Skip to main content

संस्थळाचे दर्शनी पान - भाग २

ऐसी अक्षरेवर वेगळे काय? हा प्रश्न अधूनमधून उपस्थित होतो. इतर संस्थळांप्रमाणेच हीही एक अभिव्यक्तीची जागा, इतकंच आहे का? संस्थळ सुरू केलं तेव्हापासून केवळ इतकंच राहू नये असा कायमच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. सुरुवात झाली ती मुक्त वातावरणात अभिव्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देऊन. कमीतकमी संपादन करून प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा, लेखांना तारका देऊन आत्तापर्यंत आलेलं चांगलं लेखन सांभाळून ठेवण्याची सोय केलेली आहे. त्याच मार्गाने पुढे पावलं टाकून गेले काही दिवस आम्ही ऐसी अक्षरेचा लोगो वेगवेगळ्या दिवशी बदलता ठेवला. आता सुरुवात करत आहोत ते नवीन मुखपृष्ठाची....

ऐसी अक्षरेच्या लोगोवर टिचकी मारल्यास संस्थळाचे 'होमपेज' दिसेल. विविध चित्रकार, छायाचित्रकार आणि संस्थळाच्या कलादालनातून प्रताधिकारमुक्त चित्रे प्रदर्शित केली जातील. संगीत आणि इतर बहुमाध्यमी घटकांचादेखील यथोचित वापर मुखपृष्ठावरच्या इतर अवकाशात केला जाईल.

(आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---

वा माणिक वर्मा यांचे फार गोड गाणे मुखपृष्ठावर एम्बेड केले आहे. आत्ता ऐकते आहे. सुंदर!!!

"आणिले धागे तुझे तू मी ही माझे आणिले,
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरुन जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरुन जा"
________________

मुखपृष्ठावरती नेहमी एक गाणे असावे. फार सुंदर वाटते.

Taxonomy upgrade extras

मी Tue, 27/05/2014 - 12:52

डोरोथी लँज या छायाचित्रकाराच्या जन्मदिनानिमित्त (२६ मे) तिनं काढलेलं एक छायाचित्र मुखपृष्ठावर दिलं आहे

तिचं 'ग्रेट डिप्रेशनचं' हे छायाचित्र प्रसिद्ध आहे.

चिंतातुर जंतू Tue, 27/05/2014 - 12:55

In reply to by मी

>> तिचं 'ग्रेट डिप्रेशनचं' हे छायाचित्र प्रसिद्ध आहे.

गेल्या वर्षी मुखपृष्ठावर ते दिलं होतं.

बॅटमॅन Tue, 27/05/2014 - 13:07

In reply to by मी

गरिबी, विपन्नावस्था, इ. चे पर्सेप्शनही कल्चरल असते हे वरील फटू पाहून कळते. त्यातली स्त्री अन तिची दोन पोरं यांचे कपडे अंमळ फाटके आहेत हे दिसतं, चेहर्‍यावरचे भावही खिन्न इ. वाटतात. पण 'टिपिकल भारतीय' डोळ्यांना हा फटू कै अपार दारिद्र्याचा इ. वाटत नै- याचं मुख्य कारण म्ह. अंगभर कपड्यांत आहेत सगळे. अंगभर ठीकठाक कपडे असतील तर इतके गरीब कसे? इ. इ. प्रश्न येतो खरा.

बॅटमॅन Tue, 27/05/2014 - 14:03

In reply to by घनु

चित्रातील बाई "स्टेफी ग्राफ" सारखी दिसते (मलातरी).

अहो नै हो. उगीच आमच्या हृदयाला घरे पाडून कॉलनी करू नका!!!

(स्टेफीचा अन तिच्या पोनीटेल लुकचा फॅन) बॅटमॅन.

ॲमी Tue, 27/05/2014 - 14:20

In reply to by घनु

हम्म किंचीत झाक जाणवतेय खरी स्टेफीची. तशीतर आपली करीश्मा कपूरपण कधीकधी स्टेफीसारखी वाटते. आणि माधुरी दिक्षीत हेमामालिनीसारखी :-D

मी Tue, 27/05/2014 - 14:12

In reply to by बॅटमॅन

अंगभर ठीकठाक कपडे असतील तर इतके गरीब कसे?

ह्या फोटोवरुन थोडेफार जाणवू शकेल. फ्लॉरेन्स थॉम्पसन ला ३२व्या वर्षी ७ मुलं होती.

बॅटमॅन Tue, 27/05/2014 - 14:15

In reply to by मी

फटूवरून लक्षात येतेच आहे. फक्त फर्स्ट इम्प्रेषणबद्दल बोलतोय. मागे कुठल्याशा इराणी की युरोपियन पिच्चरमधील अशाच भिकार्‍याच्या लुकबद्दल चर्चा झाली होती तेव्हा जंतू आणि अस्मि यांनी हेच मुद्दे उपस्थित केल्याचे आठवतेय.

मी Tue, 27/05/2014 - 14:16

In reply to by बॅटमॅन

छायाचित्रात इमोशनली अपिल होण्याचे कारण अनेकदा लहान मुले आणि त्यांची करुण परिस्थिती हे असते, इथे तिच्या मांडिवरचे बाळ आणि इतर मुले बघुन हेलावून जाणारे अनेक जण आहेत.

घनु Wed, 28/05/2014 - 10:44

In reply to by मी

सहमत, लहान मुले पाहून हेलावून जातो खरे.

तरीही त्या स्त्री कडे पाहिल्यावर ती मुळीच खचून गेलेली किंवा हरलेली वा हताश वाटत नाही (विशेषतः जो पहिला फोटो टाकला होता त्यात तरी) कदाचित तिच्या भावना त्या पलीकडे गेल्या असाव्यात वा शुन्य झाल्या असाव्यात म्हणूनही तसे भाव चेहर्‍यावर नसतील.

अस्वल Tue, 27/05/2014 - 22:45

In reply to by बॅटमॅन

great depressionने चांगल्याचुंगल्या घरातील (मध्यमवर्गीय) लोकांना अचानक रस्त्यावर आणलं. आजही जर आपल्यासारख्या (स्यूडो- मध्यमवर्गीय) लोकांवर अशी अवस्था आली, तर आपल्यालाही भारतात अशीच चित्रं बघायला मि़ळतील. परिस्थितीत अचानक झालेला बदल आणि त्या अनुषंगाने आलेलं दारिद्र्य हे chronic दारिद्र्यापेक्षा जास्त करुण असावं.

आदूबाळ Wed, 28/05/2014 - 14:20

In reply to by अस्वल

सहमत आहे.

