घोडेबाजार

आज हाफीसात रोहनचे फिडब्याक सेशन होते. त्याने केलेल्या कामाचा आढावाच म्हणाना. रोहन कॉन्फरन्स रुममधे गेला
"येस रोहन कम इन."
"थॅक्स"
"काय मग तुला कसं वाटलं जे वर्ष गेलं ते? आम्ही काही बोलण्याआधी तुच सांग की तु काय चांगलं काम केलंस? काय सुधारता येईल?"
"मी गेलं वर्षभर कोडींग करतो आहे. अतिशय कमी वेळेत अचुक आणि आपल्या गिर्‍हाईकाला हव्या त्यापद्धतीचं कोडींग की करतो. ती माझी खासियतच आहे. तांत्रिक रचना कितीही क्लिष्ट असो मी काहिहि करून लक्ष्य साधतोच. त्यामुळे या सबंध वर्षात मी आपल्या प्रोजेक्ट मधे सर्वोत्तम काम केलं आहे असं मला वाटतं. बाकी सुधारणा करु तितकी कमीच असते. मात्र, माझ्या स्तरापेक्षा कितीतरी अधिक जबाबदारी मी आपणहून घेत असल्याने या स्तराच्या तुलनेत अधिक सुधारणा अपेक्षित नाही"
समोरचा म्यानेजर अजिबात गडबडला नाही. त्याला हे नेहमीचच होतं म्हणा
"छान. एकून वर्ष छान गेलं तर. आम्हालाही तुझा इथला सहभाग, तुझं तांत्रिक ज्ञान, कसब आदी गोष्टी चांगल्या वाटल्या. मात्र काहि तृटी तुझ्या पुढे मांडतो. तुझं कम्युनिकेशन सुधारायची गरज आहे. शिवाय तु बर्‍याच सुट्ट्याही घेतल्या आहेस. प्रोजेक्टमधे काही गोष्टी केवळ तुलाच येतात म्हणून इतरांशी गर्विष्ठपणे वागतोस अश्याही तक्रारी आल्या आहेत"
"कोणी केल्या तक्रारी"
"हे बघ मुद्दा तो नाही. काहि बाबतील तुलाही सुधारायची गरज आहे. असो तर आता तुझ्या फिडब्याकबद्दल बोलुयात. तुला १ ते ५ या पट्टीवर ३ रेटिंग दिलेले आहे. यावेळी आपल्या अकाऊंटला तुझ्या स्तरावर एकालाच प्रमोट करता येणार होतं. खरंतर तांत्रिक पद असल्याने तुच सर्वात लायक होतास मात्र आधी सांगितल्या त्या तक्रारी आणि इतर काहि ऑफीसच्या नियमांमुळे तुला यंदा पदोन्नती देता येणार नाही. मात्र आता सहकार्य कर पुढल्यावेळी तुझाच नंबर लागु शकतो"
"एक तर मला तुम्ही जे सांगितलंत ते मान्य नाही. दुसरं असं की मी फार अधिक कष्ट करतो त्यामुळे चांगली पगारवाढ आणि मुख्य म्हणजे पदोन्नती मला मिळालीच पाहिजे. तिसरे असे की तुम्हाला आंदाज आहे की तुम्ही कोणाला पदोन्नती देणार. त्या संजयलाच ना? तो केवळ एकाच ऑफीसला चिकटून बसला आहे म्हणून?"
"अरे तसं नाही. तुला आवडेल तसं काम करायची संधी देऊच की. आणि विचार कर इतरत्र तुला ही टेक्नॉलॉजी मिळणम कठीण आहे का?"
"हे बघा मला घसघशीत पगारवाढ पदोन्नती मिळणार नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेलच. मिळेल त्या टेक्नॉलॉजीवर काम करता येईल हो पद, पैशाचं काय? आजकाल सगळ्या कंपन्या सारख्याच"
"अरे सगळेच जण हे म्हणतात मग काय सगळ्यांना पदोन्नती द्यायची का?"
"खरंतर तो माझा प्रश्न नाही. पण असो. मला तुम्ही कधी सांगु शकाल?"
"आताच सांगतो शक्य नाही."
"ओके"
=====
पेपरात बातमी. आयटी उद्योगात नव्या २५०००० जागा तयार
====

