ही बातमी समजली का? - ३७
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
=========
http://www.firstpost.com/politics/problem-of-worshipping-modi-congress-…
सेक्यूलर नेता प्रचंड लोकप्रसिद्ध झाला तो महान नेता आणि बीजेपीचा नेता प्रचंड लोकप्रसिद्ध झाला तर तो undesirable personality cult! मिडिया कि जय हो!
-------------------
राजीव गांधी निवडून आलेले तेव्हा ते आजच्या मोदींच्या चार अंगुळी जास्तच प्रसिद्ध होते.
अनंतमूर्ती
‘ज्ञानपीठ’विजेते ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले आहे.
माझ्या मते हे बिल म्हणजे
माझ्या मते हे बिल म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. Let the market decide the rates. मला ५० रुपये घेणार्या डॉक्टरकडे जायचे की ५०० रुपयेवाल्या ते मला ठरवू द्या ना. शिवाय आता भारतातपण इंशुरन्स कंपन्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे, म्हणजे लवकरच भारतात पण अमेरिकेसारखे हेल्थकेअर सेक्टरचे वाटोळे झाले तर आश्चर्य वाटणार नाही.
http://venturebeat.com/2014/0
http://venturebeat.com/2014/08/22/f-the-yuppies-ferguson-solidarity-mar…
फर्ग्युसन यांच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली - त्याच्या निषेधार्थ जी निदर्शने सॅन फ्रान्सिस्को मधे झाली तिचे शेवटी टेक्नॉलॉजी सेक्टर मधल्या कर्मचार्यांच्या विरोधात आरडाओरडा करण्यात पर्यावसान झाले. सिलिकॉन व्हॅली मधे अनेक तरूण नोकरीसाठी येतात व त्यामुळे घरभाडी वाढत चाललेली आहेत. व त्यामुळे तिथल्या स्थानिकांना घरभाडी परवडत नाहीयेत. व त्यातले अनेक जण "एव्हिक्शन नोटिस" चे बळी पडलेले आहेत. व त्याचे पर्यावसान टेक्नॉलॉजी सेक्टर मधल्यांवर जाळ काढण्यात होते.
यांना कल्याणकारी राज्य द्या, मेडिकेअर/मेडिकेड द्या, मिनिमम वेज द्या, टॅक्स लावू नका, स्वस्तात पब्लिक ट्रान्स्पोर्ट उपलब्ध करून द्या, स्वस्त दरात होम लोन्स द्या, घरमालकाकडून होणार्या "शोषणा"पासून वाचवा, पब्लिक स्कूल द्या .... सगळं द्या. पण हे सगळं देण्यासाठी जो पैसा येतो तो मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग व कंपन्यांकडूनच येतो. जरा समस्या निर्माण झाली की लगेच टॅक्स पेयर च्या अंगावर मुतायला सगळे एका पायावर तय्यार.
?
फर्ग्युसन यांच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली
??????
Are you usually that clueless?
फॉक्स न्यूज़वरचा डंबातला डंब (आणि हरामखोरांतला हरामखोर) कमेंटेटरसुद्धा - अगदी शॉन ह्यानिटीसुद्धा असले विधान करणार नाही! (अर्थात, कोल्टरबाईबद्दल सांगवत नाही म्हणा.)
(यावरून आठवले. लहानपणी, शाळेत असताना, नक्की आठवत नाही, पण बहुधा पेंडशांची कोठलीशी कादंबरी - नक्की कोठली, ती आता आठवत नाही, पण - हाताला लागली होती. त्यातल्या एका प्रसंगात, कोंकणातल्या कुठल्यातरी खेड्यातले गावकरी पारावर - किंवा कोंकणातले गावकरी जिथे कुठे बसत असतील तिथे - बसून, तेव्हा चालू असलेल्या पहिल्या महायुद्धाबद्दल चर्चा करत असतात. बोले तो, का सुरू झाले वगैरे. (डायलेक्ट मला जमत नाही, पण) मथितार्थ असा: 'आता ह्यो जर्मिळ आणि ह्यो रशिया - ह्या जर्मिळने रशियाची बाईल पळविली - त्या रावणान् सीतेला पळविली, तश्शी - म्हणून मग रशियाने जर्मिळवर हल्ला केला' वगैरे वगैरे. आणि मग जगातल्या तमाम लढाया बायकांवरूनच कशा होतात, यावर जागच्या जागी एक परिसंवाद होतो.
बरीच वर्षे झाली हे वाचल्याला, त्यामुळे तपशील आता नीटसे आठवत नाहीत - किंबहुना, कादंबरी कोठली होती, कशावर होती, काहीही आठवत नाही; कोणाची होती, त्याहीबद्दल निश्चित खात्री नाही, पण बहुधा पेंडशांचीच असावी - पण प्रसंगाची जिस्ट साधारणतः अशी होती.
सांगण्याचा मतलब, जर्मिळ कोण, रशिया कोण, मारामारी कशाबद्दल चाललीये, कशाचा पत्ता नाही. पण शेवटी कसेही करून स्त्रियांवरच जर घसरायचे असेल, तर एवढेसुद्धा माहीत असण्याची गरज काय? ऐकून हो-ला हो करणारेही तितकेच क्लूलेस असले, की पुरेसे आहे.)
फर्ग्युसन यांच्यावर गोळीबार
फर्ग्युसन यांच्यावर गोळीबार झालेला नसून फर्ग्युसन येथे (उच्चारी चूभूदेघे) फर्ग्युसन पोलीसांनी मायकेल ब्राउन (उच्चारी चूभूदेघे) यांजवर गोळीबार केला असे त्यांना म्हणायचे आहे असे वाटते.
ते त्यांनी डैरेक न लिहीता त्यांच्या नवीबाजू ष्टाईलने सांगितले इतकेच..
राष्ट्रीय पातळीवरची 'शूटर'
राष्ट्रीय पातळीवरची 'शूटर' खेळाडू तारा सचदेव हिचे बळजबरीने धर्मांतर, छळ, इ.इ. शिवाय नवर्याने मुसलमान असल्याचे लपवून ठेवत हिंदू नाव सांगितले.
http://www.indiatvnews.com/news/india/shooter-tara-sachdev-victim-love-…
शॉकिंग नसले तरी दुर्दैवी आहे
शॉकिंग नसले तरी दुर्दैवी आहे :(
'तारा'वर बळजबरी/विनययभंग/बलात्कार (पैकी जे जे झाले असेल ते सगळे) करणार्या अपराध्या(ध्यां)स योग्य ते शासन मिळेल अशी आशा आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्री आल्याचा दावा असणार्या २०-२५ काझींनाही सहाअरोपी/प्रमुख साक्षीदार केले पाहिजे असे वाटते
लव्ह जिहादचा निष्कर्ष घाईचा
बळजबरीने धर्मांतराचे प्रसंग घडतात हे सत्य आहे.
