फट्याक!

"फट्याक" असाच आवाज असावा बहुतेक.. तिथे दिल्लीत वाजला आणि इथे पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले. झालं हाफिसांमधून "लवकर निघा सुरक्षित पोचा" चे निमित्त सुरू झाले. हाफीस बसकडे जाऊ लागलो तर बहुदा अख्खे हाफीस बस कडे जात असावे. चहुकडे अर्धी जनता मोबाईलला अन मोबाईल हा शरीराचा अवयव असल्याप्रमाणे कानाला चिकटलेले होते.
"जर आता गेलो नाही तर बहुदा बसेस सुटाच्याच नाहीत, तेव्हा मी निघतोय ती मिटींग ऑनसईट वरून अटेंड करा आणि काम चेन्नई डीसी वाल्यांना करायला सांग. उद्या ऑफीस असेल की नाही सांगता येत नाही. (!! ) म्यानेज कर तिथुनच" हे सांगून होताच घरी फोन "अगं उद्या दांडी मारतोय, तुही मार, उद्याच्या संध्याकाळची दोन तिकीटं काढ"

दुसरीकडून " हॅलो हा चढले बसमध्ये, नाही इथे अजून काही नाही" असं एक युवती चिंताग्रस्त सुरात पण तीव उत्साहात कोणालातरी सांगत होती.

बस एकदम प्याक होती! नशीब लोकांनी ड्रायवरसाठी जागा सोडली होती. वेळेवर बस सुटली आणि मी कानाला लावलेल्या गाण्याच्या लयीत पुढल्या दोन मिनीटात झोपी गेलो.

