कोरल कासल (Coral castle)

मायामीत कुठे फिरायला जावं याचा खल सुरू होता. मायामी म्हणजे यू.एस.च्या दक्षिण-पूर्वेला असलेल्या फ्लॉरिडा राज्यातलं (तेच ते 'पाडस'फेम राज्य!) सर्वात दक्षिणेचं महानगर. हवेत थोडी थंडी होती म्हणून समुद्रावर जाण्याचा बेत फसला असता. आदल्या दिवशी राहिलो होतो त्या हॉटेलात एक पँफ्लेट मिळालं होतं. 'A tribute to love' अशी जाहिरात पाहिल्यावर, "आता काय इथे ताजमहाल दाखवणार का?" असा प्रश्नही विचारून झाला. ठीक आहे, जाऊन पाहू, नाही आवडलं तर सटकू तिथून असा विचार करून निघालो. तिथे शिरतानाच लक्षात आलं की ही जागा म्हणायला कासल, राजवाडा असली तरी आहे छोटीशीच. मग त्याचं एवढं का कौतुक? तर हे सगळं एका माणसाने बांधलेलं आहे, इतर कोणाचीही मदत न घेता.

मायामीच्या दक्षिणेला, मायामीचं उपनगर म्हणता येईल अशा होमस्टेड शहरात, यू.एस.-१ या गजबजलेल्या रस्त्याच्या अगदी शेजारीच 'कोरल कासल' आहे. बाहेरून फारसं काही लक्षात येऊ नये अशा प्रकारे उंच भिंती आणि झाडांमधे हा राजवाडा दडवलेला आहे. एडवर्ड लीडस्काल्निन नामक मूळच्या लातव्हियन, विक्षिप्त माणसाने जवळजवळ ३० वर्ष हा राजवाडा बांधण्यासाठी काम केलं. आपल्यापेक्षा दहा वर्ष तरूण वाग्दत्त वधूने लग्नाच्या आदल्या दिवशी दुसऱ्याच माणसाचा हात धरल्यामुळे एड अतिशय निराश मनस्थितीत अमेरिकेत आला. तिथे त्याने, त्याच्याच शब्दात, त्याच्या 'स्वीट सिक्स्टीन'साठी हा राजवाडा बांधायला सुरूवात केली. आतल्या गोष्टी पहाता या माणसाचं कागदावरचं शिक्षण फक्त चौथी पास एवढंच होतं हे मानणं कठीण आहे. मूळात त्याने जवळच्याच फ्लॉरीडा सिटीत (त्या शहर आणि राज्याचं नाव एकच आहे.) थोडी जागा विकत घेऊन स्वतःसाठी राजवाडा बांधायला सुरूवात केली. पुढे त्या भागाचा विकास होऊ लागल्यावर त्याने आपला राजवाडा आणि निवासस्थान जवळच्याच होमस्टेडमधे हलवलं. ११०० टनाच्या आसपास वजन भरेल एवढे दगड त्याने स्वतः, एकट्यानेच एका ट्रॅक्टर, वाहनात भरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले.

जेमतेम पाच फूट उंची आणि पन्नास किलो वजन भरेल अशा माणसाने तीन टनी दगडाचं हे प्रवेशद्वार कसं हलवलं असेल असा प्रश्न न पडता तर नवल. त्याचं फारसं समाधानकारक उत्तर कोणालाही माहित नाही, जे माहित आहे ते पुढे दिलेलं आहे.

तीन टनाचं दार

तीन टन वजनाचं, एवढं जड प्रवेशद्वार असताना कोणी घरात येईल कसं हा प्रश्न पडेल. पण एडने हा त्रिकोणी दगड असा काही बसवला आहे की अगदी एका हातानेही हा दरवाजा हलवता येतो. या दरवाज्यासमोरच एक पाटी आहे, "राजवाड्याच्या गायडेड फेरीसाठी १० सेंट्स इथे टाका." एडच्या उत्पन्नाचा एकमेव ज्ञात स्रोत हाच होता.

राजवाड्यात आतमधे काही मौजमजेच्या गोष्टी आहेत, काही माहितीपूर्ण. उदाहरणार्थ खालचं फ्लॉरिडा टेबल पहा.

