संकेतस्थळास शुभेच्छा
संकेतस्थळ सुरू झाल्याचे संस्थापकांपैकी एकाने निरोपाद्वारे कळवले. हा निरोप अनेकांना एकाचवेळी पाठवण्यात आला होता. त्यातील अनेकांनी 'रिप्लाय ऑल' वापरून प्रतिनिरोप पाठवले. त्यातील काही संकेतस्थळाला शुभेच्छा, पहिले पान चांगले आहे, रंगसंगती आवडली अशा प्रकारचे आहेत. तशा सर्व निरोपांसाठी (म्हणजे सारखे फोनवर नोटिफिकेशन वाजू नये म्हणून) हा धागा काढला आहे. आपल्या शुभेच्छा नव्या संकेतस्थळावर प्रतिक्रिया नोंदवून द्या. इमेलखोक्यांचा वापर टाळा.
नवीन संकेतस्थळास हार्दीक शुभेच्छा!
शुभेच्छा
मला असा काही निरोप आलेला नाही. पण संस्थापक सदस्यापैकी एकाकडून अन्य संस्थळावरील विरोपातून झालेल्या आदानप्रदान माध्यमातून 'ऐसीअक्षरे' कार्यरत झाल्याचे समजले. त्याचा साहजिकच आनंद होऊन लागलीच सदस्यत्व घेतले आहे. जसजसा कालावधी पुढे जाईल तसतसे संस्थळाच्या सुविधांचाही सर्व सदस्यांकडून लेखाजोखा घेतला जाईलच. याक्षणी फार प्रसन्न वाटत आहे.
सुंदर सादरीकरण आणि संस्थळाचे नावही सुरेख आहे. शुभेच्छा तर आहेतच आहेत, शिवाय अॅक्टिव्ह पार्टिसिपेशनही सातत्याने राहील असाही विश्वास वाटतो हेही सांगत आहे.
अशोक पाटील
तशा सर्व निरोपांसाठी (म्हणजे
तशा सर्व निरोपांसाठी (म्हणजे सारखे फोनवर नोटिफिकेशन वाजू नये म्हणून) हा धागा काढला आहे.
आपल्याकडे स्मार्टफोन आहे हे दाखवण्याच क्षीण प्रयत्न!! :)
इमेलखोक्यांचा वापर टाळा.
अहो, त्या गूगलवाल्यांनी इतकं मोठं संस्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे तर का त्याचा वापर करू नये म्हणतो मी? इथे संस्थळाच्या ब्यांडविड्थेसाठी दिडक्या मोजाव्या लागतात हे विसरू नये. ;)
आणि तुम्हाला या संस्थळाबाबत खरोखरच आस्था वाटत असेल तर तुम्ही या संस्थळावर नवीन प्रतिसाद आला की तुमच्या त्या स्मार्टफोनात नोटिफिकेशन वाजेल अशी सोय करून घ्याल. तसं करण्याबद्दल कर्माचे बोनस पॉइंट्स मिळतात हे ठाऊक नाही का तुम्हाला? :)
शुभेच्छा आणि अपेक्षा!
संकेतस्थळाला शुभेच्छा!
पण आता तेच तेच वाचून कंटाळा येतो.
आपल्या ब्लॉगावरचे लेखन उचलून एखाद्याच मराठी संस्थळावर चिकटवले तर ठिक.
पण लोक एकच लेख पाडून सगळ्या संस्थळावर जाऊन चिकटवत बसतात. जुने जाणते पण याला अपवद नाहीत.
इथे सुद्धा इकडे तिकडे चिकटवलेले लेख आणून थापलेले दिसतायत.
कुठलेही संस्थळ उघडा त्यात त्याच त्या आयडींचे तेच ते लेख.
इथे काही खास वाचायला मिळेल ही अपेक्षा.
इथे प्रकाशित होणारे लेखन इतरत्र कुठे वाचयला मिळणार नसेल तरच इथे यायला मज्जा वाटेल.
तीच ती कढी वेगवेगळ्या चुलींवर तापवून खाल्ली तर शेवटी चांगली लागेल का?
जसे दुसर्याचे लिखाण चिकटवू नये असे बंधन आहे ,तसेच इतर ठिकाणचे स्वतःचेच लिखाणही कॉपी पेस्ट करून डकवू नये असा नियम करता येणार नाही का?
आजच्याच नविन लेखनातील किमान पाच लेख हे अशा प्रकारे बहुस्थळपोस्टीय आहेत. वैताग आहे नुसता. की कमालीचे कल्पनादारीद्र्य मराठी जाललेखकांचे?
मी सहमत आहे
पण लोक एकच लेख पाडून सगळ्या संस्थळावर जाऊन चिकटवत बसतात. जुने जाणते पण याला अपवद नाहीत.
इथे सुद्धा इकडे तिकडे चिकटवलेले लेख आणून थापलेले दिसतायत.
