जालवाणी

मी एक यूजर तू एक यूजर
इंटरनेटचा जागर जागर

अक्षरांचे दिवे हवे हवे
पोस्टिंग रोज नवे नवे

अभिव्यक्तीचे दौडले घोडे
प्रतिसादांची चकमक झडे

मुद्द्याचं बोला गुद्द्याचं सोडा
चर्चाविश्वाचा अडलाय गाडा

अनुभव सारे टंकित करा
नाहीतर सरळ स्माईली ठेवा

मेल दुपानी चॅट सुहानी
स्टेटसच्या हाका करुण वाणी

पेजेसची नुसती भागमभाग
सगळीकडे ब्लॉगमब्लॉग

लाईक्सचा सुळसुळाट, कमेंट्सचा खणखणाट
एकावर एक उताऱ्यांचा गजबजाट

मनातलं तळं फेसबुकवर बघा
दिसता काठ उचलून धरा

वॉलची उंची ओलांडून जाऊ
तिकडे काय डोकावून पाहू

प्रत्येक प्रश्नावर गूगलची सत्ता
गूगल सांगेल देवाचा पत्ता

विकीच्या झाडाखाली समाधी लावा
इंटरलिंकिंगचा साक्षात्कार नवा

अॅड्सचं जंगल सांभाळा माऊस
क्लिक्सची तस्करी पैशाचा पाऊस

नेटचं विश्व सपाट की गोल
सध्यातरी व्याख्येचा झोल

नेकी कर शेअरिंग में डाल
ऑनलाईन बंदे तेरी दुनिया कमाल...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

'...झोल'पाशीच कविता संपली. पुढची द्विपदी उगाच आली. ती आधी कुठं बसवली असती तरी चाललं असतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही असंच वाटलं. पण 'नेकी कर और शेअरिंग मे डाल' फारच आवडलं.

खणखणाट, सुळसुळाट हे शब्दही मजेशीर वाटले. कविता आवडलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय झाले रे उत्पल?
नेटचं विश्व सपाट की गोल
सध्यातरी व्याख्येचा झोल
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

प्रत्येक प्रश्नावर गूगलची सत्ता
गूगल सांगेल देवाचा पत्ता

हे भारीच. 'जे गूगलवर नाही, ते अस्तित्वातच नाही' असे समजणार्‍यांसाठी.
कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कविता मजेशीर आहे.. ब्लॉगम्ब्लॉग वगैरे आवडले
कवितेला बडबडगीतासारखा फिल आहे..नाद आहे..
मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...

श्रावण, तुम्ही म्हणताय तसं मलाही वाटून गेलं एकदा...पण अदिती म्हणतात तसं 'नेकी कर...'मला आवडलं होतं, ठेवायचं होतं आणि ते आधी घेणं योग्य वाटत नव्हतं..म्हणून शेवटीच ठेवलं...अर्थात कुठल्याही कलाकृतीचे एकापेक्षा जास्त शेवट संभवतात....त्याला ही कवितासुद्धा अपवाद नाहीच..... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही