ब्युटी अँड द बीस्ट

कालचा व्हॅलेन्टाइन डे , " ब्युटी अँड द बीस्ट" हा कार्टून सिनेमांमधील माझा सर्वात लाडका सिनेमा पाहून मी साजरा केला. लहानपणी बाबांबरोबर हा सिनेमा पाहील्याचे आठवते. तेव्हा खूप म्हणजे खूपच आवडला होता. स्नो व्हाईट , लेडी अँड द ट्रँप वगैरे सिनेमे तर या सिनेमापुढे कुछ भी नही असे तेव्हा वाटले होते. याचे मुख्य कारण स्नोव्हाईट इतकी गोरीपान, फुलासारखी छान आहे की तिच्याशी स्वतःला "आयडेंटीफाय" करताच येत नाही. याउलट ब्युटी अतिशय "प्लेन" आणि पुस्तकी कीडा आहे. लहानपणी मी सहज ब्युटीशी स्वतःला आयडेंटीफाय करू शकले असावे. ते असो. पुढे माझ्या मुलीबरोबर एक रिमेक पहाण्याचा योग आला होता पण त्याला ओरीजनल डिस्ने ची सर नखभर देखील नव्हती.

तर काय सांगत होते, काल मला डेस्परेटली हा सिनेमा पहायचा होता पण सार्‍याच मैत्रिणी "बिझी बिझी" मग काय एकटी उठले केली टॅक्सी आणि व्हॅलेंटाइन्स डे की शाम डिस्ने के नाम करून आले. पण खरच आता प्रौढ वयात या सिनेमाचा आनंद पुनश्च लुटताना ती संध्याकाळ अक्षरक्षः सत्कारणी लागली. मी हसले, रडले, घाबरले, रोमांचित झाले. किती नाना प्रकारच्या भावना त्या जादूमय चित्रांनी मनात उचळंबविल्या.

बेल ही काही पारंपारीक रीत्या सुंदर म्हणावी अशी तरुणी नाही. तसं पाहता गेलं तर पाश्चात्य जगात "फेमिनाइन" समजला जाणारा गुलाबी रंग एकदाही तिच्या अंगावरील वस्त्रप्रावरणात दिसत नाही. तिचे रंग आहेत निळा आणि पिवळा. ती खरे पाहता कल्पनेत रममाण होणारी, पुस्तकांच्या राज्यात स्वतःला हरवून बसणारी अशी "इंटुक" म्हणावी अशी मुलगी आहे. संपूर्ण सिनेमाचे कथानक तिच्या त्यागावर , तिच्या आंतरीक शक्तीवर उभे आहे. स्वतःच्या स्वातंत्र्याचे बलीदान करून तिने बीस्टच्या पडक्या राजवाड्यात जन्मभर रहाणे स्वीकारले आहे.

बीस्ट स्वतः तर अतिशय कुरुप, हिडीस आहे. तो रागीट आहे, शीघ्रकोपी आहे पण मनाने तितकाच दयाळू आहे. शापदग्ध राजपुत्र असल्याने दिसावयास कितीही अक्राळविक्राळ असला तरी त्याचे मन मात्र मानवी आहे. पुढे त्या दोघांची जसजशी मैत्री होत जाते तसतसा तो अधिकाधिक "रिलॅक्स" होत जातो, त्याचे भाव कोमल बनत जातात, त्याच्या कृतीमधून ते प्रतीत होतात आणि डिस्नेच्या कुंचल्याची कमाल, संगीतकाराच्या संगीताची जादू आपल्या डोळ्यात पाणी उभे करते.

२ सुरेख संदेश लहान मुलांपर्यंत पोहोचविण्यात, त्यांच्यावर बिंबविण्यात हा सिनेमा अतिशय आकर्षकरीत्या यशस्वी होतो - एक म्हणजे बाह्य सौंदर्यास महत्व न देणे आणि दुसरे प्रेमात असलेली ताकद जिच्या योगे व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र स्थित्यंतर येऊ शकते आणि एका बीस्ट चे रुपांतर राजपुत्रात होऊ शकते.

नायक-नायिका वगळता अन्य पात्रे देखील फार मजेशीर आहेत. बीस्ट चा आवाज ज्याचा कोणाचा आहे पण ऐकायला खूप छान वाटतो. कथेत "गॅस्टन" नावाचा एक रेमेडोके व्हीलन देखील आहे.

आपल्या मुलांना जरूर दाखवावा असा सिनेमा आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अ‍ॅनिमेटेड चित्रपट नेहमीच बघायला आवडतात. कृत्रिम तंत्रज्ञान वापरून इतके नैसर्गिक हावभाव तयार केले जातात की पडद्यावरच्या कसलेल्या नटानेही हार खावी!

ब्यु-बी बद्दल बरेच दिवसांनी वाचुन मस्त वाटले.. दोनेक वर्षांपलिकडे प्रदर्शित झालेला 'अप' हा चित्रपटही मला खूप आवडतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश...तुम्ही आमच्या पंथातले दिसताय...अप लाजवाब होता....बाकी मग बोल्ट, रॅटटुई, मेगामाईंड, डेस्पिकेबल मी, कुंग-फू पांडा,कार्स,मॉन्स्टर्स, फाइंडिंग नीमो वगैरे बघितलेत की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीस्ट ज्याने साकार केला त्या ग्लेन कीन या तंत्रज्ञा ची ही मुलाखत आवर्जून वाचावी - http://screenrant.com/beauty-beast-glen-keane-interview-mikee-82407/

बीस्ट ची निर्मिती करताना त्याने - सिंहाची आयाळ, गव्याचे डोके आणि दाढी , गोरीलाच्या भुवया, माणसाचे डोळे, रानटी डुकराचे सुळे, अस्वलाचे शरीर आणि लांडग्याच्या पायांचा तसेच शेपटीचे चित्र काढले. अन जेव्हा हे चित्र पूर्ण होऊन बीस्ट त्याच्यापुढे साकार झाला तेव्हा त्या अनुभवाचे अतिशय हृद्य शब्दात त्याने वर्णन केला आहे.

हा तंत्रज्ञ म्हणतो - “The Little Mermaid to me was like wow. Beast was such a personal – like a spiritual expression for me.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हा चित्रपट अलिकडेच पाहिला. बीस्टचे तुम्ही केलेले वर्णन लाजवाब आहे. शिवाय बीस्टच्या राजवाड्यातली बोलकी मंडळी आणि त्यांची आपापसात सतत होणारी टक्कर बघायला फारच मजा येते. मला हा चित्रपट खूप आवडला. त्याबद्दल इथे वाचून छान वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

सर्वांचे मनापासून आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0