माझे डॉक्टर होणे : ६ (क्रमशः)

ही सगळीच लेखमाला लिहिण्याला सुरूवात झाली, त्याचं एक कारण म्हणजे इथे पाटील सरांनी सिनेमाबद्दल लिहिलेलं वाचून खूपच नॉस्टाल्जिक झालो होतो. तसं पाहिलं, तर बीजेला अ‍ॅडमिशन घेण्याआधी अख्ख्या आयुष्यात ४-६ सिनेमे पाहिले असतील. बीजे सोडल्यानंतरही थिएटरात जाऊन आजपर्यंत फारतर वर्षातून एखादा. पण कॉलेज अन सिनेमा याचं काहीतरी गुळपीठ होतं, अन सुरुवातीचे काही दिवस तर आम्ही सगळी गँगच्या गँग दररोज अलंकारला 'सौतन'चा शेवटचा शो पहायला जात असू. तो एकच सिनेमा मी १२-१५ वेळा तरी पाहिला असेल. अधूनमधून अपोलो, एम्पायर इ. पायी जाण्याइतपत दूरच्या सिनेमांना रात्री जात असू, पण बहुतेकदा सौतन. अन नंतर हीरो लागला तिथेच, तोही तसाच १०-१२ वेळा पाहिलाय.

आता या इतक्या महान कलाकृतींचा इतका पुनःपुन्हा आस्वाद आम्ही का घेतला असेल? तर सुरुवातीपासून सुरुवात करतो, म्हणजे 'होस्टेलला गेल्या गेल्या अभ्यासू पोरं रोजच्यारोज सिनेमे पाहून बापाचा पैसा का बरबाद करतात?' ह्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

***

होस्टेलची अ‍ॅनाटॉमी तुम्हाला सांगितलेलीच आहे. फस्फस च्या मुलांना, होस्टेल 'अ‍ॅलॉट' केले जाते. म्हणजे डिस्ट्रीब्यूशन संपल्यावर, ज्या रिकाम्या रूम्स उरतात, त्या तुमचा प्रेफरन्स न विचारता अमुक खोलीत रहा असे सांगून वाटल्या जातात. (फस्फसच्या पोरांना आपसात सीट एक्स्चेंजची परमिशन असते.) तसंही अ‍ॅडमिशन होईपर्यंत डिस्ट्रीब्यूशन संपलेलं असतं. अन फस्फस स्टुडंट म्हणजे केवळ प्लँक्टन! फूडचेन मधील सगळ्यात खालचा तुच्छ जीव! "फस्फस" म्हणजे First/First. फर्स्ट इयर, फर्स्ट टर्म. कॉलेजाची ३ शैक्षणिक वर्षे एकूण साडेचार कॅलेंडर वर्षे व्यापतात. म्हणजे ३ टर्म्सचं एक वर्ष असे. नंतर १ कॅलेंडर वर्ष इन्टर्नशिप. असे एकूण साडे पाच वर्षे, जर सरळ पास होत गेलात तर. प्रत्येक वर्षी, I/I, I/II, I/III असे म्हणत. फायनल एम्बीबीएस ची परिक्षा थर्ड्/थर्ड ला असते.

तर आम्ही सगळे नवे भावी डॉक्टर्स फस्फस वाले. तिकडे कॉलेज सुरू झालेलं. अन मला त्या तीन डीपार्टमेंटसचा शोध लागायच्या आधीची गोष्ट. १ वाजता 'माझं कॉलेज' संपलं, मग समोर एका हॉटेलात जाऊन मी राईसप्लेट खाल्ली. मग म्हटलं यार, आपण फार दिवसांत आपल्या कुणा मित्रांना भेटलो नाही. अवड्या ए ब्लॉकला एका रूमवर जगदिश नावाच्या एका (१-२ वर्ष) सिनियरकडे पॅरासाईट म्हणून टेकलेला होता. तो रूमनंबर मला ठाउक होता. मी रमत गमत अडीच वाजेच्या सुमारास तिकडे निघालो. होस्टेलचा कँपस भयंकर निसर्गरम्य अन सुंदर. दुपार होती, अन बहुतेक सगळ्या रूम्स मुलं कॉलेजात असल्याने लॉक होत्या. मी ए ब्लॉकचा जिना चढून वर गेलो. कॉर्नरच्या रूममधे अव्या रहात होता. तिथे गेलो तर रूमला कुलुप! थोडावेळ तिथे घुटमळलो अन परत फिरलो.

पॅसेजमधे माझ्यापेक्षा थोडी मोठी (वयाने) २ मुले रेलिंगला टेकून उभी होती. अवतार बनियन अंडरपँट, अन दुसरा फक्त लुंगी. पण चेहेर्‍यावरून सुशिक्षित वगैरे दिसले. त्यामुळे चोर बिर नसावेत असा अंदाज केला. ते माझ्याकडे कुतुहलाने पहात होते.

"काय पाहिजे?" लुंगीने मला थोडं दरडावून विचारलं.

