"आर्थिक नियोजन" - भाग ३ - जीवनविमा

या भागात आपण जीवन विमा विस्ताराने पाहुयात.

जीवनविमा:

एनडोव्हमेंट (परतीची हमी देणा-या) पॉलिसी:
कमवायला लागल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी नाहीतर शेजारपाजारचे कोणीतरी एलाअयसी एजंट असल्याने "अरे टॅक्स वाचवण्याकरता काही करतो की नाही" ह्या दबावाला बळी पडून जवळजवळ प्रत्येकाने एकतरी जीवन-आनंद वा तत्सम पॉलिसी घेतलेली असतेच!

विमा पण मिळतोय शिवाय वीस वर्षांनी पैसे बोनस सकट( जो जवळजवळ इन्शुअर्ड रकमेइतकाच मिळतो) मिळणार म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण झाली वा...वा.. कसे एका दगडात दोन पक्षी मारले असा निदान तात्पुरता आनंद पण झालेला असतो.

पण खरेच त्या एक-दोन (डोक्यावरून पाणी ५) लाख इन्शुरन्सला इन्शुरन्स म्हणावे का? उद्या तुम्ही टपकला तर त्या ५ लाखात साधारण किती दिवस तुमचे कुटुंब आहे त्या जीवनशैली मध्ये राहू शकेल?
आणि चांगली गुंतवणूक तरी म्हणावे का? परतावा देणा-या एलाआयसी च्या कोणत्याही एक लाखाच्या विम्याचा प्रिमियम सुमारे ५००० वर्षाला तरी असतोच! म्हणजे ५००० x २० वर्षे - एक लाख तुम्हीच भरलेले असतात. २० वर्षात रक्कम दुप्पट? अगदी सर्वात कमी जोखमीच्या रिकरिंगमध्येसुद्धा साधारण ११-१२ वर्षात पैसे दुप्पट होऊ शकतात.

एका दगडात दोन पक्षी मारणाच्या नादात दोन्ही पक्षी उडून गेले आणि तुम्ही डास/चिलटांचे चे धनी होतात.

जीवन विम्याचा खरा अर्थ आणि उद्दिष्ट हेच असते की जर कमावता माणूस अचानक गेला तर मागे राहिलेल्या कुटुंबियांचे अगदी उरलेले आयुष्यची बेगमी नसली तरी पर्यायी व्यवस्था चालू करण्याइतका अवधी मिळेल (निदान ३-४ वर्षे), मुलांचे शिक्षण व इतर महत्वाच्या जबाबदा-या पार पडताना मदत मिळेल इतकी रक्कम मिळण्याची हमी.

आणि परतीची हमी देणारा कुठलाही स्कीम जर इतक्या रकमेची करायची म्हटली तर मिळालेला आख्खा पगार त्यांच्याच डोंबलावर घालावा लागेल, कदाचित तोही पुरणार नाही.

एलाआयसीच्या परतीची हमी देणा-या(एनडोव्हमेंट) स्कीम आणि एकूणच त्यांचे "एजंसी आर्किटेक्चर" कसे चालते हे बघितल्यावर मी कानाला खडा लावला,
कारण तुमच्या भरलेल्या प्रिमियमच्या सुमारे ४०% भाग हा कमिशनपोटी एजंटला मिळत असतो (आणि तो एजन्ट तुम्हाला प्रिमियम भरण्याची आठवण करत नसेल, तुम्हीच ऒनलाईन प्रिमियम भरत असाल तर ते त्यांच्यासाठी अक्षरश: फुकट इन्कम आहे) आणि याच कारणाकरता त्यांचे एजन्ट असे गल्लोगल्ली सांडले आहेत.

कदाचित ही वरची माहिती पुर्णपणे बरोबर नसेल, कदाचित ते कमिशन मिळायला बरेच क्लॊज असतील (हो ना कोणी एलाआयसी उगाच चवताळून माझ्या अंगावर यायचा!)
पण "मॉरल ऑफ द स्टोरी" इतकेच आहे की इन्शुरन्स वा इन्व्हेस्टमेंट कोणत्याच निकषावर या पॉलिसी बसत नाहीत.

