मा-भ-भे... अर्थात - शिव्या!
शिव्या हा भाषेचा एक भलताच आकर्षक भाग आहे याबद्दल(तरी) वाद नसावा.
माझा शिव्यांकडे बघण्याचा नजरिया कायम बदलता होता-आहे. भीती-आकर्षण-अप्रूप-स्त्रीवादामुळे तिरस्कार-विरोध-आकर्षण-भाषिक आकर्षण-सररास वापर-संयमित वापर... अशा अनेक निरनिराळ्या अवस्था पार करून झाल्या. आता त्या शब्दांबद्दल काहीही वाटत असलं, तरी जे वाटतं ते रोगट नसल्याची माझी खातरी झालीय.
ही शिव्यांबद्दलची काही निरीक्षणं:
- योग्य प्रकारे दिलेल्या शिवीत प्रचंड ताकद असते. म. वा. धोंड यांनी सांगितलेला एक किस्सा किशोर आरस यांच्या पुस्तकात आहे, तो असा: एक काटकुळा पोरसवदा माणूस रस्त्यानं जात असता, त्याला दोन माजोरड्या दिसणार्या तरुण पोरांनी काहीतरी छेडलं. धक्काबुक्कीही केली. तो माणूस फक्त शांतपणे उभा राहून 'एक भडव्या-' असं दरडावून म्हणाला. पोरं चपापून मागे फिरली. हे मीही अनुभवलं आहे. बसमधल्या गर्दीत होणारे नकोसे स्पर्श ही नेहमीचीच गोष्ट. अशा वेळी घाबरून अंग आक्रसून घेण्यात अर्थ नसतो. 'तुम्हांला आयाबहिणी नाहीत का?' हा तर अगदीच निरुपयोगी आणि कालबाह्य प्रश्न. तुमचं अबलापण चव्हाट्यावर आणणारा. अशा वेळी एखादी खणखणीत शिवी जोरात हासडली, तर माणसं चपापून दूर सरतात, असा अनुभव.
- शिव्यांमध्ये फक्त स्त्रियांच्याच नाही, तर पुरुषांच्या प्रजननक्षम अवयवांबद्दलही पुरेसे तपशील असतात. त्यात फक्त स्त्रियांना लक्ष्य केलं गेलं आहे, असं मला वाटत नाही. संस्कृतीच्या - आणि विशेषतः भारतीय संस्कृतीच्या - स्त्रियांच्या योनिशुचितेचं प्राणपणानं रक्षण करण्याच्या लबाड पवित्र्यानुसार स्त्रियांचे अवयव जास्त प्रमाणात वापरले जातात आणि जास्त परिणामकारकपणे अपमान करतात, इतकंच. शिवाय आईबहिणीवरून दिल्या जाणार्या शिव्यांमध्येही संस्कृतीनं निषिद्ध मानलेलं इन्सेस्टचं कृत्य करणार्या माणसाची टोकाची निर्भर्त्सनाच करण्याचा उद्देश दिसतो. त्यामुळे मला स्त्रियांचा तथाकथित अपमान करणार्या शिव्या फारशा टोचणं बंद झालं. त्याहून लग्नसंस्थेचं पावित्र्य ठसवणार्या 'हरामी-हरामखोर' आणि तत्सम शिव्या, किंवा 'बांगड्या भरा मग'सदृश वाक्प्रचारच मला टाकून द्यावेसे वाटायला लागले.
- पोरांच्या टोळक्यात वावरताना पोरांची शिव्या देण्याची शैली दिसली आणि प्रचंड आवडली. बहुतांश तरुण, बंडखोर वयातली मुलं शिव्या या अपमानकारक शब्द म्हणून न वापरता मित्रांच्या टो़ळक्यात खास जवळीक, प्रेम दाखवण्यासाठी वापरतात. त्यात जोर असतो, सहजता असते, तसा एक जवळिकीचा भागही असतो. शिव्यांची ही अभिव्यक्ती मला अजूनही प्रचंड आवडते.
तुम्हांला शिव्या दचकवतात का? कुठल्या नि का? तुम्ही देऊ शकता - देता - का शिव्या मोकळेपणानं? कुणासमोर? कुणासमोर 'नाही'?! का?... या प्रश्नांबद्दल चर्चा करायचा इरादा आहे, शिव्यांची रंगीत जंत्री मिळवण्याचा नाही. अर्थात, ती मिळाली म्हणून तिचं काही वावडंही नाही, हे सांगायला नकोच!
मी शिव्या सहजतेने देत नाही.
मी शिव्या सहजतेने देत नाही. शिव्या देणे वाईट आहे असेही वाटत नाही व/वा मी शिव्या देत नाही याचा अभिमान वगैरेही वाटत नाही.
जसे काही लोक शाकाहार करतात, काही मांसाहार करतात, काही दारू पितात, काही पित नाहीत, काही शिव्या देतात, काही देत नाहीत. त्यात छान/चांगलं/वाईट/पुजनीय/तिरस्करणीय असं काही नाही.
लैंगिक अर्थाशी निगडीत शिव्यांचा वापर हा अनेक स्त्री-पुरूषांना लहानपणापासून करताना पाहिला आहे. रादर शिव्यांबद्दलचे सोवळेपण हा खास शहरी संस्कार. गावात माझ्या आज्या/पणज्या चित्रपटातल्या सेन्सॉरशिपची भिती नसल्याने "मेल्या मुडद्या" किंवा "मुडदा बशिवला तुझा" वगैरे अगदीच सौम्य व निरुपद्रवी शिव्यांत न अडकता, आपला राग विविध लिंगवाचक/संभोगवाचक शिव्या देत मुक्तपणे मोकळा करत असंत.
माझ्या काही मित्रांच्याही अब्द कोशात A to Z अर्थात अ ते 'झ' असा समुच्चय सतत जीभेवर नाचत असल्याने दचकायला होत नाही. मात्र त्यांच्याशी बोलतानाही माझ्या तोंडुन शिवी निघता निघत नाही याचा त्यांनाच कधी कधी संकोच होतो :(
========
अपवाद:
काही प्रसंगी मात्र माझे परिचित/सोबती समोरच्याचा विचार न करता मनापासून पण उगाचच कै च्या कै शिव्या देत असले की फारसे रुचत नाही - पण समजु शकतो.
मात्र, त्याच वेळी जातीवाचक शिव्यांची प्रचंड घृणा आहे.
======
समांतरः
माझे शिव्या न देणे हे अनेकदा दारू न पिण्यासारखेच आहे. नव्या मित्र-मैत्रीणींच्या गटात सुरूवातीला या दोन्ही सवयी मला एकटे पाडण्यास पुरेशा आहेत.
काहिंना या दोन्ही सवयींमुळे मी तथाकथित 'सज्जन' वगैरेही वाटतो. :P याला इलाज नै. परिचयाचा काही काळ गेला की हे चष्मे गळुन पडतात.
