आल्याच्या वड्या उर्फ आलेपाक.....
डिस्क्लेमर :
ह्याच वड्या ह्या आधी मिपावर लिहून झाल्या आहेत.मिपा वर मी "मुक्त विहारी" ह्या नावाने वावरतो.त्यामुळे कॉपी राईट कायद्याचा भंग जरी होत नसला तरी तिथे लेख लिहीता, मग इथे पण कशाला? असा कुणाच्या तरी अस्मितेला धक्का लागू शकतो.तर तो तसा धक्का लागू देवू नका.
१. मिपाची लेख टाकायची शैली वेगळी आहे.
२. संकेत स्थळ बदलले की, विचार बदलावेत.देवळांत घंटा आणि तीर्थात मुंडण.
३. हा माझा इथला पहिलाच लेख आहे, काही चूका झाल्या असतील तर माफ न करता, त्या चूका टाळण्यासाठी काय करावे? ते सांगावे.
४. ह्या वड्या श्री.सलील ह्यांना अर्पण.
=====================================================================
ज्यांना स्वैपाक करायची इच्छा आहे, त्यांच्या साठी मुलभूत तयारी म्हणजे ह्या वड्या.
वड्या तयार करायच्या किंवा वड्या पाडायला सारण तयार झाले आहे किंवा नाही, हे ओळखायच्या २च खूणा.सारण घट्ट करणे,म्हणजे गोळा होईल आणि त्यात चमचा उभा राहील इतपत परतणे....किंवा कढईच्या कडेला साखर जमा होई पर्यंत परतणे.
इथे आपण कढईच्या कडेला साखर जमा होणारी वडी करणार आहोत.
आता हीच वडी का? तर....
१. ही बिघडली, तरी वाया जात नाही.चूरा होवो.वडी घट्ट होवो किंवा किंचीत ओलसर राहो.वाया जात नाही.चात आल्याच्या ऐवजी वडी टाकायची.
२. ह्यातील कुठलाच पदार्थ वाया जात नाही.आल्याच्या चोथ्याचा उपयोग लोणच्यासाठी,चहात वापरायला,आल्याची कोबडी (जिंजर चिकन) करतांना किंवा आल्याची मुखशुध्दी करायला होतो.
=========================================================================
साहित्य :
१. आले.(आले शक्यतो भारतीय घ्या.चायनीझ आले असेल तर त्यात तिखट पणा नांवालाच असतो.वड्यांची चव बिघडते.
२. साखर... आल्याच्या तिखट पणावर अवलंबून.तरीपण एक वाटी आल्याच्या रसाबरोबर एक वाटी.मी अंदाजपंचे घालतो.
३. किसणी...आले किसून घ्यायला.आल्याचे तुकडे करून एकदा मिक्सर मधून फिरवून बघीतले आहे.तुम्ही असला घोटाळा करू नका.
४. मिक्सर.
५. तूप...२ चमचे
६. दुध... उगीच आपले १ ते २ चमचे.
७. साय... घ्या भरपूर...
क्रुती......
१. आले किसून घ्या.
२. आले मिक्सर मधून काढा आणि ते गाळणी मधून पिळून रस काढून घ्या.खालील फोटो बघा.
३. आता एका कढईत साखर + दूध + साय टाकून ती गरम करायला ठेवा.खालील फोटो बघा.
४. थोडे गरम झाले आणि साखर थोडी विघळायला लागली की ह्या कढईमधल्या रसायनात आल्याचा रस घाला. आणि ताटाला तूप लावुन घ्या.एकदा उकळी यायला लागली की क्षणभर पण विश्रांती मिळणार नाही.खालील फोटो बघा.
५. आता हे रसायन थोडेसे उसाच्या रसा सारखे दिसायला लागेल.त्याला मस्त उकळायला ठेवा.खालील फोटो नीट बघा.इथे जरा उसंत मिळाली म्हणून हा फोटो घेऊ शकलो.
६. आता रसायन थोडे घट्ट होवू लागले असेल.आणि बराचसा फेस पण यायला लागला असेल.आता ढवळत बसा...कुठपर्यंत तर कढईच्या कडेला साखर दिसायला लागे पर्यंत.
थोडे रसायन आणि बरीचशी साखर टाईप दिसायला लागले की गॅस बंद करा आणि परत ढवळा.आता रसायनाला फेस यायला लागला असेल.
लगेच त्याला तूप लावलेल्या ताटावर घ्या आणि गरम अस्तांनाच वड्या पाडायला घ्या.
मला नेमका ह्याच वेळी फोन आला आणि थोडा घात झाला.मिश्रण १५/२० सेकंदच मंद गॅसवर होते...पण ह्या ठराविक वेळेलाच खूप महत्व असते.
