Skip to main content

बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी

बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी
मेद दाटे दाट अंगी जाड मी झाले तशी

लग्न माझे,खूष झाल्या का बरे सार्‍या सख्या
लठ्ठ त्यांच्या मंडळी मी दिसतसे शोभूनशी

घोवही ना जाणतो ही वाढ कैसी जाहली
मी सदाची तोलते मज वजनकाटी का अशी

मॉलमधूनी येत असता खूप असते खिन्न मी
"आँटिजी" म्हणताच कोणी जातसे बिघडूनशी

एकदा वर मान करुनी कोण ना बघते मला
स्पंदने थांबायची साती जुनी चाले जशी

प्रेरणा इथून घेतलीय.

राजेश घासकडवी Thu, 24/11/2011 - 00:33

चला पाणी वहातं झालं... आता अजून धबधबे येऊद्यात.

1234 Thu, 24/11/2011 - 00:41

सध्या बाजारात मंदी आहे म्हणून हा अवकाळी ४ मिनिटांचा पाऊस.

चार मिनिटांचा संदर्भ आठवतच असेल.

राजेश घासकडवी Thu, 24/11/2011 - 01:01

In reply to by 1234

चार मिनिटांचा संदर्भ कसा विसरायला होईल? तो ऐसी अक्षरे वर प्रथम मोजला गेलेला मानदंड आहे. आणि कोण म्हणतो ऐसी अक्षरे वर वेगळं काही होत नाही? ;)

ऋषिकेश Thu, 24/11/2011 - 09:22

है शाबास!

प्रेरणा दमदार होती माझेही हात शिवशिवत होते.. पण अर्थात त्याला या विडंबनाची सर आली नसती :)

विदेश Thu, 24/11/2011 - 09:37

प्रेरणा साधी ! विडंबन मस्त !!

वाळलेली शेंग होते शेवग्याची मी कशी ... अशा प्रकारची सुरुवात ?