सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट

सन्जोपरावांची यनावाला संदर्भातील पोस्ट वाचली. "वैज्ञानिकांनी आस्तिक असू नये."

सुरवातीला, खरं तर खूप इमोशनल प्रतिक्रिया झाली. आस्तिकांना वाळीत टाकणारे/कमी लेखणारे वैज्ञानिक कोण टिक्कोजीराव लागून गेलेत प्रकारची.

मग त्यावर प्रतिवाद हा सुचला की तसं असेल तर वैज्ञानिकांनी धूम्रपान करु नये, त्यांना अपेयपान, जुगार निषीद्ध असावा वगैरे तत्सम आचारसंहीता का लागू का करु नये की आस्तिकवाद या सवयींपेक्षाही खालचा आहे? वगैरे.

मग भावनेचा भर ओसरल्यावरती विचारातील विसंगती लक्षात आली. विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन म्हणजे काय? प्रत्येक अनुभव तर्काच्या कसोटीवर पारखून घेणे. डोळे झाकून, झापड लावून न जगणे. मग या नियमांच्या विरुद्ध आस्तिकवाद कसा ते लक्षात आले. आस्तिकवाद म्हणजे "या सृष्टीचे पालन करणारी कोणी एक अथवा अनेक शक्ती आहेत ही संकल्पना." पण मग ही शक्ती किंवा या सर्व शक्ती कधी दर्शन/प्रचीत का देत नाहीत? आणि या प्रचीतीशिवाय विश्वास टाकायचा का?????

अन एकदम एक उपरती झाली की विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन म्हणजे स्वतः चालकाच्या(ड्रायव्हर) सीट मध्ये बसून कार चालविणे याउलट आस्तिकवाद म्हणजे "पीलीयन रायडर" बनणे. अर्थात कोणतीही भूमिका दुसरीपेक्षा वरचढ नाही. २ अतिशय भिन्न भूमिका. बस एवढच.

हा विचारप्रवाह मांडावासा वाटला म्हणून हा धागा. यावर यनावालांच्या पोस्टसंदर्भात उलट-सुलट (विज्ञान विरुद्ध आस्तिकवाद जंगी) चर्चा झाली तर उत्तमच. मला मात्र ती ड्रायव्हर/पिलीयन रायडर उपमा सुचल्यावर खूप मनःशांती मिळाली.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

सन्जोप रावांनी किम्वा इतर कुणी पत्र वगैरे लिहिल्यास सही करणार आहेच.
उदाहरण ड्राय्व्हिंग सीट- पिलियन चे उदाहरण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबाशी सहमत.
माझ्यासाठी विज्ञान व देव अगदीच दोन टोकावरच्या कल्पना आहेत. त्यात काहीच इंटरसेक्टिंग नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जरा लिंक द्या की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्रयत्न केलेला पण बरोब्बर त्या प्रतिसादाचा दुवा देता आला नाही. पण हे पहा पान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सन्जोपराव यांनी स्वत: टंकून ती पत्रं दिली आहेत. ती खालीलप्रमाणे:

