ऐसीअक्षरेच्या सभासदांसाठी खुषखबरः सदस्यभरती योजना

नमस्कार!

गेल्या काही दिवसांपासून ऐसीअक्षरे ऍडमिनच्या असे निदर्शनास आले आहे की, संस्थळाची सभासदसंख्या म्हणावी तितकी वाढत नाही. नवीन सभासद येण्याचे अचानक कमी झाले आहे. नवीन धागे येण्याचे प्रमाण देखील रोडावले आहे. असलेले सभासद देखील फारसे ऑनलाईन दिसत नसून बरयाच वेळा असे दृष्टोत्पत्तीस येते की, फक्त संस्थळाचे मालक-चालकच येऊन गल्ल्यावर बसून चकाट्या पिटत कष्टमरांची प्रतीक्षा करीत आहेत. याच्या कारणांचा उहापोह करण्याची ही जागा नव्हे, परंतु या संस्थळाचे इतर काही जालीय स्थळांप्रमाणे मरुःस्थल होऊ नये म्हणून तातडीने काही उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे 'सदस्यभरती योजना(scheme)'.

या योजनेबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणेः

१. सदर योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी खवचट खान यांची मार्केटिंग डिरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सभासदांना विनंती आहे की त्यांनी योजनेसंदर्भात सर्व पत्रव्यवहार इ.इ. श्री. खवचट खान यांच्याशीच करावेत. यासंदर्भात कृपया संस्थळचालकांशी कोणताही संपर्क साधू नये!
२. या योजनेचे वैशिष्ट्य असे की सभासदत्व घेणारया प्रत्येक व्यक्तिला त्यातून आर्थिक लाभ देखील होणार आहे. कसे ते पहावे,
३. प्रत्येक व्यक्तिने सदस्यत्व घेताना रु. १०००/- फक्त खवचट खान यांच्याकडे जमा करावेत. पैसे जमा करण्यासाठी बॅंक अकाऊंट इ.साठी कृपया खवचट खान यांना व्यनि पाठवावा.
४. आपले प्रवेशशुल्क जमा होताच आपल्याला तातडीने सदस्य करून घेण्यात येईल.
५. सभासद झालेल्या प्रत्येक व्यक्तिने आपल्या आप्त, मित्रपरिवार, कार्यालयीन सहकारी इ. पैकी फक्त चार जणांना 'ऐअ' चे सदस्य करून घ्यायचे आहे. (प्रत्येकी रु. १०००/- भरून)
६. जमा झालेले ४०००/- रु. वरीलप्रमाणे ख. खान यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये पाठवून देण्यात यावेत.
७. त्या चार जणांनी आपापल्या आप्त, मित्र इ.इ. पैकी चार जणांना वरीलप्रमाणेच सदस्य करून घ्यावे. तेवढे ते ४०००/- न चुकता पाठवून द्यावेत.
८. अशा प्रकारे निर्माण झालेल्या साखळीतील प्रत्येकास त्याच्या साखळीतील श्रेणीप्रमाणे त्याच्या खाली असलेल्या सर्व सदस्यांच्या संख्येप्रमाणे कमिशन देण्यात येईल. लवकरच आपले १०००/- रु. भरून निघून आपल्याला मूळ रकमेच्या कितीतरी पट फायदा होईल! सर्व हिशोब खवचट खान यांच्यातर्फे चोख ठेवण्यात येतीलच, काळजी नसावी!
९. योजनेत भाग घेणारया सर्व सभासदांना आमच्याकडून सदस्यभरतीचे किट पाठवण्यात येईल. यात नवीन सदस्य कोठे व कसे गाठावेत, त्यांचे सदस्य होण्यासाठी मन कसे वळवावे याबद्दल इत्थंभूत माहिती असेल. तसेच आपल्या वाहनावर लावण्यासाठी 'अय्या! तुम्ही अजून अय्याकर नाही?' ('aia'kar) असा बंपर स्टिकर इत्यादि गिफ्ट्स असतील.

तर मग होताय ना सदस्य? त्वरा करा! त्वरा करा! योजना मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे!

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

"ऐसीअक्षरे"करांना फिट्ट शब्द काय असेल बरे असा विचार काहीकाळ मनात होता.

अय्याकर.. Smile ??? कसला अफलातून धमाल शब्द आहे हा.. पण बाप्यामाणसांना अय्याकर आवडणार नाही.. त्यांना काय म्हणावे ??

