बिटकॉईन

मन यांच्या बिट कॉईन वरील प्रतिसादावर हे उत्तर लिहित आहे, प्रतिसाद जरा मोठा झाल्यामुळे एक लेखच पाडला.

डिस्क्लेमरः मी या पैकी कुठल्याही विषयाचा तज्ञ नाही. त्यामुळे थोडे मीठ भुरभुरून प्रतिसाद घ्या.

बिटकॉइन ला एकदम ईतका एक्स्चेंज रेट कसा काय मिळू लागला आणि बिटकॉईन कसे चालते हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत.

१. ईतका एक्स्चेंज रेट कसा काय मिळू लागला:
सर्वात सोपे उत्तरः मागणी तसा पुरवठा. एका बिट कॉईन ला बाराशे डॉलर(खरतर आज नऊशे बहात्तर) मिळतात कारण की तसे पैसे देणारा कुणीतरी तयार आहे. बस्स ईतकेच. त्यात बिट कॉईनचे असे काही नाविन्य नाही. त्याच्या जागी झपाटलेल्या मधले स्वप्नील जोशी सारखे दिसणारे बाहुले जरी असते आणि लोकांनी त्याला तितके पैसे दिले असते तर ती एक वॅल्युएबल कमोडिटी ठरली असती.

असे सगळे सांगितल्यावर (शुद्ध मराठीतः हॅविंग सेड दॅट), बिट कॉईन ज्या प्रकारे बनवले गेले आहे, त्यामुळे त्याची लोक प्रियता वाढत आहे. कारण की, तुम्ही क्षणार्धात एका जागेवरून दुसर्या जागेवर भरपूर पैसे पाठवू शकता (डीजिटल करन्सी). मध्यंतरी कुणीतरी १०० मिलियन डॉलर पाठवले होते. म्हणजे रेमीट टू ईंडिया सारखी कटकट नाही (अर्थात सोर्स आणि डेस्टिनेशन मध्ये लोकल करन्सीत कन्वर्जन करणारा कुणीतरी पाहीजे जो की माझ्या माहीती प्रमाणे भारतात अजून तरी नाही). थोडेफार हवाला सारखच म्हणता येईल. याशिवाय, थेरॉटिकली सर्व ट्रान्स्फर्स अनामिक असतात. म्हणजे कुणाला काहीही कळायचा मार्ग नाही.

साधारणतः चलन असे तयार होते की तुमच्या देशाची ट्रेझरी बॉन्ड्स छापते, ते बॉन्ड्स मध्यवर्ती बॅन्केत गहाण टाकते, त्या बदल्यात बॅन्क पैसे छापून सरकार ला देते. सरकार अनेक कल्याणकारी योजनांमध्ये ते पैसे जनतेला उधार देते: जसे की धडाडीचे उद्योजक, शेतकरी, पायाभूत सुविधा ई. ई.. अशाप्रकारे देशाचे आर्थिक दळण वळण चालू होते. पुढे ते उद्योजक नवीन कारखाने काढून लोकांना नोकर्या देतात. पैसा सर्क्युलेट होतो. पुढे जेव्हा उद्योजक नफा कमावतात ते सरकारला त्यांचा पैसा परत करतात. ट्रेझरी ते पैसे बॅन्केला परत करून बॉन्ड्स सोडवून आणते. अशा प्रकारे चक्र पूर्ण होते. यातून काहीच आस्तित्वात नसलेल्या ठिकाणातून खरीखुरी वॅल्यु तयार होते (जसे की शेतकर्यानी पिकवलेले पीक, तयार झालेली उत्पादने, मिळालेले रोजगार ई ई).
(पुन्हा एकदा, मी अर्थ शास्त्राशी काही एक संबन्ध नसलेला माणूस आहे. हे केवळ ईकडच्या तिकडच्या माहीती वर आधारित आहे आणि खूप वर वरचे आहे. बाकी कुणाला अधिक माहीती असल्या मला अवश्य दुरुस्त करावे आणि भर घालावी)

या सर्वात खर पाहील तर छापलेल्या पैशाला शुन्य किंम्मत असते. त्या पैशाची किम्मत तितकीच जितकी जनता त्यावर विश्वास ठेवते. पण जनता विश्वास ठेवते कारण की त्यांचा सरकार वर विश्वास असतो. सरकार या बाबतीत ही काळजी घेते:
अ. चलनाला एक विशिष्ट किम्मत असेल (माझ्या मते प्र्त्येक नोटेवर "मै धारक को क्ष पैसे अदा करने का वचन देता हू" हे त्या साठीच लिहिलेल असते)
ब. सरकार दुसरे कुणीतरी बनावट नोटा काढून जनतेला फसवणार नाही (इन्फ्लेशन वाढवणार नाही याची काळजी घेते)

२. बिटकॉईन कसे चालते
आता कल्पना करा की सरकार ऐवजी, तुम्ही आम्ही आपले आपणच एक चलन तयार करायचे ठरवले तर आपल्याला, सरकार ज्या ज्या गोष्टींची काळजी घेते त्यांची काळजी घ्यावी लागेल.