====

"ठाक ठाक"
'काय झालं? ' या विचाराने मी दचकून जागा झालो. दोन मिनीटे काही कळेचना. आजुबाजुची मंडळी आणि बस जागच्या जागी उभी राहिली होती. काहीच कळेना. मग जरा परिस्थितीचा अंदाज घेतला तर कळलं की कोणीतरी आमची बस अडवली आहे. बाहेर आमच्या पुढल्या बस निघून गेल्या होत्या आणि आमच्याच बससमोर साधारण १८-१९ वर्षाच्या दोन चार पोरांनी हातात काठी घेऊन बस अडवली. त्यांच्याकडे एक स्पेअर टायर तयारच होता. तो लगोलग पेटवून देण्यात आला; आणि रस्ता अडवला गेला.
गंमत अशी कोणीच घाबरल्यासारखे वाटत नव्हते. बाईकवाले तर त्या जळत्या टायरच्या बाजुने बाईक काढून निघून जात होते. त्या पोरांकडे बघून कोणाला भीती वाटावी असं काही त्यांच्यात नव्हतं. संध्याकाळी काहितरी टैमपास हवा म्हणून हे करताहेत असा काहिसा भाव होता.
गाडीतली मंडळी आता जरा गंभीर झाल्यासारखी भासली. एकाने डायवरला विचारले
"बाजुने निघेल का हो बस? "
"च्यॅक"
डायवरने एक नकारात्मक आवाज काढला आणि शांतपणे आगीकडे बघत बसला होता. त्याने गादीचे दार लॉक केले होते. त्यामुळे बाहेर पडता येत नव्हते. मग मागच्या सीटवरच्यांनाही आग बघाविशी वाटू लागली. त्यांची पुढे येण्यासाठी धडपड सुरू झाली. आधीच बसच्या प्यासेजात आम्ही पुढचे सगळे उभे होतो. आम्ही आमची 'बाल्कनी' सीट सोटायला तयार नव्हतो. समोर टायर जाळणारी पोरं नुसतीच उभी होती. ना ओरडत होती, ना घोषणा. अगदी 'अहिंसक' निषेध होता; ) काही क्षण अश्या विचित्र शांततेत गेल्यावर हाफिसात फोनाफोनी झाली. हाफीसने निघताना या घटनांची शक्यता लक्षात घेऊन एक Emergency Contact नंबर दिला होता. त्यांच्यावर फोनचा इतका भडीमार झाला की विचारायही सोय नाही. त्यांना परिस्थितीची कल्पना आलीच होती. ते आता सांगत होते बसमध्येच बसा आणि प्लीज अजून कोणी फोन करू नका. आम्ही योग्य सुत्र हलवतो Smile
"आता काय? " हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात होता. दरम्यान काही मोबाईल फोटोग्राफर पुढे सरसावले. आपल्या मोबाईलच्या टिचभर क्यामेरातून जणूकाही ही आयुष्यातील शेवटची लावलेली आग बघतोय अश्याप्रकारे त्या गिचमिडीत जमतील तितक्या अँगलने फोटो काढण्याचा सपाटा सुरू झाला. एखाद्या जळत्या टायरच्या नशिबी असे 'पोर्टफोलियो शुट' कधी आले नसेल. आता मागच्या बसमधल्यांची भिड चेपू लागली होती. विविध कंपन्यांचे आयटी हमाल आणि आजुबाजुच्या गावातील, वस्तीतील मंडळी जणू काही होळी पेटल्यावर जमावं तसं त्या आगी भोवती जमली होती. अजून हे चाललं असतं तर बहुदा फेर धरून मंडळी नाचतील की काय वाटू लागलं.
आमच्या बसच्या बाहेरच टायर पेटवल्याने डायवरने दार उघडायला नकार दिला.
"बाहेर जाऊन काय करणार, हिथुनच बगा की" इति डायवर
समोर नवे काहिच घडत नसल्याने मंडळी आपापल्या शिटांवर परतली आणि मग अचानक बसमध्ये एक नवी साथ पसरली
"हॅलो! अरे यु नो व्हॉट! वी आर स्टक इन अ दंगल!" अश्या भाषेत भयंकर एक्साईटमेंटने भरलेल्या आणि भारलेल्या फोनचा महापूर आला. जो तो आपल्या "भयंकर" परिस्थितीचे वर्णन एकमेकांना अगदी चवीचवीने करून सांगत होता. माझ्या शेजारच्या तरुणीला तर आपण कोणीतरी सेलिब्रीटी झालोत असेच वाटू लागले होते. मोबाईलमध्ये जो नंबर असेल नसेल त्या प्रत्येक नंबरवर तिने बहुदा फोन केला असावा
"या! जस्ट इन फ्रंट ऑफ मी! यु नो इटस सो होरीबअल! हो मी काढलेत फोटो, या आयविल पुट इट ऑन फेसबुक. "
दुसरीकडून आवाज आला
"तेच म्हणतेय मी आम्हाल जाऊ द्या मग जाळा काय हवं ते! अगदी स्वतःलाही जाळून घ्या हवंतर! "
मी गार!
मागे कोणाला तरी आपण एखाद्या अॅक्शनपटाचे हिरो असल्यासारखं वाटत होतं
"च्यामारी! उतरू का खाली. सांगतो त्यांना अहिंसक आंदोलन म्हणजे काय असं टायर जाळणं का? स्वतः जाऊन ते टायर बाजुला करतो, बघू कोण काय करतं ते! मग जाऊ द्या बस! "
असं म्हणून तो तावातावाने डायवरकडे गेला. डायवरने शांतपणे त्याचं बोलण ऐकून फक्त "बसा मागं, माजी नोकरी घालवता काय! " असं म्हणून फक्त खिडकीबाहेर एक तमाखुची निषेधात्मक पिचकारी सोडली.
आता समोरच्या वस्तीतून काही बायका हातात कसलेसे डबे घेऊन येताना दिसल्या. अनेकांची उत्सुकता चाळवली. त्या तर तोंडानं काहितरी ओरडत होत्या. धुर येतो म्हणून खिडक्या बंद केल्या असल्याने काय ओरडताहेत कळत नव्हतं. आता या बायका काय करणार याची उत्सुकता बघ्यांमध्ये लागली. त्यांच्या हातात काय आहे हेही त्या अंधारात, धुरात कळेना. जसजसं त्या जवळ आल्या तसतसं चित्र स्पष्ट झालं. लोक थक्क होउन त्यांच्याकडे बघत होते. त्या बायकांनी नेत्याच्या नावाने दोनचार घोषणा दिल्या आणि चक्क हातात असलेला कचऱ्याचा डबा त्या आगीत ओतला. घरातील, वस्तीतील सगळा कचरा त्या आगीत ओतल्यावर त्या आल्या तशा वस्तीत लुप्त झाल्या! तो प्रसंग बघून हसावे का रडावे हे समजेना.
मग अचानक पोलिस अवतीर्ण झाले, त्यांनी त्या पोरांना कोपच्यात घेतलं. आत हे पोलिस आग विझवतात कशी हे बघण्यासाठी गर्दी पुन्हा बसच्या पुढल्या भागात गोळा केली. मग "पाणी पाणी" अश्या आरोळ्या झाल्या. त्याआगी भोवती असलेल्या एका सुबक ठेंगणीने हातातील बिसलरी बॉटल एका हवालदारापुढे केली. त्यानेही ती मिष्कीलपणे ती घेतली आणि एका टायरवर ओतून दिली! आता एवढ्याशा पाण्याने त्या आगीला काहिही झालं नाही!
"ओह मुझे लगा आपको पिने को पानी चाहिये"
"हॅ हॅ हॅ, काय म्याडम, छोडो, जाके बसो बस मे! "
मग रितसर रेती आली, आग विझली आणि आम्ही घराकडे मार्गस्थ झालो!
या प्रवासात गाडीतील समस्त स्त्रीवृंदाला कंठ फुटलेला होता. आणि "यु नो व्हॉट हॅपंड!.. ' अशी प्रस्तावना करून आपण जणू मोठे शौर्य गाजवून एका राजकीय दंगलीतून वाचून, राष्ट्रीय पसिद्धी मिळवून घरी चाललो आहोत, अश्या थाटात हा प्रसंग अगदी उत्साहात, चवीचवीनं अर्ध्या भारताला कळवला गेला असावा!