शिव्या
शिव्या न देणारे, सालस सज्जन लोक जेंव्हा शिव्या देतात तेंव्हा थोडं दचकायला होतं, बाकी शिव्या देणं हा संभाषणकलेचा एक भाग आहे, म्हणजे वाक्यात योग्य ठिकाणी, योग्य जोर देऊन शिवी हासडता आली म्हणजे संभाषणात मजा येते, काहि लोकं उगाच आपलं निव्वळ तिखट पण चव नसलेल्या मिसळेच्या तर्री सारखे शिवराळ असतात (संजोपरावांकडून उसनी उपमा), त्यात मजा नाही. उगाच येताजाता शिव्या घालण्यासाठी 'वय' आणि 'जवळीक' वेगळी असावी लागते, होस्टेल किंवा घर शेअर करणारे मित्र एकमेकांना अभावानेच नावाने हाक मारतात, पण त्या वयात आणि त्या काळातच त्यात मजा आहे असं मला वाटतं.
सार्वजनिक स्थळी शिव्या देताना दोन हात करायची हिम्मत पाहिजे, नायतर पंचाईत व्हायची, त्यातुनही शिव्यांचे संकेत थोडेफार गावानुसार बदलतात, गावात सहज चालून जाणारी शिवी शहरात बर्याचदा खपत नाही.
स्त्रियांनी शिव्या देणं दारू/सिगारेट पिण्यासारखी एकेकाळी नॉव्हेल्टी होती, पण बर्याच स्त्रियांना मुलांसारखं सिगारेट पिणं जसं जमत नाही म्हणजे तसं शिवी घालणंही जमत नाही, ओढून-ताणून कितीही अवसान आणलं तरी ते मुलांसारखं वाटत नाही, स्त्रियांना काय वाटतं हे माहित नाही, तरी राणी मुखर्जीने 'नो..जेसिका'मधे जी थोडीफार शिवीगाळ/फाऊल केली आहे ती बर्यापैकी जमली आहे.
मला शिव्या द्यायला फारसं आवडतं नाही, त्यापेक्षा शिव्यांचंच एक पुणेरी रूप आवडतं, त्यासंदर्भातला एक विनोद - रोड वर भरधाव गाडी चालवणार्या इसमाला दुसरा इसम म्हणतो 'काय कर्वे कसे आहात?', पहिला इसम प्रश्नार्थक चेहर्याने बघतो, दुसरा इसम 'हा कर्वे रस्ता आहे, म्हणून विचारलं', म्हणजे एकार्थी 'रस्ता तुझ्या बापाचा आहे कारे भडव्या' असे म्हणणे.
परदेशात टैमपास म्हणून आपल्या बोलीत तिथल्या लोकांना शिव्या घालत मित्राशी बोलायला मजा यायची, आम्ही बस/रेल्वेने प्रवास करताना, चेहर्यावर प्रचंड गंभीर भाव आणत, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीबद्दल माहित असलेल्या सगळ्या शिव्या वापरुन एकमेकांशी बोलणे हे टाईमपासचे उत्तम साधन होते.
लहान वयात शिव्या कानावर फार
लहान वयात शिव्या कानावर फार पडल्या नाहीत आणि स्टँडर्ड दोन-चार शिव्या वगळता बाकी शब्दांचे अर्थ माहित नव्हते. 'लेका' याचा अर्थ आजच समजला. अशा शब्दांचे अर्थ मित्रमंडळात विचारायला काही वाटत नाही. तसे माझ्या तोंडात बरेच अपशब्द आहेत, आणि ते वापरताना फार लाजबिज वाटत नाही. पण ज्यांच्याशी फक्त नातं आहे म्हणून आहे अशा लोकांसमोर स्वतःसारखं वागता येत नाही. (जळ्ळी मेली कुटुंबसंस्था!) त्यामुळे शिव्याच काय ओव्याही देत नाही.
शिव्यांकडे बघण्याच्या माझ्या आणि मेघनाच्या दृष्टीकोनात फार फरक आहे असं वाटत नाही. आई-बहिणीच्या अवयव, लैंगिकतेसंदर्भात दिलेल्या शिव्यांपेक्षा स्त्रियांना वस्तू समजणारे वाक्प्रचार जास्त तिरस्करणीय वाटतात. 'याला कोण मुलगी देणार' अशासारख्या वाक्प्रचारांमध्ये, मुलगी ही कोणाच्यातरी मालकीची वस्तू आहे आणि ती कोणालातरी दिली असा भाव येतो; डॉक्टरीण, मास्तरीण असे शब्द आजही अनेक समाजांमध्ये डॉक्टर, मास्तर यांची बायको, relative being म्हणून स्त्रियांचा उल्लेख करणारा असतो म्हणूनही असे शब्द, शब्दप्रयोग खटकतात. बहुतेकदा असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सोय असते, राज ठाकरे वगैरे लोकांनी 'बांगड्या पाठवण्याचे' सल्ले दिले तरी त्यांचा निषेध करण्याची अभिव्यक्तीही दिसते, त्यामुळे त्याबद्दलही फार त्रास होत नाही.
पोरांच्या टोळक्यात वावरताना
पोरांच्या टोळक्यात वावरताना पोरांची शिव्या देण्याची शैली दिसली आणि प्रचंड आवडली. बहुतांश तरुण, बंडखोर वयातली मुलं शिव्या या अपमानकारक शब्द म्हणून न वापरता मित्रांच्या टो़ळक्यात खास जवळीक, प्रेम दाखवण्यासाठी वापरतात. त्यात जोर असतो, सहजता असते, तसा एक जवळिकीचा भागही असतो.
Men socialize by insulting each other but they really don't mean it. Women socialize by complimenting each other, they don't mean it either.
बहुभाषिक शिव्या संस्कृती
माझे लहानपण कर्नाटकात गेले, तिथल्या बोलीभाषेत एकादी तरी (लैंगिक) शिवी हासडल्याशिवाय वाक्यच पूर्ण होत नसे. त्यामुले लैंगिक शिक्षण की काय म्हणतात ते आपोआप मिळत गेले. "रांडेच्च्या, भोसडीच्या" वगैरे शब्द सुशिक्षित, सुसंस्कृत (मराठीभाषी) घरातले वडीलधारी लोकही (महिलासुद्धा) सहजपणे वापरत. ते करतांना त्यांना त्यांचा शब्दशः अर्थ अभिप्रेत नसेच. शिक्षणासाठी शहरात आल्यावर पाहिले की होस्टेलमधली मराठी मुले "च्यायला मायला", हिंदी मुले "साला भेंचोद" आणि कॉन्वेंटवाली इंग्रजाळलेली मुले "ब्लडी बास्टर्ड" इत्यादि शब्द न वापरता सलग दोन वाक्येसुद्धा बोलत नसत. अगदी एकाद्या नटाचे किंवा खेळाडूचे कौतुक करतांनासुद्धा असल्या विशेषणांचे इंजिन लावल्याशिवाय त्यांची गाडी पुढेच जात नसे. पण का कुणास ठाऊक आमच्या आणि पुढल्या पिढीमधले कोणीच अशा येता जाता शिव्या देत निदान घरात तरी बोलत नाहीत.