आपण EMIच्या माध्यमातून स्वतःचा leveraged buyout केलेला असतो हा गब्बरभौंचा हिट प्रतिसाद आठवला. उद्या दण्कन उत्पन्नचा स्रोत बंद झाला आणि EMI भरण्याची क्षमता संपली तर काय भयंकर परिस्थिती ओढवेल.

कमी गुंतवणूक करणार्‍या, प्लग इन ऑफिसेस असलेल्या सेवाक्षेत्रातल्या कंपन्यांबाबत ही भीती वाटते. गेले उद्या दुकान बंद करून फिलिपीन्सला, तर?

[स्यूडो- मध्यमवर्गीय म्हणजे कर्ज, क्रेडिट कार्डांच्या माध्यमातून "उधार की जिंदगी जीनेवाले" असा अर्थ असावा असं वाटतंय.]

अस्वल Wed, 28/05/2014 - 22:06

In reply to by आदूबाळ

स्यूडो- मध्यमवर्गीय : थोडं स्पष्ट बोलतो. आपल्यासारखे लोक (Engineers/IT/Salaried individuals with high income) स्वताला अजूनही मध्यमवर्गीयच म्हणून घेतात. आणि त्यापुढे जाउन, आपण मध्यमवर्गीय आहोत, म्हणजे सामान्य माणूस आहोत असं समजतात.
आपण सामान्य आहोत का? निव्वळ उत्पन्न ही एकच पायरी बघता, खचितच नाही.
जीवनशैली - वीकांताला हाटेलात जाउन हादडणे ज्यांना सहज शक्य आहे, त्यांनी स्वताला १२५ कोटींमधले "सामान्य" म्हणून घेणे ही एक थट्टा आहे. तेव्हा ह्या सग़ळ्या भारतीय लोकांमध्ये आपण वर कुठेतरी २०% मध्ये बसतो, बाकी जवळपास ८०% नोकर्या ह्या unorganized labor मध्ये मोडतात. तेव्हा "मध्यम" वाटावं, असं आपल्यात काहीच नाही, म्हणून स्यूडो- मध्यमवर्गीय.

ऋषिकेश Thu, 29/05/2014 - 09:05

In reply to by अस्वल

+१
मागे आय आय एम कोझिकोडे ने एक पेपर सादर केला होता. आयटीतील बव्हंशी जनता भारतातील टॉप ५% उत्पन्नगटात येते. तेव्हा त्यांनी स्वतःला "सामान्य" म्हणवून कुरवाळणे थांबवावे. पेपरचा दुवा माझ्याकडे नाही. पण त्यात अनेक रोचक निष्कर्ष होते.

गब्बर सिंग Mon, 14/07/2014 - 23:42

In reply to by ऋषिकेश

आयटीतील बव्हंशी जनता भारतातील टॉप ५% उत्पन्नगटात येते. तेव्हा त्यांनी स्वतःला "सामान्य" म्हणवून कुरवाळणे थांबवावे.

असहमत.

मला नेमके काय म्हणायचे आहे - अतिसामान्यांनी (फडतूसांनी) स्वतं:ला बिचारे म्हणवून (कुरवाळून घेऊन ....) फायदे उपटायचे उद्योग (सरकारकडून गोंजारून घेऊन) थांबवावेत.

अस्वल Tue, 15/07/2014 - 00:32

In reply to by गब्बर सिंग

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
समजा एखाद्या अतिविशिष्टाने तुम्हाला असंच म्हटलं तर?
की - "सामान्यांनी (फडतूसांनी) स्वतं:ला बिचारे म्हणवून (कुरवाळून घेऊन ....) फायदे उपटायचे उद्योग [income tax सवलती,पेट्रोल भाव वगैरे] (सरकारकडून गोंजारून घेऊन) थांबवावेत."

तुमच्यासाठी अतिसामान्य : फडतूस :: अतिविशिष्टांसाठी तुम्ही : फडतूस :: अतिविशिष्टांसाठी अतिसामान्य : non existent

चालायचंच.

बॅटमॅन Thu, 29/05/2014 - 13:09

In reply to by अस्वल

हम्म ते आहे. फक्त कैक लोकांचे हे ट्रांझिशन त्यांच्या डोळ्यांदेखत झालेले आहे, अन कैकजण फर्स्ट-जेन आयटी गाईज़ आहेत. सबब जाणिवा अजूनही मध्यमवर्गीयच आहेत असे म्हणायला हर्कत नसावी.

नितिन थत्ते Thu, 29/05/2014 - 13:58

In reply to by बॅटमॅन

मध्यमवर्गीय जाणीव म्हणजे काय याचे एक उदाहरण.....

मी रस्त्याच्या एका कडेला उभा आहे आणि मला उजव्या बाजूस जायचे आहे. मी रस्ता क्रॉस करून रिक्षा पकडतो आणि २००-३०० मीटरचा फेरा वाचवतो की कसे यावर माझ्या जाणीवा मध्यमवर्गीय आहेत ते ठरेल. [इकडेच रिक्षा पकडून २०० मीटरवर यू टर्न मारून रिक्षाचे वाढीव भाडे भरणे मला सहज परवडते].

बॅटमॅन Thu, 29/05/2014 - 14:09

In reply to by नितिन थत्ते

पण जाणिवा या फक्त आर्थिक बाबतीत नसतात. आर्थिक सुबत्ता आल्याने तुम्ही म्हणता तसे काटकसर इ. जरा कमी झाले असेल पण कल्चरल जाणिवा इ. बर्‍यापैकी तशाच आहेत असे वाटते.

बॅटमॅन Thu, 29/05/2014 - 14:21

In reply to by मी

उदा. आहारविधिनिषेध न पाळणे, मात्र जातिबाह्य लग्न न करणे. मुंज करणे न करणे हे निरुपद्रवी, आंतरजातीय लग्न करणे म्हंजे मात्र चूक. देअर यू गो मध्यमवर्गीय.

उदय. Tue, 15/07/2014 - 03:56

In reply to by अस्वल

डिप्रेशन हे सापेक्ष असते. तुम्हाला हे माहितच असेल. Recession is when your neighbor loses his job, Depression is when you lose yours.

ऋता Thu, 29/05/2014 - 22:19

In reply to by बॅटमॅन

गरिबी, विपन्नावस्था, इ. चे पर्सेप्शनही कल्चरल असते हे वरील फटू पाहून कळते.

सहमत.

थंडीच्या प्रदेशात किमान अंगभर कपडे असावेच लागतात नाहितर थेट मरण. त्यामुळे कपडेही मिळवू न शकलेले गरीब युरोप/उत्तर अमेरिकेत नसावेत असे वाटते.