आस्तिक वैज्ञानिक व संस्कार
'काही वैज्ञानिक आस्तिक का?' या 'वैज्ञानिक आस्तिक असू शकतात' या माझ्या पत्राला दिलेल्या उत्त्तरात प्रा. य.ना. वालावलकर यांनी असे प्रतिपादन केले आहे ,'बालपणात आईने आणि इतरांनी देवा-धर्माबद्दल केलेले संस्कार इतके पक्के रुजतात की जन्मभर ते पुसले जात नाहीत.' पण मग नंतरच्या काळात ज्ञान-विज्ञान शिकून प्रगल्भ होता येत नसेल, वेगळा विचार करण्याची क्षमता निर्माण होत नसेल, तर त्या शिकण्याचा काय उपयोग झाला असे म्हणावे लागेल. पण तसे नसावे. काही वैज्ञानिकांच्या बाबतीत मिळवले त्यापेक्षा अजूनही ज्ञान मिळवणे बरेच बाकी आहे, असेही वाटत असण्याची शक्यता असू शकते. ज्ञानाचा शेवट आणि अज्ञाताची ओढ वैज्ञानिक, शास्त्रज्ञ यांनाही आस्तिकतेकडे, बुद्धीच्या आकलनापलीकडील अनामिक श्रद्धेकडे वळवत असावी. याबाबत जागतिक कीर्तीच्या अनेक वैज्ञानिकांचे अनुभव व विचार लिखित स्वरुपात आढळतात. सर्व विज्ञान शाखांच्या ज्ञात अभ्यासाचा शेवट पी.एच.डी. ने (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी- तत्त्वज्ञान) होतो, हे बरेच काही सांगून जाते. खरा शास्त्रज्ञ नकारज्ञ नसतो. शेवटी प्रा.वालावलकर यांनी पुष्टीसाठी म्हणुन रिचर्ड डॉकिन्स या प्रसिद्ध पाश्चिमात्य नास्तिकाचे 'बाळाला देवा-धर्माच्या संस्काराचे विष आई आपल्या मुखाने पाजते, त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो' हे वाकुअ उद्धृत केले आहे. भारतीय संस्कृतीत आईबद्दलच्या भावना पवित्र व संवेदनशील असतात. त्यांचा असा अधिक्षेप आवेशाच्या भरातही करणे हे निश्चितच गैर आणि दु:खद आहे. हे टाळूनही मुद्दा मांडता आला असता.
चिदानंद पाठक, पाषाण
उगाच विरोध कशाला?
'काही वैज्ञानिक आस्तिक का?' हे पत्र (मटा, २० नोव्हेंबर) वाचले. वाचून असे वाटले की वैज्ञानिक आस्तिक असूच नयेत असा प्रा. वालावलकरांचा हट्टाग्रह का? जगाच्या घटनांपाठीमागे कोणीतरी एक नियामक शक्ती आहे, असे आस्तिकवादी मत तर विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांचेही होते. पूर्वीची माणसे अडाणी होती. त्यांना निसर्गनियमांचे काहीच ज्ञान नव्हते; भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा नैसर्गिक संकटांना घाबरुन त्यांना देव नामक रक्षणकर्त्याची कल्पना गृहित धरली इ. गृहितके माझ्या मते पत्रलेखकांसारख्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली तर्कटे आहेत. विद्यमान जन्म हा पहिला व शेवटचा हे मतही अशाच गृहितकांतून निर्माण झालेले नाही कशावरुन? कारण हेही कोणत्याही वैज्ञानिकाने पुराव्यांसह सिद्ध केलेले नाही. दोन श्वासांच्या अलीकडील, पलीकडील अस्तित्वाबद्दल तर्कनिष्ठ पुरावा अजूनतरी पुढे आलेला नाही. ती नास्तिकवाद्यांनी मांडलेली मते आहेत. देवाला संतुष्ट करण्यासाठी त्याला गंध, फूल, नैवेद्य इ. दाखवून साकडे घालायचे, थोडक्यात काही लालूच दाखवायची इ. कल्पनाही हास्यास्पद तर्कट आहे! लालचेपलीकडील काही भाव, भक्ती, आनंद, शांती, शरणागती असते की नाही? की निवडणुकीभोवती फिरणार्‍या राजकीय पक्षांप्रमाणे देवदेखील कोणी राजकीय पुढारी आहे? देवाला मानले याचा अर्थ जीवनातील चांगुलपणा, भलेपणा, प्रामाणीकपणा, बंधुभाव इ.इ. चांगल्या व रचनात्मक कल्पना असायलाच हव्यात. नास्तिकपणाचा आव आणणार्‍या एखाद्याजवळ माणुसकीच्या या चांगल्या कल्पना असतील. तर आतून तो आस्तिक असतो हेही तितकेच खरे. मग उगाच विरोध करण्यापेक्षा या रचनात्मक संस्कारांचे असणे वा मानणे चांगलेच आहे ना?
शामसुंदर गंधे, नर्‍हे
ही ती दोन पत्रे. पत्रे जशीच्या तशी (त्यांतल्या शुद्धलेखनाच्या चुकांसह) टंकलेली आहेत.

***

या पत्रांना उत्तर द्यावे, ज्यांना इच्छा असेल त्यांनी भर घालावी, दुरुस्त्या कराव्यात आणि संपादित पत्र सगळ्यांच्या सह्यांनिशी मटाला पाठवावे, असा प्रस्ताव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या निमित्त यनावालांच्या शिव शिव रे काउ| हा पिंडाचा घेई खाउ हा लेख आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जळीस्थळीकाष्ठीपाषाणी प्रा. अद्वयानंद गळतगे (हे महाभाग जे कोणी असतील ते) यांच्या ग्रंथराजाचा (किंवा नाडीचा) उल्लेख करणे आणि कारण असो वा नसो, पण यनावालांच्या कोण्या र्‍याण्डम लेखाचा (किंवा 'ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी' किंवा तत्सम काहीतरी नाव असलेल्या [स्वतःच्याच] ग्रंथराजाचा) उल्लेख करणे, यांत क्वालिटेटिव फरक नेमका काय?

(उल्लेख करू नये, असा दावा नाही. ते घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्य अर्थातच आगाऊ मान्य आहे. आणि तसेही, उल्लेख करण्यास अडविणारे आम्ही कोण? पण कुतूहल आहे, एवढेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बहुतेक नास्तिकांच्या नास्तिकतेचा उगम लहानपणी किंवा पौगंडावास्थेत झालेल्या परंपरावादी अत्याचारात असतो, भावनेच्या भरात बदलेल्या धर्माला नंतर वैचारिक मुलामा देण्याने विवेकवादी होताच येते असे नाही, विवेकाचे उदाहरण दाभोलकरांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत/त्यांच्या उद्धृतात(हे कसे लिहितात?) आहे. इतर कोणत्या भूमिकेला समर्थन देणे भावनावादाचे समर्थन करणे होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक नास्तिकांच्या नास्तिकतेचा उगम लहानपणी किंवा पौगंडावास्थेत झालेल्या परंपरावादी अत्याचारात असतो, भावनेच्या भरात बदलेल्या धर्माला नंतर वैचारिक मुलामा देण्याने विवेकवादी होताच येते असे नाही,

कदाचित (बहुधा) सहमत आहे.

