नाव सुचत नाही

वारा शापित आत्म्यासारखं सैरावैरा इकडे तिकडे भटकतो , माझ्या गालांना , केसांना स्पर्शतो , तो स्पर्श तेवढा हलका नसतो , ती झुळूक नसते
वाऱ्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही इतका भन्नाट वारा.

पावसाच्या मातीचा पहिले सुंगध एखाद्या काचेच्या नक्षीदार बाटलीमध्ये साठवून ठेवावा बाकी सर्व रुक्ष ऋतुंमध्ये ती बाटली उघडावी आणि हळू हळू तो सुंगंध माझ्या सर्वांगात मिसळवून टाकावा. अगदी ओल्या मातीसारख वाटायला हव मन

तुझ्या पापण्या खाली गेल्यावरच तुझ्याकडे बघायचं धाडस पुन्हा याव माझ्या डोळ्यात , पावसाच्या थेंबासारख्या कवितांची अक्षर तुझ्या विरहाच्या मेघातून बरसावीत.
एकेक क्षण खूप जड चाललाय.
खूप वर्षापासून तरंग न उमटलेल्या तलावासारखा स्तब्ध.

एखाद्या संध्याकाळी चुकून झालेला स्पर्श परत आणून देशील का मी मातीच्या सुगंधाची बाटली रिती करेन तुझ्यासाठी.

काळ्या काळ्या कभिन्न दगडावर कोरलेल्या शिल्पाचे रेखीव ओठांना डोळे झाकून स्पर्श करू लागलो कि तुझ्या दाहक ओठांचा चटका बसतो. बहुतेक अश्याच एखाद्या वेळी शिल्पाच्या ओठांमधून सगळ्या सुखद वेदना शब्दरुपाने बाहेर पडत असतील.

मृत्युनंतर हाडांचा सापळा होऊन काही दिवसांनी मातीत मिसळून जाण काही विशेष नाही पण भावनांचं रितेपण त्याहून भयानक!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

एकेक क्षण खूप जड चाललाय.
खूप वर्षापासून तरंग न उमटलेल्या तलावासारखा स्तब्ध.

हे लई झ्याक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

"नाव सुचत नाही" हे शीर्षक आहे, की नाव सुचवण्याकरिता विनंती? "मृद्गंध" वगैरे अनेक नावे सुचतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! आवडलं मुक्तक!

तुझ्या पापण्या खाली गेल्यावरच तुझ्याकडे बघायचं धाडस पुन्हा याव माझ्या डोळ्यात

ही ओळ विशेष आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उत्कट!!! आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0