असो...
वड्या तर तयार झाल्या आणि डब्यात पण गेल्या.आता उद्यापासून जातील आपापल्या माणसांकडे.
तयार झालेल्या वड्यांचा फोटो खाली देत आहे.
वड्या थोड्या घट्ट झाल्यामुळे पूड जरा जास्त आहे आणि वड्यांचा आकारपण चौकोनी न होता, त्यांनी त्यांना हवा तसा आकार घेतला आहे.
प्रतिक्रिया
ल्यप ल्यप
ल्यप ल्यप
पण फोटु?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मला
फोटो दिसत आहेत.
मिपाकरांना पण फोटो दिसत होते.
कुछ तो गड़बड़ है....
जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.
खुलाशांच्या अपेक्षेत ---
खालील खुलाशांच्या अपेक्षेत ---
१. ह्या आल्याच्या रसाच्या वड्या आहेत तर.. होय ना?
२. तूप-दूध घेण्याचा चमचा --- चहाचा की टेबल-चमचा?
३. प्रत्येक कृतीस लागणारा अंदाजे वेळ किती? खास करून सर्व मिश्रण एकत्रित करून विस्तवावर चढवल्यानंतर??
४. आले आणण्या-धुण्यापासून, मिक्सरमध्ये वाटून-रस पिळून काढण्यापासून वड्या थापण्या-पाडण्यापर्यंत प्रत्येक कृती आपणच करावे की मदतनीस घ्यावेत?
५. आले किती घ्यावे त्याचे प्रमाण? उदा. पाव किलो आले घेतले तर त्याचा रस किती वाट्या निघतो व त्याच्या अंदाजे त्या दिवशी-संध्याकाळी दिल्यात त्या आकाराच्या किती वड्या होतात?
६. आले मिक्सर मधून वाटताना त्यात पाणी घालायचे की नाही?
७. लोखंडाची कढई आहे का वरील फोटोंतील?
करून बघण्याची खुमखुमी आली इतके सुंदर फोटो बघितल्यावर... अन चव आठवल्यावर त्यामुळे अधिक माहिती करून घ्यावीशी वाटली...
१. ह्या आल्याच्या रसाच्या
१. ह्या आल्याच्या रसाच्या वड्या आहेत तर.. होय ना?
हो.चोथा काढून टाकल्यामुळे तोंडात लगेच विरघळतात.
२. तूप-दूध घेण्याचा चमचा --- चहाचा की टेबल-चमचा?
तूप २/३ चमचे घेतले तरी चालते.मध्यम आकाराचा.दूध सायीबरोबर जितके असेल तितके.जास्तीत जास्त २ चमचे दूध.
३. प्रत्येक कृतीस लागणारा अंदाजे वेळ किती? खास करून सर्व मिश्रण एकत्रित करून विस्तवावर चढवल्यानंतर??
पाव किलो आले असेल तर १ तास.किसण्या पासून ते रस काढे पर्यंत ३० ते ३५ मिनीटे.पुढे २५ ते ३० मिनीटे.
४. आले आणण्या-धुण्यापासून, मिक्सरमध्ये वाटून-रस पिळून काढण्यापासून वड्या थापण्या-पाडण्यापर्यंत प्रत्येक कृती आपणच करावे की मदतनीस घ्यावेत?
मदतनीसाची अजिबात गरज नाही.उलट आमच्या कडे अडचणच जास्त.इतके आले कशाला ते थेट उरलेल्या चोथ्याचे लोणचे तुम्हीच करणार ना? असे असंख्य प्रश्र्न बायको विचारते.त्यापेक्षा आपल्या आपणच वड्या कराव्यात.
५. आले किती घ्यावे त्याचे प्रमाण? उदा. पाव किलो आले घेतले तर त्याचा रस किती वाट्या निघतो व त्याच्या अंदाजे त्या दिवशी-संध्याकाळी दिल्यात त्या आकाराच्या किती वड्या होतात?
पाव किलो आल्यात ३० ते ३५ वड्या होतात.शिवाय चूरा वेगळा.
६. आले मिक्सर मधून वाटताना त्यात पाणी घालायचे की नाही?
पाणी थोडे घालायचे.सुरुवातीच्या वेळीस.पुढच्या घाण्याला आल्याचा रस घातला तरी चालतो किंवा पाणी घातले तरी चालते.
७. लोखंडाची कढई आहे का वरील फोटोंतील?
हिंडालियमची आहे.
जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.
हिंडालियम म्हणजे?
हिंडालियम म्हणजे?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जरमन !! ठोकून द्यायला माझं
जरमन !!