विवेकाचे उदाहरण दाभोलकरांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत/त्यांच्या उद्धृतात(हे कसे लिहितात?) आहे.

संदर्भ?

इतर कोणत्या भूमिकेला समर्थन देणे भावनावादाचे समर्थन करणे होय.

रोख कळला नाही. कृपया स्पष्ट करू शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भ?

आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर

इतर कोणत्या भूमिकेला समर्थन देणे भावनावादाचे समर्थन करणे होय.

रोख कळला नाही. कृपया स्पष्ट करू शकाल काय?

विवेकवादी भूमिकेला सोडून इतर म्हणजे भावनिक भूमिकेचे समर्थन करणे विवेकी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भ?

आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
- डॉ. नरेंद्र दाभोलकर

धन्यवाद.

विवेकवादी भूमिकेला सोडून इतर म्हणजे भावनिक भूमिकेचे समर्थन करणे विवेकी नाही.

अर्थ लक्षात आला, तो पटतोही (बहुधा), परंतु हे विधान नेमक्या कशाच्या संदर्भात आले / यातून प्रस्तुत ठिकाणी नेमके काय सुचवायचे आहे, ते लक्षात आले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
माझीही कोणे एके काळी हीच भावना होती. पण यावरचा माझा विश्वास आता उडत चालला आहे. नूर्ख, बथ्थड समाजाला (त्यात मीही आलो!) चार फटके टाकल्याशिवाय समाज सुधारणार नाही या मूळ मूर्ख, बथ्थड भूमिकेशी मी परत आलो आहे. 'श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा, शोषण नको, या दाभोलकरी, विवेकी भूमिकेपेक्षा 'परमेश्वराला रिटायर करा' ही लागूंची भूमिका ('एलेमेंटरी, माय डिअर वॉटसन' असे होम्सने कधीही म्हटले नाही, तद्वत 'प.रि.क.' असे लागूंनी कधीही म्हटले नाही अशी एक आख्यायिका आहे) आता मला अधिक जवळची वाटत आहे. 'रुपवेध' वाचल्यापासून तर अधिकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हे काम फार किचकट आहे. पण लोकांची मतं, मनं, आणि समाजाचा मतप्रवाह बदलायचा असेल तर त्यांचं आपल्याबद्दल प्रतिकूल मत होऊन उपयोग नाही. दाभोलकरांचा मार्ग हा सगळ्यात छोटा रस्ता आहे ... पण यात त्या रस्त्यावरून चालणाऱ्यांना instant gratification अजिबात नाही.

अर्थात यात बायनरी विचारपद्धतीचा (निदान माझातरी) हट्ट नाही. तुम्ही आमच्या सोबत नाहीत तर आमचे विरोधकच आहात असं अजिबातच नाही. पण तो उद्वेग दूर कराल तर सगळ्यांसाठीच उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'एलेमेंटरी, माय डिअर वॉटसन' असे होम्सने कधीही म्हटले नाही...

अर्थात!

मुळात 'होम्स' अशी व्यक्तीच जेथे नाही (कधीही नव्हती!), तेथे त्याने 'एलेमेंटरी, माय डिअर वॉटसन' (किंवा, फॉर द्याट म्याटर, 'इला इलाहा इल्लल्ला, मुहम्मदुर्रसुलिल्ला' किंवा 'वदनि कवळ घेता') म्हणण्याचा प्रश्नच उद्भवतो कोठे? (एलेमेंटरी, माय डिअर...)

हा सगळा त्या मूर्ख, बथ्थड, अंधश्रद्ध होम्स-आस्तिकांच्या मनांचा खेळ आहे. या मूर्खांना लुबाडून तेथे त्या सर आर्थर कॉनन डॉयल नावाच्या इंग्रज भामट्यापासून ते कित्येक प्रकाशक, बुकसेलर्स, झालेच तर त्या गरवारे पुलाखाच्या संड्री फुटकळ विक्रेत्यांपर्यंत कित्येक लुच्च्यांनी आपापल्या तुंबड्या भरल्या, तरी या येडयांना त्याचा पत्ताही नाही. एकेकाची टकुरी फोडल्याशिवाय सुधारणार नाहीत साले.

...तद्वत 'प.रि.क.' असे लागूंनी कधीही म्हटले नाही अशी एक आख्यायिका आहे.

