आला थंडीचा महीना..

आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा..मला लागलाय खोकला..

पण शेकोटी पेटवून खोकला काही जात नाही. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला, ताप सुरु होतं अन जाता जात नाही.
प्रत्येकवेळी डॉक्टरकडेच जायला हवं असं नाही तर घरच्याघरी स्वयंपाकघरातील जिन्नस वापरूनसुद्धा बराच फरक पडतो हे आजीबाईच्या बटव्याने दाखवून दिलंय.

असेच काही उपाय:-

घशात खवखव
झाली कि दुधाला उकळी आणून त्यात बाजूला ठेवलेली एक मोठा चमचा हळद अन थोडा गुळ घालून एकजीव करून झेपेल तितकं गरमगरम प्यावं. रोज एकदातरी हा उपाय आठवडाभर केला तर त्रास जातो हा माझा अनुभव. हे प्यायल्यावर तास दोन तास पाणी किंवा इतर काही खाऊ पिऊ नये म्हणजे हळदीला काम करायला वेळ मिळतो.
सूचना: हळद अन गुळ यांना इतर मसाल्याचे अंश लागलेले असू नयेत. म्हणजे आपण ज्या मोठ्या बरणीत बाजारातून जिन्नस आणल्यावर काढून ठेवतो त्यातूनच स्वछ चमच्याने काढून घ्यावं.

सर्दी झाल्यावरसुद्धा बरेचदा याचा उपयोग होतो. झालंच तर पाण्यात भरपूर आलं घालून भरपूर उकळून घेऊन मग gas बंद करायच्या वेळी चहा टाकून त्यावर झाकण ठेऊन ५ मिनिटांनी नेहमीप्रमाणे चहा घ्या. नाक मोकळं होईल.

झोपताना किंवा दिवसातही कपड्याला (नाकाच्या अगदी खाली) निलगिरी तेलाचा थेंब लावा. आराम पडतो.

तुम्हालाही काही आठवलं तर सांगा. शक्यतो स्वत: केलेले उपायच सांगा..म्हणजे अगदीच नविन काहीतरी सुचवायचं म्हणुन डोकं लढवु नका.

field_vote: 
2.81818
Your rating: None Average: 2.8 (11 votes)

प्रतिक्रिया

अशा वेळी मला तर मस्तपैकी कोन्याक किंवा तत्सम एखादं 'स्पिरिट' किंचित कोमट करून ढोसायला आवडतं! वाटलं तर त्यात थोडी दालचिनी/लवंग/ज्येष्ठमध पूड घालावी.
- अपेयपानप्रेमी जंतू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अत्र्यांची ब्र्यांडीची बाटली आठवली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे तर आमचं होम ग्राऊण्डवरचं होमपीच म्हणायला हवंय.

आजीबाईचा बटवा यालाच स्वयंपाकघरातील औषधं किंवा घरगुती उपचार म्हणता येईल.

थंडीतल्या घशाच्या विकारांवर - (वानगीदाखल)

@ घसा लाल होणं / + खोकला -
१. जेष्ठमध चूर्ण (१ चमचा) + मध / तूप / लोणी / साय
२. आवळा चूर्ण (१ चमचा) + मध / तूप / लोणी / साय
@ खोकला (कफाचा)
३. १ कप चहा (साधा / गवती) + दालचीनी चूर्ण १/८ चमचा
४. १/८ चमचा मिरपूड + १/८ चमचा दालचीनी चूर्ण + तुळस चूर्ण + मध
@ खोकला (कोरडा)
५. जेष्ठमध चूर्ण (१ चमचा) + त्रिफळा चूर्ण (१ चमचा) + २ चमचे लोणी --> चाटण करून थोड्या थोड्या वेळाने चाटणे.
६. छातीला, पाठीला तेल चोळून जिरवून शेकून घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

सामान्य सर्दी खोकल्यासाठी अनुभूत उपाय, जो कुणालाही सहज करून घेता येणं शक्य आहे -

१ कप दूध + १ कप पाणी + आल्याचा तुकडा १ सेमी (हलकासा चेचून) ---> हे मंद विस्तवावर उकळवावं ---> उकळी फुटून आधी पाणी उडून जाऊ द्यावं ---> १ कप दूध भांड्यात शिल्लक राहिल्यावर विस्तव बंद करावा ----> उरलेलं दूध (१ कप) गाळून (आवश्यक वाटल्यास गरजेनुसार साखर घालून) गरम गरम प्यावं.

