिनीला जी मदत केली, अथवा शेख मुजीबला जो पाठिंबा दिला, तोसुद्धा बंगाली मुसलमानांविषयीच्या कोठल्या पुळक्यामुळे अथवा शेख मुजीबबद्दल उतू चाललेल्या कोठल्या प्रेमामुळे नव्हे, तर, पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात भारताचे हितसंबंध गुंतलेले होते, म्हणून.
    • सांगण्याचा मतलब, जनरीत आहे, ही अशी आहे. चालायचेच.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कितीही झाले, तरी अयातोल्लाह खामेनी हे इराण नावाच्या एका सार्वभौम राष्ट्राचे सर्वोच्च नेते होते. (लोकनियुक्त होते, अथवा नव्हते, हा पूर्णपणे गौण प्रश्न.) अमेरिकेला अथवा इस्राएलला ते आवडले नाहीत, म्हणून (अमेरिकेने अथवा इस्राएलने) त्यांची हत्या करणे हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक (अगदीच नवा म्हणता येणार नाही, परंतु) अत्यंत अनिष्ट असा पायंडा आहे.
    • त्या हिशेबाने, ट्रंपदेखील अनेकांना आवडत नाहीत. म्हणून तिसर्‍या एखाद्या राष्ट्राने ट्रंप यांची हत्या घडवून आणल्यास (अ) ते योग्य ठरेल काय, आणि (ब) अमेरिका ते चालवून घेईल काय? (तिसर्‍या एखाद्या राष्ट्रास असे काही घडवून आणता येण्याची क्षमता असण्याची संभाव्यता काय, हा मुद्दा पूर्णपणे अलाहिदा. तसेही, One can never tell.)
    • फार कशाला, मला मोदी अजिबात आवडत नाहीत. परंतु, म्हणून, तिसर्‍या एखाद्या राष्ट्राने (आणि त्यातसुद्धा माझ्या राष्ट्राने – अमेरिकेने) मोदींची हत्या घडवून आणावी, हे मला कदापि पटणार नाही, तथा असा पुरस्कार मी कधीही करणार नाही.

पण लक्षात कोण घेतो?

सई केसकर Sat, 07/03/2026 - 13:33

In reply to by 'न'वी बाजू

उत्तम विश्लेषण

मुळात जिथे जिथे अमेरिका तारणहार बनून जाते, तिथे तिथे ती परिस्थितो अमेरिकेच्याच पूर्वकर्मामुळे उद्भवलेली असते. इराणच्या शाहला जरी अमेरिकाधार्जिणा आहे म्हणून हटवलं असलं तरी त्यानंतरच्या अमेरिकन राजवटींनी इराणला आपल्या फायद्यासाठी वापरलं नाही असं म्हणता येईल का?
आणि या सगळ्यामध्ये एखाद्या कंदिलातून एकदम लख्ख उजेड पडावा तसं मोदीजींचं परराष्ट्र धोरण दिसतं आहे. हे सुर्याइतकं लख्ख धोरण त्यांनी कुणाच्या मदतीने बांधलं आहे हे मी पटाईत काकांना विचारू इच्छिते.

अबापट Sat, 07/03/2026 - 13:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या कमेंट मधे इराणी टॅक्सीवाल्याने वर्तवलेले इराणमधील खरे चित्र दिसत असावे
हे खूप गंभीर असले तरीही ......

एप्सटिन फाईल्स मधील उल्लेखिलेले आपण ( म्हणजे तात्याने ) अल्पवयीन मुलींवर केलेले अत्याचार (? शब्द बरोबर आहे का ?), त्याच्यावरून लक्ष हटवावे म्हणून तर हा हल्ला केला नसेल ना ?
तसेच या व आधीच्या अनेक युद्धांमधील मुख्य युद्धखोर बीबी याच्या नादाने इराण मध्ये केलेला हल्ला हा जास्त गंभीर वाटतो.