च्याय्ला! म्हणजे मी यांना चोर समजत होतो, अन हे मलाच दरडावून बोलताहेत?

"त्या २४ नं रूममधे माझा एक मित्र रहातो. त्याला भेटायचं होतं. पण रूमला कुलूप दिसतं आहे."

"कोण मित्र?" लुंगीचा आवाज थोडा नॉर्मल आलेला जाणवला.

मी अव्याचं नाव सांगितलं.

"या नावाचं कोण नाय रहात तिथे. सेकंड इयरचे अमुक तमुक ३ पार्टनर्स आहेत त्या रूमचे." बनियन परत कडक आवाज.

"अहो, माझा मित्र नवीन अ‍ॅडमिशन घेतलेला आहे. त्या जगदीश सोबत रहातो."

"अस्सं होय! अन तू कोण? याच कॉलेजला नवी अ‍ॅडमिशन का?" बनियन.

"हो. मी फस्फसला आहे. अन तुम्ही?" फस्फस म्हणायची ष्टाईल मारत, मी.

"नांव काय रे तुझं?" लुंगीने मला विचारलं. "काय रे गोळ्या, याची ओळख करून घेऊया का?" हे बनियनला उद्देशून.

"होऽ करू या की ओळख. नाहीतरी आपण आता एकाच कॉलेजात. तुम्ही दोघे याच कॉलेजचे विद्यार्थी का? माझं नांव आडकित्ता. तुमचं काय?" मी अगदी नवे मित्र बनवू या, वगैरे विचार करीत बोललो.

"वावावा! ये रूममधे. तुझी ओळख करून घेतो" म्हणून लुंगी पुढे, मग मी अन नंतर बनियन असे जिन्याच्या बाजूच्या रुमात गेलो.

यापुढे जी "चर्चा" झाली, तिला रॅगिंग म्हणतात हे मला कालांतराने समजलं. कारण बहुधा त्या दोघांची ही पहिलीच वेळ होती रॅगिंग घेण्याची. दुसरं एकदम अनप्लॅन्ड अन भर दिवसा होती. अन तिसरं म्हणजे ते दोघेच होते. त्यामुळे बर्‍यापैकी माईल्ड झाली. त्यामुळे २ बोरिंग नमुन्यांनी माझी दुपार खराब केली इतपतच माझ्या डोक्यात आलं होतं.

आत गेल्यावर मला एक खुर्ची देऊन हे दोघे आपापल्या बेडवर पसरले, अन १२वीला मार्क किती? शिकवण्या लावल्या होत्या की नाही इ. विचारून मग काय अभ्यास केला होतास? बेडकाचं स्केलेटन कसं असतं? फीमर कोणतं? इन्नॉमिनेट आर्टरी कोणती वगैरे बराच पीळ १२वीच्या अभ्यासावर मारला गेला. त्याने एक उजेड डोक्यात पडला की जी बायोलॉजी शिकलो त्यापेक्षा १०० पट किचकट अभ्यास आपल्या समोर आहे. अन पुढेपाठ मागे सपाट असं चालणार नाही.

मग मी अवांतर काय वाचन करतो. कोणती पुस्तकं वाचलीत? राष्ट्रगीत म्हणता येतं का पूर्ण? इ. चवकश्या झाल्या. हळूहळू प्रतिवाक्य शिव्यांची टक्केवारी वाढत होती. गाडी 'मोसमात' आली होती. मग पहिला कूट प्रश्न आला, तो म्हणजे,

"काय रे, *&^*#? इथे कशाला झक मारायला आलास? म्हणजे, डॉक्टर कशाला व्हायचंय तुला?"

अरे! हा विचार कधीच केला नव्हता! म्हणजे निबंध लिहिण्याइतपत विचार - मग मी समाजसेवा, रुग्णसेवा वगैरे त..त.. प..प.. सुरू केली, तर,

"गपे! च्याय्ला! साल्या, पैसे नाही कमवायचे का तुला? गाडी, बंगला, चिकणी बायको?? का जाशील झोपडपट्टीत दवाखाना टाकायला?" लुंगी

"अहो तसं नाही, पैसे तर मिळतातच ना?"

"लाज नाही वाटत तुला? पैसा हे एकच तुच्छ ध्येय आहे तुझं?" बनियन.

"अहो मी तेच सांगत होतो.. ते समाजसेवा.."

"मग झोपडपट्टीतच जा! तीच लायकी आहे तुझी." लुंगी

"नाही हो. पैसे चांगले मिळतात म्हणे डॉक्टरांना.."