आयकर नाही म्हणालात ते बरे.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शब्द चालील का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धमाल आहे.
खिल्ली उडवण्यात खखांची भलतीच प्रगती झाली असून यावेळी त्यांनी चक्क द्वयर्थी (नव्या अर्थाने (किंवा दुधारी)) खिल्ली उडवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉन्झी स्कीमचा छान धागा. Smile

मौजमजा या सदरात हवा होता. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पॉन्झी म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पॉन्झी म्हणजे चार्ल्स पॉन्झी.

पॉन्झी स्कीम ऐवजी पिरॅमिड स्कीम म्हणायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मौजमजा या सदरात हवा होता.

धागा त्या सदरात हलवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरिल योजनापत्रात मला अढळलेला गुप्त मसुदा -

१. मामा योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी खवचट खान मारटिंग्या अक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सभासदांना विनंती आहे की त्यांनी पत्रव्यवहार करावेत. यासंदर्भात कोणताही संपर्क साधू नये!
२. या योजनेचे वैशिष्ट्य असे की फक्त खवचट खान या व्यक्तिला आर्थिक लाभ होणार आहे.
३. प्रत्येक व्यक्तिने रु. १०००/- फक्त खवचट खान यांना पाठवावे.
४. आपले प्रवेशशुल्क जमा करून घेण्यात येईल.
५. मामा झालेल्या प्रत्येक व्यक्तिने आपल्या आप्त, मित्रपरिवार, कार्यालयीन सहकारी इ. पैकी फक्त चार मामा-टाइप लोकांना घेउन यावे.
६. जमा झालेले ४०००/- रु. वरीलप्रमाणे ख. खान यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये पाठवून देण्यात यावेत.
७. त्या चार मामांने आपापल्या आप्त, मित्र इ.इ. पैकी चार जणांना वरीलप्रमाणेच मामा करून घ्यावे. तेवढे ते ४०००/- न चुकता पाठवून द्यावेत.
८. अशा प्रकारे निर्माण झालेले कमिशन + आपले १०००/- रु. हे मूळ रकमेच्या कितीतरी पट होईल! हे सर्व खवचट खान यांच्याकडे चोख ठेवण्यात येतीलच, काळजी नसावी!
९. योजनेत भाग घेणारया सर्व मामांना आमच्याकडून मामाभरतीचे किट पाठवण्यात येईल. यात नवीन मामा कोठे व कसे गाठावेत, त्यांचे मामा होण्यासाठी मन कसे वळवावे याबद्दल इत्थंभूत माहिती असेल. तसेच आपल्या वाहनावर लावण्यासाठी 'अय्या! तुम्ही अजून मामा नाही?' ('aia'kar) असा बंपर स्टिकर इत्यादि गिफ्ट्स असतील.

श्रेयव्हेर - हा एक काल्पनिक गुप्त-मसूदा-फोड-प्रयत्न आहे, योजनेच्या वैधते विषयी काहिच अक्षेप नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>> अशा प्रकारे निर्माण झालेल्या साखळीतील प्रत्येकास त्याच्या साखळीतील श्रेणीप्रमाणे त्याच्या खाली असलेल्या सर्व सदस्यांच्या संख्येप्रमाणे कमिशन देण्यात येईल. <<<<
या वाक्यात कमिशन च्या जागी "कर्ममूल्य" किन्वा "पुण्य" असा बदल हवाय! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या काही दिवसांपासून ऐसीअक्षरे ऍडमिनच्या असे निदर्शनास आले आहे की, संस्थळाची सभासदसंख्या म्हणावी तितकी वाढत नाही. नवीन सभासद येण्याचे अचानक कमी झाले आहे. नवीन धागे येण्याचे प्रमाण देखील रोडावले आहे. असलेले सभासद देखील फारसे ऑनलाईन दिसत नसून बरयाच वेळा असे दृष्टोत्पत्तीस येते की, फक्त संस्थळाचे मालक-चालकच येऊन गल्ल्यावर बसून चकाट्या पिटत कष्टमरांची प्रतीक्षा करीत आहेत.

सहमत.
पण खानसाहेब,तुमच्या नावातच खवचटपणा असल्याने आमचे पैसे डुबवून आम्ही जाब विचारल्यावर खवचट उत्तरे द्याल असे वाटते.

त्यापेक्षा मलाच का अकाउंटचे अधिकारी बनवत नाही? माझ्या नावावरूनच मी एकाचे चार करणार (पैसे आणि सदस्य, दोन्ही.) हे लक्षात येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या नावावरून आपण 'एक दोन तीन चार, डबोलं घेऊन होऊ पसार' असे कराल अशी शंका येत आहे.

