जादूटोणा विधेयक आणि वारकरी

आषाढीची वारी चालू असल्यामुळे सध्या वारीविषयीच्या बातम्यांचा सुकाळ आहे. धर्म-जातिभेद वगैरे विसरून वारकरी कसे वारीत सामील होतात, आय.टी.तले लोक कसे दिंडी काढतात वगैरे बातम्यादेखील त्यामुळे फोफावल्या आहेत. पण ह्याच काळात जादूटोणाविरोधातल्या सरकारी विधेयकाला विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्थान मिळेल ह्याची शक्यता नाहीशी झाली आहे, आणि त्यामागे वारकरी मंडळींपैकी एक लॉबी कार्यरत आहे. ह्या लॉबीनं वारी अडवून सरकारला वेठीला धरलं, तर विधेयकाला विरोध करणारे खरे वारकरी नव्हेत असं तुकारामाचे वंशज सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे. त्यासंबंधी बातम्यांचे दुवे :

जादूटोणा: वारक-यांत दोन गट
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकातील आणखी दोन कलम छाटले!
जादूटोणाविरोधी कायद्याच्या कालहरणाबाबत 'काळी पत्रिका'

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

दिव्य मराठीतल्या बातमीत म्हटलं आहे:
वारक-यांशी चर्चा न करता सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा घाट घातला आहे. शासनाने कायद्याचा मसूदा अद्यापही वारक-यांना दिलेला नाही, ही घोर फसवणूक आहे. या कायद्यात वारक-यांना त्रासदायक ठरणारी कलमे आहेत. त्यामुळे आमचा पूर्णत: विरोध आहे.
प्रहारमधेही अशाच अर्थाचं वाक्य आहे.

या कायद्याचा मसूदा वारकर्‍यांकडे नसताना या कायद्यात वारकर्‍यांना त्रासदायक ठरणारी कलमं आहेत, असा उल्लेख आहे. त्यातली नक्की तक्रार समजली नाही. दुसरीकडे लोकसत्तामधल्या बातमीनुसार विधेयकातली दोन कलमं वारकर्‍यांच्या विरोधामुळे कमी केलेली आहेत. मसूदा उपलब्ध करून दिलेला नसताना वारकर्‍यांना हे कसं समजलं?

वारकर्‍यांच्या मागणीपैकी या दोन मागण्या घातक वाटतातः
१. सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य व मांस यांच्या विक्रीवर पूर्णत: बंदी घालावी. ( बाकी या मागणीतला फोलपणा राहूच देत, गुजराथमधे दीव, दमण, दादरा, नगरहवेलीतून दारू येते हे माहित नाही काय?)
२. यापुढे संत, संतसाहित्य यावर चिखलफेक करणा-यांवर कारवाई होण्यासाठी कडक कायदा करावा (अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे उच्च भूमिका एका बाजूला, मंबाजीलाही मृत्युपश्चात गुन्हेगार म्हणणार का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याला घातक हाच शब्द अभिप्रेत आहे का?
१. 'चिखलफेक' अयोग्य नाही का? अभिव्य्क्तिस्वातंत्र्य म्हणजे हे करणे का?
२. मद्य, मांस आणि देवदेव हे दोन विरुद्ध माहौल आहेत. (तसे गुजरात पोलिस दारुसहित पकडल्यावर कसे हाणतात हेही मी पाहिले. दुसर्‍यांदा माणूस तिकडे फिरकत नाही. एकदम बाजूला ठेऊन द्यायला हा कायदा बनवला नाही. शिवाय तिथे दारु किमान ४ पट महाग आहे, कष्टाने मिळते आणि चोरुनच प्यावी लागते.) समजा मांस निषिद्ध असलेल्या 'मंदिरात' विक्रीची बंदीची मागणी केली तीही फोल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होय. घातक हा शब्द विचारान्तीच वापरलेला आहे.