विनोदी/irrelevant
शिव्या बहुतेक वेळा विनोदी/irrelevant वाटल्या आहेत.
म्हणजे बघा- कुणीतरी काहीतरी केलं जे आपल्याला आवडलं नाही. किंवा त्याचा त्रासच झाला तर पुढीलपैकी काय करावे?
१. त्याला त्याच्या आई-बहिण-तत्सम स्त्रीवर्ग-किंवा-तो मनुष्य ह्यांच्या खाजगी अवयवांचा उल्लेख करून बोलवावे.
२. अश्लील अशा शब्दांचा वापर करून त्यावर आवाज चढवून बोलावे
ई.ई. प्रकार फार मद्दड वाटले आहेत.
तेव्हा शिव्या दचकवत नाहीत, थोड्या disappoint करतात- की समोरच्याला आता काही सुचत नाहिये आणि तो/ती आपल्या भावनांच्या कुकरची शिट्टी वाजवत आहेत.
प्रत्यक्ष संघर्षाच्या प्रसंगी
प्रत्यक्ष संघर्षाच्या प्रसंगी आलेल्या शिव्या वगळून एरवी आलेल्या शिव्या या मुळी शिव्याच नसतात, त्या देणार्याची मानसिकता दाखवणारे शब्द असतात असं मी मानतो.
१ मित्रां मित्रांत लडिवाळपणे दिलेल्या शिव्या हा फाजील/नसलेली सलगी दाखवण्याचा भाग असतो.
२. संबोधनासारख्या येणार्या शिव्या या देणारा फारसा विचार न करता बोलणारा असल्याचे निदर्शक असतो. त्याच्याकडून कोणत्याही बाबतीत सखोल विचाराची, अभ्यासाची, चिकित्सेची अपेक्षा ठेवणे अपेक्षाभंगच पदरी देते. चिकाटीचा अभाव हा याचा स्थायीभाव.
३. अ शी संभाषण करत असताना ब बद्दल बोलताना शिव्यांचा भरपूर वापर करणार्याला 'क' ला प्रचंड न्यूनगंड असतो नि शिव्यांचा वापर करत उसने अवसान आणून अठ्ठावीस इंची छाती छप्पन्न इंच असल्याचा आभास निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सामान्यपणे ज्याला घरी दारी कुत्रं देखील विचारत नाही तो दुकानदार, छोटे विक्रेते, मित्रांच्या संगतीत वगैरे उठसूठ मतभेद व्यक्त करून मोठ्या आवाजात बोलून वादविवाद निर्माण करतो त्याचा हा भाऊबंद.
४. हाताखालच्यांशी बोलताना शिव्यांचा धबधबा सोडत वरिष्ठांच्या शिव्या ऐकूनही मुकाट राहणारा न्यूनगंड बाळ्गणारा तर असतोच वर भेकडही.
हवेत दिलेल्या शिव्या राहिल्या
हवेत दिलेल्या शिव्या राहिल्या की! उदाहरणार्थ, "This is fu**ing tasty!"
शिव्या आनंदानेही दिल्या जातात. म्हणावं तर या शिव्या I mean, you know अशांसारखी पालुपदं असतात, म्हटलं तर उत्साही लोकांचा ओसंडणाऱ्या भावना असतात. एखादा पदार्थ खाऊन आपल्याला स्वर्गसुख वाटतंय तर ते व्यक्त करणं, एवढंच त्यात असतं. त्या भावनेचं विश्लेषण सगळ्यांनाच जमेल असं नाही, बऱ्याच दिवसांनी खाल्लेल्या, नीट जमलेल्या पाककृतीमध्ये कदाचित विश्लेषण करण्यासारखं काही नसेलही!
प्रत्यक्ष संघर्षाच्या प्रसंगी
प्रत्यक्ष संघर्षाच्या प्रसंगी आलेल्या शिव्या वगळून एरवी आलेल्या शिव्या या मुळी शिव्याच नसतात, त्या देणार्याची मानसिकता दाखवणारे शब्द असतात असं मी मानतो.
मला उलट वाटतं, संघर्षाच्या प्रसंगी आलेल्या शिव्या बरेचदा त्या देणार्याची सुप्त मानसिकता दाखवणारे शब्द असतात.
एरवी आलेल्या शिव्या या मुळी शिव्याच नसतातच त्याला काहीही एक अर्थ नसतो.
१. मित्रां मित्रांत लडिवाळपणे दिलेल्या शिव्या हा फाजील/नसलेली सलगी दाखवण्याचा भाग असतो.
बरेचदा हा सवयीचा पण भाग असतो, फाजीलपणा ठिक नसलेली सलगी वगैरे पटत नाही, लहानपणी पासुन सोबत असणारे मित्र काय एकमेकांना शिव्या देत नाहीत?
२. संबोधनासारख्या येणार्या शिव्या या देणारा फारसा विचार न करता बोलणारा असल्याचे निदर्शक असतो. त्याच्याकडून कोणत्याही बाबतीत सखोल विचाराची, अभ्यासाची, चिकित्सेची अपेक्षा ठेवणे अपेक्षाभंगच पदरी देते. चिकाटीचा अभाव हा याचा स्थायीभाव.
सहमत
४. हाताखालच्यांशी बोलताना शिव्यांचा धबधबा सोडत वरिष्ठांच्या शिव्या ऐकूनही मुकाट राहणारा न्यूनगंड बाळ्गणारा तर असतोच वर भेकडही.
बरोबर, पण शिव्या देणारे वरिष्ठ पण कॉन्फीडन्सचा अभाव असणारे व कमालीचे इन्सेक्युअर असतात.
मुद्दा क्र ३ वाचताना
मुद्दा क्र ३ वाचताना फेसबुकवरचे एक व्यक्तीमत्व आठवले. प्रत्येक वाक्यात दोनचार लैंगिक शिव्या असल्याशिवाय वाक्य पूर्ण व्हायचेच नाही. एकदा सध्या आठेक वर्षांच्या असलेल्या मुलीला भविष्यात जावई घेऊन जाईल म्हणून आत्ताच शेलक्या शिव्या हासडून ठेवल्या होत्या. आता ते त्यांच्या वॉलवर लिहितात तो त्यांचा प्रश्न. पण त्यांचे आणि आमचे सामाईक मित्र त्यांच्या वॉलवर लिहू लागले की ती गटारगंगा समोर येत असे.
शिव्या
शिव्या या कालातीत असल्यामुळे जवळजवळ सर्व शिव्या अर्थासकट माहित आहेत. प्रसंगी त्या दिल्याही आहेत. पण मित्रांमधे उगाचच सलगी दाखवायला,तोंडी लावण्यासारखा, शिव्यांचा वापर कधी आवडला नाही. उठसूट एखाद्या मित्राला, ए लवड्या' अशी हांक मारणे व त्यानेही त्याला ओ देणे, हे कधी आवडले नाही.