अ. सर्व प्रथम कीती नोटा आणि कशा छापायाच्या?
सरकार हा प्रश्न बॉन्ड्स तयार करून आणि गहाण टाकून सोडवते. बिट कॉईन मध्ये एक "प्रूफ ऑफ वर्क" म्हणून एक अत्यंत कूल कॉन्स्पेट वापरली गेली आहे ज्याने की हा "मिंटींग" चा प्रश्न सोडवला गेला आहे. ही एक क्रिप्टॉग्रॉफी मधील हॅशींग ही बेसिक कॉन्सेप्ट वापरून तयार केलेली कल्पना आहे. यामुळे, एका विशिष्ठ गतीनी नवीन बिट कॉइन्स "छापले" जातात. या छापण्यात तुम्ही पण सामील होऊ शकता. तुमच्या नशीबावर पुढचा छापला जाणारा बिटकॉईन हा तुमच्या संगणकावर सुद्धा छापला जाऊ शकतो आणि तो तुमचा होऊ शकतो.

समजा खूप लोक त्यांचे संगणक घेऊन आले तर ती विशिष्ठ गती कायम ठेवण्या साठी अल्गोरिदम्स अवघड केले जातात. जर लोक सोडून गेले तर ते सोपे केले जातात. एकंदर "नोटा छापण्याचा" वेग कायम ठेवला जातो. "प्रूफ ऑफ वर्क" ही काही नवीन संज्ञा नाही. याधीही हॅश्कॅश ई ई मध्ये स्पॅमीग रोखण्यासाठी ही वापरली गेलेली आहे. किती नोटा छापायाच्या ते बिट कॉईन तयार करणार्या माणसाने आधीच ठरवून ठेवले आहे. ही संख्या २१ मिलियन ईतकी फिक्सड आहे. या संख्येला खरतर काहीही अर्थ नाही. त्याच्या जागी १०० मिलियन असते तरीही काहीही फरक पडला नसता.

ब. आता नोटा तर छापल्या, पण त्यात ट्रान्झॅक्शन्स कशी करायाची?
सर्व साधारणतः हा प्रश्न तुमच्या नोटांच्या मुर्त स्वरूपाने सोडवला जातो. तुम्ही दुकान दारा कडून एखदी गोष्ट घेतली की तुम्ही त्याला त्या नोटा देता. यात दोन गोष्टी आपोआप होतात.

  1. असा व्यवहार खरोखरच झालेला आहे याचे प्रूफ. दुकानदार पटकन त्या नोटा काढून दाखवू शकतो आणि तुमच्या कडे त्या नोटा नसल्यांमुळे तुम्ही त्या हस्तांतरीत केलेल्या आहेत हे कळून येते. थोड्क्यात "पझेशन ऑफ करन्सी" इज मोअर दॅन एनफ टू प्रूव वॅलिडिटी ऑफ बिझनेस. पण हा नियम आपल्या नवीन करन्सीला लागू होत नाही. डिजिटल असल्यामुळे, एका माणसा कडून दुसर्या माणसा कडे पैसे गेले तरी पहिल्या कडे त्याची एक कॉपी राहतेच. पहीला माणूस सरळ सरळ हात वर करू शकतो की असा व्यवहार झालाच नव्हता.
  2. पैसे एकदा खर्च केले की ते केलेच. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच पैसे खर्च करू शकत नाही कारण ते हस्तांतरीत केले जातात. पण डिजिटल मध्ये तुम्ही तेच तेच पैसे पुन्हा पुन्हा खर्च करू शकता.

या दोन्ही अडचणी बिट कॉईन मध्ये जगभरातले तुमच्या आमच्या सारख्यांचे संगणक भाग घेऊन सोडवतात. थोडक्यात सांगायच तर ते प्रत्येक व्यवहाराची एन्ट्री एका बुकात करतात की जे पाहून कुणीही सांगू शकत की:
हा व्यवहार झाला होता का? आणि
मी खर्च करत असलेले बिट कॉईन माझेच आहेत की मी ते आधीच खर्च केलेले आहेत?.