आख्यायिका काहीही असो, पण (ते असे म्हणाले) असे आपण मानता ना? मग झाले तर. (ज्या अर्थी लागूंची या म्हणण्यामागील भूमिका ही 'आपणांस अधिक जवळची वाटत आहे' असा दावा आपण करता, त्या अर्थी 'लागू असे म्हणाले' हे आपण मानत असणे अपरिहार्य आहे. अन्यथा, 'लागू असे म्हणाले नाहीत, परंतु लागूंची ही भूमिका मला अधिक जवळची वाटते' हे विधान तर्कविसंगत आहे.)

फॉर द्याट म्याटर, मारी आंत्वानेत ही (मराठीत, इंग्रजीत, फ्रेंचमध्ये, जर्मनमध्ये किंवा अन्य कोणत्याही भाषेत) 'पाव मिळत नसेल, तर केक खा,' असे काही मुळात कधी म्हणालीच नाही, असे एक मत तूर्तास प्रचलित आहे. किंवा, येशू 'देवा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही' असे कधी म्हणालाच नाही, असाही एक दावा आहे. फार कशाला, लोकमान्य टिळक 'मी ही फोलपटे फेकली नाहीत; मी ती उचलणार नाही' असे (डिपेंडिंग ऑन वन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, बाणेदारपणे, तोंड वर करून किंवा दोन्ही) म्हणाले, याबद्दल काही ठोस पुरावा उपलब्ध असल्यास तो पाहावयास आवडेल.

परंतु तरीही, त्या त्या व्यक्ती तसे तसे म्हणाल्या, यावर ठाम विश्वास ठेवणारे गाढव लोक या जगात सापडतातच ना?

चालायचेच! अहो, कोणी काय मानावे, ते आपल्या हातात थोडेच आहे? आणि आपण ते काय म्हणून ठरवायचे?
====================================================================================================

मारी आंत्वानेत ही मूळची ऑस्ट्रियन होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूर्ख, बथ्थड समाजाला (त्यात मीही आलो!) चार फटके टाकल्याशिवाय समाज सुधारणार नाही

- मुळात सन्जोपराव चार फटके टाकतील (किंवा यनावाला मूर्खात काढतील) या भीतीने समाजाने काहीएक विचार जरी पत्करला, तरी तशा पद्धतीने स्वीकारलेला तो विचार 'विवेकी' म्हणता येईल काय? काइन्डा डिफीट्स द पर्पज, डझन्ट इट?

- विचारांचा अशा प्रकारे प्रसार करण्याची पद्धती आणि 'सेना'(= 'चार फटके')/'अ‍ॅम्वे'(= 'तो एक मूर्ख') ट्याक्टिक्स यांत नेमका फरक काय?

- चार फटके टाकून समाजास 'विवेकी' विचार करावयास लावण्याची विचारसरणी कितपत विवेकी?

- त्यापेक्षा समाजाच्या नावाने गधेगाळच का काढू नये? ('हे शासन जो न मानी, तेहाची...' इ.इ.)

(तूर्तास इतकेच.)

==========================================================================

(अवांतर:)

(त्यात मीही आलो!)

'च्यारिटी बिगिन्ज़ अ‍ॅट होम,' एवढेच तूर्तास (अतिशय नम्रपणे) सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळात सन्जोपराव चार फटके टाकतील (किंवा यनावाला मूर्खात काढतील) या भीतीने समाजाने काहीएक विचार जरी पत्करला, तरी तशा पद्धतीने स्वीकारलेला तो विचार 'विवेकी' म्हणता येईल काय? काइन्डा डिफीट्स द पर्पज, डझन्ट इट?

मुळात, मुर्खपणाने स्विकारलेल्या विचारांकरता फटके का देऊ नयेत? ('फिगरे'टीव्हली, हो. अर्थात न'वी बाजूंनी 'बेसिक' बाजूचा विचार करायला हरकत नाही.

(तूर्तास इतकेच.)

बाकीचे गैरलागू, तेव्हा अजून येऊद्या. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मुळात, मुर्खपणाने स्विकारलेल्या विचारांकरता फटके का देऊ नयेत.

ही म्हणजे, 'ड्याम्ड इफ यू डू, अँड ड्याम्ड इफ यू डोण्ट' अशातली गत झाली नाही काय?

त्यापेक्षा, 'डू व्हॉट यू वॉण्ट टू डू, अँड ड्याम सन्जोपराव (अँड नाइल, इफ अ‍ॅप्लिकेबल)' अशी भूमिका कोणी का घेऊ नये?

(उलटपक्षी, मूर्खपणे विचार लादणारास फटके नकोत, पण पार्श्वभागावर लाथ [पुन्हा, फिग्युरेटिवली हो!] का देऊ नये?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी, दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक घडत होते हे नाकारता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सहमत आहे.

फक्त भावनाअतिरेकी भुमिका विवेकी असणं शक्य नाही त्यामुळे त्यास समर्थन देणं अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्राचा पहिला मसुदा जाहीर मांडते आहे. काही ठिकाणी रिकाम्या जाग्या सोडल्या आहेत. आपल्यापैकी कोणीतरी त्या भरून काढतीलच याची खात्री आहे. मला पडलेल्या शंका कंसात आहेत.