"पैसे पैसे काय करतो बे? पैसे तर रांडा पण कमवतात! याच्यासाठी डॉक्टर बनायचंय का तुला?" बनियन

हे असं बराच वेळ चाललं. रॅगिंगचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. प्रश्न असे असतात की कोणतेही उत्तर दिलेत तर तुम्हाला शिव्या बसणार हे नक्की. अगदी तुमच्या हातात सिगारेट देऊन हिचं तोंड कोणतं? अन बूड (शब्द सेन्सॉर करून वापरतोय.) कोणतं? तुम्ही कोणतंही काही ही सांगीतलं, तरी 'ही आमची प्रेमिका, हिच्या बुडाला चटके देतोस?' की लगेच दुसरा, '!~@!#, मी काय हिच्या बुडाचं चुंबन घेऊ? तोंडात धरून??'

पण त्या स्टेजपर्यंत पोहोचलो नाही त्यादिवशी. कारण एव्हाना मला जहाल बोअर व्हायला लागलेलं होतं, अन घड्याळात ५ वाजायला आलेले होते. मी हातातलं घड्याळ पाहून उठलो,

"काय बे, कुठे चाल्ला? तुला परवानगी दिली का आम्ही?"

"घरी जायचं आहे. उशीर झालाय. घरी वाट पहात असतील."

"घरी? कुठे रहातो?"

"खडकवासल्याला घर आहे."

"अबे गोळ्या, हा साला सिटीलाईट दिसतो. उगा धरला याला. ए, चल निघ इथून पटकन! @$@!%च्या, पहिले सांगायचं ना. फालतू टाईम वेस्ट केला आमचा.."

घ्या! म्हणजे मला पीळ मारून वरतून मी यांचा टाईम बरबाद केला. असो! निघायला मिळते आहे हेही नसे थोडके. लुंगी अन बनियनने मला घाईघाईत कटवलं. गांवात रहाणार्‍यांवर होस्टेलवाल्यांनी रॅगिंग करायची नाही अन होस्टेलाईट्स वर गावातल्यांनी, असा अलिखित नियम होता. सिटीलाईट अन होस्टेलाईट या दोन प्रकारांत पूर्ण मेडिकल कॉलेज विभागलेलं होतं हे मला नंतर कळलं.

या दोघांपैकी बनियन हा माझ्याच एका (सावत्र) वर्गमित्राचा मोठा भाऊ होता, अन 'त्या' सावत्र मित्राला मेडिकलला अ‍ॅडमिशन न मिळता इंजिनेरिंगला घ्यावी लागली, हा त्याचा राग होता हे नंतर कळले. याने व याच्या वर्गातील मुलांनी भरपूर रॅगिंग केली आमची. (कारण सेकंड/सेकंडवालेच रॅगिंग करण्यात इंटरेस्टेड असत. इथेही सेकंड इयर रेस्ट इयर असे.) पण नंतर तो बनियन "गोळ्या" स्वतः आजतागायत माझा एक सख्खा मित्र झाला आहे, अन आजही मी वाट्टेल तेव्हा त्याची मनसोक्त 'रॅगिंग' घेऊन त्याच्यावर सूड घेत असतो. Wink

***

तर ही होती माझी पहिली रॅगिंग. नंतरही बर्‍याच झाल्या. पण एकदाही कुणी अंगाला हात लावला नाही. ना माझ्या, न कुणाच्याच! अन रॅगिंग करून झाल्यावर ज्या ग्रूपने तुमच्यावर रॅग केलं, ते तुम्हाला स्टेशनच्या बसस्टँडवर, कँटीन रात्रभर उघडं असे. तिथे नेऊन त्यांच्या खर्चाने कॉफी पाजत. दुसर्‍या दिवशीपासून तो ग्रूप तुम्हाला मदत करण्यास तयार असे. संबंध मैत्रीपूर्ण, अन नो रिपीट रॅगिंग. फार झालं तर कुणाची हिस्टॉलॉजीची जर्नल्स कंप्लीट करून दे इत्यादी.

पण याचा अन 'सौतन' चा अन 'हीरो'चा काय संबंध??

तर, यथावकाश ८ दिवसांत मी ई १२ ला रहायला आलो. अख्खा ई ब्लॉक हे रॅगर्स साठी राखिव कुरण असे. मोस्टली सगळे फस्फसवाले 'ई'ला नं? म्हणजे ते कसे राजे महाराजांसाठी राखीव जंगल असे, शिकारीसाठी? तसं. रात्री तब्येतीत जेवणं बिवणं आवरून लोक ई मधे चक्कर मारीत अन हव्या त्या रूमावर थाप मारून चलो बे बकरा लोग! आधे घंटे मे बी ३४ को हाजीर होना! अशी आवतणं येत. मग आम्ही नवा शोध लावला. मेसमधे जेवून गुपचूप कटायचं. अन जो सिनेमा सापडेल तिथे सगळ्यात कमी रुपयांचं तिकीट काढून गुपचूप १२-१२.३० पर्यंत बसायचं. पडद्यासमोर पहिल्या २ रांगात बसून पाहिलेला कोणत्यातरी इम्पोर्टेड गाडीच्या बॉनेटवर हात-बुक्क्या आपटणारा जॅकी श्रॉफ, अन चहा पिणारा राजेश खन्ना असा पर्मनंट मेमरीत कोरला गेलाय अगदी..

