मराठी विश्वकोष जालावर सादर

आत्ता म.टा. वर विश्वकोश जालावर सादर झाल्याची बातमी वाचत होतो. तिथूनच मराठी विश्वकोषाची साईट उघडली. पण मध्येच म.टा. वरची बातमी कुठे गेली कुछ पता नहीं. त्यामुळे विश्वकोषाच्या साईटवरुन अध्यक्षांचे मनोगत चोप्य-पस्ते केले आहेत.

मराठी विश्वकोष आता जालावरही उपलब्ध झाला आहे. सध्या एक खंड उपलब्ध दिसतो; लवकरच इतरही उपलब्ध होतील अशी सूचनाही आहे.
मराठी विश्वकोष जालावर उपलब्ध झाल्याने मराठीतील संदर्भ शोधण्याचे काम फारच सुलभ होईल. लवकरच पूर्ण खंड जालावर पडोत ही अपेक्षा.

||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||

घराघरात विश्वकोश'

(एक ऐतिहासिक दस्तऐवज)

प्रिय वाचकहो ! ,
'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच.

पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासानाच्या वतीने मराठी विश्वकोश) त्यांचा ६ सीडींचा ४५० ग्रॅम वजनाचा सीडी संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) अशा १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेले) २०,१८२ पाने समाविष्ट केली. जी संगणकावर कधीही बघता येतात. ह्यासाठी संगणक तज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.

घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत त्या स्वरुपात महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. तेही युनिकोडमध्ये, सीडॅकच्या सहकार्याने. विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो १ ते १६ खंडांचा ज्ञानाचा खजिना तयार केला तो आता ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तरी त्याचे महत्त्व कालातीत आहे आणि म्हणूनच इतिहासाच्या या सोनेरी खुणा आपण जतन करीत आहोत. भविष्यात पर्याप्त स्वरुपातील (अपडेटेड) विश्वकोशही याच माध्यमातून जगास स्वतंत्रपणे व मोफत अर्पिला जाईल. आज घराघरात इंटरनेट पोहोचले आहे. घराघरात संगणक आहेत. आपण त्यावर ज्ञानाचा खजिनाच उमलत्या पिढीस उपलब्ध करुन देत आहोत. त्यापैकी आजमितिस पहिला खंड युनिकोडमध्ये जसा आहे त्याच स्वरुपात तयार आहे. चित्रांसकट. जो शब्द हवा त्यावर क्‍लिक करा. सर्व माहिती उपलब्ध! तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार हे विश्वकोशाचे ब्रीद आहे. यानंतर प्रतिमास १ खंड असे १५ महिन्यात डिसेंबर, २०१२ पर्यंत संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून सीडॅकच्या सहकार्याने विश्वकोश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल. अर्थात् त्याने ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाहीच. पण केव्हाही, कुठेही हा ज्ञानमित्र उपलब्ध होतोय हीच आनंदाची बाब. माननीय डॉ. जयंत नारळीकर, विजया वाड, स्‍नेहलता देशमुख, अरुंधती खंडकर, रा.ग.जाधव, भालचंद्र नेमाडे यांनी या प्रकल्पास व्हिडिओ शुभेच्या दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दस्तावेज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच जगास मोफत अर्पण होत आहे. 'घराघरात विश्वकोश' ह्या आमच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in किंवा www.marathivishvakosh.in असा आहे.

आपली,
डॉ. विजया वाड,
अध्यक्ष विश्वकोश निर्मिती मंडळ

http://www.marathivishwakosh.in/ वरून साभार

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम बातमी. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली बातमी दिलीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या संस्थळावर शोध घेतला पण याबद्दल कुठे काही दिसले नाही.
जालीय प्रणाली सुरेख व सुलभ झालेली आहे. विश्व्कोषाच्या मानाने (मराठी विकीच्या तुलनेत) दिलेली माहीती थोडी त्रोटक वाटली, परंतु ४-२ शब्दांवरून सगळ्याच कोषाची अशी परिक्षा योग्य नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विश्वकोष पाच मिनिटं चाळला. बऱ्याच माहितीचं तज्ञांद्वारे संकलन केलेलं दिसतं आहे.

मला प्रचंड खटकलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक लेखाचा स्वयंपूर्ण आकारबंध. मी जे तीनचार लेख बघितले ते त्या त्या विषयावरचे चांगले निबंध होते. मात्र त्यातल्या एकाही संज्ञेविषयी विश्वकोषातले संदर्भ नव्हते. विकी माध्यमांचं, किंवा एकंदरीत आंतरजालाचं हे बलस्थान जराही वापरून न घेतल्याने जाड व महाग पुस्तकाऐवजी हलकी व स्वस्त (किंवा जालावर फुकट) इतपतच सुधारणा वाटते. ही कमी नाही, पण लेखात दुवे घालणं, जे तुम्हा आम्हासारख्यांना जमतं, ते सरकारी पातळीवर झालेल्या मोठ्या प्रकल्पात का होऊ नये कळत नाही. सुदैवाने ही सुधारणा करण्यासारखी आहे, व भविष्यात ती होऊ शकेल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी,
कदाचित विकी मुक्त ज्ञानकोश असल्याने त्याचे दुवे दिले नसतील..
मराठी विश्वकोशामधले संदर्भ संशोधनासाठी चालु शकतात... विकीचं तसं आहे का?
पण सुधारणेस वाव आहे हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वेगळं म्हणायचं होतं. एखाद्या लेखाच्या आत काही संज्ञा येऊ शकतात. त्या माहीत असतील त्यांना लेख वाचता येतो. ज्यांना त्या माहीत नसतील त्यांना त्यावर क्लिक करून त्याविषयीचा त्याच कोषातला दुसरा लेख वाचता येतो. मी जे तीनचार तांत्रिक लेख बघितले त्यात दिसलं की विश्वकोष ही सुविधा वापरत नाही. लेखाच्या शेवटी 'इतर वाचा- विषय १, विषय २' अशी संबंधित विषयांची यादी आहे. तिथेदेखील दुवे नाहीत. म्हणजे निव्वळ माध्यमांतर केलेलं आहे. नवीन माध्यमाची संपूर्ण शक्ती वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी छान मिळाली. आभारी आहे. मराठी अभिमान्याला आणखी काय हवं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>साईटवरुन अध्यक्षांचे मनोगत चोप्य-पस्ते केले आहेत. <<< या चोप्य्-पस्ते चा अर्थ मात्र विश्वकोशात असणार नाही, हो ना? [मग कस्ला डोम्बलाचा आलाय तो कोष? विश्वकोष म्हणे! Blum 3 ]
असो तुम्ही मजकुराची नक्कल करुन इथे चिकटवलीत, ती पावली. धन्यवाद. उपयोगी माहिती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0