याला पार्श्वभूमी अफगाणिस्तान, इराक आणि लिबियाची आहे.
इराक मधेही सद्दाम हुसेन हा क्रूरकर्मा होता ( काय की , माझे त्याकाळी , म्हणजे पहिल्या गल्फ वॉर आधी इराक मध्ये काम केलेले सहकारी तर म्हणत की इराक हा अरब देश पूर्णपणे सेक्युलर होता , आणि बगदाद मध्ये तर युरप मध्ये असल्यासारख्या सुविधा होत्या , म्हणे )

मागासलेले तालीबान, क्रूरकर्मा सद्दाम या गोष्टी जरी खूप वैट असल्या तरीही तिथे आता जी परिस्थिती आहे, त्यापेक्षा पूर्वी जास्त चांगली परिस्थिती नव्हती का?

आज लिबियाची काय परिस्थिती आहे?

हा सगळा राडा कुणी घालून ठेवलाय?

तात्पर्य : तात्यालॅन्डला इतर ठिकाणी जाऊन बरबादी करण्याचा हक्क कुणी दिला ?

एप्सटिन फाईल्स मधील उल्लेखिलेले आपण ( म्हणजे तात्याने ) अल्पवयीन मुलींवर केलेले अत्याचार (? शब्द बरोबर आहे का ?), त्याच्यावरून लक्ष हटवावे म्हणून तर हा हल्ला केला नसेल ना ?

निश्चित सांगता येणे कठीण आहे.

म्हणजे कसे आहे, की तात्याने तूर्तास इतक्या ठिकाणी आणि इतके वाईट हगून ठेवलेले आहे, की त्यापैकी नक्की कोणत्या हगलेल्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले असेल, हे सांगता येणे ब्रह्मदेवालासुद्धा (किंवा, खरे तर, खुद्द तात्या सोडून इतर कोणालाही) शक्य नाही. (फार कशाला, तात्याचा एकंदर स्वभाव पाहता, खुद्द तात्यासुद्धा आपण हे नक्की का करीत आहोत, हे सांगू शकेल की नाही, याबद्दल साशंक आहे. त्याचे म्हणजे कसे, आत्ता एक, तर दुसऱ्या मिनिटाला दुसरेच असते. चालायचेच.)

