साहित्य देवता

आज एक गंमतीशीर दृष्य मनःचक्षूंसमोर साकार झाले.

कल्पना करा हं गणपती अन सरस्वतीचा दरबार भरला आहे. एका कोपर्‍यात ऐसीवरचे मान्यवर व नवलेखकु, कवि आदि मंडळी गरीबपणे उभी आहेत.
या दरबारात गणपती व सरस्वतीच्या दास-दासी आल्या आहेत. ते कोण तर-गंभीर अशी प्रज्ञा, तिची दुसरी जरा कमी गंभीर मैत्रिण मेधा, अतिशय अवखळ कल्पनाशक्ती अन खट्याळ विनोदबुद्धी ही उभ्या आहेत. वाणी बरीच बिझी(व्यग्र)अन थकलेली दिसतेय. कवित्व शक्ती लक्षपूर्वक ऐकत, नम्रपणे हात बांधून उभी आहे.
विवेक, तारतम्य अन प्रगल्भता, तर्क हे दासही दुसर्‍या भागात हात जोडून उभे आहेत.
या सर्वांना एकदम हाय-कमांडहून आदेश आहे की ऐसीवरच्या लेखकु, कविंची सर्वतोपरी मदत करायची. त्यांना काय हवं नको ते पहायचं, त्यांनी हाक मारली की लगेच हजर व्हायचं.

पण होतं काय या लहान देवता वरुन आलेला आदेश पाळतात तर खर्‍या पण...... सोईबरहुकूम मज्जा मजाही करतात, आळसही करतात, अन खोड्याही काढतात! Smile

आता हेच पहा ना बॅटॅनी हाक मारली वाणीला, तर प्रज्ञा अन माहीती धाऊन आल्या. तबकात बरेच विचार, आयडीया आणून बॅटॅला पेश केले. बॅटॅनी काही घेतले, काही परत ठेवले.

उसंत सखूंनी अन अस्वलाने कल्पनाशक्तीला हाक मारली तो काय मज्जा दोघीही कल्पनाशक्ती न विनोदबुद्धी एकदम लगालगा धाऊन आल्या. कल्पनाशक्तीने पोतडीतून मस्त मस्त विचार काढून दिले न दिले तोच विनोदबुद्धीने ते घासून पुसून लख्ख केलेही Smile

आता बघा हां अजो, गब्बर, चिंंज, मन, अदिती, मेघना अन ऋ यांचेकडे काय चाललय? अरे हे काय तैलबुद्धी अगदी दिमतीला हजर दिसतेय. वा वा! जय हो!! Wink

ग्रेट थिंकर, थत्ते, अजो यांनी बोलावताच अन चौकसबुद्धी हातातील काम टाकून येतेय, हवं नको पहातेय, विवेकजींनी बोलावताच कल्पनाशक्ती तिची रुपकांची पर्स घेऊनच हजर होतेय. क्या बात है!!

घाटपांडेंनी बोलावलं सुद्धा नाही तरी चालतं त्यांनी मागायच्या आतच, तर्क अन चिकीत्साबुद्धी दोघे हसत हसत त्यांना विचार देऊन टाकतात.

पण दुसरीकडे विपरीत चित्र आहे तेही बघून घ्यावे. Wink

मी, काही नवीन कवितापाडक, नवलेखकुं चा घोळका मघापासून कोकलतोय पण कोणीच येत नाहीये Biggrin
का तर म्हणे, नेमके तेव्हाच कल्पनाशक्तीला केस विंचरायचे आहेत अन मेधा फुलांची वेणी बनवत बसलीये. तारतम्य अन विवेकाला पतंग उडवण्यातून फुरसत मिळत नाहीये. छान!! Wink पण आमचा घसा कोरडा पडला आहे, त्याचे काय Sad तर्क अन चिकीत्साबुद्धी तर कायमचे रुसलेत असे वाटावे इतके गाल फुगवून बसलेत.

