५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार
आर्थिक युद्ध — भारताला कमकुवत करण्याचा डाव
भारत जसजसा आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत आहे, तसतसा प्रस्थापित महाशक्तींना हे सहन होणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आता थेट युद्धाऐवजी 'फिफ्थ जनरेशन वॉरफेअर' (5GW), म्हणजेच डिजिटल, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक युद्धाचा वापर सुरू झाला आहे. हे युद्ध रणभूमीवर नाही, तर मानवी मनाच्या स्क्रीनवर लढले जाते.
आज गुगल, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सर्व प्रमुख डिजिटल माध्यमांची मालकी अमेरिकन कंपन्यांकडे आहे. परदेशात बसून एखादी व्यक्ती राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील पोस्ट टाकते; सोशल मीडियाचे अल्गोरिदम मानवी राग व असंतोष या भावनांचा गैरफायदा घेऊन ती पोस्ट व्हायरल करतात. त्यानंतर 'बॉट नेटवर्क्स' आणि बनावट खाती वापरून ती कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवली जाते. परिणामी समाजात तीव्र असंतोष निर्माण होतो आणि रस्त्यावर उतरवून राजकीय उलथापालथ आणि औध्योगिक क्षेत्रात हिंसा घडवणे सोपे होते.
बॉट नेटवर्क्स म्हणजे काय?
बॉट नेटवर्क म्हणजे डिजिटल जगातील एक संघटित आणि छुपा रोबोटिक फौजफाटा. हजारो बनावट सोशल मीडिया खाती मानवी हस्तक्षेपाशिवाय, केंद्रीय कम्प्युटर कोडद्वारे एकत्र चालवली जातात. त्याला 'बॉटनेट' म्हणतात. दिसायला ही खाती अगदी खऱ्या माणसांसारखी वाटतात, परंतु त्यांचा खरा उद्देश खोट्या बातम्या काही मिनिटांत व्हायरल करणे, खोटे जनमत तयार करणे आणि अंतर्गत असंतोष भडकवणे हा असतो.
नोएडा हिंसाचार — एप्रिल २०२६
भारताचे प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या गौतम बुद्ध नगर परिसरात (नोएडा, ग्रेटर नोएडा, दादरी, ) सुमारे ६०,००० MSMEs कार्यरत आहेत. . लाखो कामगार इथल्या औध्योगिक क्षेत्रात काम करतात. त्यामुळे हे क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत संवेदनशील आहे. गौतम बुद्ध नगर (नोएडा, ग्रेटर नोएडा) हे केवळ उत्तर प्रदेशचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या जिल्ह्याचा GDP तब्बल ₹२.६४ लाख कोटी एवढा होता, जो उत्तर प्रदेशच्या एकूण GSDP च्या १०.३०% आहे येथील दरडोई उत्पन्न ₹१०.१७ लाख आहे क्रयशक्ती समतुल्यतेच्या (PPP) आधारावर जपानशी तुलना करण्याजोगे आहे. भारताच्या एकूण GDP (सुमारे ₹२९६ लाख कोटी) च्या तुलनेत हा एकटा जिल्हा सुमारे ०.९% योगदान देतो २०२३ च्या Global Investors Summit मध्ये उत्तर प्रदेशला मिळालेल्या ₹३५ लाख कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांपैकी सुमारे एक पंचमांश (२०%) वाटा एकट्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्याला मिळाला होता. थोडक्यात, हा जिल्हा अस्थिर झाल्यास केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसू शकतो. सरकारने दादरीतून दोन्ही डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DFC) सुरू केले याचे मुख्य कारण हेच.
हरियाणाने किमान वेतन वाढवल्यानंतर उत्तर प्रदेशातील कामगार संघटनांनी तीच मागणी केली. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्याशी चर्चा सुरू केली होती. BMS, CITU सह कोणत्याही मान्यताप्राप्त संघटनेने संपाची नोटीस दिली नाही किंवा रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले नाही. तरीही एप्रिल २०२६ मध्ये अचानक हिंसक आंदोलन उसळले.
८० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी कारखान्यांवर दगडफेक, आगजनी आणि तोडफोड झाली. देशाचे सुमारे ३,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. नोएडा पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली:
हिंसाचार करणारे लोक हे मूळचे कारखान्यातील कामगार नव्हते. त्यांना बाहेरून आणण्यात आले होते.
'बिगुल मजदूर दस्ता' या डाव्या विचारसरणीच्या संघटनेचा मुख्य सूत्रधार सत्यम वर्मा याच्या बँक खात्यात परदेशातून डॉलर, पाउंड आणि युरोमध्ये १ कोटींहून अधिक रक्कम थेट जमा झाली होती. हा पैसा तातडीने इतर खात्यांमध्ये वळवून हिंसेसाठी वापरला गेला.
५० हून अधिक सोशल मीडिया हँडल्स (व्हॉट्सअप, QR कोड इ.) द्वारे अफवा पसरवणे व हिंसाचाराला उत्तेजन देणे यासाठी संघटित प्रयत्न झाले.
उत्तर प्रदेश सरकारने या परकीय षड्यंत्राची गंभीर दखल घेत मुख्य आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कठोर कारवाई केली. पोलिसांनी संयम दाखवला; कुठेही गोळीबार केला नाही. बहुतांश स्थानिक कामगार या आंदोलनापासून दूर राहिले, त्यामुळे हे षड्यंत्र असफल ठरले. जर काही लाख कामगार खरोखरच भडकले असते, तर परिस्थिती अकल्पनीय झाली असती.
उपाययोजना: भारताने काय करायला हवे?
सोशल मीडिया कंपन्यांवर (Facebook, X, Instagram) कठोर नियंत्रण आणून त्यांच्या अल्गोरिदममध्ये पारदर्शकता बंधनकारक करणे, जेणेकरून द्वेषमूलक व उत्तेजक मजकूर कृत्रिमरीत्या व्हायरल होणार नाही.
परदेशातून नियंत्रित बॉट नेटवर्क्स आणि बनावट खाती तातडीने ब्लॉक करणारी यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवणे.
सायबर आणि डिजिटल सुरक्षेचे कायदे अत्यंत कडक करणे; परदेशी निधी प्रवाहांवर कडक नजर ठेवणे.
कोणत्याही अफवेचे खंडन काही मिनिटांत करण्यासाठी सक्षम 'फॅक्ट-चेक युनिट' स्थापन करणे.
शालेय स्तरापासूनच 'डिजिटल साक्षरता' आणि 'सायबर मानसशास्त्र' यांचे शिक्षण देणे, जेणेकरून तरुण पिढी सोशल मीडियावरील माहितीकडे चिकित्सक नजरेने पाहू शकेल.
जेव्हा देशाचे नागरिक डिजिटलदृष्ट्या जागरूक असतील, तेव्हाच परदेशी भूमीवरून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे छुपे अजेंडे पूर्णपणे अपयशी ठरतील. नोएडा हिंसाचार हे भारतातील डिजिटल युद्धाचे एक स्पष्ट संकेत आहे. आपण वेळीच सावध झालो तर पुढचा धोका टाळता येईल.