एक थियरी अशीही आहे, की अमेरिकेतल्या मिडटर्म निवडणुका स्थगित करण्याकरिता तो हे करीत आहे. (आता, केवळ युद्ध चालू आहे, म्हणून अशा निवडणुका स्थगित करता येतात का, त्याला नक्की काही घटनात्मक आधार आहे का, असले प्रश्न सध्याच्या माहौलात विचारायचे नसतात. ते समजा अगदी अ-घटनात्मक जरी निघाले, तरीसुद्धा, त्याचा प्रभावी प्रतिकार करता येण्यासाठी कोठलीही यंत्रणा तूर्तास एक तर उपलब्ध तरी नाही, किंवा असल्यास निष्प्रभ तरी झालेली आहे. काँग्रेसमध्ये (अमेरिकन संसदेत) दोन्ही सदनांत तूर्तास रिपब्लिकनांचे वर्चस्व आहे (किंबहुना, त्याला धक्का पोहोचू नये, म्हणून तर मिडटर्म निवडणुका स्थगित करण्याचे प्रयोजन!), आणि, तूर्तास ट्रंपने कितीही वाईट स्वरूपाची काशी जरी घातली, तरी त्याला विरोध करण्याच्या मूडमध्ये सांसदीय रिपब्लिकन नाहीत. राहता राहिली गोष्ट न्यायालयांची. निम्नपातळीवरील फेडरल न्यायालयांत तूर्तास तितकीही वाईट परिस्थिती नाही, त्यामुळे, तेथे ट्रंपच्या एखाद्या कृत्याविरोधात दाद मागितल्यास अद्यापही क्वचित ट्रंपविरोधात निर्णय मिळू शकतो. (अर्थात, अनेकदा, ट्रंपसरकार असे निर्णय धुडकावून लावून, न्यायालयाच्या नाकावर टिच्चून आपल्याला जे हवे ते करणे with impunity चालूच ठेवते, ही बाब अलाहिदा.) सर्वोच्च न्यायालयाची गोष्ट मात्र वेगळी आहे. तेथे (ट्रंपच्या आणि ट्रंपपूर्वीच्या) रिपब्लिकन प्रशासनांनी नेमलेल्या न्यायमूर्तींचे वर्चस्व आहे. (९पैकी ६ हे Republican appointees आहेत. ही नियुक्ती संबंधित न्यायमूर्ती गचकेपर्यंत असते. उरलेले ३ Democratic appointees आहेत, नि ते (खरे तर त्या; तिघीही योगायोगाने स्त्रिया आहेत.) खरमरीत dissenting opinions वगैरे मांडतांत, नाही असे नाही, परंतु, त्या dissenting opinionsना प्रभावाच्या दृष्टीने काहीही महत्त्व नाही. विरोधी मत कोणीतरी मांडले, अशी नोंद, एवढेच. निर्णय बहुमतानेच होत असल्याकारणाने, ‘तेवढेच ज्ञानप्रकाशात’ याव्यतिरिक्त त्या विरोधी मताला महत्त्व नाही. त्यामुळे, त्या तीन Democratic appointees या केवळ lend (the Supreme Court) a legitimacy that it sorely lacks otherwise, असे विधान केल्यास बहुधा ती अतिशयोक्ती ठरू नये. असो.) आणि, तेथे तूर्तास ‘सुप्रीम कोर्ट घटनेचा अर्थ लावते’ऐवजी ‘सुप्रीम कोर्ट म्हणते, ती घटना’ अशी परिस्थिती आहे. ट्रंप वाटेल तसा जरी हगला, तरी त्याला legitimacy द्यायला प्रस्तुत सुप्रीम कोर्ट सज्ज आहे. अधूनमधून ट्रंपच्या विरोधात एखादा निर्णय चुकून जरी दिलाच, तरी तो ‘न्यायाचा विजय’ वगैरे नसून ‘मायबाप सुप्रीम कोर्टाची राष्ट्रावर मेहेरबानी’ वगैरे गणता यावी. एकंदरीत, आम्ही म्हणतो, त्याप्रमाणे, It is the best Supreme Court that money can buy. चालायचेच. सांगण्याचा मतलब, ‘युद्धकाळात निवडणुका स्थगित करणे हे घटनेशी सुसंगत आहे’ असा घटनेचा ‘अर्थ’ लावून सांप्रतकालीन सुप्रीम कोर्टाने बहुमताने त्यावर शिक्कामोर्तब केल्यास कोणाला आश्चर्य वाटावयास नको. असो.)

(तरी बरे, अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने (भारतातल्याप्रमाणे) कशाचीतरी suo motu दखल घेऊन त्याविषयी आदेश देण्याची प्रथा (अद्याप तरी) नाही.)

(एकंदरीत, मोदी किंवा भाजप यांना आपण — तुम्ही, मी, झालेच तर (पटाईतकाका वगळल्यास बाकी) बहुधा येथील सर्वच जण — शिव्या घालतो खरे, परंतु, (ट्रंप अथवा रिपब्लिकनांच्या तुलनेत) ते सर्व अद्याप बच्चे आहेत. Mere amateurs. (ट्रंप आणि रिपब्लिकनांकडून) त्यांना अद्याप बरेच शिकून घेण्यासारखे आहे. असो.)

तात्पर्य : तात्यालॅन्डला इतर ठिकाणी जाऊन बरबादी करण्याचा हक्क कुणी दिला ?

तुम्ही पण ना, बापटकाका!

असले ‘हक्क’ तसेही कोणी ‘देते’ काय? तात्यालँडने तो ‘हक्क’ (सालाबादप्रमाणे यंदासुद्धा) (आपण होऊन) ‘घेतला’, यात काही नवल आहे काय?