ऋता Fri, 09/05/2014 - 01:55

'ऐशा रसां ऐसे रसिक...'
या दर्शनी पानावरच्या विभागातून असलेल्या लिंक्स सध्या त्यातल्या चालू धाग्यांवर (भागांवर) न जाता जुन्याच धाग्यांवर (कुठल्याशा आधीच्या भागांवर) जात आहेत. त्या लिंक्स योग्य धाग्यांवर जायची व्यवस्था होऊ शकली तर बरीच सोय होईल. धन्यवाद.
(उदरभरण नोहे मध्ये काही लिहावं वाटलं पण चालू असलेल्या भागाचा शोध घ्यावा लागला तेव्हा हे लक्षात आले.)

मन Mon, 12/05/2014 - 11:08

In reply to by ऋता

सूचना महत्वाची वाटली. मीही हेच सांगणार होतो.
बादवे, अशा धाग्यांची कल्पना आवडली. एकदीच एकोळी धाग्यांचा, लिंकांचा वर्षाव होण्यापासून असे धागे संस्थळाला वाचवतात.
चर्चा वाढलीच, तर ती वेगळी काढता येतेच. इथले हे वैशिष्ट्य आपल्याला लै आवडते.

मी Mon, 12/05/2014 - 10:51

माउंट फुजीचे चित्र उत्तमच आहे, त्यातल्या धुरात ड्रॅगनचा होणारा भास आणि रंगनिवड जबरदस्त आहे. उकिजोए किंवा वुडब्लॉक प्रिंट् शैलीचे हे चित्र 'Thirty-Six Views' ह्या मालिकेतले एक आहे, होकुसाईने त्याच्या फुजी पर्वताच्या प्रेमातून फुजीची/फुजीवरुन वेगवेगळ्या कोनतुन ३६(किंवा अधिक) चित्रे काढली.

होकुसाईचे हे अजुन एक चित्र, हे बहुदा अनेक जणांनी पाहिले असेल.

अस्वल Tue, 20/05/2014 - 00:51

विकिपिडिया वर ज्याप्रमाणे "random आर्टिकल" असते, तसे ऐसीच्या मुखपृष्ठावर टाकता येइल काय?
सर्व लेख हे शेवटी नोडस असल्याने तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य असावे असा अंदाज आहे.

मी Tue, 27/05/2014 - 22:02

संगीतबद्ध केलेली आरती प्रभूंची एक कविता मुखपृष्ठावरून ऐकता येईल.

दूव्यात गडबड आहे काय? दिसत नाहीये.

अमुक Tue, 27/05/2014 - 22:08

In reply to by मी

तो दुवा चालत नसल्यास इथे तेच गाणे ऐकता येईल. फक्त गायिका उत्तरा केळकर आहेत.
तसेच इथे मोडकांची बरीच गाणी मिळतील.

चिंतातुर जंतू Wed, 28/05/2014 - 11:05

In reply to by अमुक

>> फक्त गायिका उत्तरा केळकर आहेत.

'आठवणीतली गाणी'वरची माहिती चुकीची आहे. साउंडक्लाउडवरचा दुवा माझ्याकडे चालतोय. ते गाणं खुद्द आनंद मोडकांनीच साउंडक्लाउडवर चढवलेलं आहे आणि त्याच्या गायिका माधुरी पुरंदरे आहेत असं त्यांनीच म्हटलं आहे. मोडकांनी संगीतबद्ध केलेल्या आरती प्रभूंच्या आणखी काही कविता आणि नंदू भेंडेसोबत त्यांनी केलेलं मराठी पॉपसुद्धा तिथे आहे. गेल्या वर्षी त्यांनी 'लोकसत्ता'त सदर लिहिलं होतं. त्या अनुषंगानं ही गाणी त्यांनी चढवली असावीत, कारण त्यांच्या चित्रपटगीतांसारखी ती इतरत्र सहज सापडत नाहीत.

अमुक Wed, 28/05/2014 - 19:14

In reply to by चिंतातुर जंतू

'आठवणीतली गाणी'वरची माहिती चुकीची आहे.
................साउंडक्लाउडवरचे गाणे मी ऐकले आहे आणि त्या गायिका माधुरी पुरंदरेच आहेत याबद्दल मला अजिबात शंका नाही. मात्र हे ध्वनिमुद्रण एखाद्या कार्यक्रमात मुद्रित केल्यासारखे वाटते. 'आठवणीतली गाणी'वरील गाण्याचे ध्वनिमुद्रण वेगळे आहे (उदा. पार्श्वसंगीतात सारंगी नाही) आणि अधिक जुने (मूळ) वाटते. तसेच आवाजावरून तरी गायिका उत्तरा केळकरच (आणि माधुरी पुरंदरे नाही) आहेत, असे मला वाटते. ही दोन वेगळी ध्वनिमुद्रणे असल्याने माहिती चुकीची नसावी असे सकृद्दर्शनी वाटते आहे.
'आठवणीतली गाणी'च्या संस्थापिका/व्यवस्थापिका अलका विभास यांना मी विचारणा केली आहे. त्यांचे उत्तर आल्यावर कळवेन.

अस्वल Mon, 14/07/2014 - 22:42

तारांकित ह्या सदरात ज्या लेखांना ५ तारे मिळाले आहेत, ते लेख दिसताहेत.
ह्यात थोडी गडबड जाणवली
१. काही लेखांना एकाच ऐसीकराकडून ५ तारे मिळाले आहेत, तरी असा लेख तारांकितमध्ये दिसला, जे पटलं नाही.
२. कदाचित हा सगळ्याच संस्थळांसाठी प्रश्न असू शकेल - पण ऐसीवर येऊन गेलेले दर्जेदार (सर्वांना आवडलेले/ संपादकांना आवडलेले) लेख एकत्रित करता येतील का? हे खूप मस्त होईल, almost like a showcase full of trophies on the front page.
तारांकित ह्या सदरात जर असे लेख टाकता आले तर?

राजेश घासकडवी Tue, 15/07/2014 - 05:06

In reply to by अस्वल

तारांकित मध्ये गेल्या दोन आठवड्यांतले अधिकतम तारका मिळालेले (ताजे, चांगले) धागे एके काळी दिसत असत. सध्या ते काही कारणाने सर्व इतिहासातले दिसतात. पुन्हा एकदा तपासून बघतो.