वरच्या डाव्या बाजूच्या फोटोत त्याची आरामखुर्ची आहे. डाव्या बाजूला खाली (पिस्तूलाच्या आकाराचं) फ्लॉरीडा राज्याच्या आकाराचं हे टेबल उच्च अधिकार्‍यांच्या डायनिंग टेबलसारखं आहे. होमस्टेड, मायामी, फ्लॉरीडा सिटी आहेत तिथे टेबलात एक खळगा आहे. उजव्या बाजूच्या फोटोत खालच्या, उजव्या कोपर्‍यात बदामाच्या आकाराचं टेबल आहे, फक्त एड आणि त्याच्या 'स्वीट सिक्सटीन'साठीच. बियर पिण्यासाठी एक जागा आहे. काही आरामखुर्च्या एडने बनवल्या आहेत. एडला वाचनाचा नाद होता. दिवसभरात कुठे जास्त उजेड पडतो याचं निरीक्षण करून एडने तीन खुर्च्या बनवल्या, फक्त वाचनासाठी. उन्हाची जागा बदलेल तशी खुर्ची बदलायची. आपल्याला झालेला क्षयरोग या सूर्यप्रकाशामुळे बरा होईल अशी त्याची खात्री होती. गंमत म्हणजे तो पन्नाशीत गेला तेव्हा त्याला क्षय नव्हताच, तो यकृताच्या कर्करोगाने मेला.

सूर्यप्रकाशाचा वापर त्याने फक्त वाचन आणि वैद्यकीय उपचारां(?)साठीच केला असं नाही, तर त्याने सौर घड्याळ आणि कालमापन यंत्रही बनवलं. डाव्या बाजूच्या चित्रात त्याचं घड्याळ आणि कालमापन यंत्र दिसत आहे. दिवसाच्या वेळांचे आकडे तिथे लिहीलेले दिसत आहेतच. शिवाय थंडीच्या दिवसात सगळ्यात लांब सावली पडेल आणि उन्हाळ्यात सगळ्यात छोटी. त्यावरून महिनाही समजू शकतो. (या घड्याळ्यात आकड्यांच्या सोबत काही विचित्र कर्व्हज दिसत आहेत. ते सूर्याभोवतीच्या पृथ्वीच्या फिरण्याच्या वैचित्र्यामुळे येतात. त्या खगोलशास्त्राबद्दल कधीतरी नंतर लिहेनच. गूगलायचे असल्यास analemmaबद्दल शोध घ्या.) या सर्व निरीक्षणांसाठी ध्रुवतार्‍याची आकाशातली जागा माहित असणं आवश्यक असतं. त्यावरून दिशा निश्चिती करता येते. खालच्या फोटोत एडचा पोलॅरीस टॉवर दाखवलेला आहे. लांब असणार्‍या दोन भोकांमधल्या क्रॉस-वायरचा वापर करून एड ध्रुवतारा आणि त्यावरून उत्तर दिशा निश्चित करत असावा. चौथीपर्यंतच शिकलेल्या एडची खगोलशास्त्रातली 'लुडबूड' नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पण हे कौतुकमिश्रित आश्चर्य इथेच संपत नाही.

एडला हे दगड त्याच्या फ्लॉरीडा सिटीतल्या जागेत मिळाले. या दगडाला कोरल स्टोन असं म्हणतात. हा दगड तसा ठिसूळ असतो. बघताक्षणीच त्यातल्या हवेने भरलेल्या पोकळ्या दिसून येतात. त्यामुळेच या दगडाला एक प्रकारचा वेगळा 'पॉश लुक' येतो असं मला वाटलं. वरच्या फोटोत मधोमध (बॅरिकेडच्या मागे) नऊ टनी दरवाजा आहे. हा दरवाजा लहान पोरंसुद्धा हाताने ढकलून उघडू शकत होती. १८८६ साली तो दरवाजा जड झाला तेव्हा तो दुरूस्तीसाठी बाहेर काढला. तीन टनी आणि नऊ टनी दरवाजा सहजी उघडण्याचं रहस्य लक्षात आलं. एडने दोन्ही दगडांच्या मधोमध एक भोक पाडलं होतं. त्यातून एक धातूचा रॉड घालून तो ट्रकच्या बेअरींगवर टेकवला होता. अतिशय काटेकोरपणे या बेअरींगवर तोलून धरलेला हा दगड अर्थातच सहजपणे त्याच्या अक्षाभोवती फिरत होता. एडने एकट्याने ही जड शिळा कशी तोलून पाहिली? नक्की उत्तर माहित नाही.