---

भारताच्या मंगळमोहिमेला आशीर्वाद मिळविण्यासाठी इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सोमवारी तिरुपती बालाजीची पूजा केली. यावरून पुन्हा एकदा आस्तिक-नास्तिक वाद पुढे आलेला आहे. प्रा. य. ना. वालावलकर यांचे यासंदर्भातले विचार, आणि विशेषतः या लिखाणाला विरोध करताना आलेलं लिखाण पहाता त्यातून डोकावणारे अवैद्यानिक समज दूर करण्याची निकड वाटते.

चिदानंद पाठक असं म्हणतात की "सर्व विज्ञान शाखांच्या ज्ञात अभ्यासाचा शेवट पी.एच.डी. ने (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी- तत्त्वज्ञान) होतो." संशोधनाची सुरूवात करणाऱ्यांसाठी पीएच.डी (पी.एच.डी. नव्हे) ही फक्त सुरूवात आहे. पीएच.डी करताना दिशा शोधायची कशी, हे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण मिळतं. आपल्या क्षेत्रात सध्या काय सुरू आहे, कोणकोणत्या पद्धती संशोधनात वापरल्या जातात अशा प्रकारची संशोधनाची प्राथमिक माहिती या वर्षांमधे मिळते. विज्ञान शाखांच्या मुळातून अभ्यासाची ही सुरूवात असते. आणि या पदवीच्या नावात तत्त्वज्ञानाचा उल्लेख असेल तरीही विद्यान विषयातल्या संशोधनाच्या प्रबंधांमधे फक्त विज्ञानच दिसतं, त्यात कुठेही तत्त्वज्ञानाचा उल्लेखही येत नाही. ऐतिहासिक कारणांमुळे पदवीला हे नाव पडलं, ते तसंच वापरलं जातं. शब्दकोशात 'देव' हा शब्द सापडतो म्हणूनच देव प्रत्यक्षात आहे हा तर्क जितपत ढिसाळ आहे तेवढाच श्री. पाठक यांचा तर्कही ढिसाळ आहे.

काही किंवा अनेक शास्त्रज्ञांना देव, अज्ञाताची आवड आहे म्हणून ते सगळं खरंच हा त्यांचा तर्कही तसाच ढिसाळ आहे. काही लोकांना एखादी गोष्ट पटते म्हणून ती खरी मानणं किंवा त्यावर विश्वास ठेवणं हे व्यक्तीपूजेचं लक्षण आहे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचं नाही. दुसऱ्या एका पत्रात श्री. शामसुंदर गंधे आईनस्टाईनचा दाखला देऊन देवाच्या अस्तित्त्वाचा पुरावा देतात. पण खरंतर काही लोकांच्या मते आईनस्टाईन देव मानतही नसे. दुसरं आणि अधिक महत्त्वाचं, आईनस्टाईननेच जसा सापेक्षतेचा किंवा ब्राऊनियन गती आणि अन्य भौतिकी सिद्धांत मांडले तसा देव असण्याचा काहीही सिद्धांत मांडला नाही. कोणीही थोर वैज्ञानिक देव मानत असेल तरीही विज्ञान फक्त निरीक्षण आणि गणितांमधून सिद्ध झालेल्या गोष्टीच स्वीकारतं. कोणी एक माणूस काहीतरी मानतो म्हणून इतरांनी त्याचा स्वीकार करावा ही विज्ञानाची पद्धतच नाही. हे फारतर स्वतःच्या श्रद्धा-अंधश्रद्धांचं समर्थन असू शकेल.

श्री. गंधे म्हणतात, "पूर्वीची माणसे अडाणी होती. त्यांना निसर्गनियमांचे काहीच ज्ञान नव्हते; भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा नैसर्गिक संकटांना घाबरुन त्यांना देव नामक रक्षणकर्त्याची कल्पना गृहित धरली इ. गृहितके माझ्या मते पत्रलेखकांसारख्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली तर्कटे आहेत." ही अशी मतं अद्ययावत संशोधन माहित नसण्याचं लक्षणं आहेत. अॉस्टीन (टेक्सस, यू.एस.) च्या आणि जगभरातल्याही इतर काही संशोधकांनी वेगवेगळ्या वयाच्या, मतांच्या लोकांवर अनेक मानसशास्त्रीय प्रयोग केले, लोकांच्या मेंदूचे वेगवेगळ्या प्रकाराचे वि्चार करत असताना स्कॅन्स घेतले. त्यातून त्यांना जे लक्षात आलं तेच नानावटींनी लिहीलेलं आहे. (कोणीतरी याची खातरजमा करा.) पूर्वीच्या लोकांना पुरेसं विज्ञान माहित नव्हतं. पूर, भूकंप, इ नैसर्गिक संकटं आणि त्यातून होणाऱ्या हानीला तोंड देताना नैराश्य येऊ नये यातून देव या संकल्पनेची निर्मिती झाली. प्रयोगातून सिद्ध झालेलं विज्ञान खोडून काढताना "माझ्या मते ही फक्त तर्कटं आहेत" हा पुरावा पुरेसा नाही.