'निवडक' मध्ये जाऊन पहा. दर महिन्याप्रमाणे तारकानुरुपच निवडलेले असतात, पण फक्त पाचवाले दिसत नाहीत. दर महिन्याला सुमारे शंभर लेख येतात. त्यापैकी चाळीसेक धागे, ज्यांना चारपेक्षा अधिक तारका मिळालेल्या आहेत, ते दिसतात. त्यामुळे त्यातले वरचे काही चाळले तर निश्चितच त्या महिन्यातलं चांगलं लेखन दिसावं.

'ऐसीवरील सर्वोत्तम' अशी जनरल कॅटेगरी करण्यापेक्षा '२०१३ सालचे सर्वोत्तम विनोदी', '२०१३ सालचे सर्वोत्तम ललित' वगैरे करणं सोयीचं होईल. ते तसं करता यावं यासाठीच तारका देणं सुरू केलं होतं. जितके लोक जास्त तारका देतील तितकी ही पहिली चाळणी म्हणून उपयुक्त होईल. तुम्हाला जर एखादा लेख ५ तारकावाला, एकानेच तारका दिलेला दिसला, तर जरूर अजून एक मत नोंदवून लेखाला योग्य तारका देण्याचा प्रयत्न करा. हेच उलट्या बाजूनेही लागू आहे. जर एखादा चांगल्या दर्जाचा लेख कमी तारका मिळालेला, कमी जणांनी मतं दिलेला दिसला, तर जरूर तुमचं मत नोंदवा.

अस्वल Tue, 15/07/2014 - 23:11

In reply to by राजेश घासकडवी

ही "निवडक" ची आयडिया चांगली आहे. वापरून बघेन.
+१ to तारे - बरेचदा लेखांना प्रतिक्रिया दिसतात पण तित्क्या प्रमाणात तारे दिसत नाहीत. आता द्यायला सुरूवात करीन म्हण्टो!

रुची Fri, 22/08/2014 - 00:20

आजचे दर्शनी पानावरचे 'अलीबाबा'चे रेखाचित्र मस्तच आहे, फारच आवडले. ऑब्रीच्या रेखाचित्राची दखल घेतल्याबद्दल आभार.

अस्वल Sun, 24/08/2014 - 00:06

ऐसीवर कुठला आयडी किती अ‍ॅक्टीव आहे, किंवा महिन्याचे टॉप पोस्ट कुणी टंकले किंवा सर्वाधिक लेख कुणी लिहिले
-असल्या चांभारचौकशा तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 24/08/2014 - 00:11

In reply to by अस्वल

होय बहुदा.

लॉग्ज साठवले जातात, ते नीट चाळून घेतले तर समजेलही. चाळणी लावून कधी पाहिलेलं नाही. टॉप पोस्ट म्हणजे काय याच्या व्याख्येवर अवलंबून आहे. सर्वाधिक लेख कोणी लिहीले याची चळत लावायची सोय केलेली नाही; पण सहज करता येईल (असा अंदाज आहे.). सगळ्यात जास्त क्लिक कोणी केलं ही यादी आपोआप गाळून मिळते.

अस्वला, तुझा दरवेशी तुला काय विदा खायला घालतो काय?

---

इथे प्रतिसाद दिलेला आहे म्हणून अधिकची माहिती -

टचस्क्रीनवाल्या फोनवरून खरडवही उघडताना चुकून लॉगाऊट होत असल्याची तक्रार आली होती म्हणून लॉगाऊट बटण 'महत्त्वाचे दुवे' या भागात सगळ्यात खाली हलवलं आहे.

अस्वल Sun, 24/08/2014 - 01:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गुगल ग्रूप्सवर अशी माहीती आहे, म्हणून म्ह्टलं इथेही आहे का बघूया!
विद्यापेक्षा सांख्यिकी (पक्षी: नसत्या चौकशा) मध्ये जास्त रस आहे :ड

मारवा Wed, 30/11/2016 - 17:28

फिडेल कॅस्ट्रोचे ऐसी अक्षरे लोगोवर ज्या अर्थी चित्र घेतलेले आहे. त्या अर्थी हा त्याचा एक प्रकारे केलेला सन्मान आहे असे मी समजतो.
याचा अजुन एक अर्थ जी राजवट ज्या काही विचारसरणीच्या आधारे चालवली ती बाजुला ठेवली तरी
तो एक भला मनुष्य होता त्याची तत्वे भली होती असे गृहीतक या सन्मानामागे असावे.
तर यात फिडेल कॅस्ट्रो हा इतकी वर्षे एका देशाच्या सलग एकटाच एकच निरंकुश सत्तेवर राहीला व निवृत्ती नंतरही त्याच्याच इछेनुसार त्याच्याच भावाला
राष्ट्रप्रमुख करुन मगच निवृत्त झाला. तर सर्वात मुलभुत प्रश्न असा की
१- ऐसीच्या मते म्हणजे ज्या कोणी लोगोवर कॅस्ट्रोंची स्थापना केली त्यांच्या मते तो एक निरंकुश हुकुमशहा होता की नाही ?
२- तो एक हुकुमशहा होता, लोकशाही विरोधी होता तर अशी तत्वे बाळगणारा माणुस ( साम्यवाद बाजुला ठेवा कृपया ) याने त्याच्या देशात कुठलीच व्यक्ती विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी कुठल्याना कुठल्या स्वरुपात ऐसीच्या मते ( म्हणजे जे कोणी संबंधीत) केली नाही का ?
३-वरील प्रश्नांची उत्तरे हो असतील तर अशा व्यक्तीचा असा सम्मान करणे योग्य आहे का ?
४-समजा क्र. ३ चे उत्तर हो असेल तर यापुढे समजा जेव्हा केव्हा इतर निरंकुश हुकुमशहा ज्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात त्यांच्या देशात व्यक्ती/विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केलेली आहे अशा व्यक्तीचे पोस्टर लोगो वर लावण्यात येइल का ?
५-समजा क्र.४ चे उत्तर हो असेल तर ऐसी अक्षरे अधिकृतपणे अशा विचारसरणीचे अशा हुकुमशहांचे अशा व्यक्ती/ विचारांच्या मुस्कटदाबीचे वैचारीक समर्थनच नव्हे तर याला प्रोत्साहनही देते का ? असे जर कोणाला वाटले तर त्याचे वाटणे चुक आहे का ?
कॅस्ट्रो हा निरंकुश हुकुमशहा नसल्यास व त्याने कुठल्याही प्रकारची व्यक्ती विचार ची मुस्कटदाबी करुन त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणले नसल्यास त्याने हे जादुई वाटावे असे आश्चर्य जनक महान कार्य ( इतकी वर्षे एका देशाचा सर्वेसर्वा बनुन राहणे ) कसे केले असेल याचेही विवरण कृपया द्य्वावे.