मी लहानपणी खूप शिव्या ऐकल्या
मी लहानपणी खूप शिव्या ऐकल्या आहेत अगदी घाण घाण. पण बाकीचा मित्र वर्ग आणि एकाच वयाचे भावंड हे अती अती सज्जन असल्याने कधी कोणाला शिव्या द्यायचा संबंधच आला नाही म्हणजे शिवी द्यावी वाटली एखाद्याला तरी ह्या लोकांसमोर ती मनातल्या मनातच द्यावी लागे.
नंतर कॉलेजात गेल्यावर जो नवीन ग्रूप झाला त्यात सगळे सर्रास आणि मोकळेपणाने शिव्या देणारे होते. माझ्यासाठी ते नवीन असलं तरी धक्का बसला नाही उलट भारीच वाटलं - मुक्त /आझाद असं काहीतरी. मग जेव्हा पहिल्यांदा मी ही मोठ्याने (मनातल्या मनात नाही) एकाला शिवी दिली - अगदी तोंडावर नाही पण त्याच्या बद्दल विषय चालू असताना, तेव्हा जाम भारी वाटलं (ते जाहीरातीत दाखवतात ना, मेंथॉल-तत्सम गोळी खाल्ली की हिरोचे केस उडायला लागतात, त्याला हिमालायत असल्यासारखं ग्ग्गार ग्ग्गार नी रिलॅक्स वाटतं तसंच काहीसं वाटलं मला). आता सर्रास आणि मस्तं मोकळेपणानं शिव्या देतो मी - किती दबून रहायचं ना. जिथे माहित आहे चिडचिड करुन किंवा बंड करुन काही होणार नाही तिथे शिव्या देऊन तरी च्यायला आतली उबळ शमवावी म्हंतो मी ;)
अर्थात आज पर्यंत तरी स्वतःहून कोणालाच तोंडावर चिडून अशी शिवी दिली नाहीये किंवा उगीच म्हणून दिली नाहीये.
बालपण गावी गेल्यामुळे लैंगिक,
बालपण गावी गेल्यामुळे लैंगिक, जातीवाचक असल्या लै शिव्या अगदी त्यांच्या अर्थासह माहित आहेत. पण समहाऊ मी या बाबतीत 'आशा काळे' भक्त आहे. चांडाळा म्हणून अजून कुणाला शिवी दिली नसली तरी 'दुष्ट' हा अत्यंत आवडता शब्द कधी रागाने, कधी प्रेमाने वापरते. अगदीच कडेलोट झाला तर हलकट, नालायक!
शब्दांची उद्गम कथा शोधणं मला आवडतं. माणदेशात राहताना 'तुझ्या दाराची कडी निखळली', 'तुझं दार मी लिपलं(लिंपलं)' ही शिवी आमच्या घरमालकिणबाई त्यांच्या मुलांना देत असत. आम्हा लिंगायतांच्यामध्ये दहनाऐवजी दफन होत असल्याने दिल्या जात असलेल्या 'तुझं डबरं भरलं', 'तुला पुरला मसणवटीत'* या शिव्यांच्या अनुषंगाने कदाचित त्यांना पिरॅमिडसारख्या बांधीव ठिकाणी दफन करून त्याचं दार लिंपलं(अनारकलीसारखा जिवंत देहांत) किंवा निखळलं(मृतदेह खराब होईल) असा अर्थ असावा अशी माझी समजूत आहे. (त्या काकूंच्या समाजात दहन करतात)
एकदा प्रवास करताना समोरच्या बाकावर मुस्लीम स्त्री बसली होती. दोन तीन वर्षांचं मूल तिला त्रास देत होतं आणि मुळात आईचं वय लहान असल्याने तिची तारांबळ उडाली होती. एकदम ती रागाऊन मुलाला 'नस्ल-ए-हरामा' म्हणाली. मी आणि बहीण हात तोंडावर दाबून घेऊन दरवाज्याकडे पळत जाऊन खूप हसलो. उर्दू खूप नजाकतीची भाषा आहे पण इतक्या नजाकतीने दिलेली शिवी पहिल्यांदा ऐकली.
*- दफन साधारण स्वत:च्या शेतात केलं जातं. क्वचित प्रसंगी भाऊबंदांच्या अथवा जवळच्या नातेवाईकांच्या. शेवटी इलाज नसेल तर स्मशानात. त्यामुळं मसणवटीत पुरलं जाणं हे मानहानीकारक. मी अजून कुठल्या गावात अजूनतरी लिंगायत समाजाची दफनभूमी पाहिली नाही.
खरंच बाप्रे दिसायच ते. मी फार
खरंच बाप्रे दिसायच ते. मी फार लहान असताना पाहिल्यात अशा प्रेतयात्रा; त्यामुळे आता नीट आठवत नाही.
तिरडीवरपण मांडी घातलेलीच असते ना?
असाच एक ऐकीव किस्सा: पाय मुडपायचे राहून गेले होते. प्रेत आणि तिरडीभोवती कोंडाळे करून 'आता काय करायच' अशी गहन चर्चा चाललेली. अबरप्टली एकजण 'मोडा ना तिच्यायला' म्हणून पुढे झाला आणि कडकड आवाज करून मुडपले पाय :O. सगळेजण तिथेच फिदीफिदी हसायला लागले.
लिंगायत शव, दफनभूमी
>> झोळीतून (वजन अधिक असल्यास खुर्चीतून) कसे नेतात माहित नाहीय
गिरिश कासारवल्ली दिग्दर्शित 'Riding a Stallion of a Dream' (२०१०) चित्रपटात एक लिंगायत प्रेतयात्रा दिसते. बसवलेलं शव हातगाडीसारख्या गोष्टीवरून ढकलत नेतात असं आठवतं. दफन शेतात होतं. पण मी लिंगायत दफनभूमींचे फोटो पाहिले आहेत. गूगल केलं तर सापडावेत.
माझ्या गावी(कोल्हापुर जिल्हा)तर शिव्यांचा अगदी सुकाळ म्हणावा
माझ्या गावी (कोल्हापुर जिल्हा )तर शिव्यांचा अगदी सुकाळ म्हणावा अशी परिस्थिती.लहान थोर स्त्रीपुरुष सर्वांच्या जिभेवर -जसे बोलतात की सरस्वती विराजमान है-शिव्या विराजमान आहेत.रांडच्या, उंडगीच्या ह्या शिव्या तर अगदीच सुमार आणि आमच्या फेवरेट. अमान मोमिन त्यांच्या 'आम्ही कोल्हापुरी'त म्हणतात ..दोन बॅरिस्टर मित्र जरी न्युयॉर्क च्या रस्त्यावर भेटले तर बोलतील.. हा हा ! रांडच्या हिकडं कुठं ?