अन दुर्दैव म्हणजे, आम्ही छान रॅगिंग 'देतो' अशी आमची (मी, राजा अन अव्या. आम्ही तिघे इ१२ चे रूम पार्टनर्स) ख्याती झाल्याने, होस्टेलातले रातकिडे, जे स्वत: त्यांच्या जमान्यात असे पिक्चर्स पाहून 'तयार' झालेले होते, ते बरोब्बर १२-साडे १२ ला आम्ही परत आलो, की आम्हाला पकडून नेत. मग रॅगिंग पहाटे २-३ पर्यंत चाले. पण तरीही टोटल टाईम कमी होई. पिक्चरला नाही गेलो, तर ९ ते ३ अन गेलो, तर १२ ते ३ असे आमचे 'शो' होत असत.

चांगली रॅगिंग देणे म्हणजे बिन्धास्त बोलणे. वेगवेगळ्या अवयवांची व्हर्नाक्युलर नावे न लाजता घेणे. त्याचवेळी उद्धटपणा न दाखवता सिनियर्सची माफक करमणूक होईल असे रिस्पॉन्स देणे हे आम्ही शिकलेलो होतो. पुढे प्रश्नकर्त्यांना 'लीड' करण्याचा अनुभव गाठीशी जमा झाला तो इथूनच. परिक्षेत कामास येई. कधी गझलेवर डान्स, कधी बारकुंड्या असलेल्या मला ब्रूसली ची पोझ घेऊन दाखवायचा हुकूम. मधेच प्रश्न. चर्चा.

चर्चा अन प्रश्नही अफाट असत. प्रेमविवाह करशील का? का करशील? समजा वेश्येच्या प्रेमात पडलास, तर तिच्याशी लग्न करशील का? का करशील? इथपासून तर वेताळ (इंद्रजाल कॉमिक्स) आवडतो, कार्टूनमधे? मग त्याच्यावर क्विझ. 'किलावी'वर ते २ डॉल्फिन असतात, त्यांची नावं काय? (सांगाच कुणीतरी इन्द्रजाल कॉमिक्सवर फँटम वाचलेल्यांनी) तिथून तिसरं टोक म्हणजे राष्ट्रगीत म्हणून दाखव. सगळे उभे रहात आपण म्हटलं तर. चूक झाली तर कुणीतरी अंगावर धावून येई 'कानाखाली मारू का भ#@$??' म्हणत.. पुस्तकातली प्रतिज्ञा म्हण. 'भारत माझा देश आहे..' प्रत्येक ओळीच्या अर्थावर रॅगिंग होई.. काय वाट्टेल ते चालत असे. मारहाण कधीच झाली नाही ते सांगितलंय आधीच. पण सॉलिड इनोव्हेशन अन इमॅजिनेशन.

आमचाच गाववाला एक होस्टेल सेक्रेटरी होता. म्हणजे होस्टेलचा निवडून आलेला बॉस. त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा २ वर्षे ज्युनियर. तरीही, तो (भाऊ)ही सुटला नाही. त्याचा सुपरमॅन बनवला होता. सुपरमॅन म्हणजे काय? तर सगळे कपडे काढणे. (हे सगळं बाथरूमात जाऊन. तुम्ही तुमचं करायचं. तुमची प्रायव्हसी टिकवली जाई.) मग आधी शर्ट, मग पँट, मग बनियन अन मग फ्रेंची. बनियन फ्रेंचीत खोचणे, अन खांद्याला टॉवेल. 'केप' म्हणून. कपडे वाळत घालायच्या क्लिपांनी बनियनला अडकवलेला. बघा बरं? दिसतोय का सुपरमॅन? हा असा अवतार झाला, की होस्टेलातल्या गोल डांबरी रस्त्यावर 'आय अ‍ॅम सुपरमॅऽनऽऽ' असं ओरडत २-३ चक्कर पळायचं.

एका महाशयांना, 'बाळ कुठून जन्माला येतं?' हे विचारलेलं. ते म्हटले 'बेंबीतून' आता त्याला हे अगाध ज्ञान कुठून आलं कुणास ठाऊक? आज तो प्रथितयश वै डाक्टर आहे. पण फस्फस्ला म्हणे, बाळाचा जन्म बेंबीतून होतो. (अपेक्षित उत्तर: योनीतून असे आहे.) आता ही असली चूक. तीपण मेडिकल कॉलेजात. शिक्षा मस्ट. शिक्षा काय केली? तर यांच्या पार्श्वभागास शाई लावली. त्याचा शिक्का एका कागदावर उमटवला. मग याला पाठवला सी ब्लॉकला. 'जा. पांच सिनियर्स च्या सह्या घेऊन ये यावर.'

सी ब्लॉकला सगळे फायनल इयरवाले. सगळ्यात जास्त इरसाल नमूने. खोलीत लाईट सुरू पाहून याने रुमवर टकटक करावं. 'सर, इथे सही करता का?' असं विचारावं. 'ही झेरॉक्क्ष आहे. ओरिजिनल कुठेय? दाखव? अटेस्टेशन देतो!' अन हे सगळं रात्री ११-१२ वा. म्हटलं तर भितीदायक. म्हटलं तर विनोदी. हे असं अटेस्टेशन घेणारे नमूने वर्षानुवर्षे असत. अन देणारेही.

पिवळी पुस्तकं मराठीत भाषांतरीत करून दाखवायला लावणे. ऐकलं नाही तर इलेक्ट्रीक शेगडीवर शू करण्याची शिक्षा देण्याची धमकी देणे. (थ्री इडियट्स. 'तिथे' शॉक लागेल हे समजून भिती वाटते. त्या पिक्चरात होस्टेल लाईफ फार झक्कास दाखवलंय.) हे सगळे रॅगिंगचे प्रकार.

खोलीत एक मोडकी खुर्ची. तिच्यावर तोल सांभाळत बसलेला बकरा. समोर जमीनीवर बकर्‍याच्या तोंडावर फोकस केलेला टेबल लँप. पाठीच्या अंधारात 'सिनियर्स' रूमात दाटलेला सिगारेटचा धूर. बकर्‍याला विचारलेले प्रश्न. अंगावर धाऊन येण्याचे नाटक. फारच रेअरली कुणी यात 'ब्रेक' होई. एक नमूना होता. हे असलं सुरू असतांना सरळ उठून रुमच्या बाहेर आला, अन समोर रेलिंग पलिकडे एक पडदी असे. ३र्‍या मजल्यावर त्या पडदीवर उतरून हा हीरो एकदम वीरू स्टाईल, 'मी उडी मारतो' अन सगळे भावी रॅगर्स याच्या हाता पाया. हा मुलगा नंतर चोर निघाला. अगदी पोलीसांनी पकडून नेई पर्यंत. क्लेप्टोमॅनिक असेल, किंवा नसेल..

गर्ल्स होस्टेललाही असे म्हणे रॅगिंग. नीताला एक बादलीभर पाणी दुसर्‍या बादलीत चमच्या चमच्याने ट्रन्स्फर करायला लागलेलं. अन स्मिताला तिची वेणी ३ वेळा उघडून परत घालायला लावलेली. तिचे केस कमरेखाली होते. पण डीटेल किस्से ठाउक नाहीत.

ओव्हरऑल, रॅगिंगचा अनुभव छान. माझ्या पिढीचे लोक्स अशी रॅगिंग व्हायला हवीच असं खाजगीत तरी नक्कीच म्हणतील.

एक दोनच अनुभव वाईटही.

'बनियन'च्या ग्रूपने आमच्या बॅचच्या एका ग्रूपवर रात्रभर रॅगिंग केली अन शेवटी कॉफी पाजली नाही. वरून फार हाडचिड. त्यात एक अव्याही होता. तेच ते मास कॉपी संशय प्रकरण. मग या मुलांनी डीनकडे तक्रार केली. डीनने रॅगिंग करणार्‍या मुलांच्या पालकांना तार पाठवून बोलावून घेतले. मोठ्या कष्टाने ते मिटलं होतं प्रकरण.

पुढे ३ वर्षांनी मी स्वतः बीजेचा कल्चरल सेक्रेटरी अन लाल्या जीएस असताना फस्थर्ड ची मुले 'ई'च्या गच्चीवर कुणाचं रॅगिंग करीत होती, त्या मुलाला यांनी फार त्रास दिलेला. लीडर एक फिजी आय्लंड्सवरून आलेला एक्स्चेंज स्टुडंट होता. रॅग झालेल्या मुलाने डीनकडे तक्रार केली. डीनने या मुलांना बोलावून घेतले. रॅगिंग करणार्‍यांनी मी अन जीएस अशी दोन नावं पण सांगितली होती, जी.एम.सी मेंबर्स सामिल होते म्हटल्यावर डीन सोडून देईल असं समजून. डीन यांना झापत असतांना त्या फिजीने पाठीमागून काही कॉमेंट केली, ती सरांनी ऐकली, अन सरळ पोलिस कमिशनरना फोन लावला. नशीबाने त्यावेळी आम्ही दोघेही -मी अन लाल्या- लेडिज होस्टेलला गणपतीचं डेकोरेशन करण्यात मग्न होतो, हे सांगणारे चांगले ४०-५० साक्षीदार असल्याने आम्ही सुटलो त्या गोंधळातून. बरीच चांगली पोरं १ वर्षं डिबार झाली होती तेंव्हा.

पण हे सगळे मायनर साईड इफेक्ट्स. या सगळ्या अनुभवातून शिकणं फार प्रचंड होतं. अन फार खोल शिकायला मिळतं.