या सगळ्यातून एक उद्वेगजनक गोष्ट दिसते ती अशी की पाश्चात्य देशांमधे टीव्हीवर, वृत्तपत्रांमधून, अललित पुस्तकांमधून आधुनिक विज्ञान, हे सगळं संशोधन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याकडे (मराठी आणि अन्य कोणत्याही भाषेत) या प्रकारच्या प्रचाराचा फारच तुटवडा आहे. सध्या आपल्या स्थानिक विद्यापीठात काय संशोधन सुरू आहे याची कल्पना तिथल्या उत्साही लोकांना सहज मिळते, आपल्याकडे या बाबतीत निराशाजनक स्थिती आहे. प्रा. वालावलकरांसारखे लोक समाजाभिमुख लिखाण करून संशोधन आणि संशोधक वृत्तीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत असताना, सुजाण म्हणवणारे लोक त्या कामात खोडा घालू पहातात, ही परिस्थिती अधिक उद्वेगजनक आहे.

---

टिप: "खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो" - या वाक्याचा आगापिछा मला समजला नाही. (म्हणूनच) मला हे विधान भंपक वाटतंय आणि त्याचाही थोडा समाचार घेणं आवश्यक वाटतंय. उगाच काहीतरी मोठमोठे शब्द वापरून आपल्याला सगळं समजतं असा आव आणण्याचा एकंदर समाचार घेण्याची आवश्यकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. ’पण खरंतर काही लोकांच्या मते आईनस्टाईन देव मानतही नसे.’ या वाक्याची गरज नाही. आपण पुन्हा तीच चूक करतो आहोत, वैज्ञआनिकांचं मत रिफर करण्याची.
२. ’प्रयोगातून सिद्ध झालेलं विज्ञान खोडून काढताना "माझ्या मते ही फक्त तर्कटं आहेत" हा पुरावा पुरेसा नाही.’ या वाक्याऐवजी ’प्रयोगातून सिद्ध झालेलं विज्ञान खोडून काढताना पुराव्याशिवाय मांडल्या जाणार्‍या वैयक्तिक मताला काहीही किंमत नाही' असं वाक्य अजून स्पष्ट होईल असं वाटतं.

अजून काही सुचल्यास टंकीन. या पत्रोत्तराची डेडलाईन काय असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

...सध्या आपल्या स्थानिक विद्यापीठात काय संशोधन सुरू आहे याची कल्पना तिथल्या उत्साही लोकांना सहज मिळते, आपल्याकडे या बाबतीत निराशाजनक स्थिती आहे. प्रा. वालावलकरांसारखे लोक समाजाभिमुख लिखाण करून संशोधन आणि संशोधक वृत्तीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत असताना...

'शिव शिव रे काऊ, हा पिंडाचा घेई खाऊ' या लेखातून आपल्या (फॉर द्याट म्याटर कोणाच्याही) स्थानिक विद्यापीठांत काय संशोधन चालू आहे, याची कल्पना उत्साही (किंवा, फॉर द्याट म्याटर, निरुत्साहीसुद्धा) लोकांना नेमकी कशी बरे मिळते? फॉर द्याट म्याटर, यनावालांच्या कोणत्याही लेखातून? (नाही म्हणायला, यनावालांच्या सुरुवातीच्या 'तर्कक्रीडा' बर्‍या असत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या गावात पॉप्युलरायझेशनसाठी लेक्चरं वगैरे असतात. भारतात असं काही दिसत नाही.

यनावाला विशिष्ट विषयाबद्दल नाही पण साधारण विज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन याबद्दल लिहीतात असा माझा समज आहे. (मी त्यांचं लिखाण फार वाचलेलं नाही. आणि यावेळचं नाहीच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या गावात पॉप्युलरायझेशनसाठी लेक्चरं वगैरे असतात. भारतात असं काही दिसत नाही.

हा पूर्णपणे वेगळा विषय आहे, असे वाटत नाही काय?

(मी त्यांचं लिखाण फार वाचलेलं नाही. आणि यावेळचं नाहीच.)

ते वाचा! शक्यतो बिफोर साइनिंग ऑन द डॉटेड लाइन वाचलेत, तर बरे. (नाही म्हणजे, ते 'विवेकी' वगैरे ठरेल, म्हणून हो!)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

च्यामारी, यनावालांचे लिखाण 'वाचा' म्हणून ऑफ ऑल द पीपल मी कोणालातरी आयुष्यात कधी सुचवेन, असे वाटले नव्हते. 'चमत्कार, चमत्कार' म्हणतात, तो हाच असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते.
असो.... टंकाळा आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही.
सहमत आहे. दाभोलकर यालाच त्यांच्या पुस्तकात 'विज्ञान हे नम्र असते' असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

Smile
Great great great!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंधे म्हणतात - "देवाला मानले याचा अर्थ जीवनातील चांगुलपणा, भलेपणा, प्रामाणीकपणा, बंधुभाव इ.इ. चांगल्या व रचनात्मक कल्पना असायलाच हव्यात""

मग पुराणातील हिरण्यकश्यपू, भस्मासूर, त्रिपुरासूर आदि राक्षस जे की देवांना प्रसन्न करुन घेत त्यांच्यामध्ये या मूल्यांची कमी का भासते?
____________

मला वाटते मूल्याधिष्ठीत निष्ठा आणि ईश्वरवाद या भिन्न गोष्टींची गल्लत गंधे करत आहेत. निरीश्वरवाद = मूल्ये तुडविणे जितके चूकीचे आहे तितकेच ईश्वरवादी = मूल्ये जोपासणारी व्यक्ती ही श्रद्धा चुकीची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण गंधे?