सबब, आपल्या अर्जाचा नैवेद्य केराच्या टोपलीला दाखवण्यात आलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर धागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिस्काउंट वगैरे आहे का
चार सदस्य आणणार म्हणून म्हटल
ते सवलतीचं बघा जरा;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

खवचट खान हा आयडी माझा आहे हे आता जाहीर करण्यास हरकत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खवचट खान हा आयडी माझा आहे हे आता जाहीर करण्यास हरकत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

;;) ;;) ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान ना मान मैं तेरा मेहमान. खवचट खानचं बुकिंग आधीच करून ठेवलं होतं. माझ्या आयडीवर ड्वाला ठेवू नये. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रियाली हा आयडी माझाच आहे हे मी आधी इतरत्र जाहीर केलं होतंच, इथेही करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे कोणी प्रियालीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिव्या (दुर्लक्ष या शिवीसकट) घालतात त्यांनी आजपासून राजेश घासकडवींना काँटॅक्ट करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ मुद्दा असा आहे की सर्व पैसे अदितीच्या खात्यावर जमा करावेत. प्रशासनाशी याचा काही संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या विशिष्ट लोकांना संधी मिळावी म्हणून तर स्वतंत्र आयडी केलाय. राजेश घासकडवींना शिव्या घालणाऱ्यांसाठीच राजेश घासकडवी हा आयडी राखून ठेवला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुम्हाला तर राजेश खन्ना आवडतो आणि घासकडवी हे आडनाव भारदस्त वाटतं! तुम्हाला दुर्लक्ष नामक शिवीही का द्यायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चान चान.

वास्तव जीवनात आमच्याकडे कुठल्या सिंहीणीने ढुंकून पाहिले नाही, पण जालविश्वात दोन जाल-सिंहिणी निदान आमच्या आयडीसाठी एकमेकींच्या झिंज्या, सॉरी आयाळी उपटित आहेत हे पाहून परम संतोष जाहला!!

(स्वगत: खव्या मरतंय आता!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

अचानक उपटून तुमचा आयडी उपटू पहात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे सगळ्यांना माहित असेलच. नसेल तर आता सांगितलं आहे. उगा टुरटुर नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

उद्या पासवर्ड चोरीला गेला तर दोष राजेश घासकडवी यांचा समजावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंहिणींना आयाळ!
असेल बॉ! माया'जाला'तील सिंहिंणी आहेत या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाल की खाल, तीसुद्धा सिंहीणींच्या आयाळीतल्या बालांची काढताय, काय म्हणावं तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<पी जे वॉर्निंग सुरू > सिंहीणींच्या आयाळीत 'बाल' असतात? मग आयाळीला 'बालवाडी' का म्हणू नये Wink <पी जे संपला >

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण म्हणून ते २ दा सांगायची गरज काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माझी मर्जी, दोनदा सांगेन नाहीतर उणे दोनदा सांगेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकूण धागे, प्रतिसादांची खोगीरभरती. काय काय दिव्यं करावी लागतात एक साईट हॅपनिंग ठेवण्यासाठी... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच लिहायला आलो होतो...
आता थोड्या दिवसात माझ्या धाग्याला प्रतिसाद द्या आणि ५ रु मिळवा वैगेरे स्किम्स पण येतिलच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्कीम्सः
यात एक म्युच्युअल रुब्रिफिकेशन (एकमेकांची लाल करणे) असाही प्रकार आहे.
म्हणजे, मी तुझ्या धाग्यास ५ स्टार देतो, तू मला दे. एकमेकां सहाय्य करू.
अवांतर.
काही 'देशी' बीबींवर हा 'रेप्स' (रेप्युटेशन्स : श्रेणी) देणे हा प्रकार आढळतो, अन सहाजिकच मग प्रत्येक पोस्टीखाली, 'रेप मी अँड आय शाल रेप यू बॅक' हे असे भयंकर अपीलही दिसते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रतिसाद, श्रेण्या, तारे इ. सर्वांचे रेटकार्ड मालकांनी छापायला दिले आहे.

दरम्यान, आपल्या वरच्या प्रतिसादाचे ५ रु. संध्याकाळी घरी येऊन घेऊन जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुर्बिटणेबै भयालीदेवी घासुगुर्जी हे माझेच आयडी आहेत याची नोँद घ्यावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मीही असंच म्हणते.
दुर्बिटणेबै, भयालीदेवी, घासुगुर्जी, नाइल, खवचट खान हे सर्व हे माझेच आयडी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

if a = b b = c then a = c या नियमावरुन शहराजाद हा माझा आयडी आहे हे सिध्द होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.