हास्यसम्राट मध्ये भाग घेतलेल्या 'संतोष शिंदे'ने त्याचा एक परफॉरमन्स फक्त ह्या कोल्हापुर च्या शिव्यांवर दिलेले आठ्वते.
शाळेत असताना शिव्यांचा एक भारी प्रकार होता. आपल्याला एखादे वेळी करावी वाटणारी एखादी गोष्ट बाकिच्या मित्रांनी पण जबरदस्ती ने का होइना करावी म्हणुन यमकामध्ये शिव्या दिल्या जायच्या. ट ला ट , र ला र. उदा. मला वाटते की माझ्या मित्रांनी पण माझ्या बरोबर जोरात ओरडावे, तर मी शिवी देतो.
अच्ची गुच्ची कलाकार,
कोण माझ्याबरोबर अत्ता वरडत न्हाइ त्याच्या आईवर झाला XXकार.
अशा आत्ता कमीत कमी २० तर आठ्वतील. बाकी रांडच्या, उंडगीच्या, भोसडीच्या, सुक्काळीच्या ह्या आणि त्यांचे मुस्लिम व्हर्जन रांडके, ऊंडगीके, च्युतमारीके ह्या शिव्या नेहमी वापरल्या जातात.
अवांतरः
शेजारी लहान (४-५ वर्षाच्या) भावंडांमध्ये घडलेला प्रसंग:
आये(आजीला उद्देशुन) ह्यो मला रांड उंडगी म्हणाय लागलाय बग.
म्हणुदे की ग उंडगे , अंगाला काय भोकं पडाय लागल्याती काय?- आजी.
भावा हात मिळीव. या असल्या
भावा हात मिळीव. या असल्या इफ-एल्स कंडिशनल शिव्या अन्यत्र लोक देतच नैत की काय असे वाटण्याइतपत अन्यत्र शिव्या मिळमिळीत असतात. नै म्हणायला सोलापूर एक बर्यापैकी बरं आहे या बाबतीत. मिरजेत दरवर्षी होळीनंतर या शिव्या असायच्याच. एरवीही असायच्या, पण होळीत खास मजा. 'आभाळातनं पडला चाकू, जो कोण बोंबलत नै त्याचा बा डाकू' वरनं सुरू होऊन, अच्ची गुच्ची घौ, पोळ्या केल्या नौ इ.इ. पर्यंत जायच्या. तुला वेगळे सांगणे न लगे ;)
अपि च- एखादी गोष्ट लै घाणेरडी आहे असे सांगताना कोल्लाप्रात जन्ता 'गू-घाण' असा खास वाक्प्रचार वापरते. तो तसा ऐकणे आणि तसाच वापरणे हे दोन्ही परमभाग्याचे.
पच्चिम म्हाराष्ट्रात इन जण्रल स्वतःला शाणा समजणार्याला 'काय छत्रपती/बाजीराव लागून गेला काय' इ.इ. म्हटल्या जाते. त्याच्या जागी 'झागिरदार' आले तर खास सांगलीकोल्लापूरचं बेणं आहे हे अवश्य ओळखावं. त्यातही सूक्ष्म भेद( जसा इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा वृत्तांत असतो तसा ) म्ह. कोल्लापूरचा माणूस 'शाहूम्हाराज' वापरतो. अजून अनेक सफिक्सही वापरतो, पण ते सगळं समक्ष भेटीत सांगितल्या जाईल ;)
मी एक भाऊ दुसर्या भावाला 'ए
मी एक भाऊ दुसर्या भावाला 'ए आयघाल्या ' म्हणतानाही ऐकलंय. रांड, उंडगी, टवळी, मुरळी, फुकणी हे तर शिव्या नसल्यातच जमा आहे.
त्याच्या जागी 'झागिरदार' आले तर खास सांगलीकोल्लापूरचं बेणं आहे हे अवश्य ओळखावं. त्यातही सूक्ष्म भेद( जसा इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा वृत्तांत असतो तसा )
तासगांवला पटवर्धन!! आमची आजी एखादं काम राहून गेलं असेल तर 'हे करायला काय पटवर्धन येणार आहे का?' म्हणायची.
हा हा हा, हा पाठभेद ऐकला
हा हा हा, हा पाठभेद ऐकला नव्हता अगोदर! मिरजेलाही पटवर्धन असले तरी कुणी तसा उल्लेख करत नसे. बाकी 'शिव्या नसल्यातच जमा' इ. शी विशेष सहमत.
अन लिंगायत प्रेतयात्रेबद्दलः मी शाळेला चाललो असताना मध्ये लागणार्या गल्लीत एकदा पाहिली होती. लय विचित्र वाटले होते, पण नंतर विश्वकोशातून कन्फर्म केले की तसेच असते.
आताच पटवर्धनांचं विकीपान
आताच पटवर्धनांचं विकीपान वाचलं. मला नक्की काळ माहित नाही, परंतु ऐकीव माहितीनुसार पेशव्यांचा गणपती पळवला जात असताना दाखवलेल्या शौर्यामुळे हरिभाऊ पटवर्धनांना गणपती१ आणि तासगांव-आसपासची जहागिरी मिळाली. हरिभट पूजापाठात हुशार होते त्यामुळे त्यांच्या मुलांना सरदारकीची वस्त्रे मिळाली अणि त्यांना नंतर तासगांव-मिरज-सांगली-कुरूंदवाद-जमखंडी ही गांवे नंतर देण्यात आली.
या निमित्ताने तासगांवच्या गणपतीमंदिरात काढलेल्या आणि सध्या ऑर्कुटवर असलेल्या काही माहितीपर फोटोंची आठवण झाली. पटवर्धनांच्या विकीपानावर en.wikipedia.org/wiki/Patwardhan तासगांवची काहीच माहिती नाहीय, ती या निमित्ताने अद्ययावत करता येईल.
सध्या आल्बमची लिंक. इथे.
१. गणपतीची मूर्ती पळवली जाण्याची इतरांच्य मनात यावी, म्हणजे खुद्द गणपतीलाच आपल्याकडे राहायचं नसावं असा काहीसा तर्क असल्याची दंतकथा आहे
साधारण इ.स. १७५० नंतर कधीतरी
साधारण इ.स. १७५० नंतर कधीतरी हे झाले असे वाटते. पटवर्धनांची आद्य जहागीर म्हणजे मिरज. पुढे मग तासगाव, बुधगाव, कुरुंदवाड, जमखंडी, इ. ब्रँचेस झाल्या असे वाटते. १८०१ मध्ये चुलते (बहुधा) गंगाधरराव आणि पुतणे चिंतामणराव यांत वितुष्ट येऊन सांगलीला पुतण्याने वेगळी गादी थाटली, १८०४ साली सांगलीचा गणेशदुर्ग किल्ला बांधून तयार झाला. राजवाडा चौकातनं आत गेल्यावर खंदकासकट त्याचे अजूनही अवशेष शिल्लक आहेत. पटवर्धनांचा जुना वाडा अजूनही मिरजेत शिल्लक आहे- 'हरबण्णाचा वाडा' या नावाने लोक तो ओळखतात. रोचक गोष्ट म्हंजे भर ब्राह्मणपुरीत त्या वाड्याला ऑलमोष्ट लागून जुम्मा मशीद आहे, तीही जुनीच आहे. त्याचा अर्धा भाग पाडून तिथे अपार्टमेंट्स बांधण्यात आलीत, अर्धा भाग मात्र शिल्लक आहे. पाडापाड सुरू असताना (२००३-५ मध्ये कधीतरी) तिथे एक सोन्याची गणेशमूर्ती सापडली होती, झालंच तर पेव/बळद म्हणावे अशी स्ट्रक्चर्सही.