मात्र या प्रकरणात मुलीला फसवताना धर्मांतर हा 'उद्देश' असल्याबद्दल खात्री नाही (अर्थात, तशी प्रकरणेही असतात असे म्हणता यावे). निव्वळ एका मुलीच्याचा धर्मांतरासाठी इतकी मोठी(बातमीत वर्णिलेली) इन्व्हेस्टमेंट (२०-२२ कझी, गनपॉइंटवर बलात्कारासकट इतर अनेक गुन्ह्यांचा वापर करून धर्मांतर करणे) बरीच जास्त वाटते आहे ;)
शिवाय हे किती कॉमन आहेत, या बातमीतील सत्य किती आणि किती भाग कल्पित आहे किंवा सांगोवांगीचा आहे, सदर घटनेत झालेला विवाह हा मुद्दाम धर्मांतरासाठी होता की लग्नाला सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी त्या मुलावर नंतर धर्मांतराचे बंधन नंतर घालण्यात आले वगैरे काहीच माहिती नाही. अर्थात, बातमीत दिले आहे ते निंदायोग्य आहे हे खरे.
तेव्हा या उदावरणावरून लव्ह जिहादाच्या शक्यतेबद्दल किती कॉमन आहे आणि किती 'फिअरमाँगरींग' आहे? याबद्दल बोलण्याइतका विदा माझ्यापाशी नाही.
तशा प्रकारची प्रकरणे होतात व ती निषेधार्ह आहेत, हे सत्य नाकबूल नाहीच पण त्या कम्युनिटीने "लव्ह जिहाद" पुकारला आहे असे म्हणावे इतकी व्याप्ती आहे की नाही माहिती नाही. बहुदा तसे नसावे असा वाईल्ड अंदाज
( कोणत्याच बाजूचा ) निष्कर्ष
( कोणत्याच बाजूचा ) निष्कर्ष घाईचा ठरेल आणि बातमीत दिले आहे ते निंदायोग्य आहे.
तुझ्या प्रतिसादातली ही दोनच मते अत्यंत अचूक आणि रास्त असताना आणि त्याच्याउप्पर काहीही माहिती नसल्याची कबुलीही तू या प्रतिसादात अनेकदा दिलेली असताना त्याच्या आजुबाजूला वर्तवलेले अनेक तर्क आणि शक्यता या मात्र लव्ह जिहाद नसावा हे सिद्ध करण्याच्या अँगलनेच आलेल्या दिसतात.
कोणीतरी लव्ह जिहाद म्हटले तर ते आततायी असेलही, पण लगेच लव्ह जिहाद नसण्याच्या शक्यतांचे कंपायलेशन करणे हेही कितपत बरे?
:-)
एखादी शंका व्यक्त झाल्यावर तिची शहानिशा व्हायच्या आधीच तसं काही नसतं असं म्हणून वाळूत तोंड खुपसणे किंवा रोज उठून डोक्यावर मिर्या वाटणार्यांना गरीब बिचारे अन्यायग्रस्त म्हणणे याला उदारमतवाद म्हणत असतील तर बारा गडगड्याच्या विहीरीत नेऊन घाला तो उदारमतवाद.
बातमी
http://timesofindia.indiatimes.com/india/Love-jihad-is-BJPs-new-poll-po…
ओल्ड ह्याबिट्सच्या निमित्ताने ...... [हिंदू अल्पसंख्य होणार अशा भीतीचा बागुलबुवा इज अॅन ओल्ड ह्याबिट. आही लोकसंख्यावाढीचा दर, मग हम पांच-हमारे पच्चीस आणि अलिकडे लव-जिहाद].
>> लव्ह जिहाद नसावा हे सिद्ध
>> लव्ह जिहाद नसावा हे सिद्ध करण्याच्या अँगलनेच आलेल्या दिसतात
मला तसे काही सिद्ध करायचे नाहीये. निव्वळ मुळ बॅट्याच्या प्रतिसादात तो लव्ह जिहाद असावा असे वाटते असे त्याने नमुद केल्याने मला कोणत्याही ठोस माहितीअभावे तसे का वाटत नाही इतकेच.
सदर प्रतिक्रीया ही उप-उप प्रतिक्रीया आहे, त्याचा रोख त्यानुसार कलला आहे. बुळ बातमीवरची पहिली प्रतिक्रीया मुळ बातमीच्या प्रतिक्रियेलाच दिली आहे.
कम्युनिटीने "लव्ह जिहाद"
कम्युनिटीने "लव्ह जिहाद" पुकारला आहे असे म्हणावे इतकी व्याप्ती आहे की नाही माहिती नाही.
यातला "कम्युनिटीने" हा शब्द फारच जास्त झाला आहे. मुसलमानांना हिंदूंचे नुकसान करण्याशिवाय दुसरा धंदा नाही का? हा शब्द धर्मविषयक कोणतीही समस्या चर्चा करताना अनावश्यक आहे.
-----------------------
अशा सर्व प्रश्नांचे स्वरुप १.'मुस्लिम गुन्हेगार्/मूलतत्त्ववादी' विरुद्ध 'हिंदू समाज', २. हिंदू गुन्हेगार्/मूलतत्त्ववादी विरुद्ध मुस्लिम समाज असे असते. गुन्हेगारांमधे आणि मूलतत्त्ववाद्यांमधे सामान्य धर्मवादी नागरीकाला ओढू नये. त्यांना फार तर फार माझाच धर्म कसा श्रेष्ठ आहे याची बहस करायला आवडते.
निव्वळ एका मुलीच्याचा
निव्वळ एका मुलीच्याचा धर्मांतरासाठी इतकी मोठी(बातमीत वर्णिलेली) इन्व्हेस्टमेंट (२०-२२ कझी, गनपॉइंटवर बलात्कारासकट इतर अनेक गुन्ह्यांचा वापर करून धर्मांतर करणे) बरीच जास्त वाटते आहे
अशा कामासाठी वर्गणी गोळा करुन काझींना बोलावलं जात असेल अशी कल्पना करुन पाहिली आणि हसूच आलं. :-)
गनपॉईंटवर बलात्कार करण्यासाठीमात्र हिंदू नाव घेऊन लग्ना-बिग्नाचा देखावा करणे ही मेहनत थोडी जास्त वाटली.
बाकी एखाद्या पाक संघटनेने स्पॉन्सर केलेल्या एखाद्या पाक कृत्यात सहभागी होऊन जमलंच तर ७२ अप्सरांचे बुकिंग करायला उत्साही कार्यकर्ते मिळणे अवघड नसावेत असे वाटते.
