नियती

गर्दीत लहान मुलासारखं

शरिर हरवुन बसतं कधीतरी

सैरभैर, प्रश्नांकित!

आणि मनाला आपण हरवु देतो

कधीकधी वेगळं जगता यावं

म्हणुनसुद्धा....

पण नियती कधीच

हरवुन बसत नाही स्वतःला

आंधळ्या डोळ्यांनी

नी बांधलेल्या हाताने

धापा टाकत मूकपणे

चालत रहाते.

तिच्यात सापळ्याआड धडधडणारं

असं काहीच नसतं

कुण्याच्याही स्पर्शाने

उभे रहाणारे किंवा सुटणारे

प्रश्न नसतात

भंगणारी आकांक्षा,

फाटलेलं ह्र्दय

शोकाचे सुर

पश्चातापाचे निश्वास

जखमा आणि सारं काही

शवपेटीत बंद.

आणि चालताना सोबत असते फक्त

एक न संपणारी शवयात्रा

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

तिच्यात सापळ्याआड धडधडणारं असं काहीच नसतं.

हे विशेष. विस्तृत प्रतिसाद सावकाश देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता वाचून सुन्न झाले होते म्हणून प्रतिसाद दिला नाही. आता देते. आपल्या सर्वच कविता इन्टेन्स (प्रखर) असतात. हृदयास स्पर्श करून जातात. मन विषण्ण करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूपच निराशावाद आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेलकम साठी धन्यवाद. प्रस्तुत कवितेत, मी निराशावाद मांडलेला नाही. उलट 'अहं ब्रम्हास्मि' ठळक करायचा प्रयत्न केलाय. देव, नियती सर्वश्रेष्ठ मानणारे लोक नियतीची ही बाजु पहात नाहीत. नियती ही मुळात पोकळ आहे आणि अद्वैत ही तिची अंधारपोकळी. याउलट प्रत्येक माणुस त्याच्यापरीने स्वतःसाठी समग्र आहे. दुखःवैभवाचे वरदान नियतीला नाही. जगण्याचे वेगवेगळे पर्याय आणि भावनांचे वेगवेगळे पदर नियतीकडे नाहीत. पण मानवाकडे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

भटकलेले तारू परत या किनार्‍याला लागलेले पाहून आनंद झाला.

कवीता निराशाजनक खरीच, पण आवडली. खरी वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है... जबरदस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

अश्या कवितांना 'आवडली' कसं म्हणावां.. पण आवडलीच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!