१. चिखलफेक आहे हे कोण ठरवणार? (जुन्या ख्रिस्ती गोष्टीनुसार, कोणी पाप केलं नाही त्याने म्हातार्‍या पापिणीला दगड मारावा.) माझं ते मत तुमची ती चिखलफेक, यातून सुटका कशी होणार? चिखलफेक शाब्दिक आहे तोवर त्यावर बंदी आणण्यामागचा तर्क काय?
अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे फक्त चिखलफेक नाही. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणून कोणी चिखलफेक केल्यास त्या व्यक्तीला तिचे शब्द चूक आहेत हे पटवून देता येणं, त्या शब्दांची जबाबदारीही घ्यायला लावणं. आनंद यादवांच्या कादंबरीच्या संदर्भात जे प्रकरण झालं ती अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर आक्रमण करणारी झुंडशाही होती.

२.

मद्य, मांस आणि देवदेव हे दोन विरुद्ध माहौल आहेत.

कधीपासून? सुमारे अठरा वर्षांपूर्वी कार्ल्याला एकवीरेसमोर बोकड कापलेला पाहिलेला आहे. सतीश वाघमारे आणि किंबहुना सर्वसुखी या प्रकारच्या देवदेवतांची, रूढींची अधिक माहिती देऊ शकतील.
पौराणिक वाङ्मयात देव, ऋषी लोकांनी मद्यपान, मांशासन केल्याचे उल्लेख आहेत. जे रामायण आमच्या संस्कृतीला फार प्यारं, त्यातला हिरो, प्रोटॅगोनिस्ट राम हा सुद्धा मांसाहारीच.

मंदिर ही बहुतेकदा खासगी जागा असते. तिथे काय विकावं, काय विकू नये हा प्रश्न तिथल्या मालकांनी घ्यावा. एखाद्या रेस्टॉरंटमधे कोकमं किंवा ट्रॅकसूट विकत नाहीत म्हणून तक्रार/आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही तसंच. अमकं गाव दारूमुक्त, मांसमुक्त करावं अशी मागणी करण्यासाठी आधी ते गाव विकत घ्यावं लागेल. नियमांनुसार हे शक्य नाहीच. शिवाय तिथे रहाणारे लोक हे वारकरी असतीलच असं नाही. त्यांच्यावर वारकर्‍यांचे/माळकर्‍यांचे नियम लादण्याचा हक्क वारकरी आणि सरकारला कोणी दिलेला आहे? विशेषतः मांस खाणे आणि मद्यपान हे देशाच्या अन्य भागांमधे कायदेशीर आहेच.

लोकं त्यांच्या घरी, खासगी जागांमधे काय खातात-पितात यामुळे ग्यानबा-तुकोबा, विठोबा नाहीतर वारकर्‍यांचा नक्की काय अपमान होतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मद्य-मांसादि मुद्द्यांबद्दल सहमत. पण

चिखलफेक शाब्दिक आहे तोवर त्यावर बंदी आणण्यामागचा तर्क काय?

याला काय अर्थ आहे? राडे करत नाही म्हणून काहीही बोलू द्या असेच ना? तसे पाहता तर मग अजितदादांनी ते फेमस विधान नुस्ते बोलूनच दाखवले होते, केले काहीच नव्हते. त्या विधानाला चिखलफेक का म्हणणार आणि त्याबद्दल त्यांचा निषेध तरी का करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... मग अजितदादांना विधानाची जबाबदारी घ्यावी लागली. धरणं भरण्यावरून लोकांनी टीका केली, निषेध केला, विनोद केले, सार्वजनिक छीथू झाली आणि या सगळ्याला अजितदादांना सामोरं जावं लागलं. येत्या निवडणूकांच्या वेळी पुन्हा कोणी हा मुद्दा काढला आणि पुन्हा अजितदादांना टार्गेट केलं तरी त्यांची सुटका होणार नाही.

ते विधान एखाद्या व्यक्तीविरोधात नव्हतं. त्यामुळे चिखलफेकच म्हणावी का याबाबतीत शंका आहे. तो फसलेला विनोद होता.