*(बॉट नेटवर्क्सची आणि इतर माहिती एआय वरून घेतली आहे)
गौतमबुद्धनगर पुलिस कमिश्नरेट…
गौतमबुद्धनगर पुलिस कमिश्नरेट ने 13 मई 2025 को नोएडा के 13 अप्रैल के हिंसक श्रमिक प्रदर्शन मामले में कड़ी कार्रवाई करते हुए दो आरोपियों — सत्यम वर्मा और आकृति — पर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए) लगाया है। पुलिस जांच में सामने आया कि दोनों ने प्रदर्शन को हिंसक रूप देने, भीड़ को भड़काने और सार्वजनिक व्यवस्था बिगाड़ने में अहम भूमिका निभाई थी। ही बातमी दैनिक जागरण सहित अनेक वर्तमान पत्रांत आहे। दोन उदाहरण https://www.jagran.com/uttar-pradesh/noida-noida-protest-satyam-verma-a…
https://www.timesnowhindi.com/cities/noida-police-invokes-nsa-against-s…
मी वरील सर्व माहिती एआय वर तपासून टाकली आहे. व्हाट्स अप च्या बाबतीत ही या शिवाय वर्तमान पत्रातील बातम्या ही आहेत. व्हाट्सअप इत्यादि बातम्या वर्तमान पत्रांत आणि चॅनल वर ही आलेल्या आहेत. एनडीटीव्ही लिंक https://ndtv.in/india/noida-violence-case-shocking-revelations-in-up-po…. बाकी बीबीसी इत्यादि तर भारताबाबत नेहमीच खोट्या बातम्या देणारी न्यूज एजेंसी आहे. तिच्या बाबतीत मी काही बोलत नाही. बीबीसी कोवेरेज जेमिनी आई वरुन BBC (बीबीसी): बीबीसी के ग्राउंड रिपोर्टर्स ने इस पर काफी विस्तृत कवरेज की थी। BBC Hindi और BBC Punjabi ने नोएडा के औद्योगिक इलाकों में जाकर ग्राउंड रिपोर्टिंग की। उन्होंने दिखाया कि कैसे न्यूनतम वेतन बढ़ाने और वर्किंग कंडीशन सुधारने की मांग को लेकर करीब 40,000 फैक्ट्री वर्कर्स सड़कों पर उतरे, जिसके बाद पथराव और आगजनी हुई। बीबीसी ने पुलिस द्वारा गिरफ्तार किए गए मजदूरों के परेशान परिवारों और उनके रहने के हालातों पर भी भावुक ग्राउंड रिपोर्ट्स दिखाईं।
CNN (सीएनएन): उनके भारतीय सहयोगी चैनल CNN-News18 ने इस खबर को बहुत प्रमुखता से दिखाया था। सीएनएन-न्यूज18 ने विरोध प्रदर्शन के हिंसक होने, गाड़ियां फूंके जाने, पुलिस द्वारा आंसू गैस के गोले छोड़े जाने और इसके पीछे व्हाट्सएप ग्रुप्स के जरिए भीड़ जुटाने की पुलिसिया तफ्तीश (साजिश की आशंका) से जुड़े हर लाइव अपडेट्स को लगातार ब्रॉडकास्ट किया था।
ही माहिती क्लाउड AI वरुन घेतलेली…
ही माहिती क्लाउड AI वरुन घेतलेली… 13 मई 2026 को उत्तर प्रदेश पुलिस ने सत्यम वर्मा और आकृति चौधरी पर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) लगाया, जो नोएडा में 13 अप्रैल को हुए हिंसक श्रमिक प्रदर्शन से जुड़ा मामला है। TheQuint
पुलिस ने दोनों को "मजदूर बिगुल दस्ता" का सक्रिय सदस्य बताया है, और आरोप लगाया कि उन्होंने भीड़ को भड़काने और अराजकता फैलाने में भूमिका निभाई। Deshbandhu
13 अप्रैल को प्रदर्शन के दौरान 100 से अधिक फैक्ट्रियों में तोड़फोड़, वाहनों में आगजनी और पुलिसकर्मियों को चोटें आईं। 350 से ज्यादा लोग गिरफ्तार हुए। सुप्रीम कोर्ट तक पहुंचा मामला: सुप्रीम कोर्ट ने सत्यम वर्मा की पत्नी की याचिका पर उत्तर प्रदेश सरकार को नोटिस जारी किया है, हालांकि अंतरिम राहत देने से इनकार कर दिया। Scroll
bbc news you tube video https://www.bing.com/videos/riverview/relatedvideo?q=noida+protest+cove…
bbc वर ही बातमी आहे. व्हाट्स आप ग्रुप उल्लेख आहे.