सगळ्यात महत्वाचा धडा म्हणजे, इथे मम्मी पप्पा नाहीत. इथे तू आहेस अन मग दुनिया. माज करशील, तर तो निभावण्याची ताकत ठेव. नाही तर दुनिया पट्कन तुझ्या कानाखाली देईल. दुसरा म्हणजे, Do unto others as u want others to do unto you. सगळ्यांना मदत करा. चांगले वागा. पार्टनरला सग्ळ्यात जास्त मदत करा. तोच तुमचा सगळ्यात जवळचा नातेवाईक. रात्र रात्र आईच सेवा करीत नाही ताप आल्यावर. पार्टनरही करतात. हेच दोस्त तुम्हाला पराकोटीची घाण शिवी दिल्याशिवाय हाक मारीत नाहीत, पण तेच जीवही देतात. कुणा पोरीने दिल तोडल्यावर तेच तुम्हाला जीव देण्यापासून वाचवतात, अन तेच कमरेत लाथ घालून उठवून पेपर द्यायला घेऊन जातात. पण हे केंव्हा अन कसं? तुम्ही कराल तसं. करावं तसं भरावं. होस्टेलला राहिल्याशिवाय हे शिकता येत नाही. पाच रुपये उसने मागणं अन फेडणं. रोजचा पै पै चा हिशेब लिहीणं, पै पै साठी भांडणं.. अन रुपये फेकून, पैशापलीकडले ते हिशेब जपणं..

कणाकणाने तुमचा कणा कडक करतं, ते होस्टेल!

****
www.aisiakshare.com/node/146 माझे डॉक्टर होणे : १ (हायपरलिंक अद्ययावत केली आहे.)
माझे डॉक्टर होणे : २
माझे डॉक्टर होणे : ३
माझे डॉक्टर होणे : ४
माझे डॉक्टर होणे : ५

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

क्रमशः राहिलं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

शीर्षकात क्रमशः आहे हे खरं. मजकुराच्या शेवटी मात्र नाही. असो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यात महत्वाचा धडा म्हणजे, इथे मम्मी पप्पा नाहीत. इथे तू आहेस अन मग दुनिया. माज करशील, तर तो निभावण्याची ताकत ठेव. नाही तर दुनिया पट्कन तुझ्या कानाखाली देईल. दुसरा म्हणजे, Do unto others as u want others to do unto you. सगळ्यांना मदत करा. चांगले वागा. पार्टनरला सग्ळ्यात जास्त मदत करा. तोच तुमचा सगळ्यात जवळचा नातेवाईक. रात्र रात्र आईच सेवा करीत नाही ताप आल्यावर. पार्टनरही करतात. हेच दोस्त तुम्हाला पराकोटीची घाण शिवी दिल्याशिवाय हाक मारीत नाहीत, पण तेच जीवही देतात. कुणा पोरीने दिल तोडल्यावर तेच तुम्हाला जीव देण्यापासून वाचवतात, अन तेच कमरेत लाथ घालून उठवून पेपर द्यायला घेऊन जातात. पण हे केंव्हा अन कसं? तुम्ही कराल तसं. करावं तसं भरावं. होस्टेलला राहिल्याशिवाय हे शिकता येत नाही. पाच रुपये उसने मागणं अन फेडणं. रोजचा पै पै चा हिशेब लिहीणं, पै पै साठी भांडणं.. अन पैशापलीकडले हिशेब जपणं..

कणाकणाने तुमचा कणा कडक करतं, ते होस्टेल!

हे वाचत असताना टोपी काढण्यात आली आहे. *

*(पक्षी हॅट्स ऑफ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवणीच तश्या आहेत.
उक्कूसं एडिटलं आहे हे वाक्य.."रोजचा पै पै चा हिशेब लिहीणं, पै पै साठी भांडणं.. अन रुपये फेकून पैशापलीकडले हिशेब जपणं.." समजून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हाहा Smile रॅगींगचा अनुभव मस्त. अ‍ॅक्च्युअल भेटीपेक्षा "इन्तजार" मध्ये जशी जास्त मजा असते तशी खर्‍याखुर्‍या रॅगींगपेक्षा त्याच्या काल्पनिक टेन्शनने आणि ऐकीव कथांनीच तोंडचे पाणी पळते असा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ तै!
तुमचा फस्ट हँड एक्ष्पिरियन्स असेल तर लिवाकी! पोरी नक्की काय कर्तात हे ऐकायची लै इच्छा आहे बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला A-B-C-D उलट क्रमाने बोलायला सांगीतले होते. आणि नाव /गाव आदि चौकशी केली. पण मी जरा रडले (म्हणजे डोळ्यात पाणी आले) Sad
त्यामुळे फार रॅगींग झाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार आठवणी आहेत.

आमच्या कॉलेजात रॅगिंग त्या मानाने त्रासदायक होती, आणि तीन-चार महिने चालायची म्हणजे खूप कंटाळवाणी होती. दोन-तीन वर्षांत एखादा-एखादा विद्यार्थी मिळालेली ऑडमिशन टाकून पसार होई.