अशा प्रकारे बनवून घेतलेलं आर्द्रक-दुग्ध थंडीच्या दिवसातील सर्दी, खोकला, ताप यावर उपयुक्त आहे. यामुळे लहान मुलांची भूकही वाढते.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

सर्दी- खोकल्याबरोबर इतरही गोष्टीवरच्या घरगुती उपायांची लेखमाला आवडेल.

खोकल्यासाठी अडुळशाच्या पानांचा काढा अम्ही लहानपणी घेतला आहे. त्यात मिरी, ज्येष्ठमध पूड घालून पाण्यात उकळयचं. निम्मं आटलं की गाळून थोडा थोडा प्यायचा. *अडुळसा मात्र सर्वत्र उपलब्ध असेलच असं नाही.*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा आवडला.
माझ्या अख्ख्या मेडिकल स्टोअरच्या पसार्‍यात आजीबाईचा बटवा हरवून गेलाय.

पण थंडीसाठी विक्स वेपोरब आणि निलगिरी तेल अजूनही मस्ट (आणि मस्तं) आहे माझ्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थंडीच्या दिवसात चीनच्या आजीबाईंच्या बटव्यातूनदेखील आलंच बाहेर पडतं. गरमागरम टबमध्ये एप्सम सॉल्ट घालून आंघोळ, नंतर भरपूर आलं उकळलेल्या पाण्यात संत्र्याच्या सालीची पूड घालून मस्त वाफाळ प्यायचं असा सल्ला मला एका वेबसाइटवर दिसला.

त्याच वेबसाइटवरच्या जर्मन आजीबाईंच्या बटव्यातून येते स्पाइस्ड रम. उपयुक्तता बहुतेक तिच्यातल्या दालचिनीतून येते. मस्त डीप टिश्यू मसाज, कॅमोमाइल चहा, स्पाइस्ड रम आणि झोप अशा क्रमाने उपाय आहेत. सर्दी खोकला झालेला नसतानाही हा उपाय छान वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्येष्ठमध, पूड करून किंवा काढ्यात ऊकळून तर वापरतातच, शिवाय त्याची लहानशी काडी किंचित चावून चघळत चोखली तर खोकल्याची उबळ आटोक्यात यायला मदत होते. बाजारात मिळणार्‍या खो-गो च्या गोळ्यांमध्ये कातच फार असतो. त्यापेक्षा कंठ्सुधारक वटी चांगली. पण ज्येष्ठमध चघळण्याचा मला जास्त गुण येतो.

गरम पाण्याच्या टबात बसण्याने किंवा वाफारा घेण्याने कफ पातळ होऊन सुटून येतो.

वाफार्‍यात व्हिक्स इ गोष्टी घातल्या तर मला त्याचा खूप त्रास होतो. आमच्या वैद्य वाफ घ्यायच्या वेळी त्या गरम पाण्यात एखाद- दुसरं कोबीचं पान घालायला सांगतात. हे जरूर करून बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीरीयस धागा हाय व्हय. आमास्नी वाट्लं पाभेनी कविता लिवलिया. (पाभे ह. घे रे बाबा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

आमच्याकडे एक अमृतरस नावाची तेलाची बाटली आहे. हे औषध सांगलीचे एक वैद्य तयार करतात. त्यात काही तेले व औषधांचा अर्क आहे. तेल फार तीव्र आहे म्हणून एक ते दोन थेंब एवढेच वापरावे लागते. पण सर्दी, खोकला, घसादुखी, दातदुखी, तापाची कणकण, निरुत्साह, डोकेदुखी,छातीत दाटलेला कफ, अंगदुखी अशा अनेक लक्षणांवर हे रामबाण औषध आहे. हातावर चोळून, पाण्यात घालून वाफ हुंगणे किंवा थेट त्वचेवर लावण्यासाठी एकच थेंब वापरायचा असतो. त्यामुळे आता थंडीच्या मोसमात वेगवेगळी औषधे जमवत बसण्याचा ताप वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्दी, ही सहसा व्हायरल असते.
हा सर्दीवाला व्हायरस तसा निरुपद्रवी असल्याने महागडी अँटीव्हायरल औषधे याच्याविरुद्ध तयार करण्याची वा गिळण्याची तसदी कुणी घेत नाही, म्हणूनच कदाचित असे म्हणतात, की ट्रीटमेंट केली, तर एक अठवड्यात सर्दी बरी होते. नाही, तर साऽऽत दिवस लागतात.