8 एप्रिलला सौ. चे ब्रेस्ट कॅन्सरचे ऑपरेशन यथार्थ हॉस्पिटल मध्ये होते. आजकाल मी GR नोइडात राहतो. 5 तारखेपासून विभिन्न चाचण्यांसाठी हॉस्पिटल मध्ये होती. 8 तारखेला सकाळी 8 वाजता हॉस्पिटल मध्ये पोहचलो. बाहेर 50-60 कर्मचारी (कोण्ट्रेक्ट कर्मचारी, अधिकान्श चतुर्थश्रेणी) नारेबाजी करत होते. कारण कुणालाच माहीत नाही. मला वाटले आज ऑपरेशन होईल की नाही. पण झाले. 9 तारखेला सर्व सामान्य होते. कर्मचार्यांशी चर्चा करताना कळले काल अनेक अफवा पसरल्या होत्या. ओवर टाइम ठेकेदाराने कापले, ईपीएफ ट्रान्सफर झाले नाही. हॉस्पिटल ने अनेक कर्मचार्यंच्या विरोधात तक्रारी केल्या. त्यांना काढण्यात येणार आहे, ओवर टाइमचा रिकोर्ड हॉस्पिटलने पाठविलेला नाही. इत्यादि. हॉस्पिटल कर्मचार्यांशी समजूत घालताना 8 तारखेचा अर्धा दिवस गेला. शा आशयाच्या अफवा संपूर्ण औद्योगिक भागात पसरल्या होत्या. हे एका रीतीने भारताविरुद्ध युद्धच होते. सौची rediation थेरेपी ही पूर्ण झाली आहे. अजून आणिक टेस्ट झाल्या आहेत. त्यावरून पुढील उपचार ठरणार. किमियोची गरज नाही. तिची प्रकृती ठीक आहे.
बाकी प्रतिसाद देणार्याने पूर्ण माहिती घेतली पाहिजे.
?
सौची rediation थेरेपी ही पूर्ण झाली आहे. अजून आणिक टेस्ट झाल्या आहेत. त्यावरून पुढील उपचार ठरणार. किमियोची गरज नाही. तिची प्रकृती ठीक आहे.
तुमच्या सौं.च्या प्रकृतीचा (देव बरे करो, परंतु) या सगळ्याशी नक्की संबंध काय?
नाही म्हणजे, त्यांचे ‘स्वास्थ्य बुलेटिन’ नक्की काय सिद्ध करण्यासाठी प्रसारित केलेले आहे?
की, तुमच्या लिखाणाप्रति सहानुभूती मिळविण्यासाठी हा असंबद्ध मुद्दा (अतिशय तपशीलवार!) घुसडलेला आहे?
(छ्याः! ही मंडळी कोठल्या थराला जातील, सांगवत नाही बुवा!)
अगदी किरकोळ गोष्ट aaahe
अगदी किरकोळ गोष्ट आहे अगदी कोणाला पण समजेल.. Ai आनी समाज माध्यम च वापर कसा चुकी च केला जातो हे जे लेखक नी वर्णन केले आहे ते अगदी योग्य आहे पण noida मधील कर्मचाऱ्यां नी जो अन्याय विरुद्ध आवाज उठवला त्याला लागू होत नही.
बाकी ai आणि समाज माध्यमावर एक propoganda चालवायचं काम आपले राजकारणी उत्तम करतात. सत्तेत असतात ते जास्त त्या मध्ये पुढे असतात.
कर्मचाऱ्यांन च शोषण होते अगदी 8 हजारात 12 तास राबवले जाते, तो पगार पण वेळेवर मिळत नाही हे सत्य आहे. हि reality नाकारणे साफ चूक आहे. अगदी निपक्ष संस्थे कडून सर्व्हे केला तर हे सत्य 99 टक्के खरे आहे सहज सिद्ध होईल
ह्या काही वर्षात एक पॅटर्न फिक्स झाला आहे. सरकार धोरण विरुद्ध लोकांनी आंदोलन केले की.
1) ह्या आंदोलन ला शत्रू राष्ट कडून funding आहे.
2) आंदोलन करणारे देश विरोधी आहेत.
3) देशद्रोही च आहेत.
असा प्रचार it सेल सर्व माध्यम मधून करते.
Kissan आंदोलन वेळी पण same तोच पॅटर्न होता.