इराक मधेही सद्दाम हुसेन हा क्रूरकर्मा होता

गंमत म्हणजे, सद्दाम हुसेन हा एके काळी अमेरिकेचा (इराकमधील) पित्थ्या होता. (He may have been a bastard, but he was our bastard!) फार कशाला, ओसामा बिन लादेनसुद्धा. (He was a CIA asset created under the Reagan administration during the Soviet occupation of Afghanistan.) या दोघांचे चुकले एवढेच, की पुढे ते अमेरिकेच्या विरोधात गेले, त्यामुळे ते वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!, खलनायक वगैरे ठरले. अन्यथा, अमेरिकेच्या लेखी तोवर ते ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ कॅटेगरीत मोडत. यात काही नवीन नाही.

चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 07/03/2026 - 21:13

In reply to by 'न'वी बाजू

‘अमेरिका हे लोकशाही राज्य (Democracy) नसून घटनात्मक गणराज्य (Constitutional Republic) आहे ‘ असे एक आर्ग्युमेंट अमेरिकेतील उजव्या विचारांच्या संकीर्ण गटांतून (रिपब्लिकन्स, लिबर्टेरियन्स, वगैरे) लोकप्रिय आहे.

थोडक्यात, ‘लोकशाहीची गळचेपीऽऽऽ’ म्हणून तक्रार कसली करता, अमेरिकेत लोकशाही असणे हे घटनेनुसार अभिप्रेत नाहीच आहे मुळी, अशा स्वरूपाचे हे आर्ग्युमेंट आहे.

भाजपने तथा भारतातील उजव्या विचारांच्या अन्य संकीर्ण गटांनी यातून शिकण्यासारखे आहे.

'न'वी बाजू Sun, 08/03/2026 - 19:22

In reply to by 'न'वी बाजू

(नुकतेच हफपोष्टातल्या कोठल्यातरी आर्टिकलावरील वाचकांच्या कमेंटींमध्ये सापडलेले रत्न.)

Breaking News: in a 6-3 decision the Supreme Court has ruled that the Constitution is unconstitutional.”

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/03/2026 - 19:30

आता अल्बुकर्कीला पोहोचले. ज्या मित्राला भेटायला आले आहे तो डावी वाळवी म्हणता येईल अशा छापाचा संशोधक आहे. सध्या अमेरिकेत असला तरी एरवी बंगळुरुमध्ये असतो. संशोधनासाठी पैसे सरकार देत असलं तरीही त्याचा अन्नदाता थेट सरकार नाही. ती निराळीच गंमत. असो.

त्यालाही या टॅक्सीवाल्या रेझाचं म्हणणं सांगितलं. दुसऱ्या सार्वभौम देशात जाऊन युद्ध करण्याचा अधिकार यांना कुणी दिला, हा प्रश्न आलाच. तो बंगाली आहे; म्हणून त्यानं बांग्लादेशचं उदाहरण दिलं. बांग्लादेशात भारताबद्दल कितपत प्रेम आहे, वगैरे. 

आमची गाडी इथे येऊन थांबली की इराणी लोकांना, इराणी समाजाला काय हवं हे त्यांचं त्यांना ठरवता यायला पाहिजे. खामेनीला मारल्यावर इराणी लोकांत जो आनंद पसरला, ते त्यांचं खरं मत आहे असं मानलं तर आपल्याला, त्रयस्थ लोकांना त्यांचा हक्क डावलण्याचा हक्क कोणी दिला! 

बाँबहल्ले सुरू झाले त्याच दिवशी न्यू यॉर्करनं एका इराणी अभ्यासकाची मुलाखत प्रसिद्ध केली. त्यात तो म्हणतो की, इराणमधल्या धार्मिक कट्टर लोकांचं प्रमाण मूठभर टक्केही नसेल. पण त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेसाठी काही लोक कट्टर बनत असतील; पण बहुसंख्य लोकांना आचार-विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे. जी-२० देशांमध्ये असण्याची इराणची क्षमता आहे. पण ...