टीप: लेखनात टंकनदोष आहेत. ते वेळ मिळताच सुधारले जातील

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (12 votes)

प्रतिक्रिया

>>गंमत अशी कोणीच घाबरल्यासारखे वाटत नव्हते. बाईकवाले तर त्या जळत्या टायरच्या बाजुने बाईक काढून निघून जात होते. त्या पोरांकडे बघून कोणाला भीती वाटावी असं काही त्यांच्यात नव्हतं. संध्याकाळी काहितरी टैमपास हवा म्हणून हे करताहेत असा काहिसा भाव होता.

या आंदोलन सदृश घटना या कोणाला घाबरवण्यासाठी, इजा करण्यासाठी नसतातच. आपली निष्ठा कमी दिसू नये याची खबरदारी घेतली जात होती. लवकरच महानगरपालिका निवडणुका आहेत. ज्याच्या वॉर्डात निदर्शनं झाली नाहीत त्या इच्छुकाचे तिकीट कट. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लैच भारी अनुभव. लेखनाची श्टाईल पु.ल. टाईप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचताना मजा आली.हीच थप्पड ठाकरेंना मारली असती तर सगळा महाराष्ट पेटून उठला असता असे काल कुणीतरी कुणाला सांगताना ऐकले. ज्याला सांगितले त्याने सांगणार्‍याकडे चष्म्याच्यावरुन नाना पाटेकर ष्टाईल बघितले."अबे तू च्यूत्या है क्या?" त्याने विचारले."यहां लोगोंके खानेके वांधे पडेले है और तू जलानेकी बाते करेला है? अब देख तू, कोईबी कुचबी करे, लोगोंको घंटा फर्क नही पडनेवाला..." निर्बुद्ध समाज ते बथ्थड समाज ही क्रांती बघून फार बरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

नितीन थत्ते व संजोपरावांशी सहमत.
खळ्ळ खटॅक ते फळ्ळ फटॅक !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वास्तवदर्शी, वैचारिक, आणि रंजक तीन्ही एकाचवेळी झालय.
"म्हैस" ची खूपच छाप जाणवली. पण मस्तच. काल आमचीही बस अशीच(खरोखरच) पांढरे कपडेवाल्यांनी अडवली. टायर वगैरे नाही, पण झेंडे दाखवत चाल्ली होती पब्लिक.
त्यांच्या मागून पोलिसही चालले होते.थोड्यावेळाने पोलिसांचे दंडुके पांढरे कपडेवाल्यांच्या हातात अन् पांढरेकपडेवाल्यांचे झेंडे पोलिसांच्या हातात! असे दृश्य होते.
दुर्दैवाने छायाचित्र काढू शकलो नाही.(नोकिया ६०३० वापरल्यावर काय होणार)