युलिप (परतीची हमी देणा-या व तुमचे पैसे शेअर किंवा तत्सम मार्केट मध्ये गुंतवणा-या) पॉलिसी:
प्रथम दर्शनी या पॉलिसी अत्यंत आकर्षक वाटतात, यात तुमची जोखीम रक्कम किंवा तुम्ही भरलेला जो प्रिमियम आहे तो गुंतवल्यामुळे जी फंड व्हॅल्यू आहे त्यातील जे जास्त असेल ते कुटुंबियांना तुमच्या जोखीम काळात मृत्य झाल्यास मिळते.

जोखीम काळात जर तुमचा मृत्यू झाला नाही आणि पॉलिसी घेऊन एक ठराविक लॉकिंग पिरियड (बहुतांश वेळी ३ ते ५ वर्षे) होऊन गेला असेल तर तुम्ही पॉलिसी बंद करून फंड व्हॅल्यू इतके पैसे परत मिळवू शकता.

जर मार्कॆट अत्यंत चालले असेल शिवाय तुम्ही वेळेत फंड स्विचिंग केले असेल तर मिळणारे परतावे अत्यंत आकर्षक असू शकतात. थोडक्यात इन्श्युरन्स घेता घेता शेअर मार्कॆट मध्ये पैसे गुंतवण्याची आणि त्यातून नफा मिळवण्याची खाजसुद्धा ही पॉलिसी भागवते.

नपेक्षा ह्या पॉलिसी विकणारे एजंट वेळ पडल्यास तुम्ही ही पॉलिसी ३ वर्षांनी बंद करू शकाल शिवाय नफा होईल, ८० सी ची सूट मिळेल ती वेगळीच अशी भलावण करून तुमच्या गळी या पॉलिसी मारतात.मीसुद्धा अशा पॉलिसी घेतल्या होत्या आणि त्यातल्या बहुतांश वेळी पॉलिसी मध्ये चांगला परतावापण मिळवला होता.

पण थोडा वेळ शांत बसून जर हे सगळे कसे चालते याचा विचार केला तर तुम्ही कसे व्यवस्थित उल्लू बनला आहात हे लक्षात येते. जर ३ वर्षांनी बंदच करायची तर मग मी २० वर्षांच्या हिषोबाने मॉटॆलिटी चार्जेस तरी का भरावेत?

जर लक्षपुर्वक युनिट स्टेटमेंट पाहिले तर तुम्ही भरलेल्या प्रिमियम पैकी बराच भाग हा ऍडमिन चार्जेस, मॉटॆलिटी चार्जेस यामध्ये गेलेला असतो. उरलेला पैसा मार्कॆट मध्ये गुंतवला जातो. आणि हे चार्जेस ज्या पॉलिसी पायी मी देते तिचा तर मी काळपण पूर्ण करत नाही. मग त्यापेक्षा सरळ म्युच्युअल फंडात पैसे घातले तर तुमचे जास्त पैसे मार्केट मध्ये गुंतवले जातील आणि पर्यायाने गुंतवणुकीवर मिळणारा परतावा पण कितीतरी जास्त असेल.

एकूणच आरोग्य वा जीवन विम्याच्या कव्हरमध्ये गुंडाळलेल्या पॉलिसी कंपन्यांच्या जास्त फायद्याच्या असतात त्यामुळे उगाच कारण नसताना दोन उद्दिष्ट्ये एकत्र करून तुमच्या फायद्याचा भाग कंपन्यांच्या ताटात जाऊ देय़ नका.
इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स वेगळे ठेवा आणि दोन्ही मधल्या सर्वोत्तम पर्यांयांची निवड करा. दोन्ही एकत्र करायला गेलात तर दोन्ही मधले बेस्ट तुम्ही मिस कराल.