फिडेल लोगो
(संदर्भासाठी सदर लोगो इथे डकवला आहे. - व्यवस्थापक)

मारवा Wed, 30/11/2016 - 20:14

In reply to by अनु राव

मारवा - तुम्ही ऐसीवर नविन आहात का?

तरी बरे ५ मार्च १९५३ ला ऐसी नव्हते.

जरा गाठी सोडुन सांगितल तर कळेल तारखेचा संदर्भ पण नाही कळला.
प्लीज एलाबोरेट

चिंतातुर जंतू Wed, 30/11/2016 - 18:15

In reply to by मारवा

टीप : हे ऐसीचं अधिकृत उत्तर नाही आणि मी ऐसीचा अधिकृत प्रवक्ताही नाही.

विसाव्या शतकातला एक मोठा कालखंडभर जगभरातल्या लाखो तरुणांसाठी कॅस्ट्रो (आणि चे गव्हेरा) विशिष्ट मूल्यांचा चेहरा होते. त्याचा किंचित आढावा इथे वाचता येईल. त्या मूल्यांचा प्रभाव असलेले आणि एक प्रकारच्या स्वप्नाळू आदर्शवादानं नव्या युगाची आशा बाळगणारे अनेक (आता वय झालेले) लोक आपल्या परिसरात कार्यरत आहेत. शिवाय, जागतिकीकरण असा शब्दही अस्तित्वात नव्हता तेव्हा कॅस्ट्रो, त्याची सिगार, चे आणि लाल तारा वगैरे प्रतिमा जगभरातल्या प्रतिमाविश्वातला एक आयकॉन होते. त्या सगळ्याचा विचार करता कॅस्ट्रोला जागतिक संभाषितात एक स्थान आहे.

(ह्याचा अर्थ त्याच्या राजवटीतल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करावं असं नाही. मी स्वतःच काही कॅस्ट्रोभक्तांना 'स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट'ची आठवण करून दिली आहे.)

मारवा Wed, 30/11/2016 - 20:09

In reply to by चिंतातुर जंतू

सर्वप्रथम स्ट्रॉबेरी अ‍ॅन्ड चॉकलेट च्या दुव्यासाठी धन्यवाद. या फिल्मची माहीती नव्हती ही नक्की बघतो.
दुसर तुम्ही अधिकृत नाहीत त्यामुळे ज्यांनी हे लावलय त्यांचे नेमके मत जाणुन घेण्याची उत्सुकता आणखीच वाढली.
मला इत्यंभुत माहीती आहे कॅस्ट्रो विषयी असे मी म्हणत नाही मात्र अरुण साधुंचे पुस्तक आणि कॅस्ट्रोवरील काही डॉक्युमेंटरीज या बघितलेल्या आहेत.
इंटरनेटवर काही वाचन केलेल आहे ( फेसबुक वर एक परुळेकरांनी शेअर केलेले नाव आठवत नाही त्यांचा या चळवळीचा अभ्यास आणि बहुधा ते सक्रीय आहे त्यांच्या ही काही पोस्ट वाचलेल्या.. इंद्राज पवारांचाही एक चांगला लेख मिपावर होता अस मर्यादीतच माहीत आहे. पण या अगदी प्राथमिक मटेरीयल वरुनही काही बाबी फार स्पष्ट आहेत आणि त्या मान्य आहेत उदा.
१- गव्हेराचे टी शर्ट चे वेड, कॅस्ट्रोची सिगार इ, त्यांचे युथ आयकॉन असणे इ. कधी काळी त्यांनी काही जुलुमी राजवटींविरोधात केलेला आंतरराष्ट्रीय ( स्वराष्ट्रा पलीकडे जाऊन ) पातळीवरचा संघर्ष
२-त्यांचा विशिष्ट मुल्यांचा चेहरा असणे हे ही सहर्ष मान्य आहे.
३- त्यांनी अनेकांच्या आयुष्याला विधायक प्रेरणा दिलेली आहे त्यानेही अनेक ठिकाणी अन्याया विरोधात लढा इ. अनेक सकारात्मक बाबी एकेकट्या व्यक्तीगत पातळीवर झालेल्या आहेत. हे आणि हे हे सर्वच जे काय सकारात्मक आहे ते मान्यच आहे.
पण. खरा पण असा की वरील सर्व वजा करुनही फिडेल कॅस्ट्रो हा एक निरंकुश हुकुमशहाच होता व त्याच्या दृष्टीने वा त्याच्या विचारसरणीने कसेही का असो. त्याने शेकडो लोकांच्या मुलभुत मानवी हक्कांचा, अगदी किमान व्यक्ती स्वातंत्र्याचा, मुस्कटदाबी गळचेपी हे दोन शब्द नाही चालत असतील तरी किमान त्याने संकोच केला आहे असे निश्चीतपणे मला वाटते.
त्याने तसा केला नसल्यास इतकी वर्षे तो निरंकुश सत्तेवर सातत्याने राहणे व नंतर स्वतःच्याच भावाला देणे हे अशक्य आहे. मुळात लोकशाहीच नसल्याने ती अपेक्षाही नाही. मात्र
ज्या उदार उदात्त मुलभुत मानवी मुल्यांना आपण सर्वसाधारणपणे मानतो त्याचा तो शत्रु च आहे. ( आता त्याचे पद काय होते साम्यवादाच्या व्याख्येत तो भाग वेगळा मी स्वतःला जनसेवक वा लोकपाल म्हणुनही हुकुमशहा असु शकतो )
तर ऐसी अक्षरे इन जनरल ज्या उदात्त मुलभुत मानवी हक्क , व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मुल्ये इ.इ. चा इन जनरल सपोर्टर आहे त्याने अशा व्यक्तीला आपल्या मुळ लोगोवर स्थान देणे हे विसंगत मला तरी माझ्यापुरते वाटते. अर्थात इतक, सीरीयसली घेण्याची गरजही नसेल कदाचित पण एकच तुलना करतो
समजा इंदिरागांधी ( आणीबाणी विचारात घेता) वा मोदी (गुजरात दंगल इ. विचारात घेता ) यांचा वा बाळासाहेब ठाकरे ( यांचे मराठी माणसांच्या मुलभुत हक्कासांठे वगैरे योगदान लक्षात घेता ) यांचे चित्र असे लोगोवर घ्यायला हवे अशी कोणी मागणी केल्यास ती चुकीची आहे असे जर म्हटले व कॅस्ट्रो व या तिघातं फरक दाखवायचा झाला तर कसा दाखवणार हे बघण्याची मोठी उत्सुकता आहे.
मी या विषयात तज्ञ व्यक्ती नाही माझा असा अभ्यासही नाही मी केवळ लेमॅन पाँइट ऑफ व्ह्यु हे विचारत आहे की सर्वसाधारणपणे मला यात विसंगती जाणवते व ती चुक कशी आहे म्हणजे मी कुठे चुकतोय हे जाणुन घ्यायला मनापासुन आवडेल.
धन्यवाद