आता त्यातसुद्धा भडकाऊ भाषणं करून झुंडशाही माजवली तरीही त्या वक्तव्याची जबाबदारी घ्यावी लागेल. झुंडशाही करून, झुंडीने हिंसा केली आणि त्याचं दायित्त्व भडकाऊ विधानं करणार्‍या व्यक्तीचं आहे हे सिद्ध झालं तर कायद्यानुसार जी काही शिक्षा होईल ती भोगावी लागेल.
धर्मावरून मतं मागण्याचं भाषण केल्यामुळे बाळ ठाकरेंना मतदानाचा अधिकार (काही वर्ष?) नव्हता. ही शिक्षा न्यायालयाने केलेली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जे झालं त्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. पण तुझ्या तर्काप्रमाणे जोपर्यंत एखादी गोष्ट शाब्दिक असेल तोपर्यंत काही कोणी बोलू नये या सरणीतला विरोधाभास सांगितला, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एखादी गोष्ट शाब्दिक असेल तोपर्यंत काही कोणी बोलू नये

असं काही मी म्हटल्याचं स्मरत नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग "चिखलफेक शाब्दिक आहे तोवर त्यावर बंदी आणण्यामागचा तर्क काय?" हे काय होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बंदी आणणे आणि शाब्दिक प्रतिवाद करणे, टीका, विनोद, निषेध करणे यांच्यातला फरक समजून घेऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय. घातक हा शब्द विचारान्तीच वापरलेला आहे.
-----------वारकर्‍यांचे उद्देश घातक! आपण जर भारताच्या गृहमंत्री असता तर अतिरेक्यांच्या कारवायांना काय शब्द वापरला असता? हाच कि यापेक्षा सौम्य? वारकर्‍यांमूळे होणारे देशाचे नुकसान आणि अतिरेक्यांमुळे होणारे नुकसान यांत तुलना कशी करता येईल? 'घातांचा' जो आपण विचार 'विचार' केला आहे तो सांगाल का? म्हणजे कुणाचा कसा काय घात होईल, इ. मलाही हे एखाद्या वारकर्‍याला जाणवून द्यायची इच्छा आहे.

१. चिखलफेक आहे हे कोण ठरवणार?
--------------- चिखलफेक आहे स्वतः ठरवण्याचा अधिकार वारकर्‍यांनी मागीतला आहे का? दलितांना शिव्यांपासून कायड्याचे संरक्षण आहे. शिवी काय हे दलित ठरवतात का? उगाच कैच्या कै? तुम्हाला वारकर्‍यांचा विरोध करायचा असेल तर स्वागत आहे, पण त्याला काही मुद्दा पाहिजे.

(जुन्या ख्रिस्ती गोष्टीनुसार, कोणी पाप केलं नाही त्याने म्हातार्‍या पापिणीला दगड मारावा.)
-------witch hunt चं लॉगिक काय?

माझं ते मत तुमची ती चिखलफेक, यातून सुटका कशी होणार?
--------- वारकर्‍यांनी चिखलफेक काय ते ठरवण्याचा हक्क स्वतःकडे मागितला नाही.

चिखलफेक शाब्दिक आहे तोवर त्यावर बंदी आणण्यामागचा तर्क काय?
---------- म्हणजे तुकारामाच्या मूर्तीवर प्रत्यक्ष चिखल लावावा हे अपेक्षित आहे का? चिखलफेक अनेक स्तरांवर होते. त्यांना ज्या स्तरावर चालत नाही ते त्यांनी सांगीतले आहे. शब्दिक चिखलफेक 'कमी दर्जाची' असेल तर तुम्ही इथे अल्लावर चिखलफेकीचा एक परिच्छेद लिहून दाखवा. चिखलफेक कृतीय आहे, भौतिक आहे कि शाब्दिक आहे यापेक्षा ती किती तीव्र आहे हे महत्त्वाचं असावं. चिखलफेक शाब्दिक आहे म्हणून चालावी, हे पुन्हा कैच्या कैच.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे फक्त चिखलफेक नाही. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणून कोणी चिखलफेक केल्यास त्या व्यक्तीला तिचे शब्द चूक आहेत हे पटवून देता येणं, त्या शब्दांची जबाबदारीही घ्यायला लावणं.
-------फक्त चिखलफेक नाही? अजून सर्व प्रकारची फेक आणि मग चूक पटवणे. असे पटवण्याचा, शब्द मागे घ्यायला लावायचा 'फोरम' असला पाहिजे ना? चिखल फेकून पळून जाता येत असेल तर?