आत्ता तुम्ही म्हणाल की जर तुमच्या आमच्या सारख्यांचे संगणक हे बूक मेन्टेन करतात तर मग कुणीही त्या काहीही लिहू शकत. या वेळी अ‍ॅडव्हान्स्ड डिस्ट्रिबुटेड अल्गोरिदम्स आणि वर उल्लेखलेली "प्रूफ ऑफ वर्क" ही संज्ञा कामाला येते. या दोन्ही वापरून गणितानी हे प्रूव करता येते की असे करणे अशक्य आहे (नॉर्मल कंडिशन्स मध्ये).

बिटकॉईन, २००९ मध्ये "सातोशी नाकामोटो" नावाच्या माणसाने तयार केली. सुरुवातीला फक्त त्याचाच संगणक बिट कॉईन तयार करत होता. त्यावेळी बिटकॉईन ला शुन्य किम्मत होती कारण की लोकांचा विश्वास नव्हता. हळू हळू त्यामागचे गणित संशोधकांनी तपासले, नवीन नवीन लोक अजून अजून बिट कॉईन तयार करण्या साठी त्यांचे संगणक वापरू लागलीत. मग खरे खरे व्यवहार बिट कॉईन वापरून होऊ लागले (मी तुला ५ बिटकॉईन च्या बदल्यात ही सर्व्हीस देतो, किंवा ही वस्तू ५ बिट्कॉईनला देतो). म्हणजेच या चलनावर लोकांचा विश्वास बसू लागला. वर म्हणल्या प्रमाणे चलनाची खरी किम्मत ते वापरणार्या लोकांवर अवलंबून असते. लोक "खरे" डॉलर्स देऊन बिट कॉईन विकत घेऊ लागले. पण बिट कॉईन एका विशीष्ट गतीनी तयार होत असल्याने आणि किती वर वरची मर्यादा असल्याने तुटवडा जाणवू लागला. लोक एका बिटकॉईन ला अधिका अधिक डॉलर्स मोजू लागली. खेळण्यातले चलन अचानक खर्याखुर्या चलनांपेक्षाही अधिक खरे झाले. आणि भाव बाराशे डॉलर्सला टेकला.

"सातोशी नाकामोटो" हा कोण आहे हे कोणालाच माहीती नाही. कोणी म्हणतात की तो हा किंवा तो संगणक शास्त्रज्ञ आहे. कोणी म्हणतात की तो एक माणूस नसून एन एस ए सारखी संस्था आहे. जो कोणी आहे, त्यानी सुरुवातीला काहि मिलियन बिटकॉईन त्याच्या संगणकावर छापले होते. आज त्यांची किम्मत एक बिलियन अमेरिकन डॉलर्स पेक्षा ज्यास्त आहे. काहीही अंगमेहनत न करता (बिल गेट्स किंवा मार्क झुकर्बर्ग यांच्या पेक्षा ही कमी मेहनत करून) हा माणूस एक बिलिनेअर आहे. आणि जर बिटकॉईनची किम्मत अशीच वाढत राहीली तर तो लवकरच जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होईल. २०१० पासून त्याच्याकडून कुणीही ऐकलेले नाही. त्याची सर्वात शेवटची ईमेल २०१० मध्ये आली होती.

येणारा काळ रोमांचकारी असणार आहे, तेव्हा काय होणार आहे ते कुणालाच माहीत नाही, कल्पना सुद्धा करता येणार नाही ईतके बदल होणार आहेत.

साफ चूक .. तो काळ ऑलरेडी आलेला आहे. आपण सद्ध्या भविष्यात जगत आहोत.

एक मिनिट .. अ‍ॅमेझॉनचा रोबोट माझ्या गच्चीत उडतउडत येऊन मी १५ मिनिटांपूर्वी विकत घेतलेले पुस्तक सोडून गेला. ते घेऊन येतो.
मग ते वाचता वाचता मस्त समुद्र किनारी कार चालवणार आहे. पुस्तक वाचता वाचता कार कशी चालवणार म्हणता?
अहो ही काय गूगलची सेल्फ ड्रायव्हींग कार, परवाच घेतली दिवाळिला ... चांगले घसघशीत हजार बिट कॉईन लागले की हो!!

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

Smile

मी तुला ५ बिटकॉईन च्या बदल्यात ही सर्व्हीस देतो, किंवा ही वस्तू ५ बिट्कॉईनला देतो

हे वाचुन आम्ही WWFची पोस्टकार्डे ट्रेड करायचो त्याची (उगाचच) आठवण झाली.