रॅगिंगबद्दल मला गोड आठवणी नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॅगिंग कधी झालं नाही, पण तीन वर्ष खेड्यातल्या एका घरात 'बिग ब्रदर' ('बिग बॉस'चा ओरिगिनल इंग्रज अवतार) खेळताना खूप चांगले मित्र मिळाले हे निश्चित.

पुढच्या भागाची वाट पहाते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रॅगिंग कधी झाले नाही. सुरुवातीला काही दिवस आमच्या विंगेत सिनिअर्सना गार्ड आत सोडत नसत. मला रॅगिंगची संकल्पना विचित्र वाटते. असे 'सर म्हणायला लावून' मला आदर द्या म्हणणे वगैरे वेडेपणाचे वाटते. दक्षिणी मुलांवर हिंदी बोलण्याबद्दल रॅगिंग झालेले.
आमच्या कॉलेजमध्ये एक विचित्र गोष्ट पाहिली. तेलुगु सिनिअर्स आमच्या बॅचच्या तेलुगु मुलांना बोलावून त्यांचे रॅगिंग घेत. मी मराठी सिनिअर्स चांगले आहेत म्हणून खूश झालेलो. Blum 3 काही बंगाली सिनिअर्स मात्र बंगाली मुले वगळून इतरांचे रॅगिंग घेत.

आमच्या हॉस्टेलमधील पहिल्या रात्री दार वाजवून एक माणूस आत आला आणि दार बंद केले. वाढलेली दाढी, जाकीट, स्लीपर वगैरे असा अवतार! आम्हाला वाटले कोणीतरी फिफ्थ इयरवाला आला रॅगिंग घ्यायला. घाबरत घाबरत उत्तरे दिली. तरी चांगले प्रश्न विचारतोय म्हणजे चांगला असावा असा ग्रह झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी कळले की आदल्या दिवशीची ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचे वॉर्डन होते. ROFL त्यांनी स्वतःबद्दल काहीच न सांगितल्यामुळे आणि त्यांच्या कमी वयामुळे गोंधळ झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंतच्या सहाही भागापैकी पहिला आणि हा सहावा विलक्षणरित्या खिळवून ठेवणारा वाटला. प्रोफेशनल कॉलेजीस असोत वा प्युअरली अ‍ॅकेडेमिक, हॉस्टेल आणि इन-क्लास रॅगिन्ग कमीजास्त प्रमाणात "पार्ट ऑफ द सिलॅबस' मानले जात असे. आता मात्र शासन, विद्यापीठ तसेच मॅनेजेमेन्टने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे अ‍ॅकेडेमिक कॉलेजीस आणि वसतिगृहातील रॅगिन्गचे प्रकार जवळपास शून्यावर आले आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. मात्र आजही प्रोफेशनल कॉलेजीसमध्ये काही प्रमाणात (अगदीच जीवघेणे नसले तरी) रॅगिन्ग चालत असल्याच्या घटना आढळतीलच. मी कोल्हापूरातच वाढलो आणि कला शाखेचा विद्यार्थी असल्याने सारे शिक्षणही इथेच, त्यामुळे हॉस्टेल लाईफचा संबंध अजिबात नाहीच. पण जे काही मित्र हॉस्टेलवर राहायचे त्यांच्या रूम्सवर नोट्स अदलाबदली आणि अशाच सहली ठरविण्याच्या निमित्ताने जाणे व्हायचे, ते संध्याकाळच्या सुमारास. तिथे मात्र कधीकधी त्यांच्यात्यांच्यात चालणार्‍या रॅगिन्ग संदर्भातील गप्पा ऐकायला मिळायच्या.

कोल्हापुरी हॉस्टेलमधील सर्वात फेमस रॅग प्रघात म्हणजे 'कुस्ती'. नवख्याला (अगदी मुडदिशी असला तरीही) "तू पैलवान दिसतोसच आणि आमच्यातील सीनिअरला जर कुस्तीत, रुममध्येच चितपट केलेस तरच तुला उद्यापासून त्रास होणार नाही" असे खुशीचे गाजर दाखवत. तोही कसाबसा तयार व्हायचाच कारण एकतर तो खेडेगावातील आणि चार वर्षे या दैत्यांसमवेत काढायची तर चला टाकू या एकदोन डाव असे मनोमनी म्हणत असे. निकाल लगेच लागायचा नाहीच कारण सीनिवर त्याला चिलटासारखा खेळवत राही आणि त्या आठ बाय आठच्या खोलीत केवळ लंगोट्यावर असलेल्या त्या बिचार्‍याला घामाघूम करत असे. शेवटी नवे पोर रडकुंडीला आले की, मग 'नुरा नुरा' (म्हणजे रडकी कुस्ती) असा गिल्ला व्हायचा. रॅगिन्ग कुळाला मग दोन दिवस त्या रुममधील सर्वांची कपडे हौदावर धुण्याची शिक्षा मिळत असे.