आनंद यादवांच्या कादंबरीच्या संदर्भात जे प्रकरण झालं ती अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर आक्रमण करणारी झुंडशाही होती.
---------हे असं झालं हे मान्य. व्हायला नको होतं. यादवांना कोर्टात न्यायला वारकर्‍यांना काही जागाच नव्हती. त्यांची 'चिखलफेक प्रबंधाची' मागणी पूर्ण झाली असती तर यादवांना असा प्रकार पाहायला मिळाला नसता.

२.

मद्य, मांस आणि देवदेव हे दोन विरुद्ध माहौल आहेत.

कधीपासून? सुमारे अठरा वर्षांपूर्वी कार्ल्याला एकवीरेसमोर बोकड कापलेला पाहिलेला आहे. सतीश वाघमारे आणि किंबहुना सर्वसुखी या प्रकारच्या देवदेवतांची, रूढींची अधिक माहिती देऊ शकतील.
पौराणिक वाङ्मयात देव, ऋषी लोकांनी मद्यपान, मांशासन केल्याचे उल्लेख आहेत. जे रामायण आमच्या संस्कृतीला फार प्यारं, त्यातला हिरो, प्रोटॅगोनिस्ट राम हा सुद्धा मांसाहारीच.
----------तुम्ही पुराणकालात राहता कि आता? पुराणात १० तोंडे असणारे लोक होते. आता आहेत का? आता काय भावना आहेत याला ० महत्त्व आहे का? राम खरंच होता का? निळा माणूस कधी पाहिला आहे का (except avtaar)? जगातल्या सगळ्या (अहिंसा अहिंसा म्हणणार्‍या) बुद्ध मठांत मस्त मांस मिळते. हा नियम हिंदूना का लावणार? 'आत्ता असलेल्या लोकांच्या आत्तच्या मूल्यांचा' आपल्याला का अनादर आहे?

मंदिर ही बहुतेकदा खासगी जागा असते. तिथे काय विकावं, काय विकू नये हा प्रश्न तिथल्या मालकांनी घ्यावा. एखाद्या रेस्टॉरंटमधे कोकमं किंवा ट्रॅकसूट विकत नाहीत म्हणून तक्रार/आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही तसंच. अमकं गाव दारूमुक्त, मांसमुक्त करावं अशी मागणी करण्यासाठी आधी ते गाव विकत घ्यावं लागेल.
------- कर्फ्यू लावण्यासाठी एखादा भाग सरकारला अगोदर विकत घ्यावा लागतो. मालकी हक्कांचे कायदे, प्रशासनिक कायदे वेगळे आहेत. कोण्याकोण्या गावात स्थानिक प्रशासनाने 'या गावात वाहनांना बंदी आहे' असा ultre environmentalist नियम केलेला असतो. त्यांनी ते गाव विकत घेतलेलं नसतं? इम्फाळ मधे अखंड प्रत्येकाच्या डोक्यावर पोलिसांच गन ताणलेली असते (एएफ पी एस ए) , त्यांनी काय ते गाव विकत गेतले आहे? पुन्हा कैच्या कै.

नियमांनुसार हे शक्य नाहीच. शिवाय तिथे रहाणारे लोक हे वारकरी असतीलच असं नाही. त्यांच्यावर वारकर्‍यांचे/माळकर्‍यांचे नियम लादण्याचा हक्क वारकरी आणि सरकारला कोणी दिलेला आहे? विशेषतः मांस खाणे आणि मद्यपान हे देशाच्या अन्य भागांमधे कायदेशीर आहेच.
--------गुजरात मधले justification वापरुन असे कायदे करता येतात. ती एक मागणी आहे. पण आपला पक्ष या मुद्द्यावर रास्त आहे.