ठोकून द्यायला माझं काय जातंय ..
जर्मन म्हणजे अॅल्युमिनियम
जर्मन म्हणजे अॅल्युमिनियम. हिंदालियमला हिंदालियम असेच म्हटल्याचे ऐकले आहे. (जर्मन अॅल्युमिनियम वि. हिंदुस्तान अॅल्युमिनियम असा भेद असावा काय?)
"जर्मन" म्हणजे अॅल्युमिनियम नसावे.
"जर्मन" हे "जर्मन सिल्व्हर"चे लघुरूप असावे, असे वाटते. तो एक (चांदीशी - किंवा, फॉर द्याट म्याटर, अॅल्युमिनियमशीसुद्धा) काहीही संबंध नसलेला मिश्रधातू आहे.
(अर्थात, आधुनिक स्थानिक बोलींत "जर्मन" हा शब्द "अॅल्युमिनियम" या अर्थाने वापरला जात असल्यास कल्पना नाही, परंतु "जर्मन"चा उगम वर दिल्याप्रमाणे असावा, आणि नंतर (उगमाच्या स्थानिक अज्ञानापोटी) तो अर्थ बदलत गेला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.)
"हिंदालियम"/"हिंडॅलियम" हा अॅल्युमिनियमचा एक मिश्रधातू आहे. "हिंदुस्तान अॅल्युमिनियम कॉर्पोरेशन लिमिटेड"ने तो निर्माण/विकसित केला, म्हणून हे नाव. (अधिक माहिती प्रस्तुत दुव्यावर मिळू शकावी.)
अॅल्युमिनियमसदृश दिसतं पण
अॅल्युमिनियमसदृश दिसतं पण अॅल्युमिनियम नव्हे इतकंच ठौक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अॅल्युमिनियम व मॅग्नेशियम
हिंदालियम हा अॅल्युमिनियम व मॅग्नेशियमचा मिश्रधातू असल्याचे दिसते
http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=articl...
व्वा! या माहितीकरिता धन्यवाद
व्वा! या माहितीकरिता धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान! सोप्पी वाटतेय पाकृ. हा
छान! सोप्पी वाटतेय पाकृ. हा उष्ण पदार्थ होइल का? उन्हाळ्यात थोडा जपुन खावा?
अवांतर: कधीएकेकाळी आऽऽऽलेपाक् विक्रेते यायचे गल्लोगल्ली. सायकलवरुन वेगळ्याच पद्धतीने ओरडत जायचे. एक कोणततरी खोड विकणारेपण यायचे, पातळ काप करुन द्यायचे, छान लागायच, नाव विसरले... आणि ते सिनेमा दाखवणारेपण आठवले
सोपी छान पाकृ. बाकी तुम्हाला
सोपी छान पाकृ.
बाकी तुम्हाला सुचना हव्याच आहेत तर ही एक विनंतीवजा सुचना:
ऐसीवर चित्रे टाकताना height="" width="" टाकल्यास काही बाऊझर्सवर चित्रे दिसत नाहीत. त्याऐवजी एकतर एवतरण चिन्हात संख्या रोमन लिपीत द्यावी किंवा मग हे दोन ङ्याग काढूनच टाकावेत. तुम्ही दिलेल्या चित्रात विड्थ दिलेली होती मात्र height="" त्यामुळे काही बाऊझर्सवर (जुन्या आयईवर) चित्रांऐवजी नुसती रेघ दिसत होती. या धाग्यात योग्य तो बदल केला आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
णिषेध
ह्या वड्या श्री.सलील ह्यांना अर्पण.
सलील मधला लि दीर्घ काढल्याबद्दल णिषेध!
शेवटचा फटो 'आऊट ऑफ फोकस' करण्याची आयडिया आवडली, जेणेकरुन वाचकांना चुरा दिसू नये.
ह्यॅ! चोथ्याला पाककृतीत महत्व
ह्यॅ! चोथ्याला पाककृतीत महत्व नसल्याने (आमच्या पुरत) बाद! नाही तर एक आयडिया करा चोथ्यापासुन नवीन पाककृती तयार करा!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com
ही घ्या....आल्याचे पाचक....
आल्याच्या चोथ्यात
एका लिंबाचा रस + चिमूट भर मिरपूड + चवी पुरते काळे मीठ, घाला आणि २/३ दिवस मुरवा.
जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.
हं आता कसं!
हं आता कसं!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com
जर्मन / हिंदालीयम
अजूनही जर्मनची भांडी असंच म्हटले जाते. जाडी जास्त असेल तर विमानाच्या पत्र्याची भांडी, सूप असेही म्हटले जाते.