धन्यवाद.
==============================================
प्रश्न र्‍हेटॉरिकल आहे. कृपया स्पष्टीकरण न देऊन मेहेरबानी करावी. आगाऊ आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न र्‍हेटॉरिकल आहे. कृपया स्पष्टीकरण न देऊन मेहेरबानी करावी. आगाऊ आभार.

ROFL ROFL hahaha

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न वी बाजू ह्यांनी "श्री गंधे हे कोण आहेत" ह्या अर्थी प्रश्न विचारलेला नाही.
त्यांच्या वाक्यातील प्रश्नचिन्ह चुकीच्या जागी पडले असावे.
आपल्या घरी कसे पाव्हणे आल्यावर आपण सहजच
"कोण, जाधवसाहेब का? या; या. बसा. " अशी औपचारिक सुरुवात करतो तसा तो संवाद असावा.
प्रतिसादकर्ता घरी चार घटका दार उघडे टाकून शांत बसला असता अचानक श्री गंधे हे न सांगता सवरता
ऐनवेळी प्रतिसादकर्त्याकडे येउन टपकले असावेत.(अनवेलकम गेष्ट का काहीतरी म्हणतात ना, तसेच.)
आणि मग प्रतिसादकर्त्याने
"कोण? गंधे?"
"धन्यवाद"(हे खास एका शहरातील वैशिष्ट्य. "गुड बाय" ला धन्यवाद म्हणत दार तोंडावर आपटणे.)
असे म्हणत दार गंध्यांच्या तोंडावर आपटले असावे असा आमचा कयास आहे.
.
.
.
तस्मात्
कोण गंधे?

धन्यवाद.

हा संवाद

कोण ? गंधे???

धन्यवाद.
आसा वाचून धादकन दार बंद केल्याची कल्पना करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असं कं करतोस मनोबा?

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यनावालांची पत्रलेखन शैली फार वेधक असते. त्यांच्या हे शाश्वत ज्ञान नव्हे! या एका उत्तम उपहासात्मक पत्रा बद्दल मिपावर चर्चा झाली होती.
मी काही संदर्भ वा लिंका वेळोवेळी दिले तर काही लोकांना त्याचा मानसिक त्रास होतो असे माझे निरिक्षण आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याची मुभा सर्वांनाच आहे. पण काही लोक असे असू शकतात कि त्यामुळे त्यांची सोय झाली वा त्यांना ते उपयुक्त वाटते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

होय, द्या लिंका. बरं पडतं ते. आधी वाचायचं सुटलेलं तिथल्यातिथे मिळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ज्याला उत्तर म्हणून सकाळ मध्ये गंधे वगैरे मंडळींनी यनावाला ह्यांना उद्देशून पत्रे लिहिली आहेत; ते मूल यनावालाम्चे पत्र मिळेल काय?
त्यांची दोन तीन पत्रे मागील काही दिव्सतात चर्चेत आहेत :-
१.मिपावर चर्चा झालेलं गीतेच्या उपहासाबद्दलचं पत्र
२.शंकराचार्यांबद्दलचं भन्नाट पत्र.( "कोहम् ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायची काय गरज? त्याचे उत्तर हरेकाच्या पॅनकार्डवर दिलेले असते " असे विधान करणारे पत्र)
३. वैज्ञानिकांनी आस्तिक असावं का वगैरे धर्तीचं पत्र
ह्यातली जितकी पत्रे इथे उपलब्ध होतील, तितके बरे राहिल.
घरी मला सकाळ पेप्राच्या रद्दीमध्ये ही पत्रे सापडली नाहित.
कुनाकडे सॉफ्ट्कॉपी असेल तर इथे डकवावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख न वाचता त्यावरचे आक्षेप वाचून पत्रावर सही करणे, हे विवेकवादी भुमिकेशी विसंगत आहे. यनावालांचे लेखन जालावर वाचले असल्याने त्यांच्या मूळ लेखात प्रामाणिक पण भाबडा युक्तिवाद असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचूनच सही होइल. सध्या लेखाच्या शोधात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मान्य आहे. कुणाकडे मूळ लेख मिळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'शास्त्रज्ञांनी अस्तिक नसावे' या माझ्यामते 'अजून ठामपणे म्हणता येणार नाही' पण 'मत म्हणून मांडण्याचा अधिकार वापरला आहे' अशा यनावालांच्या लेखाला इतर शास्त्रज्ञांनी जो अशास्त्रीय विरोध केला तो त्यांनी (तसा) करू नये अशी जी काही ऐसीकरांची भूमिका आहे तिला माझा तत्त्वतः पाठिंबा आहे.