अनुप ढेरे Wed, 30/11/2016 - 20:26

In reply to by मारवा

मुलभुत मानवी हक्क , व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मुल्ये इ.इ. चा इन जनरल सपोर्टर

बर्‍याचदा लोकांचा एक अजेंडा असतो जो एखाद्या गोष्टीचं समर्थन असा नसून कोणाचा तरी विरोध या पायावर उभा असतो. त्यातून असे विरोधाभास तयार होतात. तुम्ही कितीही कृरकर्मा असलात तरी अमेरिकेला विरोध या भांडवलावर अनेक विचारवंतांची सहानुभुती मिळवू शकता. भारतीय परिप्रेक्ष्यात कॅस्ट्रो कम्युनिस्ट टाइप आहे, त्यामुळे इथल्या उजव्यांना नाही आवडत तो सो मला कॅस्ट्रो आवडतो, (उघड नसला तरी छुपा) असा काहिसा प्रवास असतो. माझ्यामते आयकॉन असणे हे दुय्यम आहे. तसं म्हटलं तर संघाची खाकी चड्डी, संचलन वगैरे हिटलर प्रेरीत होतं आणि ते कॅस्ट्रोआधीच इथे पोचलं होतं. पण त्यामुळे हिटलर जयंती मयंतीला इथे हिटलरचा फटु लागेल असं नाही.

---
अर्थात ऐसी हे खासगी संस्थळ आहे. चालकांना वाटेल तो फोटो ते लावतील. बाकीचे बोलणारे कोण? असा विचार करून हा विषय काढला नाही आधी. मारवांनी उकरलाच म्हणून हे.

मारवा Wed, 30/11/2016 - 20:46

In reply to by अनुप ढेरे

ऐसी हे डाव्या उजव्या वा कुठल्याही विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधलेले नाही. कुठल्याही एकांगी विचारसरणीचा पुरस्कार ऐसीवर अधिकृतपणे होत नाही.
असे मला प्रामाणिकपणे वाटते. व हे खासगी जरी असले तरी चालक हे मुक्त विचार मुक्त संवाद विशीष्ट विचारसरणी मुक्त असे आहेत. आणि हीच या संस्थळाची ताकद आहे.
असा मला माझ्यापुरता समज आहे. व कुठलाही प्रश्न आपण निर्भयतेने विचारु शकतो यावर माझा पुर्ण विश्वास आहे. तुमच्या म्हणण्यातुन ध्वनित होतो तस हे संस्थळ मनमानी अरेरावी भुमिका घेणार प्रायव्हेट क्लब सारख ( आमची मर्जी टाइप ) नाहीच अस मला माझ्या मर्यादीत अनुभवा वावरावरुन खात्रीपुर्वक वाटते. म्हणुनच मी बिनधास्त माझ्या मनातला खटकणारा प्रश्न विचारला.
मला तोच फरक समजुन घ्यायचा आहे की इथे इंदिरा ठाकरे मोदी यांचा फोटो लागेल का ? नसल्यास का नाही ?
व्यक्तीस्वातंत्र्याचा मुलभुत मानवी मुल्यांचा संकोच प्रमाणानुसार बघितला तर या तिघांच्या तुलनेने कॅस्ट्रो ने किती प्रमाणात केला
कॅस्ट्रो या तिघांच्या तुलनेत किती जास्त वा कमी हुकुमशहा आहे
आयकॉन च जर म्हटलं तर बाळासाहेब ठाकरे हे अधिक जवळचे मराठी माणसाचे आयकॉन ( अनेक मराठी तरुणांना आत्मविश्वास आत्मसम्मान इ. इ. ) कॅस्ट्रोच्या तुलनेत कमी कसे ? (आपण सर्व मराठी माणसे व मराठीचा आग्रह धरणारे इ. धरुन का नाही ?

अबापट Wed, 30/11/2016 - 21:10

In reply to by मारवा

माझे सुलभीकरण :असे वाटते कि गल्लीतल्या मोठ्या दादाला बिनधास्त दगड हाणून , त्याला न भिता खुन्नस देणारा छोटू जसा पॉप्युलर होऊन राहतो तसं हि काहीसं असावं. ( रोमँटिक ऑरा का हा विषय वेगळा आहे.तो पुन्हा केव्हातरी) इतर बरेच असावे , आहेच .. पण ते इतरांकडून ऐकायला आवडेल .

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2016 - 00:33

In reply to by अनुप ढेरे

>> तसं म्हटलं तर संघाची खाकी चड्डी, संचलन वगैरे हिटलर प्रेरीत होतं आणि ते कॅस्ट्रोआधीच इथे पोचलं होतं.

कुणाच्या राजवटीत किती कमी काळात किती मोठा मानवसंहार झाला वगैरे बाबी जरा बाजूला ठेवू. हिटलर आणि कॅस्ट्रो-गव्हेरा यांची जर निखळ विचारसरणीवरून तुलना करायची झाली तर एक कळीचा मुद्दा दुर्लक्षित करता येत नाही -

हिटलरची विचारसरणी एका अत्यल्पसंख्य गटाला श्रेष्ठत्व बहाल करून त्या गटाला आपलं गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी इतरांचा द्वेष करायला शिकवणारी होती. त्यामुळे भारतातही त्याचे समर्थक एका अत्यल्पसंख्य पण पूर्वप्रस्थापित गटातून आले. त्याउलट कॅस्ट्रो-गव्हेरा पददलितांचा उद्धार करणारा सर्वसमावेशक विचार मांडत होते. त्यामुळे (उदा.) भारताविषयीच सांगायचं तर आयआयटीपासून दलित वस्त्यांपर्यंत अनेकविध गटांत त्यांना आयकॉनिक स्टेटस मिळालं.

अनु राव Thu, 01/12/2016 - 10:16

In reply to by चिंतातुर जंतू

त्याउलट कॅस्ट्रो-गव्हेरा पददलितांचा उद्धार करणारा सर्वसमावेशक विचार मांडत होते.

=))

मनोबा - लोळुन हसणारी बाहुली टाकायला शिकवल्या बद्दल धन्यवाद.