तासगावचे गणपती मंदिर हे परशुरामभाऊ पटवर्धनांनी बांधले. त्याचा एंट्रन्स सौथच्या देवळांचा असतो तसा गोपुरछाप आहे. कर्नाटकातल्या स्वार्यांत परशुरामभाऊ बर्याचदा जात असत तिथून त्यांनी तशा प्रकारचे देऊळ बांधावे असे मनावर घेतले.
बाकी माहिती पाहतो.
अहो मी कुरुंदवाड संस्थानाचाच नागरीक
कुरुंदवाड संस्थाना बद्दल एक दुरुस्ती सुचवु इच्छितो.
त्र्यंबकरावांना-हरभट बुवांचे पुत्र- पेशव्यांकडुन कुरुंदवाड संस्थान ची सनद मिळाली. कुरुंदवाड चे दोन भाग होउन कुरुंदवाड- सिनियर आणि कुरुंदवाड- ज्युनियर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. कुरुंदवाड- ज्युनियर मध्ये कर्नाटकातील बेळ्गाव पर्यंतचा भुभाग समाविष्ट होतो.
कुरुंदवाड- सिनियर संस्थानाचे कालपरत्वे तुकडे होऊन कुरुंदवाड, बुधगाव, मिरज, सांगली आणि तासगाव ह्या जहागीरी बनल्या. कुरुंदवाड संस्थानाचा सविस्तर इतिहास इथे .. आणि .. इथे वाचु शकता. मिरज आणि सांगली ह्या जहागीरी कशा बनल्या हे देखील आहे. :glasses:
दिलेल्या दुव्यावरून दिसते की
दिलेल्या दुव्यावरून दिसते की कुरुंदवाडचा स्प्लिट होऊन मिरज झालेले नाही. दोन्ही एकाचवेळी तयार झालेले दिसतात. कुरुंदवाड ही सीनियरमोस्ट लाईन आहे एवढेच, आय मीन हरिभटबावांचे सीनियर पुत्र कुरुंदवाडचे संस्थापक अन ज्युनियर पुत्र मिरजसंस्थापक.
आणि बेळगावपर्यंतचा भूभाग कुरुंदवाड संस्थानात असणे अवघड वाटते, मिरज अन कुरुंदवाड यांतील अंतर १५ किमीच्या आसपास आहे अन मिरजेहून बेळगाव १०० किमी तरी आहे. इतका मोठा भूभाग कुठल्याच पटवर्धन संस्थानात नव्हता-एक्सेप्ट मिरज. मिरज सीनियरचे क्षेत्रफळ ८७१ वर्गकिमी आहे तर कुपवाडचे ४४६ वर्गकिमी.
कुरुंदवाड- ज्युनियर संस्थानाबद्दल आणखी माहिती
कुरुंदवाड- ज्युनियर संस्थानाबद्दल आणखी माहिती या संस्थाळावर मिळु शकेल. बेळगाव पर्यंतचा पुर्ण भाग म्हणता येणार नाही पण कर्नाटकातील बेळ्गाव व आजुबाजुची काही गावे अशी जहागीर असावी. या साईटवरील नकाशा तितकासा सुस्पष्ट नाही.
गाबड्या
'गाबड्या' ही शिवी अलिकडेच अमेरिकेत एका मुलाच्या तोंडी ऐकली. मुलाचे आई-वडील मराठी भाषिक आहेत, मुलगाही बऱ्यापैकी मराठी बोलतो. त्याच्या तोंडून हा शब्द ऐकल्यावर हा उगाच काहीतरी अक्षरं एकमेकांशेजारी जोडून देतो असं तेव्हा वाटलं. (त्याच्या सृजनशीलतेवर खूष होऊन मी त्याला 'शेंबड्या' अशी त्याला नवीन असणारी शिवी शिकवली.) पण 'गाबड्या' हा जुनाच शब्द आहे हे या धाग्यामुळेच समजलं.
रोगट
तरी जे वाटतं ते रोगट नसल्याची माझी खातरी झालीय.
मेघना इथे मी भला थोरला (माझ्या नेहमीच्या प्रतिसादाच्या मानाने ) प्रतिसाद लिहीला होता पण मग किळस येउन तो काढून टाकला. माझे शीव्यांविषयक ३ अनुभव मांडले होते. परत खाली लिहिते -
बस स्टोपवर अचकट विचकट गाणी गाणारे लुख्खे पहाते. पैकी एक जण "fingering इन द स्कूलबस" अशा टाइपचॆ स्वनिर्मित रचना गात होता.
नवर्याचा गुजराथी मित्र, त्याची बायको , व आम्ही लोणावळ्याला कार हायर करून गेलेलो, मित्र चालवत होता अन एका ड्रायव्हरने कट मारला. हा मित्र इतका चिडला ओरडून म्हणाला :ए रताळ्या तुझ्या गांडॆत लई अळ्या झाल्या का रे?"
एक मासे विकणारी बाई अक्षरक्ष: विनाकारण हिस्टेरॆकल होउन एका गरीब बाईला शिव्या वर शिव्या देत होती इतक्या घाण की विचारू नकोस "वरून-खालून पिकालीस तरी खाज जाईना...." टाइप्स. कोण लागणार तिच्या नाडी/तोंडी म्हणून समस्त स्त्रीवर्ग gap... एकदम चिडीचूप!!!
आता तूच सांग या तीनही प्रसंगांची विशेषता: त्यातील मुक्ताफ़ळांचॆ घृणा वाटणं स्वाभाविक आहे की रोगट? तू "रोगट" नक्की कशाला म्हणतेस?
___________
अन विचार करता असं लक्षात आलं की तीनही प्रसंगात ज्या व्यक्तीच्या करता हे शिवराळ शब्द वापरले ती व्यक्ती इनोसंट किंवा ओलमोस्ट इनोसंट होती त्यामुळे त्या त्या शिवीची घृणेची तीव्रता वाढली.
याच शिव्या जर गर्दीत गलीच्छ धक्के देणार्या किंवा लहान मुलीवर बलात्कार करणार्या माणसाला दिल्या तर मला त्या कमीच वाटतील..
कदाचित तुलाही हेच सांगायचे असावे. की शिवी इज अ टूल. कसा वापर करतो ते महत्त्वाचं.