भरपूर विश्रांती.
हाय प्रोटीन डाएट. (चिकन सूप हे सर्दीकरता याचसाठी सांगितले जाते)
भरपूर क जीवनसत्व. (याचा नक्की रोल मला ठाऊक नाही) व लिक्विड्स.
हे ३ बेसिक इलाज आहेत.

सर्दी होऊ घातली असताना पहिल्याच दिवशी तुमच्या आवडीची "डोकेदुखीची" गोळी घेऊन भरपूर आराम केलात, अन चिकन सूप (घरच्या चिकनची उकड. बाजारातलंही चालेल, पण घरचं बेस्ट. नंतरचा रस्सा इतरांना खाऊ द्यावा. तिखट खायचे नाहिये.) तर सर्दी नक्की लवकर गायब होईल.

सर्दीसोबतचा कफ पिवळा/पांढरा हिरवा. (मघा चुकून पांढरा टंकले गेले.) झाला, अंगात तापही जास्त भरला, तर त्यात बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाले आहे. अँटीबायोटिक्सची गरज लागेल, डॉक्टरांना दाखवा.

बाकी उपचार नंतरच्या खोकल्याकरता/खवखवीकरता आहेत. कोरडा असेल, तर ज्येष्ठमध. (यात भरपूर स्टिरॉईड्स असतात.) डीमल्संट (घशाला कुरवाळणारी औषधे) म्हणून अगदी लिमलेटची गोळी किंवा खडीसाखरसुद्धा चालते. स्ट्रेप्सिल्स उगा पेपरमिंटमुळे नाक मोकळं असल्याचा भास देतात. घरगुती इलाज म्हणून घशाची खवखव कमी करण्यासाठी कपभर पाणी हळद मीठाची चिमूट टाकून उकळावे, त्यात उलूसे साजुक तूप टाकून प्यावे.

खोकला कफाचा असला, तर खोकला दाबून टाकणारी औषधे आपल्या मनाने घेऊ नयेत. लिंक्टस कोडीन इ. 'कोडीन' असलेली औषधे, ज्याला 'ब' ताईंनी मॉर्फिन म्हणून मागे उल्लेखले होते, ते कोरड्या खोकल्यासाठी आहे. खोकला दाबून टाकण्यासाठी. कफ पडत असेल तर देऊ नये.

सगळ्यात महत्वाचे,
यंग टर्क्सनी 'हीरोगिरी' करू नये. मी किती 'फिट' आहे, मला थंडीने काही होत नाही म्हणून थंडीपासून स्वत:चा बचाव करणारे कपडे, टोप्या, मफलर्स इ. वापरायला विषेशतः कॉलेजातील मुले का-कू करतात. ते त्रासदायक ठरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माहितीपूर्ण प्रतिसाद, थ्यांकू डागदरदादा.

ज्येष्ठमध. (यात भरपूर स्टिरॉईड्स असतात.)

हे माहित नव्हतं.

एक शंका आहे. स्टिरॉइड्स असलेली औषधं वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत असं ऐकलं होतं. पण ज्येष्ठमध अतिशय सुरक्षित औषध म्हणून पूर्वीपासून लोकांच्या वापरात आहे. हे कसं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कठीण उत्तर आहे, पण याला सोप्या भाषेत लोचा असे म्हणतात. डीटेल पण छोटे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

(आयुर्वेद विरुद्ध 'अ‍ॅलोपथी' अशी भरपूर भांडणे झालेली आहेत, होतात अन होत रहातील. ते भांडण कुणाला उकरून काढायचे असेल, तर कृपया नवा धागा काढून सुरू करावे, मी येईन.)

आयुर्वेद, किंवा सगळ्याच देश/संस्कृतींतील 'आजीबाईचा बटवा' ह्या अनुभवसिद्ध उपचारपद्धती (रेमेडीज) असतात. उदा. विलो झाडाच्या सालीचा काढा ताप उतरविण्यासाठी कामी येतो. या काढ्यातूनच अ‍ॅस्पिरिन मिळाले आहे. अन मग अ‍ॅस्पिरिन वरून संपूर्ण नॉन-स्टिरॉइडल-अँटी-इन्फ्लमेटरी औषधांचे इंद्रधनुष्य! (स्पेक्ट्रम)

'आयुर्वेदिक' म्हणून 'सेफ'(म्हणजे साईड इफेक्ट नाहीत) हा प्रचार काही आपमतलबी लोकांनी केलेला आहे.