अन हे काय, हे दोघे दोंदील-उदर अन तुंदीलतनू - मंदत्व अन जडत्व मात्र ख्या: ख्या: हसत मजा बघताहेत Smile हाकला रे त्यांना. चटोर अन आळशी मेले, खु-शा-ल-चें-डू ;), अंधश्रद्धाळूपणा उगाचच लोचटपणा करतो आहे.

आता राघा नवलेखकुंच्या मदतीला धावून येतात. राघा म्हणतात - मुलांनो त्या जडत्व अन मंदत्वांचं खाणं आधी तोडा!! रुथलेसली तोडा. माजलेत साले. तेच उत्तम खाणे तैलबुद्धीला द्या, उंची कपडे कल्पनाशक्तीस द्या, विनोदबुद्धी खट्याळ आहे तिला खूष ठेवा. अन मुख्य म्हणजे पुस्तके वाचा, विदा जमवा, विचार-विचार करायला शिका.

एवढं करा न मग बघा या देवता कशा हाकेला धावून येतील Smile

आम्ही सगळे माना डोलावतो अन ऐसीवर येऊन लॉगिन करतो.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, आम्ही पण आहोत म्हटलं ऐशीवर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेजाजी, ज्यांचे नीरीक्षण केले आहे त्यांच्याबद्दल मांडले आहे. सर्व विचार वैयक्तिक नीरीक्षणातून आलेले आहेत. त्यामुळे जर कोणास वगळले असेल तर ती त्यांच्या गुणावशेषांची कमी नसून माझे नीरीक्षणातील लिमिटेशन्स आहेत असे प्रांजळपणे मांडू इच्छिते.

कोणालाही हायलाईट करायचा हेतू कधीच नव्हता/नसतो. मलाही पूर्वी वाटायचे मला का वगळले, मी ही आहे इथे. पण मग मग लक्षात आलं की त्यावेळी मनःपटलावर ज्यांचा प्रभाव असतो ती ती पात्रे आपोआप साकार होतात. हे लेखक मुद्दाम करत नाही.

तेव्हा समजून घावे ही विनंती. धिस इज जस्ट अ फीबल आऊटलेट ऑफ क्रिएटीव्हीटी. अशा प्रकारच्या लेखनात बर्‍याच कमतरता असतात. पण एक १००% की कोणाला वगळण्याचा अंतस्थ हेतू नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या दरबारात कोठे तरी कोपर्‍या-कापर्‍यात उभे करुन टाका की हो अम्हाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेजाजी त्याकरता मला आपले प्रतिसाद अन लेख वाचून, अभ्यास करावा लागेल Smile तेव्हा मला आपल्यावर कोणत्या गुणावशेषाचा पगडा आहे ते कळेल. पुढच्या वेळेला नक्की Smile
आपला प्रांजळपणा आवडला.
मला मान्य आहे की अशा प्रकारच्या लेखनामुळे काल्पनिक का होईना पण "ग्रुपमधून एक्स्क्लुड" केल्याची भावना येऊ शकते.

माझ्याकडून मी अशा प्रकारचे लेखन थांबवते आहे.

पण बाँडींग हे दोन्ही बाजूंनीच होते. जितके तुम्ही ग्रुपवर व्होकल रहाल तितके लोकांचे लक्ष जाईल, त्यांना तुमचे व्यक्तीमत्व कळून येईल. तेव्हा एवढच म्हणेन येत रहा, लिहीत रहा. मेक रिपल्स, मेक वेव्हज Smile
________
खरं सांगायचं तर मी इतकी इमोशनल आहे की पूर्वी असे लेख आले रे आले की मला माझं नाव नसल्याचा राग येऊन मी लगेच ५/४ वगैरे रँकिंगच्या लेखांना १ द्यायचे न खाली ओढायचे Smile
पण जेव्हा मी असा पहीला लेख लिहीला तेव्हा क्रिएटीव्हीटीचे जे समाधान मिळाले त्यातून ती र्अ‍ॅटिट्युड बदलली. असो.
________
अजून एक म्हणेन तुम्ही असा लेख लिहून पहावा. मग बघा आपल्या लेखात, कोणत्या आय डींचा ठळकपणे प्रेझेन्स जाणवतो. ते तेच असतील - (१) एक तर जे रिपल्स उठवतात किंवा (२) ज्यांच्याशी तुम्ही खवतून /व्यनितून बोलता अन जे तुम्हाला जवळचे आहेत.
अर्थात सगळे रिपल्स उठवणारे किंवा तुम्हाला जवळचे लेखात अंतर्भूत होतीलच असे नाही. पण एक नक्की जे अंतर्भूत होतील ते वरील २ प्रकारात मोडतीलच.

