खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये...
खूप छान धुकं असायचं तेव्हा आपल्यामध्ये..
नाव, गाव, रंग, रुप यातल्या कशाचाच परिचय नसताना
फक्त एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं..
आश्वासक.. हवहवसं.. गुलाबी..
गहिरं, अधीरं.. लोभस..
तुझेपणाच्या, माझेपणाच्या
सगळ्या कक्षा सामावुन घेणारं..
ओळखीचे चकवे दाखवत हळुच,
अनोळखी होवुन जाणारं..
समजतयं असं वाटेपर्यंत,
अवघड होवुन बसणारं..
अज्ञाताच्या सोबतीने सुरु केलेला स्वतःचा शोध,
स्वतःची होत जाणारी नविनच ओळख..
तू त्या शोधात फक्त सोबत होतास..
किंवा निव्वळ तू अस्तित्वात असल्याची जाणिव..
तुही कदाचित नव्याने पाहिलंस स्वतःला
माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेची सोबत घेवुन..
मग कोणत्या क्षणी महत्वाचा झाला तुझा परिचय स्वतःच्या ओळखीपेक्षा?
का जंग जंग पछाडले त्या परिचयासाठी?
ह्म्म...
शेवटी एकदाचा झाला
तुझा माझा परिचय..
पण त्याच क्षणी वितळुन गेलं ते धुकं..
नविन सापडु शकले असते असे काही चेहरे,
पुन्हा हरवुन गेले त्या धुक्यासोबत..
अजुनही वाट चालतोय आपण एकमेकांच्या सोबतीने..
पण आता काही हुरहुर नाही..
कसलंही काहुर नाही..
स्वतःविषयी काही नविन शोधही लागत नाही आताशा..
फक्त तुझ्याकडे बघताना कधी कधी वाटतं,
खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये.....
प्रतिक्रिया
गुलाबी धुक्याची प्रतिमा
गुलाबी धुक्याची प्रतिमा आवडली. आणि ते विरल्यानंतरच्या काहीतरी हरवल्यामुळे झालेला अपेक्षाभंगही.
धन्यवाद राजेश..
धन्यवाद राजेश..
merakuchhsaman.blogspot.in
मस्त कविता जिंकलात तुम्ही !
मस्त कविता जिंकलात तुम्ही ! चाबूक! कडक!
The frequency of Rejection is measured in Hurtz.
आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!
धन्यवाद सुशेगाद..
धन्यवाद सुशेगाद..
merakuchhsaman.blogspot.in
सहमत
मस्त कविता. धुक्याचे रुपक फारच छान. 'चलो इक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो' हे गाणे आठवले.
खरंच की.. that song fits just
खरंच की.. that song fits just perfectly as a sequel of the poem.. भारी आठवलं तुम्हाला एकदम अतिशहाणा..
merakuchhsaman.blogspot.in
'चलो इक बार फिरसे अजनबी बन
+१.
कविता छानच आहे!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
धन्यवाद अनुप..
धन्यवाद अनुप..
merakuchhsaman.blogspot.in
+१
राजेश व सुशेगाद ह्यांना +१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मन, राजेश व सुशेगाद यांच्या
मन,
राजेश व सुशेगाद यांच्या प्रतिसादावरील प्रतिसादात +१..
merakuchhsaman.blogspot.in
+३
+३
धन्यवाद धनंजय..
धन्यवाद धनंजय..
merakuchhsaman.blogspot.in
कविता आवडली शुभ्र पांढर धुकं
कविता आवडली
शुभ्र पांढर धुकं
धन्यवाद विवेक..
धन्यवाद विवेक..
merakuchhsaman.blogspot.in
उत्तम रुपक वापरले आहे. कविता
उत्तम रुपक वापरले आहे.
कविता आवडली
लिहित रहा! ऐसीवर स्वागत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खूप खूप आभार ऋषिकेश..
खूप खूप आभार ऋषिकेश..
looking forward to the good times at aisi..
merakuchhsaman.blogspot.in
ताजेपणा
कवितेतला नात्याचा प्रवास काही ओळींच्या ताजेपणामुळे आवडला -
एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं../ ओळखीचे चकवे दाखवत हळुच.. इ.
--
अवांतर -
धुके आणि प्रेमाच्या नात्यावरून 'पाषाणपालवी' या कादंबरीतली आरती प्रभूंची एक कविता आठवली तशी देत आहे -
धुक्यात आहे डोह कुठेतरी
अथांग त्याचा तळ गाठावा
म्हणोन शिरले धुक्यात तरीही
थेंब न ओठी एक पडावा ?
जळते आहे जळ नयनी या
अंतरंगही त्यात कढावा
प्रिया तुझ्या रे डोही माझा
अखेरचा हा देठ तुटावा
धुकेच आहे धुक्यात भरूनी
किती धुक्याचे गजरे माळू
जळत्या अश्रुंमधून माझ्या
ये ना सजणा काजळ घालू
अमुक, नेमक्या प्रतिसादाबद्दल
अमुक,
नेमक्या प्रतिसादाबद्दल आभार..
कविता मस्तच आहे.. कदाचित थोडी वेगळी असावी.. लय थोडी तुटतेय वाचताना. शोधून वाचली पाहिजे.. धन्यवाद..
merakuchhsaman.blogspot.in
वा!
चलो इक बार फिरसे
अजनबी बन जाये हम दोनो!
आठवले.
खुप छान कविता.
खुप छान कविता.