लोकं त्यांच्या घरी, खासगी जागांमधे काय खातात-पितात यामुळे ग्यानबा-तुकोबा, विठोबा नाहीतर वारकर्‍यांचा नक्की काय अपमान होतो?
--------१. अन्नसंस्कार म्हणून एक प्रकार आहे. वारकर्‍यांची ती श्रद्धा आहे. २. ननरी आणि चर्चच्या सर्व बाजूंनी peripherally ब्रोथेल्स उघडा, जेणे करून प्रत्येक भाविकास त्यातूनच जावे लागेल. अशा एखाद्या ननरीचा दुवा वाचायला आवडेल. इथे ग्या, तु, वि चा उल्लेख करायची काय गरज आहे का? अपमान कुठुन आला? बरे अशा गावांत वारकरी कमी आहेत म्हणून इतरांना अडचण होईल. जिथे वारकरी मेजॉरेटी आहेत अशीही अनेक गावे आहे. तिथे स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांची अडचण करू शकतात. म्हणजे १०,००० गावांत मांसबंदी हे लोक करू शकतात. त्यांनी आपली एक मांडणी 'तीर्थक्षेत्रे' पुढे ठेवली आहे. शक्तीची भाषा न बोलाल तर परवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसादात अनेक ठिकाणी अभिनिवेश वाजवीपेक्षा जास्त आहे.

मद्यमांसाबद्दल- बोकड कापणे हे १८ वर्षे आधीच का, अजूनही चालते. आणि तीर्थक्षेत्रात मांस ब्यान असण्याबद्दल-ज्ञानेश्वर-तुकारामांच्या काळातही बॅन नव्हते, आत्ताच काय उबळ आली एकदम? हे प्रॅक्टिकल नाही हे तर सरळच आहे. आणि खाणे व देहविक्रयाची तुलना कैच्याकैच आहे.

पण चिखलफेकीच्या मुद्द्यावर सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अमका करतो ते चालतं, मग माझं का चालत नाही असा न्याय, विशेषतः तार्किकदृष्ट्या चूक वर्तन, विचारांना, लावता येत नाही. हा धागा वारकरी, अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक यांच्याबद्दल सुरू आहे. त्यातल्या साधकबाधक गोष्टींचा विचार करू या. मशीदी, मोहल्ले, चर्चचा भाग इथे काय चालतं यांचा वारकरी आणि या विधेयकाशी संबंध काय?
त्यातून वेश्यालयांचा विषय काढलाच आहात तर, वारीच्या काळात, वारीच्या मार्गात वेश्याव्यवसाय तुफान चालतो या गोष्टीला गेली काही वर्ष वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी मिळत आहे, याकडेही लक्ष वेधू इच्छिते.

मांस-मद्य विक्री वारीच्या मार्गातल्या गावांमधे चालते, तिथेही वारकरी/माळकर्‍यांवर कोणीही मद्यपान आणि मांशासनाची सक्ती करत नाही. हा प्रश्न संख्येचा नाही. अगदी १% लोकांनाही मद्यपान, मांशासन करायचं असेल तर त्यांच्या हक्कांवर, आवडींवर गदा आणणारे आपण, किंवा माळकरी किंवा सरकार कोण? त्यांच्या वर्तनाचा जोपर्यंत इतरांना त्रास होत नाही तोपयंत त्यांना जे खायचं प्यायचं आहे ते करण्यास ते स्वतंत्र नाहीत का? त्यातूनही भारतीय घटना, कायद्यानुसार प्रत्येक मनुष्य गुन्हा सिद्ध होईपर्यंत सज्जनच असतो. त्यामुळे दुसर्‍या व्यक्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा आपल्याला त्रास होत असेल तर काय त्रास होतो ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपली असते. कोणा चार मंडळींच्या मद्यपान-मांशासनामुळे तुकोबा, विठोबांचा अपमान होतच नसेल तर मग बंदीची मागणी करण्यामागचं कारणच समजत नाही.