हे केवळ दुसर्या बाजूच्या शक्यतांच्या कंपायलेशनसाठी बरं का. तसंच असेल असे नाही.
बातमीच खोटी असली तर बरं असं मात्र मनापासून वाटलं.
या बातमीला 'लव्ह जिहाद' असं
या बातमीला 'लव्ह जिहाद' असं शीर्षक देणंच दुसऱ्याही एका कारणासाठीही खोडसाळपणाचं वाटलं.
धार्मिक तणाव हे एक कारण झालं. पण त्यात तारा सचदेवला वस्तू म्हणून वापरून घेतलं असं आरोपण बातमीदारांनीच केलेलं आहे. स्वतःला जबाबदार समजणाऱ्यांनी हे करणं अधिक खोडसाळपणाचं आहे.
तुमचा मुद्दा काय तो मला समजला
तुमचा मुद्दा काय तो मला समजला नाही.
तारा सचदेव या व्यक्तीला "जिहाद"साठी वापरून घेतलं आहे असा सूर त्या बातमीवरून निघतो. इंडीया टीव्हीच्या बातमीदारांनी त्याला "लव्ह जिहाद" म्हटलेलं आहे; बातमीदार, बातमी देणारी माध्यमं यांनी सर्वसामान्यांपेक्षा अधिक जाण दाखवणं अपेक्षित असताना त्यांनी बाईला "युद्धा"त वापरून घेण्याचं आरोपण केलेलं आहे. मला इंडीया टीव्हीचं हे वर्तन खोडसाळपणाचं वाटतं. मुळात त्यात जिहाद असा उद्देश होता का नाही ते बातमीवरून स्पष्ट होत नाही आणि नसलेल्या किंवा वार्तांकनावरून स्पष्ट नसणाऱ्या जिहादसाठी बाईचा वापर करणं हा दुप्पट खोडसाळपणा आहे.
(आता आणखी काय होमवर्क केल्यास मला काय म्हणायचं ते स्पष्ट होईल हे मला माहित नाही.)
बिहारचे उपचुनाव - मोदी लाट ओसरली?
http://www.firstpost.com/politics/bye-bye-modi-wave-in-bihar-lalu-nitis…
भाजपला १० पैकी फक्त ४ जागा. सेक्यूलर पक्षांची युती झाल्याने समीकरण बदलले आहे.
--------------
भारतीय लोक बर्यापैकी जातीनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ आहेत. प्रत्येक जातीचा एक पक्ष आहे, प्रत्येक जातीच्या जवळच्या नि दूरच्या अशा जाती आहेत. पक्ष कोणता आहे नि त्याचं अधिकृत राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक तत्त्वज्ञान काय आहे याचे खूप लोकांना सोयरसुतक नसते हे पुन्हा सिद्ध.
--------------
हाच प्रयोग उ.प्र. मधे झाला तर लोकसभेत भाजपला फारतर ५-१० जागा मिळतील असे वाटते. पण देशात सर्वत्र भाजप विरुद्ध सगळे हा रंग चढत आहे हे त्या पक्षाचे मोठे यश आहे.
>>पण देशात सर्वत्र भाजप
>>पण देशात सर्वत्र भाजप विरुद्ध सगळे हा रंग चढत आहे हे त्या पक्षाचे मोठे यश आहे.
हा रंग जुनाच आहे. ९६ सालच्या १३ दिवसीय प्रयोगानंतर आलेली देवेगौडा-गुजराल सरकारे याच रंगाचा परिपाक होती.
[जण्रली मेन निवडणुकांनंतर लगेच होणार्या पोटनिवडणुका विरोधक जिंकतात असे निरीक्षण वाचले आहे].
पोटनिवडणुका
महाराष्ट्रापुरते हे निरीक्षण यंदा चूक ठरो. आमीन!!!!
महाराष्ट्रात आता पोटनिवडणुका नाहीत. विधानसभेच्या निवडणुकांत हे निरीक्षण चूक ठरणारच आहे. पण त्यात गंमत अशी आहे की काँग्रेसादि पक्षांना - विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती आणि सत्तेच्या वासाने आतापासूनच जिभल्या चाटणार्या विरोधकांनी या गळतीवर भरुन घेतलेल्या आपल्या घागरी यामुळे पक्ष नवा, चेहरे तेच असे चित्र विधानसभा निवडणुकींनंतर दिसले तर नवल नाही. म्हणजे मग उद्या छगन भुजबळ, उदयनराजे भोसले, प्रफुल्ल पटेल (आणि अगदी अजित पवारही!) यांना शिवसेना किंवा भाजपचे नवनिर्वाचित उमेदवार म्हणून स्वीकारायची आपल्यावर पाळी येईल. तो दिवस बघायला लागण्याच्या आधी उठा ले रे बाबा, उठा ले असेच म्हणावे लागेल...
+१ =))
+१
लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रथेप्रमाणे लोकांच्या इकडून तिकडे उड्या सुरु झाल्या होत्या तिकिटांसाठी वगैरे.( काहिंनी काँग्रेसचे मिळालेले तिकिट सोडून भाजपकडून निवडणूक लढवली.) तेव्हा आलेल्या व्यंगचित्रात भाजपच्या निवडणूक प्रचाराची घोषणा होती :-
"want some change? vote for BJP and elect your old congress leaders"
;)
भाजपमधील घराणेशाही
http://www.dnaindia.com/india/report-national-conference-attacks-amit-s…
भाजपची कधीकाळी घराणेशाहीपासून दूर अशी ख्याती होती. हळूहळू पक्षातली काही बांडगूळं इतकी मोठी होत आहेत कि ते आपल्या अपत्यांवर आरामात मेहेरबानी करू शकत आहेत. बीजेपीच्या विचारसरणीनुसार प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यकांना तिकिट द्यायचा संबंधच येत नाही. असे केले तर जनसंपर्कात राहून 'आपला चान्स कधी येतो त्याची वाट बघायची' ही थेरी गडगडणार. लोक सारी उर्जा हायकमांडची मर्जी जिंकण्यात लावणार, मतदारसंघात काम करण्यात नाही.
---------------
भविष्यात पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व असेच निवडले जाण्यात याची परिणीती न होवो अशी इश्वराकडे प्रार्थना.
हिंदूंची अशी केंद्रीय बॉडी
हिंदूंची अशी केंद्रीय बॉडी आहे का?
नाही. नसावी बहुतेक. व तेच इष्ट आहे. आदि शंकराचार्य सुद्धा चार मठ स्थापन करून राहिले ओ. एकच नाय काय. त्यांना सुद्धा विकेंद्रीकरण हवे होते. देव सुद्धा एकच एक नसायला हवा. मोनोपोली व मोनोपोलायझेशन होते. ३३ कोटी आहेत ... ते बरे आहे.... लोकांना विकल्प आहेत.
