रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे
नमस्कार मंडळी,
ऐसी अक्षरेवर पहिल्यांदाच माझी चित्रे देत आहे. कलर्ड पेन्सिल्स हे माझे अतिशय आवडते माध्यम आहे. खालील चित्रांसाठी मुख्यत्त्वे फॅबर कॅसल ब्रँडच्या कलर्ड पेन्सिल्स वापरल्या आहेत.
कमंडलू: (faber castell colored pencils on A4 size 130 gm2 paper. Ref photo courtesy: www.dollsofindia.com)
काचेच्या गोट्या रेखाटण्याचा हा माझा पहिला प्रयत्न होता.5 &1/2" x 7" on 94 gm2 acid free paper with a pack of Faber Castle colored pencils. गोल आकार हाताने काढल्याने थोडे गडबडले आहेत.
चिमणी: २४ शेड्सचे फॅबर कॅसल पेन्सिल्सचे पॅक वापरुन रेखाटलेले हे पहिले चित्र. Ref photo courtesy: श्री. सुभाष जोशी. ठाणे.
प्रतिक्रिया
अ प्र ति म !!!
रेखाचित्र अप्रतिम आहेत! अतिशय छान.
काहि हरकत नाही आम्ही समजून घेउ! असं काहि लिहू नका हो, आमचा न्यूनगंड अजूनच वाढतो! आणि अशा काचेच्या गोट्या बरोब्बर वर्तुळाकार नसतात. खोडच काढायची तर मी म्हणेन काचेच्या गोट्यांची सावली काढली आहे त्यात थोडा अधिक रंग दिसला असता असं वाटतं. चिमणी थोडी मान उजवीकडे कलती करून बघत्येय असं डोळ्यावरून वाटतं पण चोचीवरून मान सरळ वाटते. बघत रहावीत अशी चित्रं आहेत ही. आय होप तुम्ही अजून कलाकृती सादर कराल....
(चित्रं प्रिंट करून टेबलावर ठेवली तर चालेल का?)
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
धन्यवाद
>>काचेच्या गोट्यांची सावली काढली आहे त्यात थोडा अधिक रंग दिसला असता असं वाटतं.
हे चित्र मी पावसाळी हवा असताना त्यातल्या त्यात उजेड असलेल्या दिवशी खिडकीच्या चौकटीत गोट्या ठेवून काढलं होतं. त्यादिवशी प्रतिबिंबात साधारण इतकीच छटा दिसली होती.
>>चिमणी थोडी मान उजवीकडे कलती करून बघत्येय असं डोळ्यावरून वाटतं पण चोचीवरून मान सरळ वाटते.
ह्म्म. शक्य आहे. चित्र पुन्हा तपासून बघीन.
>>(चित्रं प्रिंट करून टेबलावर ठेवली तर चालेल का?)
हो.चालेल की.
- वर्षा
उत्तम रेखाचित्रे -
उत्तम रेखाचित्रे - यथार्थचित्रे, तिन्ही आवडली. पहिले सर्वाधिक आवडले.
ऐसीवर स्वागत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मलापण पहिले सर्वाधीक आवडले.
मलापण पहिले सर्वाधीक आवडले.
चित्रे छान आहेत, चिमणीचे
चित्रे छान आहेत, चिमणीचे चित्र मनातल्या/आठवणीतल्या प्रतिमेवरुन काढले आणि मग चिमण्या बघत बघत तपशील पुर्ण केले आहेत काय?
तसे नसावे. त्यांनी मुळ
तसे नसावे. त्यांनी मुळ छायाचित्र
यांचे असल्याचे दिले आहे. तेव्हा चित्र या छायाचित्रावरून काढले असावे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बरोबर, आधी ते मला ह्या
बरोबर, आधी ते मला ह्या चित्राचे छायाचित्र काढणार्याचे नाव वाटले होते.
बरोबर चित्र चिमणीच्या
बरोबर चित्र चिमणीच्या फोटोवरुन काढले आहे.
- वर्षा
जबरदस्त चित्रकला! एक फालतू
जबरदस्त चित्रकला!
एक फालतू प्रश्न - समजा काही चुकलं तर खोडता येतं का हो?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नाही
रंगीत पेन्सिलींचं रेखाटन खोडरबराने खोडून कागद पूर्ववत पांढरा मिळवता येत नाही. पण चित्रात रंगछटांचे इफेक्ट्स देण्याच्या दृष्टीने अगोदरच रंगवलेल्या भागातील अतिरिक्त रंग उचलण्यासाठी नीडेड इरेजर वापरता येते.
- वर्षा
बेष्ट चित्रकला!!!! चित्रे
बेष्ट चित्रकला!!!!
चित्रे चांगली काढणार्यांबद्दल मनात अफाट आदर आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
खरंय!
उत्तम चित्रे! अजून येऊद्या.
दर्जा!!!
दर्जा!!!
मस्त
चित्रे आवडली.
छान!
आवडली. अजून काही चित्रं पहायला आवडतील.
खूप छान !
खूप छान !
छान आहेत चित्रे
छान आहेत चित्रे
फारच सुंदर चित्रं आहेत. पहिली
फारच सुंदर चित्रं आहेत. पहिली दोन तर खासच.
कलाकार
तुमच्यातल्या कलाकाराला _____/\_____ .
त्या गोट्यांचं चित्र तर
त्या गोट्यांचं चित्र तर अक्षरक्षः त्रिमितीय वाटतय.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
मला चित्रकला मुळीच येत नाही
मला चित्रकला मुळीच येत नाही पण आम्ही प्रत्यक्ष हातात कमंडलू घेऊन आलो तरी लोकांना तो इतका परफेक्ट दिसणार नाही याची खात्री आहे. जबर्याच!
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सुरेख!!!!! काय कला आहे
सुरेख!!!!!
काय कला आहे तुमच्या बोटांमध्ये! आम्हाला एक रेघ काही सरळ मारता येत नाही.
अजून टाका हो तुमची चित्रं इथे!
त्या मला वाटतं ईथे फिरकत
त्या मला वाटतं ईथे फिरकत नाहीत. पण त्यांच्या फेसबुक पेजवर डोकाउन या - अजून मस्त चित्र आहेत. मेपल लिफवरचे पाण्याचे थेंब आणि सफरचंद खास आहे अगदी.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
आहाहा, भन्नाट सुंदर चित्रं
आहाहा, भन्नाट सुंदर चित्रं आहेत. तो येडा खंड्या कसला गोड काढलाय.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
क्लासिक एकदम!
क्लासिक एकदम!
''मी तंबाखु खाणारच''