Skip to main content

अभिनंदन!

पंतप्रधान मोदींचे धाडसी निर्णयांबद्दल अभिनंदन!

आज मोदींनी सोन्याच्या खरेदीबद्दल केलेले आवाहन वाचल्यानंतर मला समाजमाध्यमांवर वेड्यात काढणार्‍या "मंदबुद्धी" लोकांची आठवण येते. खरं तर हा निर्णय या अगोदर घेतला असता, तर त्याचे अधिक फायदे या पूर्वीच मिळाले असते. पण उशीरा शहाणपण येण्याच्या आपल्या "सनातनी" परंपरेबद्दल बोलावे तितके थोडेच ठरेल...

आता मला आणखी वेड्यात काढण्यासाठी एक मुद्दा...

सध्या सुवर्णखरेदीला घातलेला लगाम तसाच अनंत काळासाठी पुढे चालू राहीला तर देशाचे भले आहेच. पण देवस्थानाना अर्पण होणारे सोने देशातील विद्यापिठे आणि प्रयोगशाळांकडे कसे वळेल, हे बघितले गेले पाहीजे.

काही काळानंतर भारतीय परत सोने खरेदीकडे वळले तर मला आणखी एक धोका दिसतो. पाकीस्तान आणि चीन मध्ये सोन्याचे प्रचंड साठे सापडल्याचे वृत्त वारंवार वाचायला मिळते. पाकीस्तान आणि चीनमध्ये सापडलेले सोने भारतीयांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकले जाऊन ते श्रीमंत होतील आणि आपल्याला जास्त त्रासदायक ठरतील.

कुणी ऐकत आहे का आणि ऐकलं तर पचवायची क्षमता आहे का?

-राजीव उपाध्ये

चिमणराव Mon, 11/05/2026 - 09:28

अणि आता काय आहे?
>>देवस्थानाना अर्पण होणारे सोने देशातील विद्यापिठे आणि प्रयोगशाळांकडे कसे वळेल, >>
त्यापेक्षा आपले सर्वर उभारा दुष्काळी भागात.

तर्कतीर्थ Mon, 11/05/2026 - 09:56

In reply to by चिमणराव

तुमची कल्पना मूलत: चांगली आहे. पण देशात डेटा-सेंट्रीक वातावरण निर्माण झाल्याशिवाय, तसेच ऊर्जेचे त्रांगडे सोडविल्याशिवाय हे कसे जमेल, याची मला शंका आहे.