बाकी माहिती सोप्या शब्दात आनि मुद्देसूत दिली आहे. आवडली.. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रुपया किंवा डॉलरच्या नोटांची देवाणघेवाणही फार काही वेगळी नाही.
बिटकॉईनमुळे पैशाचं "मेक बिलीव्ह" स्वरुप जास्त उठून दिसतं एवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी वेगळच प्रकरान आहे,.
सवडीने प्रतिसाद देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गोगोल साहेब तुमचा लेख मस्त आहे. मजा आली.

----

चलन असे तयार होते की तुमच्या देशाची ट्रेझरी बॉन्ड्स छापते, ते बॉन्ड्स मध्यवर्ती बॅन्केत गहाण टाकते, त्या बदल्यात बॅन्क पैसे छापून सरकार ला देते. सरकार अनेक कल्याणकारी योजनांमध्ये ते पैसे जनतेला उधार देते:

ट्रेझरी बाँड्स छापते. पण मध्यवर्ती बँक ते विकत घेते. (याला Open Market Operations म्हणतात.) विकत घेण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती बँक (RBI) चलन बाजारात आणते कारण विकत घेताना काही तरी द्यावे लागते ना. ते चलन. (तुमच्या मुद्द्यात तुम्ही संकल्पना मस्त मांडलीय पण शब्द वापरताना जरा कॅड्बरी चे चॉकलेट झालेय.). चलन हे रजिस्टर्ड बाँड डीलर्स ना सुद्धा देऊन बाँड खरेदी केले जातात. (to the best of my knowledge)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चलन हे रजिस्टर्ड बाँड डीलर्स ना सुद्धा देऊन बाँड खरेदी केले जातात. (to the best of my knowledge)

म्हंजे? आपणही ट्र्जरी बाँड्स खरेदी करू शकतो?

किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं तर RBI ऐवजी आता माझ्याकडे असलेले पैसे मी ट्रेजरीला दिले तर ते मला बॉन्ड्स देतीला का? तसे केल्यास रुपयाच्या घसरत्या किंमतीची काळजी करण्याचे कारण उरणार नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सामान्य व्यक्ती ट्रेझरी बाँड्स खरेदी करू शकतेच. प्रश्नच नाही.

माझ्याकडे असलेले पैसे मी ट्रेजरीला दिले तर ते मला बॉन्ड्स देतीला का? हो.

तसे केल्यास रुपयाच्या घसरत्या किंमतीची काळजी करण्याचे कारण उरणार नाही काय? अ...हं. रुपयाची (घसरती) किंमत ही चलनाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. चलनाचा पुरवठा हा रिझर्व बँक करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै कळ्ळे
म्हणजे समजा मी आज १०,०००रू देऊन काही बाँन्ड्स खरेदी केले.
उद्या रिझर्वबँकेने अधिक नोटा छापल्यावर रुपयाची किंमत १ वरून ०.९ झाली. मग माझ्याकडील बॉन्ड्सची किंमतही त्याच गुणोत्तरात वाढायला हवी ना?
म्हंजे मी उद्या बॉन्ड्स विकायला गेलो तर मला १००००+(घ्सरलेले ०.१ रू च्या दराने)१००० असे ११००० रू मिळायला हवे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

I wish I knew the answer to your question. क्षमस्व. Sad

विकेट पडली माझी .... या प्रश्नावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाँडची किंमत व्याजदराशी निगडित (व्यस्त प्रमाणात) असते. चलनपुरवठा वाढतो म्हणजेच कमी दराने कर्ज उपलब्ध होते. व्याजाचा दर कमी झाल्यास बाँडची किंमत वाढते. अर्थात घेतलेला बाँड न विकता मॅच्युरिटीपर्यंत ठेवला तर आधी कबूल केलेली रक्कम म्हणजे १०००० रुपयेच मिळणार. ही व्याजदराची जोखीम बाँडमध्ये असतेच. सरकारी रोखे जोखीमरहित असतात असे म्हणतात त्यात "डिफॉल्ट"ची जोखीम अभिप्रेत असते.

टीपः मराठी आंतरजालावरील मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून वरील माहितीची खातरजमा करून घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर शंका:-
यु एस मध्ये फेडरल ब्यांक ही आपल्या रिझर्व्ह ब्यांकेसारखी मध्यवर्ती ब्यांक. पण आपल्याकडील मध्यवर्ती ब्यांक सरकारी आहे, तशी तिथली नाही असे ऐकले.
काहीच कळत नाहिये. मध्यवर्ती ब्यांक सरकारी नसून कसे चालेल? सरकार धोरणे बनवणार आणि राबवणार कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फेडेरल रिझर्व्ह ही सरकारीच आहे. १००%. फक्त त्यांना खूप स्वायत्तता आहे.

-----

सरकार धोरणे बनवणार आणि राबवणार कसे?