'अ‍ॅलोपथी'ला मॉडर्न मेडिसिन म्हणतात. हे योग्य नामाभिधान आहे. या मॉडर्न मेडिसिनच्या दोन विशेष खुणा आहेत.
१. यात कुण्या वैद्याने अमुक औषध वा उपचारपद्धती वा शल्यक्रिया शोधली, तर पहिलेझूट तो बोंबा मारून दुनियाभरच्या इतर वैद्यांना ती सांगत फिरतो, शिकवतो. त्यापैकी सगळे ती वापरून पहातात, अन चूक असली तर कालांतराने ती पद्धती बंदही पडते, पण फार क्वचित. हे 'जुन्या' 'ग्रंथोक्त' उपचारपद्धतींत कधीच झालेले नाही. उदा. आयुर्वेद, युनानी, होमिओपथी इ.इ.इ. आणिक बरीच थेरं माजली आहेत, अगदी अ‍ॅरोमाथेरपी पर्यंत. ते असो.
२. नवे औषध निर्माण करणे हे खूप स्पेशलाईझ्ड झाले आहे. यात लॅब स्टडीज पासून, अ‍ॅनिमल ट्रायल्स, ह्यूमन ट्रायल्स अन इतर ५६ लफडी असतात, पण त्यातही एक मुख्य लफडे म्हणजे, प्रत्येक औषधाचे, 'Untoward Effects' ज्याला 'साईड इफेक्ट' असे आपण म्हणता, ते पहाणे. कधी कधी साईड म्हटलेला इफेक्ट जिंकून जातो, अन हृदयरोगासाठी बनवलेले व्हायग्रा (Sildenafil Citrate) अ‍ॅफ्रोडीझिअ‍ॅक म्हणून भाव खाऊन जाते.

मुद्दा हा, की मॉडर्न मेडिसिन प्युअर ड्रग मॉलिक्यूल बनविते, त्याचे परिणाम, दुष्परिणाम, इतर औषधांसोबतच्या अ‍ॅक्शन्/रिअ‍ॅक्शन इ. अभ्यासते, व त्याबद्दल खुलेपणाने सांगते.

हा व या प्रकारचा अभ्यास जुन्या शास्त्रांत झालेला नाही. विलो झाडाच्या सालीच्या अर्कात लाखो प्लांट अल्कलॉईड्स असतात. त्यापैकी एक अ‍ॅस्पिरिन. हे शोधून काढणे, त्याचा स्पेसिफिक उपयोग शोधणे, त्याचे साईड इफेक्ट शोधणे. नुसता ताप नाही, तर सूज कमी करणे, व कमी मात्रेत रक्त पातळ करून हृदयरोग्यांचा जीव वाचविणे हे गुणधर्म शोधणे, त्याच बरोबर, अ‍ॅस्पिरिनने अ‍ॅसिडिटी होते, याबद्दल बोंबाबोंब करणे, हे फक्त मॉडर्न मेडिसिन करते. ही दुसरी विषेशता.

तर,
ज्येष्ठमधाचे गुणधर्म 'स्टिरॉईड्स आहेत' इतपत शोधून झालेत. पुढचे संशोधन awaited.

:हुश्श: !!

स्टीरॉइड्स ही तुमच्या माझ्या शरीरात रोज बनणारी केमिकल्स आहेत. त्यांचा जास्त बाऊ करून घेऊ नका. फक्त यांना वंडर ड्रग्ज म्हणून 'आधे हकीम' वापरतात, अन ते 'खतरे जान' होते, हे ध्यानी असू द्या. याची 'फर्मॅकॉलॉजी इथे समजवून सांगणे कठीण आहे. पण वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये हे अगदी बरोबर. पण स्टिरॉईडच्या गोळ्या जश्या दमा/संधीवाता करता वर्षानुवर्षे घेता येतात, तसं ज्येष्ठमध खाणे अशक्यच! तेव्हा खोकल्यासाठी बिन्धास्त चावून खा. खूप कमी डोस आहे. काही होणार नाही.