३३ कोटी देवांची
३३ कोटी देवांची फ्यामिली.
http://spiritualsanatan.blogspot.in/2013/11/truth-behind-33-crore-330-m…
१२ आदित्य, ११ रुद्र, ८ वसू, आणि २ अश्विनीकुमार अशी ती वरिजिनल लिष्ट आहे. अन ही कल्पना वैदिक आहे. पुराणकाळात फेमस झालेले ब्रह्माविष्णूमहेशदुर्गा इ.इ. सध्याच्या मेन देवतांना त्यात स्थान नाही.
होय, आहे. सिंधुदुर्ग
होय, आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवराजेश्वर मंदिर म्हणून जे शिवमंदिर आहे त्यातली मूर्ती म्हणजे शिवाजीच आहे.
पण इथून पुढे ही मंदिरे अजून बरीच फोफावतील असे वाटते. राजगड-रायगड-सिंहगड इ. किल्ल्यांना अष्टविनायक, अकरा मारुती, इ. प्रमाणे "शिवतीर्थे" म्हणून महत्त्व प्राप्त होईल इ.इ.
Efficient Market Hypothesis
Efficient Market Hypothesis संपूर्ण योग्य आहे की नाही याबद्दल विवाद असतीलही. फामा व शिलर दोघांना एकदमच नोबेल दिले गेलेले असेलही. पण Efficient Market Hypothesis संपूर्ण चूक आहे असे कोणी सिद्ध केलेले नाही.
बातम्या विकत घेणे/देणे व विकणे ह्यात चूक काही आहे असे मला वाटत नाही.
Information is the most important good in society. And if people want it then they should be willing to pay for it.
मिडिया (वर्तमानपत्राचा)
मिडिया (वर्तमानपत्राचा) कस्टमर हा सर्वसाधारणपणे जो वर्तमानपत्र विकत घेतो तो. पण जो मोफत वाचतो त्यास मॉनेटाईझ करण्याचा मार्ग म्हंजे जाहिराती. मंजे मोफत वाचणारा खरं तर गिर्हाईक कमी व स्प्लायर जास्त. जाहिरातदार हा गिर्हाईक. गूगल चा कस्टमर - ज्यांच्या लिंका सर्च रिझल्ट्स मधे टॉप वर असाव्यात म्हणून जे बिझनेसेस पैसे देतात (गूगल वर्ड्स द्वारे) ते कस्टमर्स ... गूगलचे. याहूमेल चे कस्टमर्स - जाहीराती देणारे. फेसबुकाचे कस्टमर्स - Those who obtain access to Facebook so that they can run social media analytics on it and sell the insights of those analytics - ते.
पेड न्युज ही एक सर्व्हिस मिडिया पुरवत असेल तर .... जो बातमी देण्यासाठी पैसे देतो - तो गिर्हाईक.
वाचणारे - सप्लायर्स. दे सप्लाय देअर आयबॉल्स + अटेन्शन.
नक्की काय पटत नाही
मान्य! सर्व प्रकारच्या मिडीयाला एकाच फुटपट्टीने तोलता येणार नाही. इतर प्रकाराला तुर्तास बाजुला ठेऊ
या चर्चेपुरते बातमीत उल्लेखलेले वृत्तपत्र घेऊ.
१. त्याचा कस्टमर हा जो वर्तमानपत्र विकत घेतो तो असतो हे तुम्हाला मान्य आहे.
२. आता आपल्या कस्टमरला वृत्तपत्रे खरी बातमी ती घडल्याच्या ठराविक / कमीत कमी कालखंडात पोचवण्याची सेवा देतात व त्याबद्दल पैसे घेतात.
३. आता जाहिरातदार ही अशी एन्टीटी आहे की जी, वृत्तपत्र - प्रोडक्ट विकून होणार्या मिळकतीहून अधिकचा पैसा, वृत्तपत्रांना देते. मात्र जाहिरात हे इथे प्रोडक्ट नव्हे!
४. आता वृत्तपत्रांतील बातम्या - अर्थात प्रोडक्टची क्वालिटी - ही चांगली असावी ही ग्राहकांची अपेक्षा योग्य आहे व ते कायद्याने बंधनकारक आहे असे तुम्ही मानता. बरोबर?
५. मात्र पेड न्यूजमध्ये प्रोडक्टचे कंटेट आणि ते गिर्हाईकापर्यंत पोचण्याचा वेळ हे दोन्ही मागणी व पुरवठ्या प्रमाणे होत नसून जाहिरातदारांसारखी तिर्हाईत संस्था कंट्रोल करू लागते.
६. तेव्हा अशी पेड न्यूज गिर्हाईकाला दिली जाणारी सेवा व तिची प्रत यात तडजोड करणारे - हानी पोहचवणारे, बेकायदेशीर (व प्रसंगी घातक) आहे
आता यातील १ ते ६ मध्ये नेमका कोणता आकडा वा आकडे तुम्हाला अजिबात पटत नाहीत?
१. मान्य २. सर्वसाधारणपणे
१. मान्य
२. सर्वसाधारणपणे मान्य.
३. अमान्य. जाहीरात हे देखील प्रॉडक्ट आहे. तिचा कस्टमर वेगळा आहे. पण जाहीरात हे प्रॉडक्ट बाजारात एक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. It plays central role in alleviating SOME of the market failures - e.g. information asymmetry.
४) बरेचसे अमान्य. प्रॉडक्ट ची क्वालीटी चांगली असावी अशी प्रत्येक कस्टमरची अपेक्षा नसते. कामचलाऊ क्वालिटीचे अनेक पदार्थ/वस्तू असतात. सेकंड हँड वस्तू सुद्धा असतात. देशात किमान १०० वृत्तपत्रे आहेत. पण त्यातली सगळीच एकसमान क्वालीटीची नाहीत. पण तरीही त्यांना गिर्हाईक आहेत. That means some (in reality several) customers do not care about quality as much as some other customers. दैनिक ऐक्य हे un-serious वृत्तपत्र आहे असे कोणीही म्हणणार नाही. पण त्याची व "***" ची क्वालीटी एकसमान नाही.
५) अमान्य. - जाहिरातदारांसारखी तिर्हाईत संस्था कंट्रोल करू शकत नाही. Think of this as vendor managed inventory. (not exactly but ...). रिटेलर जो vendor managed inventory ठेवायला परवानगी देतो तो vendor ला कंट्रोल करायला देत नाही. फक्त शेल्फ चा एक सेक्शन देतो. vendor ला कंट्रोल हवा असेल तर तो स्वतःचे आऊटलेट काढतो. एखाद्या वृत्तपत्रात नुसत्या पेड न्युज असतील तर त्याचा खप प्रचंड कमी होऊ शकतो - व हे वृत्तपत्रमालकास चांगले माहीती असते.