सरकारी आर्थिक धोरण हे दोन प्रकारचे असते -
१) फिस्कल {ट्रेझरी - अ) टॅक्स, ब) कर्ज)},
२) मॉनेटरी (मध्यवर्ती बँक उदा. फेडरल रिझर्व्ह, आरबीआय)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

की मी काहीतरी घोडचूक केलेली असणार आहे. वर म्ह्णल्या प्रमाणे मला वर वर ची माहीती आहे. दुरूस्ती बद्द्ल आभार (चूक कायम ठेवत आहे जेणेकरून हा प्रतिसाद उपयोगी ठरेल)

(साहेब काय? काहीही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात पण मुद्देसूद आणि सोप्या भाषेत केेलेलं लिखाण आवडलं. या लेखाचा विकीलेख करणं सहज शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मराठीत लिखाण करताना नाकी नऊ येतात, मी कुठला विकी बिकी करत बसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारंपरिक शहाणपणा वापरत ह्या प्रकारापासून दूर राहीन, भारतात आले तरी.
लोकं ह्यात धो धो कमावतीलही,वापरतीलही.
पण ज्यातले काही कळत नाही अशा एकदम नवीन गोष्टीत एकदम उडी कशी घ्यायची बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा जो फुगवटा आला होता तो या चलनाला चलन म्हणून न बघता एक कमोडिटी म्हणून वापरल्याने आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकिलेख सुरुवात करून ठेवले आहेत. भर घालण्यास आमंत्रण देत आहे...
१. https://mr.wikipedia.org/wiki/बिटकॉईन
२. https://mr.wikipedia.org/wiki/लिटकॉईन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

मी वेळ मिळेल तशी भर घालीन.

तो पर्यन्त फील फ्री टू युज एनी पार्ट ऑफ माय लेख विथ ऑर विदाऊट एनी क्रेडीट गिवन टू मी.

थोडक्यात हा लेख बी एस डी लायसन्स खाली आहे असे समजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला भारीय की!
छान माहिती लिहीलीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रकार म्हणजे ट्यूलिप मॅनिया नाहीये ना, याची खात्री करून घ्या. हे वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणालाच माहीत नसत.

पण माझ्यामते तरी बिटकॉईनला अस काही होणार नाही. मला पर्सनली अस वाटत की याला भविष्यात अजून चांगला काळ येणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बिटकॉइन जर चलन असेल तर त्याची सॉवरीन गॅरंटी कोण देते? ती नसेल तर बिटकॉइन कधीही वर्थलेस होऊ शकेल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा एक लेख दिसला.

http://www.truthdig.com/report/page3/bitcoin_and_the_dangerous_fantasy_o...

त्यातील शेवटचा पॅरा रोचक आहे.

The reason money is and can only be political is that the only way of steering a course between the Scylla and Charybdis of dangerous ponzi growth and stagnation is to exercise a degree of rational, collective control over the supply of money. And since this control is bound to be political, in the sense that different monetary policies will affect disparate groups of people differently, the only decent manner in which such control can be exercised is through a democratic, collective agency. In brief, while apolitical money is a dangerous illusion, a Central Bank that is democratically controlled (as opposed to the indefensible notion of an ‘independent’ Central Bank) remains our best hope for a form of money that is for the people and by the people. Bitcoin, despite its many interesting features, can never be that.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://fortune.com/2016/08/24/ubs-central-banks-blockchain/?iid=leftrail

ही बातमी बिटकॉइनशी संबंधित आहे....Utility Settlement Coin.
मला फार कमी कळली आहे. पण ज्यांना रुचि आहे त्यांच्याकरता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान, बिटकॉइन बद्दल दिलेली माहिती स्पष्ट आहे. बिटकॉइन हे नाव मी बर्‍याच वेळा ऐकले आहे. या लेखाद्वारे मला समजले की बिटकॉइन म्हणजे काय. Bitcoin Whatsapp Group Links

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांभीर्याने घेउन गुंतवणूक करायला पाहिजे होती ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिटकॉईन चलनाबद्दल इंग्रजीतून बरीच माहिती वाचायला मिळते,परंतू क्लिष्ट भाषेमुळे मला कधीच नीट समजले नाही. वर्षभरापासून लोकसत्तात दर गुरुवारी ' साखळीचे स्वातंत्र्य ' ही ब्लॉकचेनवरील लेखमालिका वाचल्यावर बिटकॉईनबद्दल असलेले बरेचसे गैरसमज दूर झाले. आतापर्यंत मराठीतून ह्या विषयावर इतक्या सोप्या भाषेत कुठेच वाचायला मिळाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0