टर्म इन्श्युरन्स (परतावा नसलेल्या) पॉलिसी:
टर्म इन्शुरन्स चा अर्थ असा की जेवढ्या काळाची जोखीम कंपनी पत्कारते आहे त्यात जर तुम्हाला काही झाले तरच कुटुंबियांना इन्शुरन्सचे पैसे मिळतील, पण जर पॉलिसी जोखीम काळात तुम्ही टपकला नाहीत तर तुम्हाला शेवटी षश्प मिळत नाही.
पण चांगला भाग हा की परतावा द्यायचा नसल्याने याचा प्रिमियम अत्यंत कमी असतो त्यामुळे मोठ्या रकमेचा विमा सहजत: घेता येतो, याचाच अर्थ इन्श्युरन्स कव्हर ला अत्यंत माफक पैसे भरून वरचे जे पैसे एरवी तुम्ही एन्डोव्हमेंट पवा युलिप प्रकारच्या पॉलिसी ला पैसे भरले ते आता तुम्ही तुमच्या निवडलेल्या एक किंवा किंवा अनेक गुंतवणूक पर्याय टाकू शकता.

इन्श्युरन्स रक्कम किती:
कमी प्रिमियम असल्याने भरपूर मोठ्या रकमेचा विमा काढता येत असल्याने सहसा खालील थंबरूल वापरावा.
१. तुमचे सध्याचे जे काही वार्षिक पॅकेज असेल x ३ अथवा ४ (कुटुंबियांना सावरून कमवायला लागता येईल ३-४ वर्षे अवधी)
अधिक
२. तुमच्या सध्याची जी काय लोन्स असतील त्यांच्या मुद्दलांची बेरीज ( होम लोन अ इतर सर्व)

उदा. एखाद्याचे पॅकेज सध्या १० लाख असेल व २५ लाख गृहकर्ज असेल तर साधारण ५५-६५ लाख विमा घेणे श्रेयस्कर.

तशी तर ब-याच वेळेला कंपनी तुम्हाला तुमच्या नेट सॆलरीच्या २०० पट विमा घेण्याचा पर्याय देते (बहुदा - चूक भूल देणे घेणे) पण एक लक्षात ठेवा, जर काही झाले नाही तर शेवटी काही मिळणार नाहीये.
शिवाय सध्याच्या केस मध्ये माझ्या माहिती प्रमाणे १ कोटीच्या वरती विमा रक्कम असेल तर ती देण्याआधी एरवीच्या पॉलिसीच्या पेक्षा जास्त चौकशी करणे इत्यादींसाठी कंपनी मुदत नियमानुसार मुदत मागू शकते व पर्यायाने कुटुंबियांना पैसे मिळण्यास उशीर होतो.

तेव्हा उगाच हावरटपणा करून किंवा भारीच सुरक्षित वाटते म्हणून तुमच्या गरजेपेक्षा जास्त विमा घेऊ नका आणि जास्त प्रिमियम भरू नका.

काहि वेळा गृहकर्ज घेतानाच त्या लोनचा वेगळा विमा घेण्याचा पर्याय असतो पण माझ्या मते तो पर्याय तितकासा चांगला नाही.
उदा मी २५ लाखाचे २० वर्षाच्या मुदतीचे कर्ज घेतले व त्याच्या विम्यापोटी मी २० वर्षे ३००० रुपये दरवर्षी प्रिमियम भरणार आहे. (टर्म इन्श्युरन्स पण साधारण याच किमतीत मिळतो)
पण दहा वर्षांनी त्या २५ लाखापैकी फक्त १२ लाखच मुद्दल शिल्लक आहे तरी मी ३००० च भरतेय (जो की २५ लाखाचा प्रिमियम आहे). अर्थात उद्या मला काही झाले तर १२ लाख कर्ज माफ होऊन कुटुंबियांना घर मिळेल.
हेच जर मी टर्म इन्श्युरन्स घेतला असता तर पुर्ण २५ लाख इन्शुरन्स रक्कम मिळून ते त्यापैकी १२ कर्जाला भरून १३ लाख इतर गोष्टींकरता वापरू शकले असते.

त्यामुळे परत हेच सांगेन - दोन उद्दिष्ट्ये एकत्र करू नका.

इन्श्युरन्स केव्हा:
जसे आरोग्य विम्याला सांगितले तसेच म्हणेन, तुमच्या वर जितकी जास्त जबाबदारी तितका जास्त विमा. त्यामुळे जेव्हा जबाब्दारी येईल तेव्हाच विमा काढा, साधारण २६-२७ नंतर!
उगाच तुम्ही कमवायला लागल्या लागल्या तुमच्या वर जास्त जबाब्दारी नसताना या गोष्टीवर जास्त पैसे घालू नका.