_____________________
Good Night will reply in the morning.
उत्तरादाखल एक अनुभव
उत्तरादाखल एक अनुभव सांगते:
मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करताना मला शक्यतोवर दारात उभं राहायची सवय आहे. अंतर कमी असेल, पाऊस नसेल, गर्दी मॅनेजेबल असेल - तर मी कायम दारात उभी असते. पण आपण तिथे उभं राहिल्यामुळे मागे टेकून खाली बसलेल्या कोळणींचा वारा अडतो. मग त्या अशाच प्रचंड घाणेरड्या शिव्या देतात. जर उभी राहणारी मुलगी तरुण असेल, मग तर संपलंच. त्या मुलीला काही विशिष्ट कृत्यांची किती आस आहे, त्याकरता दारात काही अवयवांचं प्रदर्शन मांडणं गरजेचं आहे, तिचे अशा कृत्यांमधले जोडीदार कोण आहेत... अशा अनेक दिशांनी या शिव्या जातात. मला त्या ऐकून घाण वगैरे न वाटता हसायला येतं. म्हणजे वारा अडण्याचा आणि या कृत्यांचा नक्की संबंध काय, असं काय निरर्थक बोलतेय ही बाई, असं वाटून हसायला येतं.
मी या शिव्या ऐकण्यासाठी मुद्दाम दारात कोळणींसमोरची जागा हुडकून उभी राहत नाही. पणं शिव्या दिल्या तर उलट शिव्या देऊन भांडतही नाही, वैतागत नाही, चिडत नाही. हसते, कानात गाणी खुपसते, दुर्लक्ष करते, सोडून देते.
याला मी रोगट नसणे असं म्हणते.
अगदी लहानपणी आम्ही भावंडं एकमेकांना साधारण या धर्तीवरचे विनोद सांगत असू:
'एक संडास असतो. त्याच्यापुढे मोठ्ठ्ठ्ठी लाईन लागलेली असते....' इथे प्रचंड हसायला यायचं. आता यात हसण्यासारखं काय आहे? पण माणसांना बहुतेक आपल्याला निषिद्ध म्हणून सांगण्यात आलेल्या तथाकथित गुप्त गोष्टींबद्दल बोलून काहीतरी जाम मजेशीर वाटत असावं. तेच बहुधा शिव्यांबाबतही खरं असणार.
आता एका विशिष्ट वयात असे आणि नंतर 'तसे' जोक्स शेअर करणं रोगट नाही. पण सतत-कोणत्याही वयात-प्रचंड मोठ्या प्रमाणावर-त्याच त्याच प्रकारचे जोक्स करणं रोगट आहे.
हेच शिव्यांना लावून पाहिलं माझं मी. मग माझ्या लक्षात आलं, मला शिव्यांबद्दल जे काही वाटतं ते रोगट नाही.
...
'एक संडास असतो. त्याच्यापुढे मोठ्ठ्ठ्ठी लाईन लागलेली असते....'
१. भलताच विनोद आहे की हो हा!
२. चाळीत वाढलेल्या काय हो तुम्ही?
३. सॅडिष्ट!!!!!! (मराठीत: वैट्ट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!!!!) कधी त्या लाइनीतल्या शेवटल्या सद्गृहस्थाच्या१ बुटांत२ स्वतःस उभे करून विचार करून पाहिलाहेत? तुमचा होतो विनोद...
४. (खुद्द विनोदविषयाबद्दल: ) A perfect illustration of unity of purpose!
=================================================================================================================
१ किंवा सद्गृहिणीच्या, अॅज़ द केस मे बी.
२ म्हणजे, मशारनिल्हे सद्गृहस्थ किंवा सद्गृहिणी अशा प्रसंगीसुद्धा बूट घालत असतील, हे (भलतेच) गृहीत धरून.
???
'एक संडास असतो. त्याच्यापुढे मोठ्ठ्ठ्ठी लाईन लागलेली असते....' इथे प्रचंड हसायला यायचं. आता यात हसण्यासारखं काय आहे? पण माणसांना बहुतेक आपल्याला निषिद्ध म्हणून सांगण्यात आलेल्या तथाकथित गुप्त गोष्टींबद्दल बोलून काहीतरी जाम मजेशीर वाटत असावं.
कळले नाही.
म्हणजे, तुमच्याइथे संडास असणे निषिद्ध म्हणून सांगण्यात आले होते???१, २, ३ की संडासासमोर लाईन लावणे?
की संडासासमोर मोठ्ठ्ठ्ठी लाईन लावणे???
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ऐकावे ते नवलच!
२ त्याजागी काही पर्यायी व्यवस्थेबद्दल सांगितले होते काय?
३ मोठ्ठे लोक जे सांगतात, ते सगळेच ऐकायचे नसते कै. मोठ्ठे काय वाट्टेल ते सांगतात. पाश्चात्यांत म्हणे मोठ्ठे 'बगळा बाळे आणतो' म्हणून लहान मुलांना सांगतात. (असे कधी होत असते का कै? कैतरीच!) तसेच हे. 'संडास निषिद्ध' म्हणे! ऐकून घेतले म्हणून कै वाट्टेल ते खपवायचे? बच्चा समझ के रख्खा है क्या?
"व्याख्या" शाळकरीच असतात.
"व्याख्या" शाळकरीच असतात. "व्याख्या" हा शब्द खुद्दही शाळकरीच आहे.
गुदद्वार या अवयवाचे स्थान आणि मानवी शरीरातले कार्य अफाट आणि जीवनावष्यक आहे. जे बाहेर टाकले नाही तर पूर्ण शरीराला टॉक्सिक बनेल असे सर्व वेळेत बाहेर सारण्याचे काम करणार्या विभागाविषयी मला आदर आहे. त्याची उपमा डेरोगेटरी वाटणे हे व्यक्तीसापेक्ष आणि समूहमानसिकतेवर अवलंबून आहे.
दुसरा अवयव करायचाच तर किडनीशी तुलना करता येईल. पण सन्माननीय अवयव हवा म्हणून शिवीला भाषेचे हृदयच जणू असे म्हणणे मला कठीण आहे.
"व्याख्या" शाळकरीच असतात.
"व्याख्या" शाळकरीच असतात. "व्याख्या" हा शब्द खुद्दही शाळकरीच आहे.
या हिशेबाने संविधानही शाळकरीच म्हणावे लागेल बहुधा.
गुदद्वार या अवयवाचे स्थान आणि मानवी शरीरातले कार्य अफाट आणि जीवनावष्यक आहे. जे बाहेर टाकले नाही तर पूर्ण शरीराला टॉक्सिक बनेल असे सर्व वेळेत बाहेर सारण्याचे काम करणार्या विभागाविषयी मला आदर आहे. त्याची उपमा डेरोगेटरी वाटणे हे व्यक्तीसापेक्ष आणि समूहमानसिकतेवर अवलंबून आहे.
touche. तूर्त इतकेच म्हणतो. बाकी किडनी इ. वाचून थोडक्यात डेरोगेटरी स्टेटस देणे सोडवतही नाही अशातला प्रकार वाटला हा.