पण फारच इच्छा असेल तर वारकरी वाटेतल्या गावांना, गावकर्‍यांना विनंती करू शकतात. ईद, गणेशोत्सव किंवा असे हिंदू-मुस्लिम सण एकाच दिवशी/काळात आले की मुस्लिमांना गायी-बकरे हलाल न करण्याची विनंती करण्याचे प्रसंग आपल्याकडे अधूनं मधून होतात. जोरजबरदस्तीने कोणालाही त्यांच्या सवयी बदलायला सांगणं हे भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाआड येईल. त्यामुळे अशा प्रकारची बंदी आणलीच तर कायद्यासमोरही किती टिकेल याबाबत शंकाच आहे.

चिखलफेकीचा मुद्दा हा थोडा 'राजापेक्षा जास्त राजनिष्ठ' प्रकारातला वाटतो. त्या मंबाजीने तुकोबांना छळलं, एकनाथांवर एक मनुष्य एकवीस वेळा थुंकला, त्यांनी या लोकांवर बंदी आणवली नाही; कायदेशीर कारवाई केली नाही. साधी टीका-निषेधसुद्धा केले नाहीत. या माणसांचा अपमान कोणी चार वाकडे शब्द काढले म्हणून होतो का आपल्याच अस्मिता दुखावतात? आपल्या श्रद्धास्थानांबद्दल कोणीतरी, काहीतरी बोलल्यामुळे अस्मिता दुखावत असतील, अपमान होत असेल तर या संतसज्जनांचं फक्त भजनं करणं एवढंच उचललं का? त्या अभंग, भजनांचा अर्थ समजलाच नाही का?

जगाचा इतिहास पाहिला, तर टीकेला विरोध करणारे लोक हुकुमशहा होते. स्टालिन, हिटलर यांच्यासारखे. वारकरी संप्रदाय आणि पर्यायाने महाराष्ट्राला त्या रांगेत बसवण्याची एवढी अहमहिका का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या बाबतीत अंनिस चे नरेंद्र दाभोळकर व काही वारकरी या दोघांच्याही काही मुलाखती वाचल्या व पाहिल्या. दाभोळकर म्हणतात, 'वारकरी कधी नवस बोलत नाही, वारकर्‍याचा कधी अंगात येत नाही, त्यामुळे वारीला विरोध ही अंनिसची भूमिका नाही' (हे दाभोळकरांचे 'पोलिटिकली करेक्ट' विधान!). वारकर्‍यांना हे विधेयक काय हेच माहिती नाही. ते म्हणतात, 'रस्ते चांगले करा, पाण्याची व्यवस्था करा, निवारा चांगला द्या..' म्हणजे कुणाचा कुणाला मेळ नाही. सरकारचे लक्ष २०१४ वर आहे. त्यामुळे खड्ड्यात का जाईनात ते वारकरी (शब्दशः!) आणि ते अंनिसवाले, सध्या सगळ्यांना मधाचे बोट लावायचे ही सरकारी भूमिका. एकूण आनंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

वारकर्‍यांना कायद्याचा मसुदा "उपलब्ध करून दिलेला नाही" याचा अर्थ समजला नाही.

कायद्याच्या मसुद्याच्या पुस्तिका घेऊन पृथ्वीराज चव्हाण पंढरपूरला गेले आहेत आणि तेथे विठोबाच्या देवळासमोर उभे राहून त्या पुस्तिका वारकर्‍यांना वाटत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रत्येक संबंधित पार्टीच्या प्रतिनिधींना कायद्याचा मसुदा दाखवला जातो. त्यांच्याशी चर्चिला जातो. अशा प्रातिनिधिक कमिट्यांमधे न निवडून आलेल्या, इतर मत असलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जाते, बरेचसे मुद्दे बदललेही जातात. जसे लोकपाल बिलाचा मसुदा अण्णा हजारे इ ना बराच अगोदर ठाउक होता. अण्णा आणि मंडळीची कितीतरी मते नव्या बिलात समाविष्ट करून घेण्यात आली.
गुजरात सरकारने गॅस वर्क्स या 'राज्य सूचितल्या' शब्दाचा भलताच अर्थ घेउन केंद्राचा कायदा राज्य सरकारने 'केला.' सर्वोच्च न्यायालयाने तो खोडला आणि नविन केंद्रिय कायदा बनवायचे ठरवले. आम्ही तेव्हा भारतातले एक व्यापारी गॅस कंसल्टंट होतो. आमच्या कंपनीनेही काही मसुद्यात बदल सांगीतले होते. आम्ही कोणीही खासदार नव्हतो.