६) अमान्य.
बातम्या विकत घेणे/देणे व
बातम्या विकत घेणे/देणे व विकणे ह्यात चूक काही आहे असे मला वाटत नाही.
Information is the most important good in society. And if people want it then they should be willing to pay for it.
गब्बर.. एक वेगळे परिप्रेक्ष्य की काय म्हणतात ते देणार्या तुमच्या विचारांना वाचतावाचता कधीकधी ती विधाने भान सुटल्यागत झाल्याचा भास होतो ..
बातमी म्हणजे "इम्पॉर्टंट गुड" / माल / कमोडिटी आहे वगैरे हे मान्य.
पण "बातमी" या शब्दाचा सर्व जनतेला अपेक्षित असलेला अर्थ तरी निदान लक्षात घ्यावा "पेड न्यूज"ला पाठिंबा देताना.
अमुक देशात वादळ झाले, तिथे असणारे माझे परममित्र "गब्बर" कसे आहेत? याचे ज्ञान म्हणजे बातमी मला हवी असते. त्या अर्थाने मी बातमीचा पैसे देऊनही ग्राहक आहे.
पण गब्बरच्या (आणि माझ्याही हितशत्रूकडून) पैसे घेऊन, गब्बर जखमी असतानाही गब्बर सुखरुप आहे अशी "बातमी" देणारा आणि मला गब्बरला मदत करण्याचा मार्ग बंद करणारा मीडिया काय साध्य करतोय?
Saudi Arabia's secret
Saudi Arabia's secret uprising
तीन वर्षांपासून धुमसत असलेला व दडपला जात असलेला पूर्व सौदीतला असंतोष. शिया वंशीय मुस्लिमांची त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्धची चळवळ दडपली जात आहे.
या आंदोलनांमागचे खरे कारण न वाढणारी तेलाची निर्यात आणि वेगाने वाढणारा तेलाचा अंतर्गत वापर हे आहे असे काही लोक म्हणतात; म्हणजे इजिप्तमध्ये जे झालं तेच.
अरब स्प्रिंगची लागण सौदी अरेबियाला झाली तर तेलाच्या पुरवठ्यावर आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील?
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/india/Sonia-Gandhi-attacks-Modi-over…
बाईंचं डोकं फिरलंय असे दिसते.
१) http://www.tradingeconomics.com/india/inflation-cpi
२) सहारनपूर मधे यावेळी जे दंगे झाले ते सपा सरकार ला रोखता का आले नाहीत. (नाही म्हंटलं ... कायदा, सुव्यवस्था व डोमॅस्टिक सुरक्षितता हा विषय मुख्यत्वे राज्यांच्या अखत्यारीत येतो....)
३) आणि बाय द वे मुजफ्फरनगरमधले दंगे सुरु झाले ते सोनियाबाईंच्या कारकीर्दीतच ना ?
दंगे
मला समजलेला काँग्रेसवाल्यांची भूमिका :-
१.काँग्रेसचे राज्य असेल तर ध्रुवीकरण होउन सत्ता मिळावी म्हणून भाजपवाले दंगे घडवतात.
२.राज्य भाजपचे असेल तर भाजपपुरस्कृत गुंडांना त्यांना मोकाट रानच मिळते. "आमचा संबंध नाही" म्हणत म्हणत हे दंगे नव्हे कत्तली/masscares करतात.
राज्य कोणाचेही असले तरी दंगे भाजपवालेच करतात. त्यांची मेंटॅलिटी ही दंगे घडवायची आहे.
काँग्रेसची मेंटॅलिटी ही दंगे रोखायची आहे. सत्तेबाहेर असताना भाजपने घडवलेल्या दंग्यांबद्दल काँग्रेस फार तर आराडाओरडा करु शकते .
सत्तेत असताना काँग्रेस बर्यापैकी चाप लावते दंग्यांना.
थोडक्यात, शरद पवार सी एम असताना दंगे झाले तर भाजपने सत्ताप्राप्तीसाठी केलेले असतात.
मनोहर जोशी सीएम असताना दंगे झाले तर तेही स्वाभाविकच आहे. त्यांचा मूळ उद्देशच एका गटाला टार्गेट करणे हाच तर आहे!
कॉम्ग्रेस हेच तर रोखू इच्छिते.
सोनियाबैंना आपल्या बोलण्याला
सोनियाबैंना आपल्या बोलण्याला फारसा आधार देता आलेला नाहिये त्यामुळे त्यावर बोट रोखता येईलच.
मोदींवर टिका अस्थानी/अयोग्य आहे की नाही माहिती नाही. मात्र, मोदी विजयानंतर पुण्यातील दंगली कित्येक काळ वृत्तपत्रांत / मिडीयात येऊ शकल्या नाहित. एकाचा मृत्यू झाल्यावर त्याची दखल घेणे ऑलमोस्ट भाग पडले. तोवर आमची खाजगी ऑफिसेसही सुरक्षेच्या कारणाने प्रसंगी लवकर सुटली/सोडली (इतकी वेळ आली म्हणजे) मात्र त्याची साधी एकोळीची बातमी टिव्हीवर नव्हती.
जर पुण्यासारख्या मोठ्या शहरातील घटना अश्या दडून रहातात तर भारतात खरेच असे घडते असा कोणी दावा करत असेल तर - त्यावर पुराव्याअभावी विश्वास ठेवणे योग्य नाही हे एकीकडे वाटत/पटत असूनही - त्यात तथ्यांश असण्याची भिती ऋषिकेशीय प्रवृत्तीला वाटत राहतेच :(
नेमके ह्यांच्याच नावाने का
नेमके ह्यांच्याच नावाने का ओरडले जाते ह्याचे मला कुतूहल आहे
जर हा प्रश्न काँग्रेससाठी असेल तर कारण स्पष्ट आहे. त्यांना भाजपाची तशी प्रतिमा उभी करायची आहे.
जर प्रश्न मला असेल तर मी आजवर प्रत्येक दंगलीच्या वेळी भाजपाच्या नावाने ओरडलेलो नाही हे एक. मुजफ्फरनगरचे अपयश हे सपाचे होते हे ही मी म्हटले आहे.
बाकी ज्या दंगलींसाठी भाजपाचा हात नसला तरी काहि संबंध असेल अशी शंका आल्यावरही (भाजपाविरोधी अशी प्रतिमा उभी रहाण्याच्या भितीने) ती मांडूच नये असे तुमचे म्हणणे नसावे
करेक्षण.... दंगल ही
करेक्षण.... दंगल ही फेसबुकवरच्या आक्षेपार्ह फोटोवरून झाली होती, मोदी विजयावरून नाही. दोन्ही घटना आसपास घडल्या इतकंच!