कोणत्ती कंपनी:
टर्म इन्श्युरन्स घेताना पण साहजिक मी सर्कारी तर्कारी अर्थात एलाआयसी चा पर्याय पहिल्यांदा चेक केला पण इतका विमा देऊन ते तुमच्यावर उपकार करतायेत असा त्यांचा स्टॅंड असतो शिवाय एलाआयसी टर्म इन्श्युरन्स मध्ये विशेष कमिशन देत नसल्याने ( अगदी १-१.५ Wacko एजंट ला पण ती विकण्यात विशेष रस नसतो. आणि त्यात पण एलाआयसी च्या टर्म इन्श्युरन्स चे प्रिमियम खूपच जास्त होते खाजगी कंपन्यांच्या सुमारे तिप्पट त्यामुळे मी कंटाळून तो नाद सोडला.

पॉलिसीबझार डॉट कॉम या साइट वर अनेक खाजगी कंपन्याच्या इन्शुरन्सचे पर्याय दिले आहेत, त्यापैकी तुमच्या गरजां मध्ये बसणारी कंपनी निवडा. शिवाय त्यांचे गेल्या काही वर्षातील सेटलमेंट रेशो बघायला विसरू नका (ऒनलाईन उपलब्ध असतो), कस्टमर केअर अर्थात तुम्च्या पश्चात ज्या लोकांशी कुटुंबियांना डिल करायचे आहे त्यांच्या बद्दल काय फिडबॆक आहे ते तपासा

मी अविवा लाइफ निवडले पण तसे बरेच पर्याय आहेत ज्यांचे सेटल्मेंट रेशो ९२-९४% वगैरे होते, खुद्द एलाआयसी चा सेटलमेंट रेशो ९०-९२% असाच होता. उलट मागच्या वर्षी उत्तराखंड मध्ये जे झाले त्यानंतर पहिला क्लेम सेटल करणारी कंपनी टाटा एआयजी होती (१ महिना) तर सर्वात उशीरा क्लेम सेटल करणारी कंपनी एलाआयसी होती (६ महिने).

असो हाही भाग मोठा झाला तेव्हा निवॄत्तीनंतरची बेगमी पुढील भागात!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

छान झालाय हा भागदेखील.
आजकाल ऑनलाइन विमा घेता येतो. त्यात एजंटचे कमिशन नसल्याने निम्माच प्रिमिअम भरावा लागतो असे ऐकले आहे. त्याबद्दल अधीक माहिती लेखातच अॅडवता येईल का?
तसेच पूर्वी घेतलेले आणि आता अयोग्य वाटणारे जीवनविमा क्लोज कसे करायचे याबद्दलची माहितीदेखील द्यावी.

तशी तर ब-याच वेळेला कंपनी तुम्हाला तुमच्या नेट सॆलरीच्या २०० पट विमा घेण्याचा पर्याय देते (बहुदा - चूक भूल देणे घेणे) >> महिन्याच्या पगाराच्या २००पट ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महिन्याच्या पगाराच्या २००पट ना?

होय.

पॉलिसीबझार वर सगळ्या ऑनलाइन पॉलिसीच आहेत. मी ऑफलाईन विशेष चौकशी केली नाही त्यामुळे तिकडचे रेट माहित नाहीत.

ऑनलाईन विमा ५०,००,००० साठी ४५००-५००० वर्षाला आहे साधारण ३० च्या आसपास वय असलेल्या व्यक्तीसाठी!

पुर्वी घेतलेल्या पॉलिसी:

१. जर एन्डोवमेंट प्रकारच्या असतील तर पैसे भरणे चालू ठेवावे पण त्याकडे इन्श्युरन्स म्हणून न पाहता विशेष लाभ नसलेली इन्व्हेस्टमेंट म्हणून पहा.