असो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तय.
तुम्ही मनापासून हाक मारलीय आणि देवता धावून आल्यायत. तुमच्या कल्पनाशक्तीचा केशरचना व्यवस्थीत झालीय. आता दरबारात मानाची जागा मिळणार तुम्हाला. (आम्हाला दरबाराबाहेरच्या भालदार, चोपदार किंवा बघ्यांमध्ये तरी उभं करा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या कल्पनाशक्तीचा केशरचना व्यवस्थीत झालीय. आता दरबारात मानाची जागा मिळणार तुम्हाला.

क्या बात है!!!
भारी लिहीलयत हे वाक्य Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय भारी! लय भारी! आवडलं Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यु बर्का Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कौलपाडक- कौलपडीक- कौलपीडक समाजातर्फे कौलशक्तीचा समावेश देवतांमध्ये न केल्याबद्दल ह्या वर्षी आम्ही गणपतीला अनुराधा पौडवालच्या आरत्या ऐकवणार आहोत.
बाकी लेखात आपलं नाव बघून बरं वाटलं, खोटं का बोला? Biggrin
शाळेत कसे नेहमी चमकणारे विद्यार्थीच बोर्डावर दिसत. कधी काळी 'वक्रुत्व' स्पर्धेत वगैरे ३रा नंबर आला तरच माझं नाव तिथे दिसे. ते दिवस आठवले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी लेखात आपलं नाव बघून बरं वाटलं, खोटं का बोला? (दात काढत)

Smile धन्यु धन्यु!!!

ह्या वर्षी आम्ही गणपतीला अनुराधा पौडवालच्या आरत्या ऐकवणार आहोत.

ROFL आई ग!!!!

कधी काळी 'वक्रुत्व' स्पर्धेत वगैरे ३रा नंबर आला तरच माझं नाव तिथे दिसे.

वक्रुत्व ROFL फुटले!!!
___________
वक्रुत्व वरुन आठवलं - लाज वाटते पण सांगते ..... कारण लाजेमुळे आम्ही कधी कोणती गोष्ट केली नाही असे झाले नाही मग आत्ता तरी का व्हावे? Wink
नॉट टू मेनी इयर्स बॅक, एक बोलणं चाललं होत की व्होकॅब्युलरी वाढवा. वगैरे वगैरे.
मी बोलले - येस येस आय वाँट टू इन्क्रीझ माय वोकॅब्युलरी Sad
ROFL मग घरी गेल्यावर विचार करताना वाटलं च्यायला इन्क्रीझ कसली इम्प्रूव्ह करतात ना व्होकॅब्युलरी Sad
लेकीन तीर निशानेसे निकल चुक्या था Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्होकॅब्युलरी वाढवणे वगैरे- अगदी! झेपलंच नाही कधी. मुद्दाम तशी पुस्तकंही आणली होती पण ते म्हणजे विटॅमिनच्या गोळ्या खाऊन सुदृढ होण्यासारखं झालं.
इन्क्रीझ तर काय मी पण म्ह्टलंय बरेचदा, तेव्ढंस चूक नाही वाटत!
अवांतर -
परवाच जॉनी गद्दार पाहीला, त्यात धर्मेंद्रचं इंग्रजी ऐकलं. देवा!
हिंदी - मै उसे नही छोडूंगा
धरम इंग्रजी किंवा धंग्रजी : I won't leave him.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा खरय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तो जोकच तसा होता. तुम्ही कथालेखकाला, दिग्दर्शकाला नि धर्मेंद्रला इंग्रजी येत नाही असे समजून हसून र्‍हायले तर काय मन्नार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साहेब,
१.आपण जॉनी गद्दार पाहीला आहे का? नसल्यास पहावा. त्यातलं धर्मेंद्रचं शेषाद्री हे क्यारेक्टर कमालीचं जमलं आहे.
२. आपण धर्मेंद्रला इतर ठिकाणी इंग्रजी बोलताना ऐकलं आहे का? नसल्यास the burning train किंवा त्याचे ९०च्या काळातले सिनेमे पहावेत. मग श्रीराम राघवनने त्याला असं इंग्रजी बोलायला का लावलं असेल हे कळणं फार अवघड नाही!
३. आपण कथालेखक/दिग्दर्शकाला मधे का बरं आणलंत?
४. तुम्ही माझ्या प्रतिक्रियेतल्या अवांतर मुद्द्यालाच पकडून प्रतिप्रश्न का विचारलेत?
५. हे आपलं उगाच, ४ ऐवजी ५ हा आकडा बरा दिसतो म्हणून, बाकी काही दम नाहीये ह्या मुद्द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आपलं उगाच, ४ ऐवजी ५ हा आकडा बरा दिसतो म्हणून, बाकी काही दम नाहीये ह्या मुद्द्यात.