आणि मोदींच्यात अहमहाबाद/ बडोदा इकडे मुस्लिम भागात विजयी मिरवणुकीच्या काही लोकांनी दगड्फेक केली इत्यादी पेपरात आले होते.
बाकी मी मोदी समर्थक्/भक्त नाही, विरोधकही नाही. तटस्थ म्हणू शकता फारतर!
पण भलतीच गोष्ट त्यांच्या नावावर नका टाकू!
विजयावरून
फेसबुक हे निव्वळ निमित्त.
मोदी विजयावरून नाही झाली तरी मोदी विजयापाठोपाठ झाली होती.
आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे दंगलीचं कारण काहीही असो "बातमी का दाबली ?" असा ऋ चा सवाल आहे; असं मला वाटतं.
त्याच्या प्रश्नात तथ्यही असावं. पण दंगल झाली पुण्यात. महाराश्ट्रात काँग्रेसचं सरकार.
शिवाय, सकाळ, लोकमत ह्यांना मोदीराव दाबू शकतील ???
ह्यांचे आदरणीय मालक किती निष्पक्ष आहेत ते तर परिचितच आहेच.
ते प्रो-मोदी भूमिका घेतील?
ता. क :-
केंद्रापुढं हतबल महाराष्ट्र्/राज्य सरकार असं म्हणू नका प्लीझ.
बाबरी पडली तेव्हा राज्यात भाजप, केंद्रात कॉम्ग्रेस. तेव्हा कॉम्ग्रेस हतबल हतबल ठरली कारण राज्यात त्यांची पावर नव्हती.
आता राज्यात त्यांची पावर आहे, केंद्रात नवनिर्वाचित, पुरतं न स्थिरावलेलं भाजप सरकार आहे, तरी कॉंग्रेसच हतबल.
इ चाल्बे नाय.
तसे नाही
तसे नाही, दंगल त्या घटनेच्या कित्येक महिने आधी टाकलेल्या व लक्षात आल्यावर त्वरीत हटवल्या गेलेल्या आक्षेपार्ह फोटोमुळे झाली हे खरेय परंतू ती दंगल "कम्युनल" होती - धार्मिक होती.
ही घटना मोदीविजयामुळे नव्हे तर विजयानंतर घडली.
दंगल होण्यामागे मोदीविजयाचा संबंध नसावा हे मान्य.
मात्र विजयानंतर लवकरच घडलेल्या या घटनेची बातमी बाहेर न येण्यामागे / दडपण्यामागे नक्की काय कारण असावे? हे माहिती नसल्याने शंका येत रहाते. (त्याच सुमारास एक मोठे मिडीया हाऊस रिलायन्सने विकत घेतले. काही प्रतिष्ठीत पत्रकारांनी नोकर्या सोडल्या. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांवर दबाव नव्हताच असे म्हणवत नव्हते. मागे मेघनाने शेअर केलेल्या श्री.वागळे यांच्या भाषणात याच घटनेबद्दल त्यांच्यावरील दबाव उघदपणे मांडला आहे.)
मनोबांशी आजच्या दिवसात
मनोबांशी आजच्या दिवसात तिसर्यांदा सहमत. आयबीएन जाऊ द्या, पण महाराष्ट्रात साम/झी २४ तास वगैरे सारख्या इतरही वृत्तवाहिन्या आहेत, ज्या काही भाजप/मोदींच्या समर्थक म्हणता येणार नाहीत. त्यांनी तरी कुठे कव्हरेज दिलं? तसंच वृत्तपत्रांमध्ये सकाळ, लोकमत, पुढारी वगैरे सुद्धा गप्पच होते. आता हे सगळे एकाच वेळी ठरवून किंवा कोणाच्या दबावाखाली गप्प बसतील/बसू शकतील असं कोणाला वाटत असेल तर तो भाग वेगळा. आणि तुम्ही म्हणता तसं जर झालं असेल तर घडलेल्या घटनाक्रमातला नक्की कुठला भाग वृत्तांकनात आला नाही / गाळला गेला नाही हे पण काही स्पष्ट नाहीये. काही ऑफिसेस लवकर सोडली वगैरेसारखी बातमी मुख्य दंगलीच्या वृत्तांतापुढे छापणार्यांना / दाखवणार्यांना किरकोळही वाटू शकते. माझ्या मते हा पूर्णपणे माध्यमांचा निर्णय आहे.
हिंदुत्ववादी दंगलखोरांचा उन्माद कदाचित भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे जास्त असू शकेल. पण त्यावर मी खात्रीलायक माहितीअभावी कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
माझ्या मते हा पूर्णपणे
माझ्या मते हा पूर्णपणे माध्यमांचा निर्णय आहे.
तो निर्णय त्यांना घ्यायला भाग पाडले जाते का असा प्रश्न आहे. मोदी/भाजपाच पाडतात असे नाही, सगळेच पक्ष पाडतात. मात्र मोदीविजयानंतर ही घटना मी राहतो त्या शहरात घडल्याने ती जाणवली.
आणि मग त्यामुळे प्रत्यक्षात सर्वत्र शांतता आहे असे वृत्तपत्रात बातम्या नाहित या कारणावरून मान्य करणे जड जाते आहे. (इथे मोदींपेक्षा मिडीयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह मांडले आहे. मोदींसारख्या पोलरायझिंग फॅक्टरचे नाव घेतल्याने ते अनेकांनी नजरेआड केले / आपोआप झाले)
बाकी मला स्वतःला तर अॅडलॅब्ज
बाकी मला स्वतःला तर अॅडलॅब्ज इमॅजिका मधल्या अपघाताची बातमी दोन्हीकडे काँग्रेस सरकार असताना कशी काय इतकी दाबली गेली ह्याचेही कुतुहल आहे.
शेवटी मी असा निश्कर्ष काढला की पर्मनंटली कोणताच पक्ष/सरकार वा बिझनेस अनुक्रमे कोणत्याच बिझनेस/कंपनी वा पक्ष/सरकारचा समर्थक नसतो. ज्यात तत्कालीन फायदा, त्याचे आम्ही साथीदार!
रिलायन्स गुजरातची आहे म्हणून त्यांना पेश्शल वागणूक नाहीये तर तशा पद्धतीने चालणारी कंपनी अर्थव्यवस्था छान चाललीये असे चित्र उभे करण्यात जास्त मदत क्रेल म्हनून त्यांना मदत, व मोदी अशा कंपन्यांना जास्त चांगली वागणूक देतील हे माहीत असल्याने त्यांचे मोदींसाठी लॉबिंग असा प्रकार आहे.
बाकी मी मोदी समर्थक्/भक्त
बाकी मी मोदी समर्थक्/भक्त नाही, विरोधकही नाही. तटस्थ म्हणू शकता फारतर!