२. युलिप असेल तर - पैसे भरणे चालू ठेवा, वरती म्हटले तसेच त्याकडे इन्श्युरन्स म्हणून न पाहता इन्व्हेस्टमेंट म्हणून पहा, फंड स्विचिंग वगैरे पर्यायांनी नफा वाढतो का ते बघा. अगदीच नसेल तर लॉकिंग पिरियड संपल्यावर बंद करून पैसे काढून घ्या.

३. टर्म इन्शुरन्स असेल तर - ऑनलाईन चौकशी करा, त्यात सध्या भरताय त्या पेक्षा खूप कमी प्रिमियम ला जर नवी पॉलिसी मिळत असेल तर नवी पॉलिसी घ्या, जुन्या पॉलिसीला पैसे भरणे बंद करा. ती आपोआप लॅप्स होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

वाचत आहे, हा भाग पण आधीप्रमाणेच माहीतीपूर्ण. आणि मोठा झाला तर होउ देत. इतकं सिस्ट्मॅटीक वाचायला मिळणं अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात!
क्या बात!!
क्या बात!!!

मस्त लेख. सर्वच मु्द्द्यांशी सहमत. मीही एक क्याशब्याक पॉलिसी दहा वर्षांपूर्वी घेऊन ठेवलीय. दर चार वर्षांनी थोडे थोडे पैशे मिळतात. घोडचूक केलीय खरी. पण पुन्हा ती चूक केलेली नाही हे सांगण्यात आनंद वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गम्मत सांगतो :
डॉक्टर होऊन लेक्चरर म्हणून नोकरीला लागलो, तेव्हा पहिला पगार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता म्हणून वट्ट रु. ४८०० महिना होता. एका गोडबोल्या काकूंनी त्यावेळी ५० हज्जार रुपयांची पॉलिसी गळ्यात मारली होती. तिचा प्रिमियम वर्षाला ४२००. वीस वर्षांनी जेव्हा पैसे परत मिळाले (कैतरी १.१० लाख) तेव्हा हसू आले स्वतःच्या मूर्खपणाचे. कारण त्या लाखाची किम्मत, तुलनेने २० वर्षांनी १०-२० हजारावर आली होती, अन मी भरले ते पैसे जास्त होते.

एलायसीच्या नादी लागायचे नाही ही माझी जुनी कन्सेप्ट या लेखाद्वारे पुन्हा सिद्ध झाली. ४०% एजंट कमिशन असते, हे भारी काम. जवळचे मित्र एजंट असलेत तरी हे खरे सांगत नाहीत, उलट आपण मैत्रीखातर त्यांच्याकडून विमा घेतो, ही दुसरी बाब.
असो.

युलिपबद्दल माझा अनुभव छान. एक हेल्थ रायडर नामक प्रकार असतो, तो नक्की घ्या याच्यात. यात मीदेखिल भरपूर फायद्यात आहे. व्हाईट इन्कम Wink एचडीएफसी यंगस्टार रेकमेंडेड. (यंगस्टार नावाने असली तरी पस्तीशीच्या जस्ट आत वय असताना स्वतःसाठी घ्या. ते लोक लहान मुलांसाठी म्हणून मार्केटिंग करतात. ३५च्या आधी विदाऊट मेडिकल चेकअप होते अजूनही बहुतेक. मी घेतली होती त्या टर्म्स आता बदलल्या आहेत, तरीही छान पॉलिसी आहे.)

टर्म इन्श्युरन्स माझ्या सीएने रेकमेंड केला, अन तेवढाच ठेवलाय सध्या. त्या हप्त्याचा जो काय अ‍ॅडजस्टमेंट प्रकार - म्हणजे टॅक्समधून वजावट वगैरे असेल तो हिशोब करून, पैसे इन्व्हेस्टमेंटच्या प्रमाणात विमा, तोच परस्पर घेऊन टाकत असतो.