---------
कॅस्ट्रो-गव्हेरा : ह्या जोडीतल्या एकानी दुसर्‍याला जीवे मारले ना चिंज?

अनुप ढेरे Thu, 01/12/2016 - 10:28

In reply to by चिंतातुर जंतू

फायरिंग स्क्वाड, देशाबाहेर जाणार्‍यांची कत्तल, समलैगिकांचं पर्सेक्युशन हा सर्वसमावेशक अजेंडा नाही.

मारवा Thu, 01/12/2016 - 12:43

In reply to by चिंतातुर जंतू

त्यामुळे (उदा.) भारताविषयीच सांगायचं तर आयआयटीपासून दलित वस्त्यांपर्यंत अनेकविध गटांत त्यांना आयकॉनिक स्टेटस मिळालं.

अनेक टी शर्ट वर चे चे पोस्टर मिरवणार्‍या पैकी किती तरुणांना चे विषयी त्याचा देश कोणता होता, तो कोणत्या लढाईत मारला गेला, त्याची विचारसरणी नेमकी काय होती, इतर देशातही सशस्त्र हिंसा इ. कशी केली इ. माहीती असते ( विशेषतः भारतातल्या ) हा संशोधनाचा विषय ठरावा.
अनेकदा हे एका फॅड मधुन वरवरच्या उथळ आकर्षणातुन झालेले दिसते. अर्थात सिरीयस फॉलोइंगही असेलच काहींची , इन जनरल मै हु अण्णा च्या टोप्या एकेकाळी, बिइंग ह्युमन चे शर्ट घालणारी तरुणाई सारखा फॅन फॉलॉइंग प्रकार अधिक आहे. यावर माझे अधिक मत देण्यापेक्षा श्री महेश पवार जे "अर्वाचीन व्यासपीठ " सारखे दर्जेदार कार्यक्रम चालवतात व मुख्य म्हणजे या चळवळीचे समर्थक सहानुभुती बाळगणारे आहेत त्यांची ही प्रतिक्रिया वाचनीय आहे.

फिडेल क्रास्टो , चे गव्हेरा आणि मंडळी !
- महेश पवार
.... आज दुपारी नाना चौकातल्या जाड्या कम्युनिस्ट मित्राचा फोन आला . म्हणाला, 'काय रे, बघितलस ... 'फिडेल' ची बातमी या मीडियाने कशी पद्धशीरपणे दाबून टाकली ते ? ' हो म्हणण्यावाचून काही इलाजच नव्हता . कारण सध्याच्या इंटरनेट पिढीला फिडेल व चे गव्हेरा चे काहीही सोयर सुतक नाहीये हे काल पासून नव्हे तर गेली दोन दशके पाहात आलोय . अगदी १९९० साली आपल्या देशात 'मंडल कमिशन' च्या शिफारसींविरोधात जेव्हा तत्कालीन विद्यार्थी वर्गाकडून जो उठाव झाला तो शेवटचाच असावा . १९९० साल पर्यंत विद्यापीठामध्ये 'निवडणुका ' घेतल्या जात , वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडत , मग त्यात भले डावे , उजवे सगळे विद्यार्थी अगदी हिरीरीने भाग घेत व त्यातून विद्यार्थ्यांची 'आंतरराष्ट्रीय राजकारणाशी ' तोंडओळख तरी होत असे . कालांतराने १९९० पासून अगदी पद्धतशीरपणे या विद्यार्थ्यांच्या निवडणुका देशातील ' विद्यापीठातून ' काढून टाकल्या गेल्या व विद्यार्थी फक्त एम टी व्ही , मोटार सायकल , गर्लफ्रेंड आणि जमलेच तर आय टी व करियर या जंजाळात घुसत गेला . उदाहरहणार्थ सांगतो माझ्या मोबाईल फोन आणि लैपटॉप वर 'चे गव्हेराचा' फोटो स्क्रीन सेव्हर म्हणून आहे . तीन चार वर्षांपूर्वी माझा जुना लैपटॉप खराब झाला म्हणून एका किरिस्ताव अभियंत्याला बोलावले होते . त्याने माझ्या लैपटॉप वर ' चे गव्हेराचा ' फोटो पाहून सरळ विचारले की ,' क्या सर , आप भी चरस मारते हो क्या ?' मी चक्रावून का विचारले तर म्हणाला की ,' मेरे एरियामे सभी चरसी लोग इसाका फोटोवाले टी शर्ट पहनते है !'
त्या क्षणाला मला जाणवले कि आजच्या पिढीला फिडेल क्रास्टो , चे गव्हेरा वगैरे नावे अजिबात माहित नाहीयेत , मग त्यांनी भांडवलशाहीच्या विरोधात केलेले बंड तर विसरूनच जा
. अशातच एकदा मराठीतील प्रसिद्ध ( सुमार ) लेखकद्वयी मधील एका लेखकाचे ' फिडेल क्रास्टो ' वरचे पुस्तक वाचनात आले आणि हतबुद्द्य झालो . हे लेखक महाशय प्रस्तावनेतच सांगतात की,' मी अनेक वर्षे अमेरिकेत राहिलो पण २०१० सालापर्यंत मला फिडेल क्रास्टो कोण ते माहित नव्हते . २०१० साली मी एका अमेरिकन वाहिनीवर फिडेल क्रास्टो ची डॉक्युमेंटरी पहिली आणि मग मी त्याची माहिती जमा करून हे पुस्तक(खरे तर पुस्तिका म्हणायला पाहिजे ) एका महिन्यात ' मराठी वाचकांसाठी ' लिहून काढले . आता या अशा कॉपि पेस्ट करणाऱ्या नवलेखकांबद्दल काय बोलावे ? इथे फिडेल , चे , माओ इत्यादी विचार सरणी समजावून घेण्यात अख्खी हयात जाते आहे आणि हि अशी गल्लाभरू मंडळी इंटरनेटवरून माहिती जमा करून स्वतःच्या तुंबड्या भरून खुशाल जगताहेत . हे असे चित्र आजच्या काळात असेल तर ' फिडेल' च्या मृत्यूची बातमी जास्त टी आर पी देणार नाहीये हे माहित असलेला 'विकाऊ मीडिया ' या बातमीला का बरे महत्व देईल ?

