इंटरनेट चे भविष्य
संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय
नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.
कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .
आउटरनेट नामक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे.
यासाठी कोणी मोठा उद्योजक /charity पुढे येईल का?
http://www.ndtv.com/article/world/us-company-to-beam-free-wi-fi-to-entir...
https://www.outernet.is/ PROJ
https://www.outernet.is/
PROJECT TIMELINE
DECEMBER 2013
Phase I Technical Assessment
JUNE 2014
Development of prototype satellites and testing of long range WiFi multicasting.
SEPTEMBER 2014
Transmission testing in flight-like environments (requesting time on the International Space Station)
JANUARY 2015
Launch and testing of constellation operations
APRIL 2015
Establish manufacturing process for hundreds of satellites
JUNE 2015
Begin deployment of Outernet as launch schedule permits
Mandar Katre
Mandar Katre
माफ करा मिपावरचेच प्रतिसाद इकडे टंकतोय.
माफ करा मिपावरचेच प्रतिसाद इकडे टंकतोय. पण वेगवेगळ्या संस्थळावर वेगवेगळे मुद्दे समोर येतील म्हणून चर्चेत भाग घेतोय.
१. फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाऊ शकते - हे मान्य आहे आणि शक्यदेखील आहे.
२. जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून इंटरनेट सेवा दिली जाऊ शकते - हे मान्य नाही आणि शक्य आहे असे वाटत नाही.
उसकी मर्जीबिना एक पत्ता हिलता नही |
रब जो चाहे वही तो होना है | आदमी खिलोना है |
टीप : रब च्या जागी युएस / उसगांव / आम्रिका यापैकी कोणताही शब्द वापरा.
ऐसीवरील पांढरे केस झालेल्यांच्या (म्हणजे जाणकारांच्या) प्रतिक्षेत.
उसकी मर्जीबिना एक पत्ता हिलता
हॅ हॅ हॅ, कसचं कसचं!!
-परश्या उसगांवकर
माहिती
इथे तपशीलात चर्चा आहे ती जास्त उद्बोधक ठरावी, इथेही बरीच माहिती आहे.
मन्डळी ...आणखी एक गुड न्यूज ...
आता सर्व ग्राहकाना बी एस एन एल देणार २ एमबीपीएस च्या स्पीड ने इन्टरनेट सेवा ....
http://economictimes.indiatimes.com/tech/internet/bsnl-to-offer-minimum-...
Mandar Katre
छ्या! भक्तांना ट्रॉलिंग फास्ट
छ्या! भक्तांना ट्रॉलिंग फास्ट करता यावं म्हणून असेल ती सुविधा. काय कौतिक याचं??
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बहुतेक त्यामुळेच २
बहुतेक त्यामुळेच २ ऑक्टोबरपर्यंत थांबलेत असं दिसतंय.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
मी
मी मोदीभक्त नाही, पण मोदींचा द्वेष करणार्या सर्वांना विचारु इच्छितो. मोदींना हटवून त्या जागी कोणते समर्थ नेतृत्व आणावे ?
राहुल, सोनिया, नितीशकुमार, लालु की जयललिथा ? की आणखी कोणी ?
शॉल्लेट प्रश्न. Compared to
शॉल्लेट प्रश्न.
Compared to what / Whom ?
मी मोदी या व्यक्तीचा द्वेष
मी मोदी या व्यक्तीचा द्वेष करत नाहीत पण माझे त्यांच्याबद्दलचे काही आक्षेप आहेत. त्यांनी भाजपाचे काँग्रेसीकरण केलेय हा सर्वात मोठा नी प्रमुख आक्षेप आहे. जर मला काँग्रेसला मत द्यायचे नसेल तर मला सध्या त्याहूने 'वेगळा' असा फक्त 'डावे' हा अधिकच फुफाट्यात ढकलणारा एकच पर्याय शिल्लक आहे.
भाजपा व काँग्रेस धार्मिक नितीने दोघेही मध्याच्या उजवीकडून चालणारे पक्ष होतेच (एक बहुसंख्यांचे तुष्टीकरण करी दुसरा अल्पसंख्यांचे पण धार्मिक भावनांना आवाहन दोघांचेही). मोदींनी आर्थिक अंगानेच नाही तर प्रशासकीय अंगानेही भाजपाला काँग्रेससारखे एकचालकानुवर्ती बनवले
ते असो तर मी द्वेष करत नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देणे मला आवश्यक नाही तरी...
===
त्यांना पर्याय कोण? त्यांना हटवा तर खरं! इतरही काही चांगले नेते आहेत.
सुषमा स्वराज, चिदंबरम (आता ते रेसमध्ये नाहित म्हणून नाहितर प्रणब मुखर्जी) हे पर्याय मला मोदींपेक्षा बेटर वाटतात.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुषमा स्वराज, चिदंबरम (आता ते
वडिल चिदंबरम कशाला? कार्ती चिदंबरम चा ऑप्शन जास्त मस्त आहे.
Iridium ची आठवण आली. सुमारे
Iridium ची आठवण आली. सुमारे ५०एक सॅटेलाईट्स कक्षेत फिरते ठेवून टेलिकॉम क्रांती करायची त्यांची आयड्या होती. कंपनी धुपली. असो.
इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी एक तर तितकीच मोठी कंपनी हवी (गूगल) किंवा तितकंच भारी तंत्रज्ञान नव्या कंपनीकडे हवं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कोणाला काही विचारायची गरज
कोणाला काही विचारायची गरज नाही.सगळे मुकाटपणे वावरतील डोळ्यांना हाइटेक चष्मे,कानांना ब्लूटुथ आणि डोक्यावरच्या टोपीवर तो छोटा सटेलाइट हाइस्पीड रिसिवर लावून.डोळ्यांच्या आणि पापण्यांच्या उघडझापीने सर्च वेबसाइट पाहतील.ब्रेन गेम्सपण खेळतील.सवंगडी शब्द इतिहासजमा होईल.