पुण्यवंतांसाठी खास गोष्ट

पुण्यवंतांसाठी एक खास जादूची गोष्ट मी घेऊन आलो आहे. ही गोष्ट अदृश्य आहे. जे खरोखरच पुण्यवंत आहेत, त्यांनाच ती दिसेल. ज्यांना कथा दिसली, आणि वाचता आली, त्यांनी खाली प्रतिक्रिया देण्यास विसरू नये, ही विनंती. पुण्यवंत नसलेल्या ज्या लोकांना कथा दिसणार नाही, त्यांच्यासाठी मजकूर सिलेक्ट करून निळ्या छायेत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. गोष्ट वाचल्यानंतर प्रतिक्रिया देणे बंधनकारक आहे. प्रतिक्रिया न देणा-या पुण्यवंतांचे पुण्य घटेल. पुण्यवंत नसलेल्यांनी प्रतिक्रिया दिल्यास ते तात्काळ पुण्यवंत होतील!

तर ही गोष्ट अशी :
एक राजा होता. त्याच्या भोवती खुशमस्कर्‍यांचे कोंडाळे होते. खुषमस्करे लोक राजाची सातत्याने स्तुती करून त्याला खुश ठेवीत. राज्याची खरी स्थिती राजाला कळू नये यासाठी हे खुषमस्करे प्रजेला दरबारात येऊच देत नसत. त्यामुळे राजाला सत्य काय आहे, याची जाणीवच होत नव्हती. याच राज्यात दोन बुद्धिमान भाऊ होते. त्यांनी राजाला वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा निर्धार केला.
दोघे बुद्धिमान भाऊ राजदरबारात गेले. त्यांच्यासोबत लाकडाची एक रिकामी पेटी होती. त्यांनी पेटी दरबारात मधोमध ठेवली. प्रथमत: त्यांनी राजाची भरपूर स्तूती केली. राजा कसा साक्षात इश्वराचा अंश आहे, वगैरे पाठ त्यांनी दरबारात पढला. त्यामुळे राजा खुष झाला. मग दोघे भाऊ म्हणाले, "तुमच्यासारख्या दैवी राजाचे कपडेही दैवीच असायला हवेत. सामान्य रेशीम धाग्याचे कपडे तुम्हाला अजिबात शोभत नाहीत. आम्ही तुमच्यासाठी दिव्य धाग्यांचा पोषाख शिवून आणला आहे. या पेटीत हा पोषाख आहे. या दिव्य पोषाखाची खाशियत अशी की, जो पुण्यवंत आहे, ज्याने आयुष्यात कोणतेही पाप केलेले नाही, त्याला तो दिसतो. पाप्यांना हा पोषाख दिसणारच नाही."
बुद्धिमान भावांनी हा पोषाख पाहण्यासाठी प्रथम प्रधानजींना पाचारण केले. प्रधानजी पेटीत डोकावले. पेटीत काहीच दिसले नाही. पेटीत काही नव्हतेच तर दिसणार कसे? प्रधानजींना जीवनभर केलेल्या लांड्यालबाड्या आठवल्या. ते जरा घाबरले. पण लगेच सावरले. पेटीत पोषाख नाही म्हटले तर आपण केलेल्या पापांचे बिंग फुटणार हे जाणून प्रधानजी 'पेटीत नसलेल्या' पोषाखाची वारेमाप स्तुती करू लागले.
अशाच प्रकारे दोन्ही भावांनी दरबारातील प्रत्येकाला पेटीतील पोषाख दाखविला. प्रत्येक जण या पोषाखाची तोंड फाटेस्तोवर स्तुती करू लागला. शेवटी त्यांनी राजालाच पेटी उघडून दाखविली. राजाला आत काहीच दिसले नाही. पण, पोषाख दिसत नाही, असे म्हणावे तर आपण पुण्यवंत नाही, हे सिद्ध होणार या भीतीने राजाही नसलेल्या पोषाखाची स्तुती करू लागला.
पेटीत नसलेला हा पोषाख मग दोन्ही भावांनी राजाला भर दरबारात परिधान करायला लावला. त्यासाठी आधीचा पोषाख राजाला अर्थातच काढावा लागला. राजा नागडा होता, तरी दरबारातील प्रत्येक जण राजाने कसा दिव्य पोषाख घातला आहे, याची वारेमाप स्तुती करू लागला. मग दोन्ही भावांनी या कथित दिव्य पोषाखासह राजाची नगरीतून मिरवणूक काढली. राजा हत्तीवर बसून त्याच्या नगरीतून फिरू लागला. एव्हाना "केवळ पुण्यवंतांना दिसणार्‍या" या अद्भूत पोषाखाची वार्ता संबंध नगरीत पसरली होती. नगरीतील प्रत्येक जण नागड्या राजाच्या अंगावर नसलेल्या पोषाखाची स्तुती करू लागला.
शेवटी मिरवणूक गावकुसाला आली. तिथे काही मुले विटीदांडू खेळत होती. हत्तीवर बसून सगळ्यांना अभिवादन करणारा नागडा राजा पाहून ही मुले जोरजोरात हसू लागली. "नागडा राजा, नागडा राजा" म्हणून उड्या मारू लागली. तेव्हा राजाचे डोळे उघडले. मग राजाने दरबारातील सर्व स्तुतीपाठकांना अंधार कोठडीत पाठवून दिले. प्रजेला दरबारात प्रवेशाची मुभा दिली आणि तो सुखाने राज्य करू लागला.