एक तिसरा प्रकार आमच्या डॉक्टर लोकांत आहे. याला फॅमिली बेनिफिट स्कीम असे नांव आहे. हे भारी काम आहे. पण ते इम्प्लिमेंट होण्यासाठी तुम्ही एकाद्या मोठ्या प्रोफेशनल बॉडीचे सदस्य असावे लागता. याचा मी मनोभावे मेंबर आहे. हा इन्शुरन्स पेक्षा एकमेकांना मदत करण्याचा प्रकार असल्याने खूऽप कमी खर्चात खूपच जास्त रिटर्न्स आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एखाद्याने टर्म इन्शुरन्स घेउन आत्महत्या केली तर पैशे भेटतात का हो? माझी जीवनसाथी नावाची १ लाखाची पॉलिसी आहे. म्हणजे काय ते माहित नाही. फक्त २५ वर्षे ५०३९/- चा हप्ता भरायचा.शेजार्‍याने मागे लागून घ्यायला लावली. तो साईड बिजनेस एलायसी एजंट होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

१लाखच्या पॉलिसीला ५हजार म्हंजे फारच जास्त वाटतायत.
पॉलिसी घेऊन एक वर्ष झाल्यानंतर आत्महत्या केल्यास पैशे मिळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९९६ साली काढली पॉलिसी. आन ते एका वर्षाणी आत्महत्या पॅकेज चे पैशे भेटत असतील हो ते बी शेतकरी आसन तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

नै हो फक्त शेतकरी नै बाकी सगळ्यांनापण मिळते. मी विचारलेला हा प्रश्न पॉलिसी घेण्यापुर्वी. त्यालादेखील दहा वर्ष झाली म्हणा. आता नवीन पॉलिसी घेणार्यांसाठी नियम बदलले असल्यास माहीत नाही. एक वर्षाच तीन वर्ष केलं असू शकेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की टर्म इन्श्युरन्स का? मला एन्डोवमेंट वाटतेय इतका हाय प्रिमियम पाहून!

आणि टर्म इन्शुरन्स च्या शेवटी काही मिळत नसल्याने जर तुम्हाला त्यातून पुरेसे कव्हर मिळत नाहीये किंवा महाग आहे असे वाटले तर बंद करून दुसरी घेऊ शकता. (अर्थात वय ४५-५० पेक्षा जास्त असेल तर नवीन पॉलिसी पण महाग मिळेल) हाही एक टर्म इन्शुरन्स चा फायदा असतो की तुमची गरज जर संपली असेल (सहसा मी रेकमंड करणार नाही) तर तुम्ही प्रिमियम भरणे बंद करून पॉलिसी बंद करू शकता.

आणि तसेही जीवनविम्यात लॉयल्टी बेनिफिट्स नसतात. त्यामुळे कधीही घेतली तरी जोखीम काळात मृत्यू झाल्यास पैसे मिळतात. अर्थात त्या व्यक्तीने आपण "लवकरच" मरणार(आत्महत्या किंवा अन्य प्रकारे) असे माहित असल्याने ही पॉलिसी घेतली नव्हती ना याची कसून चौकशी होते. तसे मोटिव्ह मिळाले तर क्लेम रिजेक्ट होतो. हा "लवकर" म्हणजे किती हे दर कंपनी गणिक बदलते, सहसा १ ते ३ वर्षे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

असो हाही भाग मोठा झाला तेव्हा निवॄत्तीनंतरची बेगमी पुढील भागात!

लेखमाला वाचतो आहे. हा भाग बिलकुल मोठा वगैरे झाला नाही. विषयाची व्याप्ती बघितली तर अगदी नेमक्या शब्दांत माहिती दिलेली आहे. लिहीत रहा.

आमच्याइथे अमेरिकेत मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून पैसे वेगळे काढून ठेवता येेतात. ते टॅक्स फ्री कॉंट्रिब्यूशन असतं. विशिष्ट काळानंतर मुलांच्या शिक्षणासाठी त्या फंडातले पैसे काढले तर ते टॅक्स फ्री वापरता येतात. अशी काही योजना भारतात असते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो मला लिहायला मोठा हो... मराठी टायपिंग खूप सोपे झालेय तरी मला विचार करून त्याप्रमाणे लिहायला, कंटेन्ट जास्त चांगल्या पद्धतीने ग्रुप करायला खूप वेळ लागतो.