प्रत्येक काळात एका विचारसरणीची चलती असते. आज विवेकवाद आणि वैज्ञानिकता यांची चलती आहे. तथाकथित बुद्धिवादी स्वतःचा या नव्या फॅशनसोबत संबंध जोडू पाहतात. त्यांना त्यात खरी आस्था नसते. खरे ज्ञान तर नसतेच. फक्त ग्लॅमर पाहिजे असते. हे लोक टगे लोक दांडके घेऊन उभे राहतात आणि विरोधकांचा आवाज दाबतात. कालांतराने तत्त्वज्ञानाचे खरे रुप समोर येते, किंवा दुसरे खरे तत्त्वज्ञान समोर येते तेव्हा हे लोक मूर्ख, हास्यास्पद, स्वार्थी, इ होते असे समाजाला कळते. शुद्ध विज्ञान व विवेक यांचे महत्त्व किती याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारुच नये. पण त्यांच्या प्रत्येक तत्त्वाचा/शोधाचा अर्थ 'समाजाला' जोडून लावायचा हे काम सांभाळून करावे.

एक ऐसी कर म्हणून वरील पत्राच्या सुराबद्दल माझे मत मी देत आहे. 'इश्वर आहे वा नाही याबद्दल ऐसीची स्वतःची भूमिका काहीच नसावी' असे मला वाटते. केवल एका सापेक्ष, व्यक्तिगत विचाराला 'अवैज्ञानिक विरोध', तोही वैज्ञानिकांनी करू नये असे म्हणावे.

ऐसी हा विवेकवादी फोरम असावा, ती एक विवेकसेना (विवेकवादी + शिवसेना) नसावी अशी इच्छा आहे.

मी इथे एक उदाहरण देतो (देव आहे/नाही, म्हणजेच निसर्ग सम्यक आहे/नाही म्हणणे किती अवघड आहे त्याबद्दल):

राजीव साने म्हणतात - सम्यक निसर्ग: एक शुद्ध भंकस. त्यांचा लेख 'नीट' वाचला तर त्यांना काय म्हणायचे आहे ते रिफ्रेज करावे लागेल. त्यांना अभिप्रेत आहे - निसर्गातला कोणताही (अल्पसाही) भाग सम्यक आहे हे १००% सर्वाथाने भंकस आहे. आता साने सर्वाथाने १००% निसर्गाचा भाग आहेत, नसर्गच आहेत. म्हणजे त्यांचे विचार देखिल निसर्गाचाच भाग/निसर्ग आहेत. लेखाचा आशय १००% सत्य असेल तर, साहजिकच सान्यांचे विचार १००% भंकस आहेत. भंकस म्हणजे १००% खोटे. म्हणजेच तेच म्हणताहेत कि मी जे काय म्हणतो आहे ते खोटे आहे आणि मी म्हणतो आहे कि निसर्गात सम्यकत्व नाही. म्ह्णजे निसर्ग सम्यक. शिवाय हे सानेच म्हणताहेत. असो.

विज्ञान हळूहळू प्रगती करत आहे. त्याला मानवी जीवनाची आणि निसर्गाची बरीच तथ्ये कळतील अशी आशा करू. तोपर्यंत जंपिंग द गन हा प्रकार टाळू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'इश्वर आहे वा नाही याबद्दल ऐसीची स्वतःची भूमिका काहीच नसावी' असे मला वाटते

+१ या बाबतीत (आणि फक्त याच विधानापुरते) सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(आणि फक्त याच विधानापुरते)

विवेकसेनेचे सोवळे फार घट्ट बांधता ब्वॉ आपण!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Smile
ज्याचा त्याचा दृष्टीकोन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. शास्त्रज्ञांनी सश्रद्ध असावं की अश्रद्ध याबद्दल कोणी कै बोलायचं काम नाही. त्यांच्या तथाकथित अंधश्रद्धेचा कामावर कै परिणाम झाला तर विरोध ठीक, नपेक्षा या वांझोट्या विरोधाला आजिबात अर्थ नाही.

बाकी विवेकसेना हा शब्दप्रयोग लाईकवण्यात आलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी विवेकसेना हा शब्दप्रयोग लाईकवण्यात आलेला आहे.

उगीचच वानरसेना हा शब्द आठवला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वानरसेनाच तर काय! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा वानरांचा अपमान आहे. शब्द मागे घ्या!

- ([समस्त मर्कट- आणि वानर-गणांचा अनभिषिक्त-स्वनियुक्त प्रतिनिधी या नात्याने] संतप्त) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा, तेही बाकी खरंच म्हणा. शब्द मागे घेतल्या गेला आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं