Skip to main content

भिंतीवरचे लेखन

भिंतीला रंग दिला की
अचानक
बांधलेल कुंपण
काढून टाकल्यासारख ,
मोकळ वाटत इतरांना
आता परत तिथे खरडता येईल, या आनंदाने

तस झालय
(तुझ्या फेसबुक वॉलवर लिहिता येत ते पाहून..)

पण काहीच करणार नाही..
खाजगी आणि सावर्जनिक - दोन्हीची किंमत कळते मला
मनातल्या मनात
अनेक स्वप्नात रंग भरते मी

इतरांकरता असते माझी अदृश्य शाई,
मला दिसतो तुझ्या भिंतीवरचा (इनविसिबल) ग्लू
बघ
तुझ्या डोळ्यातली मिश्कील छटा
अजूनही तशीच आहे!

क्षिप्रा Tue, 08/11/2011 - 07:05

सुवर्णमयी, कविता आवडली.
शेवट विशेष आवडला :)

राजेश घासकडवी Thu, 10/11/2011 - 05:11

शेवटचं कडवं साधारण कळलं, पण पहिली दोन जुळवायला थोडा त्रास झाला. भिंत, कुंपण, वॉल एकमेकांत थोडे गुंतलेले आहेत. पुन्हा समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

नंदन Thu, 10/11/2011 - 06:59

आवडली, खासकरून शेवट. काहीशा निराळ्या संदर्भात फ्रॉस्टची मेन्डिंग वॉल आठवली.

He only says, 'Good fences make good neighbors'.
Spring is the mischief in me...