अन त्याच वेळी, त्याचे साईड इफेक्ट्स नक्कीच आहेत. हे विसरू नका. रोज २-३ काड्या चावून खाणे हे 'लिमिट' असू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आपले वैद्यकीय विषयांवरचे प्रतिसाद माहितीपूर्ण असतात, अडकित्तेश्वर. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो असणारंच!! डाक्टर आहेत ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंका कुशंका विचारायला बरा डॉक्टर सापडला! Smile (एकेरीवर शाब्दीकरित्या घसरलो. डॉक्टरांचा आदर आहेच.)
आपल्यासारख्या ज्ञानी माणसांची आंतरजालावर वनवा आहे. ती जागा आपल्यासारखे 'बोलते' डॉक्टर भरून काढतात.
बाकी पुढे येणार्‍या आरोग्यविषयक धाग्यांमध्ये इतरत्र (म्हणजे 'त्या तिथे पलिकडे तिकडे' नाही तर आपला लिखीत/दृष्य मिडीया हो) डॉक्टर लोकं लिहीतात तसे लिहीत जावू नका.(बर्‍याच ठिकाणी डॉक्टरांचे लेख फक्त रोगाची लक्षणे काय या बाबतीत असतात. तो रोग होवूच नये म्हणून त्यावर भाष्य कमी असते. नंतर अमुक अमुक शस्त्रक्रिया अमुक अमुक रित्या करतात असले गोल गोल विवेचन असते. अर्थात त्यात जाहिरातीचा भाग असतो, अन डॉक्टरकी आजकाल व्यवसाय झालाय हे सत्य आहेच. पण आंतरजालावर डॉक्टर-पेशंट असली नाती नसावीत. माझे म्हणणे रागाचे, चुकीचेही असू शकेल. त्याबद्दल माफी असावी. डॉक्टर कापरेकरांसारखे (व आपल्यासारखेही)अपवाद असतात. (म्हणूनच माणूसकीवर विश्वास आहे अन जग त्या बॉलबेरींगरूपी व्यक्तिंवरच चालते आहे.)) असो. फार बोललो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

बिन्धास्त अरे जारे करा, नो प्रॉब्लेम्स.
मला जमेल, येइल तितके ज्ञान नक्की पाजळत जाईन. Wink हवे तेव्हा हाक मारून विचारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

@ डॉ/वैद्य आडकित्ता :- क जीवनस्त्वासाठी काय सोपे आहे घ्यायला ते सांगा की. उदा:- लिंबु, आवळा, क जीवनसत्त्वाच्या चघळायला मिळणार्‍या आंबट गोड गोळ्या इ.आणि हो, च्यवनप्राशसुद्धा. च्यवनप्राश,त्रिफळा चूर्ण वगैरे औषधे लोकल वैद्यांनी घरी बनवलेली घेतली तर अधिक गुण आल्याचे दिसते. डाबर्,बैद्यनाथ ह्यांचाही गुण येतो, पण तेव्हढ्या पटकन नाही. लोकल वैद्याची औषधे कमी प्रोसेस्ड्,अधिक ताजी आहेत, हे कारण असावे का?
कारण ती खराब सुद्धा लवकर होतात, डाबर-बैद्यनाथची टिकतात.

@प्रास तै :- तुम्ही सांगितलेल्या उपायातून उपायाची माहिती कमी व बालपणीचा नॉस्टेल्जिया जास्त जानवतोय.
आजारी पडल्याचे निमित्त करून तेव्हा आईकडून बरेच लाड करून घ्यायचो. मस्त गरम पाणी, खायला मस्त औषधी(आले, हळद ,गूळ वगैरे असणार्‍या) व शेक करून घ्यायचो. एकटे रहात असताना हे सगळे करून घेणे अवघड आहे.

माझा (ऐकिव उपाय) :- २-३ लसणाच्या पाकळ्या भाजून खाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्या रोजच्या वापरातल्या अनेक भाज्या आणि फळांमध्ये क जीवनसत्त्व असतंच, शिवाय ताजा आवळा, संत्रं, लिंबू इ उपलब्ध नसेल तेव्हा आवळ्याचा सुकवलेला कीस, आवळकाठी, च्यवनप्राश वापरता येतात. आवळ्यातलं क जीवनसत्त्व सुकवल्यावरही तुलनेने बर्‍याच प्रमाणात टिकून राहतं. मात्र, च्यवनप्राशात इतर औषधी वनस्पतीही भरपूर असतात. त्यामुळे तो सरसकट सर्वांना योग्य ठरेलच असं नाही. रोज टॉनिकप्रमाणे घ्यायचा असेल तर त्याऐवजी अगस्तीप्राश घ्यावा.