मित्राशी गप्पांमधून दोघांचं एकमत यावर झालं की, भलत्याच सार्वभौम देशावर हल्ले करण्याचा आणि त्यांचे नेते मारण्याचा हक्क इतर कुणालाही असू नये, हे पुस्तकी मत मान्यच आहे. पण सध्या माझी सहानुभूती पूर्णतया इराणी लोकांना आहे. दोन्ही बाजूंनी त्यांची गळचेपीच होत होती. हेच पॅलेस्टिनी लोकांबद्दलही. त्यांचे सत्ताधारी काय आणि त्यांच्यावर हल्ले करणारे काय, कुणीही या सामान्य लोकांसाठी नव्हतेच. इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर २०२३च्या आधी नेतान्याहू सरकारविरोधी मत खूप तापलेलं होतं. हमास, त्यांना फूस लावणारे आणि शस्त्रं पाठवणारे इराणी सत्ताधारी आणि नेतान्याहू या सगळ्यांनीच 'तो पाहा बुवा' करत आपली पोळी भाजून घेतली आहे, आणि यापुढेही तेच सुरू राहणार आहे. इराणी सत्ताधाऱ्यांची बेडकी आहे का बैल, ते लवकरच समजेल; बेडकी असेल तर कदाचित इराणी लोकांना त्यांना हवेत तसे सत्ताधारी निवडताही येतील. 

इराणी सत्ताधारी आपल्याच लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मारत होते म्हणून आपण गप्प बसणं योग्य होतं, का त्रयस्थ देशानं त्यांचं पहिल्या फळीचं नेतृत्व गारद केलं म्हणून आपण त्यांच्या मृत्यूचा शोक करणं योग्य हे मला सांगता येणार नाही. अयातोल्लाच्या मृत्यूचा शोक निराळा आणि दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला म्हणून त्याचा निषेध निराळा. सामान्य इराणी माणसं अयातोल्लाला मारल्यावर आनंद साजरा करत आहेत, तो आनंद मला अस्थानी वाटत नाही.

 

'न'वी बाजू Sat, 07/03/2026 - 19:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(अयातोल्लाह खामेनी मेल्याचे दुःख नाही, परंतु…) तुमचे हे लॉजिक मला अजिबात पटलेले नाही, एवढेच तूर्तास नमूद करून, सवडीनुसार सविस्तर प्रतिवादासाठी जागा राखून ठेवतो आहे.

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 17:53

In reply to by चिंतातुर जंतू

सावरकरांनी विद्युद्दाहिनीचा पुरस्कार जो केला, तो कशासाठी मग?

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 17:56

In reply to by चिंतातुर जंतू

मरण कशाने महाग झाले? मरण (अद्यापही) स्वस्तच आहे — किंबहुना, फुकट आहे!

नंतर जाळणाऱ्यांचे जर हाल होत असतील, तर ते त्या जाळणाऱ्यांचे फ्युनरल आहे, मरणाऱ्याचे नव्हे!

गोगोल Mon, 09/03/2026 - 19:28

म्हणजे जर इराण मधल्या जनतेचा अमेरिकेला पुळका आला असेल तर मग नॉर्थ कोरिया मध्ये ऑइल सापडेस्तोर तिथल्या जनतेने वाट पाहावी काय?
इराण मधले क्रूरकर्मा लोकांनी तर आपल्याच जनतेला अक्षरशः तुडवलं आणि मारून टाकलं.

इस्रायल आपलं म्हणावं तर त्यांनी गाझा मध्ये पूर्णपणे गाढवाचा नांगर फिरवला. बरं ऑकटोबर ऍटॅक मुळे हे सर्व सुरु झाले म्हणावं तर एप्सटिनचं काय?
असे हाय स्कुल टीचर्स सडनली बिलीनेअर्स होऊन ब्लॅकमेल ऑपेरेशन्स नाही करू शकत.

दिवसागणिक जग वाईट होत चालयय की मीच म्हातारा होत चाललोय