"कणाकणाने तुमचा कणा कडक करतं, ते होस्टेल!"
~ ही झकासच व्याख्या आहे हॉस्टेलची. फ्रेम करून सध्या हॉस्टेलमध्ये असणार्‍या प्रत्येकाने आपल्या रूममध्ये लटकवावे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॅगिंग म्हणजे काय?
तर पौगंडातील नवख्या नराला त्याच्यापेक्षा वयस्क नरांनी त्यांच्या कळपात सामिल करून घेण्याचे विधी. "मॅनहूड" राईट्स. मेडिकल कॉलेजात मानव अन मानवता अन शरीर अन त्याची रहस्ये इतक्या खोलात जाऊन तपासली जातात, तुमच्या संवेदना कसोटीस लागतात, की रॅगिंग बहुतेकदा प्लीझंटच असते असे माझे मत आहे. आणि हा!! Isn't each male eager to go through those rites to reach his manhood?
दुसरी गम्मत म्हणजे आमच्याकडे ते होस्टेलाईट्/सिटीलाईट स्पिरिट. त्यामुळे होस्टेल कँपसच्याबाहेर कधीच रॅग झालो नाही. कॉलेज बिल्डिंगमधे तर होस्टेलाईट सिनियर्स आम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी जास्तीचं लक्ष ठेवीत असत. कुण्या सिटीलाईटाने चुकून आम्हाला 'अरे' केलं तर 'काऽयेरे?' म्हणायला त्याच्या वर्गातले ४ अन सिनियर ५ होस्टेलाईट पॅसजमधे थबकत असत.
मॅच्युरिटी लेव्हल खूप 'हाय' असते मेडिकल कॉलेजात. कल्पना करा. १७ हे अ‍ॅडमिशनच वय. +५.५ = २२.५ ला जनरल प्रॅक्टीशनर होतो. अन ३ वर्षं एम डी केलं तर २५.५ वर्षे वयाचा माणूस. हा 'हार्ट स्पेशालिस्ट' असतो. तुम्ही ५० वर्षांचे असतांना त्याच्या हातात जीव देता. अन तो जीव त्याने वाचवायचा असतो, शिवाय, मॅच्युरिटीही दाखवायची असते. हे सगळं मिळविण्याचा 'चरक' असतो, ते मेडिकल कॉलेज.
रॅगिंग हा फाऽऽर मायनर भाग या सगळ्याचा. म्हणून मवाळ असावी, अन मला रॅगिंगच्या प्लीझंट मेमरीझ असाव्यात. या सो कॉल्ड रॅगिंगच्या हज्जारपट कडक 'चरकातून' आम्ही जात असू प्रत्येक क्षणाला. अन ते सिनियर्स त्यातून गेलेले असत आधीच. म्हणून कदाचित फक्त इंटेलेक्चुअली आम्हाला जरा मजबूत बनविणे हा उद्देश असेल त्यांचा. अन त्यांना तरी कुठे वेळ होता हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रॅगिंगसारखा भन्नाट विषय. हॉस्टेलमधल्या घटनांचं डिटेलवार वर्णन. आणि तुमची कथा रंगवण्याची शैली. या नेहमीच्या गोष्टी तर आहेतच. पण त्या पलिकडे या लेखात तुमचं व्यक्तिमत्व उतरलेलं आहे. अगदी स्वयंपाकात गृहिणीचा हात उतरतो तसं. त्यामुळे चव झकास आलेली आहे.

असंच मुक्तपणे लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किलावि च्या २ डॉल्फिन चि नावे
१) सॉलॉमन ( द वाइज )
२) नेफर्टिटि ( द बूटिफुल )
खूपच दिवसांनी एक छान आठवण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही जवाब.
तुम्हाला ३ मार्क!
अभिनंदन!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

फ्क्त ३ च? नॉट फेअर.
तुमचे लेखन आवडले हे तर सांगितलेच नाही. पुभाप्र Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन नावांना तीन मार्क! Wink
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अप्रतिम चालू आहे ही लेखमाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

एकदम झकास...

पण आधीच्या भागाचे दुवे चालत नाहीयेत. त्याचं काहीतरी करा.. पान सापडत नाही असे येत आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या भागातील लिंक्स अपडेट केल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

भारी. कडक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख जमलय.
त्यातही शेवटचा परिच्छेद तर अप्रतिम. प्रिंट आउट काढून आमच्या रूमवर लावणारे.
तरीही मस्करी व जीवघेणा,घाणेरडा विकृत प्रकार ह्याची सीमारेषा सतत चढत्या भाजणीने(रॅगिंगचे प्रमाण वाढते तसे) पुसट होत जात असल्याने रॅगिंग होउच नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सगळे भाग वाचतो आहे. मस्त चालु आहे.
मी माझ्यापुरत्या तयार केलेल्या क्रमशः धोरणानुसार Wink यापुढली प्रतिक्रीया फक्त शेवटच्या भागावर देईन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!