लहानपणी आमच्या घरी आजारपणाचे लाड- कोड पुरवण्याची पद्ध्त नव्हती. सर्दी- खोकल्याची तर नाहीच. त्यातून मी फार आजारी देखील पडत नसे. काय ती औषधं घ्या, आराम करा आणि मोकळे व्हा. आजारी माणसाचे लाड करणं (आणि करवून घेणं) हे मला लग्नानंतर माहित झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शिल्पा, धागा आवडला, उपयुक्त आहे. प्रतिसाद माहितीपूर्ण आहेतच. पण मला एक प्रश्न आहे.
थंडीत (तापमान साधारण <~१०सेल्सियस) अनेकदा माझ्या नाकातून किंचित (त्याचा थेंबही बनत नाही एवढं कमी असतं) रक्त येतं. त्रास असा नाही; फक्त थंडीत बाहेर पडलं की एक टीश्यू खराब होतो. (दोन-तीन रूमाल खराब झाल्यावर कागदच वापरायला सुरूवात केली.) हे रक्त थांबवण्यासाठी काही करावं का, उत्तर हो असल्यास काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाकात पटकन रक्तस्त्राव होऊ शकेल अशा रक्तवाहिन्यांचे जाळे असते. (लिटिल्स एरिया)
खूप कोरडी हवा, जशी इतक्या कमी तापमानात, किंवा आपल्याकडच्या उन्हाळ्यात सहाजिक आहे, ही अश्या रक्तस्त्रावा करता कारणीभूत आहे. (घोळणा फुटणे. फक्त थंडीच ते रक्त पटकन थांबवतेही.)
नाक शक्यतो जोरात शिंकरू नका. कोरू नका. नाकाला मॉइस्चराइझ्ड ठेवा. तुपाचे बोट नाकपुडीत लावणे हा घरगुती इलाज आहे. व्हॅसलिन चालते. नॉर्मल सलाईन चा स्प्रे मिळतो, पण तो तिकडे ओटीसी मिळेल की नाही हे ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डागडरबाबू, तुम्ही सुचवलेले उपाय वेळेत आठवून करण्याचा विचार बरीच वर्ष करते आहे. पण तरीही आता घराच्या किल्लीशेजारीच मॉईश्चरायजरची बाटली ठेवून पहाते.

राजेश, ह्यूमिडीफायरचा यासाठी फार उपयोग होईल असं वाटत नाही, ६०% आणि जास्त आर्द्रता असतानाही रक्त यायचं. पण तरीही ह्यूमिडीफायर वापरायला सुरूवात केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोरड्या हवेपासून नाकाला, घशाला होणारा त्रास कमी करण्यासाठी ह्युमिडीफायर मिळतात. विशेषतः रात्री तो लावून ठेवल्याने फायदा होतो. हा अर्थातच आजीबाईच्या बटव्यातला सल्ला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा. काय माहितीपूर्ण धागा काढलाय,सॅन होजे ताईंनी.
जुलाब्,हगवण ह्यावर आजीबाईंचा बटवा काय बडबडतो? थंडीत भजी,मटण्,चिकन खावे लागते त्यामुळे असले विकार लागतात.

टारेश जुलाबथांबवी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

डॉक्टर ~ सॉरी, काहीशा वेळाने हा धागा आणि त्यावरील तुमच्या एक्स्पर्ट अ‍ॅडव्हायझरी नोट्स पाहिल्या. आवश्यक त्या टिपूनही घेतल्या आहेत स्वतंत्रपणे.

माझी केस सांगतो. मी पन्नाशी ओलांडली आहे हे तुम्हाला अन्यप्रसंगी यापूर्वीच सांगितले आहे. पण माझा नदीतील/तलावातील स्वीमिंगचा गेल्या ३५ (येस्स, जवळपास पस्तीस) वर्षाचा व्यायाम अखंडपणे चालू आहे {फक्त बाहेरगावी फार दिवसासाठी मुक्कामास गेलो तर काहीसा खंड पडतो, पण जिथे जाईन तिथे सर्वप्रथम नदी वा विहीर आहे का याचीही चौकशी करतो, नसेल तर मग जिथे मिळेल तिथे 'हर गंगे'}. सातत्याच्या जलतरणामुळे असेल पण मला या तारखेपर्यंत जाणवण्यासारखी सर्दी झालेली नाही. थंडीच्या (आजच्या) दिवसात जरूर काही वेळा घसा खवखवतो, खोकलाही काही प्रमाणात येतो, विशेषतः स्वीमिंग संपल्यानंतरच्या एकदोन तासाच्या अंतरात. पण त्यावर तुमच्यासारख्याच एका डॉक्टर मित्राने "झीट - ZEET" नावाचे ग्लायकोडिनसारखे औषध सुचविले होते ("अलेम्बिक" चे प्रॉडक्ट आहे). चव थोडीशी उग्र आहे, पण प्राथमिक पातळीवरील खोकल्यासाठी (कदाचित सर्दीसाठीही असेल) हे झीट चांगले वाटले मला.