प्रत्येक माणूस आपल्या घरी राजा असतो असं एडला वाटायचं. त्यामुळे त्याने स्वतःसाठी स्वतःचा राजवाडा बनवला. या राजवाड्यात त्याच्या आवडीच्या खगोलशास्त्रात भेटणार्‍या काही वस्तू दिसतात. चंद्र, शनी आणि मंगळाच्या शिल्पांखाली त्याची झोपायची खोली होती. या खोलीत त्याचा, आणि त्याच्या 'स्वीट सिक्स्टीन'चा दिवाण आहेच. पण त्याबरोबर मुलांसाठी छोटे दिवाण आहेत. तिथे पोरांसाठी टेबल आहे. त्याच्यासाठी एक सिंहासन आहे, त्याच्या 'स्वीट सिक्स्टीन'साठी एक खुर्ची आहे आणि एक बसण्यासाठी अतिशय त्रासदायक खुर्चीही आहे, एडच्या सासूसाठी!(फोटोत हे नीट आलेलं नाही त्यामुळे फोटो काढलेले/टाकलेले नाहीत.)

एडने एकट्यानेच हे सर्व दगड कसे हलवले याचं काहीसं उत्तर त्याच्या रहाण्याच्या खोलीत आणि वर्कशॉपमधे मिळतं. खालच्या डाव्या बाजूच्या फोटोत त्याची रहाण्याची आणि कामाची जागा दिसत आहे. त्याच्या राजवाड्यात तो लोकांना फिरवून आणत असे तरी त्याच्या व्यक्तिगत रहाण्याच्या जागेत कोणालाही प्रवेश नव्हता. बारकी पोरं त्याच्या राजवाड्यात अनेकदा जायची. "तो अगदी छोटासा होता, आम्हां पोरांएवढीच त्याची उंची असेल. आमच्यावर त्याचा जीव होता. आम्हीही दर विकेण्डला त्याच्याकडे जाऊन आता काय नवीन आहे अशी चौकशी करायचो. तो ही उत्साहाने, १० सेंट घेऊन आम्हाला चिक्कार काही दाखवायचा." तिथे लावलेल्या एका व्हीडीओत काही म्हातारे-म्हातार्‍या सद्गदित होऊन एडबद्दल बोलत होते. "पण त्याच्या रहाण्याच्या आणि काम करण्याच्या जागी तो आम्हाला कधीही येऊ द्यायचा नाही. त्याला काम करताना आम्ही कधीही पाहिलं नाही. दगड हलवताना तर नाहीच नाही. हे कोणी पाहू नये अशी त्याची इच्छा असावी. त्याला आम्ही विचारायचो, "तू हे दगड कसे हलवतोस?" त्याचं ठराविक उत्तर यायचं, "गोष्टी कशा काम करतात हे समजल्यावर हे काहीच कठीण नाही." आम्हाला तेव्हा ही सर्व जादू वाटायची."

एडच्या वर्कशॉपमधे गंजलेली अनेक हत्यारं, यंत्रं आणि पुलीज, धातूचे रोप्स दिसतात. ते अजूनही जपून ठेवलेले आहेत. एड स्वतः रोज जेवण बनवायचा. त्याचा एक बार्बेक्यूही जपलेला आहे. तो ही कोरल दगडातच आहे (फोटो काढायचा राहिला.) एका उभट दगडात मधे भोक केलं आहे. वरून एक बंद करता येणारं भांडं लटकवेलं आहे आणि खाली एक खड्डा. त्या खड्ड्यात सकाळी कोळसे पेटवायचे, भांड्यात भाज्या किंवा मांस ठेवायचं की ते दुपारपर्यंत व्यवस्थित शिजून निघायचं. एडची ही हत्यारं तो जुन्या बाजारातून, चोर बाजारातून विकत आणायचा. दगड त्याच्या जागेतच त्याला मिळाला. एकूण सस्त्यातला कारभार होता. पण एडने त्यातून जे उभं केलं आहे त्याला तोड नाही.

एडने भले हे त्याच्या 'स्वीट सिक्स्टीन'साठी केलं असेल. त्याच्या खोदकाम, आर्कीटेक्चर, सिव्हील इंजिनियरींग, जे काही म्हणा, त्यातल्या लुडबूडीमुळे आज अनेकांना तिथे नोकरी मिळालेली आहे. एक माणूसही विचारपूर्वक आणि चिकाटीने काय काय करू शकतो याचा अतिशय मोहक पुरावा म्हणजे कोरल कासल. फ्लॉरीडात दक्षिणेला, फ्लॉरीडा कीजमधे जाणार असाल तर एक-दीड तास कोरल कासलसाठी देणं highly recommended.

फोटो फेसबुकावर आहेत. हाफिसातून फेसबुक बंदी असल्यास फोटो आणि व्हीडीओ दिसणार नाहीत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! छानच किमया केली आहे एड महाशयांनी! त्याची माहिती आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोरल कासलची ओळख आणि माहिती आवडली. एकाच माणसाने त्याचं एक वेगळं विश्व बनवणं खरंच आश्चर्यजनक आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

माणसाने ठरवल तर तो शून्यातून देखील जग उभारु शकतो याच एड मूर्तिमंत प्रतीक आहे.
त्याच्या चिकाटीला सलाम. :D>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

अप्रतिम! आणि दंडवत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

अवलियाची ओळख आवडली.