मी मोदी समर्थक आहे. कट्टर नसलो तरी सॉल्लीड समर्थक आहे.
ब्याट्याशी असहमत आहे. काँग्रेस चे पडले तरी नाक वर - अशी समस्या नाहियेच. नाक फुटले, रक्तबंबाळ झाले, ठेचले गेले, त्याच्यावरून अख्खा रणगाडा गेला तरी त्याच्यावर तुरा लावायचा जो प्रकार कॉंग्रेस ने चालवलेला आहे ते इतके चक्रमपणाचे आहे की - पूछो मत.
अरे यार तुमचा सेक्युलरिझम समजला लोकांना, तुम्ही हायपर सेक्युलरिस्ट आहात, व स्युडो सेक्युलरिझम ही अस्तित्वात नसलेली बाब आहे व भाजपा पेक्षा जास्त कम्युनल कोणीही नव्हते, नाही व नसणारे - असे जरी मान्य केले तरीही - सेक्युलरिझम हा इकॉनॉमिक लिबर्टी ला पर्याय नाही - हे तुमच्या डोक्यात का व कसे शिरत नाही???
सेक्युलरिझम हा इकॉनॉमिक
सेक्युलरिझम हा इकॉनॉमिक लिबर्टी ला पर्याय नाही - हे तुमच्या डोक्यात का व कसे शिरत नाही???
:)
खरे आहे. त्यांना हे समजलेच नाही!
फक्त जर मोदी राज्यात खरोखरची "इकोनॉमिक लिबर्टी" येईल या कारणाने तुम्ही बर्यापैकी कट्टर समर्थक असाल तर पाच वर्षांनंतर तुम्ही तसे रहाणार नाही असे भविष्य वर्तवतो.
मोदी समर्थनाचे दुसरीही काही कारणे असतील तर मग हे भविष्य बाद!
(कुडमुड्या) ऋ
फक्त जर मोदी राज्यात खरोखरची
फक्त जर मोदी राज्यात खरोखरची "इकोनॉमिक लिबर्टी" येईल या कारणाने तुम्ही बर्यापैकी कट्टर समर्थक असाल तर पाच वर्षांनंतर तुम्ही तसे रहाणार नाही असे भविष्य वर्तवतो.
मोदी राज्यात ५००% सेक्युलरिझम व ५००००% इकॉनॉमिक लिबर्टी आली तरीही तुम्ही मोदीविरोध सोडणार नाही असे भविष्य वर्तवतो.
---
मोदी समर्थनाचे दुसरीही काही कारणे असतील तर मग हे भविष्य बाद!
याबाबतीत तुम्हास दाद देतो.
जनधन योजना लागू करून मोदींनी प्रि-एम्प्टिव्ह सरेंडर केलेले आहे. त्यामुळे आमचे स्टेटस आधीच "सॉल्लिड समर्थक" वरून "काहीसा सॉल्लिड समर्थक" वर गेलेले आहे. आता बोला. हा हा हा.
When the facts change, I change my mind ____ John Meynard Keynes
( गब्बर केन्स ला क्वोट करतोय हे पाहून अनेकांचे डोळे पाणावतील.... अनेकांना बाष्पगद्गदित व्हायला होईल वगैरे वगैरे.)
कट्टर हिंदुत्ववाद्यांना तसेही
कट्टर हिंदुत्ववाद्यांना तसेही कोण हिंगलत नाही, सबब ते एक सोडाच. अंध मोदीद्वेष हे पुरोगामित्वाचे लायसन आहे अशी समजूत असलेले लोकही कमी नाहीत, पण त्यांवर टीका केली की स्वयंघोषित लिबरल, सेकुलर, इ.इ. जन्ता पिसाळते. या फ्याषनला विरोध करणेही तितकेच गरजेचे आहे.
मोदी राज्यात खरोखरीच इकोनॉमिक
मोदी राज्यात खरोखरीच इकोनॉमिक लिबर्टी आली तर त्या पॉलिसीचे तर तुमच्याहून कट्टर समर्थन करू याची खात्री बाळगा (आणि खरोखरच वरचा जाड ठसा आधीच्या प्रतिसादात लक्षात आला नसेल तर पुन्हा देतोय)
फक्त "लिबर्टी" ही सर्वार्थाने हवी, निव्वळ सरकारलाच(किंवा मोजक्याच भांडवलदारांनाच किंवा मोजक्याच शेतकर्यांनाच किंवा मोजक्याच...)सोयीस्कर ठिकाणीच नको यावर आपले एकमत व्हावे!
फक्त "लिबर्टी" ही सर्वार्थाने
फक्त "लिबर्टी" ही सर्वार्थाने हवी, निव्वळ सरकारलाच(किंवा मोजक्याच भांडवलदारांनाच किंवा मोजक्याच शेतकर्यांनाच किंवा मोजक्याच...)सोयीस्कर ठिकाणीच नको यावर आपले एकमत व्हावे!
कर्जमाफी/मुक्ती सगळ्या उद्योजकांना द्या बरं ?
४% दराने कर्ज सगळ्या उद्योजकांना द्या बरं ?
नो इन्कम टॅक्स ऑन फार्म इन्कम तसेच नो इन्कम टॅक्स ऑन कॅपिटल गेन्स, डिव्हिडंड्स, कॉर्पोरेट प्रॉफिट्स वर करा ना ?
लेबर युनियन ही कामगारांच्या नफ्यासाठीच काम करते - तेव्हा तिच्यावर नॉर्मल इन्कमटॅक्स लावा ना ?
४% दराने कर्ज (शेतकर्यास) देऊ केलेले आहे त्यामुळे हजारो सावकार धंदा बुडीत जायला लागला असे म्हणत असतील तसेच सावकारी व्यवसाय हाच बेकायदेशीर ठरवल्यामुळेही अनेक सावकार देशोधडीस लागले असतील - त्यांच्या पुनर्वसनासाठी काही तरतूद करा ना ?
-
सांगायचा मुद्दा हा की फडतूसांसाठी(***) ह्या योजना अन त्या स्किमा. अन जे रिस्क घेऊन, उद्यमशीलतेने व्यवसाय करतात त्यांच्या बुडाखाली आग लावणे हा उद्योग करायचा. अन वर सेव्हर्स चे ही पैसे लुबाडायचे - हा सगळा गोंधळ घालून झाला की = क्रोनी कॅपिटलिझम च्या गफ्फा मारायला रिकामे - --- मोजके भांडवलदार, बडे शेतकरी मलीदा खातात म्हणून. नै का ?????
---
(***) - फडतूस हा अत्यंत सौम्य शब्द आहे.
भिती काही केल्या जात नाहिये,
भिती काही केल्या जात नाहिये, उलट वाढतच चालली आहे.