सहज यांचा मिसळपाववरील चर्चेतला एक मार्मिक विचारणीय असा प्रतिसाद आहे

हा 'चे' जर दिसायला कुरुप असता तर इतक टि-शर्टप्रिय झाला असता का? युथ - रेबल - गुड लुक्स - पोरींना असे काही आवडणे व एक फॅशन. एक सोशलिस्ट नेता 'चे' चे 'भांडवलशाही' लोकांकडून टिशर्टच्या माध्यमातून विकला गेला. हा टि शर्ट घालणार्‍या कित्येक लोकांना त्याचे पूर्ण नाव व काम माहीत नसते. हा टिशर्ट विकला गेला नसता, फॅशन म्हणून याची विक्री झाली नसती तर किती लोकांना आजही लक्षात असता?
एका देशाच्या माणसाने दुसर्‍या देशात जाउन सशस्त्र कारवाया करणे याला काय म्हणले जाईल?
तो काळ वेगळा होता, सत्ता चालवणारे तसे जुलमी होते. सशस्त्र क्रांतीला साथ मिळत होती. सोशलिस्ट क्रांती बदल घडवेल असा विश्वास होता. जग ह्या दोन विचारसरणीत विभागले जात होते. ज्या कॅस्ट्रोने सत्ता हस्तगत केली पुन्हा जनतेचे गोरगरीबांचे राज्य आणले का? सोशलिस्ट म्हणवत भांडवलशाहीला नावे ठेवत एकदा सत्ता हस्तगत केल्यावर काय कार्य?

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2016 - 14:09

In reply to by मारवा

मोठा प्रतिसाद लिहायला वेळ नाही, पण स्लावोय झिझेकचा 'The Left’s Fidelity to Castro-ation' हा लेख वाचा अशी शिफारस करेन. त्यात कॅस्ट्रोवर आणि पाश्चात्य कम्युनिस्टांवर भरपूर टीका आहे. त्यामुळे ज्यांना कॅस्ट्रोची नालस्ती करायची आहे त्यांनाही त्यात दारुगोळा मिळेल. आणि तरीही साठ-सत्तरच्या दशकातल्या ज्या भाबड्या रोमँटिक स्वप्नाळू आदर्शवादाचा मी संदर्भ देत होतो त्याच्याशी त्याचा संबंध आहे. झिझेक काय म्हणतो आहे ते त्यासाठी नीट वाचायला मात्र लागेल. बाकी जी ट्रोलगिरी खाली चालू आहे ती चालू द्या. (पक्षी : संस्थळ आहे घरचं होऊ द्या खर्च.)

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2016 - 14:30

In reply to by चिंतातुर जंतू

वर ज्याचा दुवा दिला आहे ती 'स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट' तशी साधीसरळ आहे, पण कॅस्ट्रोच्या क्यूबाविषयी खरंच गुंतागुंतीचं काही पाहायचं असलं तर त्याच दिग्दर्शकाच्या (तोमास आलिआ) 'मेमरीज ऑफ अंडरडेव्हलपमेंट'ची शिफारस करेन. 'कम्युनिस्ट राजवटीत एलियनेट झालेला एक बूर्ज्वा ऐन क्यूबन मिसाइल क्रायसिसमध्ये आपल्या आयुष्याच्या श्रेयस-प्रेयसाविषयी विचार करतो आहे' एवढंच वर्णन मी करेन.

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2016 - 22:58

In reply to by चिंतातुर जंतू

कॅस्ट्रोकडे केवळ क्रूरकर्मा म्हणून पाहणं हा कसा पाश्चात्य वसाहतवादी दृष्टिकोन आहे आणि आफ्रिकेत कॅस्ट्रोची प्रतिमा वेगळी का आहे, ते मांडणारा एक लेख :

To so many Africans, Fidel Castro is a hero. Here’s why

Mandela writing from Robben Island: “It was the first time that a country had come from another continent not to take something away, but to help Africans to achieve their freedom.”

At the end of his Cuban trip, Mandela responded to American criticism about his loyalty to Castro: “We are now being advised about Cuba by people who have supported the apartheid regime these last 40 years. No honourable man or woman could ever accept advice from people who never cared for us at the most difficult times.”

मारवा Fri, 02/12/2016 - 00:03

In reply to by चिंतातुर जंतू

https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2013/12/10/the-last-g…

http://www.ibtimes.com/mandela-dictators-freedom-fighter-complicated-pa…

रॉबर्ट मुगाबे

One of Mandela's most notorious allies may have been Robert Mugabe, who has ruled Zimbabwe for now 33 years. Half a century ago, when Mandela was not viewed as favorably in the West as he is today, but Mugabe was viewed perhaps more favorably, the two African liberation leaders were not so different. Both had embraced violence.

मुअम्मर गद्दाफी

Although we in the West see Mandela and Gaddafi as polar opposites, one a democratically elected leader who sought to help his people and the other a militaristic dictator who exploited them, from within the wider liberation movement their points of commonality are more apparent. Mandela, we like to forget, was isolated and opposed for years by the United States and Britain. But his movement could count on financial and political support from Gaddafi, who shared a desire to resist Western as well as Soviet meddling, a longing for more innately African institutions and a willingness to embrace violence in the pursuit of revolutionary ideals.

General Sani Abacha

General Sani Abacha seized power in Nigeria in a military coup in November 1993. From the start of his presidency, in May 1994, Nelson Mandela refrained from publicly condemning Abacha’s actions. Up until the Commonwealth Heads of Government meeting in November 1995 the ANC government vigorously opposed the imposition of sanctions against Nigeria. Shortly before the meeting Mandela’s spokesman, Parks Mankahlana, said that “quiet persuasion” would yield better results than coercion. Even after the Nigerian government announced the death sentences against Saro-Wiwa and eight other Ogoni activists, during the summit, Mandela refused to condemn the Abacha regime or countenance the imposition of sanctions.

सुहार्तो

Two of the ANC’s biggest donors, in the 1990s, were Colonel Muammar Gaddafi of Libya and President Suharto of Indonesia . Not only did Mandela refrain from criticising their lamentable human rights records but he interceded diplomatically on their behalf, and awarded them South Africa ‘s highest honour. Suharto was awarded a state visit, a 21-gun salute, and The Order of Good Hope (gold class).

>> नेल्सन मंडेलाच्या कौतुक यादीत इतरही हुकुमशहा दहशतवादी आहेत

हुकूमशहांविषयी मंडेलांना कितीही प्रेम असलं तरी गोर्‍या पाश्चात्य राष्ट्रांनी आफ्रिकेला गुलाम केलं, तिला लुटलं आणि वंशभेदी सरकारचा पुरेसा प्रतिकार केला नाही हे वास्तव बदलत नाही. आणि त्यामुळे अशा काळात मदत करणार्‍या कॅस्ट्रोच्या ऋणाविषयीचा लेखातला मुद्दाही खोडला जात नाही.