'चिकनसूप' चा सर्दीसाठी अगदी रामबाण नसला तरे 'चलता है' धाटणीचा पर्याय आहे. आमच्या कोल्हापुरात चिकनसूपऐवजी 'चिंगळ्याचा रस्सा' जालीम उपाय आहे. (छोट्या छोट्या मासोळ्या असतात, नदीच्या वाहत्या प्रवाहातून मिळतात. दहा रुपयाला एक ढीग दिला जातो जो दोघांसाठी पुरेसा होतो. शिजविताना त्यात अंगापुरते मीठ, थोडेसे ठेचलेले आले आणि दोनचार काळ्या मिर्‍या टाकून त्या रसायनाचा मस्त वास सुटला की मग थाळीतून तो रस ओरपायचा. अहाहा, सर्दी गावकोसाबाहेर जाते.)

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंगळ्या माहीत आहेत अन खाल्ल्याही आहेत Wink तेही प्रोटीनच.
चिकन सूप हे 'हाय प्रोटीन' म्हणून सांगितले आहे. कोणतेही प्रोटीन्स चालतील. अ‍ॅनिमल प्रोटिन्स 'फर्स्ट क्लास' प्रोटीन्स असतात. पचायला सोपे. म्हणून ते. अगदी 'जैन'च असाल तर हवे ते प्रोटीन्स खा/प्या. चालतं.
झीट सप्रेसंट आहे Wink
अन हां,
तुमच्या पायांचा फोटू पाठवा. गेली ३५ वर्षे व्यायाम करता आहात म्हणून. आमचे मामा आहेत. आज ७० वर्षे वय आहे, पण १००-सव्वाशे किमी मोटारसायकल लीलया चालवितात.. कारण एकच. व्यायाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

थंडी आणि सर्दी-खोकला यांचा परस्पर संबंध काय? जर सर्दी वायरल असते तर थंडी वायरसला पोषक असते असे आहे का? काहीतरी गडबड वाटते.

ऋतू बदलताना अ‍ॅलर्जी होते मग ती उन्हाळा जाऊन थंडी आली किंवा थंडी जाऊन उन्हाळा आला तरी. डॉक्टरांनी माझा गैरसमज दूर करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थंडी आणि सर्दी-खोकला यांचा परस्पर संबंध काय?
आता माणूस नाकाने श्वास का घेतो इथपासून सुरू करायला लागणार. Wink
सर्दीने नाक चोंदले, तर मग तोंडाने श्वास घेता येतोच की हो! मग नाक कशाला हवे? निसर्ग हा भयंकर 'इकॉनॉमिकल' प्राणी आहे. १ ने काम चालेल, तिथे २ कधीच देत नाही. उदा. २ तोंडे नाहीत.
तरीही, नाक अन तोंड असे दोन रस्ते श्वास घेण्यासाठी आहेत. कारणे अनेक. एकतर नाकाने वास येतो. (वास ही 'डायल्यूट' चव असते.) दोन नाकपुड्या असल्याने 'स्टिरिओ इफेक्ट' येऊन कुठून वास येतोय ह्याची थोडी कल्पनाही येते. (२ डोळे अन २ कान याच स्टिरिओ इफेक्ट साठी असतात) पण, महत्वाची गोष्ट म्हणजे, नाक हे फिल्टर अन हीटर म्हणून काम करते.
नाक आतून पाहिलत तर टर्बिनेट्स, सायनसेस आदींमुळे नाकातून आत येणारी हवा घशापर्यंत पोहोचते तेंव्हा गरम (जवळजवळ बॉडी टेंपरेचर) होत असते. मग जेंव्हा छातीत येते, तेंव्हा फुफ्फुसांना फार थंड करीत नाही. तिथलं रक्ताभिसरण सुरळीत रहाते. पण नाकातलं सर्क्युलेशन धीमे होतं. यामुळे, (जे नाकाच्या फिल्टर इफेक्टमुळे तिथेच अडकतात त्या,) रक्तात/शरीरात घुसणार्‍या जीवाणू/विषाणूंना तिथे घर बनवायला वाव मिळतो. रक्त छान फिरत असेल, तर आपली डिफेन्स आर्मी : म्हणजे पांढर्‍या पेशी अन अँटीबॉडीज तिथे येऊन शरीरात घुसणार्‍या चुकार जंतूंना मारीत असतात. हे अभिसरण धीमे झालं तर आपले सैनिक कमी, अन शत्रू जास्त असे होते, मग तिथे थोडी 'सर्दी' होते.
हेच अ‍ॅलर्जी होताना होते. तिथल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्ताभिसरण धीमे झालेले असते. मास्ट सेल्स मधून हिस्टॅमिन आदी रसायने सुटलेली असतात. ही बेसिक सर्दी. (Rhinitis: नाकाचा "आय्टीस" नाकाला आतून आलेली सूज.) यात वरून मग ब्याक्टेरिया येतात. ते घर मांडतात. कारण तुमचे सैन्य त्या मूळ व्हायरसशी लढण्यात बिझी, अन तुम्ही आराम न करता 'अंगावर काढत' आहात.. and so on..
Understanding each and every thing that your body does, and how it gets damaged and how it heals itself is included in curriculum of about 8-10 years. and u need to get admission in medical college for that Wink इथल्या करता इतकं समजावणं पुरेसं व्हावं??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी नाक आणि सर्दीचा परस्परसंबंध नाही विचारला. थंडी आणि सर्दीचा विचारला आहे.