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

मला गोष्ट काही वाचता आली नाही. ते मूळ धाग्यात लिहिल्याप्रमाणे अपेक्षितच होते म्हणा... पण तात्काळ पुण्यवान होण्यासाठी प्रतिक्रिया दिली आहे. Smile

असो. हा प्रतिसाद पापी लोकांनाच वाचता येईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी खरा पापीच आहे तरीहि, आणि निळ्या छायेत न शिरता, मला गोष्ट दिसली. कशी ते सांगा पाहू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही त्यातलाच. त्यामुळे, राईट क्लिक-> पेज सोर्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पाप पुण्याचे खेळ फार पकाऊ वाटतात. तसंही आपल्याला नरकातच जायचंय. तिथे कोल्हटकर, Nile वगैरे interesting लोक भेटतील. स्वर्गात जायचंच नाहीये, तर पुण्य हवंय कोणाला?

पण धाग्यातला 'निळ्या छायेचा' भाग वाचून या 'ज्ञाना'चा वापर करण्याची अनावर इच्छा कशीतरी दाबून ठेवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाप पुण्याचे खेळ फार पकाऊ वाटतात.

मग पाप मुंबैचे खेळ खेळा.

स्वर्गात जायचंच नाहीये, तर पुण्य हवंय कोणाला?

पुण्य हवे नशिबाला.

(बॅटूभौ ट्रकवालं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुन्दर कथा! पुष्पक सिनेमातील गाणीदेखिल अशीच छान होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0





  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांना स्वर्ग दोन बोटे उरलेला दिसतोय!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धाग्यातील मजकूर सोडा, मला तर धागाच दिसत नाहिये
अहो पापं!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला तर हे सगळे असे दिसत आहे -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आँ... हे आणि काय? भलतेच इपरित म्हनायचे! आमचा सगळा हिशेबच खड्ड्यात घालवला की हो तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या राजाचे डोळे उघडले. मला वाटले त्या मुलांना आता "पापी" म्हणून शिक्षा दिली जाणार.

(पुण्यवान होणं फार जिकीरीच काम असतय.. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

त्या मुलांना आता "पापी" म्हणून शिक्षा दिली जाणार.

त्या मुलांना शिक्षा म्हणून "पापी" दिली जाणार, असं म्हणावयाचे आहे कां आपणांस? किंवा कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐकण्यात चूक होऊ शकते .. कान गोष्टीत नाही का?
बोललेले एक असते , ऐकू येते दूसरे आणि सांगतात काही तिसरेच
पण इथे तर स्पष्ट आणि सुबक अक्षरात छापलेले आहे, तरी असे कन्फ्युजन ?
अर्थात दॄष्टी भ्रम होउ शकतो म्हणा ... अलीकडचे पलीकडे आणि पलिकडचे अलीकडे दिसू शकते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

चूक जशी ऐकतांना होऊ शकते, तशीच ती लिहितानाही होऊ शकतेच ना?
म्हणून नम्रपणे पृच्छा केली हो. विचारुन घेत्लेले बरेच की हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉईंटाचा मुद्दा आहे खरा. पण इथे प्रतिक्रिया देण्या आधी तपासण्याची सोय आहे (पूर्वदृष्य)
ती मी वापरली आहे त्यामुळे टायपिंग मिस्टेक नाही याबद्दल निश्चिंत रहा.

आणि एक कुतुहल : तुम्हाला या वाक्यात चूक असेल अशी शंका का आली ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मनिषा बै, तुम्च्या प्रतिक्रियेतील पहिले वाक्य "त्या राजाचे डोळे उघडले." असे आहे. ते पोझिटिव्ह आहे. पुढचे वाक्य शिक्षेबद्दल बोलते. म्हणुन शंका आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पापी कोण देतेय यावर ती शिक्षा की अजून काही, हे अवलंबून आहे असे अतिशय विनम्रता इ. के साथ सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

==))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१६ मे जास्त दूर नाही, कळेल स्टोरी में कितना दम हैं ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.