बिलाचे परिणाम वारकर्‍यांवर आहेत. त्यांनी त्यात आपला रस वेळोवेळी सरकारकडे व्यक्त केला आहे. त्यांना 'ऐनवेळी' मसुदा दाखवणे किंवा न दाखवणे उचित नाही. त्यांचा ते उचित असा विरोध करत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सरकारला भाषेची किंचितही अक्कल असल्याचं दिसत नाही. कायदा करून अंधश्रद्धा घालवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कायदा करून सती निर्मूलन झालं. दलितांना अट्रोसिटी कायद्यामुळे न्याय मिळतो. हुंडा, बालविवाह प्रथा कमी/बंद होत आहेत. स्त्रीशिक्षण वाढीस लागलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सती, दलितांवर अन्याय, हुंडा, बालविवाह हे सगळे identifiable distinst events आहेत. त्यांचे कायदे राबवणे सोपे होते. आता माझ्या मनात जर १०० अंधश्रद्धा आहेत तर सरकार मला काय करणार याचे मला कुतुहल आहे. जर काहीच नाही तर दुसरे नाव असावे.

एक पूर्णतः वेगळा मुद्दा - अंधश्रद्ध नसण्याची अपेक्षा करून सरकार 'बुद्धी एका लेवलच्या वर' असायची रास्त नसलेली मागणी करत आहे असे वाटते. मी अंधश्रद्ध असायचा मला अधिकार हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी अंधश्रद्ध असायचा मला अधिकार हवा.

जोपर्यंत त्या अंधश्रद्धेने कुणाचे नुकसान होत नाही तोपर्यंत आणि अंधश्रद्धेतील फोलपणा दाखवल्यावर आरडाओरडा होत नाही तोपर्यंत तसा अधिकार देण्यास काहीच हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वारकरी संप्रदायाचा त्या दोन कलमांना विरोध का आहे कळत नाही. बहुधा कोणत्यातरी प्रचारावर विश्वास ठेवून केलेला दिसतोय. धार्मिक संस्थांनी केलेली किंवा त्यांची व्यक्तींनी केलेली फसवणूक (मुळात ते कलम या दोन्ही तील नक्की कशाबद्दल आहे, ते बातमीतून नीट कळत नाही), याबद्दलच्या कलमाने वारकर्‍यांचे काय नुकसान होणार आहे?

दुसर्‍या कलमाबद्दलचा विरोध तर विनोदी वाटतो. एखादी गोष्ट त्या कायद्याच्या स्कोप मधे येत नाही तर मुळात तेथे लिहीली कशाला अशा स्वरूपाचा प्रश्न वाटतो. उलट ते स्पेसिफिकली त्या कायद्यातून वगळले असणार तसे लिहून. "हा कायदा अमुक परिस्थितीत्/अमुक बाबतीत लागू होत नाही" असे अपवादांचे क्लॉजेस बर्‍याच कायद्यांत असतीलच की.

ती दिव्यमराठीची बातमी मजेदार आहे.
"वारकरी संप्रदायाचा विरोध झुगारून महाराष्‍ट्र सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत वारंवार विश्वासघात करत आहे." ही 'बातमी' कशी काय होऊ शकते? गेली अनेक वर्षे वस्तुनिष्ठ बातमी व लिहीणार्‍याचे मत हे एकत्र करणे खूप होऊ लागले आहे.