बरोबर आहे. एकदा घाबरायचे ठरवले की छप्पन्न सशांची व्याकुळता आणणे आणि तिला सेल करणे हे ओघानेच आले. :) चालूद्या फीअरमाँगरिंग. :)
(स्वयंघोषित) सेकुलर, लिबरल, इ. बिरुदावलीत आता फीअरमाँगर हा अजूनेक शब्द अॅड झाला.
तरी बरं, मागे नवीबांनी अशी
तरी बरं, मागे नवीबांनी अशी भिती व्यक्त करण्याला फिअरमाँगरिंग म्हणणे कसे गैर आहे हे सप्रमाण सांगितले होते व तुम्हाला पटलेही होते!
पुन्हा विसरलात.. जाऊ दे, म्हणा काय वाट्टेल ते.
आता वाटते भिती तर तुम्ही फिअरमाँगर म्हणाल म्हणून ती व्यक्तही करू नये की काय?
याला काय डोंबलाची वैचारिक
याला काय डोंबलाची वैचारिक देवाण्घेवाण म्हणायचं?
ऐसीवर अधोरेखित प्रकार फारसा चालतो असे वाटत नाही. अलीकडे तर नाहीच नाही. सगळे चिभांरा (चिरंजीव भांडखोर राजश्री) किंवा चिभांका (चिरंजीव भांडणाकांक्षिणी) होऊन स्वतःचा दृष्टिकोन दुसर्याच्या नरड्यात ओतू पाहताहेत.
डम डम डिगा डिगा!
मोदींनी वाजवली बासरी आणि सांगितली कृष्णाची गोष्ट!

(मराठीत बोनस : मोदींनी वाजवली घंटा)
इथपर्यंत आलाच आहात तर -
'अहिंसा भारतीयांच्या रक्तातच' - मोदी
'शांतता आणि अहिंसेच्या मुद्द्यावर भारत ठाम आहे. आणि भारतीयांच्या रक्तातच अहिंसेचं तत्व आहे', असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र प्रसार बंदी करारा ( NPT) वर भारत स्वाक्षरी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
'परिधानमंत्री' नरेंद्र मोदी !
याच वळणाची मी वाचलेलली एक आणखी रोचक बातमी .
काळ-वेळ चुकली नाही हे
काळ-वेळ चुकली नाही हे महत्त्वाचं हो! शिवराज पाटील मात्र फॅशन बॉय म्हणून बदनाम झाले ते झालेच.
जपानच्या राजाला मोदींनी
जपानच्या राजाला मोदींनी भगवद्गीता भेट दिली.
http://indiatoday.intoday.in/story/modi-japan-gita-akihito-emperor-secu…
'सेकुलर मित्र' या जमातीबद्दलचे शेरे रोचक आणि उद्बोधक आहेत. जिज्ञासू आणि गरजूंनी बातमी मुळातूनच वाचावी. स्वयंघोषित सेकुलरांना काँट्रोव्हर्सी क्रिएट करण्याचे आवाहनही जवळपास केल्यात जमा आहे. तेव्हा सेकुलर्स, गो अहेड & फुलफिल युवर डेस्टिनी!!!! कमॉन, वी वाँट सम रोचक खोचक भोचक कमेंट्स. प्लीज डोंट डीसप्वाइंट द जन्ता.
अर्धमेल्या काँग्रेस मधे जान
बातमी वाचा च ... पण व्हिडिओ पण अवश्य बघा. त्यात तर खरी मजा आहे....
अर्धमेल्या काँग्रेस मधे जान फुंकण्याची ताकद या एकट्या एपिसोड मधे आहे ....
सोनिया म्हणत असेल .... मोदीजी ....
शुक्रिया ए मेरे कातिल ए मसीहा मेरे
जहर जो तूने दिया था वो दवा हो बैठा
----
डिस्क्लेमर - भगवदगीतेस "जहर" असे संबोधण्याचा उद्देश नाही.
https://www.project-syndicate
https://www.project-syndicate.org/commentary/shlomo-ben-ami-explains-wh…
Israelis are struggling to comprehend why five million refugees and 200,000 deaths in Syria mean so much less to the Western conscience than the 2,000 Palestinians killed in Gaza.
internal conflict
माझ्या माहितीप्रमाणे सिरियात यादवी युद्ध आहे. दोन्ही बाजूला भरपूर सिरियन्स आहेत.
एकदा यादवी युद्ध म्हटलं की बाहेरच्यांना थेट हस्तक्षेप करता येत नाही.
(चीनच्या यादवी युद्ध व युद्ध्होत्तर धोरणांचा परिणाम म्हणून चार कोटी(!!) लोक मेले म्हणतात्.पण बाहेर बसून बोंबलण्याशिवाय कुणी काही केलं नाही.
अमेरिकेनं आपली आर्मी तिथं डिप्लॉय केली नाही. रशियानं भरपूर आर्थिक मदत व शस्त्रास्त्रांची मदत चीनी कम्युनिस्टांना केली तरी प्रत्यक्ष रशियन सैन्य काही फार मधे कडमडलं नाही. लढणार्या दोन्ही बाजू चीनीच होत्या.(चँग कै शेकवाले विरुद्ध माओवाले.)
)
गाझाच्या लफड्यात घडलय ते हे की इस्राइल नावाचा "देश" किंवा "जमात"; पॅलेस्टिनी किंवा अरब नावाच्या देश/जमात/राश्ट्रावर हल्ला करुन त्यांना बेचिराख करते आहे.
काश्मीर समस्या "अंतर्गत प्रश्न " म्हणत भारत इतरांना हस्तक्षेप करु देत नाही. ज्याक्षणी "आम्ही काश्मीर जिंकलय; काश्मीरींना धडा शिकवू" अशा अविर्भावात भारत उघडपणे वावरेल; तेव्हा तो गोत्यात येइल.
शिवाय "तिकडे पहा २ लाख लोक मारलेत . आम्हाला दोन हजार तरी मारु द्यात" ही निर्लज्ज, घाणेरडी मागणी आहे.
उद्या हमास्/हिज्बुल्ला "हिटलरनं साठेक लाख ज्यूज् मारलेत. आम्हाला साठ सत्तर हजारांचं तरी हत्याकांड करु द्या." असं म्हणाले तर आंतरराष्ट्रिय समुदाय त्यांनाही आवरतं घ्यायचा, सबुरीनं घ्यायचा सल्ला देइल.
फेसबुक
सोशल चोर.
चोरी करताना कॉम्प्युटर दिसला, फेसबुक चेक केले आणि लॉगाऊट करायला विसरला आणि पकडला गेला. http://minnesota.cbslocal.com/2014/06/23/thief-forgets-to-log-out-of-fa…