मी याच्याविषयी माहिती विचारत होते.

असो. कॉमन कोल्डवर अधिक माहिती विकीवर उपलब्ध आहे तितकी पुरेशी आहे त्यासाठी मेडिकल स्कूलमध्ये दाखला घेण्याची अद्याप गरज वाटलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बूच बसल्याने वरील प्रकाटा येत नाही
क्षमस्व! पुन्हा विकीपुढे ज्ञान पाजळणार नाही;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते
कोल्ड क्रीम वापरल्यास काळेपणा येतो
यावर आजीबाईचा सल्ला काय आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

<<<हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते
कोल्ड क्रीम वापरल्यास काळेपणा येतो

मी आंघोळ झाल्यावर व्हॅसलीन लावते अन आजकाल व्हॅसलीनचं मॉश्वरायझर मिळतं ते लावते. साबणामुळेसुद्धा त्वचा कोरडी पडते असा माझा अनुभव त्यामुळे सॉफ्ट साबण जसा की डव वापरला तर मलातरी फरक जाणवलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॉईश्चरायजर वापरून त्वचा काळी पडल्याचं मलातरी दिसलेलं नाही. मला आवडणारं मॉईश्चरायजर किंचित तांब्याच्या रंगाचं असतं त्यामुळे अगदी किंचित तांबूस रंग येत असावा, पण तो दिसण्याइतपत नसावा, नसतो. मॉईश्चरायजर (याला कोणीतरी चांगला मराठी शब्द सुचवा, प्लीज) लावून धुळीत गेल्यास धूलिकण अंगाला चिकटून त्वचा काळी पडल्यासारखी वाटू शकते. आंघोळ करताना त्वचा घासून (स्क्रब) स्वच्छ केल्यास ही धूळ निघून जाते. त्यामुळे त्वचा पुन्हा कोरडी पडतेच, आणि मग पुन्हा मॉईश्चरायजर. त्वचा कोरडी पडून खाज सुटते त्यापेक्षा रोजची पाक्ष-सात मिनीटं यात खर्च करायला माझी ना नसते.
दुसरी एक शंका अशी वाटते की हिवाळा आहे म्हणून सनस्क्रीन न लावता, सनकोट न घालता उन्हात गेलात तर अर्थात मेलॅनिन तयार होणारच आणि त्यामुळे थंडीच्याही दिवसात टॅनिंग होऊ शकतं. हातापायांवर स्लीव्ह्ज, घड्याळ आणि चपलांच्या खुणा बाळगायच्या नसतील तर हिवाळा आणि पावसातही सनस्क्रीन, सनकोट वापरणं उत्तम.

काही मॉईश्चरायजर्स तांबूस वर्ण यावा यासाठीच बनवलेली असतात; अशी उत्पादनं वापरल्यास त्वचेचा वर्ण बदललेला दिसू शकेल. पण अशी उत्पादनं ब्राऊन त्वचेच्या भारतीयांच्या बाजारात विक्रीसाठी कोणी काढेल असं मला वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक : लवंगा भाजुन घेउन थंड करुन ठेवायच्या अन हवं तेव्हा ३-४ कुटुन घेउन त्यात चमचाभर मध टाकुन खायचं. त्यावर किमान दोन - तीन तास काहीच खायचं प्यायचं नाही त्यामुळे शक्यतो मी झोपायच्या आधी हा उपाय करते. खोकला झाला असताना माझ्या लेकीला या उपायाने बरं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा! उत्तम माहिती!
सर्दी-खोकला झाल्यावर नुसता हा धागा वाचला तरी बरं वाटेल असं वाटतंय आता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0