कुठलेही संस्थळ उघडा त्यात त्याच त्या आयडींचे तेच ते लेख.
सातीच्या प्रतिसादाशी १००% सहमत आहे. मराठी संकेतस्थळांवर वावरणारे लोक मोजकेच आहेत. सर्वत्र एकच एक सारखे लेख पाहून वैताग येतो. प्रतिसादही कॉपीपेस्ट करून लावावे अशी लोकांची इच्छा नसावी असे समजते.
परंतु अशा लेखांनी संकेतस्थळाला बॅक-अपसाइटचे स्वरूप येऊ शकते. ते अयोग्य वाटते.
इतर ठिकाणचे स्वतःचेच लिखाणही कॉपी पेस्ट करून डकवू नये असा नियम करता येणार नाही का?
या तोच तोचपणाचा कंटाळा येतो. सदर संकेतस्थळाच्या चालकांनी याबाबत काही धोरण बनवावे.
वेल...
'एका नवीन देवस्थानाचा जन्म' ही व्यंकटेश माडगूळकरांची कथा वाचाच. तुमचा प्रतिसाद मार्मीक आहे. पण मानवी वृत्ती, विचार आणि कृती समजून घेत नाही. त्या कथेच्या परीक्षणात सन्जोप राव म्हणतात, "तेच ते भाविक, तोच तो घंटानाद, तोच मारुती आणि तोच शेंदूर....देऊळ बदलले म्हणून काय?" ते हेच आहे. त्यावर राजेश घासकडवींना विंदांची 'तेच ते आणि तेच ते' अशी कविताही आठवली. पुरेशी बोलकी आहे ती.
एकच लेख इकडे आणि तिकडे याविषयीचा मुद्दा माझ्यापुरता पटला. यापुढे काही विशिष्ट साहित्य सर्वत्र (त्यामागे तसा हेतू आहे) आणि काही विशिष्ट साहित्य अनन्यतेच्या न्यायाने एकावेळी एकाच ठिकाणी, असा निर्णय आजच दुपारी घेतला आहे. तेव्हा माझ्यापुरती तुमची सुटका करतो. :)
आता काही मते अशीतशीच - हे खुले माध्यम आहे. अजून आवश्यक तितके मोठे (किंवा प्रगल्भ - म्हणजे काय हे इथल्यापेक्षा इतरत्र वाचता येईल) झालेले नाही. वाचकांची पत्रे लिहिण्याचीच क्षमता असणारी असंख्य मंडळी या माध्यमामुळे लेखक (काही लेखकरावही) झाली आहेत. वाचकाची पत्रे जशी इकडून तिकडे जात असतात, तसे हेही लेखन जात राहील, अजून काही काळ. लेखनाची अनन्यता जपायची झाली तर सध्याच्या संस्थळीय लॉयल्टीच्या पलीकडे विचार करावा लागेल. ते सध्या तरी शक्य नाही. कारण तसेही अजून आपण सारे मुक्ततेच्या सोसातच अडकलेलो आहोत. असे मुक्त संस्थळ उभे करीन, जिथं मजबूत जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवेन आणि लेखकांनाही पैसे देऊन अनन्य साध्य करेन, असा संपत्ती निर्माणाचा ध्यास लागत नाही तोवर या सोसावर काम भागवावे लागणारच. :)
आणखी एक - इतके लेखन शक्य आहे? सगळं गणीत केलं तरी, डोक्यावर पाणी दीडेकशे आयडी सक्रियतेने लेखन करतात. महिन्यातील उच्चतम सरासरी हजार आयडींची असेल जे प्रतिसाद वगैरे माध्यमातून सक्रिय असतात. इतक्या लोकांसाठी आजच किमान दहा ते बारा संस्थळे उपलब्ध आहेत. उभ्या महाराष्ट्रात मुख्य प्रवाहात चार वृत्तपत्रेच साखळी स्वरूपात चालतात. बाकी वृत्तपत्रे सुभ्यांची मुख्य आहेत. अजूनही संस्थळांची संख्याही वाढावी अशा प्रार्थना मराठीजन करत आहेतच. आपणही एकाचवेळी अनेक संस्थळांचे सदस्य होत असतोच. टोपणनावांचा विचारच करू नये. आता असे झाले की किती स्थळांवर अनन्य लेखन येऊ शकेल? इकडे कल्पना चित्रे, आणि तिकडे चित्रा काल्पनिक असे झाले की, लिहिणाऱ्यालाही वाटणारच की, कल्पनालाही वाचू देऊ आणि चित्रालाही वाचू देऊ.
तर... हे असे काही काळ चालणारच.
आता हे वाचून काही प्रगल्भ मंडळी मला मी शहाणपंती कसे लिहितोय हे बोलू लागतील. मग ते वाचण्यासाठी मला तिकडं जावं लागेल. घरात फुकट येत असेल तर सहा-सात पेपर मला हवेच आहेत. ;)
थोडासा असहमत.