आता महागाई विरोधी आंदोलन झाले तरी तोच पॅटर्न हि लोक वापरणार...
फॅक्ट चेकिंग
एआय वापरून या लेखाची पडताळणी केली असता खालील माहिती मिळाली. आपण याच पद्धतीने चिथावणीखोर आणि तथ्य नसलेले लिखाण इतरत्र करायला समर्थ आहात. इथे मात्र ते आणू नये. अन्यथा कारवाई केली जाईल.
✅ सारांश: काय पडताळता येते आणि काय नाही
थोडक्यात:
लेखात केलेले अनेक दावे — विशेषतः
याबाबत विश्वसनीय सार्वजनिक पुरावे उपलब्ध नाहीत.
लेखातील बरीच माहिती अपुराव्यांवर आधारित किंवा राजकीय स्वरूपाची वाटते.
🔍 मुख्य दाव्यांची तथ्य‑तपासणी
1️⃣ दावा: “दंगेखोर कामगार नव्हते; त्यांना बाहेरून आणले होते.”
✔ विश्वसनीय स्रोतांमध्ये काय उपलब्ध आहे
भारतामधील प्रमुख वृत्तपत्रे किंवा पोलिसांचे अधिकृत निवेदन कुठेही हे पुष्टी करत नाहीत की:
हे दावे खालील विश्वसनीय माध्यमांमध्ये दिसत नाहीत:
इतक्या मोठ्या प्रमाणावर समन्वित दंगल झाली असती तर राष्ट्रीय पातळीवर मोठे कव्हरेज मिळाले असते.
❗निर्णय:
अपुराव्यांवर आधारित.
लेखातील दावा विश्वसनीय पुराव्यांनी समर्थित नाही.
2️⃣ दावा: “सत्यम वर्मा नावाच्या व्यक्तीला परदेशातून १ कोटी रुपये मिळाले आणि त्याने हिंसा भडकवली.”
✔ उपलब्ध माहिती
मी तपासले:
यापैकी कुठेही खालील गोष्टींचा पुरावा नाही:
“Bigul Mazdoor Dasta” हा एक छोटा डाव्या विचारांचा मजूर गट आहे, पण त्यांचा परदेशी निधी किंवा दंगल यांच्याशी संबंध असल्याचे कोणतेही विश्वसनीय वृत्त नाही.
❗निर्णय:
कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
दावा अतिशयोक्त, राजकीय किंवा अप्रमाणित वाटतो.
3️⃣ दावा: “५०+ सोशल मीडिया हँडल्स, बॉट नेटवर्क्स, QR कोड्स वापरून अफवा पसरवल्या.”
✔ उपलब्ध माहिती
सायबर‑फॉरेन्सिक अहवाल, CERT‑In बुलेटिन, UP पोलिस सायबर सेलचे निवेदन — कुठेही अशा नेटवर्कचा उल्लेख नाही.
❗निर्णय:
अपुराव्यांवर आधारित.
4️⃣ दावा: “मुख्य आरोपीवर NSA लावण्यात आला.”
✔ उपलब्ध माहिती
UP मध्ये NSA कधी कधी वापरला जातो, पण:
❗निर्णय:
अपुराव्यांवर आधारित.
🧭 एकूण मूल्यांकन
लेखात:
यांचा वापर केला आहे, पण
व्यक्ती, निधी, कटकारस्थान, पोलिस तपास याबाबतचे दावे पुराव्यांशिवाय आहेत.
लेख मतप्रधान किंवा राजकीय कथनासारखा वाटतो, तथ्याधारित रिपोर्टिंगसारखा नाही.
🛑 महत्त्वाची सूचना
राजकीय दावे, विशेषतः “परदेशी निधी”, “कटकारस्थान”, “दंगल घडवणे” यांसारखे आरोप —
नेहमी विश्वसनीय, स्वतंत्र स्रोतांमधून तपासूनच स्वीकारावेत.
👉 तुला हवे असल्यास मी पुढे हेही करू शकतो:
फक्त सांग — तुला किती खोलात जायचे आहे.