मुलांच्या फी तुम्ही टॅक्स मध्ये डिडक्शन म्हणून क्लेम करू शकता ( बहुतेक ८० सी च्या १ लाखाच्या बाहेर) पण त्या साठी केलेली आगाऊ बचत करमुक्त करण्यासाठी काही असल्याचे ऐकिवात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मुलांच्या फीबद्दल साशंक आहे. हायर एजुकेशन लोन वरील व्याज करमुक्त असतं नक्की.
जरा शोधाशोध करावी लागेल असं दिस्तय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

डोनेशन/कॅपिटेशन फी वगळता ट्युशन फीवर ८०सीच्या अंतर्गत रिबेट मिळु शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चाइल्ड एज्युकेशन अलावन्स असा वेगळा ८० क खेरीज उपलब्ध असतो पण त्याची अमाउंत फार लहान असते आणि दोनच मुलांसाठी मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुलांच्या फी तुम्ही टॅक्स मध्ये डिडक्शन म्हणून क्लेम करू शकता

तेवढंच नाही. मी जे म्हणतो आहे त्यात अनेक इतर खर्चही समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, पुस्तकांचा खर्च, स्टेशनरी, कॉंप्युटर, आणि बहुधा होस्टेल फी वगैरे... असा फंड मूल लहान असल्यापासून सुरू करता येतो, आणि दरवर्षी त्यात थोडे थोडे पैसे टाकता येतात. अर्थात या ५२९ प्लॅनचे वेगवेगळे प्रकार आहेत. बहुतेकांत तुमचे फेडरल टॅक्सेस वाचत नाहीत पण स्टेट टॅक्सेस वाचतात, आणि त्यात केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून जो फायदा होतो त्यावर जर तुम्ही शिक्षणासाठी खर्च केला असेल तर टॅक्स लागू होत नाही. http://en.wikipedia.org/wiki/529_plan

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सवितातै,
आपला उपक्रम अत्यंत आवडला आहे. आपण मागे "अर्थ" हे माझे क्षेत्र नाही असे लिहिल्याचे आठवते. तरीही आपण ज्या पद्धतशीरपणे विषय मांडताहात ते अतिशय स्तुत्य आहे. (अदिती, सोकाजी, मे बी अजून कोणी अपवाद) वजा जाता अगदी आपल्या स्वतःच्या क्षेत्रातले देखिल तांत्रिक लेखन करण्याबद्दल मराठी आंतरजालावर अनास्था असताना आपण अशी लेखमाला लिहिताय ही फार आनंदाची गोष्ट आहे.

१. भारतात व्यक्तिगत रिस्क न पाहता सेम प्रिमियम घेतात. दॅट सक्स.
२.

नपेक्षा ह्या पॉलिसी विकणारे एजंट वेळ पडल्यास तुम्ही ही पॉलिसी ३ वर्षांनी बंद करू शकाल शिवाय नफा होईल, ८० सी ची सूट मिळेल ती वेगळीच अशी भलावण करून तुमच्या गळी या पॉलिसी मारतात.मीसुद्धा अशा पॉलिसी घेतल्या होत्या.

नीडस रीचेक. बहुतेक ८० सी च्या १ लाखात पीएफ चे पैसे असतात. इतर फालतू गुंतवणूकांत पडायचे नसेल तर(१ लाख -पीएफ) इतक्या रकमेच्या युलिप घ्याव्यात.
३.

पण थोडा वेळ शांत बसून जर हे सगळे कसे चालते याचा विचार केला तर तुम्ही कसे व्यवस्थित उल्लू बनला आहात हे लक्षात येते. जर ३ वर्षांनी बंदच करायची तर मग मी २० वर्षांच्या हिषोबाने मॉटॆलिटी चार्जेस तरी का भरावेत?

उल्लो जरा हार्श शब्द झाला. हे २० वा ३ वर्षे वयाच्या साठाच्या आत पूर्न होणार असतील, तर मॉर्टॅलिटी चार्जेस फार भिन्न नसतात.

४.

काहि वेळा गृहकर्ज घेतानाच त्या लोनचा वेगळा विमा घेण्याचा पर्याय असतो पण माझ्या मते तो पर्याय तितकासा चांगला नाही.
उदा मी २५ लाखाचे २० वर्षाच्या मुदतीचे कर्ज घेतले व त्याच्या विम्यापोटी मी २० वर्षे ३००० रुपये दरवर्षी प्रिमियम भरणार आहे. (टर्म इन्श्युरन्स पण साधारण याच किमतीत मिळतो)
पण दहा वर्षांनी त्या २५ लाखापैकी फक्त १२ लाखच मुद्दल शिल्लक आहे तरी मी ३००० च भरतेय (जो की २५ लाखाचा प्रिमियम आहे). अर्थात उद्या मला काही झाले तर १२ लाख कर्ज माफ होऊन कुटुंबियांना घर मिळेल.

गृहविमाचे कवर उरलेल्या मुदलाप्रमाणे कमी कमी होत जात नाही. जेव्हा व्हायचे तेव्हा त्याचा प्रिमियम त्या प्रमाणात असे.

५.

इन्श्युरन्स रक्कम किती:

व्यक्तिगत मत - वर्तमानातील जीवनमानात जराही काँप्रो न करणे. मरण्यानंतर जगण्यासाठी जगताना मरू नये.

६. इन्श्युरन्स केव्हा:
मूल झाल्यापासून २१-२२ वर्षासाठी.

विम्याचे तत्त्वज्ञान सध्याला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. भारतात व्यक्तिगत रिस्क न पाहता सेम प्रिमियम घेतात.

हे युलीप/ एंडॉवमेंट साठी खरं आहे. टर्मसाठी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद!

भारतात व्यक्तिगत रिस्क न पाहता सेम प्रिमियम घेतात. दॅट सक्स.

->

चूक. ऑनलाईन मध्ये पूर्ण हेल्थ चेकअप होतो. नॉन स्मोकिंग, हेल्दी व्यक्तींना प्रिमियम कमी बसतो.(टिवी किंवा इतर ठिकांइ तुम्ही जो लो प्रिमियम म्हणून पाहता तो हाच असतो.) स्मोकिंग ला प्रिमियम वाढतो. हेल्थ चेक-अप मध्ये जर काही आले तर ते एकतर प्रिमियम वाढवू शकतात किंवा पॉलिसी रिजेक्ट करतात.

बहुतेक ८० सी च्या १ लाखात पीएफ चे पैसे असतात. इतर फालतू गुंतवणूकांत पडायचे नसेल तर(१ लाख -पीएफ) इतक्या रकमेच्या युलिप घ्याव्यात.

हे जेव्हा बाकी काही नसते तेव्हा खरे आहे पण जसजश्या जबाब्दा-या वाढतात तसे बदलते. होम लोन प्रिन्सिपल अ अनेक असंख्य गोष्टी ८० सी या एकाच अंब्रेला खाली आहेत. तेव्हा जसजसे तिकडचे वाढत जाते तसे फक्त टेक्स सेव्हिंगसाठी युलिप तितकेसे चांगले राहात नाही

आणि तसे ही माझे स्वच्छ मत आहे की - फक्त टॅक्स वाचवायला दरवर्षी गुंतवणूक करण्याची कोणतेही कमिटमेंट देऊ नका जेव्हा अजून २-३ वर्षांनी तुमचे आयुष्य कसे बदलणार आहे (लग्न, घर, मुले) हे माहित नाही. दिर्घकालीन फायदे लक्षात घेऊन तुमच्या मर्यादेप्रमाणे गुंतवणूक करा, त्यातून टॅक्स वाचला तर उत्तमच आणि तो वाचतोच शेवटी.

पण कसेही करून टॅक्स कमी करायचा त्यासाठी जे लागेल ते करून मोठी गुंतवणूक करून ठेवतो हा दृष्टीकोन नको. टॅक्स वाचवण्यासाठी लोन काढून घर घेणे (जिथे राहणार नाही) हा हल्ली च्या काळातला असाच एक मुर्खपणा आहे, असो त्याबद्दल नंतरच्या भागात सविस्तर लिहेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

उत्तम माहिती.
थोडक्यात पाचेक वर्षापूर्वी एकदा गाढवपणा केला आहे असे दिसत्येय.

पुन्हा क्याल्क्युलेशन करायला हवं.

आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!