वेगवेगळ्या संस्थळावर बहुसंख्य सदस्य तेच असले तरी सगळे सदस्य सगळीकडेच आहेत असे नाही. माझेच उदाहरण द्यायचे तर पाच सहा संस्थळांपैकी मी दोन ते तिन स्थळांवर असतो. लेख देताना लेखाचा स्वभाव पाहून कोणत्या स्थळांवर द्यायचा हे लेखकाने ठरवावे असे मला वाटते. सर्वच स्थळांवर देण्यापेक्षा लेख आणी स्थळाच्या स्वभावाची जिथे जिथे जोडी चांगली जमेल तिथे तिथे तो द्यावा.
एक लेख अनेक संस्थळे
साती, प्रियाली आणि श्रावण मोडक ~
या तीन सदस्यांनी 'एकच लेख अनेक संस्थळावर पोस्ट' करण्याच्या प्रवृत्तीवर लिहिले आहे ते योग्य-अयोग्य याचा निर्णय त्या त्या स्थळावे मॉडरेटर्स ठरवितील, एखादी पॉलिसीदेखाल त्या संदर्भात जाहीर करता येईल.
मी माझ्या केसपुरते लिहितो. खरे सांगायचे झाल्यास साती आणि प्रियाली म्हणतात त्या मतांशी मीही काही प्रमाणात सहमत आहे. पण मी ज्यावेळी 'पोएट्री' हा लेख इथे पोस्ट केला (माझ्या स्वतःचा ब्लॉग कधी नव्हता, आजही नाही त्यामुळे तिथून जुनेपुराणे मटेरिअल उचलून संस्थळावर कॉपीपेस्ट करण्याचा माझ्याबाबतीत प्रसंग उदभवत नाही.) नेमक्या त्यावेळी 'उपक्रम' वरील एक जालीय स्नेही श्री.धम्मकलाडू यानी श्री.मुक्तसुनीत यांच्या 'ऐसी अक्षरे' प्रतिसादाला उत्तर देताना 'मी तिथले सभासदत्व घेतलेले नाही, पण इतरांना सुचविले आहे' अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला. श्री. ध.ला. यांच्यासारखेच आणखीन् काही तिथले सदस्य असतील ज्यानी ऐसी अक्षरेचे आवाहन तर वाचलेले आहे पण सदस्यत्वापासून लांब राहिलेले दिसतात. तीच गोष्ट 'मी मराठी' या संस्थळाचीही. तिथेही माझे काही साहित्यप्रेमी मित्र आहेत जे इथले सदस्य नाहीत. मग या दोन संस्थळावरील मी ज्याना स्नेही समजतो व जे साहित्यातील घडामोडीवर प्रेम करतात त्यानीही 'पोएट्री' च्या १०० वर्षाच्या वाटचालीवर लिहिलेले मोडकेतोडके वाचावे असे मला वाटले तर माझ्यासमोर एकच पर्याय म्हणजे तो लेख परिचयाच्या संस्थळावर एकाच वेळी प्रसिद्ध करणे. जालीय संस्थळावर लेखन करणार्यांना कसलाही आर्थिक लाभ होत नसतो हे तर उघडच आहे; त्यामुळे त्यादृष्टीनेही नैतिकतेचा मुद्दा उभा राहू शकत नाही. त्यातही अशा लेखांचे आयुष्यही अत्यल्प असल्याने एकदा का तो दुसर्या पानावर गेला की मग त्याची आठवणही कुणाला राहात नाही.
~ असे असले तरी वरील तिन्ही प्रतिसादकांचे मुद्दे पटले असल्याने माझ्यापुरता मी निर्णय घेतो की, यापुढे या संस्थळावर पोस्ट केलेला लेख अन्य संस्थळावर मी प्रसिद्ध करणार नाही.... अॅण्ड व्हाईस-व्हर्सा !
अशोक पाटील
गैरसमज
नेमक्या त्यावेळी 'उपक्रम' वरील एक जालीय स्नेही श्री.धम्मकलाडू यानी श्री.मुक्तसुनीत यांच्या 'ऐसी अक्षरे' प्रतिसादाला उत्तर देताना 'मी तिथले सभासदत्व घेतलेले नाही, पण इतरांना सुचविले आहे' अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला. श्री. ध.ला. यांच्यासारखेच आणखीन् काही तिथले सदस्य असतील ज्यानी ऐसी अक्षरेचे आवाहन तर वाचलेले आहे पण सदस्यत्वापासून लांब राहिलेले दिसतात.
इथे तुमचा थोडासा गैरसमज झालेला आहे असे नमूद करेन. :-) बाकी जाहीर बोलणे बरे दिसत नाही.
हार्दिक शुभेच्छा!
संस्थळाला आणि प्रवर्तकाना हार्दिक शुभेच्छा!!