-----********************--------------

त्याच दिवशी कार्यालयात रोहनचा भाऊ - 'दादा'चे तिकीट वाटप होणार होते . दादा कार्यालयात पोचले
"या राम राम दादा. या"
"आधी मुद्याचं बोला बाकी टिवटीव नंतर. मी ऐकलं मला तिकीट नाहिये?"
"बसा तर दोन मिन्टं. आस्सं. हे बघा आम्ही काही बोलण्याआधी तुच सांग की काय काम केलं? काय सुधारता येईल?"
"ह्ये बगा तात्यासायेब, मी गेलं वर्षभर खपतो हाये. अतिशय कमी वेळेत पक्षाला हवी तितकी, हवं ते काम करणारी मानसं गोळा करून दिलेली हायेत. तशी ती माझी खासियतच आहे. जातीय रचना, बदललेले वॉर्ड असं काहिहि कितीही क्लिष्ट असो मी काहिहि करून आपली मान्सं जमवतोच. त्यामुळे या सबंध वर्षात मी आपल्या पक्षात सर्वोत्तम काम केलं है असं मला वाटतं. बाकी सुधारणा करु तितकी कमीच असते वो; मात्र, माझ्या पदापेक्षा कितीतरी अधिक जबाबदारी मी आपणहून घेत हाये.. अजूनही काय म्हनाल त्ये पुर्न व्हायच्या आत हजर करतो की नायी बगा"
तात्यासाहेब अजिबात गडबडले नाहीत. त्यांना हे नेहमीचच होतं म्हणा
"छान! अरे, आम्हालाही तुझा इथला सहभाग, तुझं माणसं गोळा करायचं, लोकांचं काम करून द्यायचं कसब चांगल्या वाटल्या म्हणून तर इतक्या लहान वयात या वॉर्डाचा उपाध्यक्ष केला. मात्र आता वॉर्ड बदल्यावर तुझा वॉर्डात जरा शिकलेली माणसं वाढलेली हायेत अन त्यामानानं तुझं कम्युनिकेशन सुधारायची गरज आहे. शिवाय तु पक्षाच्या पैशावर दौरे बरेच काढतोस, लोक फक्त तुझ्याच मागे हायेत म्हणून इतरांशी गर्विष्ठपणे वागतोस अश्याही तक्रारी आल्या आहेत"
"कोन ते बेनं तक्रार करनारं?"
"हे बघ मुद्दा तो नाही. काहि बाबतील तुलाही सुधारायची गरज आहे. असो मुद्द्याचं बोलायचं तर यावेळी नव्या वॉर्डात तु आनि तो अशोक यापैकी एकालाच तिकीट देता येणार होतं. खरंतर धडाडी बघितल्यास तुच सर्वात लायक होतास, मी पक्षाला तसं कळवलंही. मात्र आधी सांगितल्या त्या तक्रारी आणि इतर काहि नियमांमुळे तुला यंदा तिकीट देता येणार नाही. मात्र आता सहकार्य कर पुढल्यावेळी तुझाच नंबर लावतो की नाही बग"
"एक तर मला तुम्ही जे सांगितलंत ते मान्य नाही. दुसरं असं की मी त्या अशोकपेक्षा फार अधिक कष्ट करतो त्यामुळे चांगली तिकिट मलाच मिळालं पाहिजे. तिसरे मला आंदाज आहे की तुम्ही त्या अशोकला का तिकिट देणार ते! तो केवळ पक्षाला चिकटू चिकटून बसला आहे म्हणून की त्याने जास्त पैसे दिलेत म्हणून? त्याच्यामागे काळं कुत्र देखील उभं राहत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे. असो"
"अरे तसं नाही. तुला आवडेल तसं काम करायची संधी देऊच की. शेवटी तो रबरी शिक्का असणारे काम तुझ्याशिवाय कोण करेल आणि विचार कर दुसरा कुठला पक्ष तुझ्या विचारसरणीच्या जवळही फिरकतो?"
"हे बघा मला तिकिट मिळणार नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल. कोणत्याही पक्षात काम करता येईल हो पदाचं काय? आजकाल सगळे पक्ष सारखेच"
"अरे सगळेच जण हे म्हणतात मग काय सगळ्यांना तिकिटं द्यायची का?"
"खरंतर तो माझा प्रश्न नाही. पण असो. मला तुम्ही कधी सांगु शकाल?"
"आताच सांगतो शक्य नाही"
"बरं"
=====
पेपरात हेडलाईन. निवडणूकांच्या इछुकांचा घोडेबाजार सुरू. अनेक प्रतिष्ठित यंदा अपक्ष
====

field_vote: 
2.75
Your rating: None Average: 2.8 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्त तुलना.

(इथली तुलना पहाता) निवडणूकांचं एक बरं असतं. किती उमेदवार असावेत यावर नियंत्रण नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सही बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हे वाचल्यावर माझ्या एका परिचिताने मला विचारले" बरोबर आहे तुझं. जर आपण आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहु शकत नाही तर उमेदवारांनी पक्षाशी का प्रामानिक रहावं"
राजकीय पक्ष = खाजगी संस्था- व्यावसायिक हे इतकं खोलवर मुरलंय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कंपन्या 'अधिक नफा' या सूत्राशी प्रामाणिक असतात ... आणि राजकीय पक्षही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नोकरीत 'तुला पगारवाढ किंवा प्रमोशन देणार नाही' असं सांगणारा बॉस काय किंवा 'तुला तिकीट मिळणार नाही' असं सांगणारा पक्षाधिकारी काय, आणि त्या दोन्ही गोष्टी ऐकून घोडाबाजारात भाग घेणारे काय, आपापली गणितं मांडत असतात. बॉसचे आपण देत असलेल्या अगर देत नसलेल्या (प्रमोशन, पगारवाढ, तिकीट) वस्तूच्या किमतीबाबत काही आडाखे असतात. तर कर्मचाऱ्याची किंवा पक्ष कार्यकर्त्याची स्वतःची गणितं असतात. बदलत्या परिस्थितीनुसार पारडं कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकतं. या गणितांतूनच - काम व त्याबद्दलचा मोबदला यांच्या मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतूनच - समाजाला उपयुक्त घटकांचं उत्पादन व्हावं असा हेतू असतो. जर मोबदला देणारी व्यवस्था ही समाजोपयोगी घटकांच्या उत्पादनक्षमतेऐवजी इतरच काही गुणांसाठी मोबदला देत असेल तर हे हेतू मातीला मिळतात. जेव्हा ही दोन समानुपाती असतात तोपर्यंत घोडाबाजार चालावाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही घोडेबाजार आवडले. सद्यस्थितीवरचे मार्मिक भाष्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0