चौथीपर्यंतच शिकलेल्या एडची खगोलशास्त्रातली 'लुडबूड' नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

हा लेख उपक्रमावरही हवा! तिथे इतरांनाही लुडबूड करता येईल.

फक्त एड आणि त्याच्या 'स्वीट सिक्सटीन'साठीच. बियर पिण्यासाठी एक जागा आहे

हे बाकी आवडल. अशा 'अवकाश' निर्माण करणार्‍या जागा हव्यातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे बाकी आवडल. अशा 'अवकाश' निर्माण करणार्‍या जागा हव्यातच.

खि खि खि ... मलाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम ओळख.

अशा हुशार आणि विक्षिप्त माणसांमुळेच अमेरिका घडली असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते व्हीडू दुस्र टाका हो
ते थोपुवर लॉगआय्ला लाव्तंय. अन आप्ला कै आय्डी न्हाय थितं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तो व्हीडो दुसरीकडे टाकेपर्यंत -- व्हीडोत एवढंच आहे की एका हाताने अगदी सहजपणे तीन टन वजनाचं दार ढकलता येतं.

(पुराव्याने शाबीत करताना धडपडलेली) अदिती

अशा हुशार आणि विक्षिप्त माणसांमुळेच अमेरिका घडली असे वाटते.

मी: बर्‍याच उदाहरणांवरून हे पटतं. असे लोकं फक्त अमेरिकेतच असतात असं नाही, बाहेरूनच बर्‍याचदा येतात. त्यामुळे इमिग्रेशनचे कायदे कडक ठेवू नयेत अशीही ओरड मधूनच ऐकायला येते. पण तो विषय वेगळा आहे.

या विक्षिप्तपणाचा ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीशी काडीमात्र संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>

ओ ते दक्षिण्-पश्चिमेला नाहीय... साउथ वेस्ट नव्हे हो ... साउथ इस्ट्ला आहे. Smile

>

असेच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां गं ... दक्षिण पूर्व म्हणायचं होतं ...
हे असं होतं, जीपीएस वापरून हजारो मैल प्रवास करायची सवय लागली की! उजवीकडे वळा, डावीकडे वळा यापलिकडे समजतच नाही! Wink

(दिशा हरवलेली) अदिती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मानलं पाहिजे ब्वा त्या एडवर्ड लीडस्काल्निनला!
वेगळीच ओळख करून दिलीत. आम्हाला तकेशीज कॅसल माहित होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मस्त आहे हे सगळं. फ्लिंटस्टोनची आठवण झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोरल कॅसलची मस्त ओळख. विक्षिप्तपणावरून अमेरिकेतल्या दक्षिण पश्चिमेतलं (खर्र्याखुर्र्या पश्चिमेतलं) विंचेस्टर हाउस् आठवलं. विंचेस्टर हा माणूस स्वतः अब्जाधीश - विंचेस्टर गन त्याचीच. त्याच्यानंतर त्याच्या विधवेने घरात अनेक बदल केले. तिचा विश्वास होता की घर पूर्ण झालं की ते झपाटलं जाईल. त्यामुळे सतत घराच्या बांधकामात काही ना काही बदल तिने चालू ठेवला. त्यामुळे घरात अनेक चित्रविचित्र आकाराच्या खोल्या, बोळकांडी तयार झालेली आहेत. अनेक छोटीशी दारं इथून तिथे लोकांना घेऊन जातात. ती दारं छोटी असण्याचं कारण म्हणजे विंचेस्टर विधवा स्वतः जेमतेम चार फूटाहून थोडीशीच उंच होती.

मात्र सॅन होजे एरियात गेल्यावर हे घर बघण्याची शिफारस मी करणार नाही, कारण माणशी तीसचाळीस डॉलर मोजण्याइतकं ते गमतीदार निश्चित नाही. (दारावर जाहिरात आहे - फ्री ऍडमिशन टू गिफ्ट सेंटर ऍंड कॅफे - सर्व मानवजातीवर उपकारच जणू!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख छान आहे.
जॉर्जियातील हेलन विलेज मधे एक 'भुत बंगला' बनविला आहे तिथे 'भुत बनलेले' कलाकार पुर्ण घरातून फिरताना आपल्याला घाबरवायचे काम करतात ते आठवलं Wink

फोटो, विडीयो विकांताला बघेन ठरवलं होतं पण जमलं नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!