मी या शाळेत जाणार नाही

मी या शाळेत जाणार नाही

दुर आहे शाळा घरी लवकर येता येत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

भिती मला वाटे शाळा नवी मोठी
आठवते मला शाळा जुनी छोटी
नविन शाळा मला मुळीच आवडत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

जुने मित्र माझे फार होते ग चांगले
बट्टी होई आमची जरी भांडण झाले
ह्या शाळेत मला मुळी कुणी मित्रच नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

मोठे मोठे वर्ग येथे मोठा आहे फळा
नव्या मुलांना जुनी मुले करती कोंडाळा
भंडावून सोडी सारे मी केविलवाणा पाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

लहानच आहे मी काही मोठा नाही झालो
उगीचच मागच्या वर्गात पहिला मी आलो
या शाळेत अ‍ॅडमीशन का घेतले समजत नाही
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

आई तू एकदातरी सांग ना ग बाबांना
जुनी शाळाच चांगली बोल ग त्यांना
अभ्यास तेथेही करीन निट मी राहीन
नाही ग आई मी या शाळेत जाणार नाही

- पाषाणभेद

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान कविता/गीत आहे..
मात्र नेहमीची तक्रार करतो.. रेकॉर्ड करा.. त्याशिवाय या गेय कवितांच्या ठेक्याचा अंदाज येत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिदा, मला चालीत म्हणता येणार नाही अन ते तुम्हाला ऐकवणारही नाही!
खरोखर एखाद्याकडून गावून घ्यायचे असेल तर एखादुसरा शब्द पुढेमागे, कमी जास्त करावा लागेल हे नक्की.
कविता वाचल्यबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

'मै कभी बतलाता नही' या गाण्याचं स्वैर रूपांतर म्हणावं का? शाळा बदलणं हा प्रकार मुलांना कितपत आवडतो कोण जाणे? मलातरी फारसा आवडला नाही.

पाभे, चालीत गाऊन नाही. माझ्या मते ऋषिकेशचं म्हणणं असं की कविता चालीत वाचून रेकॉर्ड करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही कविता वाचून मला लहानपणची '...परी उशीर टाळायाला, मी निघे तडक शाळेला' ही कविता आठवली. त्या कवितेत फ्रॉस्टच्या 'आय हॅव माइल्स टु गो बिफोर आय स्लीप' ची छटा आहे. तुमच्या कवितेला तसा गहन अर्थ प्राप्त होऊ शकतो... तीवर थोडी मेहेनत घ्यायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> 'मै कभी बतलाता नही' या गाण्याचं स्वैर रूपांतर म्हणावं का?
नाही.

>>> 'आय हॅव माइल्स टु गो बिफोर आय स्लीप' ची छटा आहे...

इतक्या मोठ्या आवाक्याच्या कवितेशी तुलना केल्याने लाजल्यासारखे झालेय.
माझ्या शालेय जीवनात एका वर्षी शाळा बदलली गेली होती. आता चौथीतून पाचवीत गेल्यावर ती बदलावीच लागली असती कारण प्राथमिक शाळा चौथीपर्यंतच होती. त्या वेळेचा विचार केला अन ही कविता लिहिली. अर्थात मिठ मसाला पाणी टाकून ती वाढल्या गेली. (हे वाढवणे अगदी पाच सात मिनीटात झाले होते. म्हणून काही टायपो/ शब्दबदलही त्यात होते.)
कविता केल्यानंतर व प्रकाशित केल्यानंतर वाचल्यानंतर मग मात्र ही भावना सार्वत्रीक असू शकते असला साक्षात्कार झाला. लहान मुलाची खरोखर अशी अवस्था होवू शकते. मोठी माणसे घर बदलतांना रडतातसुद्धा. त्यात त्यांच्या भावना त्या घराशी, तेथील वातावरणाशी निगडीत असतात. त्यात झालेला बदल दु:खदायक असू शकतो. तीच भावना लहान मुलाची शाळा बदलल्यानंतर होवू शकते. त्याचे भावविश्व जुन्या शाळेशी तदरूप झालेले असते. बाहेरच्या जगाची कल्पना नसल्याने नव्या विश्वात तो गांगरून जातो. त्याच भावना मी कवितेत रेखाटायचा प्रयत्न केला आहे.

प्रतिसादकांचे व वाचकांचे धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

माझ्या शालेय जीवनात एका वर्षी शाळा बदलली गेली होती. आता चौथीतून पाचवीत गेल्यावर ती बदलावीच लागली असती कारण प्राथमिक शाळा चौथीपर्यंतच होती. त्या वेळेचा विचार केला अन ही कविता लिहिली.

माझी शाळा दर ३ वर्षांनी बदलत गेली, त्यामुळे कवितेशी काही अंशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉस्टॅल्जिक मुलाची कविता.
छान आहे. छोटे वाटणारे बदल लहान वयात बरेच त्रासदायक असतात हे खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0