या हिशेबाने संविधानही शाळकरीच
या हिशेबाने संविधानही शाळकरीच म्हणावे लागेल बहुधा.
शाळकरी असणे हे काहीतरी उणे आहे ही समजूत फार घट्ट आहे.. व्याख्या चुकीची असू शकते. विपरीत असू शकते. ती शाळकरी आहे हा टीकेचा फार सापेक्ष मार्ग आहे.
"सापेक्ष" शब्दाचा अर्थ विचारु नये. माहीत नाही. पण तो शाळकरी नसल्याने वापरला आहे. ;)
जेव्हा मनुष्याने आपल्या
जेव्हा मनुष्याने आपल्या समोरच्या शत्रुवत वाटणार्या माणसाला ठार करण्याऐवजी शिवी दिली तेव्हा मानवी संस्कृती सुरु झाली असे कुठेसे ऐकलेवाचले.
उपरोक्त वाक्य निश्चितच गटणीय, दवणीय, वपुरोक्त, सानेगुर्जीय इ इ आहे. ते हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाकांच्या "गॉड इज सफरिंग" या देवाच्या हजारो व्याख्यांमधील आणखी एक या प्रकारचेदेखील आहे. देवाची ही एकच व्याख्या नव्हे. म्हणून पेस्तनकाका नेसेसरीली "शाळकरी" नव्हेत. (शाळकरी हाही डेरोगेटरीच असावा असेही नव्हेच.. पण ते एक असो)
स्केप्टिकांना, क्रिटिकलांना गटणे, दवणे, वपु अन सानेगुर्जी आवडत नाहीत. पण अन्यही लोक्स असतात. वरील वाक्य वाचून या अनेक अन्य लोकांना "अहाहा" फीलिंग प्रसंगोपात्त येते. त्यामुळे त्याची "वॉव" व्हॅल्यू मान्य करुन ते उद्धृत करणे कधीकधी चालावे.
एकाला टॉलरन्स उत्पन्न झाला म्हणजे सारे जग अल्कोहोलिक झाले असे नव्हे. काहींना अर्ध्या पेगानेही चढते.
वरील वाक्य वाचून या अनेक अन्य
वरील वाक्य वाचून या अनेक अन्य लोकांना "अहाहा" फीलिंग प्रसंगोपात्त येते. त्यामुळे त्याची "वॉव" व्हॅल्यू मान्य करुन ते उद्धृत करणे कधीकधी चालावे.
वॉव व्हॅल्यू एकवेळ मान्य करता येईल, फक्त मुख्य आक्षेप त्याच्यावरच आहे, म्ह. तेवढं सोडून काही नाही. ते रोचक जरूर आहे, पण सत्य नाही. अगदी अंशमात्रही सत्य असण्याबद्दल शंकाच आहे.
किडनी इ. वाचून थोडक्यात
किडनी इ. वाचून थोडक्यात डेरोगेटरी स्टेटस देणे सोडवतही नाही अशातला प्रकार वाटला हा.
गुदद्वार किंवा किडनी हे "घाणेरडे" अतएव त्यांची उपमा "डेरोगेटरी"च. मेंदू, डोळे, नाक, तोंड, फुप्फुसे ही श्रेष्ठ या पक्क्या गृहीतकांतून उपरोक्त मत होणे समजण्यासारखे आहेच. शहरातला कचरा, मैला साफ करणार्या यंत्रणेला "ब्रेन ऑफ द सिटी" किंवा "लंग्ज ऑफ द सिटी" असे म्हणणे डेरोगेटरी ठरु नये. पण इल्लॉजिकल ठरावे. तरीपण कोणी त्यांना तसे न म्हणता आतड्याची उपमा दिल्यास त्यांचा अपमान केला असेही समजता येते किंवा आतड्याचे महत्व जाणले आणि अधोरेखित केले असेही म्हणता येते.
पण एखादी उपमा डेरोगेटरी असणे किंवा नसणे हे वाचणार्यावर अवलंबून असते हेच तुला मान्य होत नसल्याने तुझे म्हणणे मान्य करतो...ठीक आहे.
लेका सारखी चलवादी ही पण एक
लेका सारखी चलवादी ही पण एक शिवी ऐकून आहे त्याची पण माहीती मिळू द्या.
झक मारणे म्हणजे मासे मारणे असा काहीसा अर्थ यापुस्तकात दिलेला आहे, एव्हढा सरळ अर्थ मनात ठेऊन कधीही ही शिवी दिलेली आठवत नाही :)
पुस्तक लै दर्जेदार आहे, माझ्याकडून हरवलं :(
मध्यमपदलोपील्यबन्तउभयान्वयी
'छक्के-पंजे' (१९८७) या चित्रपटात आत्माराम भेंडे यांना भांडखोर, शिव्या देणारा जावई हवा असतो. त्यांची मुलगी सविता प्रभुणे आणि दिलीप प्रभावळकर यांचे प्रेम असते. प्रभावळकर अतिसज्जन-शामळू असल्याने मुळात शिव्या माहित असण्याचीच पंचाईत ! 'भवान्या' (मच्छिंद्र कांबळी) या इरसाल मालवणी दोस्ताकडून ऐकलेली बडबड हीच काय ती त्यांची मिळकत असते. शिव्या देण्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय लग्नास परवानगी मिळणार नसल्याने नाइलाजाने जावयाची परिक्षा द्यायला प्रभावळकर भेंड्यांकडे जातात. तेंव्हा प्रभावळकरांच्या 'एमेपिअच्डी वुइथ मराठी लिटरेचर' या व्यक्तिरेखेने दिलेल्या शिव्या येथे ऐकोन कर्णसंपुटे तृप्त करोन घ्यावीत - ८:५० ते ११:५० (फीत पाहण्यासाठी दोन जाहिराती सहन कराव्या लागतील).
भाषा अवगत होण्याआधीपासुनच
भाषा अवगत होण्याआधीपासुनच माणुस देतोय शिव्या.
http://www.nytimes.com/2005/09/20/science/20curs.html?pagewanted=all&_r…
मला कधी कधी शिव्या
मला कधी कधी शिव्या दचकवतात.
स्त्रियांनी दिलेल्या शिव्या नक्कीच दचकवतात.
मित्रांमध्ये बोलताना शिव्या असताता तोंडात. खर्या भांडणात, म्हणजे रस्त्यावर गाडीला धडक वगैरेच्या केसमध्ये, शिव्या द्यायला कचरतो (घाबरतो).
घरच्यांसमोर/ मोठ्या माणसांसमोर नाही देत. च्यायला वगैरे आलं चुकुन तोंडात तरी बोलणी बसतात.
दुसर्या एका धाग्यावर गाढवाच्या गावात अशी म्हण वापरणार्याकडून शिव्यांची भलामण? ;-)