"निर्बुद्ध समाज ते बथ्थड समाज ही क्रांती बघून फार बरे वाटले."
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काल आमची बस उगाच अडकून पडली होती १५-२० मिनीटे. काहीही थरारक वा मजेशीर झाले नाही. बस अडकलेली असतानाचा वेळ शांतपणे झोप काढून सत्कारणी लावला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेजला असतानाची गोष्ट आहे.पुतळाविटंबनामुळे भुसावळच्या काही सफेद गळपट्टी लोकांना रास्ता रोको करायचे होते.जळगाव-नागपूर रस्त्यावर नाहता चौफुली पेटंट, म्हणून ८/१० जन झेंडे घेवून टपरीवर उभे, ३/४ पोलीस दंडुका घेवून, २ फोटो काढणारे.
नेमके त्यादिवशी रहदारी कमी होती.
एक्का दुक्का ट्रक येत जात होते.म्हणून पोलिसाने ४/५ ट्रक आडवा हात देवून थांबवले झेंडे वाल्यांना लगबगीने पाचारण केले फोटोवाल्याला म्हणे काढ लवकर आणि मग ट्रक वाल्यांना म्हणे जा आता.
असला रास्ता रोको. आम्हीपण त्याच टपरीवर सकाळचा चहा ढोसत होतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अमेरीकेत असतो अन इथे काहीच घडलं नाही...अगदी बुशला चप्पल फेकुन मारल्यावरदेखील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आसं का? बॉरं बॉरं.
पुलंच्या म्हैस ची आठवण झाली. छान लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मजा आली वाचताना Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅहॅहॅ..मस्त..रंजक...पुलकित. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लई भारी अनुभव कथन!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून मजा आली. "म्हैस" ला उत्तम सलाम ठोकलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"इस थप्पड की गूंज" आणखी कुठे कुठे पोचणार आहे देव जाणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हॅलो! अरे यु नो व्हॉट! वी आर स्टक इन अ दंगल!"
"या! जस्ट इन फ्रंट ऑफ मी! यु नो इटस सो होरीबअल! हो मी काढलेत फोटो, या आयविल पुट इट ऑन फेसबुक. "
ही वाक्यं म्हणजे अगदी अर्क आहेत. मध्यम व उच्चमध्यमवर्गीय मानसिकतेचं उत्तम दर्शन. अतिशय साध्या शब्दांत टंग इन चीक टिप्पणी. दंगलही लुटुपुटूची, लोकांना वाटलेली भीतीही तशीच कचकड्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुष्यात २-३ दंगली पाहिल्यात
८ दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या संचारबंदी. अन माझ्या व्यवसायामुळे असलेले प्रिव्हिलेज्ड स्टेटस, ज्यामुळे मी अँब्युलन्स मधे गावभर फिरू शकत होतो, अन पाहू शकत होतो.
I can tell you, its no joking matter.
मूठभरच गुंड सगळ्यांना वेठीस धरतात. पण त्यांचा आवाज चालण्याचं एकमेव कारण म्हणजे ज्या गल्लीत ते गोंधळ घालत असतात, तिथले तुमच्यामाझ्यासारखे लोक घरात बसून रहातात. मनातले विखार काढून टाका. शेजार्‍यांशी मैत्री ठेवा, हाक मारली की ४ तरूण पोरे उभी रहातील असे पहा. आपल्या भागातली दंगल नुसत्या आवाज देऊन बंद होते. पोलीस लागत नाहीत.
हे जर केले नाही, तर मात्र कठिण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सगळ्या वाचकांचे अनेक आभार. आवर्जुन प्रतिसाद,चांदण्या देणार्‍याचे विषेश आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मजेशीर, रोचक आणि वर्तमानातलं लिखाण. मलाही पुलंची 'म्हैस' आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'म्हैस'चा वापर करून आताच्या शिक्षित लोकांचा अडाणीपणा मस्तच रेखाटला आहे, म्हैस मधल्या लोकांची आठवण येण्यासारखाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मस्त लिहिले आहेत, ऋषिकेशजी! संपुर्ण बस अगदी डोळ्यासमोर उभी केलीत. वरती काही प्रतिसाद पुलंची "म्हैस" डोळ्यासमोर आणलीत असे म्हणत आहेत.. मी तर म्हणेन की त्याही पेक्षा कैकपटीने सुपिरीअर असा हा लेख झाला आहे.

(बाकी हिंसा ही कुठल्याच प्रश्नाचे उत्तर असु शकत नाही हे नक्की!)
-
इंट्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम झाला आहे. आज पहील्यांदा वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक घटना आणि मस्त खुसखुशीत वर्णन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच जमलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आजच वाचला. बर्‍याच काळापुर्वी लिहिलेला लेख असल्यामुळे दंगलीचा नक्कि सन्दर्भ कळला नाही पण त्याने काहि फरक पडला अस वाटल नाही. एकदम चित्रदर्शी वर्णन आणि मिष्किल शैली. मजा आ गया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिश्किल लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0