खी: खी: मस्त!!!

या वरुन सन्जोपरावांच्या एका मस्त मस्त बहारदार लेखातील हा उतारा आठवला-

स्त्रोत - http://sanjopraav.wordpress.com/2007/02/23/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E...

“सह्याद्रीच्या दगडादगडावर इथल्या स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडले आहे,इथल्या मातीच्या कणाकणावर इथल्या क्रांतिकारकांचा घाम सांडला आहे, इथल्या फत्तराफत्तरावर इथल्या शहिदांचे…” इथे काहीतरी सांडवून सर्वसाक्षीला तो तिय्या जमवायचा होता. पण ते न जमल्याने तो उगीचच खाकरला “शहिदांचे अं…..नाव कोरलेले आहे. पण आज या शहिदांची याद कोणाला आहे? जो तो आपल्या ह्याच्यात आहे. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक तुम्हाला विनोदी श्रेणी देतात नि मला मात्र इग्नोर करतात, यातच कळावे दुनिया कशी दुष्ट दुष्ट आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकाच गोष्ट खटकली

"उंची कपडे कल्पनाशक्तीस द्या"

या एवजी 'उंची कपडे कल्पनाशक्तीस सुद्धा द्या' असा पण चाल्ल असतं ना Smile
'साधी राहाणी आणि ऊच्च विचारसणी' याहून पुढे जाऊन 'उच्च राहाणी आणि उच्च विचारसरणी' असेल तरी चालू शकेल ना Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोग साथ आते गये ... और कारवाँ बनता गया....

नेहमीप्रमाणे स्पाँटेनिटी ने भरून वाहणारे लिखाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात!!

कल्पनाशक्ती, विनोदबुद्धी सोबत लहानग्या लालित्याला घेऊन तुमच्या सेवेस हजर झालेले दिसताहेत. त्या लालित्याला जपा, वाढवा मग बघा तुमच्या लेखणीला कसले तेज येते ते!

छानच! खूप आवडली कल्पना नी विस्तार दोन्ही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आमचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. लिखाण अजून फुलवले असते तर अजून चांगले झाले असतेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिभेची काही कोडी साहित्यदेवता स्वप्नात येउन सोडवते असे ऐकून व वाचून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कल्पना ऑफिसमध्ये साहेबांना १५ दिवसांनी भेटली .
साहेब : कल्पना, कहां थी तुम ?
कल्पना : मै तो यही थी सर .............. Smile
साहेब : मुझे लगा तुम बदल गयी हो ....
कल्पना : बदल गयी हो ...........याने क्या सर ??
साहेब : कल्पना थी और अब वास्तविकता मे बदल गयी हो . ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0