त्याच बातमीतील इतर अनेक गोष्टींचा त्या कायद्याशी काय संबंध आहे तेही कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खर तर मला असे वाटले होते कि हे विधेयक सहज पास होईल. नाही तरी ज्याची अंमलबजावणी करायचीच नाही अथवा करायची झाली तरी त्यात बरीच शक्ती खर्च करावी लागेल असे विधेयक पास करायला राजकारण्य़ांच काय जातय? अनेक कायदे फक्त कागदावरच आहेत ज्यांची अंमलबजावणी व पालन करणे उभयपक्षी गैरसोयीचे असते.
काही लोकांच्या मते आहेत तेच कायदे सक्षमपणे राबवले तर वेगळ्या अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकाची गरज लागणार नाही. कायदा आणि प्रबोधन ही दोन्ही हत्यारे वापरली तरच काही सामाजिक बदल घडून येतील. कोणा एकाचाच वापर हा अपुरा पडतो व त्याचा फारसा उपयोग होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>> आता माझ्या मनात जर १०० अंधश्रद्धा आहेत तर सरकार मला काय करणार याचे मला कुतुहल आहे <<

कुणाची अंधश्रद्धा त्याच्या मनापुरती असली तर त्याला विधेयकाचा काहीच त्रास होणार नाही. जिथे कुणाचं तरी शोषण होतं (उदा : नरबळी, चटके देणं वगैरे अघोरी प्रथा) तिथेच कायदा लागू होईल. अधिक माहिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कायद्याचा मूळ मसुदा आपल्याला इथे पहाता येईल. यदाकदाचित पास झाला तर त्याचे श्रेय कुणी घ्यायचे यावर डॉ दाभोलकर महाराष्ट्र अंनिस व शाम मानव अखिल भारतीय अंनिस यांच्या समर्थकात रस्सीखेच होइल असे भाकित वर्तवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक वाचलं. याला विरोध करणारे लोक नक्की कशाला विरोध करत आहेत? लोकांची धर्म किंवा संबंधित गोष्टींच्या आधारे आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक छळवणूक, पीडा करण्याला अटकाव करण्याला विरोध करणारे किती नीच लोक असतील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या बातमीनुसार महाराष्ट्र शासनाने अधिनियम काढुन "जादु-टोणा" कायदा संमत करायचे ठरवले आहे.

दाभोलकरांची हत्या हा यामागचा कॅटॅलिस्ट दिसतो. पण हेही नसे थोडके.

(प्रत्यक्ष अंमलबजावणीवेळी पोलिसांना टेबलाखालुन मलिदा घेण्याचे एक नविन साधन मिळेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करणारे वारकरी नाहीच, असा पवित्रा काही मंडळींनी घेतला आहे. विधेयकाचे विरोधक संघवाले असून, ते वारक-यांच्या कळपात घुसून आपला कार्यभाग साधत आहेत, अशी मांडणी ही मंडळी करताना दिसते. कथित विचार मंचवाले आणि पुरोगामी म्हणविणारी मंडळी हे मत हिरीरीने मांडत आहेत. मला वेगवेगळ्या ठिकाणी गवसलेले हे काही धागे :

वारी सोहळ्यावर आरएसएसचा ताबा
उत्पात पुन्हा मातले ! बडव्यांची भडवेगिरी!!
वारीतील सनातनी वाटमारे

पुरोगाम्यांमधला एक गट थेट वारक-यांवरही हल्ला करताना दिसून येतो. रामटेकेंसारखी मंडळी त्यात आहेत. या संबंधीचे धागे मिळाल्यास यथावकाश देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गवसले' म्हणता म्हणता आपण हे दुवे देणं रोचक आहे. कारणं दोन -
१. मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग
२. 'सनातन', 'हिंदु जनजागृती'वाल्यांचे विचार अन् ह्यांचे विचार ह्यांत खूप फरक असला तरीही सूर साधारण तसाच, म्हणजे टिपेचा वाटतो. जर ह्यांना गांभीर्यानं घ्यायचं तर त्यांना का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||