तो आणि ती

तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर
ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर

तो ‘दील और दिमाग़ से’ आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा
ती फक्त ‘दील से’ आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी

तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा
ती नातेवाइक, मुले, समाज... काय म्हणेल ह्या विचाराने हैराण होत आयुष्य जगणारी

तो काहीसा हळवा, बराचसा माघार घेणारा पण कधी कधी आक्रमक होणारा
ती हळवेपणाचा आव आणून टोचून बोलून घायाळ करणारी

तो नाजूक आठवणींच्या वलयात गुरफटून, गालातल्या गालात हसून आनंद मिळवणारा
ती ‘कसला विचार करतोय कोण जाणॆ?’ असे म्हणून आपल्याच विश्वात आनंदणारी

तो एकांतात, नाजूक क्षणी, नाजूक क्षण वेचून आठवणींच्या कप्प्यात साठवण्याचा कसोशिने प्रयत्न करणारा
ती एकांतात, नाजूक क्षणी ‘तुझे माझ्यावर खरेच प्रेम आहे ना रे’? असे विचारून धुंदी उतरवणारी

तो अचानक उत्कटतेने तीला कवेत घेउन, चुंबनांची बरसात करून घुसमटून टाकावे असा विचार करणारा
ती ‘वेळे काळाचे भानच नाही, जनाची नाही तर मनाची तरी’ असे म्हणून रंगाचा बेरंग करणारी

तो त्याच्यातल्या उणिवा तीने भरून काढून त्याला साथ द्यावी असे वाटणारा, पण हे तीला कसे समजवून सांगावे ह्या विचारांनी घुसमटणारा
ती सगळे मलाच बघावे लागते, तो कधीतरी मला समजून घेइल, ह्या एकांगी विचारांनी घुसमटून जाणारी

तो कधी-कधी हे सगळे असह्य होउन भांड-भांड भांडणारा
ती तेवढ्याच आक्रमकतेने भांड-भांड भांडणारी

तो नंतर माघार घेउन तीला रंगात आणून खुलवणारा
ती समजूतदारपणे, खुषीने रंगात येउन खुलणारी

तो तीच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून तीच्यावर मनापासून प्रेम करणारा
ती त्याच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून त्याच्यावर तीतकेच मनापासून प्रेम करणारी

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

असते खरे असे विसंवादी-पूरक नाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चगंमतच्च आहे
तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून करमेना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

थोडी गोग्गोड वाटली रे कविता, थोडा तडका आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या मुक्तकातून लेखकाची हळवी बाजू दिसून येते.

अशी मुक्तकं लिहिण्यासाठी मी एक मार्गदर्शनपर लेख लिहिला होता, त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोकाजीना हळवे कल्पून डोळे अंमळ पाणावले

बाकी दुव्यातील पाकृ एकदम फक्कड आहे हो गुर्जी
लवकरच एक प्रयोग करुन बघेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

जाई,
हा घ्या रुमाल, पुसा, पुसा.... डोळे पुसा
Handkerchief

Smile
- (हळवा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शी बै
अच्रत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

ROFL ROFL ROFL ROFL ROFL
गुर्जी, लैच भारी मार्गदर्शन!

- (मार्ग शोधणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुछ पट्या नही.....
फारच एकतर्फी वाटली... म्हणजे कसं की तो अगदी छान छान ( दिल और दिमागसे आणि त्याच वेळी हळवा वगैरे ) आणि ती अगदीच आपली ही.... तो एक छानसं कॉकटेल आणि ती बेचव शहाळं वगैरे...
तेव्हा आता तिच्याबाजूनी एक होउन जाउंदेत, कसें? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो एक छानसं कॉकटेल आणि ती बेचव शहाळं वगैरे

Biggrin
पण असू शकत नाही का?

- (बेचव शहाळ्याचे कॉकटले करावे असा विचार करणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< - (बेचव शहाळ्याचे कॉकटले करावे असा विचार करणारा) सोकाजी >>

हे कॉकटले काय असतं बुवा? आतापर्यंत कॉकटेल माहिती होतं, पण कॉकटेल पेक्षा भारी असेल तर शुभस्य शीघ्रम.... आणि हो, ते तिच्याकडून असेल ना त्यामुळे ते गोग्गोड नसून चमचमीत असेल.... बरोबर की नाही? :bigsmile:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संबंधाची बांधणी छान आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!आवडली..............

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0